‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे नाव सांगा ही स्पेशल अट माझ्यासाठीच का घालत आहात>>> प्रश्नाचा उद्देश सरळ असेल तर मी उत्तरे देतो नाहीतर मी उत्तरे द्यायला बांधील नाही!! माझा लेख हा संपूर्ण संदर्भ देऊन लिहिला आहे! त्यामुळे त्यावर मी अजून स्पष्टीकारण देणार नाही!!

आणि त्या राजपूत राजना का मारले नाही याचे कारण ते त्याचे मांडलिक झाले होते. मंदिरे पाडण्याला त्या राज्पूतानी विरोध केला नाही म्हणून त्यांचे धर्मांतर त्याने केले नाही.. एवढे होते तर नेतोजी पालकर ला महम्मद कुलीखान का केले याचे उत्तर द्या आणि नंतर राजांनी परत हिंदू का करून घेतले याचे सुद्धा!!

वैर संपल्यावर कसले कायमग? महाराज वैरापुढे निघून गेले पण तुमच्यासारखे द्वेषाचे राजकारण करणारे संघोटे मात्र त्याच कबरी भोवती घुटमळत राहीले हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव आहे>> तुमच्यासारखे ब्रिगेडी आहेत महाराष्ट्रात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे!! तुमचे खेडेकर म्हणतात त्यानी लिहिलेल्या इतिहासाला पुरावा नसतो यातच ब्रिगेडची मानसिकता दिसून येते!!

शिवाजी होते म्हणून सुन्नत झाली नाही की औरंगजेबाला गरज होती म्हणून झाली नाही???
>> ही दोन्ही तुम्हीच इथे केलेली विधाने आहेत. त्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारला आहे, ज्याबद्दल थेट उत्तर अपेक्षित आहे. ते सोडून "खरं नाव कळवा"चा पिंगा जो तुम्ही घालताय तो किती बालिश आहे हे समस्त माबोपब्लिक बघतंय बरं... Rofl Rofl Rofl Rofl

१. त्या राजपूत राजना का मारले नाही याचे कारण ते त्याचे मांडलिक झाले होते.
>> आले का उत्तर? बरं बरं, आता सांगा.... एखाद्याचे मांडलिक होणे हे राजकिय घटना असते की धार्मिक घटना? एखादा व्यक्ती जो प्रचंड कट्टर धार्मिक आहे तो मांडलिक झालेल्यांचे धर्म बदलत का नाही? मांडलिक झालात म्हणून धर्म बदलला नाही तरी चालेल असे चालवून घेणारा औरंगजेब होता का?

२. मंदिरे पाडण्याला त्या राज्पूतानी विरोध केला नाही म्हणून त्यांचे धर्मांतर त्याने केले नाही
>> ह्या विधानाला तुमच्याकडे काही पुरावा असेल असे समजतो.... निव्वळ तर्कावर हे विधान फेकलेले नसावे अशी अपेक्षा आहे. जरी फेकले असले तरी त्यासमोरचा खड्डा तुम्हाला लक्षात आलेला नाही हे दिसत आहेच.

मुळात तुम्हाला फारच इतिहास शिकायला लागणार आहे असे दिसते. कोणताही राजपूत राजा उगाचच मांडलिक झाला नाही. त्यांच्या राज्यावर आक्रमणे झाली, त्यांच्या स्त्रिया मुघल जनान्यात भरती केल्या गेल्या आणि त्यांनतर मांडलिक झाले. हे मांडलिक राजे औरंगजेबाच्या आधीपासून झाले आहेत. औरंगजेबाच्या काळात फार कमी उदाहरणे आहेत. आणि औरंगजेबाला ही भीती होती की राजपूत राजांचा धर्म बदलला की हे आपल्या विरोधात जातील त्यामुळे त्याने त्यांना तसेच हिंदू ठेवले..

लढा राजकीय होता तर -

१. नेतोजी पालकरला मुसलमान का केले?
२. शाहू राजांना मुसलमान करण्याचा का प्रयत्न केला?
३. अनेक देवळे का पाडली?
४. देवळात गाय का कापली?

जर राजकीय होता तर मुळात हे सर्व करायची काय गरज होती.. जंजिर्याच्या सिद्दीने मुरुड परिसरात एवढी धर्मांतरे का केली?
राज्य जरी स्थापन केले असले तरी धर्म वाढवणे हा हेतू होताच. नाहीतर औरंगजेबाने स्वताला गाझी हे विशेषण का लावले?

