किस्से आणि डायरी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2018 - 09:51

लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडलेच पाहिजे असे गरजेचे नसते.
बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.
हा माझ्या आयुष्याचा फंडा आहे.
हा माझा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन आहे.
त्यामुळे साधेसरळ मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतानाही आयुष्यात रोज काहीतरी हॅपनिंग घडत असते असे मला उगाचच वाटते. जे काही घडते त्यातले बरेच काही लिहावेसेही वाटते. पण असे रोजच एखादा धागा काढून सटरफटर लिहू लागलो तर मायबोलीवरून हकालपट्टी व्हायला फार वेळ लागणार नाही. म्हणून मोह आवरता घेतो Happy

पण मग विचार केला की आयुष्यात जे चुटूरपुटूर घडत असते, जे आपल्याला एखाद्या विषयाचे लेबल लावून स्वतंत्र नवीन धाग्यात लिहिता येत नाही, पण तरीही जे ईतरांशी शेअर करावेसे वाटते. अश्या रोजच्या किस्से कहाण्या घटनांसाठी का नाही वेगळा धागा काढावा..

मग विचार आला की हा धागा आपल्यापुरताच का मर्यादीत ठेवायचा. मायबोलीवर आणखीही असे कैक असतील ज्यांना असे छोटेमोठे किस्से सहजच शेअर करावेसे वाटत असतील. बरेच असेही असतील ज्यांना लिहायची ईच्छा असेल मात्र संकोचामुळे ते नवीन धागा काढू शकत नसतील. तर अश्या सर्वांच्या सर्वच पोस्टना सामावायला हा धागा. जिथे विषय आणि लांबीचे जराही बंधन नाही.

रोजच्यापेक्षा आयुष्यात काही वेगळे घडले. एखाद्या घटनेकडे पाहून काही वेगळे वाटले, काही मौलिक वा सर्वसामान्य विचार मनात आले, तर ते ईथे बिनधास्त मांडा.
जर दुसर्‍या कोणाचा किस्सा वाचून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील साधारण तसाच किस्सा आठवला तर तो जरूर शेअर करा.
लक्षात ठेवा, आजच्या तारखेला धागाकर्त्याचे मायबोलीवर ८० + चाहते आहेत. त्यामुळे आपली ईथे पडणारी पोस्ट साधारण ८० वाचकांपर्यंत पोहोचेल या विश्वासाने बिनधास्त लिहा Happy

सुरुवात मी करतो ........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या शुक्रवारचाच किस्सा. ऑफिसमध्ये नेहमीसारखा सकाळचा चहा झाला आणि मी हलके व्हायला वॉशरूममध्ये शिरलो. छोटीशी वॉशरूम. एक युरीनल आणि एक ईंग्लिश कमोड. एकावेळी एकानेच आत जायचे आणि आतून कडी लावून घ्यायची. मी तसेच केले. आणि पुढच्या कामाला सुरुवात करणार तोच कमोडच्या वर भिंतीवर काहीतरी सळसळताना दिसले. काहीतरी नाही, पालच! ऑफिसमध्ये पाल. मी शॉकमध्ये. तसे माझे कान, नाक, डोळे सारे ईंद्रिय कुचकामी आहेत असे माझे घरच्यांचे ठाम मत आहे. कारण मी कधीही पहिल्या हाकेला ओ देत नाही, कधी काही विचारले तर पटकन उत्तर देत नाही, आणि घरात कुठलीही वस्तू शोधताना मला ती वेळेवर सापडत नाही. पण पाल मात्र घराच्या कुठल्याही भिंती वा कोपर्‍यात का असेना, माझ्या नजरेस पडतेच. आजही पहिल्याच फटक्यात दिसली. याला दुर्दैवच म्हणावे लागेल. अन्यथा, जर ती मला दिसलीच नसती, तर मी आरामात खाली बसून माझे काम उरकले असते आणि ती वर आपला कोळीडान्स करत राहीली असती. जे मला समजलेही नसते. पण एकदा समजले की खेळ संपतो. भितीने तुमच्या मनाचा ताबा घेतला की पालीचा डायनॉसोर बनतो. आता या अवस्थेत मी डोक्यावर टांगती पाल घेऊन बसू शकत नव्हतो. बरे ऑफिसमध्ये अजूनही बरेच वॉशरूम आहेत. आमच्या फ्लोअरवरच विविध आकारमानाचे चार आहेत. पण जे लोकं रोज किमान एकदातरी ऑफिसला पावन करतात त्यांनाच ठाऊक असेल की खरी मजा आपल्या फेव्हरेट जागीच येते.

