देव नसलेले डाॅक्टर

Submitted by Prshuram sondge on 1 April, 2018 - 20:20

दवाखान्याचं कॅनटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतोत.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.अाईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर आपण खेळलेलो ,वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून अाईनं काय केलं नव्हतं आमच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं. अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळून गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्यची अटळता माणसाला कळू लागते. या विचारत मी गढून गेलो असतानाचं माझा मोबाईल वाजला .कॉल आय.सी.यु मधूनच होता.आताच तर मी सारं बघून आलो होतो. बाईचं कंडीशन ठीक होती. डॉक्टरच्या मताप्रमाणे तब्येतीत सुधारणा होती. आताच कुठं तिचं शरीर औषधानां साथ देत होतं.तो दिलासा होता. असं इतकं असपष्ट बोलणं ही पुरेस असतं.थोडसं रीलॅक्स व्हायला.
पुन्हा तिथूनच फोन.जी बातमी आपल्याला ऐकायचीच नसते. अशी बातमी असूच नाही असं वाटतं. तीचं बातमी ऐकावी लागते की काय अशी भीती असल्यामुळे मी दचकलो. “तुमचं पेंशट सीरिअस ..कम फास्ट.” आय सी यु मधील नर्सचा फोन होता.अर्थात तिचा स्वर कमालीचा शांत होता. भावनाशून्यं. आता आईचं मरण पहावं लागतं की काय असा प्रश्नं मला पटला.माझा पाय ओढत नव्हता. ऐ-हीवी मी पळत जात असे. आज पाय जड झाले होते.जाव तर मलाच लागणार होत कारण त्या आय सी यू मध्ये रूगणाच्या एकाच नातेवाईकाला जाऊ दिलं जातं होतं.ते डॉक्टर.. फक्त माझ्याशीच रूगणाच्या कंडीशनविषयी बोलत असतं. ते कुणा कुणाला सांगणार? मी पळतच गेलो कारण मी खाली तिस-या मजल्यावर होतो.हॉस्पीटलं किती मोठं असो.तिथं जागजागी लिप्टचा वापर करू नये.चांगल्या आरोग्यासाठी जिन्याचा वापर करा असा फुकटचा सल्ला दिलेला असतो.मी पळत पळत वर गेलो.पळणं आणि प्रचंड भिती मुळे माझाच बीपी हाय झाला होता. मला प्रचंड घाम आला होता.तेवढयात पुन्हा कॉल आला . कम फास्टं.
मला हे कळत नव्हतं. ती सीरीअसं असली तरी मी ती जाऊन काय करू शकत होतो. अनेकदा हात जोडून डॉक्टरला फक्त विनवणीचं करू शकत होतो. जास्तीत जास्तं केवीलवाणा अवाज काढून.जे काय करायच होतं.ते सारं त्यांनाचं करायचं होतं.शेवटी मरण तर अटळचं आसतं.
मी वार्डमध्ये शिरलो.सारे नर्स, दोन डॉक्टरं.. दोन त्यांचे अस्टिंट.सारे तिथ जमा झाले होते. सा-यानी गराडा घातला होता. आमची आयी तडफडत होती. तिच्या एंकदंरीत हालचालीवरून तिला श्वास घ्यायला कमालीचा त्रास होत होता. ती पुढचा श्वास घेईल की नाही अशी भीती वाटतं होती.मी गेलो.ती माझ्याकडं पाहू शकली.त्या डोळयात कमालीची असाह्ययता होती. हे जग सोडून जावाचं लागतं. असं तिला बहुतेक वाटतं असावं. तीनं माझ्या हाताला स्पर्श करण्याची अपेक्षा केली. माझा तर दगड झाला होता. अगदी निर्जीव…..
“काय झालं?” माझा गहीवरल्या स्वरात प्रश्नं. हे बरं होतं तिथं माझ्या जवळचं कुणीच नव्हतं. नाहीतर मी माझा हुंदका थोपवू शकलो नसतो.असावांचा बांध फुटायला आपलं आणि आपलं कुणी तरी जवळ असावं लागतं.
“बी पी हाय.”
“काय करावं लागलं? डॉ.काय म्हणतायेत.”
तिथचं एक ऑपरेटर एका मशीन मधून आलेली वाकडी तिकडी नळी घेऊन उभा होता.
“त्यांना ऑक्सीजन दयावा लागेल.”
“मग दयांना? उशिर का करताय?”
“नक्की दयायचा का?”
“दयाना प्लीज.तुम्ही का उशिर करताय ? आई सीरीअसं.”
“ येस. क्रीटीकलं.” असं ते म्हणतं होते पण तो मशिनची नळी मात्र तिच्या तोंडाला लावत नव्हता. माझा मात्र पारा चढत होता.
"मग दयांना प्लीज…. "मी अक्षरश: ओरडलो.
“याचा एका तासाला पाच हजार रूपये चा्र्ज....”
“असू दया. तुम्ही कधी लावणारेत. लावा लवकर….”
त्यानं पुन्हा माझ्याकडं पाहीलं.त्याला अजून माझ्याकडून कन्फर्म करायचं होतं. मी हातानं इशारा करून त्याला ते लवकर लावण्यास सांगितलं.ती नळी आईच्या नाकाला तोंडाला लावण्यात आली.त्यामुळे तीची होणारी तगमग शांत झाली.पाच मिनीटे सारेच निशब्द होते. तिला आराम वाटू लागला असावा. सारेच आम्ही त्या मशीनच्या स्कीनवरील निळया,पिवळया रेषा पहात राहीलोत.
मी विचारलं,”कसं वाटतं.”
ती फक्त मान हलवू शकली. त्यात होकार होता.मला हायसं वाटलं. भीतीच्या जाळानं झालेली काळजाची आग आग थंडावत गेली.
मरणास तूर्त तरी आम्ही थोपवलं होत.

