विजेचा मनमानी वापर

Submitted by साद on 8 May, 2018 - 02:59

एखादा सुटीचा दिवस असतो. योगायोगाने त्या दिवशी आपली आवडती क्रिकेट म्याच टीव्हीवर चालू असते. ती अगदी रंगात आलेली असते आणि आपण ती एन्जॉय करत असतो आणि अचानक ते प्रक्षेपण बंद पडते. कारण? अर्थातच विजेचे भारनियमन. मग आपली प्रचण्ड चिडचिड होते आणि नकळत आपल्या तोंडून “आय* त्या वीज ***च्या”, असे उद्गार बाहेर पडतात.

अशा प्रकारे रंगाचा बेरंग करणारे आणि आपल्या कामाचे वेळापत्रकही बिघडवून टाकणारे भारनियमन आपल्याला उन्हाळ्यात छळते. मेट्रो आणि मोठ्या शहरांत याची झळ फार नाही बसत. पण बाकी गावांत विजेच्या नावाने शंख होत असतो. विजेच्या अपुर्या उत्पादनाबाबत आपण सरकारच्या नावाने बोंब मारून मोकळे होतो. पण उपलब्ध विजेचा वापर आपण काळजीपूर्वक व काटकसरीने करतो का?

अंघोळीसाठी (अगदी उन्हाळ्यात पण) बरेच गरम पाणी तापवण्याच्या नादात आपण बाथरूममधील गिझर हे घरातील सर्वाधिक वीज वापरणारे उपकरण आहे हे विसरून जातो. काही घरांत तसेच कार्यालयांत विजेचा मनमानी वापर चालू असतो. दिवसा सर्व पडदे लावून घ्यायचे, अंधार करायचा आणि मग ट्यूबलाईटी जळत ठेवायच्या. हा सगळा उफराटा प्रकार आहे. आपल्या खोलीतून बाहेर पडताना दिवे व पंखे खुशाल चालू ठेवणे, फरश्या पाण्याने धुतल्यावर त्या वाळण्यासाठी फुलस्पीडमध्ये पंखे लावणे, ४० C तापमान असताना ड्रायरने कपडे वाळवणे.... ही सर्व विजेच्या उधळपट्टीची लक्षणे आहेत.

आता रात्री बाहेर पडून बघा काय दिसते ते. कितीतरी ऑफिसेसच्या पाट्या रात्रभर neon signs मध्ये झळकत असतात. हॉस्पिटल व अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत हे योग्य आहे. पण, जे उद्योग रात्री कायम बंद असत्तात त्यांनी अशी वीज जाळावी काय?
‘एसी’ चा वापर पण खूप काळजीपूर्वक व्हायला पाहिजे. काही घरांत तो २४ तास चालू असतो. अहो निदान पहाटे तरी बंद करा ना राव. अजून ती उत्सवांची डोळे दिपवणारी रोषनाई तर काय वर्णावी? अन ते रस्त्यावरचे सार्वजनिक दिवे सकाळी ८ पर्यंत चालू दिसले की पण फार राग येतो.

वीज उत्पादन ही खर्चिक बाब आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण यामुळे विजेची मागणी कायम वाढतीच राहते. सोलरचा वापर आपल्याकडे तसा कमीच आहे. वीजनिर्मितीचे नियोजन हा तज्ञांचा विषय आहे. पण नागरिक म्हणून विजेचा काळजीपूर्वक वापर ही तर आपलीच जबाबदारी आहे. आधीच उन्हाळ्याने लाही लाही होत असते आणि त्यात कुठे विजेची नासाडी होताना दिसली की मग डोके अगदी सटकते बघा.

