सध्याचे (युएस) स्टॉक मार्केट रोलर कोस्टर - संधी?

Submitted by maitreyee on 9 February, 2018 - 14:21

गेल्या कित्येक महिन्यात अमेरिकन स्टॉक मार्केट चा आलेख चढता राहिलेला आहे. अपेक्षित असलेली "करेक्शन" २ वर्षात झालेली नव्हती.
अनेक गुंतवणूकदार वाहत्या गंगेत हात धुवून तत्पुरते का होईना श्रीमंत झाले . तर इतर काही जास्त सावध खेळाडू योग्य "एन्ट्री पॉइन्टः ची वाट पहात होते.
जानेवारीचा शेवट मात्र सनसनाटी झाला आणि फेब्रुआरी त्याहून वादळी ठरत आहे.
२०१८ जानेवारी पासून डाव जोन्स, एस आंड पी आणि नास्डॅक हे तिन्ही इन्डेक्सेस दर दिवशी रेकॉर्ड ब्रेक करत होते. (रोलर कोस्टर वर जात असण्याचे फीलिंग!) २६ जानेवारी ला डाव जोन्स ने २६,६०० चा रेकॉर्ड केला. (रोलर कोस्टर सर्वात उंच पोहोचला. आणि...!! झूंईईईईई !! Lol ) फेब्रु ५ - इतिहासातला बिगेस्ट वन डे ड्रॉप! १०००+ पॉइन्ट्स!
फेब्रु ६ - इतिहासातला ४थ्या क्रमांकाचा बिगेस्ट व डे गेन!! पावणेसहाशे पॉइन्ट्स .
फेब्रु ८ - गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे करुन पुन्हा इतिहसातला दुसर्या क्रमांकाचा वनडे ड्रॉप!! १०००+ पॉइन्ट्स!!
म्हणजे रेकॉर्ड ब्रेक हायेस्ट पॉइंट, बिगेस्ट ड्रॉप (२ वेळा) , चौथ्या क्रमांकाचा बिगेस्ट गेन हे सर्व ८-१० दिवसात!
काही तज्ज्ञ ही केवळ हेल्दी करेक्शन असल्याचा निर्वाळा देत आहेत, काही जण इन्फ्लेशनची भिती किंवा इन्तरेस्ट रेट्स वर जाण्याची भिती घालत आहेत.
तर या करेक्शन कडे एक गुंतवणुकीची संधी म्हणून बघावे का? खरेदी करायला उतरण्याइतके मार्केट स्टेबल आहे/ होईल का? कोणते सेक्टर आत्ता त्यातल्या त्यात सुरक्षित आहेत ? कोणते स्टॉक्स / इटिएफ इ. खरेदीच्या लिस्ट मधे टाकावेत ? कोणते फॉलिंग नाइफ (धोक्याची गुंतवणू़क) ठरतील ? ही चर्चा करण्यासाठी हा धागा.
माझं मत सांगायचं तर ( मी अगदीच अमॅचुअर इन्व्हेस्टर आहे.) माझ्या नजरेला तशी एकॉनॉमी संदर्भात मोठी थ्रेट किंवा कन्सर्न दिसत नाही. बार्गेन स्टॉक्स खरेदी करायला , इव्हन स्विंग ट्रेडिंग साठीही मला ही एक संधी आहे असेच वाटते आहे. इतरांची मतं ऐकायला आवडतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंच काळजीचे कारण आहे. हे नवीन बेअर मार्केट सुरू होण्याची सुरुवात असू शकते. पैशाचे सोंग आणता येत नाही.
बिट कॉइन प डले. ते लॉसेस भरून काढायला शेअर्स विकून टाकले ही एक शक्यता असेल. पण युएस मार्केट नेहमी अप आणि डाउन सायकल मध्येजाते तेव्हा हार्ट अ‍ॅटॅक ची वेळ असते. आमचे इथले मार्केट पण तिथल्या घटना मिरर करते म्हणून मी इथे लिहीन. एक चांगली लिंक आहे शोधून देते.

पण तुमचे ब्लू चिप्स शेअर्स लार्ज कॅप घ्यायला हरकत नसावी डिप्स मध्ये. जसे अ‍ॅपल गूगल. फेसबुक तेल कंपन्या
शेल बी पी. आनी सर्व एअर प्लेन व वेपन्स बनवणा र्या कंपन्या तुम्ही फिनान्शिअली स्टेबल गटात असलात तर त्रास होणार नाही. दुर्बल घटक लोकांसा ठी अवघड होत जाईल परिस्थिती. रिअल इस्टॅ ट स्ट्राँग पण त्यातील लोन्स सेफ आहेत का ते बघून घ्या.

