ताणतणाव घालवण्याचे माबोकरांचे फंडे (stressbuster) काय आहेत ?

Submitted by किल्ली on 16 March, 2018 - 05:31

तुमचे stressbuster फंडे काय आहेत ?
कृपया इथे त्याबाबतचे विचार मांडा, म्हणजे कसं बरं होईल, हो ना ?

मानसिक ताणतणाव (आणि कधी कधी येणारा बौद्धिक ताणतणाव Lol ) घालवण्याचे किल्लीचे काही फंडे आहेत, जसे की :
१. माबो वर वाचन करणे, प्रतिक्रिया देणे , खूपच विचार असह्य झाले तर लिहिणे !!
२. भांडी घासणे (खरंच !! उत्तम stressbuster आहे हा !! एकदा बघाच !!)
३. कोल्ड कॉफी , चोकोलेट किंवा पाणीपुरी हादडणे
४. गाणी ऐकणे , धांगडधिंगा असणारी !!

भन्नाट आणि खास उपाय येऊ द्यात !!! Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची एक ठरलेली जागा आहे वडाच्या झाडाखाली, ४ टाळकी जमा करुण ज्या व्यक्तिमुळ डोके फिरलय त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करने, किंवा खिशात पैशे असतील तर फिरायला जाने.

मी शॉप्पिंग करते (एकटीच), वडापाव , पेस्ट्रीज , चॉकलेट खाते, खुप चालते किंवा ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो त्याच्याशी खुप जास्त बडबड करते, इतकी की माझ्यापेक्षा जास्त स्ट्रेस त्याला किंवा तिला यायला हवे Wink

मी ओगी बघते. पण आजकाल जास्त पहायला मिळत नाही. मग शेजारी जे लहान बाळ आहे, ते आमच्या कडे येऊन दंगा करतं त्यातच टाईमपास होतो. लहान मुले खरच आनंद देतात. अगदीच ताण असेल तर हवा येऊ द्या, झी गौरव वगैरे हसवणारे जुने डाऊनलिड केलेले व्हिडीओ बघते.

नेटवर डोळ्यांना सुखावणारे निसर्ग बघते.
खास फिरण्यासाठी वेळ मिळत नाही, कारण अख्खा दिवस कामात जातो, मग वेळ मिळेल तेव्हा मायबोलीवर येऊन झी मराठी व कलर्स मराठी सिरीयल मधल्या व्हिलन्सला झापते, त्यात हसू येऊन ताण कमी होतो.

खरच या सिरीयल मधल्या काल्पनीक पात्रांना नावे ठेवणेच जास्त बरे पडते, खर्‍या लोकांना नावे ठेवण्यापेक्षा. जाम मज्जा येते. जे लोक आत्ता जॉइन झालेत मायबोलीला त्यांनी रात्रीस खेळ चाले या सिरीयल वर आम्ही किती वेळ घालवुन मज्जा केली ती जरुर वाचा. जाम धमाल आली होती.

https://www.maayboli.com/node/58113

https://www.maayboli.com/node/58998

मी बिग बँग थिअरी आणि हाऊस एम डी बघते.
प्राईम आणि हूक मुळे उजळ माथ्याने पैसे भरुन बघता येतं.आधी कुठूनतरी चोरुन बघावं लागायचं.

ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो त्याच्याशी खुप जास्त बडबड करते, इतकी की माझ्यापेक्षा जास्त स्ट्रेस त्याला किंवा तिला यायला हवे Wink >>>>>>>>>>>>>>>+११

मी देखिल संगीत एकतो
नाहीतर मी बीन बघत बसतो
मला खुप आवडतात त्याने केलेल्या उचापती बघायला.

दारू पिणे, tv वर फॅमिली फ्युईड , monk, फ्रेंड्स, रुल्स ऑफ एंगेजमेंट बघणे.
खूपच स्ट्रेस असेल तर कॅसिनो मध्ये जाऊन टाईम घालवणे ( लिमिटेड पैसे घेऊन).