मग म्हटलं हाकलूया हिला, किंवा थेट मारूया. तसेही मिडीयम साईज होती. मिडीयम साईज पाल म्हणजे ८ ते १२ सेंटीमीटर. आधी बूट काढून मारायचा विचार केला. पण चुकून नको तिथे पडला असता तर गडबड झाली असती. मग आजूबाजूला पाहिले, तर वॉशरूम धुवापुसायची फडकेवाली काठी नजरेस पडली. एका टोकाला फडके लटकत होते. मधोमध धरली आणि फडक्याच्या विरुद्ध बाजूने नेम धरून फटका मारला. पण दुसर्‍या साईडने फडक्याचे वजन जास्त असल्याने अंदाज चुकला. नेम चुकला. जे पाल मारताना तसेही पहिल्या फटक्याबाबत नेहमी होतेच. जणू "पहिला फटका तुला कधीच वर्मी बसणार नाही" असा आशिर्वाद मिळवूनच या पाली भूतलावर अवतरल्या असतात.

तर फटका चुकला. पाल सावध झाली आणि पळाली. खाली टिश्यू पेपरच्या डब्यामागे गेली. या पाली नेहमी अश्या अडगळीतच कश्या जातात हे कमाल कोडे आहे. हुशार प्राणी. मग नेहमीसारखा खाटखूट आवाज केला. ती बाहेर आली नाही. अशी येणारही नव्हती. बस्स मनाचे समाधान केले. पण त्यामुळे आता केराची टोपली हलवून तिला उघड्यावर आणने भाग होते. हात कुठे लावणार त्या टोपलीला म्हणून काठी आत टाकून स्वत:कडे खेचले. तसे त्यावर ओवरटर्निंग मोमेंट अ‍ॅक्ट होत टोपली कलंडली. आतले सारे वापरलेले टिश्यू बाहेर सांडले. कर्म माझे. कोणी मला इंजिनीअर केले. कधी कधी हा प्रश्नच पडतो मला. पण एक चांगले झाले. पाल उघड्यावर आली. पण पुन्हा मारायला काठी जवळ नेताच सरसर पुन्हा वर चढली. तिच्या पहिल्या हालचालीलाच मी चार फूट मागे उडालो. आता ती पुन्हा वर. आणि मला पुन्हा एक सावचितपणे फटका मारायचा चान्स. पण यावेळी ती सावध. पुन्हा एक चुकीचा फटका आणि पुन्हा ती सळसळत कमोडच्या मागे.

एव्हाना दहा मिनिटे झाली होती. कोणीतरी मला आत वॉशरूममध्ये जाताना पाहिले असणार. कोणीतरी स्टॉपवॉच चालू केला असणार. पोरं हलकट आहेत आमच्या ऑफिसातील. प्रत्येकाचा ‘आतला हिशोब’ ठेवतात. मी पंधरा मिनिटे पालीवरच खर्च करून आणखी माझी सवयीची पंधरा मिनिटे बसलो तर उद्या ‘अर्धा तास ऋन्मेष’ म्हणून माझ्या नावाचा बोभाटा झाला असता. पण आता मनुष्य असल्याचा अहंकार उफाळून आला होता. आता हिला चेचायचंच. आता नो सेकंड चान्स म्हणत एक दोन तीन, जिथे ती पळेल तिथे नुसते फटके मारत सुटलो आणि पळता पळता तिचा वेग मंदावून ती खाली पडली. घाव वर्मी बसला असणार हे मी समजलो. ‘मरे हुए को क्या मारना’ असा फिल्मी विचार न करता आणखी दहाबारा फटके मारून तिच्या प्रेताचे धिंदवडे काढले आणि एक नवाकोरा टिश्यू घेऊन तिचे पार्थिव उचलून फ्लश करून टाकले.

