‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा,

वरच्या प्रतिसादातले 'आम्ही' एकवचनी की अनेकवचनी?

प्रतिसादाच्या शेवटी 'बहुत काय लिहावे' वगैरे लिहीत नाहीत का तुमच्यात? मला वाटलं ऐतिहासिक लेखनाचा समारोप करताना कम्पल्सरी आहे तसं लिहिणं.

आम्ही अनेकवचनी किंवा एकवचनी, वाचक घेईल तसे Wink

बहुत काय लिहावे' वगैरे लिहीत नाहीत का तुमच्यात? >> मुआफी असावी हुजूर, आपले आपण वाचून घ्यावे शेवटी ___/\___

पण तुम्ही मायबोलीवर असताना इतरांनी ह्या विषयावर आपापसात चर्चा केलीच कशी?

उगीच काय काय वाचावे लागले आम्हाला.

तुम्ही लोकं उगाच पुस्तकं बिस्तकं वाचता, पुरावे खोदून काढता, तत्कालीन समाजाच्या संकल्पना आणि समजुतींचा विचार करता. तुम्हाला इतिहासकार व्हायचे असेल तर पहिले म्हणजे स्वतःला काय ऐकल्यावर बरं वाटतं हे पाहायचा. मग त्या मताला सहमती देणारा कोणी काही लिहिले आहे का हे गूगल वर शोधायचा. जमलंच तर शब्दरचना किंवा भाषांतर करून लिहायचा. शुद्धलेखन, व्याकरण वगैरे काहीही मनावर घ्यायचा नाही. नाहीतर डायरेक्ट कॉपी पेस्ट करून टाकायचं. इंटरनेट, ब्लॉग, फेसबुक, व्हाट्सअँप वगैरे तास फ्रीच आहे. नसेलच तर ऑफिस कॉलेज मध्ये असतंच. आपापल्या आवडीचा रंग म्हणजे लाल, हिरवा, पिवळा, निळा, भगवा किंवा आणखी कुठला वापरायचा. कॉपीराईट असा काही असता ह्याचा विचारही मनात ना येऊ देता २ ५ इमेज अपलोड करायच्या. हि सगळी सिद्धता झाली कि मग २ ५ आपल्या बाजूची आणि २ ४ दुसऱ्या बाजूची लोक येतातच. मग मस्त वादविवाद करायचा. मग दोन्ही बाजूंच्याना आपल्या माणसाला विरोध होतोय म्हणजे तो खरंच बोलत असणार असा वाटत राहता. हे सगळं इतका सोपा असताना तुम्ही उगाच उरफोड करून संशोधन करता.

Rofl मज्जा आली, वरदा, चिनूक्स, चिडकू... उत्तम!!!

पदव्युत्तर शिक्षणानंतरही काही वर्षं पूर्णवेळ प्रशिक्षण, संशोधनविषयक शिक्षण घ्यावं लागतं, विविध भाषा, लिप्या, शिकायला लागतात, किमान हजारदीडहजार मूळ संदर्भग्रंथ 'क्रिटिकली' वाचावे लागतात, सैद्धांतिक आणि तत्वज्ञानविषयक अभ्यास करावा लागतो. विविध बदललेल्या इतिहासलेखन/विश्लेषणपद्धती अभ्यासाव्या लागतात. या क्षेत्रात जागतिक पातळीवर नवं काय काय होत आहे याची जाण ठेवायला लागते.
>> ह्या! अस्सं काह्हीच नसतं. इतिहास म्हणजे फक्त संदर्भ.. बाकी सगळं घाला चुलीत. काय समजलें!

>>>>तुम्ही मायबोलीवर असताना इतरांनी ह्या विषयावर आपापसात चर्चा केलीच कशी?>>>>

जर प्रशिक्षित पुराणवस्तू शात्रज्ञाची संभावना खालील शब्दात केली जात असेल तर त्या कावळ्यांच्या सभेत कोकिळे ने गप्पच बसणे चांगले नाही का?
>>>>>>>>
अहो असे अनेक विषय आहेत इतिहासात.. त्यामुळे आपण दूर आहात यापासून हे उत्तम आहे.. पण आम्हा इतिहास वाचकांना हे सहन नाही होत त्यामुळे पुरावे देऊन हल्लीच्या बिनपुराव्यानी केलेल्या मांडण्या खोडून काढाव्या लागतात..>>>>> शिवाजी मृत्यू धाग्यावरून साभार...

वर तुम्ही कोकिळेला सांगा, तू असताना कावळे गातातच कसे ?

