किस्से आणि डायरी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2018 - 09:51

लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडलेच पाहिजे असे गरजेचे नसते.
बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.
हा माझ्या आयुष्याचा फंडा आहे.
हा माझा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन आहे.
त्यामुळे साधेसरळ मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतानाही आयुष्यात रोज काहीतरी हॅपनिंग घडत असते असे मला उगाचच वाटते. जे काही घडते त्यातले बरेच काही लिहावेसेही वाटते. पण असे रोजच एखादा धागा काढून सटरफटर लिहू लागलो तर मायबोलीवरून हकालपट्टी व्हायला फार वेळ लागणार नाही. म्हणून मोह आवरता घेतो Happy

पण मग विचार केला की आयुष्यात जे चुटूरपुटूर घडत असते, जे आपल्याला एखाद्या विषयाचे लेबल लावून स्वतंत्र नवीन धाग्यात लिहिता येत नाही, पण तरीही जे ईतरांशी शेअर करावेसे वाटते. अश्या रोजच्या किस्से कहाण्या घटनांसाठी का नाही वेगळा धागा काढावा..

मग विचार आला की हा धागा आपल्यापुरताच का मर्यादीत ठेवायचा. मायबोलीवर आणखीही असे कैक असतील ज्यांना असे छोटेमोठे किस्से सहजच शेअर करावेसे वाटत असतील. बरेच असेही असतील ज्यांना लिहायची ईच्छा असेल मात्र संकोचामुळे ते नवीन धागा काढू शकत नसतील. तर अश्या सर्वांच्या सर्वच पोस्टना सामावायला हा धागा. जिथे विषय आणि लांबीचे जराही बंधन नाही.

रोजच्यापेक्षा आयुष्यात काही वेगळे घडले. एखाद्या घटनेकडे पाहून काही वेगळे वाटले, काही मौलिक वा सर्वसामान्य विचार मनात आले, तर ते ईथे बिनधास्त मांडा.
जर दुसर्‍या कोणाचा किस्सा वाचून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील साधारण तसाच किस्सा आठवला तर तो जरूर शेअर करा.
लक्षात ठेवा, आजच्या तारखेला धागाकर्त्याचे मायबोलीवर ८० + चाहते आहेत. त्यामुळे आपली ईथे पडणारी पोस्ट साधारण ८० वाचकांपर्यंत पोहोचेल या विश्वासाने बिनधास्त लिहा Happy

सुरुवात मी करतो ........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर तर या डायरीलेखनाची सुरूवात आजीने केलेली . तिच्याकडे बाबांच्या लहानपणीच्या आठवणी होत्या.तेच बघून आईने आमच्या आठवणी लिहायला सुरूवात केली.त्या डायरी वाचून आपण लहानपणी कसे होतो ते कळत.आणि विस्मरणात गेलेले पराक्रम आठवतात.कितीही वेळा वाचली तरी परत वाचावीशी वाटते.
ऋन्मेषदादा लिही तू डायरी .नंतर तुझ्या मुलांना मोठे झाल्यावर वाचायला मजा येईल.

तुमचा अभिषेक या आयडीने असे आपल्या मुलीबद्दल लिहिले होते. बरेच दहा बारा भाग लिहिलेले. हल्ली लिहित नाही वाटते.

https://www.maayboli.com/node/54702

तेव्हाही माझ्या डोक्यात हा विचार आलेला. आपणही हि स्टाईल कॉपी करावी. तेवढाच एक नवनवीन धाग्यांना विषयही मिळेल. पण त्या आधी साखरपुडा, लग्न, हनीमून, मुलं असा लांबचा प्रवास करावा लागेल Happy

छान लिहीलय त्यांनी पण. मी वाचले नव्हते हे जुने धागे.त्यामुळे माहीतच नव्हते.दोनच आठवडे झाले सदस्यत्व घेऊन.सो आता लिंक वरून वाचल.

