स्वयंपाकासाठी मातीची भांडी

Submitted by लोला on 27 March, 2013 - 01:55
nirlep bhumi

स्वयंपाकासाठी मातीची भांडी पूर्वीपासून वापरली जातात. त्यातल्या पदार्थांना स्वर्गीय चव येते. आजच्या जमान्यात वापरण्यासाठी अशी भांडी उपलब्ध आहेत. त्याबद्दल इथे लिहीता येईल.

मी नुकतेच "निर्लेप" ने बाजारात आणलेले "भूमी" हे भांडे घेतले. सुबक आकार, मजबूत, छान आहे. त्याच्यावर प्रक्रिया ( २ तास पाण्यात भिजवून ठेवणे) करुन त्यात वांग्याची भाजी केली. मंद आचेवर असूनही भांडे व्यवस्थित लगेच तापले. फोडणीसाठी तेल आधी घालून मग भांडे गॅसवर ठेवले. भाजी नेहमीच्या वेळेत शिजली, छान लागली.

वापर, निगा यांची सर्व माहिती माहितीपुस्तिकेत आहे. यासोबत एक पाककृतींचे पुस्तकही मिळते.

याला २ वे नॉन्स्टिक कोटिन्ग आहे. आतून आणि बाहेरुनही. तेल कमी लागते. हे भांडे गॅस, मायक्रोवेव आणि कन्वेक्शन अव्हनमध्येही ठेवले तर चालते.
स्वच्छ करताना फार न घासता सोप आणि कोमट पाणी यांनी धुवायचे.
मंद आचेवर ठेवायचे
थेट गॅसवर न ठेवता मध्ये एक नेहमीचा मेटल स्टँड ठेवावा.
याबरोबर एक लाकडी spatula मिळत. मेटलच्या पळ्या वापरु नयेत.

हे फोटो
nirbh1.jpgnirbh2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! बरे झाले इथे शेअर केली माहिती.
ह्याची किंमत किती आहे? ग्लास कोटीन्ग आहे का आतून? कपासारखे?

गेले काही दिवस मी अगदी हाच विचार करत होतो की जर धातू चे भान्डे उपलब्ध नसेल, तर वेळेस मातीची भान्डी कशी वापरावीत कारण हल्ली तसे कुठेच वापरताना दिसत नाही. मला तर स्वतःलाच बनवायची आहेत. अर्थात ही प्रेस मोल्ड मधुन बनविलेली असणार, जे घरी शक्य होईलच असे नाही तसेच लागणारी माती (मंगलोरी कौलान्ची) इकडे मिळेलच असेही नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

लोला त्या भांड्याच्या आतील बाजु पण मातीची आहे का? फोटोमध्ये आतल्या बाजुला कोटिंग असलेले धातुचे भांडे आहे असे वाटतेय.

लोला, केनयात मातीचा तवा अजूनही वापरात आहे. त्याला आपल्या झार्‍यासारखी ( पण आकाराने आणि संख्येने कमी ) छिद्रे असतात. त्यावर फुलके केले तर परत गॅसवर शेकावे लागत नाहीत. तिथे तो साधारण ५० रुपयांना मिळतो.

दिनेशभाऊ, थ्यान्क्स, भन्नाट आयडीया सुचविल्याबद्दल, असा भोकाचा तवा तयार केला (माती/धातू) तर भाकरी पुन्हा भाजायची गरज पडणार नाही बहुतेक.

ईथे गुरगाव मध्ये अनेक प्रदर्शनात मातीच्या भांड्यांचा गाळा असतो.मी त्यातून घेतली आहेत १ ..२ भांडी.एक चलंगडी घेतली आहे.चांगले होते त्यात सारे. फक्त ज्या भांड्यात भाजी आमटी केली त्यात दुध तापवू व आटवू नये.

भांडे पूर्ण मातीचे आहे. मेटल अजिबात नाही. मी डिपार्टेमेन्टल स्टोअरमधून घेतली. तिथे ३ वेगळे साईझ होते. फोटोतले सर्वात छोटे आहे, दुसरे मध्यम आहे. आणि एक मोठ्या आकाराचेही मिळते. पण शेप एकच आहे सध्यातरी.
आतून बाहेरुन कोटिंग आहे असे लिहीले आहे, मी नीट वाचून इथे लिहीते काय आहे ते. पण भांडे स्वयंपाक करण्यायोग्य होण्यासाठी ते करावे लागत असेल.
रेसिपी बुकमध्ये भातापासून पुढे बरेच काही आहे पण नेहमीचे पदार्थ करता येतीलच.
छोटे १४००, मध्यम १७०० अश्या किंमती आहेत (डिस्काउन्टसह)

http://www.nirleponline.net/nirlepshop/c/cl_1-c_193/bhoomi.html

भाज्यांना तेल कमी लागतं ला जास्त? स्वच्छ कसं करायचं? व्हेज - नॉन -व्हेज दोन्ही होईल का?

कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळेल की फक्त निर्लेप ऑउटलेट मध्येच....? माझि पण शंका.

माझ्याकडेही एक मातीचे भांडे आहे. वांगं, बटाटा अशा रस्सा भाज्या मस्त होतात एकदम आणि खुप वेळ गरम राहुन रस्सा भाज्यांत मुरतो. भांडं रिकामं गरम करत ठेवायचं नाही असे त्यावर लिहिले होते. मी आधी तेल टाकुन मग गॅसवर ठेवते.