>>पण तुम्ही मायबोलीवर असताना इतरांनी ह्या विषयावर आपापसात चर्चा केलीच कशी?<<
Lol बेफि, यु मेड माय डे...

worship.gif

निर्लज्जम सदा सुखी. कावळे म्हणून उद्धार झाला तरी निर्लजासारखे परत त्याच जुन्या विषयावर पोस्ट टाकताहेत.

पण तुम्ही मायबोलीवर असताना इतरांनी ह्या विषयावर आपापसात चर्चा केलीच कशी?
उगीच काय काय वाचावे लागले आम्हाला.
Submitted by बेफ़िकीर on 15 May, 2018 - 12:18
<<

अगदी !
Lol

मला जे काही लिहायचं होतं ते लिहून मी काल माझ्यापुरता विषय संपवला होता. पण रात्री या धाग्याचे लेखक शंतनु परांजपे यांची मायबोली सुविधेतून आलेली ई-मेल मिळाली. त्यातील वैयक्तिक संदर्भ, उल्लेख गाळून त्याचा मजकूर इथे देते आहे. आणि त्यावर मला काय वाटतं तेही इथेच लिहित आहे कारण एकुणात यात वैयक्तिक काही नाही म्हणून. परांजपे यांना याचं उत्तर शक्यतो खाजगीच हवे असणार हे मला कळतं आहे परंतु एकुणातच सोशल मीडियातील अर्ध्याकच्च्या इतिहास 'लेखना'विषयी बोलायचे होते म्हणून मी इथे कॉपी-पेस्ट करते आहे.

<<अंशतः तुमचे बोलणे पटले. पण मध्ययुगात वावरणाऱ्या माझ्या सारख्या वाचकाला सातवाहन, वाकाटक, चालुक्य, शिलाहार यांच्यातही तेवढाच रस आहे. कदाचित तुमच्यासारखे उत्खनन नाही जमणार कारण माझे ते प्रोफेशन नाही पण याचा अर्थ पत्ता नाही असे होत नाही. प्राचीन इतिहासतद्न्य आणि मध्ययुगीन इतिहास अभ्यासणारे यांच्यात वाद का आहेत याचा अजूनही मला पत्ता लागला नाही...........
माझा ओढा किल्ल्यांपेक्षा लेणी आणि मंदिरे यांच्याकडे थोडाफार अधिक आहे. त्यामुळे बर्जेस, फर्ग्युसन हे वाचले जातातच. पण मला मध्ययुगात रस आहे कारण सोमवार ते शनिवार घरी बसून त्याचा अभ्यास करता येतो. पण वस्तुस्थिती सांगायची झाली तर आजघडीला प्राचीन इतिहासापेक्षा सामान्य लोकांना मध्ययुगात जास्त रस आहे त्यामुळे त्यांचे गैरसमज आपसूक दूर करणे हे ओघाने येतेच. माझ्या ब्लॉगवर सातवाहनांच्या ३ लेखांच्या लेखमालेपेक्षा जर शिवाजी राजांच्या एका लेखाला लोकांचा प्रतिसाद जास्त मिळत असेल तर आपसूक एक लेखक म्हणून मी शिवाजीकडेच वळणार.
सातवाहन, चालुक्य, शिलाहार हे सुद्धा यायला हवेतच वादच नाही पण तिथे पण अभ्यासकात मतभेद खूप आहेतच की. कुणी म्हणतो भाजे पहिली तर कुणी कोंढाणे, आक्षीचा लेख देवनागरी मधला पहिला का श्रवणबेळगोलचा असे अनेक वाद आहेतच की. लोकांनाही सुद्धा लेणीवगैरे मध्ये फार रस नाही अहो. छान छान म्हणून पुढे जातात आणि काही सांगायला लागले की ऐकायची तयारी नसते. त्यामुळे तुम्ही पाहिलेत तर बरेच प्राचीन इतिहास संशोधक हे रिसर्च पेपर किंवा पुस्तके यातच जास्त दिसून येतात.
बाकी वरच्या तुमच्या लेखात आक्षेप एकच आहे की 'धड न वाचल्याने लोकांना ते माहिती नसतात', माझ्यामते याला लेखाची भाषा कारणीभूत आहे. मध्ययुगीन इतिहास सोप्या पद्धतीने लिहिता येतो पण लेणी सांगताना मग गवाक्ष, गजपृष्ठाकार वगैरे क्लिष्ट शब्द वापरावे लागतात त्यामुळे ते अनेकांच्या डोक्यावरून जाते. तो जर इतिहास सोप्या पद्धतीने लिहिता आला त्यातील रंजकता अजून वाढेल.
माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतो आहे कारण तुम्ही यातील तद्न्य आहात आणि तुमचा अभ्यास जास्त आहे. पण रिप्लाय वाचला आणि म्हणणे मांडावेसे वाटले म्हणून हा प्रपंच.>>>

१. मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहास/पुरातत्व या अभ्यासकांत वाद अजिबातच नाहीत. भूतकाळाचा अभ्यास करायच्या या दोन वेगवेगळ्या शाखा-उपशाखा आहेत. जेव्हा ज्या उपशाखेची गरज असते त्याची मदत घेतली जातेच. तुमच्या डोळ्यांसमोर ते होत नाही म्हणजे होत नाही असे नाही.
२. तुमच्या उल्लेखावरून तुम्ही विद्यार्थी आहात हे उघड आहे. तुम्हाला रोजच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासांत रस आहे, तुम्ही त्याविषयक पुस्तके वाचता हे कौतुकास्पद आहे. परंतु चार (किंवा चाळीस) पुस्तके वाचली की तो विषय कळतो, त्यातील 'गैरसमज' किंवा प्रॉब्लेमॅटिक जागांचे आकलन होते असे तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. विशेषत: कुठल्याही विद्याशाखेबद्दल हे तितकेच लागू आहे. त्यासाठी त्या विद्याशाखेचे किमान काही तांत्रिक प्रशिक्षण आवश्यक असते. काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. वाचनाचा परिघ वाढवावा लागतो. उदाहरणार्थ - तुम्ही लेण्यांसाठी फर्ग्युसन, बर्जेस वाचता. ठीक आहे. पण त्यानंतर गेल्या शे दीडशे वर्षांत एतद्देशीयांनीही लेण्यांमध्ये भरपूर पुढील संशोधन केलेले आहे. त्यांचे फक्त व्यावसायिकच नव्हे तर पॉप्युलर पातळीवर समजतील अशीही काही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची माहिती, वाचन तुमचे आहे का? तुम्ही जे मतभेद उल्लेखत आहात ते का आहेत याचं तांत्रिक/ सैद्धांतिक आकलन तुम्हाला होतं का? त्यावर तुमचं स्वतःचं स्वतंत्र मत असण्याइतकं वाचन, अभ्यास आहे का?
प्राचीन इतिहास सातवाहन, वाकाटक, शिलाहार अशा राजघराण्यांच्या चौकटीतून अभ्यासला जात नाही. हा विश्लेषणपद्धतीचा बदल होऊनही कितीतरी दशके उलटली आहेत. याची तुम्हाला माहिती आहे का?
हे प्रश्न मी विचारते आहे ते तुम्हाला कमी लेखायला म्हणून नव्हे तर तुमची लेखक म्हणून नक्की भूमिका काय आहे ते स्पष्ट करून घ्यायला. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर इतिहासविषयक माहिती फक्त संकलित करून लिहिता (मी वाचला नाहीये) का त्याविषयीची तुमची 'मतं' मांडता? अगदी संकलित करून लिहायची असेल तरीही त्या प्रत्येक मुद्याविषयी अद्ययावत वाचन पाहिजे असं नाही का तुम्हाला वाटत? मतं मांडायला, गैरसमज दूर करायला स्वतः संशोधक असावं लागतं असं माझं नम्र मत आहे.
४. इतिहास सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगितला पाहिजे वगैरे ठीक आहे. इतिहास ही कुणा एकाची मक्तेदारी नाही हेही अंशत: वाजवी मत आहे. परंतु या दृष्टीने कुठे कधी काही प्रयत्नच होत नाहीत असे तुमचे मत आहे का? किती जणांना खरंच खोलात जाऊन स्वतःचा वारसा, इतिहास या विषयी निदान ढोबळमानाने जाणून घेण्यात रस असतो? पुणे आणि मुंबईत विद्यापीठांतर्फे दर शनिवार-रविवार असे इतिहासविषयक हॉबी कोर्सेस असतात. शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्राचीन इतिहासावर तज्ज्ञांकडून सोप्या भाषेत मराठीत पुस्तके लिहून घेतली आहेत कधीच. इतरही काही पुस्तके आहेत. ती किती लोक आवर्जून माहिती करून घेऊन वाचतात? फक्त गूगलवर सर्च टाकून समोर येईल ते डोळ्याखालून लोकांनी/नेटिझन्सनी घालणे म्हणजे लोकांपर्यंत इतिहास पोचला असं मानाय्चं का? आणि लोकांना रस नसला तर ठीक आहे ना. ज्यांना आहे ते त्यांच्या परीने रस घेतील. प्रत्येकालाच असला पाहिजे असा अट्टाहास कशाला? आणि इतिहास हा फक्त वैभवशाली मानबिंदूंविषयी नसतो. त्यात बरंच अन्य काही असतं. असो.
५. प्राचीन इतिहास संशोधक रीसर्च पेपरमध्ये दिसण्याबाबत - तो त्यांचा पेशा, भाजीभाकरी मिळवून देणारा, आहे. संशोधक नोकरी करत असो वा नसो, चोवीस तास स्वतःच्या संशोधनाविषयी काम करत असतो. ते संशोधन पूर्ण झाल्यावर व्यावसायिक फोरम्सवर - म्हणजेच अ‍ॅकेडेमिक जर्नल्समध्ये आणि सेमिनार्समध्ये - सादर करणे हा त्याचा अविभाज्य भाग असतो. प्रत्येक वेळेस ते काम सामान्य जनतेला कळेल, रस असेल असे असेलच असे नाही. आणि ते काम मराठीत परत सोप्या पद्धतीने लिहिणे सगळ्यांनाच अनेक कारणांमुळे शक्य असते असे नाही. बहुतांशी नसतेच. प्रत्येक शास्त्रज्ञ/ अर्थशास्त्रज्ञ वगैरे वगैरे त्यांचे काम प्रत्येक वेळेस पॉप्युलर पातळीवर लिहितात का?
