
'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं'!
'जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं' या आनंद चित्रपटातील संवादाने एकेकाळी चित्रपटरसिकांच्या मनाचा ठाव घेतला होता. आज, संपूर्ण देश पुन्हा या वाक्याने गहिवरून गेला आहे. पाकिस्तानी गोळीबारात शाहिद झालेल्या २२ वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांनी फेसबुकवर 'लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीईंग लाँग' या आशयाचे स्टेटस ठेवले होते. या स्टेटसप्रमाणेच शहीद कुंडू जगले. माणूस किती दिवस जगला, यापेक्षा तो कसा जगला, याला जास्त महत्व असते. सत्तर ऐंशी वर्षाचं आयुष्य जागूनही काहींना जीवनाचा अर्थ सापडत नाही, तर काही मोजक्या दिवसातच आयुष्याचं सोनं करून जातात. मातृभूमीच्या रक्षणासाठी अवघ्या २२ व्या वर्षी हौतात्म्य पत्करलेल्या कॅप्टन कुंडू यांनी देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचा वादा पूर्ण करत आपलं जीवन सार्थकी लावलं. या देशाच्या रक्षणासाठी तळहातावर शिर घेऊन मृत्यूला सामोरे जाणारे असे हजारो जवान आपल्या शरीराची ढाल करून सीमेवर उभे आहेत. त्यामुळेच देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. त्यांच्या शौर्य त्यागाच्या स्मृती प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमच्या कोरल्या जातील. मात्र, त्यांचे बलिदानचं काय? भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतीय सेनेचे वीर जवान आपल्या छातीवर गोळ्या झेलत मातृभूमीचे रक्षण करत आहेत. त्यांनी पाकिस्थानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ दिले नाहीत, आणि यापुढे ही ते होणार नाहीत. कारण सीमेपलीकडून होणाऱ्या आक्रमणाचे निर्दालन करण्याची क्षमता भारतीय लष्कारात आहे. परंतु पाकने भारताविरोधी पुकारलेल्या छुप्प्या युद्धात आणखी किती जिगरबाज जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागणार आहे? किती काळ आपण धडा शिकवण्याची भाषा करत श्रद्धांजलीचे शाब्दिक हार चढवून आश्रू ढाळणार आहोत ? यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तान संदर्भात मत मांडताना ‘कुत्र्याचे शेपूट’ या वाक्प्रचाराचा वारंवार वापर केला जातो. कारण एखाद्याचा स्वभाव कितीही प्रयत्न केले तरी बदलत नाही.तुम्ही कितीही चांगले वागा, तो मात्र आपले वागणे बदलायला तयार नसतो, अगदी 'कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच' या म्हणीप्रमाणे. पाकच्या बाबतीतही सुरवातीपासून असाच अनुभव आलेला आहे. एक दोनदा नाही तर शेकडो वेळा विविध आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्थानने भारतविरोधी कुरापती थांबविल्या नाहीत. समोरासमोरच्या युध्दात विजय मिळवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर या देशाने दहशतवादाचा सहारा घेतला. सीमेववर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय जवानांनवर गोळीबार करण्याचे सत्र आरंभिले. रविवारी अश्याच एका घटनेत भारताचे चार जवान शाहिद झाले. राजौरी जिह्यातील भिंबर गली सेक्टरमध्ये रविवारी पाकिस्तानी रेंजर्सने क्षेपणास्त्रांचा मारा करीत गोळीबार केला. यामध्ये कॅप्टन कुंडू, रायफलमॅन रामावतार, शुभमसिंग, हावलदार रोशन यांना वीरमरण आले. पाकिस्तानसाठी शस्त्रसंधीचे उल्लंघन ही काही नवी बाब नाही. अशी आगळीक हा देश सतत करीत असतो. कुठल्याही प्रश्नाच उत्तर शांततेच्या मार्गाने सोडवायची आपली पद्दत आहे. 'कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं', या म्हणीप्रमाणे भारताने कधीच आगळीक केली नाही. परंतु पाणी आता डोक्यावरून जायला लागले आहे. त्यामुळे किमान दगड तरी भिरकावला गेला पाहिजे. सरकार म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेला सर्वच निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतात.. प्रत्येक निर्णयांच्या दूरगामी परिणामांचा विचार सरकारला करावा लागत असतो..अंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि जागतिक नियमांचेही संकेत सरकारला पाळावे लागतात. त्यामुळे भावनेच्या भरात एखादा अरेरावीची निर्णय सरकारला घेता येणार नाही, हे मान्य. परंतु सीमेवर पाक सैनिक नेहमी आगळीक करत असतील तर आपल्याही लष्कराला दोन पाऊले पुढे जाऊ द्यायला काय हरकत आहे. गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकला चांगलाच जरब बसला होता. भारत यापुढे पाकिस्थानची आगळीक सहन करणार नाही, असा संदेश यातून दिला गेला. मात्र आता अशा कारवाईचं सातत्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने भारताविरोधात एक प्रकारचे युद्धच पुकारले आहे. त्यामुळे, त्याला जश्यास तसे उत्तर देणे गरजेचे आहे.
