पदार्थांचे गुणधर्मः उष्ण-शीत

Submitted by ज्ञाती on 3 May, 2010 - 00:05

गुण म्हणजे पदार्थाचा अंगभूत गुणधर्म. मग तो चांगला (शरीराला उपकारक) असो की वाईट (शरीराला हानिकारक), त्याला "गुण" च म्हटले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रांमध्ये पदार्थांचे वीस गुण सांगितले आहेत. त्यापैकी महत्वाचे दोन म्हणजे उष्ण-शीत. उष्ण म्हणजे बोलीभाषेत गरम आणि शीत म्हणजे थंड. (इथे पदार्थ स्पर्शाला म्हणजे हात लावुन पाहिल्यावर गार/गरम लागतो याचा काही संबंध नाही.)

एखादा पदार्थ उष्ण की शीत हे कसे ठरते?
१. स्वभावः प्रत्येक पदार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासुन बनलेला असतो. या पंचमहाभूतांचे गुणधर्म पदार्थात कमी-अधिक प्रमाणात येतात. उदा. जसे तेज महाभूत रुक्ष, तीक्ष्ण, उष्ण आहे. ज्या पदार्थामध्ये तेजोमहाभूताचे आधिक्य असते तो पदार्थ (उदा. मिरे) साधारण तसेच गुणधर्म दाखवतो. उष्ण पदार्थांमध्ये तेज व वायू महाभूतांचे आधिक्य असते. शीत पदार्थांमध्ये जल, आकाश आणि पृथ्वी महाभूताचे अधिक प्रमाण असते.

२. परिणामः त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हे पदार्थाचे गुण ठरवण्याचा महत्वाचा निकष आहे.
आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा.

शास्त्रकारांनी या गुणधर्माचे वर्णन हजारो वर्षांपुर्वी करुन ठेवले आहे. पदार्थातील पंचमहाभूतांचे कॉम्बिनेशन आजही तसेच आहे. त्यामुळे इतक्या वर्षापुर्वी केलेला अभ्यास जुना झाला, आता नव्याने गुणधर्मांचा अभ्यास व्हायला हवा असे म्हणणे फोल आहे.

प्रत्येक पदार्थ एकतर उष्ण असतो किंवा थंड असतो, अर्थातच उष्णतेचे/शैत्याचे प्रमाण वेगवेगळ्या पदार्थात कमी-अधिक असते. जसे की हिरवे मूग हे किंचित उष्ण आहेत तर मिरे अति-उष्ण आहेत. सुंठ बर्‍यापैकी उष्ण आहे. हे तर-तमत्व पदार्थाच्या पांचभौतिक कॉम्बिनेशननुसार येते. (वेगळे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण म्हणतो ना आज हवामान गरम आहे/कमी गरम आहे/ गरम नाहिये पण थंडीही नाहिये/ खूप थंड हवामान आहे तसंच काहीसं.)

आता वर म्हटले तसे हे गुण म्हणजे पदार्थाचा स्वभाव आहे. एकाच पदार्थातील गुणाचे तारतम्य हे प्रामुख्याने दोन घटकांमुळे बदलते.
१.त्या पदार्थावरील संस्काराने: जसे दही उष्ण आहे. त्यामध्ये पाणी मिसळुन घुसळणे हा अन्नसंस्कार केला असता तयार होणारे ताक हे दह्यापेक्षा कमी उष्ण असते (दह्यापेक्षा कमी उष्ण असले तरी ताक उष्णच आहे).
२. तो पदार्थ सेवन करणार्‍या शरीराची प्रकृती आणि अवस्था:
प्रकृती:- मुळातच पित्ताधिक प्रकृतीच्या व्यक्तीला तुरीची डाळ/दही कधीही, कशाबरोबरही खाल्ले तरी उष्ण पडते.
अवस्था:- शरीरात कफदोषाचे आधिक्या झाले असता (जो मुळात थंड, गुरु अशा गुणांचा आहे) मिरे हे तितके उष्ण पडत नाहीत. कारण त्यातील उष्णत्व हे वाढलेल्या कफाचे पारिपत्य करण्यात खर्ची पडते. याउलट शरीरात उष्णता आधीच वाढलेली असताना घेतले गेलेले साधारण उष्ण द्रव्यही (जसे तिळ-गुळ) बाधते (शरीराला उष्ण पडते). यावरुन लक्षात येते की एखादा पदार्थ केवळ उष्ण किंवा थंड म्हणुन चांगला किंवा वाईट असे वर्गीकरण करणे अशक्य आहे. गरजेनुसार, योग्य प्रमाणात वापरलेली दोन्ही गुणांची द्रव्ये शरीराला तितकीच फायदेशीर आहेत.
३. काळ (अर्थात दिवसाची/ऋतूची अवस्था): भर उन्हाळ्यात तिळगुळाची पोळी किंवा दुपारच्या वेळी आवड म्हणून सूपवर घातलेली किंचितशी मिरपूड उष्ण पडु शकते. तसंच थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी खाल्लेला पेरु थंड पडतो.
४. शरीराच्या विशेष अवस्था जसे आजारपण किंवा गरोदरपण: या अवस्थांमध्ये अतिउष्ण आणि अतिथंड अशा दोन्ही गुणांनी युक्त पदार्थांचा वापर टाळावा. याबाबतच्या काही सामान्य गैरसमजुती पुढीलप्रमाणे:
लहान मुलांना केळे खायला देणे, विशेषतः रात्रीच्या वेळी. लहान मुलांमध्ये आधीच कफ दोषाचे आधिक्य असते. त्यात रात्रीच्या वेळी (जेव्हा वातावरणात शीत गुणाचे आधिक्य असते) तेव्हा केळी खाल्ल्यास मुलांना श्वसनसंस्थेशी निगडीत आजार बळावतात जसे सर्दी, खोकला, बाळ-दमा.
गरोदर स्त्रियांनी बदाम, खजुर, केशर असे पदार्थ नियमित खाणे: ह्या उष्ण पदार्थांच्या सेवनाचा बाळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होउ शकतो.