खेळ खल्लास.. किस्सा खल्लास !
पण पालीच्या मर्डरनंतर नेहमीच अशी स्थिती नसते. आसपास अजून एखादी तर नाही ना ही भिती काही काळ मनात घर करून राहतेच. कोणीतरी मागच्या खिडकीतून तिला शोधत शोधत येईल अशी भिती सतत वाटत होती. पाचच मिनिटे कसेबसे साशंक मनाने बसलो आणि उठलो... उठताना प्रार्थना केली, देवा ती ऑफिसमध्ये दिसलेली पहिली आणि शेवटचीच पाल असू दे Happy

छानच ऋन्मेऽऽष. शिकार मस्त केलीस
"तिच्या पहिल्या हालचालीलाच मी चार फूट मागे उडालो. ">>>>
तुमची कबड्डी वाचून मला प्रश्न पडलाय की त्या वाॅशरूम ची साईझ किती असेल.

पाफा, मोठे लांबलचक आहे आहे ..
एक कमोड, एक जेन्टस युरिनल, एक वॉशबेसिन विथ मिरर, एक भिंतीवरचे कपाट ज्यात टिश्यू साबण वगैरे सामान ठेवले जाते. एक ती फडकेवाली काठी ठेवायची जागा... आणि हे सगळे एका रांगेत.. त्यामुळे मोठे लांबलचक आहे..

उद्या ‘अर्धा तास ऋन्मेष’ म्हणून माझ्या नावाचा बोभाटा झाला असता.,<<<<<<< माबो सारखे ऑफिस मध्ये सुध्दा तुम्ही ऋन्मेऽऽष या नावाने ओळखले जातात का?

अक्षय कुमारला आपण अक्षय कुमार म्हणून ओळखत असलो तरी त्याचे मूळ नाव राजीव भाटिया आहे.
आणि त्याच्या ऑफिसमधील म्हणजे फिल्म ईंडस्ट्रीमधील लोकंही त्याला अक्षयकुमार याच नावाने ओळखतात.
ईतके सिंपल आहे हे Happy

धन्यवाद मिस्टर पंडीत.. मिस्टर बीन माझ्याही फार आवडीचा.. पण माझ्या गर्फेंडला मात्र तो जराही आवडत नाही, आचरट वाटतो. एकदा मी तशीच काहीतरी हरकत केलेली तेव्हा चिडून मला बोल्लेली त्या मिस्टर बीन टाईप्स करू नकोस. तेव्हा मला हे समजले...
असो आवड आपली आपली, कोणाला ऑऊ लोल्लिता शक्ती कपूर आवडतो, त्यामानाने आपली ही मिस्टर बीनवाली आवड नक्कीच चांगली Happy

पाल स्वतःच्या हातांनी मारायची पण असते? (!)
अॅक्च्युअली, आमच्या घरात ते काॅन्ट्रॅक्ट पिताश्रींकडे आहे.
पाल बघून किंचाळणे एवढेच काय ते मला माहीत. मला आणि माझ्या बहिणीला पालीचा प्रचंड फोबिया. पालीला बघून अंगावर शहारे येतात . प्रचंड किळस वाटतो. एवढी भिती वाटते की हे टाईप करताना पण आजुबाजूला पाल नाही ना हे पाहतेय. न जाणो "माझीच आठवण काढत होतीस ना? बघ मी आलेय" म्हणत यायची कुठूनशी......

हं असाच एक पालीचा किस्सा यावरून आठवलेला. एकदा असंच किचनला आणि घरातल्यांच्या पोटाला पीडायचं, म्हणून डोसे का काय बनवत होते. तर हीच मी म्हणत अवतरलेली. नेमके पिताजीही नव्हते घरात. आणि घरातल्या इतर कोणीही पाल मारायची डिग्री घेतलेली नव्हती. ती खिडकीच्या तावदानावर होती. ५-६सेमीची. काळ्या रंगाची. अंगावर पट्टे असलेली. सदा वळवळ्या प्रकारात मोडणारी. माझे दगडाखालचे हात लक्षात येऊन ती माझ्याकडे पाहून कुत्सित हसतेय असाच भास झालेला मला एक क्षण...!

