शोले (इन ऑफिस)

Submitted by जित on 29 January, 2018 - 00:26

शोले म्हटलं की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. जर चित्रपटांमध्ये राजा ठरवायचा झाला तर शोलेला पर्याय नाही. मध्यंतरी एका मित्राने हैदराबादमधल्या एका शोले थीम हॉटेल बद्दल सांगितले. तिथे म्हणे मॅनेजर गब्बरच्या वेषात असतो. गल्ल्यावर एक ठाकूर पण असतो. आणि वाढपी सगळे वेगवेगळ्या गावकऱ्याच्या वेषात. तेव्हापासून डोक्यात एक विचार होता, की जर एखाद्या ऑफिसमधले लोक, एकमेकांशी शोलेच्या आविर्भावात बोलू लागले तर कशी मजा येईल.
तेच शब्दरूप करायचा एक प्रयत्न.
——-
प्रसंग : प्रॉडक्शनमध्ये बग्स आलेत, क्लायंट उचकलाय, मॅनेजर त्याच्या QA लीडशी बोलतोय
——-
मॅनेजर : अरे ओ सांभा कितने टेस्ट केसेस थे?
QA : दो सरदार
मॅनेजर : हं,टेस्ट केसेस दो और टेस्टर्स तीन. फिरभी बग्स वापीस आए, क्या समझ कर टेस्ट केसेस पास किये थे, के सरदार बहोत खूस होगा, सबासी देगा, धिक्कार है.

——-
प्रसंग : मॅनेजरच्या डोक्यात नवी requirement आलीय, मॅनेजर त्याच्या डेव्हलपरशी बोलतोय. डेव्हलपरचं नाव जय
——-
मॅनेजर : जय
जय : हं
मॅनेजर : आज मैने कुछ सोचा है
जय : हां कभी कभी ये काम भी करना चाहीए (आपला जय अमिताभ नसल्यामुळे मनात, फक्त पहिला हां तेवढा उघडपणे)
मॅनेजर : आज मैने एक बहोत बडा फैसला किया है
जय : (मनात) मै बताऊ तेरा बहोत बड़ा फैसला? (उघडपणे) तू अपने सॉफ्टवेयरमें नया फीचर अॅड करना चाहता है
मॅनेजर : अरे वाह वाह, इसलिए तू मेरा फेवरिट एम्प्लोई है, एक अच्छा एम्प्लोईही मॅनेजरके मन की बात जान सकता है
जय : और ये एम्प्लोई ये भी जानता है की इस महीनेमें अॅड किया हुआ ये पाँचवा नया फीचर है (परत सगळ मनात)
मॅनेजर : ये फाइनल है यार (एम्प्लॉईच्या मनातलं ओळखलं नाही तर तो मॅनेजर कसला)
जय : (मनात) फायनल? साला दारू पिके आय है क्या
मॅनेजर : यार पार्टनर मेरा ये एक काम करवा दे
जय : क्या
मॅनेजर : वोह क्लायंट है ना, उसके अकाउंट मॅनेजर से जाकर ईस नये फीचर की बात कुछ ईस ढंग से कर की क्लायंट हमे प्रोजेक्ट डिलिव्हरीके लिये एक्स्टेंशन दे दे
जय : मै क्यूँ करू, मै तो सिर्फ डेव्हलपर हूँ
मॅनेजर : अरे डेव्हलपरही तो क्लायंट को बता सकता है कितना समय लगेगा नया फीचर बनानेके लिए, और तुम्हारे अलावा ईस टीममे डेव्हलपर है ही कौन!
एकदा मॅनेजरने ठरवलं कि ती काळ्या दगडावरची रेघ हे प्रत्येक एम्प्लॉईला माहीत असल्यामुळे संवाद संपला.

——
प्रसंग : एम्प्लॉयी म्हणजे आपली बसंती Yearly Review साठी मॅनेजरच्या समोर बसली आहे. मॅनेजरशी प्रमोशन बद्दल कसं बोलावं ह्याचा विचार करतेय
——-
बसंती : (मनातले विचार) प्रभू, टीममे ऐसी कोई बात तो है नहीं जो तुमसे छुपी हो. तुम तो सब जानते हो, देखो मै ये नहीं कहती की तुम्हे याद नहीं होगा. लेकिन फिर भी अपनी तरफ से ख देना अच्छा होता है. आज रिव्हयू है, बस एक छोटीसी बिनती है प्रभु. देखो.. जरा देखो, ये कॉम्प्युटर पे कोड लिखते लिखते बिना टेनिस खेले टेनिस एल्बो हो गया है. अरे तुम्हारे लिए क्या मुश्किल है? बस ऐसा प्रमोशन देना के बसंती रानी बन के राज करे इस टिमपे, युंकी मजा आ जाए नौकरी का, बाकी जैसी तुम्हारी इच्छा प्रभू
मॅनेजर : बसंती
बसंती : (चमकून) युंके कौन बोला
मॅनेजर : ये हम बोल रहे है
बसंती : प्रभू, तुम? चमत्कार हो गया (मॅनेजरला आपलं नाव माहीत आहे बघून बसंती एकदम खुश)
मॅनेजर : हमने तुम्हारे लिये प्रमोशन तय कर लिया है, कन्या
बसंती : पहले ही रिव्हयूमे प्रमोशन दीया, वाह प्रभू. युंके तुमने सोचा है तो ठीकही सोचा होगा. लेकिन फिरभी अगर पोझिशन बाता देते.. या फिर इमेलकी राह देखू, जैसा तुम कहो प्रभू
मॅनेजर : पोझिशन का नाम है – टेस्ट लीड
बसंती : टेस्ट लीड? प्रभू ये मेरे करिअरका सवाल है. जल्दीसे काम मत लेना. भलेही एक-दो क्वार्टरली रिव्हयूज और लग जाये.. पोझिशन तो लीड का है, लेकिन बाकी लीड्स जादा होशियारी मारते है
मॅनेजर : चूप रहो कन्या
बसंती : अपने आप को प्रमोट करनेकी आदत तो मुझे है नही, जो तुम्हारी आग्या
मॅनेजर : अगर हमारी आग्या का पालन नाही कीया तो अगले कई साल डेव्हलपर बनी रहोगी
बसंती : हां प्रभू
इथे प्रत्येक एम्प्लॉईसाठी आपला मॅनेजर खरंच भगवान असल्यामुळे संवाद इथेच संपतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय .. आवडलं.. शोलेची पारायणं झाली असल्याने सगळे संवाद त्या चालीत आठवले.. या संवांदावर कोणी फारसे लिहिलेही नसावे