‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

वा.

छान.

मस्तच.

बा अ‍ॅडमीना बघतोयस ना रे?

तसेही जुनेच कशाला हवे? मागच्या तीस वर्षांतली सगळी पुस्तके चाळून घ्या... कदाचित हा काही ओळींचा इतिहास वाले पाठ्यपुस्तक कुठेतरी मिळेलच.

आम्हाला तर चौथ्या वर्गात असतांना म्हणजे १९९० साली शिवाजीमहाराजांचाच पूर्ण इतिहास होता. तोही बाबासाहेब पुरंदरें यांनी लिहिलेला.. आता बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास खोटा लिहिला असेल काय?

विकत घेऊन वाचू शकता.. खाली लिंकवर आहे.
https://www.instamojo.com/salilchaudhary/99b173259be517de35dccea4cea7f85b/

माझ्या आठवणीप्रमाणे तिसरी की चौथीचे इतिहासाचे पूर्ण पुस्तक शिवकालावरच होते.
एकेक गड कसा घेतला, त्यावर एकेक धडा.
शिवनेरीवर जन्म, रोहिडेश्वराची शपथ, तोरणा, जावळी, अफझुलखान प्रतापगड ,फाजलखान-सिद्दी जौहर-बाजीप्रभू-पावनखिंड ही क्रमावलीही अजून लक्षात आहे.
पुढे मिर्झाराजे जयसिंह-तह , आग्रा भेट, सुटका, सिंहगड, पुरंदर, राज्याभिषेक...
अनेक चित्रंही अजून आठवतात.

भरत, अगदी अगदी, तेच पुस्तक. लिंक वर दिली आहेच. तेव्हापासून जे महाराजांच्या प्रेमात पडलोय ते आजतागायत...

< औरंगजेबाला ही भीती होती की राजपूत राजांचा धर्म बदलला की हे आपल्या विरोधात जातील त्यामुळे त्याने त्यांना तसेच हिंदू ठेवले..>
औरंगजेब हा इतका उघड हिंदुद्वेष्टा असूनही हे अनेक राजपूत सरदार त्याचे मांडलिक का राहिले? तुम्हीच म्हणताय की त सरदार औरंगजेबासाठी महत्त्वाचे होते. तरीही?

हा एक प्रश्न स्वघोषित तज्ज्ञांच्या नजरेतून सुटला असावा. आता तर इतिहास अभ्यासक मंडळच आलं आहे. त्यांच्यासाठी.

भरत ते भारतात, महाराष्ट्र मध्ये शिकवल्या जाणारया पुस्तकांमध्य होते
संघात शिकवत असलेल्यामध्येनसेल मग यांना कुठून कळणार?
यांचा ब्रेनवाॅश करून इतिहास शाळेत चुकिचा शिकवतात हे बिंबवले गेले आहे मग ते जे उलटेसुलटे शिकवतील त्यालाच हे नंदीबैलासारखे खरे मानून मत बनवणार..

आता वर नाही का सरळ खोटे लिहीले एका ओळीचा इतिहास आहे म्हणून.. खरतर ही गोष्ट गेल्यावर्षीच्या CBSC बोर्डात सिलॅबस बदल झाल्यावर होती पण ती गोष्ट "माझ्या बालपणीची" सांगुन टेपा मारायला बघत होते Wink

बघतो लिंक. पार मालोजीरावांपासून सुरुवात होती ना?
नंतरच्या एका वर्षात एकेका पेशव्यावर एकेक प्रकरण होतं.

शालेय इतिहासाबद्दल इतका कळवळा असणार्‍यांनी राजस्थानच्या संदर्भपुस्तकांत लोकमान्य टिळकांबद्दल लिहिलेलं आणि गुजरातच्या अलीकडच्या पुस्तकांतला राजांबद्दलचा मजकूर वाचावा. आणि आपापल्या तलवारी उपसून तिथे जावे.
मी मागे मायबोलीवरच स्क्रीनशॉट टाकला होता.

ही कालची चड्डीवाल्यांची पोर 2_3 एकांगी विचारांची पुस्तक वाचून काहीतरी खरडायचे म्हणून खरडतात. हिटलर स्तुतीची पुस्तक वचून त्याला हिरो समजणारी पोर ही.. दुसरया बाजूचे खरेखोटे वाचायचेच नसते यांना..

कोणीतरी लिहीले की ते बरोबर चूक याची सत्यता पडताळून न बघता लगेच त्यांच्या मागे पळणारी.. भारताची संपूर्ण पिढी या व्हाॅटस्प फेसबूक विद्यालयात येणार्या पोस्टींमुळे बरबाद झाली आहे. त्यांना हे सगळे पाठवणारी भाजप्याची हलकट आयटीसेलची आर्मी आहे
किव देखील येते आणि खंत देखील वाटते..

विषय काये...
>> माझं खरं नाव काय आहे हा विषय आहे.. लेखाचा उद्देश आणि गाभा तोच आहे.

विषय काये...

अहो विषय गेला खड्ड्यात. कसेही करून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर हीन भाषेत टीका करायला मिळाल्याशी मतलब!

बघतो लिंक. पार मालोजीरावांपासून सुरुवात होती ना?
नंतरच्या एका वर्षात एकेका पेशव्यावर एकेक प्रकरण होतं.
Submitted by भरत. on 13 May, 2018 - 18:50

>> हो. मालोजीरावांनी आपले कर्तृत्व गाजवले आणि जहागिर मिळवली, मग कोण्यातरी मंदिराचा जिर्णोद्धार केला असं काही आठवतंय. विठोजी आणि मालोजी दोघे बंधूंच्या इतिहासापासून मराठ्यांचा इतिहास आहे... प्रत्येक पेशव्यांवर एक एक प्रकरण आहे... त्यानंतर पार स्वातंत्र्यमिळेपर्यंतचा संपूर्ण इतिहास शाळेतच शिकवला आहे.

