देव नसलेले डाॅक्टर

Submitted by Prshuram sondge on 1 April, 2018 - 20:20

दवाखान्याचं कॅनटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतोत.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.अाईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर आपण खेळलेलो ,वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून अाईनं काय केलं नव्हतं आमच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं. अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळून गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्यची अटळता माणसाला कळू लागते. या विचारत मी गढून गेलो असतानाचं माझा मोबाईल वाजला .कॉल आय.सी.यु मधूनच होता.आताच तर मी सारं बघून आलो होतो. बाईचं कंडीशन ठीक होती. डॉक्टरच्या मताप्रमाणे तब्येतीत सुधारणा होती. आताच कुठं तिचं शरीर औषधानां साथ देत होतं.तो दिलासा होता. असं इतकं असपष्ट बोलणं ही पुरेस असतं.थोडसं रीलॅक्स व्हायला.
पुन्हा तिथूनच फोन.जी बातमी आपल्याला ऐकायचीच नसते. अशी बातमी असूच नाही असं वाटतं. तीचं बातमी ऐकावी लागते की काय अशी भीती असल्यामुळे मी दचकलो. “तुमचं पेंशट सीरिअस ..कम फास्ट.” आय सी यु मधील नर्सचा फोन होता.अर्थात तिचा स्वर कमालीचा शांत होता. भावनाशून्यं. आता आईचं मरण पहावं लागतं की काय असा प्रश्नं मला पटला.माझा पाय ओढत नव्हता. ऐ-हीवी मी पळत जात असे. आज पाय जड झाले होते.जाव तर मलाच लागणार होत कारण त्या आय सी यू मध्ये रूगणाच्या एकाच नातेवाईकाला जाऊ दिलं जातं होतं.ते डॉक्टर.. फक्त माझ्याशीच रूगणाच्या कंडीशनविषयी बोलत असतं. ते कुणा कुणाला सांगणार? मी पळतच गेलो कारण मी खाली तिस-या मजल्यावर होतो.हॉस्पीटलं किती मोठं असो.तिथं जागजागी लिप्टचा वापर करू नये.चांगल्या आरोग्यासाठी जिन्याचा वापर करा असा फुकटचा सल्ला दिलेला असतो.मी पळत पळत वर गेलो.पळणं आणि प्रचंड भिती मुळे माझाच बीपी हाय झाला होता. मला प्रचंड घाम आला होता.तेवढयात पुन्हा कॉल आला . कम फास्टं.
मला हे कळत नव्हतं. ती सीरीअसं असली तरी मी ती जाऊन काय करू शकत होतो. अनेकदा हात जोडून डॉक्टरला फक्त विनवणीचं करू शकत होतो. जास्तीत जास्तं केवीलवाणा अवाज काढून.जे काय करायच होतं.ते सारं त्यांनाचं करायचं होतं.शेवटी मरण तर अटळचं आसतं.
मी वार्डमध्ये शिरलो.सारे नर्स, दोन डॉक्टरं.. दोन त्यांचे अस्टिंट.सारे तिथ जमा झाले होते. सा-यानी गराडा घातला होता. आमची आयी तडफडत होती. तिच्या एंकदंरीत हालचालीवरून तिला श्वास घ्यायला कमालीचा त्रास होत होता. ती पुढचा श्वास घेईल की नाही अशी भीती वाटतं होती.मी गेलो.ती माझ्याकडं पाहू शकली.त्या डोळयात कमालीची असाह्ययता होती. हे जग सोडून जावाचं लागतं. असं तिला बहुतेक वाटतं असावं. तीनं माझ्या हाताला स्पर्श करण्याची अपेक्षा केली. माझा तर दगड झाला होता. अगदी निर्जीव…..
“काय झालं?” माझा गहीवरल्या स्वरात प्रश्नं. हे बरं होतं तिथं माझ्या जवळचं कुणीच नव्हतं. नाहीतर मी माझा हुंदका थोपवू शकलो नसतो.असावांचा बांध फुटायला आपलं आणि आपलं कुणी तरी जवळ असावं लागतं.
“बी पी हाय.”
“काय करावं लागलं? डॉ.काय म्हणतायेत.”
तिथचं एक ऑपरेटर एका मशीन मधून आलेली वाकडी तिकडी नळी घेऊन उभा होता.
“त्यांना ऑक्सीजन दयावा लागेल.”
“मग दयांना? उशिर का करताय?”
“नक्की दयायचा का?”
“दयाना प्लीज.तुम्ही का उशिर करताय ? आई सीरीअसं.”
“ येस. क्रीटीकलं.” असं ते म्हणतं होते पण तो मशिनची नळी मात्र तिच्या तोंडाला लावत नव्हता. माझा मात्र पारा चढत होता.
"मग दयांना प्लीज…. "मी अक्षरश: ओरडलो.
“याचा एका तासाला पाच हजार रूपये चा्र्ज....”
“असू दया. तुम्ही कधी लावणारेत. लावा लवकर….”
त्यानं पुन्हा माझ्याकडं पाहीलं.त्याला अजून माझ्याकडून कन्फर्म करायचं होतं. मी हातानं इशारा करून त्याला ते लवकर लावण्यास सांगितलं.ती नळी आईच्या नाकाला तोंडाला लावण्यात आली.त्यामुळे तीची होणारी तगमग शांत झाली.पाच मिनीटे सारेच निशब्द होते. तिला आराम वाटू लागला असावा. सारेच आम्ही त्या मशीनच्या स्कीनवरील निळया,पिवळया रेषा पहात राहीलोत.
मी विचारलं,”कसं वाटतं.”
ती फक्त मान हलवू शकली. त्यात होकार होता.मला हायसं वाटलं. भीतीच्या जाळानं झालेली काळजाची आग आग थंडावत गेली.
मरणास तूर्त तरी आम्ही थोपवलं होत.

