‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बोलत आहात ना तीनशे वर्षांपूर्वीचे का काढता!? तुम्हरे तेच करताय की.. नथुराम, गोळवलकर, इंग्रज.. साधे आणि सोपे आहे, पुरावा देऊन लेखातील मांडलेले खोडून काढा.. तुमच्या तर्कट विचाराना इतिहासात थारा नाही..

आणि काहीही झाले तरी मोदी.. lol

परांजपे.... वर विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या बघु आधी..

पुरावे वगैरे देऊन खोडण्यापर्यंत पोचायला तुमची दिल्ली अजून खूप दूर आहे. तुमची विधाने स्वतःच आधी पूर्ण सिद्ध नाहीयेत आणि दुसर्‍यांना काय पुरावे मागत आहात? शाखेत इतकेच शिकले का? कोणी लॉजिकल प्रश्न विचारले की म्हणायचे "पुरावे द्या"? मतलब कुच्छभी यारों...

तुमच्या विधानांना खोडण्यासाठी पुराव्यांची गरजच नाही. तुमचे तुम्हीच सक्षम आहात.. Rofl

परांजपे तुम्ही लिहीत जा इतिहास, बाकीचे कोणी भुंकले तर भुंकू दे लक्ष नका देऊ, आपला इतिहास आपण नाय सांगायचा मग काय ते पाकिस्तानवाले सांगतील.

शूर राजपूत सरदार हिंदूद्वेष्ट्या मुघलांचे मांडलिक का झाले याचं पुराव्यासकट उत्तर वाचलं हो.
येसूबाई, शहाजी प्रकरणीही वाचलं.
पुरा तो पुरावा.

Submitted by कल्पतरू on 13 May, 2018 - 21:39
परांजपे तुम्ही लिहीत जा इतिहास, बाकीचे कोणी भुंकले तर भुंकू दे लक्ष नका देऊ, आपला इतिहास आपण नाय सांगायचा मग काय ते पाकिस्तानवाले सांगतील.>> नक्कीच.. कुणीही रोखू शकत नाही.. हिंदुंवर मुघलांनी केलेल्या अत्याचाराच्या घटना मांडायलाच हव्यात.. विरोध करणाऱ्यांना करुदे.. शेवटी मनरेगा सारखा त्यांचा पण रोजगार चालू आहेच की!!

मला इथे विरोध करणारे दिसत नाहीयेत. फक्त प्रश्न विचारणारे आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे दिवस संपला तरी द्वेषपसरवण्याच्या कामावर नेमलेले पेडनोकर देऊ शकत नाहीत. फक्त आणखी आपल्याच विणलेल्या जाळ्यात स्वतः गुरफटत आहेत.

एवढ संदर्भासहित लिहायला कुठे पैसे मिळतात ते सांगाल का? कारण तुम्ही एवढे पेड पेड करताय त्यामुळे चार पैसे मिळणार असतील तर खरेच कमवेन असे म्हणतो. संपर्क दिलात तरी चालेल.

आणि फक्त प्रश्न विचारत आहेत न वाचता हाच प्रोब्लेम आहे. तुम्ही लेखातील पुराव्यांना विरोध केला नाही म्हणजे ते तुम्हाला मान्य असावेत.!! मला तितके पुरेसे आहे!!

परांजपे, काय ते संदर्भ संदर्भ चाललंय? ते संदर्भ घाला चुलीत.... तुमच्याच विधानांचे संदर्भ देऊन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे न देता गोल गोल पिंगा घालण्यात दिवस घालवला.. Rofl

बाळ, तू अजून इतिहास अभ्यासाच्या फक्त पाळण्यात आहेस... तेही फक्त द्वेषपसरवण्याच्या कामापुरत्या इतिहासात. संदर्भाच्या गोष्टी तू करुन हसं करुन घेत आहेस मघाचपासून.... सांभाळ आणि जरा खराखुरा स्वतःचा अभ्यास कर. दोन प्रश्नांची लॉजिकल उत्तरं देता येईनात आणि नाचतोय संदर्भ संदर्भ करुन... Rofl

तू फक्त बिकॉम शिकला आहेस... बिकॉम शिकणार्‍यांना इतिहास कसा अभ्यासावा याचे काही ट्रेनिंग देतात का ते माहिती नाही....
कारण बी.ए. हिस्टरी ला देतात नीटपणे...

अरे सर्कशीतल्या जोकरा, तुला संदर्भ देऊन विरोध करता येत नाही ते सांग की. इतिहासात लॉजिकला अजिबात थारा नसतो. त्यांना मुसलमान का नाही केले हे त्याला जाऊन विचार मी कसे सांगणार. मी त्याने काय केले हे सांगितले. त्याने मंदिरी पडून मशिदी बांधल्या, देवळात गाय कापली या गोष्टी त्याने केल्या.. याच्यावर आक्षेप असेल तर तू खेडेकर आणि कोकाटे सोडून काही वाचले नाहीस!

