'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' !

Submitted by अँड. हरिदास on 6 February, 2018 - 04:00

kapil kandu 1.jpg
'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं'!

'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' या आनंद चित्रपटातील संवादाने एकेकाळी चित्रपटरसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता. आज, संपूर्ण देश पुन्हा या वाक्याने गहिवरून गेला आहे. पाकिस्तानी गोळीबारात शाहिद झालेल्या २२ वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांनी फेसबुकवर 'लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीईंग लाँग' या आशयाचे स्टेटस ठेवले होते. या स्टेटसप्रमाणेच शहीद कुंडू जगले. माणूस किती दिवस जगला, यापेक्षा तो कसा जगला, याला जास्त महत्व असते. सत्तर ऐंशी वर्षाचं आयुष्य जागूनही काहींना जीवनाचा अर्थ सापडत नाही, तर काही मोजक्या दिवसातच आयुष्याचं सोनं करून जातात. मातृभूमीच्या रक्षणासाठी अवघ्या २२ व्या वर्षी हौतात्म्य पत्करलेल्या कॅप्टन कुंडू यांनी देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचा वादा पूर्ण करत आपलं जीवन सार्थकी लावलं. या देशाच्या रक्षणासाठी तळहातावर शिर घेऊन मृत्यूला सामोरे जाणारे असे हजारो जवान आपल्या शरीराची ढाल करून सीमेवर उभे आहेत. त्यामुळेच देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. त्यांच्या शौर्य त्यागाच्या स्मृती प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमच्या कोरल्या जातील. मात्र, त्यांचे बलिदानचं काय? भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतीय सेनेचे वीर जवान आपल्या छातीवर गोळ्या झेलत मातृभूमीचे रक्षण करत आहेत. त्यांनी पाकिस्थानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ दिले नाहीत, आणि यापुढे ही ते होणार नाहीत. कारण सीमेपलीकडून होणाऱ्या आक्रमणाचे निर्दालन करण्याची क्षमता भारतीय लष्कारात आहे. परंतु पाकने भारताविरोधी पुकारलेल्या छुप्प्या युद्धात आणखी किती जिगरबाज जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागणार आहे? किती काळ आपण धडा शिकवण्याची भाषा करत श्रद्धांजलीचे शाब्दिक हार चढवून आश्रू ढाळणार आहोत ? यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तान संदर्भात मत मांडताना ‘कुत्र्याचे शेपूट’ या वाक्प्रचाराचा वारंवार वापर केला जातो. कारण एखाद्याचा स्वभाव कितीही प्रयत्न केले तरी बदलत नाही.तुम्ही कितीही चांगले वागा, तो मात्र आपले वागणे बदलायला तयार नसतो, अगदी 'कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच' या म्हणीप्रमाणे. पाकच्या बाबतीतही सुरवातीपासून असाच अनुभव आलेला आहे. एक दोनदा नाही तर शेकडो वेळा विविध आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्थानने भारतविरोधी कुरापती थांबविल्या नाहीत. समोरासमोरच्या युध्दात विजय मिळवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर या देशाने दहशतवादाचा सहारा घेतला. सीमेववर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय जवानांनवर गोळीबार करण्याचे सत्र आरंभिले. रविवारी अश्याच एका घटनेत भारताचे चार जवान शाहिद झाले. राजौरी जिह्यातील भिंबर गली सेक्टरमध्ये रविवारी पाकिस्तानी रेंजर्सने क्षेपणास्त्रांचा मारा करीत गोळीबार केला. यामध्ये कॅप्टन कुंडू, रायफलमॅन रामावतार, शुभमसिंग, हावलदार रोशन यांना वीरमरण आले. पाकिस्तानसाठी शस्त्रसंधीचे उल्लंघन ही काही नवी बाब नाही. अशी आगळीक हा देश सतत करीत असतो. कुठल्याही प्रश्नाच उत्तर शांततेच्या मार्गाने सोडवायची आपली पद्दत आहे. 'कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं', या म्हणीप्रमाणे भारताने कधीच आगळीक केली नाही. परंतु पाणी आता डोक्यावरून जायला लागले आहे. त्यामुळे किमान दगड तरी भिरकावला गेला पाहिजे. सरकार म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेला सर्वच निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतात.. प्रत्येक निर्णयांच्या दूरगामी परिणामांचा विचार सरकारला करावा लागत असतो..अंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि जागतिक नियमांचेही संकेत सरकारला पाळावे लागतात. त्यामुळे भावनेच्या भरात एखादा अरेरावीची निर्णय सरकारला घेता येणार नाही, हे मान्य. परंतु सीमेवर पाक सैनिक नेहमी आगळीक करत असतील तर आपल्याही लष्कराला दोन पाऊले पुढे जाऊ द्यायला काय हरकत आहे. गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकला चांगलाच जरब बसला होता. भारत यापुढे पाकिस्थानची आगळीक सहन करणार नाही, असा संदेश यातून दिला गेला. मात्र आता अशा कारवाईचं सातत्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने भारताविरोधात एक प्रकारचे युद्धच पुकारले आहे. त्यामुळे, त्याला जश्यास तसे उत्तर देणे गरजेचे आहे.