६. आता या लेखातील विषयाकडे येऊयात. मी मध्ययुगाची अभ्यासक नव्हे त्यामुळे माझे वाचन, आकलन तुलनेने मर्यादित आहे. पण तरीही काही मते आवर्जून मांडावीशी वाटतात.
औरंगजेब धर्मवेडा होता का नाही हाच मुद्दा अचानक का पुढे आला? तर नुकतेच एका अमेरिकन इतिहासकार विदुषीने औरंगझेबावर पुस्तक प्रसिद्ध केले आहे (Aurangzeb: The Life and Legacy of India's Most Controversial King - Audrey Truschke). त्यात तिचे थोडक्यात म्हणणे असे आहे की औरंगजेब हा सरळ सरळ हिंदूधर्मद्वेष्टा किंवा धर्मवेडा अशा काळ्यापांढर्‍या चौकटीतून न बघता तत्कालिन राजकारण, मानसिकता इत्यादि अनेक संदर्भचौकटीतून अभ्यासला गेला पाहिजे. तो एक अतिशय गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व होता. त्याने काही हिंदू मंदिरे फोडली पण कितीतरी हिंदू मंदिरांना वर्षासने/देणग्या, संरक्षण ही दिले. जैनांनाही दिले. (सगळ्यात विवाद्य ठरलेला हाच मुद्दा)... तिने जदुनाथ सरकारांच्या कामावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत...
आता जदुनाथ सरकार हे अतिशय थोर इतिहासकार होते यात शंकाच नाही. पण त्यांचे औरंगजेबावरचे पुस्तक प्रकाशित होऊन नव्वदपेक्षा जास्त वर्षे उलटली आहेत. या अवधीत इतिहासविश्लेषण-लेखन-सैद्धांतिक चौकटी यात फार मोठे बदल/घडामोडी/प्रगती झाली आहे. साहजिकच इतर कुठल्याही इतिहास संशोधनाप्रमाणेच हे संशोधनही सार्वकालिक अंतिम सत्य ठरू शकत नाही. हिस्टोरिओग्राफी, म्हणजे एखाद्या विषयाच्या संशोधनाच्या इतिहासाचे साक्षेपी पुनर्मूल्यमापन, समजावून घेताना कितीही थोर इतिहासकार असला/ली तरी त्या काळाच्या मानसिकतेच्या चौकटीत त्यांनी कसे काम केले व त्यात काय त्रुटी आहेत याचा लेखाजोखा नवे संशोधन करताना घ्यावाच लागतो. त्यामुळे एकेकाळी जदुनाथ सरकारांचे औरंगजेबाचे चरित्र हे त्या विषयातील सर्वोत्तम पुस्तक असले तरी ते आज नसणार हेही उघड आहे. शिवाय लेखिकेने घेतलेला आक्षेप खराच आहे की सरकारांना जुनी पर्शियन येत नव्हती त्यामुळे त्यांनी मूळ संदर्भ कधीच हाताळले नाहीत. भाषांतरांवर काम चालवले. तसेच व त्यामुळेच त्यांचा 'इंटरप्रिटेशन्स'वर तिने शंका उपस्थित केली हेही ठीकच आहे. या लेखिकेला स्वतःला संस्कृत, जुनी पर्शियन, ब्रज, उर्दू वगैरे भाषा व्यवस्थित येतात. तिने इतिहासाचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हा तिच्याकडे या संशोधनाविषयक आवश्यक तो 'स्किलसेट' आहे.
सरकारांवर आक्षेप घेणारी ही काही पहिली संशोधक नव्हे. सरकारांच्या पानिपतावरील लेखनावर खुद्द शेजवलकरांनी टीका करून ते सप्रमाण खोडून काढले आहे. तेव्हा सरकार हे फायनल ऑथॉरिटी वगैरे कधीच नव्हते.
लेखिका पुढे असेही म्हणते की कलोनियल इतिहासकारांनी हिंदू-मुसलमान फुटीचे धोरण इतिहासातही चालू ठेवून दुष्ट मुसलमान राज्यकर्ते ही प्रतिमा इतिहासात दृढ करायचा सर्वतोपरी प्रयत्न केला. धर्मवेडा औरंगजेब ही त्याचीच बहुतांशी परिणत प्रतिमा आहे. यातही फार आदळ आपट करण्यासारखं मला वाटत नाही.
एकुणात तिचं पुस्तक चाळलं तरी तिने सर्व उपलब्ध इतिहाससाधनांचा सखोल अभ्यास करून संशोधन केले आहे हे जाणवते. याउप्पर समजा तिच्या संशोधनात त्रुटि असतील त्या इतर मध्ययुगीन अभ्यासक चर्चा करून दाखवून देतीलच.
पण हिंदुत्ववादी स्वघोषित संस्कृतीरक्षक मात्र या पुस्तकाने फार भडकले आहेत हे बरेच दिवस सोशल मीडियावर बघते आहे. जसं काही औरंगजेबाविषयी चार बरे शब्द बोलले तर शिवाजीची थोरवी कमी होणार आहे किंवा भारतीय इतिहासाला बट्टा लागणार आहे अशा आविर्भावात.
असं काही कधी होत नसतं. आणि तिने पुस्तक लिहिलं म्हणून लगेच ते पाठ्यपुस्तकांत येऊन समस्त भारतवर्षीय बालकांवर औरंगझेब थोर होत असे कानीकपाळी ओरडून ठसवले जाणार आहे असे होणार आहे का?