तू फक्त बिकॉम शिकला आहेस>> कोणत्या दारुड्या जोकाराणे सांगितले मी 'फक्त' बीकॉम आहे म्हणून.. तू तर अडाणी आहेस रे.. मी निदान साक्षर तरी आहे.. मला लिहिता वाचता येते. इतिहास हा संदर्भांनी चालतो.. तुमच्या ब्रिगेडमध्ये संदर्भ नसतील पण आम्हाला लागतात..

आणि आधी घरच्यांनी जे नाव दिले आहे ते लावायला शिक आणि माझे शिक्षण तुला झेपणार नाही.. एवढी पुस्तके तू १ ते आजवरच्या शिक्षणात नाही पाहिलीस त्यामुळे दिलेल्या संदर्भांना विरोध कर.. लॉजिकवाले प्रश्न दुसरीकडे जाऊन विचार, मी भिक घालणार नाही..

आणि एक.. जेव्हा तू बोबडं बोलायला शिकत होता ना तेव्हाच आमचा समग्र भारताचा इतिहास विधिवत अभ्यासून झालेला होता... लैच टिपिर टिपिर लावलीयसा म्हणून शेवटी सांगावं लागतंय...

काय आहे की तू आहेस आज उगवलेला बच्चा.... असले बालीश दावे, निष्कर्ष, पोरकट मांडण्या, आणि पुरावे पुरावेचा जयघोष ना... तुझ्या वयाची नवीनवी इतिहासाने भारुन बिरुन गेलेली पोरं अशा तरण्यावयात गरमजोशीत करतच असतात.. कारण तुम्हा पोरांना समवयस्कांवर छाप पाडायला ते बरं असतं, कारण त्यांनी काही इतिहास वाचलेला नसतोच (जे वर मी आधीच म्हटलंय) त्यामुळे आम्हाला पहिल्या फटक्यात लक्षात येतं की पाणी कुठलं आहे... कळलं का १९९७?

बी.ए. हिस्टरी>> इथे लॉजिक प्रमाणे इतिहासाचा अभ्यास करा असे सांगत असतील तर भयानक आहे शिक्षण!! बरोबर बी. ए. म्हणजे तुम्हाला संदर्भ काय आणि कोणते याची कल्पना पण नसणार.., मोडी वाचायला शिकवतात का तुमच्या बी. ए. मध्ये?? नसेल तर शिकून घे.. गरज आहे फार!! इतिहास अभ्यासताना लागते!!

मी त्याने काय केले हे सांगितले. त्याने मंदिरी पडून मशिदी बांधल्या, देवळात गाय कापली या गोष्टी त्याने केल्या>>

गेल्या 10-20 प्रतिसादात तेच तेच? मुद्दामुन पैसे घेऊन लिहीत आहे का?

संपादन (4 hours left)
आणि एक.. जेव्हा तू बोबडं बोलायला शिकत होता ना तेव्हाच आमचा समग्र भारताचा इतिहास विधिवत अभ्यासून झालेला होता... लैच टिपिर टिपिर लावलीयसा म्हणून शेवटी सांगावं लागतंय...>> अरे चुलीत घाल तो लॉजिकने शिकलेला इतिहास.. लॉजिकवाल्या इतिहासाला आम्ही केराची टोपली दाखवतो. संदर्भ आणि संदर्भ एवढ्यावरच इतिहास चालतो.. आणि तुम्ही फार 'गाजरे' खाता ना इतिहासाची. तुमची बिनसंदर्भी 'गाजरे' तुमच्यापाशी ठेवा.

गेल्या 10-20 प्रतिसादात तेच तेच? मुद्दामुन पैसे घेऊन लिहीत आहे का?> इथेच धार्मिक विरोध दिसून येतो त्याचा..

तन्तनु पलंजपे,
इथे लेख रुपी पो टाकून खाली जे काय अश्लाघ्य भाषेत तुम्ही करताहात, त्यावरून तुमची मूळ इन्टेन्शन्स सुस्पष्ट होत आहेत.
तुमचे शिक्षण कुणाला झेपण्यासारखे नाहीच हे सत्य आहे. सुशिक्षित अन डिग्रीधारक यात फरक असतो, अन तो संस्कारांचा असतो. संघ परिवारातील परिवारात होणारे ड्युअल संस्कार मला 'आतून' ठाउक आहेत.
तेव्हा लोकांचे आईबाप काढणे बंद करा, अन सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे, माझ्या या देशाला धर्म जातींवर तोडण्याचे जे हलकट प्रयत्न तुम्ही अन तुमच्या 'दैवतांनी' चालवले आहेत, ते बंद करा.

