भारत द्वेषाची 'ना'पाक भिंत..!

Submitted by अँड. हरिदास on 26 December, 2017 - 04:07

भारत द्वेषाची 'ना'पाक भिंत..!

हेरगिरी प्रकरणीच्या कथित आरोपात पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक आणि नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची अखेर काल त्यांच्या कुटुंबियांशी भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कुलभूषण जाधव यांच्या आई त्यांना भेटण्याची विनंती पाकिस्तानकडे करत होत्या, मात्र पाकिस्तान त्यांना भेटण्याची परवानगी देत नसल्याने त्यांच्या आई आणि पत्नीचा धीर खचला होता. मात्र शेवटी भारताने सतत केलेल्या मागणीपुढे व आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे पाकिस्तानला नमावे लागले. आणि, कुलभूषण यांच्या आई व पत्नीला पाकिस्तानला व्हिसा द्यावा लागला. काल तब्बल दीड वर्षानंतर जाधव कुटुंबीयांची भेट झाली. मात्र यावेळी भेट कमी आणि त्याचा देखावाच अधिक करण्यात आला. मानवतावादाचा विचार करूनच जाधव यांच्या कुटुंबियांना व्हिसा देण्यात येत असल्याचा ढोल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने वाजवला. परंतु, प्रत्यक्षात या मानवतावादाच्या अडून एक अमानवीय राजकारण खेळल्या गेले. जाधव यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात पोहचल्या, त्यांना कुलभूषण जाधव यांची भेटही देण्यात आली मात्र ती दूरवरून आणि काचेच्या भिंतीपलीकडून. त्यांचे बोलणेही झाले पण ते इंटरकॉमवर. शिवाय ही भेट पाक अधिकाऱयांनी रेकॉर्ड केल्याचेही वृत्त आहे. याच पद्धतीने भेट घडवायची होती तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही अशी भेट होऊ शकली असती. पण, तसे केले असते तर पाकिस्तानला आपल्या उदारमतवादाचा देखावा करता आला नसता. अर्थात, पाक कितीही मानवतेच्या बाता मारत असला तरी त्याचा खरा चेहरा अंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा उघड झाला आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैनिक तेथील जनतेवर कसे अत्याचार करतात हे दाखविण्यासाठी पाकिस्तानने एका महिलेचा फोटो संयुक्त राष्ट्रसंघात दाखविला होता. मात्र तो फोटो काश्मीरमधील नसून पॅलेस्टाईनमधील असल्याचे उघड झाल्यानंतर पाकचे नाक कापल्या गेले. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणातही पाकचा बनाव अनेकवेळा समोर आला आहे.

हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपांवरून भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक करून त्यांच्यावर लष्करी न्यायालयात तथाकथित खटला चालवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यादरम्यान भारताला साधी बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. कुलभूषण जाधव कोणत्या तुरुंगात आणि कशा अवस्थेत आहे याचीही कोणतीच कल्पना भारताला देण्यात आली नाही. भारताने विनंत्या केल्या. पण, पाकिस्थानकडून कोणतीच माहिती पुरवण्यात आली नाही. कदाचित पुरावे सिद्ध होऊ शकत नसतील व खोटेच असतील, तर सादर काय करायचे; ही पाकची समस्या असावी. त्यामुळेच जाधव यांच्या खटल्याबाबत संपूर्णपणे गोपनीयता राखली गेली. त्यानंतर अचानकपणे जाधव यांना दोषी ठरवून फाशी फर्मावण्यात आल्याची बातमी झळकली. वास्तविक, 1977 च्या व्हिएन्ना करारानुसार, अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याच्या देशाकडून वकिली मदत घेता येते. परंतु कुलभूषण जाधव यांना अटक करण्यापासून त्यांना शिक्षा जाहीर करेपर्यंत पाकिस्तानने भारताची बाजू ऐकूनच घेतली नाही. जाधव हे भारतीय नागरिक आहेत. त्यांना पकडून त्यांच्यावर परस्पर खटला चालविण्याचा प्रकार व त्यांना भारतीय दूतावासातील अधिका-यांना भेटू न देणे किंवा भारताला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कच उपलब्ध होऊ न देण्याचा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय व मुख्यत: व्हिएन्ना संकेतांचा भंग होता. त्यामुळे भारताने या प्रकाराची आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. आणि पाकिस्तानचा इरादा उधळला गेला. नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांची फाशी स्थगित करत न्यायाच्या सगळ्या संकेतांना आणि परंपरांना काळे फासणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पण यावरही पाकचा कांगावा सुरूच राहिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हा खटला चालविण्याचा अधिकारच नाही असा युक्तिवादही पाकने केला. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे खोडून काढत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला नागडे केले.

