'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' !

Submitted by अँड. हरिदास on 6 February, 2018 - 04:00

kapil kandu 1.jpg
'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं'!

'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' या आनंद चित्रपटातील संवादाने एकेकाळी चित्रपटरसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता. आज, संपूर्ण देश पुन्हा या वाक्याने गहिवरून गेला आहे. पाकिस्तानी गोळीबारात शाहिद झालेल्या २२ वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांनी फेसबुकवर 'लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीईंग लाँग' या आशयाचे स्टेटस ठेवले होते. या स्टेटसप्रमाणेच शहीद कुंडू जगले. माणूस किती दिवस जगला, यापेक्षा तो कसा जगला, याला जास्त महत्व असते. सत्तर ऐंशी वर्षाचं आयुष्य जागूनही काहींना जीवनाचा अर्थ सापडत नाही, तर काही मोजक्या दिवसातच आयुष्याचं सोनं करून जातात. मातृभूमीच्या रक्षणासाठी अवघ्या २२ व्या वर्षी हौतात्म्य पत्करलेल्या कॅप्टन कुंडू यांनी देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचा वादा पूर्ण करत आपलं जीवन सार्थकी लावलं. या देशाच्या रक्षणासाठी तळहातावर शिर घेऊन मृत्यूला सामोरे जाणारे असे हजारो जवान आपल्या शरीराची ढाल करून सीमेवर उभे आहेत. त्यामुळेच देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. त्यांच्या शौर्य त्यागाच्या स्मृती प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमच्या कोरल्या जातील. मात्र, त्यांचे बलिदानचं काय? भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतीय सेनेचे वीर जवान आपल्या छातीवर गोळ्या झेलत मातृभूमीचे रक्षण करत आहेत. त्यांनी पाकिस्थानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ दिले नाहीत, आणि यापुढे ही ते होणार नाहीत. कारण सीमेपलीकडून होणाऱ्या आक्रमणाचे निर्दालन करण्याची क्षमता भारतीय लष्कारात आहे. परंतु पाकने भारताविरोधी पुकारलेल्या छुप्प्या युद्धात आणखी किती जिगरबाज जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागणार आहे? किती काळ आपण धडा शिकवण्याची भाषा करत श्रद्धांजलीचे शाब्दिक हार चढवून आश्रू ढाळणार आहोत ? यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तान संदर्भात मत मांडताना ‘कुत्र्याचे शेपूट’ या वाक्प्रचाराचा वारंवार वापर केला जातो. कारण एखाद्याचा स्वभाव कितीही प्रयत्न केले तरी बदलत नाही.तुम्ही कितीही चांगले वागा, तो मात्र आपले वागणे बदलायला तयार नसतो, अगदी 'कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच' या म्हणीप्रमाणे. पाकच्या बाबतीतही सुरवातीपासून असाच अनुभव आलेला आहे. एक दोनदा नाही तर शेकडो वेळा विविध आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्थानने भारतविरोधी कुरापती थांबविल्या नाहीत. समोरासमोरच्या युध्दात विजय मिळवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर या देशाने दहशतवादाचा सहारा घेतला. सीमेववर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय जवानांनवर गोळीबार करण्याचे सत्र आरंभिले. रविवारी अश्याच एका घटनेत भारताचे चार जवान शाहिद झाले. राजौरी जिह्यातील भिंबर गली सेक्टरमध्ये रविवारी पाकिस्तानी रेंजर्सने क्षेपणास्त्रांचा मारा करीत गोळीबार केला. यामध्ये कॅप्टन कुंडू, रायफलमॅन रामावतार, शुभमसिंग, हावलदार रोशन यांना वीरमरण आले. पाकिस्तानसाठी शस्त्रसंधीचे उल्लंघन ही काही नवी बाब नाही. अशी आगळीक हा देश सतत करीत असतो. कुठल्याही प्रश्नाच उत्तर शांततेच्या मार्गाने सोडवायची आपली पद्दत आहे. 'कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं', या म्हणीप्रमाणे भारताने कधीच आगळीक केली नाही. परंतु पाणी आता डोक्यावरून जायला लागले आहे. त्यामुळे किमान दगड तरी भिरकावला गेला पाहिजे. सरकार म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेला सर्वच निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतात.. प्रत्येक निर्णयांच्या दूरगामी परिणामांचा विचार सरकारला करावा लागत असतो..अंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि जागतिक नियमांचेही संकेत सरकारला पाळावे लागतात. त्यामुळे भावनेच्या भरात एखादा अरेरावीची निर्णय सरकारला घेता येणार नाही, हे मान्य. परंतु सीमेवर पाक सैनिक नेहमी आगळीक करत असतील तर आपल्याही लष्कराला दोन पाऊले पुढे जाऊ द्यायला काय हरकत आहे. गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकला चांगलाच जरब बसला होता. भारत यापुढे पाकिस्थानची आगळीक सहन करणार नाही, असा संदेश यातून दिला गेला. मात्र आता अशा कारवाईचं सातत्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने भारताविरोधात एक प्रकारचे युद्धच पुकारले आहे. त्यामुळे, त्याला जश्यास तसे उत्तर देणे गरजेचे आहे.