गार्डन मध्ये जाऊन एकट बाकावर बसायच.सोबत बर्गर ;कोल्ड्रींग खात पुस्तक वाचायच किंवा शांत गाणी ऐकायची .यातल काहीच नसेल तर मित्रमैत्रीणींशी खूप सार्या गप्पा मारायच्या.

Ekti baher walk karne headphones laun gane aikat.holidays Che photos pahane. Mitra maitrini barobar Masta gappa marne.

बाहेर फिरून येणे, एखाद्या व्यक्तीचा राग आला असेल तर समोर आहे असे समजून भडाभडा मनातले बोलून मोकळे होणे किंवा कागदावर सगळे लिहून कागद नष्ट करणे, घर अतीस्वच्छ करणे, उत्तम पदार्थ खाणे, नवीन हेअर कट आणि बेष्ट म्हणजे झोपणे(हो ताणतणावातही मला खूप आणि छान झोप लागते Happy )

ताण तणाव जास्त असेल तर अंघोळ करतो. फ्रेश वाटते. मग हेड मसाज. अशावेळी चहा पित नाही. ताणतणाव आणि चहा एकत्र आला की ऍसिडीटी होते असा माझा अनुभव.
पुलं किंवा वपुंची पुस्तक वाचतो.
फक्त गाण्याच्या ट्युण्स् ऐकतो. यानेही खुप फरक पडतो.
बादवे सगळ्यात उत्तम उपाय आईच्या कुशीत शिरायचे आणि आईला डोक्यावरुन हात फिरवायला लावायचा. क्षणात स्ट्रेस जातो Happy

संगीत हे माझ्यासाठी सगळ्यात प्रभावी साधन आहे ताण घालवायचे. ते जर नसेल सहज उपलब्ध तर मग एकांतात निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा.

तलत मेहमूद ऐकते. (या व्यक्तीच्या गायकीने सुखदुःखात जी काही साथ दिली आहे त्याबद्दल मी त्यांची आजन्म ऋणी आहे).
शक्य असेल तर एक छोटीशी १५ ते २० मिनिटांची डुलकी काढते. मन थोडे स्थिर झाल्यामुळे दुसऱ्या कामात लक्ष देणे सोपे होते. वेळ असेल तर बागकाम करते, पु. लंचे एखादे पुस्तक वाचते. व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकात वर्णन केलेला निसर्ग वाचता वाचता कल्पनेत अनुभवते. आधीच काढलेली चित्रे खडूने, पेन्सिलीने मनापासून रंगवते.
ऑफिसमध्ये असले तर एक कप कडक कॉफी पिते, त्यावेळी मोबाईलवर Solitare चा एखादा गेम खेळते आणि परत कामाला लागते Happy

मायबोलीवर एखादा धागा काढतो किंवा एखादा असा प्रतिसाद देतो की त्याला धरून येणारे प्रतिसाद मनोरंजन करतील.
>>>lol

ऋन्मेष :-

१) ज्या कारणामुळे स्ट्रेस आला आहे त्यालाच नष्ट करायला बघतो.

२) एखाद्या मंदिरात जाऊन बसतो.

३) मायबोलीवर एखादा धागा काढतो किंवा एखादा असा प्रतिसाद देतो की त्याला धरून येणारे प्रतिसाद मनोरंजन करतील.

४) रात्रीचे वेळ असेल तर पॉर्न विडिओ बघतो. त्यानंतर सहसा छान झोप लागते.

५) रात्रीची वेळ असेल तर गच्चीवर जाऊन कट्ट्यावर उताणे झोपून तारे बघणे हा सुद्धा जालीम उपाय आहे. रात्री तिथेच झोप आली तर बेस्ट. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलीसोबत जाग येते तेव्हा आदल्या रात्री स्ट्रेस होतो हे सुद्धा आपण विसरून गेलो असतो. तिथूनच घरी आईला फोन लावला की आळोखेपिळोखे देत घरी पोहोचेपर्यंत चहा हातात रेडी मिळतो. त्याने स्वत:च्याच आयुष्याचा हेवा वाटतो आणि उरलासुरला स्ट्रेस असल्यास तो देखील छू होतो Happy

