भारत द्वेषाची 'ना'पाक भिंत..!

Submitted by अँड. हरिदास on 26 December, 2017 - 04:07

भारत द्वेषाची 'ना'पाक भिंत..!

हेरगिरी प्रकरणीच्या कथित आरोपात पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक आणि नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची अखेर काल त्यांच्या कुटुंबियांशी भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कुलभूषण जाधव यांच्या आई त्यांना भेटण्याची विनंती पाकिस्तानकडे करत होत्या, मात्र पाकिस्तान त्यांना भेटण्याची परवानगी देत नसल्याने त्यांच्या आई आणि पत्नीचा धीर खचला होता. मात्र शेवटी भारताने सतत केलेल्या मागणीपुढे व आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे पाकिस्तानला नमावे लागले. आणि, कुलभूषण यांच्या आई व पत्नीला पाकिस्तानला व्हिसा द्यावा लागला. काल तब्बल दीड वर्षानंतर जाधव कुटुंबीयांची भेट झाली. मात्र यावेळी भेट कमी आणि त्याचा देखावाच अधिक करण्यात आला. मानवतावादाचा विचार करूनच जाधव यांच्या कुटुंबियांना व्हिसा देण्यात येत असल्याचा ढोल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने वाजवला. परंतु, प्रत्यक्षात या मानवतावादाच्या अडून एक अमानवीय राजकारण खेळल्या गेले. जाधव यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात पोहचल्या, त्यांना कुलभूषण जाधव यांची भेटही देण्यात आली मात्र ती दूरवरून आणि काचेच्या भिंतीपलीकडून. त्यांचे बोलणेही झाले पण ते इंटरकॉमवर. शिवाय ही भेट पाक अधिकाऱयांनी रेकॉर्ड केल्याचेही वृत्त आहे. याच पद्धतीने भेट घडवायची होती तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही अशी भेट होऊ शकली असती. पण, तसे केले असते तर पाकिस्तानला आपल्या उदारमतवादाचा देखावा करता आला नसता. अर्थात, पाक कितीही मानवतेच्या बाता मारत असला तरी त्याचा खरा चेहरा अंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा उघड झाला आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैनिक तेथील जनतेवर कसे अत्याचार करतात हे दाखविण्यासाठी पाकिस्तानने एका महिलेचा फोटो संयुक्त राष्ट्रसंघात दाखविला होता. मात्र तो फोटो काश्मीरमधील नसून पॅलेस्टाईनमधील असल्याचे उघड झाल्यानंतर पाकचे नाक कापल्या गेले. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणातही पाकचा बनाव अनेकवेळा समोर आला आहे.

हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपांवरून भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक करून त्यांच्यावर लष्करी न्यायालयात तथाकथित खटला चालवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यादरम्यान भारताला साधी बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. कुलभूषण जाधव कोणत्या तुरुंगात आणि कशा अवस्थेत आहे याचीही कोणतीच कल्पना भारताला देण्यात आली नाही. भारताने विनंत्या केल्या. पण, पाकिस्थानकडून कोणतीच माहिती पुरवण्यात आली नाही. कदाचित पुरावे सिद्ध होऊ शकत नसतील व खोटेच असतील, तर सादर काय करायचे; ही पाकची समस्या असावी. त्यामुळेच जाधव यांच्या खटल्याबाबत संपूर्णपणे गोपनीयता राखली गेली. त्यानंतर अचानकपणे जाधव यांना दोषी ठरवून फाशी फर्मावण्यात आल्याची बातमी झळकली. वास्तविक, 1977 च्या व्हिएन्ना करारानुसार, अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याच्या देशाकडून वकिली मदत घेता येते. परंतु कुलभूषण जाधव यांना अटक करण्यापासून त्यांना शिक्षा जाहीर करेपर्यंत पाकिस्तानने भारताची बाजू ऐकूनच घेतली नाही. जाधव हे भारतीय नागरिक आहेत. त्यांना पकडून त्यांच्यावर परस्पर खटला चालविण्याचा प्रकार व त्यांना भारतीय दूतावासातील अधिका-यांना भेटू न देणे किंवा भारताला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कच उपलब्ध होऊ न देण्याचा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय व मुख्यत: व्हिएन्ना संकेतांचा भंग होता. त्यामुळे भारताने या प्रकाराची आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. आणि पाकिस्तानचा इरादा उधळला गेला. नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांची फाशी स्थगित करत न्यायाच्या सगळ्या संकेतांना आणि परंपरांना काळे फासणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पण यावरही पाकचा कांगावा सुरूच राहिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हा खटला चालविण्याचा अधिकारच नाही असा युक्तिवादही पाकने केला. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे खोडून काढत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला नागडे केले.