समोरून वार करणार्याची छाती चिरता येते, मात्र पाठीमागून वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. पाकिस्तान भारताशी समोरून कधीच युद्ध करणार नाही.. त्याचे परिणाम त्याने तीन वेळा भोगले आहेत. त्यामुळे अशी चूक तो चौथ्यादा करेल असे वाटत नाही. आणि राहिला प्रश्न अणुयुद्धाचा तर या निव्वळ पोकळ गर्जना आहेत. पाकिस्तानची या धरतीवर शाबूत राहण्याची इच्छा संपल्यावरच ते असा निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे, दहशतवादी कारवाया आणि छुपे युद्ध, याच मार्गाने पाक भारताला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ज्या ज्या वेळी शांततेसाठी पाऊल उचलले, त्या त्या वेळी पाकिस्तानने भारताच्या प्रयत्नांना हरताळ फसला. अटलबिहारींची लाहोर यात्रा असो, की नरेंद्र मोदींची पाकिस्तानची भेट.. पाकला प्रेमाची भाषा समजत नाही, हा अनुभव प्रत्येकवेळी आला आहे. आजवर पाकशी झालेल्या असंख्य चर्चांपैकी एकाही चर्चेची फलनिष्पती समोर आली नाही. मग असल्या वांझोट्या चर्चा करण्याचा काय फायदा ? भारताने चर्चा, तर पाकने मात्र आक्रमणे करत रहायची, याला काय अर्थ आहे. पाकसोबत प्रत्यक्ष युद्ध सुरु नसले तरी दररोज भारतीय जवानांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागत आहे. भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास भारतमातेचे पुत्र कायम तत्पर असतात. पण, हे चालणार तरी किती दिवस? भारत द्वेषाने वाकडी झालेली पाक ची शेपूट काहीही केलं तरी सरळ होणार नसेल तर ती शेपूट ठेचायलाच हवी..!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत द्वेषाने वाकडी झालेली पाक ची शेपूट काहीही केलं तरी सरळ होणार नसेल तर ती शेपूट ठेचायलाच हवी..!!!
<<

अगदी सहमत !

मात्र पाकिस्तानचे वाकडे शेपूट ठेचायचा जरासाही प्रयत्न वर्तमान सरकारने केला तरी भारतातलेच पुरोगामी, विचारवंत, डावे, कॉंग्रेसी, निधर्मांध व उदारमतवादी लोक सध्याचे सरकार कसे युध्दखोर, एका विशिष्ठ धर्माचे निर्दालन करणारे वगैरे आहेत म्हणून गळा काढायला सुरुवात करुन अवॉर्ड वापसीची अथवा असहिष्णुतेची नौटंकी पुन्हा एकदा सुरु करतील. तशी सुरुवात सुरु झाली देखील.