समोरून वार करणार्याची छाती चिरता येते, मात्र पाठीमागून वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. पाकिस्तान भारताशी समोरून कधीच युद्ध करणार नाही.. त्याचे परिणाम त्याने तीन वेळा भोगले आहेत. त्यामुळे अशी चूक तो चौथ्यादा करेल असे वाटत नाही. आणि राहिला प्रश्न अणुयुद्धाचा तर या निव्वळ पोकळ गर्जना आहेत. पाकिस्तानची या धरतीवर शाबूत राहण्याची इच्छा संपल्यावरच ते असा निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे, दहशतवादी कारवाया आणि छुपे युद्ध, याच मार्गाने पाक भारताला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ज्या ज्या वेळी शांततेसाठी पाऊल उचलले, त्या त्या वेळी पाकिस्तानने भारताच्या प्रयत्नांना हरताळ फसला. अटलबिहारींची लाहोर यात्रा असो, की नरेंद्र मोदींची पाकिस्तानची भेट.. पाकला प्रेमाची भाषा समजत नाही, हा अनुभव प्रत्येकवेळी आला आहे. आजवर पाकशी झालेल्या असंख्य चर्चांपैकी एकाही चर्चेची फलनिष्पती समोर आली नाही. मग असल्या वांझोट्या चर्चा करण्याचा काय फायदा ? भारताने चर्चा, तर पाकने मात्र आक्रमणे करत रहायची, याला काय अर्थ आहे. पाकसोबत प्रत्यक्ष युद्ध सुरु नसले तरी दररोज भारतीय जवानांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागत आहे. भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास भारतमातेचे पुत्र कायम तत्पर असतात. पण, हे चालणार तरी किती दिवस? भारत द्वेषाने वाकडी झालेली पाक ची शेपूट काहीही केलं तरी सरळ होणार नसेल तर ती शेपूट ठेचायलाच हवी..!!!
तेव्हा सुरुवात ज्यांनी केली
तेव्हा सुरुवात ज्यांनी केली त्यांना कोणी उपदेश पाजत नाही. त्यांना फटके पडले की तुमच्यासारखे छुपे तटस्थ लगेच नका रे भांडू>>>>>
म्हंटलेले ना ऋन्मेष ह्या धाग्यांवर, स्वच्छ ब्रिगेड येऊन ओरड सुरू करेल
तसेही विषय सुरू करणाऱ्याला फटके पडून उपयोग नाहीच आहे, त्यांचे जन्म मृत्यूचे चक्र चालूच असते
तेव्हा सुरुवात ज्यांनी केली
तेव्हा सुरुवात ज्यांनी केली त्यांना कोणी उपदेश पाजत नाही. त्यांना फटके पडले की तुमच्यासारखे छुपे तटस्थ लगेच नका रे भांडू म्हणून साटंलोटं करायला येऊन विरोधी बाजूलाच गिल्टी फिल करायला लावतात. इ ना चॉलबे.>>> माझ्या वरच्या प्रतिसादातच मी सुरवात करणार्यालाही दोष दिलाय तरी विरोधी बाजूलाच का बरं गिल्टी वाटायलंय?
माझ्या लेखी सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय घेवून त्याचा ५६ इंच छाती म्हणून डंका पिटणारे व त्याची सत्यासत्यता पहा बरं म्हणून टवाळी करणारे सारखेच.
बाकी इतर विषयांवरील राजकीय झोडपाझोडपी वाचताना कधीकधी करमणूक होते, पण या गंभीर विषयावर ती होणार नाही अशी अपेक्षा होती, परंतू पहिल्याच प्रतिसादात ती मावळली. इथलं वाचनकार्य शहीदांना नमन करुन संपवतो. बाकी वादविवाद लगे रहो!
