आठवणीतले क्षण...

Submitted by अभिजीत... on 6 April, 2018 - 05:17

दिवस होता दिवाळीचा ३० ऑक्टोबर २०१६ माझा आवडता सण .. दिवाळी, माझाच नाही तर सर्वांचाच आवडता सण खास करून लहान मुलांचा ...

तो दिवस होता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस..... पहाटे लवकर उठून कड्यक्याच्या थंडीत उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची मज्जा आज हि मनाला प्रसन्न करुन जाते.

जर वर्षी प्रमाणे यंदा हि आम्ही मंडळामधील सर्वजण जवळच असलेले ग्रामदैवत जानाई मळाईच्या डोंगरावरती दर्शनाला सकाळी लवकर गेलो होतो ..परंतु आमच्या क्लासमेट ग्रुप चे आदल्या दिवशीच ठरले होते; कि उद्या कुठे तरी फिरायला जायच म्हणून तरी मी आज त्यांना न सांगता मंडळामधील मुलांबरोबर डोंगरावती गेलो होतो , पण मी हे आमच्या क्लासमेट मधील काही जणांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या कॉल वेळी सांगितले होते कि मी लवकरात लवकर येईन म्हणून ; तरी डोंगरावरती असताना मला अक्षयचा फोन आलाच, कुठे आहेस? म्हणून नेहमीप्रमाणे टोचून बोलायला तो चुकला नाही. लवकरच मी तीथुन घरी आलो आणि आकाशला फोन केला, कुठे जमला आहेत सर्व जण? त्याने सांगितले कि आमच्या घरी ये म्हणून दिवाळीचा फराळ करायला सर्व जण इथेच येणार आहेत; म्हणून मी आणि विशाल लगबगीने तिथे पोहचलो तिथे आधीच अजित आणि अक्षय पोहचले होते ,आम्ही तिथुन फराळ करून बाहेर पडलो आणि सुशांतला घेऊन आमचा सहा जणांचा सज्जनगड ला जायचे ठरले घरापासून २५ कि. मी वरती असलेले सज्जनगडचे अंतर आम्ही बाईक वरून १ तासाभरात पार पाडले तेथून चालत एकमेकांची मस्ती करत आम्ही गडावरती येऊन पोहचलो प्रथम आम्ही समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीला वंदन करून बाहेर आलो तर सर्व जण म्हंटले आधी जेवण करू मग गड फिरू आणि आम्ही तसेच केले जेवण करून आम्ही गडाच्या कड्याच्या दिशेने गेलो पण आमच्या जेवण अगोदरचे काही अविस्मरणीय क्षण -जसे मंदिरासमोरील फोटो असतील सेम पोज मधील ,कि तिथे आमचा दंगा पाहून एका गृहस्थाने दिलेला सल्ला , कि सर्व जण एकाच प्रकारच्या टी शर्ट मध्ये आहे म्हणून बगणारे सर्व जण किंवा तिथल्या रीतीप्रमाणे उघडे बसून केलेले जेवण कि विशालचा 'फील लाईक सेलेब्रिटी'डायलॉग करता त्याला लोळवलेले हे सर्व करता तीन कधी वाजले हे कळलेच नाही ,कड्यावरती पोहचल्यावर आम्ही काही ग्रुप फोटो काढले आणि कड्याच्या टोकावरती येऊन बसलो ;कड्याच्या तिन्ही बाजूला खोल दरी होती दरीत पाहिले तर गडाखालून आलेली वाट ही सामोरच्या डोंगरामध्ये जणू सापासारखी नागमोडी झाडांच्या हिरवळीत कुठे हरवते हे समजत नाही कोकणातून समोरून येणारा वारा ;वऱ्यामधी असलेला गारवा आणि शरीराला मिळालेली शुद्ध हवा यामुळे मन कसे प्रफ्फुलीत झाले होते.