निदान फॅन्सी कार घ्यावी असे तरी काही म्हणा Lol>> टेस्ला रोडस्टर. नथिन्ग लेस्स्स्स. आज ही पडले आहे मार्केट असे वाचले म्हणजे सोमवारी इथे मारामारी दिसेल.

हे काका काय म्हणतात बघा. देअर इज टू मच डेट इन द मार्केट. इथे भारतात पण हाच प्रॉब्लेम आहे. इथे तर कर्जाची रिकव्हरी अशक्य होत चालली आहे व ब्याड डेट्स चे टिपाड भरून वाहते आहे.

https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/jim-rogers-says...

>मी अगदीच अमॅचुअर इन्व्हेस्टर आहे.

तुमच्या पोर्ट्फोलीयोमधे आधीच नसेल तर , S & P 500 index Fund ने सुरुवात करा आणि दर महिन्याला एक ठरावीक रक्कम त्यात जाईल असे पहा. त्यामुळे जेंव्हा मार्केट खाली जाईल तेंव्हा तुम्ही आपोआप जास्त शेअर विकत घ्याल, मार्केट वर असेल तर आपोआप कमी शेअर विकत घ्याल. लाँग टर्म मधे कुणीच मार्केटपेक्षा जास्त रिटर्न मिळवत नाही त्यामुळे तुमच्या पोर्ट्फोलीयोचा काही भाग तरी मार्केट इतकेच रिटर्न मिळवत राहील.

वरील अजय यांच्या प्रतिसदाशी सहमत. मार्केट टायमिंग, स्विंग ट्रेडिंग हे आपल्यसारख्या सामान्य लोकांच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. आपण नोकरी धंदा संभाळून हे करतो पण जे पूर्ण वेळ हेच करतात तेही इंडेक्स फंड पेक्षा जास्त कमवू शकत नाहीत.

इंडेक्स फंड वगळता इतर फंड ( जे सल्लागार आपल्या गळ्यात मारतात) त्यांचा एक्सपेंस रेशो जास्त असतो त्यामुळॅ त्यांनी अगदी इंडेक्स पेक्षा जास्त परतावा दिला तरीही आपण मारच खातो.

विषेश्तः तरुण लोकांनी आपले ४०१ के कशात आहेत हे नीट पाहून अजय यांचा सलला मनावर घ्यावा.

इंटरेस्ट रेट वाढणार आहेत यावर्षी शिवाय बाँड्स स्ट्राँग असल्याने फंड्स तिकडे फिरवले जात आहेत.

वर सुचवलेलं डॉलर कॉस्ट अ‍ॅवरेजींग एक्विटीज मध्ये हि करता येते, काहि ब्रोकर्स थ्रु. पण एक फरक लक्षात घ्या, डॉकॉअ‍ॅ ने रिटर्न्स ऑप्टिमाय्ज करता येतात, मॅक्सिमाय्ज नाहि. परवा सारख्या झालेल्या घसरणीतुन रिटर्न्स मॅक्सिमाय्ज करण्याची विंडो उपलब्ध होती. अर्थात लाँगटर्म इंवेस्टमेंटच्या दृषीकोनातुन...

(ओवरॉल ब्लुचीप शेअर्स मध्ये विशेष उतार आला नाहि; आफ्टर लुझिंग ३-४% दे बाउंस्डबॅक बिफोर मार्केट क्लोज्ड अँड मोर लाइकली वुड कंटिन्यु टु गेन नेक्स्ट वीक)

सल्लागार आपल्या गळ्यात मारतात >>> हो हा अनुभव घेतलेला आहे. इंडिया इन्व्हेस्टमेन्ट फन्ड म्हणून मॉर्गन स्टेनली चा फंड आणि एक एनर्जीवाला फायडेलिटीचा फंड असे कन्सल्टन्ट ने सुचवल्यावर इन्व्हेस्टमेन्ट केल्या होत्या त्या माझ्या पोर्टफोलिओ मधल्या वर्स्ट पर्फॉर्मिंग मधे आहेत Happy इंडेक्स फंडात इन्वेस्ट करणे हे पटते आहे पण समहाऊ आधी केले नव्हते
बाकी मी स्विंग ट्रेड मात्र बरेचदा करते. हल्ली अलिबाबा, टेस्ला , फेबु हे सध्या आवडीचे आहेत त्यादृष्टीने.