>>इथलं वाचनकार्य शहीदांना नमन
>>इथलं वाचनकार्य शहीदांना नमन करुन संपवतो. <<
इथे हल्ली ते हि दबकुन करायला लागावं अशी परिस्थिती झालेली आहे. इथ्लं काहि पब्लिक एव्हढं ब्रेन्वॉश्ड झालेलं आहे कि तुमच्या वाक्यातुन त्यांच्या सोयीचा काय अर्थ काढत बसतील हे सांगताहि येणार नाहि.
एक बावीशीतला तरुण शहिद झालेला आहे लोकहो - जरा जनाची नाहि तर मनाची तरी लाज बाळगा...
लाज? हम्म. तुम्ही बाळगली का?
लाज? हम्म. तुम्ही बाळगली का?
लेखी सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय
लेखी सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय घेवून त्याचा ५६ इंच छाती म्हणून डंका पिटणारे व त्याची सत्यासत्यता पहा बरं म्हणून टवाळी करणारे सारखेच.>>>>>
पुरावे मागण्याचे कारण सरकार ने आधी पसरवलेल्या खोट्या बातम्या होत्या हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात.
>>>> बावीशीतला तरुण शहिद झालेला आहे लोकहो - जरा जनाची नाहि तर मनाची तरी लाज बाळगा>>>>
राज ,कोणताही जवान शहीद होणे ही दु:खाचीच गोष्ट आहे,
मात्र मागच्या राजवटीत त्याबद्दल सरकारला दोष दिलेला चालतो (म्हणजे तुम्हीच चालावून घेता) आणि या राजवटीत तसा दिला की तो बेशर्मपणा होतो हे चुकीचे आहे ना?
रच्याक,
"लोक सैन्यात मरण्या साठीच जातात" असे दिव्य स्टेटमेंट एका मंत्र्यांनी केले होते, त्या बद्दल अड्ड्यावर बरेच बोलणेही झाले होते, तुम्ही कदाचित बिझी असाल तेव्हा, दिसला नाहीत
पुरावे मागण्याचे कारण सरकार
पुरावे मागण्याचे कारण सरकार ने आधी पसरवलेल्या खोट्या बातम्या होत्या हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात.>> हो अगदी मान्य, म्हणूनच तर दोन्ही बाजू पटत नाहियेत. बाकी ते लोक सैन्यात मरण्यासाठी जातात म्हणणारे लोक्स तर सैन्याच्या जीपपुढे बांधून 'देशनिकाला' करण्याच्या लायकीचे आहेत.
दारूने कित्येक लोकं मरतात.
दारूने कित्येक लोकं मरतात. घरंदारं उध्वस्त होतात. पण तो एक व्यवसाय आहे आणि तो चालणे देशाची, सरकारची गरज आहे. म्हणून चालतच राहणार..
भारत पाक शत्रुत्व आणि चकमकी यात दोन्हीकडचे कित्येक जवान मरतात. मरत राहणार. पण हे असेच चालू राहणार. कारण ही दोन्ही देशांची आणि सरकारची गरज आहे. नाईलाज आहे.
जे यात शहीद होतात त्यांच्या देशप्रेमाला सलाम !
पण लोकं नाहक मरत आहेत. मरत राहणार. मग कुठलेही सरकार येवो.
त्यातल्या त्यात चांगले सरकार तेच जे आपले कमीत कमी जवान मारले जातील हे बघतील.
यात तुम्ही त्यांचे किती मारता या आकड्याला काही अर्थ नाही. कारण त्यांचे चार मारल्यावर तुमचे दोन जिवंत होत नाहीत. उलट चिडून त्यांनी आणखी दोन मारले तर ते नुकसानच.
म्हणून देश वाचवा. जवान वाचवा. मुत्सद्दीपणा दाखवा.
सिम्बा - मी अड्ड्याचा नियमीत
सिम्बा - मी अड्ड्याचा नियमीत वाचक नाहि, देर्फोर तुमचं ते "व्हॉटबौटरी" आर्ग्युमेंट माझ्या बाबतीत इंप्लॉजिबल आहे. आणि हो, सगळ्या भांडणांचा बेस कुठलंतरी "व्हाटबौटरी" आर्ग्युमेंट असतं, हे तुमच्या लक्षात येतंय का???
