‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पतरु... मजा आगया... आता जरा कपडे फाडूनही नाचून दाखवा... बजाओ रे जंबुरे.. जोर से बजा...
ए बच्चा लोग ताली बजाव.... बजाव बजाव...

Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

शंतलु.. बालिशरे तू... महाराज साम दाम दंड भेद नीती जाणणारे कुशल राजा (इंग्रजीत किंग म्हणतात) होते... अशी पत्रे त्यांच्या राज्यकुशलतेचा, माणसे ओळखण्यचा, संवादकौशल्याचा सुंदर नमुना आहेत. तुम्ही निवडून निवडून हिंदू धर्म कसा वाचवला पाहिजे वाली पत्रेच जाहिर करा... त्यातच तुमचा फायदा आहे.

और आन्दो!!!

मुळात हे टायटल माझे नाही तर कवी भूषण याचे आहे.. हाच तो कवी भूषण ज्याने राजांची स्तुती गायली रायगडावर येऊन आणि तोच हे म्हणतो. जे राजांना चालते ते या भामट्यांना चालत नाही. यांच्याकडून कसला ऐकायचाय इतिहास.. जो भूषण ज्याचा राजे सन्मान करतात त्याच्या वाक्याला 'भिकारचोट' वगैरे म्हणवून अप्रत्यक्षपणे शिवाजी राजांचा अपमान करतात ही लोकं. हे असे ब्रिगेडी आहेत म्हणून ५७% मुस्लीम, नूरखान बेग, मुस्लीम अंगरक्षक, राजांनी मशिदी बांधल्या, रायगडावर मशीद होती, राजांच्या हातात कुराण, औरंगजेब चांगला, अफजलखान फक्त सीमा वाढवायला आला होता, औरंगजेबाने मंदिरे पाडून मशिदी बांधल्या तरी तो राजकीय हेतू, नेतोजी पालकरचे धर्मांतर केले तरी राजकीय, वगैरे प्रकार सुरु झालेत.

असल्या पेड trolsला आता उडवून उत्तरे देणार. पुराव्यांनी बोला नाहीतर एकाही प्रश्नाला उत्तर मिळणार नाही. काय घालायचाय तो गोंधळ घाला मग माझ्या नावाने.

Submitted by तर्राट जोकर on 14 May, 2018 - 19:42
शंतलु.. बालिशरे तू... महाराज साम दाम दंड भेद नीती जाणणारे कुशल राजा (इंग्रजीत किंग म्हणतात) होते... अशी पत्रे त्यांच्या राज्यकुशलतेचा, माणसे ओळखण्यचा, संवादकौशल्याचा सुंदर नमुना आहेत. तुम्ही निवडून निवडून हिंदू धर्म कसा वाचवला पाहिजे वाली पत्रेच जाहिर करा... त्यातच तुमचा फायदा आहे.

और आन्दो!!!>>

अरे सर्कशीतल्या जोकरा, राजांनी असे लिहिले म्हणून फाटली का तुमची. जयसिंगाला लिहिले आहे. जो औरंगजेबाचा नोकर होता. तुझी आकलनशक्ती कमी आहे. या पत्राला खोडून दाखव.. राजांनी लिहिलेले मानायला पण तुम्ही ब्रिगेडी तयार नाही. कसले शिवभक्त तुम्ही डोंबल?? तुम्ही तर मुघल भक्त!!

तुम्ही इस्लाम धर्म वाचवला पाहिजे अशी पत्र असतील तर दाखवा की. राजांनी हिंदुधर्म उल्लेख केला की राजांची कुशल राजनीती वगैरे सांगायचे बंद करा आता.. एक हिंदू माणूस दुसऱ्या हिंदू माणसाला लिहितो आहे. मानायची हिम्मत नसेल तर सोडून द्या. शिवाजी झेपणारा विषय नाही आहे आणि नुसते बी. ए. करून तर नाहीच नाही..अस्सल समकालीन पत्र वाचली की शिवाजी कळतो.