मी वार्डमधून बाहेर पडलो.तितक्यात ती नर्स जवळ येऊन म्हणाली,”हे औषध आणा अणि इतका अॅडवान्स भरा.”
तिचा भंयकर राग आला.मी आय सी यू मध्येच आरडा ओरडा करायच्या बेतात होतो. मला मीच आवरू शकलो.
"आम्ही पेंशटं तुमच्या जीवावर आय सी यू मध्ये ठेवतो. तुम्ही ऑक्सीजन दयाला आम्हला बोलवतात.तुम्ही तो देउ शकला असता.फक्त पैशासाठी माझी वाट पहात बसलात."
"तसं नाही सर,आम्हला सक्त सूचनाच तशा आहेत."
“आसल्या कसल्या सूचना आहेत ?”
“पेंनश्टच्या नातेवाईकाना विचारूनच सारं दया.पुन्हा प्राबलेम होतात.”
“मी जर उपलब्ध नसतो झालोतर ....तुम्ही मरूच दिल असत आईला तर ?”
“तस नाही सर,या हॉस्पीटलचे पण काही रूलूस आहेत.”
“पेशंट तडफडत असताना त्याची तडफड नातेवाईकांना दाखवायची."
तसं नाही सर....असा राग अाणि नका."
"मग तुम्ही रेट का सांगत होता.”
“सर सांगावा लागतात.बिलींगच्या वेळेस कीत्येक जणाचे अनेक प्रश्न असतात.
“तुम्ही पेंशटच्या नातेवाईकाना ब्लॅकमेल तर करत नाहीत ना?
मुद्दाम असे सच्यूएशन तयार करत नाहीत ना?”
"छे! सर असं काही नाही. हे सरकारी ऑफीस नाही. हे हॉस्पीटलं आहे."
“असं वेठीस नाही धरायला पायजे." मला जरी राग असला तरी मी तो व्यक्त करू शकत नव्हतो..माझ्या मनात आईची तडफड्‍ व त्या माणसाचा तो प्रश्न घोळतचं होता. तो प्रसंग व ती चीडं लगेच विसरणं शक्यं नव्हतं.
“तुम्ही अॅडव्हनस भरा.पेंशटची काळजी नका करू. आमच्या सरांनी अनेकानां मृत्यूच्या दारातून परत आणलं सर.तुम्हीचं तर ते जाणातच अहात. एवढया मोठया हॉस्पीटलंमध्ये नियमांचा अग्रह तर राहणारचं ना सर "
तिचं ते बोलणं. टि.व्ही वरील बातम्या देणा-या ‍ निवीदेकसारखं वाटू लागलं. अगदी बलात्कार ,खूनाच्या बातम्याही कीती ही भावशून्यं चेह-यांनी व स्वरानी देऊ शकतात त्या मी ती चीट्टी घेऊन कॅश कांउटवर गेलो.
डॉक्टरला आपण लुटारू नाही म्हणू शकत. त्याला देव तरी कसं म्हणता येईल ? मरण तर अटळचं असत ना ? माणूस जरी डॉक्टर असला तरी ही…….त्याला ही मराव लागतच की.
डाॅक्टर काय करू शकतो? फक्त मरणाच्या वाटा लांबू शकतो.
परशुराम सोंडगे
(अशा अनेक कथा अाणि व्यथा वाचण्यासाठी माझ्या या ब्लाॅगला भेट दया व प्रतिक्रिया दया
prshuramsondge.blogspot. com
sahitygandha.blogspot. com)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाईट वाटले, पण मग डॉक्टरचे पैसे बुडवणारे लोक आठवले आणि नातेवाईक मेले की डॉक्टरला मारहाण आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणारे लोक आठवले. मग तितकेसे वाईट वाटले नाही.

