ताटाभोवतीची नाविन्यपूर्ण महिरप

Submitted by मनीमोहोर on 24 April, 2018 - 10:17

व्हेजिटेबल कारविंग मध्ये मला खूप रस आहे. खूप दिवसांपासून अशी महिरप करायचं मनात होतं . काल ती केली. टोमॅटो च्या स्किन ला स्पायरल मध्ये काढून घेतलं आणि नंतर ते रोल केलं की अशी गुलाबाची फ़ुलं मिळतात. मध्ये ठेवण्यासाठी काकडीचं कमळ केलं आणि पानं केली भो. मिरचीची. ताटाच्या दोन्ही बाजूला ठेवले टोमॅटोचे गुलाब आणि पानं आणि मध्ये ठेवलं काकडीचं कमळ.

काल काहीतरी छोटासा समारंभ होता म्हणून ही महिरप केली. मेन्यू होता अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन .. ब.भाजी, कोशिंबीर, ढोकळा, टोमॅटोचं ना. दूध घालून सार, वरण भात तूप लिंबू , आणि बासुंदी पुरी ...सगळं घरी केलेलं .

मेन्यू आणि महिरप बघून पाव्हणे खुश आणि त्यामुळे मीही खुश ..

हा फोटो

IMG_20180423_142208.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म.मो. किती गोड!! मला महिरप खूप आवडली. मस्त.
ते टोमॅटोचं साल कसं काढायचं काही कळलं नाही. तूनळी वर असेल ना?

धन्यवाद सर्वाना.

यू ट्युब वर आहे टोमॅटोचं गुलाबाचं फूल कसं करायचं ते. पण पुढे त्याची महिरप करायची आयडिया माझी आहे. कोणाला वाटलं तर करता येईल म्हणून शेअर केलीय माबोवर.

हे टोमॅटोचे गुलाब खर्‍या गुलाबाच्या झाडावर लावले तर किती दिवस टिकतील? आमच्या दारातलं गुलाब सध्या निपुत्रिकेसारखं उदास दिसतंय.

@ पाय (चिन्ह सापडत नाही)
तुमच्या गुलाबांना गुलाबजाम मुव्ही दाखवा. उदासीनता जाईल. Happy

धन्यवाद सर्वाना.
सगळे प्रतिसाद मस्त.
टीना, स्मायली लई भारी .

π Proud

सजावट मस्त आहे. पण ताट अजून भरपूर भरलेलं पाहिजे Blush

हेमाताई तुम्ही खुप ग्रेट आहात. अशा कामात खुप अलगद हात आणि पेशन्स लागत ते तुमच्याकडे भरपूर आहे. खुप छान झाल आहे.

खूप छान..!
जेवणारी व्यक्ती ताट पाहूनच खूष..!

Pages