मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

अर्थ माझा वेगळा

नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.

जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.

तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुका निवडताना केलेल्या चुकांमुळे पालकपण त्यात मिसळला!

सुचना: पालकांनी मुलांसाठी डब्यात पालकाची भाजी द्यावी!

कर्ण हा खरा सूर्य पुत्र होता, पण सगळे त्याला सूत पुत्र हिणवत, पण कुंतीला माहित होते तो आपलाच सुत आहे.
चरख्यावर सूत काढून वस्त्र बनवतात.

मुळे मूळ नक्षत्रावर ह्या वनस्पतीचे मुळ घेऊन येत आणि मुळ्या सोबत किसून त्याचा लेप बनवित असत!

६४ चे वर्गमूळ नाही सांगता आले म्हणून मुळुमुळु का रडावे! मुळात चांगला अभ्यास करावा!

कल्याणाचे समर्थ रामदास स्वामींनी कल्याण केले.
कल्याण स्टेशन गेल्यावर, त्याला आपली चूक कळली व तो ओरडला "आता झाले कल्याण"

Pages