क्रमश:

रात्री उशीरा बेस्ट फ्रेंडबरोबर वाॅकला जायच .पूर्ण सोसायटीला चार-पाच राऊंड मारायचे. खूप गप्पा मारायच्या .बोलूल बोलून त्याला पकवायच.आणि तासाभराने घरी यायच. गॅलरीत त्याच्याबरोबर एकत्र अभ्यास करत बसायच.आईला रात्रीच चहा करून ठेवायला सांगायचा आणि मधेमधे प्यायचा . पहाटे चार-पाच वाजता झोपायच. खर रात्रीच्या थंड हवेमुळे आणि शांततेत खूप मस्त वाटत.

आईला रात्रीच चहा करून ठेवायला सांगायचा आणि मधेमधे प्यायचा . पहाटे चार-पाच वाजता झोपायच >>> याचे तब्येतीवर वाईट परिणाम होतात नंतर स्वानुभव आहे. असो. Happy

स्ट्रेस? कधीकधी वैचारिक थकवा येतो. तेंव्हा...

१. यु ट्यूब वर Quebec चे Pranks पाहतो. (Quebec चेच पहा. काही आपल्या बेंगलोरच्या टुकार पोरांनी सुद्धा बनवलेत व त्यांना लाखो लाईक्स सुद्धा मिळालेत. पण ते पाहिल्यास स्ट्रेस वाढू शकतो)

२. "दिल चाहता है" किंवा "जिंदगी ना मिलेगी दोबारा" पाहतो

३. मायबोलीवर येतो Happy (पण स्ट्रेस आलेला असतो तेंव्हाच माबोवर येतो असे नाही बरं का)

>> पण हे सगळे उपाय करायला मुळात स्ट्रेस येतो कसा?
अगदी हाच प्रश्न मलाही पडला होता. मग लक्षात आले कि कधीकधी अतिकामामुळे किंवा एखाद्या समस्येवर वेळेत योग्य उत्तर न मिळाल्याने (जनरली ऑफिसच्या कामासंदर्भात) अनेकदा वैचारिक थकवा येतो.

या कारणासाठी मद्यपान करणे हे सर्व वर्गात चालते. मद्यपान हा असा प्रकार आहे की लोकं शोधून शोधून कारणं काढतात. खुशी हो या गम, थोडी व्हिस्की थोडी रम..

मी एक दोन - तीन पेट्या ठेवल्यात. ताणाची कारणे व कामाचा ताण कामावर, घरातला घरी, आणि रस्त्यावरचा रस्त्यावर ठेवतो.
त्याची दोन कारणे.
पहिल म्हणजे एकमेकांवर परिणाम होऊन अजून ताण वाढू नये म्हणून व उपयोग नसतो म्हणून. कार्यालयातील ताण घरी आणून (किंवा उलट) उगाचच चिडचीड केली तर स्वाभाविक प्रतिक्रिया, आता याला काय झाल, हा काय येडचाप पणा आणि त्यामुळे उदभवू शकणारा अजून एक भलताच प्रश्न.

आणि दुसर म्हणजे वरील तीनही ताणांची उत्तरे सहसा वेगळी असतात.

रस्त्यावर कुणी आगाऊ पणा केला तर लहानपणा पासून घोटवून घेतलेली शब्दसंपत्ती उपयोगी पडते. (बंद गाडीत) आणि चित्त शांत होते. दोषी चालक १०वी पास नसावा म्हणूनच चालक आहे अशी समजूत काढतो, जाउ दे झाल म्हणतो आणि परत चालवण्यावर लक्ष देतो. माझ्या दृष्टीने गाडी छान चालवणे हाही एक ताणनाशक उपाय आहे.