समोरून वार करणार्याची छाती चिरता येते, मात्र पाठीमागून वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. पाकिस्तान भारताशी समोरून कधीच युद्ध करणार नाही.. त्याचे परिणाम त्याने तीन वेळा भोगले आहेत. त्यामुळे अशी चूक तो चौथ्यादा करेल असे वाटत नाही. आणि राहिला प्रश्न अणुयुद्धाचा तर या निव्वळ पोकळ गर्जना आहेत. पाकिस्तानची या धरतीवर शाबूत राहण्याची इच्छा संपल्यावरच ते असा निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे, दहशतवादी कारवाया आणि छुपे युद्ध, याच मार्गाने पाक भारताला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ज्या ज्या वेळी शांततेसाठी पाऊल उचलले, त्या त्या वेळी पाकिस्तानने भारताच्या प्रयत्नांना हरताळ फसला. अटलबिहारींची लाहोर यात्रा असो, की नरेंद्र मोदींची पाकिस्तानची भेट.. पाकला प्रेमाची भाषा समजत नाही, हा अनुभव प्रत्येकवेळी आला आहे. आजवर पाकशी झालेल्या असंख्य चर्चांपैकी एकाही चर्चेची फलनिष्पती समोर आली नाही. मग असल्या वांझोट्या चर्चा करण्याचा काय फायदा ? भारताने चर्चा, तर पाकने मात्र आक्रमणे करत रहायची, याला काय अर्थ आहे. पाकसोबत प्रत्यक्ष युद्ध सुरु नसले तरी दररोज भारतीय जवानांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागत आहे. भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास भारतमातेचे पुत्र कायम तत्पर असतात. पण, हे चालणार तरी किती दिवस? भारत द्वेषाने वाकडी झालेली पाक ची शेपूट काहीही केलं तरी सरळ होणार नसेल तर ती शेपूट ठेचायलाच हवी..!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता काही लेखक आपलं प्रत्येक लेखन मायबोलीचे ग्रुप्स लक्षात न घेता, ललित लेखनात ओततात ; हा त्यांचा दोष आहे. ललित लेखन म्हणजे काय हे त्यांनी समजून घ्यायला हवं.
चर्चा तर होणारच ना?<<
>>>
भरत..आपण काही लेखक म्हटलं आहे.. तरीही स्पष्टीकरण. हा लेख चालू घडामोडी भारतात या ग्रुप मध्ये आहे. घडामोड आहे.. भारतातील आहे.. आणि चालू म्हणजे रिसेन्ट सुद्धा आहे. राजकारण हा ग्रुप यासाठी नाही. की विषय राजकीय नाही.