तेव्हाही माझ्या डोक्यात हा विचार आलेला. आपणही हि स्टाईल कॉपी करावी. तेवढाच एक नवनवीन धाग्यांना विषयही मिळेल. पण त्या आधी साखरपुडा, लग्न, हनीमून, मुलं असा लांबचा प्रवास करावा लागेल Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 9 March, 2018 - 19:48
>>>>

ऋ भाऊ तुमच्या अन अभिषेक यांच्या लिखाणशैलीत शोधल्यास साम्यस्थळे नक्की सापडतील. माझी ती कुवत नाही त्यामुळे जाहीर माघार. पण एक गोष्ट आहे तुमच्या दोघांच्या लिखाणात दक्षिण मुंबई आणि VJIT हा समान दुवा नक्कीच आहे.

हा किस्सा मी नववीत असतानाचा.त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती.आम्ही सगळ्यांनी आमच्या शिक्षकांना फुलं देवून कधी नव्हेते खूष करायचा प्रयत्न केला.तुम्ही किती छान शिकवता असं सांगून सगळ्यांना एकत्रच चण्याच्या झाडावर चढवल.फक्त एकच शिक्षक याला अपवाद होते.दहा दिवसांनी ते रिटायर होणार होते. म्हणून त्यांचा स्पेशल सन्मान केला.मराठी शिकवायचे ते आम्हाला .इथपर्यंत सगळ छान सुरू होत.
आठवड्यातून चार दिवस आम्हाला टेक्निकलचा तास असायचा.खर तर मला त्या इंजिनीयरींगच्या विषयात काहीही रस नव्हता.पण अ तुकडीला कंपल्सरी असल्याने जबरदस्ती गधामजूरी करावी लागायची.त्यात आमच्या नवीन विषयाचा इंट्रो देणार्या सरांनी विषय भरकटवत टेक्नीकल आणि भगवद्गीतेचा संबंध जोडायला सुरूवात केली होती.नाव बाळकृष्ण असल्याने स्वतःला ते कृष्णाचा अवतार समजून आम्हा पाच ऐवजी पस्तीस पांडव मुलींना वेल्डींग शिकवत होते.बोअर झाल्याने मागच्या मुली भिंतीचा आधार घेवून पेंगत होत्या. आणि आम्हाला इच्छा असूनही आधार नसल्याने पेंगता येत नव्हत.अशा प्रकारे त्यांचचा एक अध्याय संपला होता.आणि पुढच्या बुधवारी उरलेला दुसरा अध्याय पूर्ण करणार अशी सूचना वजा धमकी देवून त्यांनी पुढच्या आठवड्याभराचीही झोप उडवली.आमच्या शाळेची नाॅर्मल वेळ दुपारी बारा ते सहा होती.पण या टेक्नीकलपयी आठवड्यातले चार दिवस आम्हाला आठ वाजताच शाळेत येवून जाॅब बरोबर दोन हात करावे लागत असत.तर त्या दिशी आठ ते दहा पकवण्याचा एक एपिसोड झाला आणि आम्ही लोखंडाचा जाॅब हॅक्साॅने कट करून फायलींग करून राईट अॅगल केला.एवढ करून आधीच जीव दमलेला. त्यामुळे साडे तीन वाजता मराठीच्या तासाला आम्ही फक्त झोपायचे बाकी होतो.झोप येत असल्याने मी डोक्याला हात लावून बेंच वर बसले होते.मस्त डोळा लागणार तितक्यात शेजारी बसलेल्या मुलीने माझा डोक्याखालचा हात काढला.आणि असा अनपेक्षीतपणे हात काढल्याने मी धाडकन बेंचवर आपटले.आणि घाबरून ओरडले.बेंचवरच सगळ सामानही सांडल.हा सगळा प्रकार काही सेकंदात झाल्याने सर पण दचकले.मागच्या मुलीने संपूर्ण प्रसंगाच रसभरीत वर्णन केल्याने शिक्षा अटळ होती.त्यांनी मला पुढे बोलावल आणि शिक्षेचे दोन आॅप्शन दिले.एक तर मी तो धडा दुसर्या दिवशी दहा वेळा लिहून आणायचा .नाहीतर त्यांना मुलांपैकी कोणीतरी दिलेल जास्वंदाच फूल शिक्षा म्हणून स्वीकारायच आणि उरलेला धडा अख्खा धडा शिकवायचा.पहिला आॅप्शन मला या जन्मात शक्य नव्हता.मग इकडेतिकड बघीतल तेव्हा माझ्या मित्रमैत्रीणी दुसरा आॅप्शन घे अस खुणा करून सांगत होत्या.त्यांच्याकडे फुलाचा विनीयोग कसा करायचा याचा प्लॅन बहुतेक रेडी होता.त्याच्या विश्वासावर मी ते फूल घेतल आणि उरलेला धडा आरामात शिकवला.तास संपल्यावर ते सर निघून गेले आणि फुलाचा कसा बंदोबस्त करायचा याचा विचार आम्ही करू लागलो.शेवटी एका मित्राला फूल कोणाला खपवायच याची आयडीया सुचली.आणि मी ती अंमलात आणायला सुरूवात केली.इंटरमिजीएटचा तास घ्यायला चित्रकलेचे सर वर्गात आले.आणि आदराने आम्ही ते फूल त्यांना अर्पण केल.बर सकाळासून सगळी मुल फक्त त्यांच्या पाया पडून गेलेली.पण आमच्या वर्गाकडून ज्यांनी त्यांच तास घेणच मुश्कील केलेल मिळालेल्या अनपेक्षीत आदराने त्यांना आनंदाश्रू यायचे बाकी होते.आणि इथे फूलाच संकटातून बाहेर पडल्याने मीही सुटकेचा निश्वास टाकला.नंतर ही घटना मी विसरूनही गेले.घरीपण कोणाला सांगीतल नव्हत. पण सत्य कधीच लपून रहात नाही याचा प्रत्यय मला वर्षाच्या शेवटच्या दिवशी आला.प्रत्येक तुकडीतल्या पहिल्या तीन क्रमांकाच्ये विद्यार्थ्यांना त्या रिटायर झालेल्या सरांच्या हस्ते रीझल्ट मिळणार होता.तिसर्या नंबरसाठी नाव अनाउन्स केल्यावर मला उठून चालवतच नव्हत. पायातली शक्ती गेल्यासारख झाल.झोपेत चालल्यासारखी मी चालत गेले आणि त्यांच्याकडे बघीतल.ते हसत होते.आता काय होणार याच सगळ्यांना टेन्शन आलेल.कारण पापामध्ये अख्खा वर्ग सहभागी होता. नंतर बाबांना जवळ बोलवून त्यानी सगळा प्रसंग सांगीतला आणि छान शिकवल अस म्हणून निघून गेले.फक्त माझ्याच बाबांना कळल्याने सगळ्यांच टेन्शन दूर झाल. येताना बाबांनी फुलाच काय केलस अस विचारल्यावर अती आनंदाच्या भरात चुकून मी त्यांना सगळ खर सांगितल.नशीब त्यांनी ते आईला सांगितल नाही.नाहीतर घरी गेल्यावर माझी बिनपाण्याची धुलाई झाली असती.