मंदिरे पाडण्याला त्या राज्पूतानी विरोध केला नाही म्हणून त्यांचे धर्मांतर त्याने केले नाही>> विरोध केला असल्याचे कुठे वाचनात आले नाही. त्यामुळे विरोध केला नसेल हा निष्कर्ष. विरोध केला असेल तर उत्तम. आपल्याजवळ विरोध केल्याचा पुरावा असल्यास जरूर दाखवा!!

औंर्गजेब जुलमी राजा होता हे उघड आहे. पण एक शंका आहे. संभाजीराजांना मारल्यावर येसुबाई आणि शाहुराजे हे मुगलांच्या कैदेत दिल्लीला होते; ते थेट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत. त्या दोघांचं धर्मांतर का नाही करवलं गेलं? धर्मांतर न करता जिवंत कसं ठेवलं गेलं?

भरतजी शाहूचे करण्याचा प्रयत्न केला त्याने पण औरंगजेबाच्या मुलीने हाणून पाडला. शाहूचे खरे नाव शिवाजी पण औरंगजेबाने बदलून ते शाहू ठेवले.
येसूबाई साहेबांचे का नाही केले माहिती नाही. मुळात शाहू ला पकडल्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात फिरत होता त्यामुळे त्या दोघांकडे लक्ष द्यायला त्याला फारसा वेळ मिळाला नाही.

येसूबाई यांचे नाही केले म्हणून औरंगजेब चांगला असे म्हणणे चूक आहे.. मग वर दिलेल्या उदाहरणांना काय म्हणाल? लढा जर राजकीय होता तर मंदीर पाडून मशीद बांधण्याची काय गरज?

जाऊद्या हो परांजपे कुठे ट्रोलांच्या मागे लागता, त्यांना पुरावे वगैरेशी काहीही देणे घेणे नसते फक्त कोणत्याही धाग्याचा चिखल करुन त्यात लोळायला मिळावे हाच फक्त त्यांचा उद्देश असतो.

हे माहीत नाही ते माहीत नाही याचा पुरावा नाही

अरे संघोट्यांनो काय आहे काय तुमच्याकडे ज्यावर फुशारक्या मारत आहे? मोदीसारखे खोट्या बातम्यांवर 90 वर्ष काढली पुढची पण निघतील या आशेवर राहू नका

औरंगजेबाला ही भीती होती की राजपूत राजांचा धर्म बदलला की हे आपल्या विरोधात जातील त्यामुळे त्याने त्यांना तसेच हिंदू ठेवले..
>>> राईट्ट! म्हणजेच राजपूतांचा धर्म बदलणे हे त्याच्यासाठी सोपे नव्हते. कारण धर्म बदलला तर राजे आपल्या विरोधात जातील असे त्याला वाटले. तो राजपूतांच्या हिंदूधर्मबद्दल असलेल्या कर्मठपणाला घाबरला....त्यामुळे त्याने आपले राज्य वाचवण्यासाठी धर्मबदलण्याची सक्ती न करता त्यांना तसेच हिंदू ठेवले. असाच तुमच्या म्हणण्याचा अर्थ होतोय का नाही? म्हणजेच औरंग्याचे मत धर्मबदल झाला नाही तरी चालेल पण माझे राज्य राहायला हवे असे दिसत आहे. आणि दुसरे असे की इतक्या वर्षांच्या मुसलमानी सत्तेनंतरही औरंग्याला अशी उलटण्याची भीती वाटत होती यचा अर्थ धार्मिक बळजबरी तितकी पावरफूल किंवा मनापासून नव्हती म्हणू शकतो....