आईबाबा आता नाहीत. (त्यामुळे आईच्या कुशीत शिरायची सोय नाही. :)) त्यांची काळजी आनंद मानून घेतली. मुलांची शिक्षण झाली. त्यांनी काही ताण दिला नाही.
आम्ही दोघांनी एक ठरवलय. छोट्या फालतू गोष्टीत काहिही वाद घालायचे नाहीत. काही फरक पडत नाही अस केल काय , तस केल काय. त्यामुळे घरी दैनंदीन कोणताही ताण मला सध्यातरी नसतोच. तेंव्हा सुखी माणसाचा सदरा माझ्याकडून घ्या. Happy

कार्यालयात ताण आल्यास, का आला याच विष्लेशण करून असलेल्या कारणावर उत्तर शोधण्यात मला जास्ती मजा येते. कधी छोटा बदल तर कधी मोठा बदल आवश्यक असतो. प्रत्येकाची उत्तरे वेगळी असतील पण शोधली की सापडतात. कधी कधी वेळ जास्ती लागू शकतो. नशिबाला दोष देत बसणे हे सगळ्यात मोठे ताण वाढवण्याचे कारण असते हे लक्षात ठेवावे. आपण परिस्थिती बदलू शकतो हा आत्मविश्वास आला की कशाचाही ताण येत नाही.

सर्वात उत्तम उपाय म्हणजे ताण आणणारी कुठलीही गोष्ट घडली तर १० मोजा, दीर्घ श्वास घ्या, तुम्ही आत्ता त्याबद्दल काय करू शकता याचा विचार करा आणि त्याप्रमाणे कृती करा, जे मी करतो.

असो. जरा जास्तीच झाल.

तुम्हा सर्वांना ताणमुक्ती साठी शुभेच्छा. Happy

ताण आणणारी कुठलीही गोष्ट घडली तर १० मोजा, दीर्घ श्वास घ्या, तुम्ही आत्ता त्याबद्दल काय करू शकता याचा विचार करा आणि त्याप्रमाणे कृती करा>>>>>>>>>>>११११११११११११११११११११११११११११११११

@ विक्रमसिंह : छान पोस्ट लिहीलीत तुम्ही
तुम्ही म्हणत आहात ते थोडंसं आदर्श जीवनशैली प्रकारात मोडतं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की वरील पोस्ट आचरणात आणली तर ताण काय असतो हेच विसरायला होईल.

सर्वात उत्तम उपाय म्हणजे ताण आणणारी कुठलीही गोष्ट घडली तर १० मोजा, दीर्घ श्वास घ्या, तुम्ही आत्ता त्याबद्दल काय करू शकता याचा विचार करा आणि त्याप्रमाणे कृती करा, >>>> हे सध्या आचरणात आणत आहे. it works .. फक्त १० अंक म्हणता मी रामरक्षा किंवा रामनाम जप करते..

ताणतणाव निवारणावर एक धडा होता आम्हाला यंदा व्यक्तिमत्व विकास विषयात.... पण त्याची लांबी बघूनच एवढा रट्टा मारावा लागणार या विचारानेच तणाव आलेला.... Happy

माझेही काही फंडे-
1) लिखाण करायचं.
2)बेस्ट फ्रेन्डला फोन लावून तिला हैराण करायचं.
3)कागद-पेन घ्यायचा नि पानंच्या पानं आपली सही करत बसायचं. (सहीच्या गोपनीयतेचं मला टेन्शन नाही...ज्याचं त्याचं ज्याने त्याने पहावं)
4)आईला मनस्ताप द्यायचा. (पण यातून टेन्शन वाढायचीही शक्यता असते.)
5)सगळं सोडून पाय ताणून झोपून जायचं.... घोडे बेच के...

त्यापेक्षा जालीम उपाय-
6) माबोवरच्या भयकथा वाचायच्या. किंवा भूतांच्या सिरीयल्स पिक्चर बघायचं. (एवढे घाबराल की स्ट्रेस विसरून जाल)

हे आहेत द्वादशांगुला चे सहा उपाय.... कसे वाटले?