जाधव यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली भेट हासुद्धा याच दबावाचा परिमाण म्हटला पाहजे. कारण जाधव कुटुंबियांना अजून काही काळ भेट नाकारल्या गेली असती तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दबाव वाढला असता. तसेही काही दिवसात पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू मांडायची आहे. त्याठिकाणी भारताविरोधात गरळ ओकायला आणि आपण सभ्य असल्याचे दर्शवायला पाकिस्तनाला काहीतरी कारण हवे होते. त्यामुळेच हि भेट देण्यात आली. मुळात भारतद्वेषाने पाकिस्तानची मती भ्रष्ट झाली आहे. याच द्वेषातून दोन ती वेळा पाकने भरातविरोधात युद्ध पुकारली. पण, भारताशी सरळ युद्धात विजय मिळवू शकत नाही हे लक्षात आल्या नंतर पाकने दहशतवादाचा साहारा घेतला. धार्मिक कट्टरता वाद जोपासत दहशत वादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरु केले.. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतंकवाद्यांना रसद पुरविणे, त्यांचे रक्षण करणे असे काम पाक सुरवातीपासून करत आला आहे. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा सुद्धा पूर्वग्रहदूषितच आहे. काश्मीर कितीही अशांत झाले तरी विलग होत नाही आणि चार दशकांपूर्वी ‘पूर्व पाकिस्तान’ असलेला बांगलादेशही भारताशीच सलोखा वाढवतो.. ही पाकिस्तानची जळजळ कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यामागे आहे हे निश्चित. म्हणून तर बांगला देशसोबतच्या सहकार्य कराराची घोषणा भारताने केली त्याच दिवशी जाधव यांच्या फाशीचे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर भारताला आता कटुनीतीचा वापर करून हा प्रश्न सोडवावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत या विषयाला अतिशय योग्य रित्या हातळले. त्यामुळेच जाधव यांची फाशी स्थगित होऊ शकली. त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. मात्र हा संघर्ष अजून संपलेला नाही.पाकिस्तान हे आपल्यासाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे, ते मुकाट सहन करून बरे होणार नाही. तद्वातच फक्त छाती चा आकार मोठा असूनही चालणार नाही.. कटुनीती आणि जशास तसे उत्तर देण्याची राजकारणविरहित क्षमता भारताच्या नेतृत्वाला ठेवावी लागले..!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचून वाईट वाटलं.इतक्या दूर बोलावून अशी टेलिफोनिक भेट घडवून आणणं, सौभाग्य चिन्ह काढायला लावणं हा दुष्टपणा.(यात मेटल पार्ट हा एक भाग असला तरी मनोधैर्य खच्ची करणं हा हिडन हेतू असू शकतो.भारतीय स्त्रिया अजूनही सार्वजनिक ठिकाणी बिना मंगळसूत्र/सौभाग्य चिन्ह जाणे अशुभ सूचक मानतात (जीन्स वर/काही बोल्ड नेकपीस असताना फॅशन म्हणून मंसू न घालने हा क्वचित अपवाद)).
मारहाणीची चिन्हंही दिसत होती.