तिथे बसलो तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकमेकांची टर उडविणे ,अतिशयोक्ती करणे हे सर्व चालू होते पण हळू हळू आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागलो होतो आम्ही शाळेमधील किस्से रंगवू लागलो होतो त्यामध्ये आम्ही कधी गंभीर विषयाकडे वळललो कळलेच नाही एकमेकांचे प्रॉब्लेम जाणून घेण्यासाठी आम्ही खूप दिवस कधी असे निवांत बसलोच न्हवतो; त्यावेळी आम्ही आमच्या मैत्रीमधली अजून एक पुढची पायरी चढलो होतो ,सायंकाळची वेळ होती सूर्य मावळायच्या मार्गावर होता; पक्ष्यांची आपल्या घरट्याकडे परत जाण्याची शर्यत चालली होती आम्ही हि घरी लक्ष्मीपूजन असल्याने लवकर घरी जाण्याचा निर्णय घेतला पण तीथून आमचा पाय निघत नव्हता; आपल्या जवळांच्या बरोबर तो निसर्ग न्याहळत बसण्याची ती ओढ़ अजून मनाला भावाते .

लवकरच आम्ही तीथून निघालो आणि गडाच्या पायथ्याला असलेली बाईक घेऊन रमत रमत गडाचा घाट उतरू लागतो तेव्हा मला सर्वांबरोबर अजून वेळ घालवायचा होता म्हणून मी त्यांना जवळच असलेले उरमोडी धरण येथे घेऊन गेलो जाण्या अगोदर आम्ही परळी फाट्यावर गाडीची हवा चेक केली आणि धरणाच्या दिशेने गेलो आणि काही वेळातच धरणावरती पोहचलो धरणाच्या बंदऱ्यावरून आम्ही जरा फुढे जाऊन थांबलो ; तिथे धरणावर असलेल्या पूलावर फोटो काढण्यासाठी अक्षय आणि विशाल पाण्यात उतरले तिथे त्यांना आम्ही भिजवले आणि खूप मज्जा केली फोटोस काढले आणि निघणार तेवढ्यात विशाल कडून गाडीची चावी गहाळ झाली हे कळताच सर्वानी आधी विशालला जरा कानपिचक्या दिल्या खेचली परंतू सर्वानी लगेच शोधून हि दिली, नंतर आमचे बाईक प्रेमी अजित आणि आकाश हे पाणी बघुन जागे झाले कि आमची गाडी धुवायची आहे म्हणून आम्ही तीथे योग्य जागा बघुन धरणामध्ये उतरलो आकाश ,अजित आणि विशाल हे गाडी धुण्यासाठी पाण्यात गेले मी आणि सुश्या तिथेच असलेल्या गवतावर झोपलो मला रात्री सिंधुदुर्ग ट्रिप ला जायच होता म्हणून आराम गरजेचा होता पण मला हे क्षण गमवायचे नव्हते ; मी लांबून त्यांना पाहत होतो त्यांची मस्ती करणे ,मदत करणे ,पाणी उडवणे हे चालूच होते हे पाहून मी देवाला एकच मागणे केले अशीच आमची मैत्री कायम राहो .

गाडी धुऊन झाल्यानंतर आम्ही लगेच तीथून निघालो, मी अजितच्या बाईकवर पाठी बसलो होतो आणि विचारात हरवलो गाडीवर लागणाऱ्या वाऱ्यामुळे झोप आली होती ; मनाला बरा वाटणारा प्रवास हळू हळू संपत चालला होता इकडे सूर्य डोंगरामागे लपला होता आणि आम्ही हि त्या ठिकाणाहून हिर्वळीमध्ये जणू लपत लपत घरी चाललो होतो .....

आजही ते आठवणीतले क्षण आठवणीत नाहीत तर मनात घर करून आहेत ....

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
मित्रांसोबतचे भटकंतीचे अनुभव शब्दबद्ध करणे खासच.. शुद्धलेखनाच्या चुका टाळाव्यात. पुलेशु !

Chhan..