मी चालते. वेड्यासारखी चालते. जोपर्यंत डोक्यातले विचारचक्र थांबत नाही तोपर्यंत चालते. पाय दुखू लागले तरी चालते. किंबहुना पाय दुखेपर्यंत चालते. मग शरीर थकते. आणि मन देखील. एकदा थकले की स्ट्रेस आपसूक रिलीज होते. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो.
जे काही आहे, माझा फंडा आहे. हा उपाय सर्वांनाच लागू होणार नाही. ज्याचे त्याचे वेगवेगळे उपाय Happy

अरे हो, आणि या काळात उपाशीही राहते. डोक्यावर स्ट्रेस घेऊन अन्न जातही नाही आणि खाऊही नये. टेंशन उतरले की मगच पोटपूजा उरकावी..

हे आहेत द्वादशांगुला चे सहा उपाय.... कसे वाटले?
>>>>
उपाय छान आहेत,
पण अग् तू वय वर्षे दहावीत आहेस नं, या वयात फारसे स्ट्रेस टेंशन घेऊ नये, आयुष्य मजेत जगावे. नाही म्हटले तरी या वयात आपण आईवडिलांच्या पंखाखाली सुरक्षित असतो. खरे टेंशन तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला स्वताच्या बळावर भरारी घ्यायची असते. आपले टेंशन आपणच निस्तरायचे असते. आपल्या कर्माची जबाबदारी आपणच घ्यायची असती. आताचे हे तुझे मौजमजेचे वय आहे समज, आणि फिकीर नॉट मोडमध्ये जगून घे छान Happy

अर्चना सरकार तुमच्या मताशी सहमत.

पण टेन्शन येतंच कधीकधी.... अभ्यासाचं तर आधी...कोणाशी भांडल्यावर निस्तरायचं कसं त्याचं, मैत्रीण रागावल्यावर त्याचं, कोणी चूक दाखवल्यावर त्याचं... अगदी पालकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकू ना याचंही...

फिकीर नॉट मोडमध्ये जगून घे छान >>>> खरंच की. पण हेही अंगवळणी पडायला वेळच लागतो.

डोक्यावर स्ट्रेस घेऊन अन्न जातही नाही आणि खाऊही नये. टेंशन उतरले की मगच पोटपूजा उरकावी..>>>>
माझं उलटं आहे ह्या बाबतीत.. आवडती गोष्ट हादडली की कसला स्ट्रेस आणि काय !! अस्मादिक खाण्यामध्ये रममाण होतात ..

मग शरीर थकते. आणि मन देखील. एकदा थकले की स्ट्रेस आपसूक रिलीज होते. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो.>>> +११
हे try करायला हवं .. तेवढाच व्यायाम सुद्धा होईल !!

डोक्यावर स्ट्रेस घेऊन अन्न जातही नाही आणि खाऊही नये. टेंशन उतरले की मगच पोटपूजा उरकावी..>>>> ऑ?? मी तर स्ट्रेस मधे, टेन्शन मधे चापुन जेवते. मग जरा टेन्शनवर उपाय शोधायला तरतरी येते. बरं काही सुचायला लागतं. Happy

@द्वादशांगुला
पण टेन्शन येतंच कधीकधी.... अभ्यासाचं तर आधी...कोणाशी भांडल्यावर निस्तरायचं कसं त्याचं, मैत्रीण रागावल्यावर त्याचं, कोणी चूक दाखवल्यावर त्याचं... अगदी पालकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकू ना याचंही... >>>>>>>>>
जरी फार मोठी नसले तरी , आता ह्या गोष्टी "लहान लेकरांना पण आजकाल टेन्शन येतं" ह्या सदरात टाकते मी !!
पण सहमत आहे, होऊ शकतं असं .. ह्या वयात चिल मारणं सोपं असतं तुलनेने असं वाटतं मला ..

ऑ?? मी तर स्ट्रेस मधे, टेन्शन मधे चापुन जेवते. मग जरा टेन्शनवर उपाय शोधायला तरतरी येते. बरं काही सुचायला लागतं. Happy >>>> +++११११११११११११११११११११११११११११११११११११११

जेवणे न जेवणे हे काही माझ्या स्ट्रेस रिलीजमध्ये येत नाही. मात्र टेंशनमध्ये जेवायला काही मला होत नाही. म्हणून ऑफिसमध्येही जेवायला जायच्या अर्धा तास आधी मी मेल चेक करत नाही Happy

Pages