पण हे इतिहास ऑप्शनला टाकणारे चंगुमंगू लोक, यांना काय माहित नसतं आणि लोकांना अभ्यास विचारतात... Rofl

हे एक आले. इतिहासाच्या तासाला टंगळमंगळ करत होतास का रे? म्हणे एका ओळीत शिकवला?कुठल्या शाळेतला रे तु? शाखेतल्या का?
Submitted by दत्तू on 13 May, 2018 - 18:28

(येथे मी माझा शाळेतील इ. ७ वीचा निकाल टाकला होता. परंतु त्यात माझे खरे नाव असल्यामुळे माझी गोपनीयता नाहीशी होत होती. त्यामुळे आता 'काही' जणांनी पाहिल्यावर तो काढून टाकत आहे. पोस्ट एडीट केली म्हणून 'कोलांटी उडी मारली' आदी आरोप करू नयेत!)

अहो विषय गेला खड्ड्यात. कसेही करून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेस, मुसलमान यांच्यावर हीन भाषेत टीका करायला मिळाल्याशी मतलब!

<कसेही करून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर हीन भाषेत टीका करायला मिळाल्याशी मतलब!>

Look who is talking.
संघ म्हणजे नव्या पिढीच्या डोक्यात शेण भरायची फॅक्टरी.
भाजप तेच काम आधुनिक तंत्रज्ञानाने करतो.

आता तुम्हीच ही नावं घेतलीत म्हणून. आपल्या लाडक्या पंतप्रधानांचीच भाषा बघा.

स्मरणपत्र
१. राजपुतांनी औरंगजेबाला विरोध का केला नाही?
२. राजस्थान- लोकमान्य टिळक.
३. गुजरात - शिवाजीमहाराज.

अरे काय दत्तू. तुम्ही पण आपल्या माननीय पंतप्रधानाच्या पातळीवर येऊन बोलायला लागलेत... ?

स्मरणपत्र २
शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे खरे मानायचे की औरंगजेबाला धर्मकर्मठ हिंदू उलटतील म्हणून भीती असल्याने त्याने हिंदूच ठेवले हे खरे मानायचे...?

पुरावा? मी फक्त 10-12-15-17 चे सांभाळले आहे हे 4-6वीचे विक्षिप्त लोक सांभाळत असतील Wink

पुरावा? मी फक्त 10-12-15-17 चे सांभाळले आहे हे 4-6वीचे विक्षिप्त लोक सांभाळत असतील Wink??

17??? माझ्या मते त्याला 'Post Graduation' (पदव्युत्तर शिक्षण) म्हणतात!
जुने रेकॉर्ड्स सांभाळणे याला 'विक्षिप्तपणा' म्हणत असाल तर कठीण आहे!

अजून एक, इ. ७ वीत मला ७२% नाही तर ७८.६६% होते, अर्थात नीट पाहिले असते तर लक्षात आले असते!!!

6% ने काय बिल्डिंग बांधणार आहे का? 92 पेक्षा कमीच हो तरी
स्वतःच्या शालेय प्रगतीचे काहीच पुरावे न देता आपण वाद घालत आहात त्यामुळे माझी ही शेवटची पोस्ट!!! (कारण धागा विनाकारण भरकटत आहे.)
(मी माझ्या शालेय प्रगतीचा पुरावा दिला, पण शाळेत इतिहास खूप चांगल्या प्रकारे शिकल्याच्या गमजा मारलेल्यांनी नाही, याची इतर मायबोलीकरांनी नोंद घेतली असेलच!!!)

शाळेत आम्हाला तरी कधीही औरंगजेबाचा हा इतिहास सांगितला नाही.. त्याने मंदिरात गायी कापल्या आणि मंदिरे पाडून मशीद बांधली.. हा औरंगजेबाचा राजकीय लढा.. मंदिरे पाडून मशिदी बांधणे..

पुण्यात राहता ना, जा जरा कसबा पेठेत पुण्येश्वराचे मंदिर विचारा कुठे आहे ते.. आज तिथे दर्गा दिसेल तुम्हाला.. त्या दर्ग्याच्या आत मंदिराचे अवशेष आहेत सगळे.. हा यांचा राजकीय लढा.

सप्तकोटीश्वराचे मंदिर गोव्यात पोर्तुगीजांनी पाडले आणि नंतर शिवाजी राजांनी हट्टाने ते पुन्हा बांधले.. कितीही राजकीय राजकीय म्हणून ओरडलात तरी औरंगजेबाने मंदिरे पाडली आणि मशिदी पाडल्या हे सत्य आहे आणि ते तुम्ही नाकारू शकत नाही...

विक्षिप्त मुलगा, तुम्ही इतिहासाचं पाठ्यपुस्तक शोधणार होतात. कुठवर आलंय?
बरं ७८% गुणांच्या जोरावर वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी शोधा.

कितीही राजकीय राजकीय म्हणून ओरडलात तरी औरंगजेबाने मंदिरे पाडली आणि मशिदी पाडल्या हे सत्य आहे आणि ते तुम्ही नाकारू शकत नाही...
>> अरे हां बघा. तुम्हीच सांगितले आता की औरंग्या किती सर्वधर्मसमभावी होता ते... आपण तर असं काहीही बोललो नाही. Rofl

खालीलपैकी एक विधान खरे असावे.. ते कोणते ते अभ्यासाआधारे सांगा.
१. शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे खरे
२. औरंगजेबाला धर्मकर्मठ हिंदू उलटतील म्हणून भीती असल्याने त्याने हिंदूच ठेवले हे खरे

Pages