मी वार्डमधून बाहेर पडलो.तितक्यात ती नर्स जवळ येऊन म्हणाली,”हे औषध आणा अणि इतका अॅडवान्स भरा.”
तिचा भंयकर राग आला.मी आय सी यू मध्येच आरडा ओरडा करायच्या बेतात होतो. मला मीच आवरू शकलो.
"आम्ही पेंशटं तुमच्या जीवावर आय सी यू मध्ये ठेवतो. तुम्ही ऑक्सीजन दयाला आम्हला बोलवतात.तुम्ही तो देउ शकला असता.फक्त पैशासाठी माझी वाट पहात बसलात."
"तसं नाही सर,आम्हला सक्त सूचनाच तशा आहेत."
“आसल्या कसल्या सूचना आहेत ?”
“पेंनश्टच्या नातेवाईकाना विचारूनच सारं दया.पुन्हा प्राबलेम होतात.”
“मी जर उपलब्ध नसतो झालोतर ....तुम्ही मरूच दिल असत आईला तर ?”
“तस नाही सर,या हॉस्पीटलचे पण काही रूलूस आहेत.”
“पेशंट तडफडत असताना त्याची तडफड नातेवाईकांना दाखवायची."
तसं नाही सर....असा राग अाणि नका."
"मग तुम्ही रेट का सांगत होता.”
“सर सांगावा लागतात.बिलींगच्या वेळेस कीत्येक जणाचे अनेक प्रश्न असतात.
“तुम्ही पेंशटच्या नातेवाईकाना ब्लॅकमेल तर करत नाहीत ना?
मुद्दाम असे सच्यूएशन तयार करत नाहीत ना?”
"छे! सर असं काही नाही. हे सरकारी ऑफीस नाही. हे हॉस्पीटलं आहे."
“असं वेठीस नाही धरायला पायजे." मला जरी राग असला तरी मी तो व्यक्त करू शकत नव्हतो..माझ्या मनात आईची तडफड्‍ व त्या माणसाचा तो प्रश्न घोळतचं होता. तो प्रसंग व ती चीडं लगेच विसरणं शक्यं नव्हतं.
“तुम्ही अॅडव्हनस भरा.पेंशटची काळजी नका करू. आमच्या सरांनी अनेकानां मृत्यूच्या दारातून परत आणलं सर.तुम्हीचं तर ते जाणातच अहात. एवढया मोठया हॉस्पीटलंमध्ये नियमांचा अग्रह तर राहणारचं ना सर "
तिचं ते बोलणं. टि.व्ही वरील बातम्या देणा-या ‍ निवीदेकसारखं वाटू लागलं. अगदी बलात्कार ,खूनाच्या बातम्याही कीती ही भावशून्यं चेह-यांनी व स्वरानी देऊ शकतात त्या मी ती चीट्टी घेऊन कॅश कांउटवर गेलो.
डॉक्टरला आपण लुटारू नाही म्हणू शकत. त्याला देव तरी कसं म्हणता येईल ? मरण तर अटळचं असत ना ? माणूस जरी डॉक्टर असला तरी ही…….त्याला ही मराव लागतच की.
डाॅक्टर काय करू शकतो? फक्त मरणाच्या वाटा लांबू शकतो.
परशुराम सोंडगे
(अशा अनेक कथा अाणि व्यथा वाचण्यासाठी माझ्या या ब्लाॅगला भेट दया व प्रतिक्रिया दया
prshuramsondge.blogspot. com
sahitygandha.blogspot. com)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कैच्या काय, उद्या म्हणतील युक्रेनच्या शहरातील माझे घर गेले, आता मला मुंबईत नरिमन पॉइंटला/दिल्लीत ग्रेटर कैलासला घर द्या.

