मैत्री भाग - 5

Submitted by ..सिद्धी.. on 14 April, 2018 - 12:22

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा...
भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

मागील भागात:-
महंतांच्या चेहेर्यावर स्मितहास्य पसरलं. त्यानी समिधाच्या बाबांची परवानगी घेऊन समीरलाच तो सांगायला लावला. सगळ्यांनाच ती कल्पना आवडली आणि शेवटी या योजनेवर शिक्कामोर्तब झाली. महंतांनी धोका नको म्हणून घरातल्या सर्वांच्या हातात अभिमंत्रीत धागा बांधला. हे सगळं ठरवून पहाटे चार वाजता सगळेजण झोपायला गेले.
इथून पुढे
==================================
सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. समिधा पडल्या पडल्या विचार करू लागली. राजेशला ती लहानपणापासून ओळखत होती. तिच्यापेक्षा तीनच वर्षांनी मोठा असल्याने तिचं छान जमायचं त्याच्याबरोबर. खूप काळजी घ्यायचा तो तिची. इतकं चांगलं वागणार्या माणसाचा दुसरा चेहेरा असाही असू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. भाऊ-बहीणीचं नातं की मैत्रीचं नातं निवडायचं यावर तिचं मन अजूनही दोलायमान परिस्थितीत होतं. राजेशचा विचार करायला गेलं की रोहनचा केविलवाणा चेहेरा डोळ्यासमोर यायचा .शेवटी बराच विचार केल्यावर तीने मैत्रीचं नातं निवडलं तेव्हा कुठे तिला शांतपणे झोप लागली.

सकाळी सगळेजण उशीराच उठले. आवरून झाल्यावर बाबांनी राजेशला फोन लावला. बर्याच दिवसांच्या गप्पा मारल्या. समिधा आल्याचं कळल्यावर राजेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. तब्बल तीन वर्षांनी तिला भेटायला मिळणार म्हणून खूप खूश होता तो. परीक्षेमुळे कारखान्याच्या उद्घाटनालाही आली नव्हती ती. त्यामुळे कधी एकदा दिला भेटतो असं झालं होतं त्याला. बाबांनी जरा घाबरतच त्याला समिधा आणि कंपनीला बाहेर फिरवून आणशील का? असं विचारलं. तोही आपल्या लाडक्या बहीणीला फिरायला घेऊन जायला तयार झाला. शेवटी संध्याकाळी चार वाजता निघायचं ठरलं. राजेशने फोन ठेवला. योजनेचा पहिला टप्पा यशस्वी रित्या पार पडल्यामुळे बाबांना हायसं वाटलं.
 
चार वाजता समिधा ;संजना आणि समीर तयार होऊन चहा पीत बसले होते. तितक्यात राजेश आला. समिधाने या दोघांशी त्याची ओळख करून दिली. बाबांना सांगून सगळेजण निघाले. समीरने राजेशला विचारून गाडी चालवायची परवानगी मागीतली. पहिल्यांदा राजेशने जरा आढेवेढे घेतले. पण संजनाने त्याला सांगितलं की समिधाबरोबर बसून तुला मस्त गप्पा मारता येतील. इतक्या वर्षांनी भेटताय तर मग मस्त एंजाॅय करा. समिधानेही त्याला गळ घातली. मग त्याने समीरला गाडीची चावी देऊन ड्राईव्ह करायला सांगितलं. समीरने संजनाच्या हुशारीची दाद दिली. राजेश समिधा बरोबर मागच्या सीट वर बसून  गप्पा मारू लागला. सगळ्यात आधी ते  कारखाना पहायला गेले. तिथे बराच वेळ सगळं पाहण्यात गेला. राजेशने त्यांची उत्तम सोय केली होती..

