किस्से आणि डायरी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2018 - 09:51

लाईफ ईंटरेस्टींग बनण्यासाठी त्यात रोज काही ईंटरेस्टींग घडलेच पाहिजे असे गरजेचे नसते.
बस्स जे घडतेय ते ईंटरेस्ट घेऊन जगायचे असते.
हा माझ्या आयुष्याचा फंडा आहे.
हा माझा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन आहे.
त्यामुळे साधेसरळ मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतानाही आयुष्यात रोज काहीतरी हॅपनिंग घडत असते असे मला उगाचच वाटते. जे काही घडते त्यातले बरेच काही लिहावेसेही वाटते. पण असे रोजच एखादा धागा काढून सटरफटर लिहू लागलो तर मायबोलीवरून हकालपट्टी व्हायला फार वेळ लागणार नाही. म्हणून मोह आवरता घेतो Happy

पण मग विचार केला की आयुष्यात जे चुटूरपुटूर घडत असते, जे आपल्याला एखाद्या विषयाचे लेबल लावून स्वतंत्र नवीन धाग्यात लिहिता येत नाही, पण तरीही जे ईतरांशी शेअर करावेसे वाटते. अश्या रोजच्या किस्से कहाण्या घटनांसाठी का नाही वेगळा धागा काढावा..

मग विचार आला की हा धागा आपल्यापुरताच का मर्यादीत ठेवायचा. मायबोलीवर आणखीही असे कैक असतील ज्यांना असे छोटेमोठे किस्से सहजच शेअर करावेसे वाटत असतील. बरेच असेही असतील ज्यांना लिहायची ईच्छा असेल मात्र संकोचामुळे ते नवीन धागा काढू शकत नसतील. तर अश्या सर्वांच्या सर्वच पोस्टना सामावायला हा धागा. जिथे विषय आणि लांबीचे जराही बंधन नाही.

रोजच्यापेक्षा आयुष्यात काही वेगळे घडले. एखाद्या घटनेकडे पाहून काही वेगळे वाटले, काही मौलिक वा सर्वसामान्य विचार मनात आले, तर ते ईथे बिनधास्त मांडा.
जर दुसर्‍या कोणाचा किस्सा वाचून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील साधारण तसाच किस्सा आठवला तर तो जरूर शेअर करा.
लक्षात ठेवा, आजच्या तारखेला धागाकर्त्याचे मायबोलीवर ८० + चाहते आहेत. त्यामुळे आपली ईथे पडणारी पोस्ट साधारण ८० वाचकांपर्यंत पोहोचेल या विश्वासाने बिनधास्त लिहा Happy

सुरुवात मी करतो ........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा उनाडक्या करून बराच मार खाल्लाय मी.पण मजेपुढे मार काहीच नसतो.एकप्रकारचा कोडगेपणा अंगात येतो नंतर.अभ्यास व्यवस्थीत असल्याने त्यासाठी कधी शिव्या नाही खाल्ल्या.पण मारामारी आणि कीडे करून पुरेशी दहशत निर्माण केली .केलेले पराक्रम अंगाशी येवू नयेत म्हणून.आता बारावीमुळे सुटलच सगळ.वाचनाचा छंद असल्याने नवनवीन प्रयोग सुचायचे मला आणि मग ते अंमलात आणताना राडा व्हायचा आणि शिव्या पडायच्या.

त्याच्या घरी जावून नाही .ते वर झोपले असताना. एका टेरेसवर मुल आणि एका वर मुली झोपायचो तेव्हा. मधे एकच भिंत असल्याने पलीकडे जाता यायच.
आणि माणस मारली नाहीत रे कधी.नाहीतर आता घरी मायबोलीवर असण्याऐवजी बालसुधारगृहात असले असते.

नवीन थ्रिलींग गोष्टी मी बाबांकडूनच शिकले.आईने पण बरच प्रोत्साहन दिल.शाळेने खूप सारे अनुभव देवून जगात जगायला लायक बनवल.या तीन गोष्टी माझ्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत.सहलींमध्ये नवीन गोष्टी ट्राय करता यायच्या.

एका टेरेसवर मुल आणि एका वर मुली झोपायचो तेव्हा.
>>>>
ईंटरेस्टींग ! शाळा कॉलेजच्या वयात असे टेरेसवर मित्रांसोबत झोपणे. धमाल अनुभव असतो. आम्ही रोजच नाही पण मुद्दाम ठरवून असे झोपायला जायचो महिन्यातून एखाद्या विकेंडला. आठवायला घेतले तर या अनुभवातूनही किस्से निघतील. झोपायचेच का, सार्वजनिक नळावर एकत्र आंघोळ करणे यासारखी धमाल नसायची.. पाणी जायच्या जागी बूच लावून पाण्याचा हौद बनवायचा आणि त्यात नुसता धुमाकूळ Happy

आज रात्री टेम्पोवाल्या काकांच डोक फोडल्याचा किस्सा टाकते.ज्या मी पहिल्यांदा आणि शेवटचा मोठ्या माणसावर हात उगारलेला.