बस्स, सर्वांना वीज जपून वापरायचे आवाहन करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यापेक्षा लोकांनी सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला तर खूप फरक पडेल. इंधन, प्रदूषण, वाहतूक तिन्ही बाबतींत.
मुंबैची बेस्ट तोट्यात आहे आणि खाजगी मोटारी, ओला-उबर-रिक्षांच्या रांगा आहेत.
मी राहतो त्या भागात कमी अंतराच्या पण नियमित प्रवासाच्या म्हणजे कॉलनीपासून स्टेशनपर्यंत जाणाऱ्या बसेस कायम रिकाम्या जातात. अगदी पीक अवर्समध्येही. मनपाच्या शाळेच्या वेळा सोडल्या तर.

यापेक्षा ँलोकांनी सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला तर खूप फरक पडेल. इंधन, प्रदूषण, वाहतूक तिन्ही बाबतींत. >>> टोटली. एक मोठा वर्ग जो पूर्वी बेस्ट वापरत होता तो आता एसीमधून आरामात जाउ म्हणून जास्त पैसे देउन या सुविधा वापरतो असे झाले असावे का? खाजगी मोटारींचेही तसेच असावे.

पुढच्या महिन्यात विज बिल मधून वजा होतात युनिट.

तुमचा वापर दर महिन्याला कायम सौर उर्जा निर्मितीपेक्षा कमी असल्यास वीज वितरण कंपनी वर्षाच्या अखेरीस (१एप्रिल- ३१ मार्च) फक्त एकुण वीज निर्मितीच्या १०% युनिटचा मोबदला देते. पुढील वर्षाला पुन्हा नेट मीटर शुन्य केले जाते. म्हणजे अंदाजे वर्षाला १५० युनिट फुकट जातात.

बहुतेक मॉडर्न ऑफिस बिल्डिंग्जमध्ये सेंट्रलाइज्ड एसी असतात. बारा महिने.
आपापल्या प्रशासनांना सांंगून वीज वाचवायची उत्तम संधी आहे.
शिवाय मुख्य दारं सतत उघडली जात असल्याने विजेचा वापर खूप वाढतो.
लहान लहान डहाळ्या कापण्यापेक्षा बुंध्यावरच घाव घाला असं थोरले बाजीराव सांगून गेलेत.

बहुतेक मॉडर्न ऑफिस बिल्डिंग्जमध्ये सेंट्रलाइज्ड एसी असतात. बारा महिने.
>>>
वर आरारांनी लिहिले आहे त्याप्रमाणे एसीची गरज बहुतेक ठिकाणी असते. मात्र एसी आहे म्हणून रचना हवी तशी करू, मग एसी वाट्टेल तितका चालवला तरी चालेल ही मानसिकता आता बदलत आहे. LEED प्रमाणित स्थापत्य / रचना / डिझाइन सामान्य मापक आहे आता. अमेरिकेत जुनी मिडवेस्टमधली ऑफिसेस पाहिलीत तर त्याला खिडक्या वगैरे नसतातच. प्रकाश, हवा सगळे कृत्रिम साधने वापरून उपलब्ध केलेले असते. आता नैसर्गिक स्त्रोतांचा शक्य तितका वापर केला जातो. युरोपमध्ये माझा जो थोडाफार अनुभव आहे त्यात मी लोकं खिडक्या उघडून काम करणे पसंत करतात असे पाहिले आहे. जरा स्प्रिंग सुरू झाला की स्वेटर घालून बसतील पण खिडक्या लगेच उघडतील.

आमच्या भारतातल्या ऑफिसात संध्याकाळ ६नंतर एसी बंद करतात. सिलिंग फॅन वापरणे अपेक्षित असते अगदीच उकडत असेल तर. सिलिंग फॅन जर अपेक्षे इतपत रिलिफ देत नसेल तर स्टँडिंग फॅन देतात. ऑफिसच्या गेस्ट हाउस/हॉस्टेलमध्ये सोम ते शुक्रवार सकाळी ८ ते संध्याकाळी ६ एसी बंद ठेवतात.