आता नेहमी आहारात येणारी अन्न/औषधी द्रव्ये साधारणपणे उष्ण की शीत ते पाहू.
उष्ण द्रव्ये:
करडई, चुका, मेथी, कारले, वांगे, आंबा, फणस, कवठ, टोमॅटो, ताक, दही, खोबरे, गुळ, तीळ, हिंग, मोहरी, ज्वारी, बाजरी, कुळीथ, उडीद, लसुण, खजूर, तेल, मद्य, सुंठ, मिरे, जिरे, वेलची, ओवा, बदाम, खारीक, जायफळ, अक्रोड, केशर, डिंक, आंबा, पपई, टरबुज, चिंच, जीरे, लवंग इ.

शीत द्रव्ये:
दुध, तूप, लोणी,मध, पाणी, नारळाचे पाणी, उसाचा रस, चिक्कु, सीताफळ, केळे, पेरु, द्राक्षे, सफरचंद, चंदन, वाळा, जेष्ठमध, तांदुळ, नाचणी, लाह्या, बटाटा, रताळे, काकडी, मनुका, सब्ज, गुलकंद, धणे इ.

उष्ण-शीत गुणांबद्दलच्या माहितीची उपयुक्तता: आयुर्वेद हे एक प्रत्यक्षपर शास्त्र आहे. म्हणजेच त्यातील कुठल्याही संकल्पनेचे ज्ञान व्यवहारात उपयुक्त ठरते. उष्ण आणि शीत हे परस्परविरोधी गुण आहेत. शरीरातील उष्णता वाढली असता शीत गुणाचे औषध वापरावे लागते. तसेच शरीरातील शीत गुण वाढला असता उष्ण द्रव्याने त्याचे निराकरण होते. एखाद्या व्यक्तीला डोळ्याला रांजणवाडी येउन डोळ्याची आग होत असेल तर घरात उपलब्ध असलेले थंड द्रव्य/औषध (जसे ज्येष्ठमध, तूप, लोणी) वापरुन लगेच उपचाराला सुरुवात करता येते.त्याचप्रमाणे काही वेळा वयस्कर माणसांचे एसीमध्ये जाउन आल्यावर पाय दुखतात. अशा वेळी थंड गुणाने झालेल्या या त्रासावर लगेच शेकणे हा गरम उपाय करता येतो. आधीच अ‍ॅसिडिटी होण्याची शरीराची प्रवृत्ती माहीत असेल तर त्या दृष्टीने गरम पदार्थांचे जाणीवपुर्वक सेवन केले जाते.

लेख आणि उत्तरे ही माझ्या अल्पमतीप्रमाणे देण्याच्या प्रयत्न केला आहे. यात उणीवा असल्यास त्या वैयक्तिक मर्यादा समजाव्यात, शास्त्राच्या नव्हे. Happy

(टीपः काही दिवसांपुर्वी एका बातमीफलकावर झालेल्या चर्चेतून या लेखाचा मुहूर्त लागला. अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेल्या/ले शंका/प्रश्न यांचे स्वागत आहे. ( आयुर्वेदावर विश्वास नसलेल्यांना त्याची महती पटवुन देणे हा लेखाचा उद्देश नाही. )

प्रकाशनपूर्व प्रूफरीडिंगसाठी सिंडरेला, अश्विनी यांचे मनापासून आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्डे उष्ण असते ना? उन्हाळ्यात खाल्ले तर चालते का? उष्ण पडु नये म्हणुन सोबत आणखी काही खावे का?