डोसे तर बनवायचे होते. मग हिंमत करून टाळी वाजवली ( तिच्या मनोरंजनासाठी), तिच्या थोड्या बाजूला हवेत फडकं फिरवलं(तिचं लक्ष माझ्याकडे खेचण्यासाठी), तिच्या अंगावर पाण्याचे सपकारे मारले(तिला आयुष्यातली पहिली आंघोळ घालण्यासाठी). अखेर कंटाळून काला हीटनं तिला वारा घातला; तर ही बेटी ओट्यावरच पडली, तिही उपडी....! तिच्या लालसर कोवळ्या पोटाचं दर्शन बघून ढवळायलाच झालेलं......मी हाफ मर्डर केलं असावं तिचं.....
मग काय , मी सरळ त्या पालीला शरण गेले. ओट्यावरचं सगळं झाकलं (ती पाल सोडून हो) , आईला वगैरे या बिनबुलाई मेहेमानची जुजबी माहिती दिली. डोसे राहिले ते राहिलेच. मग कधीतरी रात्री तिचे अंत्यसंस्कार पिताश्रींनी केले असावेत.

बिचारीने किचनला आणि घरातल्यांच्या पोटाला माझ्या अन्न अत्याचारापासून वाचवण्यासाठी जीव गमावला. तिच्या आत्म्याला शांती लाभो. तिला पुन्हा पालीचा जन्म न मिळो..

पाल स्वतःच्या हातांनी मारायची पण असते?
>>>
हातांनी मी पण नाही मारली ओ Proud
पण घरातला कर्ता पुरुष झाल्यापासून... म्हणजे मी तसे स्वतःला घरी घोषित केल्यापासून हे काम माझ्यावर लागले. तेव्हापासून वेळप्रसंगी मिडीयम साईज पालीसमोर दाखवतो धीटपणा.. पण लांबी वाढली की शुक शुक करत हाकलावणेच शहाणपणाचे

मी पालीच्या वाट्याला जायचं की नाही हे तिच्या कॅटेगरी वरून ठरवते.
१) छोटी वळवळणारी
२)मध्यम वळवळणारी
३)मोठी वळवळणारी
४) छोटी स्थिर
५)मध्यम स्थिर
६)मोठी स्थिर
७)छोटी छुपी रूस्तम
८) मध्यम छुपी रूस्तम
९)मोठी छुपी रूस्तम

यातलल्या ७,८,९ अतिभयानक ...! आपण निरीक्षण करत असतो तेव्हा स्थिर. आपण लक्ष हटवतो तेव्हा कुठे गायब होते, तीच जाणो.

द्वादशांगुला श्या! काय हे.. तुम्ही उपडी पोटावर पडलेली ओट्यावर ५ ते ६ सेंटीची पाल मारू शकला नाहीत आणि वर ईथे येऊन सेंटी मारत आहात Happy

बाकी त्या ५) मध्यम स्थिर मध्ये गावातल्या पाली असतात. त्यांच्यासमोर ढोल वाजवा त्या हलतच नाहीत. गावकर्‍यांच्या तर त्या मैत्रीणी असल्यासारखे त्यांना त्या घरात असल्याने काही फरक पडत नाही. संध्याकाळ झाली की एकाच जागी येऊन तासनतास नुसत्या बसून (की झोपून?) राहतात. रात्री उठा कधीही लाईट लावा, त्या तिथेच. सकाळी निरोप न घेताच जाताच.

मारली असती, पण पुढील दोन बाबी तिला ओट्यावर तडफडवण्यात कारणीभूत ठरलेल्या-

१) तिचं ते विचित्र दर्शन-
तिचं ते लालसर पोट पाहून ढवळूनच आलेलं. न खाल्लेला डोसा उलटून बाहेर येतोय की काय असंच वाटलं होतं. शेवटी ती सुलटी होऊन गायब होऊ नये म्हणून मी अन् आईने मिळून तिच्या अंगावर जुनाट ओलं पोतेरं टाकलं . (तिला काला हीट मारल्याने झोंबत असावे. तेवढीच तिच्या जीवाला शांती..!!)

