शेवग्याच्या पानांचे थालीपीठ

Submitted by प्रमोद् ताम्बे on 8 April, 2018 - 01:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन वाट्या शेवग्याची कोवळी पाने ,
एक वाटी भिजलेले जाड पोहे,
एक मोठा बारीक चिरलेला कांदा,
३-४ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या,
चवीनुसार तिखट,
मीठ,
जिरेपूड,
दोन चमचे दही,
जरुरीनुसार ज्वारीचे पीठ ,
दोन टेबलस्पून बेसन पीठ,
अर्धा डाव तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम जाड पोहे भिजत घालून ठेवा आणि दुसरीकडे एका तसराळ्यांत शेवग्याची कोवळी पाने घ्या,त्यांत २-३ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार तिखट,मीठ,जिरेपूड,दोन चमचे दही घालून कोरडेच मिक्स करून घ्या , आता त्यांत भिजलेले पोहे आणि बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या,मग त्यांत जरुरीनुसार ज्वारीचे पीठ आणि बेसनाचे इथ व आवश्यक तेव्हढेच पाणी घालून थालीपीठाचे पीठाचा गोळा करून १० मिनिटे झाकून ठेवा.
१० मिनिटानंतर तव्यावर थोडे तेल घालून थालीपीठ लावा,बोटाने मध्यभागी एक व त्याच्या बाजूला ४ भोके पाडून त्यांत चमच्याने थोडे थोडे तेल सोडून तवा गॅसवर ठेऊन मंद आंचेवर दोन्ही बाजूंनी थालीपीठ नीट भाजून घ्या.
डिशमधून एका वाटीत लोणी किंवा दही अगर खाराच्या मिरच्या किंवा लोणचे घालून गरम थालीपीठ सर्व्ह करा. न्याहारीसाठी अतिशय पौष्टिक , रुचकर व स्वादिष्ट असे हे शेवग्याच्या पानांचे थालीपीठ.मधुमेहयांनी शेवग्याची पाने जरूर खावीत.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी चार थालीपीठे
अधिक टिपा: 

भिजवलेले जाड पोहे घातल्याने खुसखुशीतपणा आला.

माहितीचा स्रोत: 
कुणीतरी सांगितले की मधुमेहींनी शेवग्याचा पाला/पाने आहरात सेवान करावीत म्हणून अंदाजाने स्वत: बनवून बघितले कारण पानांची भाजी चरबत लागली व आवडली नाही म्हणून मग हे थालीपीठ करून बघितले आणि छान झाले
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवग्याच्या कोवळ्या पानांची भरपूर लसूण कांदा घालून बनवलेली भाजी मस्त लागते ... थोडी कोरडी बनते म्हणजे बाकी पालक किंवा मेथी सारखी नसते टेक्श्चर ला. पण चव चांगली लागते.
माझं सासर मालवण च. गोपाळकल्याच्या दिवशी शेवग्याची ही भाजी, आंबोळ्या आणि काळ्या वाटण्याचं सांबारं ( हो सांबारं च म्हणतात इकडे ) इतकं च जेवतात...

अनिश्का , इकडे ये गं , कडकडून मिठी मारते तुला .
तुझ्या प्रत्येक शब्दाला +१००० .
माझ्या माहेरी ......सेsssssssमं.
सासरी शेवगाच कोणाला आवडत नाही.

स्वस्ति माझ्याकडून पण घट्ट मिठी तुला. अग माहेरी कोणी खात नाही म्हणजे माहीत नाही हे जास्त कोणाला पण सासरी असते ही भाजी...आणि मला पण आवडते...

पटेल मधे असतात की कायम. पालेभाज्यांच्या सेक्षन मधे. मोरिंगा की काहीतरी म्हणतात.
मी मागे एकदा पिठल्यात घातली होती, पण खूप काही वेगळं नाही लागलं चवीला. पानं कमी पडली असतील किंवा नीट कृती माहित नसल्यामुळे असेल.