२०१६ च्या सप्टेंबर महिन्यात हिंदूस्थानी सैन्याने, पाकिस्तान विरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे वरिल सर्व हेच अस्थनीतलेच निखारे होते. श्रीनगर मध्ये पाकिस्तान पुरुस्कृत देगडफेक्याला, स्वत:च्या तुकडीच्या संरक्षणार्थ मेजर गोगई यांनी त्यांच्या जीपला बांधले तर वरिल सर्व पुरोगामी नौटंकी मंडळीना त्याचा किती पुळका आला होता तो तर सर्वांनीच पाहीला. आता जर का सिमेवर हिंदूस्थानी सैन्याने पाकिस्तान विरोधात कोणतीही मोहिम हाती घेतली तर त्यांना पहिला विरोध ह्या तथाकथित पुरोगामी नौटंकी मंडळींचा असेल.

अनिरुद्ध , किती खोट्या गोष्टी बोलशील रे. शरम कर रे शरम कर. पाकिस्तानाशी युद्ध करण्याची धमक नाहीये भाजप सरकारात. नुस्त्या बोंबा मारत होता तो मोदी निवडून येइपर्यंत आता विरोधकांच्या पदराआड लपतो काय रे? ५६ इन्ची छाती पिटून दाखवणारा आता ती छाती विरोधकांच्या नावाखाली लपवत फिरतो का?

तरी बरे पाकिस्तानचे वाकडे शेप्पूट कसे ठेचायचे हे काँग्रेसनेच जगाला दाखवले. भाजप्यांसारखे कंदाहारला अतिरेकी पाहुनचारासकट सोडायला गेले नाहीत की कारगीलसारखे नाक कापून घेतले नाही. तुमच्या नेत्यांत अक्कल नाही, धमक आणि समजही नाही, काही करता येत नाही त्याची ही अशी विरोधकांच्या नावाने खॉटीनॉटी कारणे सांगून वेळ काढता फक्त.

कोणत्याही विदेशी शत्रूविरुद्ध देश कायम एकत्र उभा राहिला आहे. तुमच्यासारखे देशवासीयांनाच देशद्रोही म्हणणार्‍यांना आधी शोधून शोधून हाणले पाहिजे

जर का सिमेवर हिंदूस्थानी सैन्याने पाकिस्तान विरोधात कोणतीही मोहिम हाती घेतली तर त्यांना पहिला विरोध ह्या तथाकथित पुरोगामी नौटंकी मंडळींचा असेल. >>>>>>

तथ्य काय ते खाली आले आहेच

http://zeenews.india.com/news/nation/isi-funded-rss-leaders-pandeys-conf...

http://www.jantakareporter.com/india/bjps-cell-member-dhruv-saxena-arres...

https://www.indiatoday.in/india/north/story/pdp-clemency-to-afzal-guru-m...

जुमलेबाज आणी बोलबच्चन सरकार असल्या मुळे हि वेळ आली आहे. खालील डाटा पहा.

सिझफायर व्हायोलेशन

२०११ - ६२
२०१२ - ११४
२०१३ - ३४७
२०१४- ५८३
२०१५ - ३८७
२०१६ - २७१
२०१७ - ८६०

आणी २०१८ - ३५ दिवसात २४१.

बाकि काहि बोलण्याची गरजच नाहिये की कोणते सरकार मजबुत होते,

. गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकला चांगलाच जरब बसला होता. >>>>>>>
म्हणजे काय?
सर्जीकल स्ट्राईक नंतर किति दिवस शास्त्रसंधि उल्लंधनास खीळ बसली होती?