हा एक किस्सा मी होस्टेलमध्ये रहात असतानाचा.
वर्ष- २००२/०३. मोबाईल फोन सर्वव्यापी झाले नव्हते. होस्टेलमध्ये एक लॅंडलाईन होता ज्यावर आमचे सगळ्यांचे ( १२-१५ मुलींचे ) फोन यायचे.
एकदा दुपारी फोन वाजला. लॉंग डिस्टन्स कॉल असला की फोनची बेल वेगळी वाजायची, तशी वाजली. एका मुलीने फोन उचलला, दीपालीसाठी फोन होता. दीपाली म्हणजे माझी रूममेट. ती कॉलेजला गेली होती. पण मी फोन घ्यायला गेले. कारण एसटीडी कॉल म्हणजे तिच्या घरून ( बेळगावहून) असू शकतो आणि दुपारी फोन केलाय म्हणजे महत्त्वाचा निरोप असू शकतो असं मला वाटलं.
आमचा संवाद:
मी: हॅलो
तो: दीपाली?
मी: नाही, मी तिची रूममेट. आपण कोण बोलताय?
तो: दीपाली कुठे गेली आहे?
मी: कॉलेजला. आपण कोण बोलताय?
तो: किती वाजता येईल?
मी : रात्री ९. आपण कोण?
तो: एवढ्या उशीरा?
मी: ती रोज याच वेळी येते. तुम्ही बेळगावहून बोलताय का?
तो: बेळगाव? का? मी नगरहून बोलतोय. तुम्हाला मी बेळगावहून बोलतोय असं का वाटलं?
मी: एसटीडी बेल वाजली म्हणून.
तो: तिला बेळगावहून कुणाचे फोन नेहमी येतात का?
मी गप्प. आता मला अंदाज आला की काही तरी गडबड आहे.
तो:. बोला तुम्ही. लाजू नका ( शप्पथ तो असं म्हणाला Lol )
मी: नाही, तसं काही नाही. तुमचा काही निरोप आहे का ?
तो. तिला सांगा की तिच्या नगरच्या वकील मित्राचा फोन आला होता. माझा नंबर लिहून घेता का?
मी नंबर लिहून घेतला आणि फोन ठेवला.

रात्री दीपाली आल्यावर मी तिला नंबर दिला आणि सांगितलं की तुझ्या नगरच्या वकील मित्राचा फोन आला होता. ती म्हणाली की माझा असा कुणीही मित्र नाही. मी काही या नंबरवर फोन करणार नाही.

काही दिवसांनी संध्याकाळी परत त्याचा फोन आला. यावेळी मात्र त्याने सुदैवाने दीपाली देशपांडे असं पूर्ण नाव घेतलं. माझ्या रूममेटचं आडनाव देशपांडे नव्हतं. दीपाली देशपांडे समोरच्या दुसऱ्या होस्टेलमध्ये रहात होती. आधी त्या होस्टेलमध्ये फोन नव्हता तेव्हा त्या मुलींचेही फोन इथेच यायचे म्हणे. शेवटी खरी दीपाली आली आणि तिने फोन घेतला.
हुश्श!

तळटीप: हा किस्सा १००% खरा आहे, पण नाव- आडनाव बदलून लिहिले आहे. Happy

ढिंच्याक नको( ढिंच्याक नावाने जी प्रसिद्ध आहे ती फारच विचीत्र आहे.) .ते जरा विचीत्र वाटत.रात्री अजून एक किस्सा टाकेन त्यानंतर बहुतेक लेडी डाॅन म्हणाल तुम्ही अस वाटतय.