@ shantanu paranjpe
उत्तम व समर्पक टायटल. पुन्हा एका छान लेखाबद्दल अभिनंदन!

अख्ख्या चर्चेत... मी किंवा इतर कुणीही औरंगजेब हा अतिशय चांगला पापभीरु वगैरे होता, उगाच लोक त्याला बदनाम करतायत असे म्हटले नाही किंवा सुचवलेलेही नाही. खरे इतिहासअभ्यासक व्यक्तिगत अभिनिवेश आणि भावना (भावना बरे.. मतं नाही) बाजूला ठेवून इतिहासाचा तटस्थपणे अभ्यास करतात...
शिवाजी महाराज महान प्रेरणादायक राजे होते, अजूनही आहेत... त्यांच्यापासून शिकावे आणि आयुष्यात वापरावे तितके गुण कमीच ... त्यांच्या रयतेबद्दलच्या काळजीला, राज्यकुशलतेला, सर्वसमावेशक बुद्धीला खरा भारतीय नेहमीच नमन करत आला आहे. तो वादच नाही.

प्रश्न आहे की.... शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे खरे की औरंगजेबाने घाबरुन जाऊन भारतभरच्या हिंदू राजे आणि सरदार यांना हिंदू बनवले नाही हे खरे?
दोन्ही विधाने शंतनु यांचीच आहेत. आणि दोन्ही विधानांतला कॉन्फ्लिक्ट पण त्यांना कळलाय... तरी बिचारे उगीच आपटधोपट करत आहेत.
त्यांच्या मदतीला आलेल्या दोन चार लोकांनाही आरडाओर्ड्याशिवाय काही करता येत नाहीये... अरे भौ, तुम्हीच केलेले विधाने तर सिद्ध करा.... दोन दिवस झाले... तिथंच अडलंय गाडं....

या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो. दोन पैकी एक खरे असले पाहिजे. पण यांची इकडे आड तिकडे विहिर झालंय...

(शूक शूक... दोनो चीज में जीत तो आपकीही है.... हे तुम्हाला समजत का नाहीये हे मला समजत नाहीये Rofl )

शिवाजी झेपणारा विषय नाही आहे आणि नुसते बी. ए. करून तर नाहीच नाही..अस्सल समकालीन पत्र वाचली की शिवाजी कळतो.>>>>>जाऊद्या परांजपे. चार पुस्तकं वाचल्यावर इतिहासकार म्हणून घेणाऱ्यांसमोर कुठे डोकं फोडतातय.

मशिदी देखील बांधू दिल्या दुसऱ्या जागी.>>> शिवाजी महाराजांनी एकही मशीद बांधली नाही.. बांधली असल्याचा पुरावा द्यावा!!

>> नक्की कसला पुरावा हवाय? मशिदी बांधू दिल्या ह्याचा की महाराजांनी मशिद बांधली याचा? कारण त्यांनी म्हटले आहे की बांधू दिल्या... आणि तुम्ही म्हणताय की बांधली नाही. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत... ते एकदा क्लिअर करा... मग राजांचे पत्र दाखवतो...

ए बच्चा लोग ताली बजाव.... बजाव बजाव...>>>>मी तर चांगलीच वाजवली राहिला प्रश्न माकड्चाळ्यांचा, तर मला वाटत माकडचाळे तुम्हीच बेस्ट करताय, स्वतःच्या पोस्टमध्ये स्वतःच हसण्याच्या चित्र विचित्र स्मायली टाकून. घालमेल समजते , असू द्या होतं कधी कधी.

मला माहिती होतं की तुमचा विरोधात बोलत असल्याने तुम्ही अगदी खास महाराजांची पत्रे घेऊन पीएचडी केलेली असेल तरी त्या पीएचडीची पण पत्रास ठेवणार नाही. म्हणून मी सांगत नव्हतो माझं शिक्षण.... बघा.. तुम्हाला पटत नाही म्हणून तुम्ही बीए शिक्षणाची खिल्ली उडवत आहात... नाकाला तुमच्या शेंबुड आहे. पुसा की राव.