राजकरणाचा माझा विषयच नाहि किती वेळा लिहु? >>> मग नका ना पडु राजकारणात . कोणी तुम्हाला आमंत्रण दिले होते का ? सैनिक शहिद होत आहे हे सरकारचे अपयश आहे असे आम्हि म्हणले तर तुम्ह्लाला ते राजकारणी वाटतेत, पण आम्हाला नाहि वाटत. आम्हि सरकरचे डोळे उघडावे , त्यांनी पाक विरोधात काहितरी कठोर भुमिका घ्यावी या मताचे आहोत.

बाकि तुम्ह्लाला काय म्हणायचे आहे या या धाग्याबद्द्ल हे तुम्हि लिहिलेच नाहिये आतापर्यत. फक्त राजकारण करु नका एवढेच लिहित आहात.

तुंम्ही कोण आमंत्रण देणार? अन कोण पडलय राजकारणात .. तुमचंच तर चालु आहे.. धाग्याबद्दलच लिहायला आले होते पण तुमचं हे राजकारणाच पाल्हाळ अन वरचा गंभीर विषय.. लिहिण्याचा मुडच निघुन गेला...

तुंम्ही कोण आमंत्रण देणार? >>> अहो, आमंत्रण दिले नव्हते असेच म्हणले मी. तुम्हि वाचता का नाहि नीट ?

धाग्याबद्दलच लिहायला आले होते पण तुमचं हे राजकारणाच पाल्हाळ अन वरचा गंभीर विषय.. लिहिण्याचा मुडच निघुन गेला... >>>> आया उंट पहाड के नीचे. एवढ्या गंभीर विषयावर............... लिहिण्याचा मुडच निघुन गेला... ??

हे लिहायला मात्र मुड आहे. पण अजुन धाग्यावर जे लिहायचे होते त्याबद्दल एक शब्द नाहि. काड्या टाकायला आला होता हे तर आता कळलेच आहे स्पष्ट.

म्हणजे इंदिरा गांधींची आणीबाणी योग्यच होती म्हणता का ?>>>>>. नाही, तो इंदिरा गांधींचा स्वतंत्र निर्णय होता. पण पी एम म्हणून त्या मला कायम आवडल्या. त्यांच्या खंबीरपणामुळेच अमेरीका नमली होती. पण आता डॉ. मनमोहन सिंग असो वा नरेंद्र मोदी, पाकीस्तानशी प्रकट युद्ध होऊ शकत नाहीये. ते काश्मीर म्हणजे अश्वत्थाम्याची भळभळती जखम आहे. निवडणूकीत कोणी पण भरमसाठ आश्वासने देतात, पण सत्तेवर आल्यावर कळत असावे की खरा नूर काय आहे.
त्यामुळे शिवसेना-भाजपावाले काँग्रेस च्या नावाने बोंबलतात आणी काँग्रेसवाले भाजप-शिवसेनेच्या नावाने. आपले जाणते राजे होते केंद्र सरकारात, त्यांनाही जाणिव आहेच की डायरेक्ट युद्ध पुकारता येत नाही. पण राजकारणी जनतेला येडे बनवुन स्वतः पेढे खातात हे नवीन आहे का?