2006-07 मधला मी पहिलीत असतानाचा हा किस्सा. माझ नवीन शाळेत अॅडमीशन घेतलेल.शाळेपासून घर लांब असल्यामुळे व्हॅन लावली होती. शाळेत मी नवीन होते आणि वक्तृत्व स्पर्धेत नेहमीच इतरांना पाणी पाजायचे. याच गुणांना ओळखून शाळेने मला राज्यस्तरीय नाटकात काम करायची संधी दिली. शाळा सुटल्यावर एक तास रोज सराव असायचा.लहान असताना सगळेजण लाडाने माझे गाल ओढायचे .शाळेतल्याही बाई खूप गाल ओढायच्या.त्यामुळे घरी जाताना आधीच टाळक फिरलेल असायच.
एकदा असच प्रॅक्टीस करताना खूप वेळ झालेला. त्या दिवशी एका वक्तृत्व स्पर्धेची फायनल असल्याने मधल्या सुट्टीवर पाणी सोडाव लागलेल.आणि वर्गात मैत्रीणींनी आधीच माझा डबा संपवल्यामुळे पोटातले कावळे ओरडून ओरडून बेशुद्ध पडत आलेले.तितक्यात अचानक बाईंनी सूचना दिली की आजपासून आपण दोन तास नाटकाचा सराव करणार आहोत.त्यामुळे लवकर घरी जायचा एकुलता एक आशेचा किरण माझीच प्रमुख भूमीका असल्याने मावळला.इन टोटल तो एक दळभद्री दिवस होता. एकतर माझ्यासकट इतरांचेही डायलाॅग माझे पाठ असल्यामुळे मधेच डायलाॅग विसरणार्या मुलांवर माझ पित्त खवळायच.त्या दिवशीही अशीच परिस्थिती असल्याने आधीच डोक्याची मंडई झालेली.आणि त्याच दिवशी नेमके मला न आवडणारे काका घ्यायला आलेले.त्यांना सगळे मिक्स मिशीवाले काका नावाने हाक मारायचे.हे नाव मीच पाडलेल कारण त्यांची बरोब्बर अर्धी मिशी काळी आणि अर्धी पांढरी होती.त्यांनाही हीच गालाला हात लावायची घाणेरडी सवय होती.शाळेतून घरी येताना रोज माझी गाडीतली खिडकी ठरलेली होती. तिथे मी रोज घरी जाईपर्यंत परीकथेच नाहीतर चंपकच पुस्तक वाचत बसायचे आणि त्याच दुनियेत हरवून जायचे.आणि ते काका हात लावून सारख डिस्टर्ब करायचे.त्या दिवशी गाडीत दुसर्या शाळेतली मुलंमुली होते.आणि माझ्याबरोबर आमच्या वर्गातला आमच्याच सोसायटीतला एक मुलगा होता. तो आणि मी एकत्र पुस्तक वाचत होतो. तितक्यात आमचे हे व्हिलन काका तिथे आले आणि परत त्रास द्यायला लागले.त्यांच अनुकरण करत त्या मुलीही त्रास द्यायला लागल्या.एकतर भुकेमुळे आधीच डोक गरम झालेल.त्यात या हरकींमुळे चांगलाच संताप झाला आणि मी काकांना 'अजून त्रास दिलात तर डोक फोडेन.' अशी वाॅर्नींग दिली .पण त्यांनी ती सिरीयसली घेतली नाही.मग मात्र माझ रक्त तापल ,हात शिवशिवायला लागले आणि या प्रकरणाचा अंतच करायचा अस मी ठरवल.शांतपणे मी हातातल पुस्तक मित्राकडे दिलं. बॅगेतून डबा काढला.त्यांना वाटल की मी डबा खाणार आहे.पण पुढे याच डब्याने आपल्यावर हल्ला होणार आहे यापासून ते बिचारे अनभिज्ञ होते. मग मी तो डबा थाडकन त्यांच्या डोक्यावर मारला.बर त्यांच बॅडलक की त्या दिवशी नेमका आईने नेमका स्टीलचा डबा दिलेला. इतक्या छान प्रसादामुळे त्यांच्या डोक्याला खोक पडली.पहिल्याच मारामध्ये मी रक्त काढल. परत डबा बॅगेत ठेवला आणि पुस्तक वाचायला सुरूवात केली. गाडीतली मुल घाबरून शांत बसली आणि घरी जाईपर्यंत जीवाला शांतता मिळाली.घरी मार बसणार हे माहीतच होत.पण आश्चर्य म्हणजे आईने त्या दिवशी माझी बाजू घेवून काकांनाच झापलं. आनंदाचा अॅटॅक यायचाच बाकी राहीलेला मला.नंतर कळल की बाबांनी त्यांना मला हात न लावण्याबद्दल सूचना केलेली. म्हणून नियमभंग केल्याबद्दल मीच नकळतपणे त्यांना शिक्षा दिलेली.त्यानंतर बरेच दिवस ते काका घाबरून असायचे अजून कशानेतरी आपला कपाळमोक्ष व्हायला नको म्हणून.त्यानंतर मात्र वर्गातल्या मुलं मुलीही चारदा विचार करून भांडायच्या मी असच कुठल तरी शस्त्र उगारू नये म्हणून.याआधीही आणि यानंतरसुद्धा आतापर्यंत मी कुठल्याच मोठ्या माणसावर हात उचलला नाही.