म्हणजे काय तर तुम्ही इम्प्लिकेशन करत आहात की त्याने असे धर्मांतर केले असते, तसे अत्याचार केले असते. जे त्याने केलेले नाही व त्याचे तसे करण्यामागचे कारण त्याच्यासोबतच दफन झाले आहे. (की आहे कुठे असे औरंग्याने लिहिलेले की "मला भीती आहे हे राजपूत माझ्याविरुद्ध उलटतील"? नाही लै मोठ्ठा अभ्यास तुमचा म्हणून इचारतोय.. माहिती असंल ना! )

मग आता सांगा शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे खरे मानायचे की औरंगजेबाला धर्मकर्मठ हिंदू उलटतील म्हणून भीती असल्याने त्याने हिंदूच ठेवले...? ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना औरंग्याची राजकिय महत्त्वाकांक्षा विचारात घ्याल अशी आपली माझी भाबडी अपेक्षा आहे.
Rofl

परांजपे. आम्हा अडाण्यांना काय प्रश्न विचारताय... तुम्हीच अभ्यासू आहात. तुम्ही आमच्यासारख्या अडाण्यांचे शंकासमाधान करायचे.... पुरावे देऊन.

< औरंगजेबाला ही भीती होती की राजपूत राजांचा धर्म बदलला की हे आपल्या विरोधात जातील त्यामुळे त्याने त्यांना तसेच हिंदू ठेवले..>
औरंगजेब हा इतका उघड हिंदुद्वेष्टा असूनही हे अनेक राजपूत सरदार त्याचे मांडलिक का राहिले? तुम्हीच म्हणताय की त सरदार औरंगजेबासाठी महत्त्वाचे होते. तरीही?

१. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही
>> आपण किती इतिहासकारांचा संपूर्ण अभ्यास केला आहे जेणेकरुन हे मत आपण बनवले?

२. त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली.
>> इतिहासाचा अभ्यास विज्ञानाप्रमाणे सर्व साधने पडताळून, पुरावे पडताळून करायचा असतो. केवळ एकाच पुस्तकावर अवलंबून राहण्याची इच्छा इथे दिसून येत आहे.

३. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही
>> म्हणजे? महाराष्ट्रात राहून एका इतिहासप्रेमी माणसाला शिवाजी राजांचा अभ्यास नाही?

४. पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही
>> जदुनाथ सरकार यांच्या अभ्यासावर शंका न घेण्याचे कारण त्यांनी औरंग्याला क्रूरकर्मा असे रंगवले म्हणून? म्हणजे राम पुनियानी वगैरे लोकांवर तुम्ही शंका घेता की नाही घेत?

वरचे वाचून सर्वांनी काय ते समजून जावे Rofl

जोकर साहेब तुम्ही तर स्वतःला अडाणी म्हणवून घेता त्यापेक्षा माझं बरं आहे की मग.. तुमचा कसलाच अभ्यास नाही नाहीतर एक तरी संदर्भ दिला असता आत्तापर्यंत..

इतिहासाचा अभ्यास साधने वाचून करायचा असतो हे स्वतःला सांगा.. आणि एक तरी साधन देऊन इथे मुद्दे मांडता.. पण आता तुम्ही अभ्यासक नाही असे म्हणत आहात त्यामुळे आता काहितरी वाचून अभ्यासून या.. अभ्यास नसताना शंका काढणे बरे नाही.. अभ्यास नसताना शंका काढल्या की उद्देश साफ नाही हे दिसून येते..

असो। रामराम, दोन चार संदर्भ ग्रंथ वाचून जरा साक्षर व्हा मग बोलू..

शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे खरे मानायचे की औरंगजेबाला धर्मकर्मठ हिंदू उलटतील म्हणून भीती असल्याने त्याने हिंदूच ठेवले...?

जी गोष्ट इतिहासाच्या पुस्तकात 6-7 वी ला शिकवली होती ती आती पुन्हा सांगून तुम्ही काय साधणार ते सांगा? >>>

खरच शाळेत आपल्याला 'खरा' इतिहास शिकवला होता???

माझ्या आठवणीनुसार शाळेत (विशेषतः ६-७ वीला) अमुक एक राजघराण्याचा हा राजा, मग त्याचा मुलगा सत्तेवर आला, त्याने इतका राज्यविस्तार केला, मग त्याचा मुलगा आला, त्याने इतका राज्यविस्तार केला इतकेच शिकवले गेले. पण राज्यविस्तार करताना किती गावे उद्ध्वस्त केली, किती मंदिरे पाडली, किती आया-बहिणींची अब्रू लुटली हे नाही शिकवले. अर्थात ६-७ वीच्या वयात अब्रू लुटणे म्हणजे काय हे कदाचित कळले नसते, पण इतर सत्कर्मे (!) शिकवावयास हरकत नव्हती. आणि त्याच पुस्तकात महाराजांचा इतिहास मात्र काही ओळीत आटोपला होता! (कुठे वाचनालयात, माळ्यावर वगैरे जुने पुस्तक मिळाले तर नक्की स्कॅन करून टाकेन!)