अगदी अगदी. ह्याच राजकारण्यांची तळी उचलून लागून इथले काही सदस्यही त्या राजकारण्यांच्या जनतेला येडे बनवण्याच्या उद्योगाला हातभार लावतात ह्याला जनता म्हणून माझा आक्षेप आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेत भाषण झालं. काश्मीर प्रश्नाचे निमित्ताने, पाक काडून सातत्याने होत असलेल्या गोळीबाराच्या निमित्ताने ते काही बोलतील, अशी अपेक्षा होती. पण पंतप्रधान म्हणतात काँग्रेसने देशाचे तुकडे पाडले.. नेहरू ऐवजी पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न केंव्हाच सुटला असता.. माझ्याकडून तर पूर्ण स्पीच ऐकल्या गेलं नाही. संसद देश्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आहे कि आरोप प्रत्यारोप करण्यासाठी ? त्यावेळी नेहरू ऐवजी पटेल होऊ शकले नसतील..पण आज तर मोदी पंतप्रधान आहेत.. आज ते परिस्थिती का सुधारत नाही. काँग्रेसने आपल्या विदेश धोरणातून पाकबाबत चुकीचे निर्णय घेतले असतील. मग मोदी यांनी त्यात काय बदल केला? गेल्या ७० वर्षाचं पुराण सत्ताधारी कितीदिवस लावून धरणार आहे. कोणतंही भाषण घ्या त्यात ७० वर्षाचा उद्धार ठरलेलेच असतो. ते लायक नव्हते म्हणून तर जनतेने यांना निवडले ना..
अर्थात विषय राजकारणाचा नाही. पण सीमेवर भारतीय जवान मारल्या जात असताना राष्ट्रप्रमुख विरोधकांवर आरोप करण्यात धन्यता मानत असेल तर राजकीय बोलावंच लागणार आहे. अवघ्या २२ वर्षी कॅप्टन कपिल कुंडू यांना हौतात्म्य पत्करावं लागलं. दोन दिवस कठोर इशार्यांच्या बातम्या आल्या आणि आज पुन्हा राजकारण सुरु झालं.
काय असेल तो शेवटचा क्षण? मृत्यू समोर दिसतोय…पुढच्या काही क्षणात मी या जगात नसणार हे माहित असूनही शत्रूशी दोन हात करण्याची उर्मी कमी होत नाही. आणि देश सेवकांना राजकारणातून उसंत मिळत नाही... याला काय म्हणणार.

दुटाप्पी पण सोडा हो भावना ताइ, अजब काका. दोन्ह तोंडानी बोलु नका .>> बरं का राहुलकाकाका, दोन्ही तोंडाने नव्हे, एकाच तोंडाने दोन्ही बाजूंना बोललोय. आता काहींना एकाच बाजूला बोलल्यावर लय भारी वाटतं त्याला कोण काय करणार? Wink
<<ह्या विषयाचे राजकाराण केल्या बद्दल मोदींना , अमित शहांना आणी भाजपाला टैग करुन त्यांना माफि मागायला सांगा. ते इथे पुरावे म्हणुन दाखवा. नाहितर असल्या पोस्ट टाकुन स्वतःचा दांभिक्पणा दाखवु नका. तुमच्या दांभिकपणाला काहिहि किमत नाहिये.>> मास्तर, आपल्या विरुद्ध मत वाल्यांना दांभिकतेचे सर्टिफिकेट दिल्याबद्दल आभार...त्याच्या किंमतीचं आम्ही बघून घेवू. बाकी तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलत आहात त्यांचाही निषेध करून झाला आहे. सगळ्या पोष्टी पुन्ह्यांदा वाचा. आता तुम्ही सांगाल त्या प्रकारात करुन, टॅग मारून पुरावा दाखवेन...वाटच बघा...अन चालू द्या! Wink

महात्मा गांधीचे म्हणने तर असे होते की भारताने फौजच बाळगू नये.
याच्या समर्थनार्थ काही संदर्भ आहे का तुमच्याकडे?>>> भारताने फॊजच बाळगु नये असा स्पष्ट उल्लेख वाचला नाही. पण नेताजींच्या चरित्रात एके ठिकाणी उल्लेख आहे. एका कार्यक्रमात नेताजी त्यांनी तयार केलेले सैन्य घेऊन गेले. ते हि परेड करत. त्यावेळी गांधीजी कुत्सितपणे हसले होते. आणि हे काय आहे? असे हसत विचारले होते.