अरे वा.. जे वर्कशॉप जॉब आम्ही ईंजिनीअरींगला करत होतो.. ते देखील स्वत: कुठे तर दुसरयाकडून करवून घेत होतो ते तुम्ही शाळेतच करत होता.

हे धडा शिकवण्यावरून आठवले.. एकदा ईंग्लिशच्या बाईंनी माझ्या पाठीत धपाटा घालत, कान पिरगाळत, माझ्या हातात पुस्तक देत म्ह्टले होते.. ये तू शिकव..
आणि मी फक्त मान खाली घालून मित्रांचे फिदीफिदी हसणे ऐकत गालाला खळ्या पाडून निर्लज्जपणे उभा होतो Happy

आता अनेक शाळांमध्येv3 चा कोर्स असतो.किंवा मग gardening, cooking, शिवण हे विषय दहावीला100 गुणांना असतात

V3हा तुलनेने जास्त त्रासदायक प्रकार असतो.कारण याअंतर्गत सहा विषय असतात.फिटींग, वेल्डींग ,इंजिनीयरींग ड्राॅईंग ,संगणक ,इलेक्ट्राॅनीक्स आणि बेसिक इलेक्ट्रीसिटी हे सहा विषय.इंटरेस्ट नसला तरी final बोर्डाच्या प्रॅक्टीकल साठी प्रामाणिकपणे कराव लागत.कोणता जाॅब बनवायला येईल ते सांगता येत नाही.फिटींगचा आला तर वाट लागते घासून घासून.