खूप छान लेख आहे. नाचणी उन्हाळ्यात खाऊ शकतो का? माझी acne prone skin आहे.मी खूप बारीक आहे. मला वजन वाढवायचं आहे. माझ्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू? Dr बोलले होते की तूप, चना डाळ ,तळलेले पदार्थ, पाव , अंडी खायचे नाही. दही व केळी खाल्ले की मला सर्दी होते. Plz rply Kara na

२. परिणामः त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हे पदार्थाचे गुण ठरवण्याचा महत्वाचा निकष आहे.
आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा.
>>
असे ढोबळ वर्गीकरण करुन, त्याला काहीतरी समर्पक नाव देणे, यात अशास्त्रीय काय आहे?

मला वजन वाढवायचं आहे. माझ्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू? Dr बोलले होते की तूप, चना डाळ ,तळलेले पदार्थ, पाव , अंडी खायचे नाही.
<<

डॉक्टर बदला.
तरूण व्यक्तीला वजन वाढवण्यासाठी या गोष्टी खाऊ नको सांगणार्‍या या महानुभावांचे काँटॅक्ट डीटेल्स मला संपर्कातून कळवा, फोटो असेल तर उत्तम. रोज उदबत्ती ओवाळून (***ने) आरती करीन. Lol

@ अभि_नव.
(वैयक्तिक प्रतिसाद)

२. परिणामः त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम हे पदार्थाचे गुण ठरवण्याचा महत्वाचा निकष आहे.
आयुर्वेदातील व्याख्येप्रमाणे, सर्वसाधारणपणे ज्या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराची/शरीराच्या एखाद्या भागाची आग होते, तहान लागते, घाम येतो, चक्कर-ग्लानि येते तो पदार्थ उष्ण समजावा. याउलट ज्या पदार्थाने थंड वाटते, वाहणारे रक्त थांबते अर्थात रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, शरीराची होणारी आग कमी होते, तहान शमते तो पदार्थ शीत समजावा.
>>
असे ढोबळ वर्गीकरण करुन, त्याला काहीतरी समर्पक नाव देणे, यात अशास्त्रीय काय आहे?
<<

"शास्त्र" म्हणजे काय? शास्त्रात मांडलेले सिद्धांत बदलू शकतात, त्यात प्रगती होते, हे मान्य आहे का?

५००० वर्षांपूर्वी (म्हणजे आमच्या काळी NCERT सुरू झाली, तेव्हा) "पदार्थाच्या लहानात लहान अविभाज्य कणास अणू म्हणतात" असे मला ७वीत शिकवले. ८वीत त्याच अविभाज्य कणात प्रोटॉन, न्यूट्रॉन अन इलेक्ट्रॉन्स असतात हे शिकवले. अन सोबतच अ‍ॅटॉमिक फिशनही शिकवले. तर, ५००० वर्षांनंतर, ते "ढोबळ" जरा रिफाईन व्हायला हवे असे वाटत नाही का? की ढोबळमानाने रामभरोसे जग चालवायचे आहे?

(इतरांसाठी: ढोबळमानाने नांव देणे यात चुकीचे नाही. त्याकाळी ज्ञात असलेल्या निकषांनुसार वर्गीकरण करणे हे शास्त्राच्या त्या पायरीसाठी बरोबर आहे. पण लोचा असा आहे, की हे "शास्त्रीय" आहे असे "आज" म्हटले, की पुढे जाऊन या शीत-उष्ण पदार्थांमुळे अमुक आजार होतात, हे ही "शास्त्रिय" आहे असे आपोआप सिद्ध होते, अन पुढचे सगळे उपचार बिनडोकपणे शास्त्राच्या नावाखाली केले जातात. उदा. किडनि फेल्युअरला कोथिंबिरीचा रस, अ‍ॅलर्जीसाठी बस्ती, सर्दीसाठी नस्य, डोकेदुखीसाठी जलुकावतरण, अन बरेच काही. वाट लागली की मग "डॉक्टर" कडे जायचे, अन मग मॉडर्न मेडीसिनला दोष द्यायचा.)

महोदय, आपणास "scientific" या शब्दाचा अर्थ समजतो का? आपल्या मायबोली मराठीत "शास्त्रीय" वास्तुशांती देखिल करतात. 80KT वाले तुम्हीच ना?