आदिसिद्धी सही !
खरेच लेडी डॉन आहात. तसेच वकृत्व (बोलबच्वनगिरी), नाटकं, वगैरे आणखी देखील बरेच गुण आहेत तुमच्यात Happy

काकांना मारले हे एकूण बरेच केलेत असे वाटले. पुढे तुमच्या आईबाबांच्या प्रतिक्रियेने ते कन्फर्मही केले.
आता ते काका यापुढे ईतर कुठल्या मुलीला त्रास देतानाही घाबरतीलच..

अशा गोष्टी एका लिमीट पर्यंत ठीक असतात.अती झाल की मग माझ डोक फिरत.कुठेही आणि कोणावरही अन्याय झाला तरी चीड येते.मग असच कोणीतरी तावडीत सापडत.
नववीत असताना दहावीतल्या एका मुलाचा गाल लाल केलेला.उनाडक्या म्हणून नाही अभ्यासासाठी.तो किस्सा उद्या रात्री टाकेन.

प्लीज एकेरी नावाने हाक मारा मला.

हो एक्चुअली एकेरी नावानेच हाक मारणार होतो. पण तुझा वरचा किस्सा वाचून मनात भितीयुक्त आदर तयार झाला Proud

जोक्स द अपार्ट, पुढच्या किस्श्याची वाट पाहतोय, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज Happy

आम्हाला रोज वर्गात एक गोष्ट सांगावी लागायची मोठ्या गटात असताना .अर्ध वर्ष तर मीच सांगितली.त्यामुळे पहिलीत स्टेजवर बोलण माझ्यासाठी काहीच नव्हत.

शाळेत स्पर्धांमध्ये भाग घेतला की सगळ जमत. माझ पहिल भाषण मी मोठ्या गटात असताना इंदिरा गांधींच केलेल.आमच्या शाळेतही खूप स्पर्धा असायच्या.लहान मुलांच्या वयोगटानुसार.अजूनही असतात.

सर्व प्रथम बिकट परिस्थितीतही अर्धशतक झळकावल्याबद्दल ऋ ह्यांचे अभिनंदन Happy
आणि प्रतिसादांचे चौकार षटकार ठोकुन एकहाती मॅच फिरवणाऱ्या आदिसिद्धि ह्यांचे मनापासून कौतुक Wink

धाग्यास शतकी वाटचालिकरिता शुभेच्छा !

आदिसिद्धी, ग्रेट! लोकांना थक्क करावे, अविश्वसनीय वाटावे ईतके टॅलेंट आहे तुझ्यात Happy

मला वाटते धाग्याचे शीर्षकही आदिसिद्धीचे कारनामे असे करावे Wink

थापा मारायला मला आवडत आणि जमतही नाही.आयुष्यात मी तीनच थापा मारल्यात तेही मैत्रीणींना शिक्षेतून वाचवण्यासाठी.त्याने कोणाचही नुकसान न होता फायदाच झाला. या प्रसंगांमध्ये माझ्याबरोबर जे होते त्यांनी ते enjoy केले.त्यामुळे अविश्वसनीय असले तरी खरेच असल्याने त्यात खोट बोलाव अस काहीच नाही.
आणि मार खाऊन सुधरणारे या कॅटेगिरीत मी बसत नव्हते.मग हे किस्से कधीकधी घडायचे.
हे माझे आणि भावाचे लहानपणीचे किस्से आईनेच एका डायरीत लिहील्याने त्याच्या सत्यतेबद्दल मला काहीच डाऊट नाही.हे घडल्याच्या आठवणी आयुष्यभर सोबत असतील.

हे माझे आणि भावाचे लहानपणीचे किस्से आईनेच एका डायरीत लिहील्याने ....
>>>>

सही आहे हे. आईने मुलांचे लहानपणीचे किस्से आणि आठवणी डायरीत लिहून जतन करणे.. नमस्कार सांग तुझ्या आईला _/\_ आणि छान कल्पना आहे. मलाही माझ्या मुलांच्या गमतीजमती असे जतन करायला आवडतील. त्यांच्या जन्मापासूनच लिहायला घेतो Happy

त्यांच्या जन्मापासूनच लिहायला घेतो>>>> Lol
हे वाचून मला 'तो' लेख आठवला ज्याच्यामुळे मी ऋच्या लेखनाचा फैन झालो !!
आदिसिद्धी माबोची लेडी ऋन्मेष बनणार बहुधा... Happy

Pages