सुरवातीला तर अनेकांची अशी समजूत होती की या आप्‍तस्वकियांच्या भेटीनंतर कुलभूषणना फाशी दिले जाऊ शकेल. त्यामुळे प्रत्यक्षात आई व पत्नीला त्यांना अखेरचेच दर्शन घ्यायचे आहे, असेही म्हटले गेले होते; पण पाकिस्तानी डॉ. महंमद फैसल यांनी त्याचा साफ इन्कार केल्यानंतर या भेटीच्या मागे मानवतेच्या गप्पा मारल्या गेल्या.. मात्र काल प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर खरा प्रकार समोर येऊ लागला आहे.. हे निव्वळ भारत द्वेषाचे राजकारण होते, यात शंका नाही.

हा आपल्या देशाचा अपमान आहे. आपल्या मायभगिनींचा जाहीर अपमान आहे. ९० हजार पाकड्यांना युद्धकैदी असून सर्व मानमरातब आणि सोयीसुविधेने ठेवणारी आपली युद्धसंस्कृती, स्वतःची कांबळी युद्धकैद्यांना देऊन मानवता निभवणारे आपले भारतीय सैनिक आणि भारतीयत्व आहे. हरामखोर पाकड्यांना ह्या अपमानाचा मोबदला लवकरात लवकर द्यावा लागू दे हीच माझी ५६ इंची देवाला प्रार्थना.... Sad

हरामखोर पाकड्यांना ह्या अपमानाचा मोबदला लवकरात लवकर द्यावा लागू दे हीच माझी ५६ इंची देवाला प्रार्थना....<<
>>>सत्ताधारी कुणीही असो एकादी घटना झाली की, घटनेचा त्रीव्र निषेध करत घासून गुळगुळीत झालेले इशारे पाकिस्तनाला दिले जातात.. यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, त्यांना धडा शिकवणारच.. दहशतवाद्याना जश्यास तसे उत्तर देऊ..या नेहमीच्या धमक्या देण्यात येतात. मात्र सोडणार नाही म्हणजे काय? दहशतवादी भारताच्या ताब्यात थोडीच आहे....अर्थात, कुठल्याही प्रश्नाच उत्तर शांततेच्या मार्गाने सोडवायची आपली पद्दत आहे. कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसत या म्हणीप्रमाणे भारताने कधीच आगळीक केली नाही. परंतु पाणी आता डोक्यावरून जायला लागले आहे. त्यामुळे किमान दगड तरी भिरकावला गेला पाहिजे...

मायबोलीवर पाकिस्तान आणि मुस्लिम लोकांच्या विरोधात फार कडवटपणे लिहू नये. लोकांच्या भावना दुखवतात.
लेख आवडला आणि पटला.

http://mea.gov.in/press-releases.htm?dtl%2F29239

Statement by the official spokesperson on Shri Kulbhushan Jadhav’s meeting with his family

December 26, 2017

As you are all aware, the mother and wife of Shri Kulbhushan Jadhav met him yesterday in Islamabad. The meeting took place after requests by India for family access.
Prior to the meeting, the two Governments were in touch through diplomatic channels to work out its modalities and format. There were clear understandings between the two sides and the Indian side scrupulously abided by all its commitments.
However, we note with regret that the Pakistani side conducted the meeting in a manner which violated the letter and spirit of our understandings. This included:

i. The Pakistani press was allowed on multiple occasions to approach family members closely, harass and hector them and hurl false and motivated accusations about Shri Jadhav. This was despite a clear agreement that the media would not be allowed close access.

ii. Under the pretext of security precautions, the cultural and religious sensibilities of family members were disregarded. This included removal of mangal sutra, bangles and bindi, as well as a change in attire that was not warranted by security.

iii. The mother of Shri Jadhav was prevented from talking in their mother tongue, although this was clearly the natural medium of communication. She was repeatedly interrupted while doing so and eventually prevented from proceeding further in this regard.