डॉ. रवी प्रयाग, साहेब,

अ‍ॅलोपथी हा शब्द कुठून आला हे जरा शोधून पहाल का? मी "अ‍ॅलोपथी" चा डॉक्टर आहे असे वाटते का तुम्हाला?>

मी "मॉडर्न मेडिसिनचा" "डॉक्टर" आहे. वैद्य्/वैदु/होमिओपॅथ्/हकीम्/योगगुरु इ. नाही. अ‍ॅलोपॅथ तर अजीब्बातच नाही.

"Allopathy is a derogatory term coined by हन्नीमॅन."

अर्थात,

Allopathic medicine and allopathy (from the Greek prefix ἄλλος, állos, "other", "different" + the suffix πάϑος, páthos, "suffering") are terms coined in the early 19th century by Samuel Hahnemann, the founder of homeopathy, as a synonym for mainstream medicine.

Wink

एनीवे,
माझा "वरचा" वैयक्तिक प्रतिसाद वाचून मला अलाऊड टु कीप टर्म असा फुल फॉर्म सांगणार्‍यांना, "हाय!"

अरेरे आ रा रा, तुम्हाला शब्दच्छल करण्याची फार सवय आहे, ती फार आक्षेपार्ह आहे. Modern म्हणा.
काय म्हणायचं याकडे तुम्ही ध्यान द्या, बाकी नंतर! तुम्ही विरोध करायचाच ते सुद्धा आपल्यासारख्यांनाच का?
विरोध करण्यासाठी विरोध सोडून मुद्दा काय आहे ते जरा बघा न जरा! पुढे?

आ.रा.रा,
तुला उद्देशुन मी काहीही लिहिले नसताना, इथे येऊन कारण नसताना वयक्तीक प्रतिसाद देत आहेस.
तुझ्यासारख्या लोकांमुळे एखादी चर्चा नीट होऊ शकत नाही इथे.
मुळ प्रश्नाला बगल देऊन, जो प्रश्न मी विचारलाच नाही त्या प्रश्नाचे उत्तर अशास्रीय आहे हे सांगत आहेस आणि वरुन अविर्भाव असा की काय मोठे गुपीत उघड केले.

अभि_नव, आयुर्वेदाप्रमाणे ठीक आहे, alopathy प्रमाणे नाही, बाकीच्या डॉक्टर्सना विचारून बघा हवं तर!alopathy च्या !
Submitted by डॉ रवी१ on 26 April, 2018 - 22:32
>>
डॉ. रवी१,
अलोपथीमधे या संकल्पना अगदी अशाच नसतील किंवा दुस-या कुठल्याही स्वरुपातही नसतील. केवळ त्या अलोपथीमधे नाहीत, म्हणुन आपोआप अशास्त्रीय कशा ठरतात? त्यांना अशास्त्रीय ठरण्यासाठी "त्या अलोपथीमधे नाहीत" यापेक्षा अजुन जास्त "शात्रीय" कारण हवे ना?

{प्रत्येक पदार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासुन बनलेला असतो.}

हे नवीनच आहे माझ्यासाठी.
शास्त्रीय आहे की नाही, हे ठरवायची आपली कुवत नाही.

शास्त्रीय आहे की नाही, हे ठरवायची आपली कुवत नाही.
नवीन Submitted by भरत. on 27 April, 2018 - 09:10
>>
असा नम्रपणा हवा माणसाच्या अंगी! Wink Proud

अभि_नव, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु मी अशास्त्रीय असे न म्हणता, आधुनिक वैद्यकीय
शास्त्रामध्ये allergy मध्ये पित्त उठते, त्वचा गरम होऊ शकते, गळू इ. झाल्यास त्वचा तापते, अम्लपित्तात
जळजळ होते असे प्रकार होतात, हे खरे आहे, तशा प्रकारात थंड/गार किंवा गरम होणे ह्याला एका साधारण लक्षणा
पलीकडे विशेष महत्व देत नाही. आयुर्वेद हे जास्त सखोल,व्यापक, समग्र व समावेशक असण्याची शक्यता मला आधुनिक वैद्यकापेक्षा असू शकेल किंवा असेलही हे ही मान्य आहे. प्रत्येक pathies ना merits व demerits असू
शकतात. मला pathies बद्दल empathy/sympathy व आदर आहे, त्यामुळे मी सर्वसमावेशक आहे.