, पाकिस्तान विरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे वरिल सर्व हेच अस्थनीतलेच निखारे होते. >>>>>

केलेल्या कारवाईचे देशवासीयांना पुरावे मागावे लागणे ही दुर्दैवी वेळ विद्यमान सरकारने आपल्या खोट्या आणि पोकळ दावे करण्याची सवयीने आणली आहे,

हा स्ट्राईक होण्या अगोदर काही दिवस निखलास खोटी माहिती मीडिया मध्ये पसरवण्यात आली होती, त्यातून शहाणपणा सुचून लोकांनी पुरावे मागितले.

भक्तांचे मेंदू लुटूपुटूच्या लढाया शाखेतल्या बौद्धिकांत बसून खेळल्याने विशिष्ट पद्धतीत विचार करतात. त्यांना माफ करा.

आणि advocate साहेब टीका करायची तर आकडेवारी सकट थेट करा,
इतका subtle विरोध लोकांना जाणवत सुद्धा नाही.
* हे तुम्हाला विरोध करायचा आहे अशी समजूत करून घेऊन लिहितोय, संतुलित पणा दाखवायला किंचित विरोध करून बाकी आरती ओवाळणारे तुम्ही नसावात असे मला वाटते.

एक दोनदा नाही तर शेकडो वेळा विविध आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्थानने भारतविरोधी कुरापती थांबविल्या नाहीत.
<<

लेखातील या मुद्द्याशी देखील सहमत आहे.

मात्र होतेय काय की,
भारतातलेच कथित विरोधी पक्ष, वर्तमान सत्ता उलथवायला पाकिस्तानची मदत मागायला जोवर जात राहतील तोवर पाकिस्तान, भारतविरोधी कुरापती थांबवेल ही आशा करणे व्यर्थच आहे.

भारतातलेच कथित विरोधी पक्ष, वर्तमान सत्ता उलथवायला पाकिस्तानची मदत मागायला जोवर जात राहतील तोवर पाकिस्तान, भारतविरोधी कुरापती थांबवेल ही आशा करणे व्यर्थच आहे.>>> किती टोकाच वाक्य आहे हे...बापरे..
पाकिस्तान ची मदत मागायला का जातील ?

भारतातलेच कथित विरोधी पक्ष, वर्तमान सत्ता उलथवायला पाकिस्तानची मदत मागायला जोवर जात राहतील >>>

असे लोक भारतात आहेत आणी मोकळे फिरत आहेत आणी ५६ इंच त्यांना पकडु शकत नाहि. जर भारतात असे लोक कोण आहेत हे माहित असुनहि हे सरकार त्यांना भारतातच पकडु शकत नसेल तर कसले भ्याड सरकार आहे हे. हे पाकिस्तानला काय धडा शिकवणार !

अनिरुद्ध तुम्हि मोदी सरकारचा जो नाकर्तेपणा समोर आणला आहे त्याच्याशी एकदम सहमत! मोदी सरकारचा निषेध ! शाब्बास अनिरुद्ध. असेच मोदी सरकारचे नाकर्तेपण उघडे करत रहा!

आणि advocate साहेब टीका करायची तर आकडेवारी सकट थेट करा,
इतका subtle विरोध लोकांना जाणवत सुद्धा नाही.
* हे तुम्हाला विरोध करायचा आहे अशी समजूत करून घेऊन लिहितोय, संतुलित पणा दाखवायला किंचित विरोध करून बाकी आरती ओवाळणारे तुम्ही नसावात असे मला वाटते.<<
>>कोणती आकडेवारी पाहिजे.. पाक ने किती वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं त्याची की, यात भारताचे किती सैनिक मारले गेले याची.

