मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

अर्थ माझा वेगळा

नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.

जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.

तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काथ्या च्या दशा गोळा करून बनविलेल्या त्याच्या कपड्यांची अक्षरशः दशा झाली होती!

धो धो पावसात ओला होऊ नये म्हणून 'ओला' करून तो घरी आला!

सर्दी होऊ नये म्हणून घरी आल्या आल्या आल्याचा चहा घेतला!

आता जर तर नको जरतारी वस्त्रे हवी तर थोडी जर तरी हवी ना! जर जरच नसेल तर जरतारी वस्त्र जरा तरी बनविता येईल का!

जरा जर्जर झालेल्या त्याला बसल्या जागेवर जराही हलता येत नव्हते! असे जरी असले तरी बसल्या जागी जरासे काम तो करायचाच!

कृष्णा, मस्त वाक्ये सुचताहेत तुम्हाला...>>>> धन्यवाद!! Happy

ती तारा 'तारा' गोळा करून एकतारा बनवीत असे

गळ्यात काळी पोत, कानात कुड्या, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर रूपयाएवढे कुंकू, हेच काय ते तिचे अलंकार
साडी हातात घेताक्षणी तिचा तलम पोत जाणवला
रात्र चढत होती, पोत वार्‍याने फरफरत होता आणि गोंधळी बेभान होऊन नाचत होता.
पावसाळ्याआधी जमीन, भिंती, पडवी पोतायला हवी होती
पोतराज, पिंगळा, वासुदेव हल्ली खेड्यातही कमीच दिसतात
तिच्या आवाजाचा पोत त्या गाण्यासाठी अगदी योग्य होता
पोतभर चुरमुरे बघता बघता फस्त झाले

@कृष्णा --- सायकलचा कुत्रा आणि गव्हाची आरोळी म्हणजे काय? नाही माहीत.

स्वप्नांनाही भिजविले
मी अनेक रात्री
आठवणीत वेचल्या
मी अनेक रात्री

स्वप्नांनाही भिजविले
मी अनेक रात्री
आठवणीत वेचल्या
मी अनेक रात्री

कृष्णा तुला जास्ती मार्क Happy>>>

दक्षिणाने दक्षिण हस्ते मार्कांची दक्षिणा दिली त्यामुळे कृतकृत्य झालो! Happy

Pages