मातीच्या भांड्याबाबत माहिती हवी आहे.

Submitted by देवकी on 5 May, 2018 - 06:20

२ दिवसांपूरवी मी झाकणवाली मातीची हंडी विकत घेतली.वास जाण्यासाठी त्यात पाणी भरुन ठेवले होते.दोन्ही दिवस भांड्याच्या तळाशी पाणी झिरपत आहे.पहिल्या दिवशी वाटले होईल नीट.पण दुसर्‍या दिवशीही भांड्याच्या बुडाशी पाणी झिरपतंय.जर मी यात काही शिजवले/दूध गरम केले तर ते असेच झिरपेल का?मला अजून काही खरेदी करायची होती.पण आता उत्साह मावळला.
मातीची भांडी कशी वापरण्यात यावी याबाबत माहिती हवी आहे.आगाऊ धन्यवाद!

IMG_20180505_154352.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे सुद्धा मातीचे भांडे आहे. त्यात भात, आमटी एकदम चांगली होते.

आपण एक दिवस पाणी ठेऊन पाणी झिरपणे बंद व्हायला पाहिजे होते. दुसरे भांडे घेऊन प्रयत्न करा.

दुसरे भांडे घेऊन प्रयत्न करा.>>>>> बघू.
सस्मित, लिंकबद्दल आभार.बाकी ते भूमीचे भांडे एकदम झकास आहे.

आता ते भांडे उन्हात वाळण्यासाठी ठेवले आहे.उद्या गॅसवर दूध तापवेन म्हणतेय.

देवकी, नुस्त पाणी घालून नाही चालणार. सिझन करायला पाहिजे. इथे साउथ इंडियन मैत्रिणी बर्‍यापैकी हे पॉट्स वापरतात. त्या पाणी भरून रात्रभर ठेवतात. मग दुसर्‍या दिवशी कोरड करून खोबरेल तेल लावून घेतात भांड्याला. मग अगदी बारीक गॅसवर पुर्ण भांड गरम करून घेतात. ५/१० मिनिट.
मग परत गार झाल्यावर पाणि भरून रात्रभर ठेवतात.
ही संपुर्ण प्रोसिजर ४/५ दिवस रिपिट करतात. आणि मग ते भांडे सांबार करायला, दही लावायला , भाज्या करायला वापरतात.
त्या दगडी भांडी(सोपस्टोन) पण आणतात बरेचदा त्याला पण असच सिझन करतात.

सीमा,धन्यवाद!

काल दुपारपासून ते भांडे उन्हात सुकवले.रात्री मंद गॅसवर ५ मिनिटे ठेवून नंतर त्यात तूपाची फोडणी घालून डाळीची आमटी केली होती.पण केल्या केया लगेच काढल्याने काही चवीत फरक जाणवला नाही.आज तुम्ही सांगितल्यानुसार सिझन करेन.

सीमा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल मातीच्या भांड्यात खोबरेल तेल तापवून थंड झाल्यावर पाणी भरून ठेवले. पाणी अजिबात झिरपले नाही.आजही तसेच केले.आताही पाणी झिरपले नाही.