बैंगन हराभरा

Submitted by तृप्ती आवटी on 1 January, 2018 - 13:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ छोटी कोवळी वांगी, एक जुडी कोथिंबीर, २ पेर आलं, ७-८ हिरव्या मिरच्या, तेल, जिरं, मीठ.

क्रमवार पाककृती: 

वांगी स्वच्छ धुवून-पुसून घ्यावीत आणि देठं काढून टाकावीत. सगळ्या वांग्यांना देठाच्या बाजूनं उभी-आडवी खाप करावी. कढईत तेल गरम करून त्यात (फक्त) जिर्‍याची फोडणी करावी. तेल जरा सढळ हातानं घालावं. वांगी परतत असताना कोथिंबीर, आलं, मिरच्यांचं चांगलं बारीक वाटण करून घ्यावं. गरज पडल्यास वाटताना जरासंच पाणी घालावं. वांगी अर्धी-कच्ची शिजली की त्यात वाटण आणि चवीनुसार मीठ घालून नीट हलवून घ्यावं. झाकण घालून वाफेवर भाजी शिजवावी. तांदळाच्या किंवा ज्वारीच्या पातळ भाकरीसोबत फार मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
इतर जिन्नस असतील तर ४ जणांच्या जेवणासाठी पुरते
अधिक टिपा: 

आंध्रप्रदेशात ही अशी भाजी करतात. झटपट पण चमचमित चविष्ठ प्रकार आहे. हिरव्या वाटणातल्या भाजीला जरा ग्लॅमरस वाटावं म्हणून 'बैंगन हरभरा' नाव दिलं आहे.
वांगी हिरवी असली तर उत्तम.
सध्या पाककृती शोध सुविधा चालत नसल्यानं कुणी आधीच ही रेसिपी लिहिली आहे की कसं शोधता आलं नाही.

माहितीचा स्रोत: 
सौदिन्डियन मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृती खरच सोपी आणी छान आहे. करेनच. पण नाव वाचुन वाटले की बाकी भाज्यात कसे आपण मटार घालतो, तसे यात हरभर्‍याचे दाणे घालायचे की काय. कारण आधी मी चुकून हरभरा वाचले. आणी तसेही थंडीमुळे भारतात भरपूर हरबरा आलाय.

छान पाककृती.

वांगी - हरभरा अशी भाजी आमच्याकडे करतात.

छान आहे ! जरा फोटु हवा होता!
हरभर्‍याचे दाणे घालायचे की काय.>>>

हो ना मलाही तसेव वाटले आधी आपल्या भोगीच्या भाजीत हरबरा घालतो तसे!

सोपी रेसिपी. नक्कीच ट्राय करेन >>> +१११

फोटो टाका जमल्यास, म्हणजे अजुन अंदाज येईल अन छान वाटेल.

एक शंका, >>> सगळ्या वांग्यांना देठाच्या बाजूनं उभी-आडवी खाप करावी. <<<< म्हणजे वांग्याचे चार भाग करायचे कि न चिरता फक्त भेगा द्यायच्या

वांगी हरभरा अशी एक रेसिपी सिंडरेला नेच पुर्वी टाकली होती (ना?)>>>>हो. वांगं सोलाणा भाजी. आमच्या घरी हिट आहे ती भाजी. Happy

आजच करून बघतो.
सोपी वाटतेय. फक्त आम्ही तिखट अधिक टाकणार.

आज केली ही भाजी. आम्हाला वांग्याच्या भाजीत तो हा पण घालणे मस्ट असते त्यामुळे तोही घातला. मस्त झाली होती. सोपीही आहे. फोटु काढायचा राहिला माझा पण Sad

छान.

म्हणजे वांग्याचे चार भाग करायचे कि न चिरता फक्त भेगा द्यायच्या >>> चीर द्यायची फक्त. वांगी आख्खीच राहिली पाहिजेत.

रश्मी, मला फार अवघड / वेळखाऊ रेसिपीज अजिबात झेपत नाहीत म्हणून सोपेच पदार्थ बनवते आणि इथे लिहिते Happy

मै, ज्या मैत्रिणीनं रेसिपी दिली तिला सांगते Happy

वांगी हिरवी असली तर उत्तम.<<< माझी शिजल्यावरही हिरवीच राहिली.... Proud ....
..
करून बघतो. हल्ली भाकरी खातो त्यामुळे सोबत.

सायोला हाणा. पार्लरला जाते म्हणे. पण त्या इंपॉ ने खरच ती सोय होते खरी.
तो हा अम्हणजे बटाटा का?

मला सीमाने लिहिलेलं डांगर शोधायचं होत< पण शोधायचं कसं? खूप दिवसांनी आले तर सगळं बदललय. शोधायचं कस?

>> मायबोलीचा सर्च काम करत नाहीये

आता करतो आहे. फक्त मायबोली एडिटर वर लिहून ते स्ट्रिंग (देवनागरी) कॉपी पेस्ट केलं मायबोली च्या सर्च फिल्ड मध्ये तर काम होतं असा माझा अनुभव आहे. अजूनही जास्त चांगले पर्याय असतील पण मला माहित नाहीत.

किंवा मग रेग्युलर गुगल मध्येही सर्च करता येतं आधी किंवा नंतर "site: maayboli.com" की तत्सम स्पेसिफिकेशन देऊन. ह्याबद्दल अधिक माहितीसाठी भास्कराचार्य किंवा अजून कोणी एक्स्पर्ट्स ना संपर्क साधावा.

मस्त. सोपी आहे.
मै +१ ब्याडवर्ड घातल्याशिवाय करणे शक्य नाही.

पार्लरला जाते म्हणे >>> बघ की, फिरनी होइल अशानं त्या भाजीची Wink Light 1

ब्याडवर्ड घातल्याशिवाय करणे शक्य नाही. >>> अमित, छोटे बटाटे आख्खेच उकडून छान खरपूस परतून घेतले तर मस्त लागेल ही भाजी.

आवटीबाईंनी सांगायच्या आत मीच सांगते, विषयाला धरून बोला Angry Proud