मलाही खूप हसायला येत होत पण ते सर सिनीयर असल्याने हसता येत नव्हत.माझ्यासकट अख्खा वर्ग हसण कंट्रोल करत होता.त्यात परत सगळ्यांच्या खाणाखुणांमुळे जागेवर परत जाताना मी खूप हसत होते. त्यांनी वर्गाबाहेर पाऊल टाकल्यावर मात्र पोट दुखेपर्यंत हसत होतो आम्ही सगळे.दहा दिवसांनी असेही ते रिटायर होणार होते.त्यामुळे बिचार्या सरांची आदरपूर्वक पाठवणी करण आमच कर्तव्य होत.

लहानपण, कीटके, मुलांची आठवण ... असा सगळा मिलाफ वाचून मला माझ्या लहान मुलीचा किस्सा आठवला. वय वर्षे साडे तीन बहुतेक. जुनिअर केजी. शाळेत चाललेली माझी पोर अन मी. बिल्डिंगच्या बाहेरच लहानसं साईमंदिर होतं. शाळेत जाताना ती तिथे उभी राहून पाया पडायची. छोटीशीच प्रार्थना. शाळेतला दिवस छान जाऊदे, चांगली बुद्धी दे वगैरे ... पण त्यादिवशी त्यात तिने एक वाक्य ऍड केलं... देवा, आमच्या घरातलं ते उडणार झुरळ जाऊदेत... आई खूप घाबरते... अन तेही मोठ्याने बोललेली पठ्ठी...... यावर मी काय बोलणार ना ? मी तिलाच हात टेकले अन म्हटलं... चल लवकर बस जाईल नाहीतर...

आदिसिद्धी चे किस्से अचाट आहेत.
पहिलीत नाटकांमधे लीड रोल काय, वॅनकाकांच्या डोक्यात डबा मारणं काय, शाळेत इंजिनियरींग काय (इथे इयत्ता लिहिली नाहीये. तरी माझा अंदाज आहे की तिसरी-चौथी असावी.)

सस्मित ताई आमच्या शाळेत शालाबाह्य उपक्रमांना जास्त महत्व होत अगदी अभ्यासाईतकच किंबहुना जास्त.सगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्याना यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाव यासाठी आमच्या शाळेत अनेक स्पर्धा आणि उपक्रम घेतले जातात.पुण्यातल्या नावाजलेल्या शाळांपैकी एक आहे माझी शाळा.त्यामुळे अगदी बालवर्गापासून आमच्या शाळेतल्या मुलांना स्टेजवर बोलायची सवय आहे.
स्पर्धा ही आमच्याच वयोगटतल्या मुलांची होती.
आता राहीला प्रशन टेक्नीकलचा तर ते बर्याच शाळांमध्ये आहे.नेटवर तुम्ही elements of electrical and electronics technology V3 अस सर्च करून माहिती वाचू शकता.

असेल गं. मी आपलं मला वाटलं ते सांगितलं.
मी एवढी हरहुन्नरी नव्हते पहिलीत. वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे पण ते पाचवी पासुन पुढे.
नाटक वैगेरे नाहीच कधी.
एकदा फक्त शाळेच्या गॅदरींग मधे भाग घेतला होता. मंगळागौरीचा नाच होता. त्यात होते. आठवीत असताना.
आणि विंजीनीयरींग आणि शाळा दुरच, कॉलेजात कॉमर्स घेतल्याने आणि आताच्या आयुष्यातही आकाउंटगिरीच करत असल्याने विंजीनीयरींग कशाशी खातात ते अजिबात माहित नाही.
असो. लैच अवांतर Happy

वा.गॅदींरींगमध्ये नाचलात तुम्ही.आमच्या वर्गाच गॅदरींग असताना मला तर पहिल नाचातून बाहेर हाकलायचे(डान्सची क्वालीटी बघून) .आणि गाण म्हणायच झाल तर इज्जतीचा फालुदा होईल इतका सुंदर आवाज आहे माझा.त्यामुळे नाच आणि गाणं हे दोन्ही आॅप्शन माझ्यासाठी नव्हतेच कधी.आवाज खणखणीत आणि भाषा शुद्ध असल्यामुळे वक्तृत्वस्पर्धेसाठी शाळा पाठवायची.

Pages