अजय +१
गुंतवणूक करताना आपले वय, हाताशी असलेला अवधी आणि गरज लक्षात घेवून स्वतःला योग्य असे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करावे आणि त्यानुसार गुंतवणूक करावी. शक्यतो इंडेक्स फंड्स मधे गुंतवणूक करावी. अ‍ॅक्टिवली मॅनेज्ड फंड्स मधे गुंतवणूक केल्यास नो लोड, लो एक्स्पेंन्स रेशो, टॅक्स इफिशियन्सी याकडे लक्ष द्यावे. शक्यतो सेक्टर फंड टाळावेत, घेतल्यास कोअर गुंतवणूकीला सपोर्ट म्हणून घ्यावे. . सामन्यतः सुरवातीला एक ब्रॉड इंडेक्स फंड(एस अ‍ॅड पी ५०० किंवा टोटल मार्केट) , एक ब्रॉड बॉन्ड फंड, एक टोटल इंटरनॅशनल फंड एवढे पुरेसे आहे. हळू हळू स्मॉल कॅप, टिप्स वगैरे त गुंतवणूक करावी.

I wish I had made a strong portfolio of high dividend paying stocks, so that substantial monthly income will be available when I retire.
My income these days is minimum. I can barely pay monthly expenses, a large portion being health insurance premiums. Any expense like new car, long trip must come from savings. It hurts.

People used to joke about making a graph where age and expenses go up, savings come down. Where they cross is a critical point - you better die before that. I am seriously constructing such a graph and exploring means of quick death, short of suicide, like alcohol poisoning or stop taking medications. Maybe going to India - sure to die in a few months.

नन्द्या क्या बात कर रहे हो , मरे आपके दुष्मन Happy
हो डिविडन्ड पेयिंग स्टॉक्स वगैरे बरोबरच आहे.
स्वाती२ तुमचेही सल्ले जनरल गुंतवणुकीला, लाँग टर्म ला वगैरे चांगलेच आहेत. पण मला अपेक्षित हे आहे की आताच्या या स्पेसिफिक डिप वर काय संधी निर्माण होऊ शकतात.

स्वाती२, तुमचा प्रतिसाद 'गागर में सागर' आहे.
अख्खं पुस्तक लिहिलं जातं ते मुद्दे तुम्ही चार वाक्यांत अगदी स्पष्ट लिहिलेत.

<आताच्या या स्पेसिफिक डिप वर काय संधी निर्माण होऊ शकतात.>
पुढे काय होईल याबद्दलच्या तुमच्या 'अंदाजा'वर हे अवलंबून आहे. डिप टेंपररी आहे असं वाटत असेल, तर इक्विटीत एका फटक्यात जास्त गुंतवणूक करून अ‍ॅव्हरेजिंग करता येईल. उतरण थोडा जास्त काळ चालणार वाटत असेल, तर तेवढ्या काळासाठी सिप, स्वॅप चालू करता येईल.
मला काही करायचं असेल, तर मी दोन्ही थोडं थोडं करेन. Happy

मी म्युचुअल फंड्स मधे गुंतवणूक करते. हे नॉर्मल करेक्शन आहे. त्यामुळे याला मी तरी संधी म्हणणार नाही आणि काहीच करणार नाही. नेहमीसारखी गुंतवणूक करत राहीन. गुंतवणूकीसाठी म्युचुअल फंड घेणार असल्यास स्ट्रॅटजी वेगळी आणि स्वतंत्र स्टॉक्स विकत घेणार असल्यास वेगळी. त्यामुळे स्वतंत्र स्टॉक्समधे लाँग टर्म गुंतवणूक करण्यासाठी काही कंपन्यांचे शेअर्स सेलवर घेण्यासाठी संधी आहे पण त्यासाठी आधीपासून अभ्यास हवा. अभ्यास करुन तुमच्या यादीत ज्या स्ट्राँग फंडमेंटल असलेल्या कंपन्या असतील त्यांचे शेअर्स सेलवर मिळत असल्यास घ्यावेत, अर्थात लाँग टर्म साठी. मार्केट अजून काही काळ वरखाली होत राईल हे गृहित धरावे.