हा लेख पाहिल्यावर त्याच हलकल्लोळाचा एक उठलेला तरंग आहे हे लक्षात आले होते. पण सविस्तर लिहायचा कंटाळा केला होता. औरंगजेब धर्मवेडा होता का नाही यावर जदुनाथांच्या किंवा इतर कुणाच्याही मताला सर्टिफिकेट देण्याआधी मध्ययुगीन इतिहास संशोधनाची साक्षेपी पारख/ चिकित्सा करण्याचे स्किलसेट आपल्याकडे आहे का हे लेखकाने तपासून बघितले असते तर बरे झाले असते. लेखकाने नवे विवाद्य पुस्तक वाचले आहे का हे माहित नाही, नसल्यास आवर्जून वाचावे अशी मी शिफारिस करेन. सोप्या इंग्लिशमध्ये लिहिले आहे. शेवटी सर्व इतिहाससाधनांचे तपशीलवार संदर्भही आहेत.

लेखक ही टिप्पणी वैयक्तिक टीका अशा अर्थाने घेणार नाही अशी आशा आहे.

वरदेच्या ह्या पोस्टनंतर ह्या धाग्यावर काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाही. अ फा ट. __/\__ परांजप्यांविषयी माझं आधी थोडं प्रतिकूल मत झालं होतं, ते त्यांच्याकडून आलेली वरील वाक्ये वाचून सुधारलं, हेही प्रांजळपणे म्हणतो. वरदा, लिहित रहा.

इतिहासातील नकारात्मक व्यक्तिंचे उदात्तीकरण ही एक फॅशन झाली आहे. उदा . नथुराम गोडसे. त्याची मंदिरं व पुतळे बांधण्याचं काम
चालू आहे असे वाचनात आले आहे. नशीब औरंगजेबाचे एखादे देऊळ बांधलेले दिसत नाही. या लाटॅमधे एखाद दिवशी तेही होण्याही शक्यता नाकारता येत नाही. मला तर तो शिझोफ्रेनिक वाटतो. असो हा धागा काढण्याचे काहीच कारण दिसत नाही.

इतिहासातील नकारात्मक व्यक्तिंचे उदात्तीकरण ही एक फॅशन झाली आहे. उदा . नथुराम गोडसे. त्याची मंदिरं व पुतळे बांधण्याचं काम
चालू आहे असे वाचनात आले आहे. नशीब औरंगजेबाचे एखादे देऊळ बांधलेले दिसत नाही. या लाटॅमधे एखाद दिवशी तेही होण्याही शक्यता नाकारता येत नाही. मला तर तो शिझोफ्रेनिक वाटतो. असो हा धागा काढण्याचे काहीच कारण दिसत नाही.