शंतनु लगा.. ते भिकारचोट आहे ना... ते तुझ्या इंटेन्शनला म्हणलंय रं भावड्या... संघी कांगावा नकुस करु रे...

अरे तू भिकारचोट टायटल म्हणले आहे. इथले लोक अडाणी नाहीत वाचायला. आता कवी भूषण पण संघी झाला का रे भावड्या!!

आणि तू बीकॉम, १९९७ वरून बोलला की.. म्हणून म्हणतोय नाव सांग.. कदाचित तुझा खोटेपणा जास्त उघडकीस आणता येईल मला.. 'गाजर' इतिहासवाल्यांची कमी नाही रे आपल्याकडे. नाकाला शेंबूड आमच्या नाही तुमच्या आहे. नेतोजी पालकरला मुसलमान का केले तुम्हाला आयुष्यात सांगता नाही येणार. बसा राजकीय इतिहासाचे ढोल वाजवत.

आणि मशिदी बंधू दिल्या असा समकालीन पुरावा असेल तर दाखव की. पुरावा असेल तर मान्य लगेच करू.. कोण घाबरतंय.. शिवाजी राजानी नवीन मशिदी बंधू दिल्या, बांधल्या कशाचा सुद्धा पुरावा चालेल.

अस्सल समकालीन पत्र वाचली की शिवाजी कळतो.
>> बब्बो. किती तो कान्फिडन्स? लै भारीए... कीप इट अप.

आणि मशिदी बंधू दिल्या असा समकालीन पुरावा असेल तर दाखव की. पुरावा असेल तर मान्य लगेच करू.. कोण घाबरतंय.. शिवाजी राजानी नवीन मशिदी बंधू दिल्या, बांधल्या कशाचा सुद्धा पुरावा चालेल.
>> त्यानंतर काय करशील? इंटेशनली एकतर्फी इतिहास पसरवत आहेस ह्याबद्दल माफी मागशील? का संघोट्यांसारखा परत गोल गोल पिंगा घालत निर्लज्जासारखा पळून जाशील?

त्यानंतर काय करशील? इंटेशनली एकतर्फी इतिहास पसरवत आहेस ह्याबद्दल माफी मागशील? का संघोट्यांसारखा परत गोल गोल पिंगा घालत निर्लज्जासारखा पळून जाशील?>>>

माफी मागायचा काय संबंध?? पुरावा असेल तर असेल. नाकारला कुणी आहे का?? तुम्ही दाखवा मशीद बांधल्याचा/ बांधू दिल्याचा 'समकालीन' पुरावा. बांधू दिली/बांधली असेल तर मी बांधली असे म्हणेन. माझ्या पदरचे काही जात नाही. जे पुराव्यात आहे ते आहे.

आम्हाला तुमच्यासारखी सवय नाही साहेब.. जयसिंगाच्या पत्राला राजांचा मुत्सद्दीपणा, औरंगजेबाने गाय कापली त्याला त्याचा राजकीय हेतू. असले फाटे आम्ही फोडत नाही. जे आहे ते मान्य करतो.

बब्बो. किती तो कान्फिडन्स? लै भारीए... कीप इट अप.>> तुमच्या बी. ए. मध्ये अस्सल आणि समकालीन या दोन्हीला महत्व नसावे बहुतेक. कारण तुला महाराजांच्या पत्रातील एक ओळ सांगितली तरी ती मानायला तू तयार नाही.

कारण तुला महाराजांच्या पत्रातील एक ओळ सांगितली तरी ती मानायला तू तयार नाही.
>> बाळ. म्हणुनच म्हंटलंकी तू अजुन बच्चा आहेस.. मी कधी म्हटलं की ते मानायला मी तयार नाही? सांग बघू?