किमान तुम्हाला सांगून तरी पैसे मागितले. माझ्या सासऱयांच्या बायपासला नीतू मांडके या प्रसिद्ध डॉक्टरने त्या काळी 1.5 लाख रुपये कॅशमध्ये लाच मागितले होते (मूळ बिलाव्यतीरिक्त) आणि जे द्यावे लागले होते.

ता.क. गैरसमज नसावा, माझ्या अख्या खानदानात कुणीही डॉक्टर नाही.

सत्य आहे का?
आणि एका तासाला पाच हजार रूपये चार्ज हा रेट खरा आहे का?
किती तासांसाठी ते लावावे लागते?

सत्य असेल तर तुमच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. क्षमस्व.
पण काही रचलेलं वा वाढवून सांगितलेलं असेल तर उगाच नसता वाद नको. ईथे हा डॉक्टर वाद वरचेवर पेटत असतो.

मला डॉक्टरांचे चांगले वाईट दोन्ही अनुभव आहेत.
वैद्यकीय खर्च महाग हा खरेच एक गहन प्रश्न आहे.
चांगला मेडीक्लेम हवाच.
आमचा ऑफिसचा आहे. पण तो फक्त वर्षाला दोन लाखाचा. आधी खूप वाटलेला. पण पावणेदोनलाखावर टच करून आलो आणि यापुढे ऑफिसच्या मेडिक्लेम व्यतिरीक्त बाहेरून आणखी काढावा का विचार करतोय..
ऑफिसमध्ये कोणाच्या घरी काही गंभीर अपघात वा काही झाले ज्याचा खर्च काही लाखांत होतो तेव्हा स्वेच्छेने मदतीचा कागद फिरतो. आज मी दुसरयाच्या आईसाठी देतोय उद्या दुसरा कोणी माझ्या आईसाठी देईल हेच एक समाधान.
पण तरी या बाबतीत पैसा कुठवर पुरणार वा कुठे निश्चिण्त व्हायचे हा प्रश्न राहणारच..

वाईट वाटले.
दोन्ही बाजूंना काही काळे काही गोरे (मनाने) आहेत.
यातून योग्य मार्ग निघावे.

अतिशय वाईट अनुभव..पण काही बेसिक गोष्टी इतक्या महाग का असाव्यात हा ही प्रश्न मनात आला. सरकार अशा गोष्टी subsidized रेट मध्ये देऊ शकत नाही का?

@उपाशी बोका
किमान तुम्हाला सांगून तरी पैसे मागितले. माझ्या सासऱयांच्या बायपासला नीतू मांडके या प्रसिद्ध डॉक्टरने त्या काळी 1.5 लाख रुपये कॅशमध्ये लाच मागितले होते (मूळ बिलाव्यतीरिक्त) आणि जे द्यावे लागले होते.
नीतू मांडके यांचा उल्लेख नको होता. त्यांनी घेतले असतील की नाही हा मुद्दा नाही पण काही सज्जड पुरावा नसताना उगाच बदनामी नको. बाकी मूळ बिलाव्यतिरिक्त कोणी जास्त पैसे घेईल असे वाटत नाही. बीलातलाच काही भाग तसा घेतला असण्याची शक्यता आहे. मेडीकल इन्सुरन्स असेल तर हे प्रकार टाळता येतात.