इतिहास अन धर्म एकत्र केव्हा अन कुठे झाले?
पैसे घेऊन पकिस्तानातून आला का, असा प्रश्न पलांज्पेनी केला होता वरच. Lol
कठीण आहे.

im glad nobody else is responding on this thread. लोक हो चला याला इग्गी मारू या.

इथे लॉजिक प्रमाणे इतिहासाचा अभ्यास करा असे सांगत असतील तर भयानक आहे शिक्षण!!
>> बरोबर. तुम्हाला लॉजिकशी काय घेणेदेणे...? तुमच्या इतिहासात तर विमाने उडतात, इंटरनेट असतं, शस्त्रक्रिया करुन मुंडकी ट्रान्सप्लांट होतात, आधीच मेलेले लोक नंतर येऊन देशाचं वाट्टोळं करतात, हिंदू म्हणजे सज्जनांचे अवतार, मुस्लिम म्हणजे राक्षसांचे अवतार, गैरसोयीचे ते लपवून ठेवणे, घटनांचा वापर धार्मिक तेढ वाढवण्यासाठी करणे हे सगळे अंतर्भूत आहे...
तुझी अक्कल मोडीलिपी शिकण्यापलिकडे जाणार नाही... शुभेच्छा!

माझ्या देशाचे अशा मत्थडांपासून रक्षण कर रे रंवळनाथा!

अरे चुलीत घाल तो लॉजिकने शिकलेला इतिहास.. लॉजिकवाल्या इतिहासाला आम्ही केराची टोपली दाखवतो.
>> there you are my sweet boy.. you just want to be fed up on comfortable lies.. not on truths.

लॉजिकवाल्या इतिहासाला आम्ही केराची टोपली दाखवतो. >>>

संघोट्याच्या डोस्क्यात लाॅजिक जात नाही हे ॅखरं
इतिहासात लाॅजिक नसते हे शाखेत शिकवतात ना? मोदीच्या बोलण्यातून जो इतिहास ऐकायला मिळतो त्यात पण काहीच लाॅजिक नसते.. Wink

im glad nobody else is responding on this thread. लोक हो चला याला इग्गी मारू या.
Submitted by आ.रा.रा. on 13 May, 2018 - 22:49

... हौ, ह्या धाग्याचे महत्त्व आता संपुष्टात आले आहेच. कलटी मारावीच....

( औरंगजेबाच्या कारकिर्दीत ) सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे>>>
याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. कृपया अधिक माहिती द्याल का?

ज्यांचा 'पाऊलखुणी गुरु' दुसऱ्या बाजीरावाचा भक्त. त्यांच्या बरोबर कसले वाद घालताय.

बाकी, आपणास मुघल/ औरंगजेब यांच्याबद्दल काडीचेही प्रेम नाही.

<< पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. >>

-------- सुरवातीच्या काळात (बाल्य ते षोडस) आपल्याकडे खुप मोठा ज्ञानाचा साठा आहे असे वाटण्याचा असतो... जस-जसा काळ पुढे सरकत जातो, अनुभव गाढीशी येतो आणि निसर्गात असलेल्या अथान्ग ज्ञानसागराची खोली आणि व्याप्तीची थोडी जाण होते त्यावेळी आपण किती अज्ञानी आहोत, आपल्या कडे असलेले ज्ञान किती कमी आहे याची जाण होते.

औरन्गजेब कसा होता हे सर्वान्नाच माहित आहे. त्यासाठी एव्हढा लेख प्रपन्च करायची अवशक्ता मला समजली नाही.

औरन्गजेब कसा होता हे सर्वान्नाच माहित आहे. त्यासाठी एव्हढा लेख प्रपन्च करायची अवशक्ता मला समजली नाही.
>>
सुरवातीच्या काळात (बाल्य ते षोडस) आपल्याकडे खुप मोठा ज्ञानाचा साठा आहे असे वाटण्याचा असतो... जस-जसा काळ पुढे सरकत जातो, अनुभव गाढीशी येतो आणि निसर्गात असलेल्या अथान्ग ज्ञानसागराची खोली आणि व्याप्तीची थोडी जाण होते त्यावेळी आपण किती अज्ञानी आहोत, आपल्या कडे असलेले ज्ञान किती कमी आहे याची जाण होते.
>>
मुघल आले म्हणुन इथे सर्व चांगले झाले, मुस्लिम मुघल शासकांनी अजिबात काही चुकीचे केले नाही, देवळे फोडली नाही, ग्रंथसंपदा जाळळी नाही, बळजबरी धर्मबदल केला नाही, हिंदुहित बघितले ई.ई. अशा प्रकारचे अनेक गैरसमज असणारे व सद्ध्या "सुरुवातीच्या गैरसमजाच्या" काळात वावरणारे बाल्य वाचक इथे येतात तसेच औरंग्याला संत म्हणणा-यांच्या कुळातलेही काही येतात. यशा सर्व नव्या पिढीसाठी अशा लेखांची सतत गरज असतेच.

Pages