ताटाभोवतीची नाविन्यपूर्ण महिरप

Submitted by मनीमोहोर on 24 April, 2018 - 10:17

व्हेजिटेबल कारविंग मध्ये मला खूप रस आहे. खूप दिवसांपासून अशी महिरप करायचं मनात होतं . काल ती केली. टोमॅटो च्या स्किन ला स्पायरल मध्ये काढून घेतलं आणि नंतर ते रोल केलं की अशी गुलाबाची फ़ुलं मिळतात. मध्ये ठेवण्यासाठी काकडीचं कमळ केलं आणि पानं केली भो. मिरचीची. ताटाच्या दोन्ही बाजूला ठेवले टोमॅटोचे गुलाब आणि पानं आणि मध्ये ठेवलं काकडीचं कमळ.

काल काहीतरी छोटासा समारंभ होता म्हणून ही महिरप केली. मेन्यू होता अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन .. ब.भाजी, कोशिंबीर, ढोकळा, टोमॅटोचं ना. दूध घालून सार, वरण भात तूप लिंबू , आणि बासुंदी पुरी ...सगळं घरी केलेलं .

मेन्यू आणि महिरप बघून पाव्हणे खुश आणि त्यामुळे मीही खुश ..

हा फोटो

IMG_20180423_142208.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच झालेय.
टोमॅटो ची फुलं सुंदर.फ्रिजर मध्ये ठेवून मग कापले का?

धन्यवाद प्रतिसादासाठी सगळयांना.

सायो उकडून नाही घ्यायचे टोमॅटो. टोमॅटोची स्किन एका सलग स्पायरल मध्ये काढायची आहे आणि ती काढताना जरा zig zag काढली पाकळ्या छान होतात. एवढं कठीण नाहीये ते. थोड्या प्रॅक्टिस ने नक्कीच जमेल.

अनु , टोमॅटो रूम temperature चे घ्यायचे आहेत. फ्रीजर मधले खूप कडक होतील आणि carving कठीण होईल.

योकु, कमळामध्ये टोमॅटो ची त्या साईज ची गोल चकती ठेवली आहे.

हे खाणं कठीण आहे. ह्याकडे एक सजावट म्हणूनच बघावे. इथे केलेली टोमॅटो ची फुल तर जस्ट स्किन ची केली आहेत त्यामुळे उरलेला टोमॅटो वापरुच शकतो आपण. पण वेज कारविंग ही एक कला आहे . जसं रुखवतात केले जाणारे साखरेचे शोभेचे पदार्थ, हलव्याच्या दागिन्यातला हलवा वैगेरे कुठे खाल्ले जात असतील ? तसंच आहे हे ही. ही सगळी एक प्रकारची skills आहेत. त्याकडे त्या नजरेतून बघणे योग्य.

ताटातले पदार्थ तर जास्तच आवडले : P थँक्स

सुंदर.
कला म्हणून बघावं >> +१
जसं कागदावर चित्र काढलं की कागद, पेन्सिल, खडू, रंग फुकट जात नाहीत तर त्याचा वापर होतो तसंच हे. खाण्याचे पदार्थ आल्याने होणारी द्विधा समजू शकतोच, पण ही कलाच आहे.

खूपच छान सजावट. जेवणाचा बेत पण झकासच, एकदम तोंडाला पाणी सुटले.
आणि हो, त्या हॉटेलमध्ये एक तै पाककृतीवर लिहितात त्यांच्यासारखा फोटोच्या मधोमध "मनिकामिहिर" असा काहीतरी बटबटीत लोगो टाकला नाहीत, त्याबद्दल तुमचे विशेष आभार. Happy

मस्त दिसतय. टोंमॅटो आणि काकडी खायला आवडते त्यामुळे जेवताना माझा हात ताटाबरोबरच महिरपीत पण जाण्याची दाट शक्यता आहे Proud

Pages