मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

अर्थ माझा वेगळा

नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.

जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.

तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिनाने न जेवण्याचा पण केला पण आईच्या मायेपुढे तिचा नाईलाज झाला. लग्नात पण ठेवण्याचा तिने निश्चय केला.

कुत्रा मागे लागला म्हणून त्याने सायकल जोरात मारली पण मध्येच सायकलचा कुत्रा तुटला...

गुलाबजामने भरलेले पात्र बघून , झकोबाच्या तोंडाला पाणी सुटले. Happy
नाटकातील नारदाचे पात्र छान काम करत होते.

कावळ्या सारख्या पक्ष्यांनी पक्ष स्थापून ऐन पक्ष पंधरवड्यात पक्षपाती पणा करणे योग्य नव्हे!

नाडी तपासता तपासता , डॉक्टरांच लक्ष निखिलच्या पायजम्याच्या लोंबणार्‍या नाडीकडे गेलं.

वराची वरात आली आणि वरच्या मंडळींची गडबड झाली वरवर ते शांत दाखवत होते पण आतून जीव वरखाली होत होता!

पत्रावळीवर जेवण वाढून तिने पत्राची घडी करून ठेवली, आणि गळणार्‍या पत्र्याकडे पाहू लागली.

कृष्णा, मस्त जमलेत वाक्य. Happy>>

तुम्हा सर्वांची वाक्ये वाचता वाचता काही वाक्ये वेचिली! Happy

Pages