उद्या म्हणतील युक्रेनच्या शहरातील माझे घर गेले, आता मला मुंबईत नरिमन पॉइंटला/दिल्लीत ग्रेटर कैलासला घर द्या. >>> काहिच्या काहि !
उचल्ली जिभ लावली टाळ्याला !
विद्यार्थी ऐडमिशन मागत आहेत , फुकट काहिहि मागत नाहियेत, , फी देखील पुर्ण भरणार आहेत !
नायजेरिया सारखा देश देखील करतो आहे आणी म्हणे आम्हि विश्वगुरु !

मग पूर्ण फी भरणार असतील तर मुळात गेलेच कशाला युक्रेनला? भारतात खाजगी मेडिकल कॉलेज नाहीयेत का? जायचे होते तिथेच आधी.

The National Medical Commission, the regulator for medical education in India, mandates that foreign medical students must complete an MBBS course of at least 54 months and a year of internship at the same overseas institution.

The rules don’t allow medical students from abroad to switch to Indian colleges or even to other institutions abroad midway through their courses.
संदर्भ

कुठेही डिग्री करा, पण ती भारतात किमान मान्यताप्राप्त आहे की नाही, नियम काय आहेत, ते नको बघायला? परदेशाचे जाऊ दे, भारतातल्या भारतातपण डिग्री UGC ची मान्यता मिळालेली आहे की नाही, ते नको बघायला? नाही तर असेल डिग्री ज्ञानेश्वर विद्यापीठाची आणि मग म्हणाल मला MBA/M.Tech. ला ॲडमिशन द्या, मी पैसे भरायला तयार आहे की.

मग पूर्ण फी भरणार असतील तर मुळात गेलेच कशाला युक्रेनला? भारतात खाजगी मेडिकल कॉलेज नाहीयेत का? जायचे होते तिथेच आधी. >> इथे मिळाली नाहि म्हणुन गेले ना ,, सरकारने परमिशनहि दिली आहे

आणी नियम कसले टाकता ! नियम बदला म्हणुनच आंदोलन करत आहेत. असामान्य परिस्थितित सरकारनेच मदत करायची असते. रोज उठुन काहि कोण मदत मागत नाहि
अडानीचे ५ लाख करोड चे कर्ज ५ मिनिटात माफ करता येते पण याना मदत करता येत नाहि ! आणी हि लोक पैसे हि मागत नाहियेत, फक्त
ऐड्मिशन मागत आहेत. अर्थात असल्या भिकार सरकार कदुन हिच अपेक्षा आहे !