सांगायचा उद्देश की एनर्जी कन्झर्वेशनचे प्रयत्न मोठ्या उद्योगातून केले जात आहे. त्यासाठी क्रेडिट वगैरेही मिळतात. उर्जेचा वापर करणे तितकेच गरजेचे आहे - त्याशिवाय विकास शक्य नाही. उर्जेचा वापर करताना तो एफिशियंटली करणे सर्वांच्याच फायद्याचे आहे.

डासांचा उपद्रव थांबवला तर मोठ्या प्रमाणावर घराघरातून रात्री वापरली जाणारी फॅन व आता एसीची गरज खूप कमी होईल. हे सगळीकडेच आप्लाय होणार नाही. उदा. विदर्भात, हैद्राबादला खिडक्या उघड्या ठेवल्या तरी रात्री फॅन लावावा लागेलच. मात्र पश्चिम महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी रात्री खिडक्या उघडल्या तर एसी नक्कीच लावायला लागणार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र डासच एव्हडे प्रचंड आहेत की दिवसासुद्धा खिडक्या उघड्या टाकता येत नाहीत. डासावर काही जालीम उपाय झाले तर "आह" होईल. काँग्रेस* गवताचा नाश झाला तसा डासांचाही होणे अशक्य नसावे.

*काँग्रेस गवताचा आणि मोदी-रागा भाजपे-काँग्रेसचा संबंध नाही. म्हणजे नाव पडले ते मिलो गव्हातून आलेल्या तृणामुळे पडले असे ऐकून आहे. मात्र इथे काँग्रेस हा शब्द फक्त आणि फक्त गवताच्या बाबतीत वापरलेला आहे.

भरत Wink
मी वर लिहिलेला मुद्दा पाहा एकदा. सरळ जिथे शक्यय तिथे घरून काल्म करू देत पब्लिकला. सगळाच खर्च वाचेल. ट्रान्सपोर्ट, वीज, ऑफिस इन्फ्रा, एअर कंडिशनिंग, कँटीन एक्सपेन्सेस इ. इ.

आणि हो, घरूनच कामं करायचीयेत म्हटल्यावर मुं/पु/मोठी शहरं इकडे लोक कमी येतील, अ‍ॅटलीस्ट आपल्या गावच्या (इथे गाव म्हणजे खेडेगाव अपेक्षित नाही तर तुलनेनं लहान शहर जिथे आयटी इंडस्ट्री नाही; अर्थात खेड्यातही जर रिलायबल पॉवर आणि इंटरनेट सोर्स असेल तर तिथेही हे शक्यय) घरात राहून ही भागेल...

योकु, घरातून काम करणे शक्य आहे असे उद्योग वा कामाच्या संधी एकून नोकरी धंद्याच्या तुलनेत किती आहेत? आयटी इन्डस्ट्री व बॅक ऑफिसमध्ये काम करणारी माणसे सोडल्यास बहुसंख्य नोकर्‍या-उद्योगासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची गरज आहे. त्यामुळे घरातून कामाची परवानगी दिली तर फरक पडेल पण तो फार नसेल. आमच्याच कंपनीत जवळपास दोन आठवडे आता घरातून काम करता येते व त्यामुळे कंपनीतील रिसोर्सेसवरचा ताण नक्कीच कमी झालेला आढळतो. पुन्हा हे प्रत्येक टिमला शक्य नसते. जिथे डेटा सिक्युरिटीवगैरे कन्सर्न्स आहेत तिथे कर्मचार्‍यांना ऑफिसमधूनच काम करावे लागते.

वीस वर्षांआधी या संकल्पनेची खूप मार्केटींग केली गेली की आता लवकरच लोकांना प्रवास करायची गरज पडणार नाही, कारण सगळं घरात बसूनच कामे होतील, विडिओ कॉनफरन्सींग ने . प्रत्यक्ष जायची गरज नसणार. त्यामुळे इंधन वाचेल, वेळ वाचेल, कितीतरी जास्त काम होईल, लोकांनाही कुटूंबाजवळच राहता येईल, शाळा-ऑफिसेस सगळे बंद होतील वगैरे वगैरे...