Happy

सध्याचे इसीस आणि इतर राज्यकर्ते ह्यांचं वर्तन पाहता, औरंगजेब संबंधित वर्णन केले आहे ते पटण्यासारखे वाटते

वरदा,
वेळ काढून इथे सविस्तर प्रतिसाद पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.

सध्याचे इसीस आणि इतर भाजप राज्यकर्ते ह्यांचं वर्तन पाहता, औरंगजेब संबंधित वर्णन केले आहे ते पटण्यासारखे वाटते
नवीन Submitted by Zankar on 16 May, 2018 - 22:41

धन्यवाद वरदा! हा प्रतिसाद खरोखर डोळ्यात अंजन घालणारा होता. मी कोणत्याही विशिष्ट संघटनेच्या किंवा विशिष्ट विचारधारेचा पुरस्कर्ता नाही, कोणत्याही पक्षाशी माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही. जे मला चूक वाटते त्याला मी चूक म्हणतो, जे बरोबर वाटते त्याला बरोबर म्हणतो. पण आजकाल तटस्थ राहणे हाच एक गुन्हा झाला आहे. टोळधाड पडल्यावर मी गप झालो. कारण गाढवांपुढे गीता वाचण्यात काहीही अर्थ नाही हे मी शिकलोय इयत्ता चौथीत.

आता मला एक लहानशी विनंती करायची आहे तुम्हाला, मला ४-२ पुस्तकांतून, आणि आंतरजालावरून जेवढे छत्रपती कळले ते असे की राजे नक्कीच धर्मनिरपेक्ष होते, खुद्द पुरंदरेंनी सुद्धा (ज्यांच्यावर ब्रिगेड दात खाऊन असते) या गोष्टीला त्यांच्या राजशिवछत्रपती पुस्तकातून अधोरेखित केले आहे.

तर मला ३ प्रश्न विचारायचे आहेत, कृपया उत्तर द्यावे.
१. छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते का? अर्थात हा प्रश्न सापेक्ष असला तरी त्यांनी कुणातरी मौलवींना गुरू मानले होते, मशिदी बांधायला जागा नेमून दिल्या इत्यादी गोष्टी, ज्या शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवतात, त्या खऱ्या आहेत का?
२. समर्थ रामदासांचा आणि शिवरायांचा नेमका संबंध काय?
३. संभाजीराजांनी अष्टप्रधानातील मंडळींना हत्तीच्या पायी देऊन का ठार केले?

(सत्य जाणून घेण्यासाठी फक्त हे प्रश्न आहेत, ब्राम्हण विरोध समजू नये)
- समर्थांनी लिहिलेला दासबोध वाचलेला, आणि त्यांनी लिहिलेलं मारुतीस्तोत्र रोज सकाळी म्हणणारा राव पाटील.

वरदा madam,

१. अर्थात मी ते नवीन पुस्तक वाचले नाही किंबहुना त्याचे नावही पहिल्यांदा ऐकले. मी ते जरूर मिळवून वाचेन. त्या पुस्तकाच्या लेखिकेने नुकतेच एक twitter वर स्टेटमेंट केले 'For anyone unfamiliar with these episodes, in Valmiki's telling (I'm loosely translating here): During the agnipariksha, Sita basically tells Rama he's a misogynist pig and uncouth. During the golden deer incident, Sita accuses Lakshmana of lusting after her and setting up Rama.' आणि याचा संदर्भ म्हणून तिने एका भाषांतरीत रामायणाचा संदर्भ दिला आणि लोकांनी मूळ संस्कृत द्या असा सांगितल्यावर, ते तुम्ही तिकडे जाऊन वाचा असा सल्ला दिला. अर्थात या tweet वर गदारोळ खूप झाले पण इतक ठामपणे होत तर तसा संस्कृत संदर्भ द्यायला हरकत नव्हती.

२. औरंगजेबाने मंदिरांना नवीन वर्षासने दिली किंवा देणग्या दिल्या अशा प्रकारच्या कमेंट माझ्या एका फेसबुक पोस्ट वर भारताबाहेरच्या एका मुघल इतिहासाच्या संशोधकांनी केल्या आणि तेव्हा त्यावर त्यांना त्याचे फारसी पत्र मागितले तर ते त्यांना देता आले नाही. त्यामुळे याचे फारसी काही दिले असले पुस्तकात तर जरूर स्वागतार्ह असेल.