<< इथे मिळाली नाहि म्हणुन गेले ना >>
भारतात खाजगी मेडिकल कॉलेजात पण ॲडमिशन नाही मिळाली? मग खरच कठीण आहे.

<< नियम बदला म्हणुनच आंदोलन करत आहेत. >> Lol
काही दिवसांनी आंदोलन करतील की १० वर्ष अनुभव आहे म्हणून कंपाऊंडरला डॉक्टर म्हणून मान्यता द्या.

भारतात एखाद्या भागात पुर आला, भुकम्प झाला परिक्षेच्या काळात तर त्या भागातील विद्यार्थ्या चे नुकसान होउ नये म्हणुन परिक्षा परत घेतली जाते, तुम्च्या म्हणण्याप्रमाने त्यांचे वर्ष वाया गेले तरी हरकत नाहि !

करोना काळातहि एखाद्याला करोना झाला असेल तर परत जेइइ ने परिक्षा घेतली होती , ती पण घ्यायला नको होती म्हणजे !

काय बोलतात कसली भिकार मनसिकता आहे, संवेदनशिलता वगैरे माहित नसेलेले लोक हे माणुसच नाहित !

काही दिवसांनी आंदोलन करतील की १० वर्ष अनुभव आहे म्हणून कंपाऊंडरला डॉक्टर म्हणून मान्यता द्या. >> परत तेच गाढवा सारखी कम्परिझन उचल्ली जिभ लावली टाळ्याला ! !

जाती आरक्षणा मुळे देखिल बहुतांशी डॉक्टर हे कुवत नसताना ह्या पेशात आलेले आहेत.
कमी% असून अ‍ॅडमिशन मिळते..पण गुण नसल्याने यथा तथा नॉलेज असू शकते.

विशेषतः डेंटिस्ट्री मधे हा अनुभव घेतला आहे. वाइट वाटते पण विशिष्ठ आडनावांच्या डॉ. कडे जाणे टाळले जाते. जर भावना दुखावल्या गेल्या असतिल तर हा प्रति. काढुन टाकता येईल पण असल्या डॉ. कडे जाऊन आम्हा पेशंट लोकांच्या भावना, वेळ, पैसे सर्वच दुखावलं जातं ह्याचा ही विचार व्हावा.

युक्रेन सरकार परत परीक्षा घेणार असेल तर? >>> अहो साहेब, शहरे जमीन दोस्त झाली आहेत तेथे ! लोकांना जीवाची पडली आहे
आणी तरिहि परिक्षा घेणार असतील तर भारत सरकार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देणार का युक्रेन चा ते आधी विचारा सरकारला !

माझ्या माहितीनुसार, युक्रेनचा व्हिसा भारत सरकार देत नाही, युक्रेन सरकार देतं. >>>> भारत सरकारच्या परमिशन शिवाय व्हिसा मिळवुन कोणत्याहि दुसर्या देशात जाउन दाखवा
काहि हरकत नाहि, लोजिकल विचार करता येत नसेल तर असे होते !

या बाबत युक्रेन मधे शिकायला गेलेल्या एका मुलाच्या बापाने माफ करा पित्याने आधीच खुलासा केला होता. ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये फी द्यायला तयार होते. पण "देणगीची" रक्कम एवढी भारी होती की त्या पेक्षा रशिया वूहन किंवा युक्रेनमधे जाऊन शिकणे परवडते. अर्थात सरकार " हे" थांबवू शकत नाही.
कसे थांबवणार ? इच्छा असेल तरच ना.

Pages