मंगलोरला आमच्या बिल्डिंगमधल्या आंटी कुठूनतरी काळ्या मातीचं एक भांडं घेऊन यायच्या आणि त्यातच दूध तापवायच्या. त्या दुधाला खूप जाड साय येते शिवाय दुधाची चव चांगली लागते म्हणायच्या. त्यांच्या हातची कॉफी अप्रतिम् असल्याने हे खरे पण असेल. Happy

या भांड्याचा टिकाऊपणा साधारण कसा असतो? आमच्या विंचवाच्या बिर्‍हाडामधे सामान हलवताना तुटण्या-फुटण्याच्या चान्ससाठी विचारतेय.

निर्लेप व्यतिरीक्त अजून कुठल्या ब्रँडने आणली आहेत का अशी भांडी?

लोला, फोटोतली भाजी एकदम यम्मी... Happy

हो लिंबू, भाकरी बहुतेक नाही शेकावी लागणार.
मुंबईतही जे कुंभार तग धरुन आहेत ते खापरे बाजारात आणतात. (पुण्यातही असतीलच ना ) त्यांना सांगितले तर करुन देतील. गोव्यात भातासाठी वगैरे अजून मातीची भांडी वापरात आहेत. आंबिल साठी पण आदिवासी मडकेच वापरतात.

भुमी बर्‍याच वर्षांपासून बाजारात आहे, पण त्याला तेवढी मागणी नव्हती. आता कदाचित तंत्र सुधारले असावे. माझ्या आठवणीप्रमाणे ती भांडी पुर्वी नॉन स्टीक होती.

दिनेशदा, बडोद्याला हा छिद्रेवाला तवा १० ते १५ रुपयाना मिळ्तो. अजुन एक प्रकार non stick tava Rs. 100 ला मिळ्तो. या लिन्कवर पण बर्याच वस्तु आहेत त्या जरा महाग आहेत
http://www.mitticool.in/product_detail.php?product_id=5

मस्त दिसतंय भांडं आणि भाजी. आतून कोटिंग कसलं आहे ते सांग.
बायदवे, हे जपानचं 'दोनाबे' भरपूर शेप्स, साईझ मिळतात ह्यात. माझ्याकडे पूर्वी होतं.

आतून बाहेरुन नॉन्स्टिक कोटिन्ग आहे. वर माहिती अ‍ॅड केली आहे.

दिनेशदा, तवा मस्त आहे!
सावली, तू म्हणतेस तश्याच सूचना आहेत.
नंदिनी, अजून तरी आहे फुटले नाही. Wink

लोला, मी वर दिलेला फोटो/माहिती पहा. त्याला असं कोटींग नसतं.
जर ह्याला कोटिंग आहे तर मातीचे गुणधर्म, चव पदार्थात कसे उतरतात?

भारी दिसतंय. आता पुढच्या भारतवारीत आणणार.

मी केरळातून (हा आपला योगायोग - महाराष्ट्रात मिळत नाही असं नाही. Happy ) आणलं होतं एक मातीचं भाडं स्थानिक कुंभाराच्या लहानशा दुकानातून. अर्थातच सोबत काही माहितीपत्रक वगैरे नव्हतं. भिजवून मग वापरायचं वगैरे इन्टरनेटवरून कळलं आणि त्याच्या मल्याळमपैकी जितकं आमच्या गाइडाकडून पदरात पडलं त्यावरून नुसतं गॅसवर ठेवायचं नाही इतकं कळलं.
माझा अजून फोडणी वगैरे करायचाही धीर झालेला नाही त्यामुळे त्यात. आता करेन. त्यात पाणी उकळून धुतलेले तांदूळ वैरून भात केला आहे, तो छानच होतो. भांड्याला काही कोटिंग वगैरे नाही, पण स्वच्छ करायला सोपं आहे.

>> जर ह्याला कोटिंग आहे तर मातीचे गुणधर्म, चव पदार्थात कसे उतरतात?
+१ मलाही हा प्रश्न पडला.

मातीचे गुणधर्म म्हणजे कोणते? Proud
चव उतरणार नाही कदाचित.
माहितीपत्रकात असे लिहीले आहे की मातीच्या भांड्यात शिजवल्याने पदार्थांची मूळ चव रहाते, पदार्थ करपत नाही. (porous भांड्यामुळे) भांडे मंद आचेवर असूनही पटकन तापले मात्र.

असामी, माझ्याकडे अ‍ॅमेझॉनवर घेतलेले भांडे आहे. आतून/बाहेरुन मातीचे. माझ्याकडे ग्लास टॉप स्टोव्ह असल्याने ते भांडं पापड भाजायच्या जाळीवर ठेवून मग त्यात भाजी करते. सुरुवातीला भांडं गरम व्हायला वेळ लागतो पण व्यवस्थित शिजते भाजी. भांड्यातच फोडण्या केल्या तरी चालतात.

बित्तुबंगांनी लिहिलेल्या आलु बंजारा पाकृच्या धाग्यावर अ‍ॅमेझॉनवर मिळणार्‍या मातीच्या भांड्याची माहिती/चित्र इ आहे.

Pages