Maybe going to India - sure to die in a few months. >> हा धाग्याचा विषय नाही पण प्रत्येकाचा बघण्याचा द्रुष्टिकोन वेगळा असतो. अमेरिकेतल्या एका वर्षाच्या प्रिमियम मध्ये माझ्या वडलाची मुंबईतिल नामवन्त रुग्णालयात बाय- पास झाली. आणि त्याच रकमेत आईची पुण्यात कॅन्सरची १ महिन्याची ट्रिटमेंट झाली असती. वडलाचा उपचारानंतर ७००० रुपयाचे हेल्थ केअर घेतल्याने त्याचा खर्च खुपच कमी आला. भारतात हेल्थ केअर वर अमेरिके पेक्षा खुपच कमी खर्च आहे
investment return म्हणाल तर भारतात मागच्या १० वर्षात बॅकेत FD (CD) वर डॉलरच्या तुलनेत ६-७% परतावा मिळाला आहे.( २००९-२०१४ पर्यन्त रुपया घसरत होता पण तेव्हा बॅकेत पण १०-१२% परतावा होता.) तेच पैसे जर सरकारी करमुक्त बॉड मध्ये गुंतवले तर ६% परतावा आला असता. शेअर बाजार आणि प्रोपर्टी मध्ये त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला असता.
घर थोडी छोटी असतिल पण म्हातरपणी किती मोठे घर लागते. मुम्बई- पुण्यातिल घराचा कर बागराज्याचा कराच्या जवळपास १-२ % असतो.
गाडी- पेट्रोल थोडे माहाग आहे पण ओला- उबेर वर स्वस्तात मोबिलिटी मिळते. घर काम साठी गडी , फोन, नेट, केबल ह्या सर्वाचा खर्च कितीतरी पटीने कमी आहे. ट्रॅव्हल वाली लोक समवयस्क लोकाना स्वस्तात फिरवुन आणतात.
हवा- पाणी दुषित आहे पण त्याची सवय ठेवली असेल तर काही त्रास होत नाही. आम्ही भारतवारीत कधीही पाणि गाळुन - उकळुन पिले नाही याचा कधी त्रास झाला नाही.
थोडक्यात we come back to India to stretch our dollar, for better life. I strongly believe in work in outside India preferably USA, raise kids in USA & come back to India for retirement. One can have different opinion.

आता मुळ मुद्द्या कडे,
शॉर्ट टर्म मध्ये माझ्या मते आजुन बरेच करेक्षन अपेक्षित आहे. पुढील दोन- तीन फेड मिटिंग्च्या आधी २-४ दिवस आणि मिटींग च्या आउटकम वरुन नंतरचे १-२ आठवडे मार्केट मध्ये चढ- उतार अपेक्षित आहे. त्यावेळी स्विंग ट्रेडींग मध्ये बर्यापैकी वाव आहे.
अत्ताची मिटींग ३०-३१ जानेवारीला होती, पुढील मिटींग २०-२१ मार्च ला आहे.

लाँग टर्म साठी अजय, स्वाती२ याना अनुमोदन.

we come back to India to stretch our dollar, for better life. I strongly believe in work in outside India preferably USA, raise kids in USA & come back to India for retirement. One can have different opinion.

मलाही निदान आज असेच वाटते. पुण्या मुंबई बाहेर सांगली/सातारा/ भागात घरांच्या किमती ऐकूनच जीव जाईल इतक्या जास्त नाहीत. मेडिकल सोयी आहेत. सोशल लाईफ आहे. प्रदुषण फार नाही. इतर खर्चही तसे कमी आहेत....

<<<नन्द्या क्या बात कर रहे हो , मरे आपके दुष्मन>>>
असे म्हंटले तुम्ही तरी त्याचा शेवटी परिणाम तोच होणार. कारण मला दुष्मनच नाहीत!
आणि आत्मैव आत्मनो शत्रू! असले काहीतरी वाचून मीच माझा शत्रू आहे असे कधी कधी वाटते!
बाकी हे सगळे मी गेली दहा वर्षे म्हणतो आहे - बायको कंटाळली ऐकून ऐकून - पुरे करा असली कटकट. एकदा काय करायचे ते करा नि मोकळे व्हा म्हणते (फक्त गार्बेज तेव्हढे आज रात्री बाहेर नेऊन ठेवा)
पाहिलेत किती प्रॅक्टीकल आहे माझी बायको!

ऐकावे जनाचे करावे मनाचे!
मी तर बुवा संत मोतीलाल यांचा भक्त आहे - जिंदगी ख्वाब है!
पण याचा विचार इन्वेस्ट्मेन्ट करताना अजीबात करू नका. कारण ख्वाबभी कितने सुहाने होते है असे इतर कुणा संत संतिणीने सांगितलेच असेल.
पण त्या इन्कमचे मात्र फार महत्वाचे आहे! आजकाल रिटायर झाल्यावरच जास्त खर्च असतात.
रशिया, चीन, जपान, इंडोनेशिया , सिंगापूर, टांझानिया, न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, मोरोक्को, मोनेको, यूरोप क्रूझेस, माचू पिचू, ब्राझील, आर्जेंटिना, मेक्सिको, कॅरिबिअन्स, अँटार्क्टिक सगळी कडे जाऊन यायला पाहिजे. काही लोक भारतात जाऊन नेपाळ, ब्रह्मदेश, श्रीलंका नि हिमालयातील कैलास वगैरेलाहि जातात - म्हणजे तुम्हाला हे सगळे करावेच लागते.
कदाचित नोकरीत मिळतात त्याहून जास्त पैसे लागतील.
शिवाय जिथे कुठे पैसे घालाल त्या स्टॉकवर दररोज लक्ष ठेवायला पाहिजे. नोकरीच्या वरताण काम! कारण स्वतःचे पैसे ना. सरकारचे नाहीत किंवा कंपनीचे नाहीत.