१) संभाव्य प्रतिक्रिया-
माझ्या सुपीक डोक्यातून पटापटा विचार पिकू लागले- जर मी तिला मारायला गेले आणि नेम चुकला तर..
*जे पाल मारताना तसेही पहिल्या फटक्याबाबत नेहमी होतेच. जणू "पहिला फटका तुला कधीच वर्मी बसणार नाही" असा आशिर्वाद मिळवूनच या पाली भूतलावर अवतरल्या असतात.>>> तुम्ही म्हटल्याप्रमाणे. आणि नेम चुकून ती पालथी झाली अन् सूड उगवत अंगावर आली तर....बा प रे...!!!!

अनामिक भीती... दुसरं काय.....

च्रप्स.
राधिका आपटे कोण? तीच बोल्ड आणि बोल्ड का? तिची कुठली पोस्ट? काही लिंक मिळेल का?

कुठल्याही प्राण्याला (irrespective of its size) बघून जोरात किंचाळण ही साधारणतः दुसरीपर्यंत माझी सवय होती.पण तिसरीत जेव्हा गणपतीसाठी आम्ही कोकणातल्या नवीन घरी गेलो तेव्हा माझी काही किटकांची भीती गेली.एकतर पावसाळ्यामुळे घरात सगळीकडे कीटकांच पावसाळी अधिवेशन भरल होत.आयुष्यात पहिल्यांदा इतक्या किटकांच तेही इतक्या संख्येने live दर्शन घडल्याने मी इथे येवून खूप मोठी चूक केली आहे यावर शिक्कामोर्तब झाला.
संध्याकाळी घरी आरती सुरू झाली.पारंपारीक नऊवारी साड्या आणि अंबाडा घालून सगळ्या बायका अगदी तल्लीन होऊन आरत्या म्हणत होत्या.त्या गर्दीत मी मागे उभी होते.जवळपास नास्तीक आणि किड्यांच्या मांदियाळीत इच्छेविरूद्ध असल्याने नुसतीच उभी होते. तितक्यात कुठून तरी टारझनसारखी एक पाल आली आणि मावशीच्या अंबाड्यात विसावली.काही क्षणात घडलेली ही घटना बघून मला आधीच आरतीमुळे फुटलेल्या घामाबरोबर आताsuffocation पण व्हायला लागल.त्यामुळे एक अस्फुट किंकाळी दिली .पण आरतीचा स्वर बघता कोणीही माझ्याकडे लक्ष दिल नाही.मग आरती संपल्यावर मी तारस्वरात किंचाळले.मला काहीतरी चावल असेल म्हणून सगळे घाबरले. शेवटी मी मावशीकडे बोट दाखवल.पण हाय रे कर्मा आमचा गनीम मैदान सोडून केव्हाच पळून गेला होता.त्यामुळे फुकटच्या शिव्या आणि मिळालेला मार याचा हिशेब एक तरी मिडीयम साईझ पाल ठार मारून चुकता करायचा याची मनाशी खूणगाठ बांधली. त्यासाठीचे रीतसर प्रशिक्षण बाबांकडून घेतले.आणि शत्रू हाती लागण्याची वाट पाहू लागले.
दहा महिन्यांनी तो दिवस उजाडला.मधल्या काळात मी तीन छोट्या पालींवर हात साफ केलेला. चौथीच्या नवीन वर्षाच्या सकाळी सात वाजता वर्गात प्रार्थना सुरू होती.अशातच पुन्हा एकदा रंगाचा बेरंग करायला लार्ज साईझ पाल भिंतीवर येवून उभी ठाकली.प्रार्थना संपल्यावर चित्रविचीत्र आवाज काढत अख्खा वर्ग एका बाजूला जावून थांबला .
त्यानंतर मी शाळेच्या पहिल्या दिवशी घातलेला नवीन कोरा करकरीत बूट हातात घेतला आणि एका बेसावध क्षणी तिच्यावर वार केला.पहिल्याच फटक्यात ती बरीचशी गारद झाली.मग शेवटचा निर्णायक वार करून पालीचे एक घाव दोन तुकडे केले.परत पायात बूट चढवला आणि तिच्या उरलेल्या देहाचा चेंदामेंदा केला.मगच माझा आत्मा शांत झाला.बर या सगळ्यात माझ्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या आमच्या बाई शुकशुक करून तिला हाकवत मृत्यूपासून तिची सुटका करू पाहत होत्या.पण एकदा माझ्या तावडीत सापडल्यावर त्याही तिला यमसदनी जाण्यापासून वाचवू शकल्या नाहीत.शेवटी एकदाचा माझा आत्मा शांत झाला आणि अपमानाचा बदलाही घेवून संपला.त्यानंतर मात्र वयाच्या सतराव्या वर्षीपर्यंत म्हणजे आजपर्यंत मी एकही पाल न मारता त्यांना जीवदान दिले.आणि देवाने जगण्याचा दुसरा चान्स दिला अस म्हणत त्याही पुन्हा आमच्या घराकडे फिरकल्या नाहीत.त्या सुट्टीत मी सगळे छोटे किटक आणि प्राणी पकडायला शिकले.आता फक्त मी उडाणारे मोठे झुरळ जे कोकणात अनेक ठिकाणी सापडते त्यालाच घाबरते.अशा प्रकारे वयाच्या नवव्या वर्षी अतीशय लहान वयात 13 प्राणी पकडण्याची पदवी मी प्राप्त केली.आता घरात चार पैकी दोनच सदस्य या कामात distinctionमिळवून उत्तीर्ण झालेत ते म्हणजे मी आणि माझे गुरूतुल्य वडील.