iv. Deputy High Commissioner was initially separated from family members who were taken to the meeting without informing him. The meeting was started without his presence and he could join only after pressing the matter with concerned officials. Even then, he was kept behind an additional partition that did not allow him access to the meeting as agreed.
For some inexplicable reason, despite her repeated requests, the shoes of the wife of Shri Jadhav were not returned to her after the meeting. We would caution against any mischievous intent in this regard.
From the feedback we have received of the meeting, it appears that Shri Jadhav was under considerable stress and speaking in an atmosphere of coercion. Most of his remarks were clearly tutored and designed to perpetuate the false narrative of his alleged activities in Pakistan. His appearance also raises questions of his health and well being.
We also regret that contrary to assurances, the overall atmosphere of the meeting was intimidating insofar as family members were concerned. Family members, however, handled the situation with great courage and fortitude.
The manner in which the meeting was conducted and its aftermath was clearly an attempt to bolster a false and unsubstantiated narrative of Shri Jadhav’s alleged activities. You would all agree that this exercise lacked any credibility.

New Delhi
December 26, 2017

माझ्या नाहीत पण तुमच्या दुखावल्या गेल्या असं दिसतंय.
Submitted by सायो on 26 December, 2017 - 18:30

>> तुम्ही काय लिहित आहात हे तुमचं तुम्हाला तरी कळत असेल अशी आशा करतो...
स्थळ, काळ, वेळ, घटना, भावना न बघता काड्या टाकायला तुम्हाला कसं काय सुचतं याबद्दल मात्र आश्चर्य वाटले.

पॉवरफुल देशांनी थोडी मदत केली तर अजूनही सुखरुप घरी परत येऊ शकतील. प्रत्यक्ष भेटू द्यायला हरकत नव्हती.एनीवे सेफ्टी चे कारण देऊन कपडे बदलवले आणि दागिने /सौभाग्यचिन्हे काढवली होतीच.अजून स्क्रिन पार्टिशन आणि इंटरकॉम भेटीच्या फार्स ची गरज नव्हती.

>>स्थळ, काळ, वेळ, घटना, भावना न बघता काड्या टाकायला तुम्हाला कसं काय सुचतं याबद्दल मात्र आश्चर्य वाटले>> काड्या टाकल्या नाहीत पण तुमचा पहिला प्रतिसाद मला सार्कॅस्टिक वाटला आणि म्हणून मी तसं लिहिलं आहे. तसं नसल्यास क्षमस्व.

--------
पाकिस्तान सुखी सुखी भेट घ्यायला देईल असे कोणी मानत नव्हते परंतु इतक्या अपमानास्पद वागणूक दिली जाईल याची कल्पना कुणाला नव्हती. या वागणुकीचा जाब सुषमा स्वराज नक्कीच खडसावून विचारतील. सयुंक्त राष्ट्रात या वागणुकीचा मुद्दा त्या उचलून धरतील.
यावरून राजदूत ला बोलावून नोटीस द्यायला हरकत नाही. अर्थात जे कठोर असेल त्याचा अवलंब स्वराज या करतील ही अपेक्षा आहे. (त्यांच्याकडूनच ठेवता येईल. )

डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट म्हणून काही लिहिले तर "पाकिस्तान प्रेमी" असा शिक्का बसणार नाही अशी आशा !

इतक्या हाय प्रोफाईल हेराची कुटुंबियांशी भेट घडवून आणणे हेच मुळात एक गुडविल आहे असे असताना त्यांनी सौभाग्य अलंकार घालू न देणे, काचेच्या आडून भेट घेऊ देणे, आपल्या भाषेत बोलू न देणे ही सर्व खबरदारी घेतली तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे ? आपल्या ड्रुष्टीने कुलभूषण काहीही असो, पाक च्या दृष्टीने तो परकीय हेर आहे. कसाब बद्दल आपल्या काय भावना आहेत त्याच त्यांच्या कुलभुषण बद्दल आहेत हे कटू सत्य आहे. भारताच्या ताब्यात आलेल्या एखाद्या पाकिस्तानी हेराला भेटायला त्याची पत्नी व आई बुरखा घालून आल्या तर परवानगी देण्यात येइल ? त्यांना त्यांच्या अगम्य भाषेत बोलू दिले जाईल? डोमेस्टिक कंपल्शन्स त्यांनाही आहेत. नेपाळ मध्ये पकडलेला एक पाकिस्तानी अधिकारी भारताच्या ताब्यात आहे अशी शक्यता आहे. आपला हात दगडाखाली आहे.