आता....... वीस वर्षाने टेस्लाच्या इलेक्ट्रीक कारचे कौतुक ऐकतोय.... ड्रोन चा वापर माणसे नेण्यासाठे होइल का ते बघतोय, बोअरींग कंपनी... लूप ट्रेन्स इत्यादीं कल्पनांना फुचरिस्टीक म्हणून डोक्यावर घेतले जातेय... अरे भौ. ते तुमचे विडिओ कॉन्फरन्सींग आणि ३डी प्रोजेक्शन चे काय झाले? कुठवर आलंय....?

बुलेट ट्रेन येतेय हो.
घरून काम आणि ह्विडियो कॉन्फरन्स, ऑनलाइन संवाद,डेटा, डॉक्यूमेंट एक्सचेंज. बुलेट ट्रेनमधून.
आणखी काय?

ट.स. खूप असा फरक नाही पडणार पण हातभार तरी लागेल... आणि या जगड्व्याळ पसार्‍यात बीट्स - पीसेस नी खूप काही अचीव होईल.

टेस्ला (आणि गूगल) इलेक्ट्रिक कारपेक्षाही ऑटो पायलट टेक्नोलोजी आणत आहेत त्याने ओनरशिप पॅटर्नच पूर्ण बदलून जाण्याची शक्यता आहे.

हातभार तरी लागेल... आणि या जगड्व्याळ पसार्‍यात बीट्स - पीसेस नी खूप काही अचीव होईल.>>>>+ 11

यावरून जागतिक पृथ्वी दिनाची आठवण झाली. वर्षातून १ दिवस मोजक्या लोकांनी १ तास सर्व दिवे बंद करून फार काय साध्य होते असा प्रश्न विचारला जातो. तर ती कृती प्रतिकात्मक असते. त्यातून इतरांनी स्फूर्ती घ्यावी अशी भावना असते.
पण याहीपेक्षा जगातील अनेकांनी आठवड्यातून एकदा ठरवून काही वीज बचत केली तर त्याचा एकत्रित परिणाम मोठा असतो.

पाश्चात्त्य विकसित देशांचे हे कारस्थान आहे अविकसित आणि विकसनशील देशांविरुद्ध. त्यांनी अमर्याद वापर करुन घेऊन आपल्या मूलभूत सुविधा मजबूत करुन घेतल्या. तेच आता अविकसित व विकसनशील करत आहेत तर पर्यावरण खतरेंमें, वीज वाचवा, पाणी वाचवा इंधन वाचवा वगैरे.. कार्बफूटप्रिंट यांवत्यांव.. त्यांना कॉम्पीटीशन नकोय... त्यांची ग्रीनपीस वगैरे संस्था का इकडे हैदोस घालत असतात?

प्रतिकात्मक करुन विकसनशील देशातल्या सुशिक्षित आणि प्रगतीक्षम पापभीरु लोकांमध्ये गिल्ट पेरण्याचे काम आहे ते.. मला आजही गाडीवर पाइपने पाणी मारुन धुतांना गिल्ट फील होते.. मग गाड्या कशा धुवाव्या? तर गाड्याच घेऊ नये पब्लिक ट्रान्सपोर्टने जावे इथंपर्यंत गाडी येते.. म्हणजे ह्या गिल्ट फीलींग पायी आपला विकास हा पर्यावरणाला भकास करणारा असल्याने तो करुच नये असे वाटायला लागते. आणि आपण स्वतःला अपराधी समजून प्रगती थांबवतो. मात्र पाश्चात्त्य देश सर्व काही भरमसाठी खर्च करत असतात मनसोक्त... ते चालते.

हो ना, आणि आपल्याला कार्बन क्रेडिट चे आमिष दाखवून ते प्रदूषण करायला मोकळे. आपण मस्त चार पाऊले मागे प्रगतीत.