ऋन्मेषदादा तुझे लेख मला खूप आवडतात.तुझी प्रसंगाआधीची वातावरणनिर्मीती मस्त असते.तुझ्या लहानपणीचे तू सांगीतलेले (90%) बरेचसे किस्से आणि सवयी रिलेट होतात कारण पाचसहा वर्षापूर्वी मीही अशा गोष्टी केल्यात आणि अजूनही करते. उनाडक्या करायला मला अजूनही आवडत.पण अभ्यासामुळे त्याच्या प्रमाणात घट झाली आहे.तुझ लिहीण मनापासून आणि प्रामाणिक असत. म्हणून मला तुझ लिखाण जास्त आवडत.

आदिसिद्धी छान किस्सा आणि छान लिहिलाय.
बेडकाच्या किस्श्याची वाट पाहतोय.

धागा पालीबेडकांपुरताच नाहीये. मला काही वेगळे किस्सेही लिहायचे होते. पण काही पर्सनल टेण्शन आणि व्यस्त कामामुळे ते विस्मरणातच गेले. पण काही ना काही आयुष्यात घडतच असते. काही घडताच ताजे ताजे टाकेन Happy

हा किस्सा मी सहावीत असतानाचा.आज या घटनेला बरोबर सात वर्ष होतील.म्हणून आज टाकले.
पालीला यमसदनी पाठवल्यावर दोन वर्ष झालेली.अजूनही दर सुट्ट्यांमध्ये माझ कीटक पकडणे प्रशिक्षण सुरू होत.ट्रेनींग कंप्लीट झालेल .आता प्रॅक्टीकलसाठी मी सावज शोधत होते.उन्हाळा असल्याने फारसे कीटक दिसत नव्हते.पण हर एक का दिन आता है |या न्यायाने संध्याकाळी पाऊस आला.आणि माझा जुना दुष्मन डराॅव डराॅव करत समोर उभा ठाकला.माझ्या चेहेर्यावर एक खुनशी हास्य पसरलं.कारण आज मी एका दगडात दोन पक्षी मारणार होते.
पार्श्वभूमी:-
खर तर बेडूक आणि माझा दूर दूर तक काही संबंध नव्हता. पण वर्षभरापूर्वी एके दिवशी याच प्राण्यामुळे मला माझा दात आणि इज्जत दोन्हीच बलीदान द्याव लागल होत. एके दिवशी संध्याकाळी बिल्डींगच्या टेरेसवर मी आणि सोसायटीतले मित्रमैत्रीणी गप्पा मारत होतो. तेव्हा बिल्डींगमागे शेत होत.त्यामुळे अनेक प्राण्यांचा अड्डा रोज रात्री तिथे भरायचा.आणि रात्रीच्या झोपेच खोबर व्हायच.त्या दिवशी दुपारी पाऊस पडून गेलेला.आणि कुठूनतरी (बहुतेक लिफ्ट मधून) हे बेडूकमहाशय टेरेसवर दाखल झाले.त्यांच्या जबरदस्त एंट्रीने टेरेसवरची जनता आरडाओरडा करत एकाबाजूला झाली.दोनतीन मिनीटांनी काय झाल ते मला कळल.नुकताच माझा बेडूक पकडण्याचा कोर्स अर्धा कंप्लीट झालेला.इतक्या लगेच प्रात्यक्षीक आणि मोठ्या मुलामुलींसमोर हिरोगिरी अशी दुहेरी संधी चालून आली .अर्ध्या हळकुंडाने पिवळ होत मी बेडूक पकडायला पुढे सरसावले.