सैतानाला 'सैतान' म्हटले तर बिघडले कुठे???

दोन चार संदर्भ ग्रंथ वाचून जरा साक्षर व्हा मग बोलू..>>>

ही गरज तुम्हाला व संघाला आहे.. सोईचे वाचून एकतर्फी मत डोक्यात घालून व्यक्तिरेखांचा अभ्यास न करता कैच्याकै मते ठोकत बसणे हे तुमच्यालोकांची वैशिष्ट्य आहे.

त्याच पुस्तकात महाराजांचा इतिहास मात्र काही ओळीत आटोपला होता!

>> टाका टाका... हा काही ओळींचा इतिहास कोणत्या पाठ्यपुस्तकांत आहे ते जरूर टाका....

इतिहास-भूगोल ह्या विषयांकडे किती लक्ष देऊन किती मुले आवर्जून शिकतात हे चांगलेच माहिती आहे... पुढे कमाईला लागले की आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला अशी बोंब मारायला मोकळे...

"तुम्हाला चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे" हेच ते ब्रेनवॉशिंग.... कारण तुम्ही स्वतःहून कधीच अभ्यासच केलेला नसतो. मार्कांपुरतं परिक्षेत लिहिणारे आम्हाला इतिहास शिकवला नाही असे म्हणतात तेव्हा लैच हसायला येतं मला..

>> टाका टाका... हा काही ओळींचा इतिहास कोणत्या पाठ्यपुस्तकांत आहे ते जरूर टाका....

CHALLENGE ACCEPTED!!!

फक्त लगेच उद्या, परवा नाही टाकता येणार. जुनी पुस्तके मिळवायला थोडा वेळ लागेल.

Shocking : Cruel Mughal invader ‘Aurangzeb’ glorified as ‘Sufi Saint’ by NCP
https://www.hindujagruti.org/news/16220_mughal-invader-aurangzeb-glorifi...

Communal clashes in Aurangabad after illegal water connection was clamped in ‘place of worship’, reports
http://www.opindia.com/?p=107080

Govt should provide places for namaz if it doesn’t want us to pray on roads: Muslim groups
https://theprint.in/governance/govt-should-provide-places-for-namaz-if-i...

आज या लोकशाही देशात, साधे वस्तुस्थितीवर आधारलेले लेख लिहिणेही काँग्रेजीनीं कठीण करुन ठेवलेय. आणिबाणी लादणारे ते हेच. वर तोंड करुन खरा इतिहास विचारतात.

त्याच पुस्तकात महाराजांचा इतिहास मात्र काही ओळीत आटोपला होता! (कुठे वाचनालयात, माळ्यावर वगैरे जुने पुस्तक मिळाले तर नक्की स्कॅन करून टाकेन!>>>

हे एक आले. इतिहासाच्या तासाला टंगळमंगळ करत होतास का रे? म्हणे एका ओळीत शिकवला?कुठल्या शाळेतला रे तु? शाखेतल्या का?
किती शिकवले ठावूक नसताना बोलू नये

5-6 च्या मुलांना काय बलात्कार लुटालुट शिकवायचे? म्हणजे शाखेत तलवारी दिल्यासारखे करायचे का? सविस्तर इतिहास नंतर आहे पण तुम्ही वाचला नाही तो तुमचा प्रॉब्लम..

खरा इतिहास म्हणे शिकवला नाही? काय आहे खरा इतिहास? गोडस्या भेकड आयुष्यात इंग्रजांविरूध बोलायला वितभर होत असलेला अचानक बंदूक हाती कसा घेतो? इंग्रजांविरूध लढू नका खरे शत्रू मुस्लिम इतर धर्मीय आहे सांगणारा गोळवळकर हा खरा इतिहास हवा का?

केटीधारक शांत बस
साधे असलेला अभ्यास करता येत नाही नापास होणारे थोबाड वर करून यांना खरा इतिहासाचा अभ्यास करायचा म्हणत आहे

जा केटी सोडव आधी

Pages