३. अनेक जण शिवाजी राजांनी मशिदीना वर्षासने दिली वगैरे दिली असे म्हणतात पण याबद्दल श्री. गजानन मेहेंदळे सर यांनी स्पष्ट सांगितले की असे कोणतेही नवीन वर्षासन,देणगी दिली नाही. एखाद दुसरी 'जुनी' चालू ठेवली असेल तर असू शकते. तसेच औरंगजेबाच्या बाबतीत सुद्धा झे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असा काही मूळ संदर्भ त्यानी दिला असेल तर उत्तम. मग जरूर वाचेन ते पुस्तक

४. औरंगजेबाच्या स्वतःच्या गारदेमध्येच तो गाझी म्हणवून घेतो. त्यामुळे आता तोच जर स्वतःला गाझी म्हणवून घेतो तर आपण काय बोलणार.

५. घटकाभर धरले की ४ मंदिरे बांधली तर यात त्याचा पोलिटिकल व्हीयू दिसतो ना की एखाद्या भागातील हिंदू मनसबदार असतील तर ते सोडून जाऊ नयेत हा हेतू स्पष्ट आहे. पण मंदिरे तोडून तिथे मशिदी बांधण्यामागे कोणता पोलिटिकल व्हीयू असू शकतो हे कळेल का? कुणीही उत्तर द्या अगदी तुम्ही दिलेच पाहिजे असे नाही.

६. शिवाजी महाराजांची अनेक पत्रे आहेत त्यात ते धर्मरक्षण करण्यासाठी लढतो आहे असे म्हणतात. समर्थ रामदास तर धर्मरक्षी म्हणतात. मग जर पोलिटिकल असेल तर धर्म रक्षण करण्याची गरज काय? जर तुम्हाला राज्य वाढवायचे असेल तर अनेक हिंदूंचे धर्मांतर कशाला करावे लागते? औरंगजेब असेच नाही जंजिर्याचा सिद्दीचे सुद्धा उदाहरण आहे. अफजलखान तर स्वतःला बुतकिशन म्हणवून घेतो. सत्ता स्थापन हे मुख्य उद्दिष्ट होतेच पण धर्म विस्तार हे धोरण होते हे का नाकारतो? काही शेकडो वर्ष जुना असलेला इस्लाम धर्म इतक्या लवकर का वाढत गेला? बर अर्ध्या लोकांनी स्वताहून घेतला पण बाकीच्यांवर जबरदस्तीच केली ना? तुम्ही प्राचीन इतिहास संशोधक आहात त्यामुळे मंदिरांच्या मशिदी झालेली उदाहरणे मी द्यायची गरज नाही. अगदी जवळचे उदाहरण म्हणजे पुण्येश्वर मंदीर. तुम्ही पहिले असेलच ते.

७. माझं तुमच्याएवढे वाचन नसणे ही साहजिक गोष्ट आहे कारण एक तर मी २० वर्षाचा आहे. (वर कुणीतरी वयाचा उल्लेख केलाच माझ्या). त्यात मी कॉमर्स शाखेचा विद्यार्थी आहे. जरी हौशी असलो तरी एक गोष्ट पाळली आहे की विनासंदर्भ वाचन करायचे नाही आणि मतसुद्धा मांडायचे नाही. राजवाडे, सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे, काशिनाथ साने, ग ह खरे आणि अजून अनेक यांनी घालून दिलेल्या मार्गांवर चालण्याचा थोडासा प्रयत्न आहे इतकेच.

८. तुम्ही वर म्हणालात की बर्जेस सोडून किती वाचलीस वगैरे तर मी नावे सांगून उगाच प्रदर्शन करणार नाही पण मी मध्ययुगात वावरत असल्याने ५-६ लेखकांच्या पलीकडे वाचली नाहीत हे खरेच आहे कारण माझा तो प्रांत नाही. जसे तुम्ही मध्ययुगात नसल्यामुळे शेजवलकर किंवा या फोरेनर बाई यांचीच वाचलीत तशीच माझी पुस्तकांची यादी सुद्धा कमीच आहे. आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही, याचे कारण म्हणजे मी अजून शिकतोच आहे. त्यामुळे मी निष्कर्ष अजिबात काढत नाही प्राचीन काळावर.