एका लाईफ हॅक नुसार जर प्रत्येक उपकरणावर ते तासाला किंवा १० मिनिटामध्ये किती विजेचा वापर करते त्याचा उल्लेख केला (किंमत) तर अनावश्यक वापर टाळला जायची शक्यता वाढते.

बाकी, तुम्ही धरणांचा आणि विस्थापनाचा मुद्दा मांडलात ते छान केलेत. नर्मदा प्रकल्प, त्याची वाढवलेली उंची, विस्थापितांसाठी आंदोलने करणार्‍या मेधा पाटकर यांच्याबद्दलची आपापली मते यानिमित्ताने लोकांनी आठवून आणि तपासून [पाहिली तरी पुरे होईल. मुळात तिथे, "मला काय पडलंय" असा विचार आपण केला होता की नाही, हेसुद्धा.
<<
फिस्सकन हसू आलं.
अहो, नर्मदा, सरदार सरोवरात काही चुकीचं कसं होईल? मोदी "जीं" नी बांधलाय ना तो? Rofl

*

बाकी प्रतिसाद पुढे वाचून

लोकहो,
वीज "वाचवा" हा प्रकार मुळातच थोडा गंडलेला आहे.

याचे मूळ सरकारच्याने पुरेशी वीज पुरवता येत नाही, याच्यात आहे.

वीज, हा फॉसिल फ्युएल सारखा दुष्प्राप्य वा नॉन रिन्युएबल आयटम नाही. वीज बनवताना फॉसिइल फ्युएल्स वापरतात, हे सत्य असले, तरी वारा, पाणी, लाटा, ऊन इ. वापरून बक्कळ वीज बनवता येऊ शकते. हे बनवायला मेगा इन्वेस्टमेंट मसल लागतो. हा आपणच टॅक्सरूपाने आपल्या सरकारला, किंवा बँकेतील बचत मार्गे कर्ज देऊन कुण्या कंपनीला दिलेला असतो. यात कंपन्या सरकारला कंट्रोल करून नफा कमवण्यासाठी गडबड्गुंडा करतात हे सत्य आहे. अन आत्ता अभ्यासू लेखना चा टंकाळा आलेला आहे.

वीज नावाच्या प्रकाराचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे, की एकदा बनली की ती वापरावीच लागते. साठवूण ठेवणे जिकिरीचे अन नवी बनवण्यापेक्षा कित्येक पट अधिक खर्चिक आहे.

ग्रिड युजर्सपैकी अनावश्यक वीज वापरकर्त्यांनी कमी वापरावी, अन तसे केले तर इतरांना वापरता येईल, याबद्दल बोलताना खोलीतला २३ वॅटचा एलईडी बंद करणे किंवा ४० वॅटचा पंखा बंद करणे, हे इलाज थोडे हास्यास्पद आहेत.
१० मजली बिल्डिंगमधे लिफ्ट एकदा वरून खाली किंवा खालून वर "रिकामी" जाते तेव्हा किती खर्च होतो? जाहिरातींच्या बोर्डांवर लावलेल्या लाईटांतून किती वीज वाया जाते? वर लिहिलंय तसं सेंट्रल एसी, मॉल्स, इ. मधे किती वेस्टेज होते?

सर्वात महत्वाचे म्हणजे, वीज चोरी.

सार्वजनिक मालमत्ता बेदरकारपणे वापरण्याची मानसिकता.

लोखंडी पलंगाला विजेच्या तारा बांधून विहिरीत टाकून विहीरभर गरम पाणी लग्नाच्या वर्‍हाडाला देणारा "फुकट" वीजधारक शेतकरी मला ठाऊक आहे. चोवीस तास आकडे टाकून चालणार्‍या झोपडपट्ट्या, अन पॉवरलूम्स, अन गणपती गर्ब्याच्या आराशी, अन तसाच मोट्ठा रेडिऑलॉजिस्ट वीज चोरीच्या आरोपात सापडलेलाही ठाऊक आहे.