दोन्ही बाजूंना काही काळे काही गोरे (मनाने) आहेत. >>>> अगदीच.
हॉस्पिटलच्या बिल्समधे लावलेले ग्लव्ह्ज, सिरिंज, बाकी सटरफटर गोष्टींचे चार्जेस वाचले कि आश्चर्य वाटतं कि एवढे ग्लव्ह्ज वापरले कधी आणि पिअर्स केलच नाही तर एवढ्या सिरिंज कुठे वापरल्या. अशाच बर्याच मेडिसिन्स आणि इतर गोष्टी कुठे वापरल्या, खरंच वापरल्या का याचा भरोसा नसतो. वेल, आपल्याला नॉलेज नसल्यामुळे विश्वास ठेवावा लागतो. त्यातही सर्जरीज नंतर तर इतके असंख्य वेगवेगळे चार्जेस असतात, कि सगळं ब्लाइंडली पे कराव लागतं. गरीब लोकांना जर असंच बिल लावलं तर त्यांनी करायचं काय?

दुसरी बाजु : काही असेही डॉक्टर्स असतात.

19226005_1433049850118113_946374409424032588_n.jpg

काय दुर्दैव आहे. एरव्ही सहज श्वास घेतांना. जगतांना, हसणे, गाणे, नाचणे , झोपणे या क्रिया करतांना आपण सारे जो ऑक्सिजन ( प्राणवायू ) फुकट घेत असतो, तोच काही रुपये देऊन घेतांना त्याची किंमत तेव्हा कळते.

परशुराम दादा, काही परीस्थितीत ( दमा वगैरे ) ऑक्सिजन द्यावा लागत असेल. आणी समजा न सांगता लावले तर, तर तुम्ही आमचे बिल एवढे कसे केले? आम्हाला का नाही आधी विचारले असेही डॉ व नर्सेसला ऐकावे लागते. अशा केसेस दोन्ही कडुन ( पेशंट, त्याचे नातेवाईक व हॉस्पिटल ) घडतात.

बाकी प्रत्येकाचा वै. अनूभव.

समजा न सांगता लावले तर, तर तुम्ही आमचे बिल एवढे कसे केले? आम्हाला का नाही आधी विचारले असेही डॉ व नर्सेसला ऐकावे लागते. >> हो हो, मी असं भांडण दिनानाथ मधे बिलिंग काउंटरला पाहिलं आहे.

वाईट अनुभव आहे हा.
दोन्ही बाजूंना काही काळे काही गोरे (मनाने) आहेत.>>>> +१

साधारणतः कृत्रिम श्वासोच्छवास देण्याआधी परवानगी (consent) घेतली जाते.
फक्त प्राणवायु द्यायचा असेल , अन तोही तातडीने तर अशी कुणी नातेवाईकांची वाट पाहत नाही. प्राणवायु चालू करून रुग्णाची प्रकृति स्थिर झाल्यानंतर नातेवाईकांना वाढीव बिलाची कल्पना देण्यात येते.

<<< काही सज्जड पुरावा नसताना उगाच बदनामी नको. >>>
उगाच बदनामी नाही, स्वतःच्या हातानी पैसे दिले की अजून पुरावा लागत नाही. उलट लोकांना पण कळावे की त्यांचे पाय पण मातीचेच, म्हणून मुद्दाम नाव घेतले आहे. ते बिलाचे पैसे न्हवते, तर ऑपरेशनची तारीख मिळावी म्हणून मागितलेली लाच होती नाहीतर बिल द्यायची तयारी असूनही तारीख मिळणार नाही असे सांगितले.

काळाचा महिमा कसा असतो बघा? बायपास झाल्यावर इतक्या वर्षांनी पण माझे सासरे अजून हयात आहेत आणि कॅशमध्ये पैशाची लाच घेणारा नितू मांडके हा प्रसिद्ध डॉक्टर ५५ व्या वर्षीच हृदयविकारानेच गेला.