महंतांनी मात्र त्या चौघांबरोबर जाणं टाळलं होतं. आदल्या दिवशीसारखीच त्यांनी पूजेची तयारी केली. काही सामान संपलं होतं.त्याची लिस्ट करून मागवून घेतलं. ते सगळं एकत्र करून त्यांनी त्याच्या गाडीत ठेवलं . ठरल्याप्रमाणे समिधाचे बाबा देखिल त्यांच्यासोबत निघाले. महंतांनी समिधाच्या घरातल्या सर्वांना पूजेच्या काळात देवघरात बसण्यास सांगितलं. आणि कुठल्याही परिस्थितीत हातात बांधलेला अभिमंत्रीत धागा काढायचा नाही असं बजावलं. सातच्या सुमारास महंत आणि समिधाचे बाबा निघाले. बाबा ड्रायव्हिंग करत असताना महंत काही मंत्रांचा उच्चार करत होते. एके ठिकाणी त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. गाडीतलं सगळं सामान त्यांनी एका मोठ्या पिशवीत घेतलं. बाबांनी गाडी व्यवस्थित पार्क केली. काल तिघांना दिलेल्या सूचना बाबांनाही दिल्या आणि दोघांनी चालायला सुरूवात केली. कोणीच एकमेकाशी बोलत नव्हतं. भारलेल्या प्रदेशाची सुरूवात झाली हे कळत होतं. वारा एकदम पडलेला होता . वातावरणात एकप्रकारची उदासीनता होती. नैराश्य पसरलं होतं. अर्धा तास चालल्यावर महंत त्या ठिकाणी आले. त्यांनी आणि समिधाच्या बाबांनी कालच्यासारखी पूजेची तयारी केली. आता ते संजनाच्या मेसेजची वाट बघत होते.

  साधारण आठ वाजताच्या सुमारास संजनाचा मेसेज आला . कारखाना बघून ते यायला निघाले होते. वीस एक मिनीटात पोहोचणार होते. रात्रीच्या वेळी सगळीकडे किर्र अंधार पसरला होता. समीर वेगात गाडी चालवत होता. संजना आणि समीधाने त्याला मस्त गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. थोड्याच वेळात ते इष्ट स्थळी पोहोचणार
होते..

संजनाचा मेसेज आल्यावर महंतांनी आवाहनाला सुरूवात केली. मंत्रपठण संपल्यावर रोहनची प्रतिमा तिथे अवतरली. बाबा आश्चर्यचकीत होऊन हा सगळा प्रकार रिंगणात उभे राहून बघत होते. कुंकवाचं रिंगण एकदा चमकून पुन्हा शांत झालं.

---आदिसिद्धी

=====================================

तळटीप :- कुठे काही चुका असल्यास सांगाव्यात ... मी दुरूस्त करेन....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.. Happy
पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

रोहनच्या आत्म्यासाठी महंत, भारलेली जागा, कुंकवाचे रींगण, इतकीसारी पुजेची तय्यारी वैगेरे टु मच.
महंतांचं काम म्हणजे धारपांच्या कथेतच. मोठ्मोठ्या अघोरी शक्तींचा नायनाट करायला.
एका खुन झालेल्या मुलाच्या आत्म्यासाठी एवढा खटाटोप पटत नाही.

सस्मित ताई ..नारायण धारपांच्या कथा मी वाचल्या नाहीयेत...त्यामुळे त्यांच्या कथांची मला अजिबातच माहिती नाहीये....तुम्हाला कथा आवडली नसल्यास आय अॅम साॅरी.....सुधारणा सुचवाल तर पुढच्या कथांमध्ये नक्की विचार करेन....

नारायण धारपांच्या कथा मी वाचल्या नाहीयेत> Uhoh
सिरीयसली?? महंत कुठुन माहित झाले तुला?
म्हणजे मला तरी धारपांच्या कादंबर्यांतुनच माहित झाले म्हणुन विचारलं. गै न.

महंत हे मी असंच नाव दिलेलं एका व्यक्तीचं...उगाच ते नेहमीचे साधू वगैरे म्हणायचा कंटाळा आलेला म्हणून....नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणून.....मी सिरीयसली सांगतेय मला त्यांच्या कथांमध्येही महंत आहेत हे आता तुमच्याकडूनच कळतय......मी त्यांची एकही कथा वाचली नाहीये आतापर्यंत.....