आयला! तरीच मला आयडीची आहुती देऊ नका असा सल्ला मिळाला होता. 21.gif आज पाहिलं हे रत्न!
<<
आ.रा.रा,
तुला उद्देशुन मी काहीही लिहिले नसताना, इथे येऊन कारण नसताना वयक्तीक प्रतिसाद देत आहेस.
तुझ्यासारख्या लोकांमुळे एखादी चर्चा नीट होऊ शकत नाही इथे.
मुळ प्रश्नाला बगल देऊन, जो प्रश्न मी विचारलाच नाही त्या प्रश्नाचे उत्तर अशास्रीय आहे हे सांगत आहेस आणि वरुन अविर्भाव असा की काय मोठे गुपीत उघड केले.
नवीन Submitted by अभि_नव on 27 April, 2018 - 09:22
<<
अर्र!
80KT चे गुपित फारच वर्मी लागलेय तर.

तर अभिनवजी, तो प्रतिसाद मुद्दाम वैयक्तिक यासाठी आहे, की "तुमच्या"सारखे फडतूस या देशात गेल्या साठ वर्षांत उभ्या राहिलेल्या क्रेडिटेबल व क्रेडिबल इन्स्टिट्यूटमधून घेतलेली पदवी "मिरवत" लोकांचा बुद्धीभेद करीत फिरत आहेत. ९०%+ विद्यार्थी भारत (यालाच हिंदूस्थान म्हणतात ना?) सोडून जातात अशा संस्थेचे तुम्ही विद्यार्थी आहात म्हणे? अन तरीही भारतात टिकून आहात? ;अरेरे: Rofl अन ऑन अदर हँड, "आपले" सरकार गेल्या "हजारो" वर्षांपासून डॉक्टरांकडुन बाँड लिहून घेतंय.

अरे टिनपॉट माणसा, आय मीन अभि_नव "जी" मेडिसिनबद्दल बोलूच नकोस नका. अन हो. आता अरेतुरे वर आलाच आहेस बाळ, तर जरा मूळ प्रश्न कोणता ते सांगतोस का? तुझे तुमचेच वाक्य तिथे क्वोट केलेले आहे.

"असे ढोबळ वर्गीकरण करुन, त्याला काहीतरी समर्पक नाव देणे, यात अशास्त्रीय काय आहे?" << हे ते वाक्य.

ढोबळ वर्गिकरण = शास्त्र असे तुला म्हणायचे आहे काय, बाळा?

***

डॉ. रवि,
सर, तुम्हाला सध्या पास. मी आजकाल अ‍ॅलोपथीची "कोणतीही" डिग्री असलेल्या लोकांना पास देण्याच्या मूडात आहे. ते आपले हे, अन मी यांत जी काय "चर्चाझ" सुरू आहे तिचा काँटेक्स्ट लक्षात न घेता मधे पडून मला बोलणे हे बरे नव्हे, बर्का. प्लीज हं सर.

अवांतर,
बाकी यूजी, पीजी बाँडबद्दल, सध्याच्या आयुष मंत्रालयाबद्दल, (आयुष काय ते आपणास ठाऊक असेलच ना सर? त्यात्ला A अ‍ॅलोपथीचा नाहिये अन आपले ते "हे" परदेशात जाऊन तुमच्या पॅथीच्या डॉक्टरांना शिव्या घालतात बर्का. लै अभिमान वाटला ना तुमच्या शिक्षणाचा तेव्हा तुम्हाला? आय क्नो. शब्दाला किंमत अस्ते हो सर. छळुन शब्द बदलत नाहीत.),
हा, कुठे होतो आपण?
तर, आयुर्वेदातील (उदा चरकसंहिता, सुश्रुतसंहिता यांतील गोमांसभक्षणाबद्दलच्या श्लोकांसंबंधी, त्याने होणारे पुत्रप्राप्ति वगैरे..) उपचार यांबद्दल नक्की काय म्हणणं आहे सर तुमचं? "ग्रेट" असू ""शकते"" इतकेच. बरोबर ना? याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे. डाएट, न्यूट्रीशन इ चा अभ्यास आयुर्वेदात फारच सुंदर आहे. कांशाच्या पात्रात ओतलेली जांभळाची मदिरा प्लस विस्तवावर भाजलेले त्या आपल्या ह्या .. चे मांस.. असे उन्हाळ्यात भक्षण करणे योग्य असते म्हणे?

आता अरेतुरे वर आलाच आहेस
>>
वयक्तीक होण्याची सुरुवात तु केलीस आधी.

ढोबळ वर्गिकरण = शास्त्र असे तुला म्हणायचे आहे काय, बाळा?
>>
हे असे मी कुठे म्हणालो ते वाक्य दाखव पाहु, नाव लपवुन फिरणा-या वयस्कर माणसा.

Pages