मुळात बॅक चॅनेल ने वाटाघाटी करून एकाच्या बदल्यात एक अशी अदलाबदल करण्या ऐवजी भारत हे एस्केलेट करत आहे असे वाटते. अर्थत त्यात ही काही करणे असतील.

( येऊ द्यात अंडी व टोमॅटो !)

भारतात अंडर अरेस्ट हेराच्या नातेवाईकांना अगम्य भाषेत दुभाष्या प्रेझेंट ठेवून बोलू दिले जाईल असे भारताचे सहिष्णू धोरण पाहून वाटते.

>>काड्या टाकल्या नाहीत पण तुमचा पहिला प्रतिसाद मला सार्कॅस्टिक वाटला आणि म्हणून मी तसं लिहिलं आहे.<<
सहमत.

५६ इंची वगैरे राँग चॉइस ऑफ वर्ड्स; खास करुन या घटनेसंदर्भात...

जाधव हे खरेच भारतीय हेर असण्याची शक्यता कितपत आहे यावर मायबोलीवर चर्चेचा धागा आहे का? किंवा त्यासंदर्भाने एखाद्या चर्चेचा बातमीचा संदर्भ ईथे कोणी देईल का? हे प्रकरण कानावर येणार्‍या बातम्यातूंन आणि देशभक्तीपर व्हॉटसअप पोस्टमधूनच वाचले आहे. घडल्या घटनेवर थेट व्यक्त होण्याआधी सविस्तर जाणून घ्यायची ईच्छा आहे. माझ्यासारखेच ईथे सर्वांनाच सारे माहीत असण्याची शक्यता नाही.

मला जी माहिती ऐकण्यात आली त्या नुसार,

1) पाक ने टर्म्स अँड कंडिशन्स आधीच स्पष्ट केल्या होत्या.
- जर या अटी अपमानास्पद होत्या तर सरकारने त्या पायरीवरच अटकाव करायला हवा होता.तेव्हा अटी स्वीकारून आता हो-हल्ला करून उपयोग नाही.

2) what ever said and done श्री जाधव पाकिस्तान साठी हेर/कारस्थानी/देश विघातक कारवाया करणारे आहेत.
हा आरोप खरा की खोटा हा भाग बाजूला ठेऊ,

उद्या कसाब ला भेटायला त्याची आई आली असती तर काय वातावरणात त्यांची भेट भारताने घडवली असती याचा विचार व्हावा.

3) भारत सरकारने या पैकी कोणत्याही गोष्टीचा निषेध नोंदवला नाहीये, जाब विचारला नाहीये त्या अर्थी राजनैतिक पातळीवर हा प्रकार स्वीकारला गेला आहे, आता सामान्य नागरिकांनी आरडाओरड करून काही फरक पडणार नाही असे वाटते

सिम्बा,

<< मला जी माहिती ऐकण्यात आली त्या नुसार,

1) पाक ने टर्म्स अँड कंडिशन्स आधीच स्पष्ट केल्या होत्या.
- जर या अटी अपमानास्पद होत्या तर सरकारने त्या पायरीवरच अटकाव करायला हवा होता.तेव्हा अटी स्वीकारून आता हो-हल्ला करून उपयोग नाही. >>

हे नानाकळांच्या प्रतिसादातील प्रेस स्टेटमेंटनुसार पाहू गेले, तर खरे नाही, असे दिसते.