म्हणजे औरंगजेब धर्मांध होता हे तू मानतोस.. मग विषय संपला तेच मांडायचं आहे मला लेखात!!
नवीन Submitted by shantanu paranjpe on 14 May, 2018 - 20:55

>>> हा हा हा... हे काय होतं? संदर्भ की निष्कर्ष? मला तरी निष्कर्ष काढलेला दिसतोय...! निष्कर्ष काढायला तर्क वापरावा लागतो, तर्कासाठी संदर्भ लागतो... पण तू तर फक्त संदर्भावरच थांबून राहणारा. हे तर्क वापरुन निष्कर्ष काढण्यापर्यंत कशी उडी मारली? कधी?

आता मारलीच आहेस तर माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाक रे बाबा...
१. शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे खरे
२. औरंगजेब हिंदूंच्या उठावाला घाबरुन होता म्हणून त्याने हिंदू राजांना, सरदारांना मुस्लिम नाही केले...

वरील पैकी एक खरे आहे... ते कोणते? दोन्ही तूच मांडलेली विधाने आहेत... आता पर्यंत तू गोल गोल ना ना चा पाढा वाचित होतास... आता निष्कर्ष काढेपर्यंत आलायस तर सांगू शकशील....

परांजपे

शिवाजी झेपणारा विषय नाही आहे आणि नुसते बी. ए. करून तर नाहीच नाही..अस्सल समकालीन पत्र वाचली की शिवाजी कळतो.>>>>>>

प्रथम तुम्ही शिवाजी न लिहीता शिवाजी महाराज असे लिही. पुन्हा नीट सांगणार नाही.

दुसरे की पत्र वाचली तरच अस्सल इतिहास कळतो हे तुमच्या डोक्यात कोणी भरले ते ठाऊक नाही ज्यांनी भरले त्यांना नक्कीच इतिहासाचा अभ्यास कसा करावा याची शिकवणी लावण्याची गरज आहे. माझा निरोप त्यांना नक्की द्या.

तिसरे <<<मुळात हे टायटल माझे नाही तर कवी भूषण याचे आहे.. हा>> यावर आधीच स्पष्टीकरण दिले आहे तरी तुमचे रडगाणे चालूच आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावली वर तुमच्याकडे उत्तर नाही असले असते तर इतका "तमाशा" तुम्ही केला नसता. तुमचा चालू असलेल्या तमाशावरून तुमची पात्रता, आकलनशक्ती व अभ्यास कळतो. संघोट्यांची लायकी फक्त 1 वाक्यात ओळखत.

चौथे इथे एकाही आयजीने औरंग्याबद्दल सकारात्मक वगैरे लिहीले नसताना ही तुम्ही नंगानाच चालवला आहे तो थांबवा. त्याने तुमच्या अकलेचे प्रदर्शन होत आहे. ज्याची आता किव व खंत येऊ लागली. शांत पणे स्वतःचेच प्रतिसाद वाचा तुम्हाला कळून चुकेल.

पाचवे शिवाजी महाराजांचा मृत्यु वर तुम्ही चांगली माहीती दिली तिथे तसे मी नमुद ही केले आहे परंतू त्या मागचा तुमचा सुप्त हेतू कळल्याने शिरशिरी आली. तुम्ही लिहीले चांगले पण तुम्ही धर्म जात फुकाचाअभिमान विशिष्ट हेतू व तिरस्कार यासारख्या अनावश्यक गोष्टीत अडकल्याने तुमचे लिखाण कायम संशयाच्या भोवर्यात येईल. हे न सोडल्यास तुमच्या इतिहासाच्या टिपणांची काडीची किंमत केली जाणार नाही.

सहावे इतिहास हा नेहमी तटस्थ राहून अभ्यासावा तरच तो तुम्ही समजू शकतात हे आमचे सर सांगायचे (ते कोण.. जाऊद्या तुम्हाला न झेपणारे आहे) इतिहास हा का शिकावा? तर आपल्या पुर्वजांची कामे मेहनत यांची ओळख व त्यांनी केलेल्या चुकांचे अध्ययन करून आपल्या पिढीला शहाणे करणे हा उद्देश्य मुख्य आहे.
परंतू तुमच्या अभ्यासाचा उद्देश्य भलताच आहे. पुन्हा सांगतो इतिहासाचा अपमान करत आहात सोईचा इतिहास इतरांना सांगून त्याद्वारे लोकांना भडकवणे वगैरे संघोट्यांचे काम दुर सारा. तुम्हाला अभ्यास खराच करावयास असेल तर दोन्ही बाजूंनी नीट करून त्याद्वारे निरीक्षण निष्कर्ष काढा.