इतर धाग्यांवर विनाकारण राजकारण आणुन काय गदारोळ माजवला जातो, याची कल्पना आहे मला. पण तो गोंधळ इथे या धाग्यावर नको इतपत तरी सारासार विचार केला जावा, एव्हढिच अपेक्षा होती माझी. पटतंय का बघा, नाहितर सोडुन ध्या...
<इतर धाग्यांवर विनाकारण
<इतर धाग्यांवर विनाकारण राजकारण आणुन काय गदारोळ माजवला जातो, याची कल्पना आहे मला. पण तो गोंधळ इथे या धाग्यावर नको इतपत तरी सारासार विचार केला जावा, एव्हढिच अपेक्षा होती माझी. पटतंय का बघा, नाहितर सोडुन ध्या...>
धाग्यावरचा पहिलाच प्रतिसाद आपल्या सोयीचा असल्याने त्यात असलेलं पक्षीय राजकारण खपतंय.
सध्याचे सत्ताधारी विरोधात असताना सैनिकांच्या मृत्यूवरून राजकारण करीत , तेही खपतं.
सध्याचे पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांत, तुमच्या राज्यातल्या सैनिकांवर काश्मीरमध्ये दगडफेक केली जाते असं म्हणतात, ते तर अगदीच चालतं.
राजकारण करू नका हा डोस फक्त आपल्यापेक्षा वेगळ्या मताच्या लोकांसाठी असतो.
दोन्ही सरकार ह्या बाबत अपयशी
दोन्ही सरकार ह्या बाबत अपयशी ठरले आहेत.कोणाकडेही ह्याचे सोल्युशन नाही.उलट आकडेवारी बघता भाजप सरकार आल्यावर जास्त जवान मेले आहेत आणि समोरून हल्ले कमी झालेले नाहीत.
मी मध्ये वाचले कि कश्मीरचे बॉर्डर लगट चे लोक आम्हाला दुसरी जागा द्या म्हणजे गोळीबार होताना आम्ही तिथे जाऊ असे म्हणत होती.सरकार त्यांना भिंत बांधून देऊ असं काही तरी म्हणत होती पण त्यांचे म्हणणे होते त्याने हवे तितके प्रोटेक्शन मिळणार नाही तेंव्हा दुसरी जागा द्या आतल्या बाजूला, बॉर्डरहुन जरा आतल्या बाजूला.नीटसे समजले नाही पण ते लोक कोणत्या परिस्तिथीतून जात असावेत ह्याचा विचार केला की अंगावर काटा येतो तसेच बरेच जवानही शहीद होत आहेत. रेस्पेक्ट तर आहेच पण त्यांचा शहीद होण्याचा नंबर वाढतो आहे.भाजप सरकार कडे काही लॉंग टर्म व्हिजन किंवा strategy आहे की trial and error सुरु आहे.
मी मध्ये वाचले की ह्याचे एकच सोल्युशन आहे की जी LOC आहे त्याला ऑफिशीयल बॉर्डर डीक्लेर करणे.अशी एखादी diplomatic संधी चालून आली पाहिजे.तरच सोल्युशन निघू शकेल.दुसरे हे होऊ शकेल की काश्मीरच्या जनतेने भारताला ऑल आऊट सपोर्ट करणे हे होणे शक्य नाही for several reasons. त्यामुळे तूर्तास तरी हे असेच सुरु राहणार असे दिसते आहे.
राज यांना उत्तर द्यायला आलेलो
राज यांना उत्तर द्यायला आलेलो, पण भरत यांनि आधीच प्रतिसाद दिलाय, सो माझा प्लॅन कॅन्सल.
जाता जाता,
या धाग्यावर राजकारण चालू झालंय म्हणून उगाच त्रागा करण्या ऐवजी, या धाग्यावर राजकारण चालू करणारा पहिला प्रतिसाददाता आणि बाहेरच्या स्पेस मध्ये सरकारला जबाबदार धरण्याचा ट्रेंड चालू करणारे मोदी यांचा स्पष्ट शब्दात निषेध करा.