< I do believe that where there is only a choice between cowardice and violence I would advise violence. Thus when my eldest son asked me what he should have done, had he been present when I was almost fatally assaulted in 1908, whether he should have run away and seen me killed or whether he should have used his physical force which he could and wanted to use, and defended me, I told him that it was his duty to defend me even by using violence. Hence it was that I took part in the Boer War, the so called Zulu rebellion and the late war. Hence also do I advocate training in arms for those who believe in the method of violence. I would rather have India resort to arms in order to defend her honor than that she should in a cowardly manner become or remain a helpless witness to her own dishonor.

महात्मा गांधी.

>>राज यांना उत्तर द्यायला आलेलो, पण भरत यांनि आधीच प्रतिसाद दिलाय<<
ते उत्तर आहे? माझा अगदि सुरुवातीचा प्रतिसाद परत एकदा वाचुन स्वतःलाच हा प्रश्न विचारा - (फक्त) तुमच्यावरच का घेताय? Happy

>>भारताने फॊजच बाळगु नये असा स्पष्ट उल्लेख वाचला नाही.<<
बाळगु नये असा शब्दप्रयोग नाहि; दि स्मॉलेस्ट आर्मि इमॅजिनेबल असे काहिसे शब्द होते गांधींचे गोलमेज परिषदेच्या वेळेस...

आणि आता शेवटी, धागाकर्त्यांचीच भुमिका बदलुन त्यांनी या धाग्यावर राजकिय धुळवड करायला संमती दिलेली अस्ल्याने मी यापुढे वाचनमात्र...

स्मीलेस्ट इमॅजिनेबल आर्मी हे गांधी 'मी ज्यासाठी प्रयत्न करतोय' अशा भारतासंदर्भात आहे. गांधींवर लिहिणार्‍यांनी तो परिच्छेद गांधींच्या स्वप्नातला भारत असा घेतलाय -
त्या फ्रेजच्या आधी भारताचे सगळ्या देशांशी संबंध शांततेचे असतील असंही म्हटलंय - Since we shall be at peace with all the rest of the world neither exploiting nor being exploited, we should have the smallest army imaginable

काश्मीरमध्ये अजून तुम्ही लष्कर का उतरवलेलं नाही असं गांधींनी नेहरू-पटेलांना विचारलेलं.

एकाच तोंडाने दोन्ही बाजूंना बोललोय. >>>> त्यालाच दोन्हि तोंडाने बोलणे म्हणतात. तुम्हि आता कबुलच केले आहे की तुम्हि दुतोंडी आहात तर कामच झाले.
बाकी तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलत आहात त्यांचाही निषेध करून झाला आहे >>>> म्हणजे तुम्हि राजकारण करत आहात की!

आता तुम्ही सांगाल त्या प्रकारात करुन, टॅग मारून पुरावा दाखवेन...वाटच बघा. >>> वाटच बघतोय . फक्त पळूण जाउ नका .

एकाच तोंडाने दोन्ही बाजूंना बोललोय. >>>> त्यालाच दोन्हि तोंडाने बोलणे म्हणतात. तुम्हि आता कबुलच केले आहे की तुम्हि दुतोंडी आहात तर कामच झाले.>>> असेच अज्ञानात सुखी रहा. Happy
बाकी तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलत आहात त्यांचाही निषेध करून झाला आहे >>>> म्हणजे तुम्हि राजकारण करत आहात की! >>> म्हणजे तुमचा उद्देश सफलच झाला म्हणायच तर!
आता तुम्ही सांगाल त्या प्रकारात करुन, टॅग मारून पुरावा दाखवेन...वाटच बघा. >>> वाटच बघतोय . फक्त पळूण जाउ नका .>>> नाय जाणार...तुमी वाट बघा! Wink

>>‘Home Rule without military power was useless'

हे गांधीजींच्या संदर्भात वाचलेलं आठवतं

नाय जाणार...तुमी वाट बघा! >>> अजुनहि वाटच बघतोय. ते अशी ही बनवाबनवी मध्ये सुधीर जोशी वाट बघतच बसले होते. तसे होणार याची खात्री आहे.

Pages