उपाशी बोका, लाच घेणार्‍या डॉक्टरचं नाव लिहिलंत हे बरं केलंत. जनरली लोकं कुणाचा वाईट अनुभव आला तरी बाकी वेबसाईट्स वर लिहिताना नाव घ्यायला कचरतात. मग बाकीच्यांना त्यातून शिकण्यासारखं काय रहातं?

लेखाबद्दल बर्‍याच वरच्या मतांशी सहमत. चांगली आणि वाईट लोकं सगळ्याच प्रोफेशनमध्ये भेटतात तेव्हा जनरलाईज्ड स्टेटमेंट करता येत नाही.

<<< चांगली आणि वाईट लोकं सगळ्याच प्रोफेशनमध्ये भेटतात तेव्हा जनरलाईज्ड स्टेटमेंट करता येत नाही. >>>
याबाबतीत १००% सहमत.
मुळात अपेक्षा अशी असते की डॉक्टरने जादूची कांडी फिरवून पेशंटला क्षणात बरे करावे. गंमत म्हणजे पेशंट आधी नीट लाइफस्टाइल ठेवत नाही, बकाबका खाणार, व्यायाम करणार नाही, चालणे करणार नाही, दर वर्षी चेकअप करणार नाही, अगदी गळ्याशी आल्यावरच डॉक्टरकडे जाणार, इंटरनेटवर काहीतरी वाचून स्वतःवरच प्रयोग करणार असे असले की सगळा दोष डॉक्टरचा कसा? याउलट सगळेच डॉक्टरपण संत-महात्मा आहेत असे मी म्हणणार नाही. कट-प्रॅक्टिस, अनावश्यक ट्रीटमेंट वगैरे अनेक प्रकार चालतात, नाही असे नाही. टाळी दोन्ही हाताने वाजते.

मुळात स्वतःचा जीव व्यवस्थित सांभाळणे, जेवणावर ताबा ठेवणे, दरवर्षी वेळच्यावेळी चेकअप करणे आणि वेळ पडलीच तर डॉक्टरकडे एक प्रोफेशनल म्हणून बघणे (जर त्याचा सल्ला पटला नाही तर दुसर्‍या डॉक्टरकडे जाणे) हे जास्त सयुक्तिक आहे, असे मला वाटते आणि मी तसेच करतो. नशीबाने आत्तापर्यंत बहुतेक वेळा चांगलाच अनुभव आला आहे.

डॉ . नीतू मांडकें बद्दल माझा अनुभव अगदी वेगळा आहे . माझ्या मोठया मामांची बायपास सर्जरी २००२ मध्ये लीलावती हॉस्पिटल मध्ये डॉ . मांडकेनी केली . हॉस्पिटल चार्जेस भरावे लागले . सर्जरीसाठी काहीही फी घेतली नाही .

"देव नसलेले डॉक्टर" ह्या हेडिंगवरच माझा आपेक्ष आहे. बाकी क्षेत्रात पण अशीच अपेक्षा ठेवता का?? आणि डॉकटर देव असावेत, असले पाहिजेत असे का बुवा वाटते?? तेही माणसे आहेत. प्रोफेशनल्स आहेत.. हे मान्य करायला काय हरकत आहे??

डाॅक्टर देव नाहीत पण लोक त्याना मानतात.
ते प्रोफेशनलच असतात. अगदी दोन नंबर सुध्दा करतात.
ते रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करून पैसे काढतात.
हा अनुभव. चांगले सुध्दा डाॅक्टर अाहेतच की
अनेक डाॅक्टरांचा पैसा हाच' देव' झालेला तुम्ही पाहिलेले असेलच

मला तर हा अनुभव खरा वाटत नाही. मी स्वतः तसेच माझ्या नातेवाईकांना ऑक्सिजन घेताना पाहिले आहे. असा चार्ज कधी ऐकला नाही. आणि इमर्जन्सी मध्ये ऑक्सिजन देण्यासाठी नातेवाईकाची वाट बघणे, त्या वेळी भाजीवाल्यान्सारखे पैशासाठी घासाघीस करणे . ह्या पोस्टच्या खरेपणा विषयी शंका निर्माण करतात. अर्थात डॉक्टरांच्या बद्दल मला काही आदर आहे अस नाही. ते धंदा खोलून बसले आहेत आणि आपण गरजू गिऱ्हाईक आहोत. वेळ येते तेव्हा
अडला नारायण गाढवाचे पाय धरी.
सुसर बाई तुझी पाठ मउ अश्या म्हणी उगाच नाही आल्या.
वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर
यमस्तु हरति प्राणान्वैद्य: प्राणन्धनानि च