That will drive the message home straight
माझ्या मते तरी हा विषय
माझ्या मते तरी हा विषय अजिबातच राजकारण करण्यालायक नाही. त्यामुळे सुरवात करणारा व त्याला चघळून चघळून शेवट करणारा सगळेच सारखे. हे मा वै म. >>>>
ह्या विषयाचे राजकाराण केल्या बद्दल मोदींना , अमित शहांना आणी भाजपाला टैग करुन त्यांना माफि मागायला सांगा. ते इथे पुरावे म्हणुन दाखवा. नाहितर असल्या पोस्ट टाकुन स्वतःचा दांभिक्पणा दाखवु नका. तुमच्या दांभिकपणाला काहिहि किमत नाहिये.
दुसरे एक के बदले दस सर हे जे म्हणाले होते त्यांना जाब विचारा तुम्हाला जर खरेच शहिदांच्या बलिदानचे वाइट वातत असेल तर.
राजकारण कस्ले त्यात ! सरकारला जर जमत नाहिये तर त्यांना जाब विचारण्यात कसले राजकारण ! ते तर कर्त्यव्य आहे नागरिकांचे.
दुटाप्पी पण सोडा हो भावना ताइ, अजब काका. दोन्ह तोंडानी बोलु नका .
राहुलका, मला अजिबात त्या
राहुलका, मला अजिबात त्या राजकरणात रस नाहि.. अन इथे कुठे तोंडाने बोलणार कोण? इथे तर टायपणार ना? अन कुणालाहि मी दोन तोंड बघितली नाहित सगळ्यांची तोंड दिसतात पण ते एकच असते.. दुट्टप्पीपणा काय असतो? अन तो कसा केला जातो?
परवा तो २२ वर्षांचा पोर आपला जवान फुकाफुकी मारला गेला अन त्याच्या तोंडच ते वाक्य पाहुन मी इथे वाचायला आले.. वाचुन झाल्यावर प्रतिसाद वाचतेय तर इतर धाग्यांवर जो गदारोळ असतो तोच राजकरणाचा.. जो गेला अन कश्यासाठी गेला त्यासाठी एक शब्द नाहि अन यांच गलिच्च राजकरण इथे चालु.. पहिला प्रतिसाद पाहिला का? हे विचारणार वर.. अरे दुसर्यांचे प्रतिसाद कश्याला तपासता तुमचेहि तेच आहेत ना? इतकच आहे तर राजकरणात सक्रिय व्हा अन घाला गोंधळ इथे किबोर्ड बडवत बसु नका.
<इतकच आहे तर राजकरणात सक्रिय
<इतकच आहे तर राजकरणात सक्रिय व्हा अन घाला गोंधळ इथे किबोर्ड बडवत बसु नका.>
आँ? आता कीबोर्ड बडवूनही राजकारण केलं जातं. जमाना बदल गया है| प्रत्येक गोष्टीसाठी सभा, व्यासपीठ, रस्त्यावर उतरणं याची गरज नसते. मायबोलीवर "राजकारण- भारतात" हा ग्रुप आहे.
शिवाय मला कुठल्याच राजकारणात रस नाही, असं म्हणताना तुम्ही एकाच सभासदाचं नाव घेऊन निषेध करता, ते पटत नाही.
आता काही लेखक आपलं प्रत्येक लेखन मायबोलीचे ग्रुप्स लक्षात न घेता, ललित लेखनात ओततात ; हा त्यांचा दोष आहे. ललित लेखन म्हणजे काय हे त्यांनी समजून घ्यायला हवं.
चर्चा तर होणारच ना?
भरत एकाच सभासदाच नाव घेतलं
भरत एकाच सभासदाच नाव घेतलं कारण तोहि नावाने उद्देशुन बोलतोय ना? तुंम्हाला काय पटतय्/पटत नाहि हे मी कश्याला पाहु? माझं म्हणन एकच होतं कि ह्या आयडिने हा जो लेख एका शुरासाठी लिहिलाय त्यावर लिहा कश्याला उगाच त्यातहि राजकरण?
{तुम्ही त्यांचे किती मारता या
{तुम्ही त्यांचे किती मारता या आकड्याला काही अर्थ नाही. कारण त्यांचे चार मारल्यावर तुमचे दोन जिवंत होत नाहीत. उलट चिडून त्यांनी आणखी दोन मारले तर ते नुकसानच.
म्हणून देश वाचवा. जवान वाचवा. मुत्सद्दीपणा दाखवा}
ऋन्मेषच्या या मताशी सहमत!!
{गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकला चांगलाच जरब बसला होता. भारत यापुढे पाकिस्थानची आगळीक सहन करणार नाही, असा संदेश यातून दिला गेला}
कसली जरब आणि कसलं काय. त्या सर्जिकल स्ट्राईक नंतर उलट दहशतवादी हल्ले वाढले, त्याची आकडेवरी वर कुणीतरी दिलेलीच आहे.
मुठभर लोकांच्या ईगो आणि उन्मादासाठी जास्त जवानांचे प्राण धोक्यात घातले जाउ नयेत.
इतकच आहे तर राजकरणात सक्रिय
इतकच आहे तर राजकरणात सक्रिय व्हा अन घाला गोंधळ इथे किबोर्ड बडवत बसु नका. >>> ओ तुम्हि आधी मोदींचा निषेध करा. मग या इथे. टंकायला .
परवा तो २२ वर्षांचा पोर आपला जवान फुकाफुकी मारला गेला अन त्याच्या तोंडच ते वाक्य पाहुन मी इथे वाचायला आले >>> मग विचारा ना जाब सरकारला का नाहि सरकार एक के बदले १० सर आणत म्हणुन. राजकारण करु नका म्हणुन माबो वर सल्ले कसले देताय!
जो गेला अन कश्यासाठी गेला त्यासाठी एक शब्द नाहि अन यांच गलिच्च राजकरण इथे चालु.. >>>> जो गेला तो देशासाठी गेला, देशाचे संरक्षण करण्यासाठी गेला. तुम्हाला कळत नसेल तर आता समजावुन घ्या.
आणी आज परत दोन जवान गेले आहेत.
आता तुम्हिह्च सांगा, सरकारने पाकड्यांना धडा शिकवावा हे न म्हनता काय म्हनायला पाहिजे हो ? मोदींनी बिर्याणी खायला जा म्हणुन सांगायचे का ?
तुम्हि आधी गलिच्च राजकरण इथे चालु केले आहे मोदींना पाठींबा देउन. तुम्हाला लाज वाटली पाहिजे ताइ, तिकदे जवान शहिद होत आहेत आणी तुम्हि सांगता आहात सरकारला जाब विचार नका ? काय मानसिकता आहे तुमची ! केवळ लज्जास्पद !
तेव्हा मोदींना सगळिकडे पाठींबा देण्याच घाण राजकारण बंद करा आणी तुम्ह्लाला सरकारला जाब विचारता नसेल तर दुसर्यांना थोपवुन नीच राजकारण तरी करु नका.
राहुलका , लाज काढायचे कारण
राहुलका , लाज काढायचे कारण नाहि मी कोणतहि राजकरण केलं नाहिय.. जे करताय ते तुंम्हीच अन मी कुणाचा निषेध करायचा न कुणाचा नाहि हे सांगणारे तुंम्ही कोण? इथे किबोर्ड बडवुन कसला सरकारला जाब विचारता आहात... लिहा ना सरळ जावुन मग सरकारला..
मी कुणाला सल्ला देणारी सल्लागार नाहिय... ते काम तुंम्हीच करताय मोदिंचा निषेध करायला सांगुन
मुठभर लोकांच्या ईगो आणि
मुठभर लोकांच्या ईगो आणि उन्मादासाठी जास्त जवानांचे प्राण धोक्यात घातले जाउ नयेत.
नवीन Submitted by व्यत्यय on 7 February, 2018 - 10:56
<<
अगदी सहमत !
महात्मा गांधीचे म्हणने तर असे होते की भारताने फौजच बाळगू नये.
आता सरकारने तीन्ही सैन्य दले बरखास्त करुन देशाच्या संरक्षणाची कमान, भारतातल्या पुरोगामी, निधर्मांध व विचारवंताच्या हातात द्यावी मग बघा एका तरी पाकिस्तान्याची हिम्मत होते का भारतात घूसखोरी करायची.
किती खोटे बोलाल?
किती खोटे बोलाल?
राहुलका , लाज काढायचे कारण
राहुलका , लाज काढायचे कारण नाहि मी कोणतहि राजकरण केलं नाहिय.. >>>> तुम्हि मोदींना सगळिकडे पाठींबा देण्याच राजकारण्च करता आहात. तुम्हि मी राजकारन करत नाहि असे सर्टिफिकेट तुम्हि स्वतालाच देणार ? वा वा!
ते काम तुंम्हीच करताय मोदिंचा निषेध करायला सांगुन >>>> तेच तर मी करतोय . मग तुम्हि एवढा वेळ का चिडला होता बुवा ?