सोलार पॅनल्स फोडणारे, विंड मिल्सच्या कॉपर वायर्स चोरी करुन विकणारे संभावित भामटे ठाऊक आहेत, अन 'सर, मीटर अ‍ॅडजस्ट करून देतो', सांगणारे एमेसीबीचे एम्प्लोयीजही ठाऊक आहेत.

विंडमिल्समुळे वार्‍यातली ताकत शोषलि जाते, अन सोलर पॅनल्स मुळे सूर्य कमजोर होईल असले (वि)ज्ञान पाजळणारे बिप्लवदेव छाप राईट विंगर्सही ठाऊक आहेत. Lol ( अ‍ॅटॉमिक पॉवरबद्दल बोलूच नये.. शंकराची पिंड अणुभट्टिच्या आकाराची असते इतकेच यांचे व्हॉट्सॅप ग्यान!)

हे इतकं जरी सरकारने इमानदारीत बंद केलं तरी मला माझ्या शांत झोपेसाठी लागणारा माझ्या पैशाने विकत घेतलेला एसी, माझ्या कमाईतून बिल भरुन २७-२८ डिग्रीला रात्रभर चालवताना गिल्टी वाटणार नाही. (लोड शेडिंग नसेल असे गृहित धरून बरं का!)

मुंबईत अलीकडे अनेक ठिकाणी नळांतून गॅस येतो. त्याच्या दाब आणि उष्णता अधिक असल्यामुळे गॅस स्टववर ठेवलेल्या भांड्याच्या तळाच्या बाहेर ज्वाळा पसरते. इतक्या उष्णतेची आवश्यकता नसते. ती बाहेर पसरून स्वयंपाकघराचे तापमान वाढवते. ( यामुळे किचनमध्ये फ्रिज असेल तर त्याची कार्यक्षमता कमी होते ते वेगळे.) स्टवची चावी कमी करूनही विस्तव जरूरीपेक्षा जास्तच राहातो. म्हणून गॅसपाइपला असलेल्या नियंत्रण चाव्या (गॅस बंद करायच्या मुख्य चाव्या) पूर्ण ९० अंशांत उघडू नयेत. त्या अर्धवट उघडल्या की स्टवपर्यंत गॅस कमी पोचतो आणि स्टवच्या चाव्यांद्वारे पाहिजे तेव्हढाच घेता येतो.

या धाग्यातले श्री आ. रा. रा. यांचे सर्व प्रतिसाद आवडले. बोचरे असले तरी सत्य सांगणारे आहेत. आम्ही सामान्य लोक उत्पादन खर्च , वाटपखर्च, वापरखर्च याबद्दल खरोखर अनभिज्ञ असतो. फार भाबडेपणाने विचार करतो.
प्रत्येकाने जरूरीपुरते निसर्गस्रोत नक्कीच वापरावे. पण भड दिखाऊपणा, उधळमाधळ, बेफिकिरी शक्यतो टाळावी हा मध्यममार्ग.

varache kahi pratisad vacuum hasave ka radave kalat naahee. Maza mudda Bhavnik kahi nahi. Sandrp che reports, world bank cha data, Ani ultra amen goshti hyancha don vegavegalya case studies sathi kelelya abhyasavarun lihil aahe. ( 2 ek varshapuri)

हीरा, आमच्याकडे पाइप्ड gas आहे. वेगवेगळ्या वेळी कमीजास्त प्रेशर असतं.
म्हणजे शेगडीचा knob तिथेच ठेवून ज्योत कमीजास्त पेटते.
पण तुम्ही म्हणता तसं नको इतकी जास्त ज्वाळा आणि उष्णता जाणवली नाही.