हा लेख आत्ता वाचला. हॉस्पिटलमध्ये खर्च खूप येतो. अगदी शंकास्पद असा खूप. औषधेही काहीच्या काही महाग आहेत. हा लेख २०१८ चा. गेल्या चार वर्षांत उपचारांचा दर प्रचंड वाढला आहे. वैद्यकीय विमा दिसला की बिलं गरगरीत फुगतात कारण पेशंटला भरावी न लागता परस्पर भरली जातात, आणि तो तक्रार करण्याची शक्यता पुसट होते असे म्हणतात.
प्रतिसादांमधून उलट सुलट मते दिसली. दोन्ही बाजू मांडल्या गेल्या. पण स्वत:वर येते तेव्हा घासाघीस करणे शक्य होत नाही.
साधना, प्रतिसाद एक नंबर.!

या आयडीमागची व्यक्ती डॉ. साती होत्या.

>> इतरत्र कुठेतरी तुम्ही यांच्यावर स्त्री पेशंटशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे असं म्हणाला आहात. नक्की काय खरं?

1)Doctor की हा व्यवसाय आहे

हे मान्य पण व्यवसाय करणे म्हणजे मनमानी करण्याचा खुला परवाना नाही

ह्या व्यवसायाचे पण नियोजन करणे गरजेचे आहे जसे बाकी व्यवसायच नियोजन केले जाते.
रिक्षा ,टॅक्सी परमिट सारखा हा व्यवसाय नको.
ठराविक च परमिट देवून व्यवसाय होण्याची खात्री रिक्षा टॅक्सी वाल्यांना दिली जाते ..
तसा प्रकार डॉक्टरी व्यवसायात पण आहे .
डॉक्टर ची प्रचंड संख्या देशात वाढणे गरजेचे आहे तेव्हा खरी स्पर्धा होईल आणि सर्व गैर धंदे बंद होतील

चुकीचे निदान करणे,गरज नसलेल्या टेस्ट करायला सांगणे.भीती दाखवणे,चुकीची औषध देणे ..असे प्रकार पण सर्रास घडतात.

अनुभव वाईटच. अशावेळी आपले हात दगडाखाली असतात. आणि डॉक्टरला देव मानण्यापलीकडे उपाय नसतो. पण सगळेच डॉक्टर असे नसतात हेही खरंच.
माझी मुलगी ४ महिन्यांची होती. ताप १०३ आणि लूज मोशन्स चालू झाले होते. तिला गॅस्ट्रो ची लागण झाला होती.तिला एडमिट केली होती एका अत्यंत सिनिअर आणि नामवंत डॉक्टर कडे. ५ दिवस होऊन गेले तरी तिची स्थिती तशीच होती. म्हणून डॉक्टर व्हिजिटला आल्यावर मी विचारलं की तिची तब्बेत अजून का सुधारत नाही, कधी थांबणार तिचे मोशन्स? त्याला हा त्याचा अपमान वाटला. मी त्याच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावर बोट ठेवतेय असा त्याने समज करून घेतला.
' तुला काय बॉंड पेपरवर लिहून हवं का ती कधी बरी होईल ते? ट्रिटमेंट चालू आहे. डॉक्टरला विचारायच्या आधी स्वतःच्या चूका बघा. हक्क हवेत, कर्तव्य पार पाडायला नकोत (हे कर्तव्य म्हणजे अंगावरचं दूध पाजणे. माझ्या मुलीने bf पूर्णपणे रिजेक्ट केलं होतं म्हणून आम्ही फॉर्म्युला वापरला हे त्याला कोण सांगणार? ) मला हा एकच पेशंट नाहीये. इथे काय बसून राहू का तुझ्या मुलीकडे बघत. रोज ५० पेशंट येतात माझ्याकडे' हे ऐकवलं.
यावर मला बोलावच लागलं की तुमच्याकडे ५० पेशंटस् असतील पण मला एकच मूल आहे. एवढं बोलताय त्यापेक्षा तीच्या तब्बेतीचं सांगा. मी काही लिहून मागत नाहीये.
यावर त्याचं उत्तर होतं, 'तुम्ही काय तो विचार करा आणि सांगा तुमचा डिसिजन.(म्हंजे निघा)
महत्वाचं म्हणजे या वादानंतर त्याने औषधं बदलली आणि संध्याकाळपर्यंत तिची तब्बेत सुधारायला लागली. २ दिवसांनी म्हणजे ७ व्या दिवशी तिला आम्ही घरी घेऊन आलो.
पुन्हा तिथे गेलो नाही हे सांगायला नकोच.