मी कुणाला सल्ला देणारी सल्लागार नाहिय... इथे किबोर्ड बडवुन कसला सरकारला जाब विचारता आहात... लिहा ना सरळ जावुन मग सरकारला.. >>>>>
तेव्हा पहिल्यांदा तुमच्या विचारातील विसंगती वर काम करा ताइ. राजकारण वगैरे विषय फार पुढचे आहेत. नंतर त्यावर चर्चा करु आपण
>>महात्मा गांधीचे म्हणने तर
>>महात्मा गांधीचे म्हणने तर असे होते की भारताने फौजच बाळगू नये.
याच्या समर्थनार्थ काही संदर्भ आहे का तुमच्याकडे?
महात्मा गांधीचे म्हणने तर असे
महात्मा गांधीचे म्हणने तर असे होते की भारताने फौजच बाळगू नये. >>> त्यांचे म्हणने होते की त्या एवजी आरेसेस च्या शुर लोकांना सीमेवर पाठवा जे २०१४ च्या आधी गल्लिछ राजकारण करत होते.
हेच काम येत वाटतं राहुलका
हेच काम येत वाटतं राहुलका यांना उलटसुलट लिहिण्याचं... राजकरणाचा माझा विषयच नाहि किती वेळा लिहु? तरीहि तेच लिहितायत.. कुठे वाचला माझा मोदिंना दिलेला पाठींबा? एकाच गोष्टीचा कसला रट्टा मारताय? कोणतीहि चर्चा अन ती तुमच्याशी? काहि गरज नाहि.
मला किनई मोदी किंवा राहुलबाबा
मला किनई मोदी किंवा राहुलबाबा पण नकोयत पी एम म्हणून. सगळे पक्ष घाला चुलीत आणी जनतेचाच कौल ( निवडणूक नको आत्ता पुन्हा ) घेऊन एकच पी एम नेमा. मंत्री मंडळ बरखास्त करुन नाहीतर सगळा देश मिलीटरीच्या ताब्यात द्या एकदाचा. हाणा एकेकाला चांगले फटके. म्हणजे निदान नवीन तरी अनूभव घेता येईल. उगाच इथे बसुन कशाला एकमेकाला शाब्दिक मार देताय?
मिलीटरीच्या ताब्यात देश दिला की शिस्त लागेल. मग येतील ठिकाणावर सगळे. हां नही तो क्यां?
म्हणजे पाकिस्तान बनवायचा की
म्हणजे पाकिस्तान बनवायचा की उत्तर कोरीया?
म्हणजे पाकिस्तान बनवायचा की
म्हणजे पाकिस्तान बनवायचा की उत्तर कोरीया?>>>> का? म्हणजे एवढे माणुसकीहीन आहेत का आपले सैन्यवाले? भारतीय आहोत आपण. अजूनही इतके धर्मांध आणी महत्वाकांक्षी झालेले नाही आहोत.
म्हणजे इंदिरा गांधींची
म्हणजे इंदिरा गांधींची आणीबाणी योग्यच होती म्हणता का ?
अजूनही इतके धर्मांध आणी
अजूनही इतके धर्मांध आणी महत्वाकांक्षी झालेले नाही आहोत.<<
>>>
माणूस कधीच जन्मतः वाईट नसतो.. परस्थिती आणि संस्कार माणसाला चांगलं वाईट बनवत असतात.. आपण नमूद केलं तसं जर देश सैन्याच्या ताब्यात दिला तर एकाहती सत्ता माणसाला हुकूमशहा बनवू शकतो. एक प्रमुख एकाद्यावेळी चांगला निघेल ,पण सगळेच चांगले असतील याची काय शास्वती? माणसाच्या म्हत्वाकांक्षा आणि हाव अमर्याद आहे.. यातून हुकूमशाही चा जन्म होण्याची दाट श्यक्यता वाटते.
एकच पी एम नेमा. मंत्री मंडळ
एकच पी एम नेमा. मंत्री मंडळ बरखास्त करुन <<
>> म्हणजे एकाच माणसाच्या हातात सर्व सत्ता.. ही हुकुम शाही होणार नाही का?
एकंदर गलिच्छ राजकारणाने व्यथित होऊन आपण असे मत मांडले असावे, असे वाटते. मात्र ह्या सूचना प्रत्यक्षात आणण्याचा विचार ही स्वतंत्र आणि लोकशाही ला पोषक नाही.
Pages