>>>> नानाकळांच्या प्रतिसादातील प्रेस स्टेटमेंटनुसार पाहू गेले, तर खरे नाही, असे दिसते.>>>>
ओक हा मुद्दा आधी क्लिअर झाला असेल तर माझा प्रतिसाद रद्द समजावा Happy
मी हा घटनाक्रम फॉलो करत नाहीये, काल मित्राशी बोलण्यातून जे कळले ते लिहिले

पाक ने टर्म्स अँड कंडिशन्स आधीच स्पष्ट केल्या होत्या.
- जर या अटी अपमानास्पद होत्या तर सरकारने त्या पायरीवरच अटकाव करायला हवा होता.तेव्हा अटी स्वीकारून आता हो-हल्ला करून उपयोग नाही.<<
>>अशा टर्म आणि कंडिशन स्पष्ट नव्हत्या.. माझ्या माहितीप्रमाणे.. आणि असतीलही तर मानवी मूल्यांचा ढोल का वाजवला गेला.

उद्या कसाब ला भेटायला त्याची आई आली असती तर काय वातावरणात त्यांची भेट भारताने घडवली असती याचा विचार व्हावा.<<
>>पहिली गोष्ट कसाब अतिरेकी कारवाई करताना रंगेहात पकडला गेला होता.. त्याच्या विरोधात कोणतेच षडयंत्र रचल्या गेले नव्हते. माणसं मारतांना त्याला पकडले होते. पाकिस्थान ने कसाब ला शेवटपर्यंत स्वीकारले नाही.

भारत सरकारने या पैकी कोणत्याही गोष्टीचा निषेध नोंदवला नाहीये, जाब विचारला नाहीये त्या अर्थी राजनैतिक पातळीवर हा प्रकार स्वीकारला गेला आहे, आता सामान्य नागरिकांनी आरडाओरड करून काही फरक पडणार नाही असे वाटते<<
>>बर्याचदा सरकारने काही गोष्टींचा विरोध करावा यासाठी जनमत बाध्य करत असते.. आज होणार पाकिस्थान निषेध उद्या सरकारला याबाबतचा निषेध करण्यासाठी बाध्य करू शकतो. तसेही आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत हा मुद्दा मांडणार असल्याचे संकेत आहेत.. अर्थात याला अधिकृत दुजोरा नाही

इतक्या हाय प्रोफाईल हेराची कुटुंबियांशी भेट घडवून आणणे हेच मुळात एक गुडविल आहे <<<
>>>जाधव यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटू देण्यातून पाकने भारतावर किंवा जाधव यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार हे कोणत्याही देशाचे कर्तव्यच आहे. केवळ नातेवाईकच नव्हे तर भारतीय उच्चायोग अधिकाऱयांनाही जाधव यांना भेटण्याचा अधिकार आहे. याला तांत्रिक भाषेत ‘कॉन्स्युलर ऍक्सेस’ असे म्हणतात.

ह्या धाग्याशी तसा डायरेक्ट सबंधित नाहीये पण प्रफुल्ल मोहरकरांची बातमी जेव्हा वाचली तेव्हा हताश वाटले( पुन्हा एकदा).
आणी त्यात ते मुर्ख चॅलेन्वाले असे फालतु प्रश्ण विचारतात कसलेच भान न ठेवता आणि बोलतात , तसे इथे काही प्रतिसाद वाटतो/वाटतात.
सैनिकाच्या आईला विचारतात की, पाकिस्तान हल्ल्याविषयी काय भावना आहेत?

भारत सरकारने या पैकी कोणत्याही गोष्टीचा निषेध नोंदवला नाहीये, जाब विचारला नाहीये त्या अर्थी राजनैतिक पातळीवर हा प्रकार स्वीकारला गेला आहे, आता सामान्य नागरिकांनी आरडाओरड करून काही फरक पडणार नाही असे वाटते<<

>>जाधव प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उद्या गुरुवारी संसदेत निवेदन देणार आहेत. कदाचित उद्या आपल्या या प्रश्नाला संसदेत उत्तर मिळेल..!

Pages