अश्या विषयांवर हि राजकरण? काय हे कुठे चाललय सारं.. सगळीकडेच भाजपा अन काँग्रेस का? >>>>>>

२०१४ ची इलेक्शन जिंकायला मात्र हे चालते का ?

image1s.jpg

सर्जीकल स्ट्राईक नंतर किति दिवस शास्त्रसंधि उल्लंधनास खीळ बसली होती?<<
>> भारत यापुढे आगळीक सहन करणार असा संदेश या सर्जिकल स्ट्राइक नंतर संपूर्ण जगात गेला होता.. ह्या कारवाया सातत्याने केल्या गेल्या असत्या तर निश्चितच पाक ने शेपूट घातले असते. मात्र झाले काय की सरकारने एक चांगला निर्णय घेतला सरकारचे तोंडभरून कौतुक करण्यात आले पण सत्ताधारी पक्षाने या कारवाईचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. एका सैनिकी कारवाई चे राजकारण केल्या गेल्याने देशाची जग पातळीवर निर्माण झालेली प्रतिमा मालिन झाली. याला सत्ताधारीच नाही तर पुरावे मागणारे आणि देणारे सर्वच कारणीभूत आहे.

भारत यापुढे आगळीक सहन करणार असा संदेश या सर्जिकल स्ट्राइक नंतर संपूर्ण जगात गेला होता >>>>>

काहिहि संदेश वगैरे गेला नव्हता. त्यानंतर सतत पाकिस्तान त्रास देत आहे. आणी सरकार सुस्त आहे. त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्यात

बाकी आरती ओवाळणारे तुम्ही नसावात असे मला वाटते.<<
सत्य असत्यशी मन केले ग्वाही .. मानियले नाही बहुमता!
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाला प्रमाण मानून, जे मला सत्य वाटते तेच मांडण्याचा प्रयत्न असतो. चांगलयला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची सवय आहे.. अर्थात कुणाला पटो वा न पटो..

श्रीनगर मध्ये पाकिस्तान पुरुस्कृत देगडफेक्याला, स्वत:च्या तुकडीच्या संरक्षणार्थ मेजर गोगई यांनी त्यांच्या जीपला बांधले तर वरिल सर्व पुरोगामी नौटंकी मंडळीना त्याचा किती पुळका आला होता तो तर सर्वांनीच पाहीला. <<
>>> याबाबत सविस्तर माहिती नाही.. पण या संदर्भाने एक मुद्दा मांडवा वाटतोय..जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दगडफेक करणार्‍या हजारो तरुणांविरुद्धचे सर्व खटले मागे घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. गेल्याच आठवड्यात शोपियानमध्ये लष्करी जवानांनी आत्मसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबाराच्या घटनेत लष्करी अधिकार्‍यांवरच खुनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. काश्मीर मधील पीडीपी च्या सरकारमध्ये कोण कोण आहे हे आता सांगायला नको. मुद्दा हा आहे की राष्ट्रवाद जपणारा एक सत्ताधारी पक्ष असे निर्णय घेतले जात असताना मूग गिळून गप्प का बसला असेल?

बरं चालु आहे राहुलका... चालुदेंत्त आरामात राजकरण सगळ्यांच धाग्यांचं.. >>>>> आम्हि नाहि केले हो, मोदी साहेबांना सांगा. आम्हि त्यांचेच आदर्श ठेवुन सरकारला विचारत आहोत.

काय कहर आहे ना! वरील सर्व प्रतिसाद पाहता हा धागा राजकारण विभागात हलवण्यात यावा ही मा. प्रशासनाला विनंती.

भारतीय सैन्याचे हे खरंच दुर्दैव आहे की त्यांच्यावर होणारे हल्ले हे सत्ताधार्यांसाठी विरोधकांच्या हातातले आयते कोलीत असते तर विरोधकांसाठी सरकारवर आगपाखड व छी-थू करायची संधी. देशाच्या संरक्षण, सार्वभौमत्व यांसारख्या मुद्यांवर इतका उथळपणा खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. Uhoh

ही प्रथा भाजपनेच सुरु केली आहे मिस्टर अजब. आता जे पेरले ते उगवणारच. आम्हीच काय ते देशभक्त आनी देशाची काळजी असणारे सैनिकांबद्दल प्रेम असणारे इत्यादी इत्यादी टेंभा मिरवणार्‍यांनी ही विषारी बीजं पेरलीत. रामदेवबाबासारखे अक्षयकुमारसारखे त्याचा व्यवसायैक फायदा घेत आहेत, भाजपने राजकिय फायदा घेतला. चिडिया चुग गई खेत तो अब रोनेसे क्या होगा.