९. ब्लॉगमध्ये तेच लिहावे जे वाचकांना कळेल आणि सोप्या भाषेत. कारण इतिहास शोधला पण तो सामान्य वाचकांपर्यंत नाही पोचला तर त्या इतिहासाचा शून्य उपयोग आहे हे माझे मत आहे. तुमचे मत वेगळे असू शकते. इतिहासाचार्य राजवाडे यांच्यासारख्या मंडळीनी आपले आयुष्य खर्च घालून इतिहास शोधला तो (त्यातून अर्थार्जन नसताना) आणि तो सर्वसामान्य लोकांसमोर सोप्या भाषेत खुला केला अगदी कॉपीराईट काढून. मध्ययुगीन इतिहासकारांनी तरी संशोधन करताना सामान्य व्यक्ती हीच डोळ्यासमोर पाहून केले. स्वतापुरते केले नाही हे अगदी खरेच.

१०. या लेखात मी कुणाला certificate देत नाही. माझा उद्देश साफ आहे. जे झाले ते मांडणे. त्यात काहीच चूक नाही असे मला वाटते. आणि मी जो निष्कर्ष काढला तो वरच्या किमान १५ उदाहरणावरून काढला आहे. बाकी यातून दुसरा काही निष्कर्ष येत असल्यास जरूर मांडावा.

११. मत मांडायला वगैरे संशोधक व्हाव लागत हे अगदी मान्य. पण जर प्राथमिक संदर्भ देऊन लिहिले असेल तर त्यातले मत कसे चुकीचे असू शकते हे नाही समजले. मी स्वतःला अजिबात संशोधक म्हणवत नाही. आमच्या गुरुंनी जे शोधून ठेवलंय तेच इतक अफाट आहे की ते वाचून अन्वयार्थ काढण्यात आयुष्य जाईल.

माझ्या आडनावावरून कुणाला अनुयायी, भक्त, संघी वगैरे वाटत असेल तर तो त्यांचा प्रोब्लेम आहे. कारण हेच उलटे येऊ शकते. म्हणजे औरंगजेबाने मंदिरे नाही पाडली हे म्हणणारा हिंदू धर्माच्या विरोधात नसेल कशावरून? म्हणून इतिहासात तर्क नाही तर प्राथमिक संदर्भ लागतात.

वरदा madam, मी तुम्हाला मेल वर उत्तर मागितले याचे कारण हेच होते की इथे मेसेजची संख्या वाढत जाईल. पण तुम्ही इथे दिल्याने मलाही नाईलाजणे इथेच द्यावे लागले..

चूकभूल देणे घेणे, मी काही तुमच्यासारखा संशोधक नाही त्यामुळे मतभेद असू शकतील. तुमची मते जास्त परिपक्व असतील, कारण तेवढा अनुभव आहे तुम्हाला पण एक आहे की मूळ संदर्भ दिल्याशिवाय मी बोलत नाही आणि बोलणार नाही हे ही तितकेच खरे.

असो, काही चुकले असेल तर उदार मानाने क्षमा कराल!!

वरदा सही पोस्ट.
ह्या पुस्तका बद्दल माहिती न्हवती. वेगळं वाटतय आणि लेमन भाषेत आहे सो ऑर्डर केलंय.
बाकी शिवाजीने काय केलं आणि संभाजीने काय केलं ... ते अगदी आजच्या सैन्याने काय केलं आणि इतर वैभवशाली दंडातील बेटकुळ्या फुगवणार्‍या मेसेजवर ठाम अविश्वास आहे. ते खरं असलं तर अभिमान बाळगायला आवडला असता पण मेसेजेस इतके एकतर्फी भावनिक लिहिलेले असतात की दुसर्‍या बाजुचे प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे त्या लेखात मिळत नाहीत.
तू लिहिलं आहेस तसं कारणमिमांसा केलेलं वाचलं की म्हणून छान वाटतं. लिहित रहा.

छत्रपती धर्मनिरपेक्ष असोत वा नसोत, पण एक गोष्ट नक्कीच आहे, शांतता प्रिय धर्माचे लोक कधीच धर्मनिरपेक्ष नव्हते आणि नसतात.

छत्रपती धर्मनिरपेक्ष असोत वा नसोत, पण एक गोष्ट नक्कीच आहे, शांतता प्रिय धर्माचे लोक कधीच धर्मनिरपेक्ष नव्हते आणि नसतात.
Submitted by Zankar on 17 May, 2018 - 11:00
<<

अस कस, अस कस,
शांतताप्रिय धर्माचे लोक धर्मनिरपेक्ष असोत वा नसोत, इतरांनी मात्र धर्मनिरपेक्ष व शांतातप्रिय असायला हवे.

लेखामागचा खरा उद्देश उघड केल्याबद्दल झंकार आणि अनिरुद्ध यांचं अभिनंदन.
ही पोस्ट टाकायला मला पाकिस्तानकडून मिळालेल्या पैशांचा हिशोब मांडायला धागाकर्ते येतीलच.

Pages