आतुर- भाग २

Submitted by Harshraj on 13 March, 2018 - 02:08

"अगं, चलतेस का आता, उशीर होतोय. केबिन लॉक करायचं आहे मला."

"हो सर, एक मिनिट!" आपला पावसात भिजण्याचा प्लॅन न सांगता तिने चोर कप्प्यातली छोटीशी कॅरीबॅग काढून, त्यात मोबाईल आणि आणि पैसे व्यवस्थित गुंडाळून पुन्हा चोरकप्प्यात ठेवले. आणि विलास ला म्हणाली," चला"

दोघे केबिन लॉक करून गेट वर आले. विलास ची बस अजून गेटवर आली नव्हती. अक्षदा ला बाय करावं म्हणून त्याने वळून पाहिलं तर ती गायब होती. 'अरेच्चा, आत्ता तर सोबत होती, कुठे गेली? '

तेवढ्यात बसही आली. विलास नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर बघत असतानाच त्याला पुढे थोड्या अंतरावरच अक्षदा एका दारूच्या दुकानासमोर थांबलेली दिसली. ती नुसतीच निश्चल उभी होती. चिंब भिजलेली होती. विलास एक क्षणच पाहू शकला तिला. पण मनातून तिचा राग आला..

'काय गरज पडली हिला त्या दारूच्या दुकानासमोर थांबायची? लोक कसे बघत असतील हिच्याकडे. समजत नाही का हिला?'

एक ना दोन अनेक विचार..'उद्या विचारतोच हिला आली की !'

पण दुसऱ्या दिवशी अक्षदा आलीच नाही. विलासला ब्रेकफास्ट ही करावासा वाटेना. शेवटी त्याने नुसताच चहा घेतला आणि कामाला सुरुवात केली. सवयीने आजही त्याने तिला गुडमॉर्निंग आणि फ्रेंडशिप मेल पाठवली. पण रिप्लाय करायला आज अक्षदा नव्हती. तेवढ्यात अक्षदा चा मेसेज आला.

'today not coming. not feeling well. sorry -akshada '

अक्षदाचा पहिला मेसेज. इतके दिवस त्याने साधा फोन नंबर सुद्धा मागितला नाही हिला याचं आश्चर्य वाटलं त्याला. आणि काळजी सुद्धा वाटू लागली. 'काय झालं असेल? नक्की काल पावसात भिजल्यामुळं आजारी पडली असणार.'

'get well soon'चा रिप्लाय करून कामाला लागला. आज लोडही खूप होता कामाचा. प्रेजेंटेशन्स, मीटिंग्ज,मशीन हँडलिंग आणि बरंच काही. विचार करायला सुद्धा वेळ नव्हता. तरी लन्च ब्रेक मध्ये पुनः तिची आठवण झालीच. पण सकाळी नाश्ता न केल्यामुळे आता सपाटून भूक लागली होती. कलिग्जच्या गोतावळ्यात तरी एकदोघांनी त्याला डिवचलंच.

" काय आज पार्टनर नाही का जेवायला?''

"तरी म्हटलं आज आमची कशी आठवण आलीय..." वगैरे.

पण विलास ने लक्ष दिले नाही. जेवण करून तो पुन्हा कामात गुंतला.

इकडे अक्षदाला पावसात भिजल्यामुळे कणकण आली होती. रूममेट बरोबर ती दवाखान्यात जाऊन आली आणि बेड वर पडून राहिली विलास सर वाट बघतील म्हणून मेसेज केला आणि मोबाईल वर एफम लावून कानात हेडफोन्स घातले. पुन्हा तेच गाणं लागलं..'ऋतू हिरवा...' कालसुद्धा येताना एका दुकानातून तिला या गाण्याचे बोल पडले आणि ती तिथेच खिळून राहिली. आजूबाजूचं भान नाही राहिलं. एकतर आवडीचा पाऊस आणि आता हे आवडीचं गाणं..परफेक्ट मॅच..तिचं हे नेहमीचंच होतं..तिला कळायचं नाही आपलं काय कनेक्शन आहे या पावसाबरोबर, या निसर्गाबरोबर ..या गाण्याबरोबर..आणि या शब्दांबरोबर...आपण अशावेळी कसे हरवून जातो तिचं तिलाच कळायचं नाही.

होस्टेलमध्येसुद्धा ती जेव्हा गुलमोहराचं झाड एकटक न्याहाळत बसायची ..तेव्हा रूममेट वेड्यातच काढायची. म्हणायची," रोज तेच झाड बघून बोअर होत नाही का ग ? वेडी कुठली !"

कानात हेडफोन घातलेल्या अक्षदाच्या मनात अनेक आठवणी रेंगाळत होत्या..आपल्या घराच्या, आई बाबांच्या, मैत्रिणींच्या...त्यातच तिला केव्हा झोप लागली कळलं नाही.

उठली तेव्हा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यामुळे तिला फ्रेश वाटत होतं बऱ्यापैकी. कणकणही गेली होती. पण सर्दी मात्र नव्हती गेली.

दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिस मध्ये आली , विलास तिची वाटच बघत होता. आल्याआल्या त्याने तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली,

"कशी आहेस?" विलास

"बरी आहे सर." अक्षदा

"तरी मी तुला सांगत होतो, जाताना भिजू नकोस. आजतरी छत्री आणलीय का? आणि गोळ्या आणल्यास का बरोबर?"

ती मान खाली घालून नुसतीच उभी होती. केबिनमधले सगळे जण विलास कडे आश्चर्याने बघत होते. विलासलाही ते जाणवले. तो जरासा ओशाळला आणि गप्प बसला. अक्षदाने सॉरी म्हटलं तेव्हा अक्षदाकडे कटाक्ष टाकून हसला, तशी अक्षदाने जीभ चावली. विलास मनात म्हणाला, 'आलं हिचं सॉरी पुन्हा!'

जेवताना पुन्हा त्याने विषय काढला,

"कशाला भिजायचं एवढं? आणि दारूच्या दुकानासमोर कशाला उभी होतीस?" तो जरा चिडूनच बोलला.

अक्षदा चमकली,"मी कुठे उभी होते दारूच्या दुकानासमोर?"

"अगं, परवाच विचारतोय मी. ढिम्म उभी होतीस पावसात?" विलास.

"अय्या हो का? दारूचं दुकान होत ते ? ऍक्च्युली आवडीचं गाणं ऐकू आलं म्हणून थांबले होते." अक्षदा

अक्षदाचं गाण्यात हरवून जाणं ठाऊक झालं होतं विलासला. 'कशी आहे हि मुलगी. किती अल्लड, किती निरागस. बाहेरच्या जगाशी जणू संबंधच नाही हिचा. कुणीही सहज फसवेल. तिची काळजी घेणारं सतत कोणीतरी जवळ असलं पाहिजे.'

अक्षदा मात्र इकडे सर्दीशी सामना करत होती. एकामागून एक शिंका येत होत्या. आणि त्यामुळे धड जेवताही येत न्हवतं.

प्रत्येक शिंके गणिक ती सॉरी म्हणत होती. आता मात्र विलासला हसायला आलं. त्याचा हसरा चेहरा बघून अक्षदालाही जरा हायसं वाटलं. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. पुढची कथा लिहिण्यासाठी अजून उत्साह आला. मागील भागाची लिंक कशी द्यायची कोणी सांगेल का ?