<मात्र पाकिस्तानचे वाकडे शेपूट ठेचायचा जरासाही प्रयत्न वर्तमान सरकारने केला तरी भारतातलेच पुरोगामी, विचारवंत, डावे, कॉंग्रेसी, निधर्मांध व उदारमतवादी लोक सध्याचे सरकार कसे युध्दखोर, एका विशिष्ठ धर्माचे निर्दालन करणारे वगैरे आहेत म्हणून गळा काढायला सुरुवात करुन अवॉर्ड वापसीची अथवा असहिष्णुतेची नौटंकी पुन्हा एकदा सुरु करतील>
मोदी सरकार विरोधकांच्या मताला किती किंंमत देतं ते उघडच आहे. सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या रणगर्जना (परिंदा भी पर नहीं मार पाएगा, एक के बदले दस) सत्तेत आल्यावर पोकळ ठरल्याने विरोधकांवर निष्कारण आगपाखड करणे सुरू आहे.
सरकारच्या आणखी एका अपयशावर पांघरूण घालायचा व लक्ष भलतीकडे वळवायचा आणखी एक प्रकार.

@भावना, या धाग्यावर राजकारण आणायचा पहिला प्रकार अनिरुद्ध यांच्याकडून झालाय, तो तुम्हाला खटकलेला दिसत नाही. किंवा तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात. पण त्यांना प्रत्युत्तर मिळताच तुम्हाला आक्षेप नोंदवावासा वाटला, असं दिसतंय.

ही प्रथा भाजपनेच सुरु केली आहे मिस्टर अजब. आता जे पेरले ते उगवणारच. >>> असेल, म्हणून आता सगळ्यांनी तसेच वागण्याला मी दुर्दैव म्हणलंय ताई. (An eye for an eye only ends up making the whole world blind.__महात्मा गांधी). माझ्या मते तरी हा विषय अजिबातच राजकारण करण्यालायक नाही. त्यामुळे सुरवात करणारा व त्याला चघळून चघळून शेवट करणारा सगळेच सारखे. हे मा वै म.

सगळ्यांनी तसेच वागायची गरज नाहीच. हे जबाबदारी अंगावर आल्यावर, धमक नसल्याने ती टाळण्यासाठी विरोधकांच्या नावाने भुंकणारे जे पैदा झालेत त्यांना सुनवत आहे. आम्ही अ‍ॅक्शन घेत नाही कारण विरोधक कोल्हेकुई करतील ही असली स्टेटमेंट्स येणे जास्त दुर्दैवी आहे हे तुम्हाला कळत नाही म्हणता? त्या स्टेटमेंटच्या विरोधात सगळं राजकारण होतंय. तेव्हा सुरुवात ज्यांनी केली त्यांना कोणी उपदेश पाजत नाही. त्यांना फटके पडले की तुमच्यासारखे छुपे तटस्थ लगेच नका रे भांडू म्हणून साटंलोटं करायला येऊन विरोधी बाजूलाच गिल्टी फिल करायला लावतात. इ ना चॉलबे.

कॅप्टन कुंडू, रायफलमॅन रामावतार, शुभमसिंग, हावलदार रोशन सर्वांना आदरांजली>>>>>+1

Sorry our government let you down

झाल्या प्रकारची कडी निंदा केल्याचे तरी कोणाच्या वाचनात आले का? तशीही हल्ली कडी निंदा इतकी कॉमन झाली आहे की तिला आतल्या पानावर कोपऱ्यातली जागा मिळते

Pages