जशी मी त्याच्या समोर गेले तसा तो पळायला लागला.आणि त्याच नादात पाईपमध्ये पाय अडकून तोंडावर आपटले.डोळ्यासमोर अंधारी आली. एक दात पडला आणि तोंडाचा सुजून हनुमान झालेला.तरीही उठून तो बेडूक पकडलाआणि टेरेसच्या कठड्यावर विजयी मुद्रेने उभी राहीले.पण तितक्यात त्याने जीभ बाहेर काढली आणि माझ्या हातातून सुटून तो खाली क्रिकेट खेळताना कॅच पकडणार्या एका मुलाच्या तोंडावर धाडकन आपटला.त्या मुलाची आई वर आली आणि तिने इज्जतीचा पंचनामा केला. घरी गेल्यावर पण हे प्रताप बघून जरा मार मिळालेला.पण दात पडल्यामुळे अवतार बघून जरा दया आली आणि आईने हात आवरता घेतला.पण बाबा मात्र जाम हसत होते. पुढचे अनेक दिवस सगळेजण त्या मुलाला चिडवायचे.
पार्श्वभूमी समाप्त.
तर गरम होत असल्याने आम्ही टेरेसवर झोपायच ठरवल.आज हे सावज सगळ्यात आधी मलाच दिसल.लगेचच मी त्याला रिकाम्या आईस्क्रीमच्या खोक्यात बंद केल. रात्री दिड वाजता उठले आणि त्या मुलाच्या( ज्याला क्रिकेट खेळताना प्रसाद मिळालेला) चादरीत हळूच बेडूक सोडला. सात-आठ मिनीटांनी तो मुलगा किंचाळत उठला.त्याचा अवतार बघून सगळेच भेदरलेले.पुन्हा एकदा हिरोपंती करत तो बेडूक मी उचलला आणि थेट सहाव्या मजल्यावरून पॅराशूटशिवाय खाली सोडून दिला.टाणकन टाकीच्या पत्र्यावर त्याच्या लॅन्डींगचा आवाज आल्यावर त्याच्या कपाळमोक्षाची पावती मिळाली आणि निश्चिंत मनाने उरलेली झोप पूर्ण केली.सकाळी मी उठाच्या आतच माझा पराक्रम सोसायटीत पसरलेला.त्या मुलाच्या आईने तर त्याच्यावरच संकट दूर केल्याबद्दल कौतुक केल आणि आधीच्यासाठी माफी मागीतली. पुढचे कैक दिवस मला सेलीब्रिटी स्टेटस मिळाल.आणि दोन दिवसानी वार्षिक परीक्षेत वर्गात दुसरी आल्याने आईने केलेल्या किड्यांबद्दल माफ केल.

त्या मुलाच्या( ज्याला क्रिकेट खेळताना प्रसाद मिळालेला) चादरीत हळूच बेडूक सोडला.
>>>
त्याच्या घरी जाऊन?

किस्सा बाकी भारी आहे. मी सुद्धा दहावी बारावीला असताना गार्डनमधील स्टडीकॅम्पमध्ये दर रात्री फुल नाईट अभ्यासाला जायचो तेव्हा हे बेडूक महाशय दिसायचे. कधी पकडले नाहीत, कधी मारले नाहीत. पण कधी घाबरलोही नाही. एकदा पायावर एक टप्पा उडी मारून पलीकडे गेला तेव्हा त्याच्या स्पर्शाचे काही वाटलेही नाही. गोड प्राणी आहे तसा..

Pages