आरारांचे प्रतिसाद आवडले. मी माझ्यासाठी पुर्ण पैसे देऊन वीज किंवा कुठलेही इंधन वापरण्यात मला कमीपणा वाटत नाही. वाया दवडण्यात मात्र वाटतो. आजूबाजूच्या परिस्थिती नुसार वापराचे योग्य प्रमाण मी ठरवतो. ग्रेट लेक्सच्या जवळ रहाताना बॅक यार्ड हिरवं ठेवायला पाण्याची काळजी मी अजिबात करत नाही. भारतात नक्की करेन. कॅलिफोर्निआत 5 वर्षे पाऊस नाही पडला, दुष्काळ पडला तर एक दिवसा आड गवताला पाणी द्या इतपत पाणी कपात असते. आमच्या हापिसात दिवे बंद करायला स्वीच नाहीच आहे. अख्या इमारतीचे दिवे 24x7 जळत असतात. हा अपव्यय वाटतो. पण हे झाडून सगळ्या हापिसात चालतं.

कार मधून मनाला येईल तेव्हा भली मोठी चक्कर मारणे यात इंधन जळणे आणि मला कुटुंबासोबत फिरताना मिळणारा आनंद यातील दुसरी गोष्ट मोठी ठरते. भांडवलशाही झिंदाबाद.

वीज वाचवा हे माझ्या घरातल्यांना ( ज्येष्ठ नागरीक ) अनेकवेळा सांगुनही पटलेले नाहीये. मग माझा संताप होतो. आता उन्हाळा आहे तेव्हा घरातले पंखे सतत चालू असतात. अरे पण तुम्ही ज्या रुम मध्ये काम नाही करत किंवा विश्रांती नाही घेत, तिथला पंखा तरी बंद करा. पण नाही, त्यांना हे सांगणे हा त्यांचा अपमान वाटतो.
माझ्या साबा एका रुम मध्ये गाणी ऐकत असतात, मग मध्येच सिरीयल पहायला हॉल मध्ये गेल्या की फॅन तसाच चालु ठेवुन जातात. हे गेल्या ८ वर्षापासुन चालु आहे. काही वेळा भडकुन मग मी त्या रुम मधली ट्युब बंद करुन छोटा लाईट चालू करते.मला गंमत वाटते की उपकरणे चालू करायला तुम्ही विसरत नाही मग बंद करायलाच नेमके कसे विसरता?

पाण्याचे पण तसेच, आपले काम झाले आहे तर नळ बंद करावा. पण नाही, आम्ही वयानुसार विसरतो हा त्यांचा जाहीर अजेंडा असतो. गोष्टी छोट्या असतात पण त्यांची काळजी घेतली की सारे साधते. कित्येक सोसायटी मध्ये लोक संध्याकाळ झाली की जिने व पर्किंग मधले लाईट लावतात, पण सकाळ झाली की ते बंद करायलाच विसरतात, जणू काही हे त्यांचे काम नसुन तिथल्या सेक्रेटरीचे वा चेअरमनचे आहे.

बाकी नाही, आपलया देशातल्या लोकांना काडीची शिस्त नाहीये. आणी तोंड वर करुन सगळे लोक आजी, माजी सरकारला शिव्या देतात, पण स्वतःची जबाबदारी मात्र झटकुन टाकतात.

पाश्चात्त्य विकसित देशांचे हे कारस्थान आहे अविकसित आणि विकसनशील देशांविरुद्ध. त्यांनी अमर्याद वापर करुन घेऊन आपल्या मूलभूत सुविधा मजबूत करुन घेतल्या >> ते स्वतः केलेल्या चुकांमधून शिकून त्यावर उपाययोजना करत आहेत. त्यांनी स्वतः केलेल्या चुका बाकिच्यांनी करू नयेत म्हणून ते जर आपल्याला सांगत असतील तर त्यात वाइट किंवा कारस्थान काय आहे? प्रगती अमर्याद प्रदूषण करूनच होते असं काही आहे का?

बाकी.. अ. रा. रा. ना +१

Pages