काॅग्रेसने सोईचा इतिहास शिकवला असता तर सावरकारांचा उल्लेख माफिवीर केला असता व हेगडेवार वगैरेना स्थानच दिले नसते. 50 वर्ष शासन केले जाब विचारायची हिंमत एकाही चड्डीत नव्हती. तरी प्रत्येक नेत्यांचा उल्लेख कमीजास्त प्रमाणात पुस्तकांमध्ये करून मुलांना इतिहास नीट सांगितला आहे. जरा लाज बाळगा. तुम्हीतर सत्तेत येऊन 5 वर्ष पण झाले नाही तरी मुलांना घोटाळ्यांचा जे झालेच नाही ते अभ्यासक्रमात शिकवायला दिले इतके हलकटपणा भाजपा संघ शिवाय जगात कोणी करू शकणार नाही.

तुमच्या दृष्टीने विष पेरणे महत्वाचे आहे. राजे काय म्हणाले, याला काडीची किम्मत नाही. कारण धादांत खोटे लिहिण्यात तुम्ही पटाईत आहात.

इथे कल्पतरू अन तंतनु पलांज्पे नामक दोन विषवल्ली उगवल्यात, त्यांना छाटण्याचे काम भरपूर लोक मिळून करताहेत हे पाहून आनंद होतोय.

<<<शिवाजी कळतो>>>बापाला पण एकेरी बोलावतोस का परंजप्या? स्क्रीनशॉट काढून कुठे पाठवला तर जिथं असशील तिथं इतिहास शिकवायला येतील तुला, एडिट कर किंवा डिलीट कर लगेच.

अरे पाटला तू ज्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय त्या पुस्तकाच्या नावातच शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केलाय. तो चालतो व्हय तुला.. आणि एवढाच आदर सन्मान असेल तर माझ्या आधी जी तुमची संघटना आहे ना संभाजी ब्रिगेड, तिला छत्रपती संभाजी राजे ब्रिगेड, किंवा संभाजी राजे ब्रिगेड असे नाव बदलून यायला सांग..

एकेरी उल्लेख करायचा असता तर सगळीकडे केला असता..

राजा आई देवमित्र यांचा उल्लेख हा एकेरी असतो. साहित्यशास्त्राच्या व्याकरणानुसार तो एकेरी उल्लेख असतो. रामाच्या देवळात गेलो असे म्हणतात रामसाहेबांच्या देवळात गेलो असे नाही. एकेरी म्हणजे अनादर नव्हे हे ब्रिगेडी लोकांना अजून झेपत नाही.

इतिहासाचा इतिर्‍हास करा मग भविष्यात विकास होईल. इतिहासात माणस शिरली की एका गर्तेत अडकतात ती बाहेरच येत नाहीत.भुतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होउ नये इतपर्यंतच त्याचा आधार ठीक आहे.अन खरा इतिहास कुणाला माहित आहे? अन माहित झाला तरी भूतकाळात जाउन चुका दुरुस्त करता येत नाही. झाल गेल गटार गंगेला मिळाल. विज्ञानाची कास धरा व भविष्यात वाटचाल करा.

इतिहासात माणस शिरली की एका गर्तेत अडकतात ती बाहेरच येत नाहीत.भुतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होउ नये इतपर्यंतच त्याचा आधार ठीक आहे.अन खरा इतिहास कुणाला माहित आहे? अन माहित झाला तरी भूतकाळात जाउन चुका दुरुस्त करता येत नाही. झाल गेल गंगेला मिळाल. विज्ञानाची कास धरा व भविष्यात वाटचाल करा.

नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 15 May, 2018 - 09:40>>>>>>
+1

अरे बापरे इथे रणकंदन झालेलं दिसतंय (माबोप्रथेप्रमाणे अपेक्षितच होतं म्हणा). इतकं सगळं वाचवलं नाही मला पण तरी बर्‍यापैकी चाळले प्रतिसाद.

तर इथे मी (आगांतुकपणे) व्यावसायिक इतिहासतज्ज्ञ व पुरातत्वज्ञ समुदायातर्फे अत्यंत मनःपूर्वक आभारप्रदर्शन करायला लिहित आहे.
त्याचं काय आहे. इये महाराष्ट्रदेशी हौशे आणि नवशे इतिहासकार भरपूर, अगणित वगैरे. सोशलमीडियाच्या आगमनानंतर तर अगदी पेवच फुटले आहे चढाओढीने इतिहासविषयक पोस्ट्स टाकायचे. गवशे लोक अर्थातच (वेळ नसल्याने) यात फार क्वचित असतात. त्यामुळे बहुतांशी पोस्ट्स, रणकंदन वगैरे सांभाळणारे हौशे असतात. गवशे व्हायचं असेल तर पदव्युत्तर शिक्षणानंतरही काही वर्षं पूर्णवेळ प्रशिक्षण, संशोधनविषयक शिक्षण घ्यावं लागतं, विविध भाषा, लिप्या, शिकायला लागतात, किमान हजारदीडहजार मूळ संदर्भग्रंथ 'क्रिटिकली' वाचावे लागतात, सैद्धांतिक आणि तत्वज्ञानविषयक अभ्यास करावा लागतो. विविध बदललेल्या इतिहासलेखन/विश्लेषणपद्धती अभ्यासाव्या लागतात. या क्षेत्रात जागतिक पातळीवर नवं काय काय होत आहे याची जाण ठेवायला लागते. पण यातलं काहीही न करता महाराष्ट्रदेशात स्वतःला इतिहासअभ्यासक म्हणवून घेता येतेच. सध्याच्या बदलत्या राजकीये विचारसरणींच्या संघर्षात तर अशा अभ्यासकांची सोशल मीडियावर प्रचंड चलती आहे.
फक्त यात आमच्यादृष्टीने सुखाची गोष्ट म्हणजे इतिहास कधीही धड न अभ्यासल्याने/वाचल्याने यातील बहुतांशी प्रजेला शिवाजी-औरंगजेब-मुघल-पेशवे, आर्यप्रश्न, स्वातंत्र्यलढ्यातील पाचसात व्यक्ती आणि घटना या पल्याड गेल्या पाचदहाहजार वर्षांत भारतभू मध्ये काही आणखी इतिहास आहे याचा पत्ता नसतोच. या घटनांविषयीही फक्त कुणाकुणाची जुनी/ आउटडेटेड किंवा दुसर्‍या हौश्या लेखकांची काही पुस्तके किंवा इंटरनेटवरचे लेखन वाचूनच (अर्धीकच्ची) माहिती असते.
पण यामुळे आमच्या इतरांच्या व्यावसायिक इतिहास पुरातत्व अभ्यास-संशोधनाला उत्तम मोकळीक मिळते. कुणाही नवश्या हौश्याची कटकट त्यात फारशी होत नाही (कारण त्या मुद्यांचे, अडचणींचे, सांस्कृतिक प्रक्रियांचे अस्तित्वच मुळात माहित नसते). त्याबद्दल मी अपार अपार कृतज्ञ झाले आहे हल्ली.
तेव्हा असेच चालूद्यात आणि आम्हाला आमचे काम मनापासून करता येत आहे ते करूद्यात. शिवाजी, मध्ययुग, मुघल, पेशवे वगैरे वर ज्यांना खरंच नव्याने काम करायचे आहे ते त्यांच्या मगदुराप्रमाणे करून व्यावसायिक आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत राहतीलच. त्यांचा तुमचा संबंध नसणे स्वाभाविकच आहे. ते तसेच राहूद्यात अशी ईशचरणी प्रार्थना!!

Pages