वाईट वाटले, पण मग डॉक्टरचे पैसे बुडवणारे लोक आठवले आणि नातेवाईक मेले की डॉक्टरला मारहाण आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणारे लोक...... +१.
हे आमच्या नातलग डॉक्टरने पण सांगितले.शेवटच्या स्टेजवर असणारा पेशंट आणायचा आणि बिल भरायचे नाही म्हणून तोडफोड करायची.ही झालेली तोडफोड मी पाहिली होती.

५ दिवस होऊन गेले तरी तिची स्थिती तशीच होती.......मी चिन्मयी, आई म्हणून खरे आहे तुझे म्हणणे.माझ्याही लेकाला 1.5 महिन्याचा असताना डायरिया झाला होता.माझी tuzyachsarkhi स्थिती झाली होती. ज्यु.डॉक्टरला विचारले की आम्ही सेकंड ओपिनियन घेऊ का? तर तो म्हणाला,"घेणार असलात तर घ्या,पण या डॉक्टरसारखा दुसरा हुशार डॉ.नाही.
तसेही पोटाचे infection हळुहळू कमी झाले तर ते जास्त परिणामकारक असते."
पुढे मीही याबाबत असेच वाचले होते.

इतर कोणत्याहि व्यवसायात नफेखोरी होतच असते पण ग्राहका कडे नाहि म्हणयचा औप्शन असतो कारण तो जीवनमरण्याचा प्रश्न नसतो पण वैद्यकिय व्यावसायिकाने त्याचा फायदा घेउ नये एवढीच माफक अपेक्षा असते

.शेवटच्या स्टेजवर असणारा पेशंट आणायचा आणि बिल भरायचे नाही म्हणून तोडफोड करायची. >> मुद्दामहुन असे कोणी करत असेल अशी शकयता नाहि. तुम्हाला माहित असेल तर सविस्त माहिती द्यावी दोन्हि बाजु सांगुन ! लुझ कौमेट करण्यात काहि फायदा नाहि !

ह्याला एकच मार्ग आहे डॉक्टर लोकांची संख्या प्रचंड वाढवणे.लोकांवर दहा रुपये जरी टॅक्स लावला तरी किती तरी मेडिकल कॉलेज दर वर्षी उभी राहतील.
ब्रिटिश नी बघा मुंबई मध्ये किती प्रचंड हॉस्पिटल उभी केली आहेत.kem, नायर,आणि
अशी अनेक खूप अती प्रचंड हॉस्पिटल ब्रिटिश लोकांनी उभी केली.
भारतीय राज्य करते महा नालायक त्यांनी काय योगदान दिले.
प्रतेक राज्यात,प्रतेक जिल्ह्यात सुसज्ज मोठी हॉस्पिटल सरकार नी उभी करणे गरजेचे आहे .
पाहिजे तर extra tax लावा.
सर्वात जास्त लूट वैद्यकीय व्यवसायातील लोक करत आहेत.
Dr dev वैगेरे काही नाहीत राक्षस आहेत .

पाहिजे तर extra tax लावा.>>>
ओ ओ . हॉस्पिटल आवरा पण tax नका लावू. पाठीवर मारा पण पोटावर नक्का मारू!

कोणीतरी वर डॉक्टर संख्या वाढवली पाह्जे असे म्हणले आहे . परंतु खालील बातमी पहा. इतकी अनावस्था आहे कि काय होणार !
इथे पेशंट डॉक्टर विना मरत आहेत आणी दुसरिकडे भावी डॉक्टर आमरण उपोषण करावे लागत आहे

https://indianexpress.com/article/cities/delhi/degrees-in-limbo-medical-...

Pages