जाधव यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली भेट हासुद्धा याच दबावाचा परिमाण म्हटला पाहजे. कारण जाधव कुटुंबियांना अजून काही काळ भेट नाकारल्या गेली असती तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दबाव वाढला असता. तसेही काही दिवसात पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू मांडायची आहे. त्याठिकाणी भारताविरोधात गरळ ओकायला आणि आपण सभ्य असल्याचे दर्शवायला पाकिस्तनाला काहीतरी कारण हवे होते. त्यामुळेच हि भेट देण्यात आली. मुळात भारतद्वेषाने पाकिस्तानची मती भ्रष्ट झाली आहे. याच द्वेषातून दोन ती वेळा पाकने भरातविरोधात युद्ध पुकारली. पण, भारताशी सरळ युद्धात विजय मिळवू शकत नाही हे लक्षात आल्या नंतर पाकने दहशतवादाचा साहारा घेतला. धार्मिक कट्टरता वाद जोपासत दहशत वादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरु केले.. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतंकवाद्यांना रसद पुरविणे, त्यांचे रक्षण करणे असे काम पाक सुरवातीपासून करत आला आहे. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा सुद्धा पूर्वग्रहदूषितच आहे. काश्मीर कितीही अशांत झाले तरी विलग होत नाही आणि चार दशकांपूर्वी ‘पूर्व पाकिस्तान’ असलेला बांगलादेशही भारताशीच सलोखा वाढवतो.. ही पाकिस्तानची जळजळ कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यामागे आहे हे निश्चित. म्हणून तर बांगला देशसोबतच्या सहकार्य कराराची घोषणा भारताने केली त्याच दिवशी जाधव यांच्या फाशीचे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर भारताला आता कटुनीतीचा वापर करून हा प्रश्न सोडवावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत या विषयाला अतिशय योग्य रित्या हातळले. त्यामुळेच जाधव यांची फाशी स्थगित होऊ शकली. त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. मात्र हा संघर्ष अजून संपलेला नाही.पाकिस्तान हे आपल्यासाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे, ते मुकाट सहन करून बरे होणार नाही. तद्वातच फक्त छाती चा आकार मोठा असूनही चालणार नाही.. कटुनीती आणि जशास तसे उत्तर देण्याची राजकारणविरहित क्षमता भारताच्या नेतृत्वाला ठेवावी लागले..!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताच्या ताब्यात आलेल्या एखाद्या पाकिस्तानी हेराला भेटायला त्याची पत्नी व आई बुरखा घालून आल्या तर परवानगी देण्यात येइल ? त्यांना त्यांच्या अगम्य भाषेत बोलू दिले जाईल? >>>>>> विकु, तुमचे काही मुद्दे पटण्यासारखे असले तरी हा मुद्दा नक्कीच पटण्यासारखा नाहीये. कुंकु लावणारी बाई काय कपाळावर टिकलीच्या आकाराचा बाँब लावणार होती का? मंगळसुत्रात काय फटाक्याची लड असणार होती का? उलट बुरख्या मध्ये काहीही लपवु शकता. पण बुरखा असो वा कुंकु-मंगळसुत्र, यात वागवणे काय गैर आहे? पोलीसां मध्ये स्त्रीया असतात की. त्या चेक करु शकल्या असत्या की कुंकु आणी मंगळसुत्र कितपत धोकादायक आहे ते. आता काय तर म्हणे बुटांमध्ये जाधव सासु सुना काहीतरी लपवत होत्या. धन्य आहेत हे महाभाग. ज्या देशाचा जन्मच मुळात भारत द्वेषातुन झालाय त्यांच्याकडुन काय दुसरी अपेक्षा करणार म्हणा!

मागे मी कुठल्याश्या मासिकात ही माहिती याची देहा याची डोळा बघीतली/ वाचली होती की सियाचीन मध्ये जे पाकी सैनिक पहारा ( पाकी बाजूने ) देत असतात त्यांना त्यांचे लष्कर/ सरकार बुट, स्वेटर/ जॅकेट/ कॅप असे थंडीमध्ये रक्षण करण्यासाठी काहीही देत नाही. त्यांचे फोटो पण होते त्यात की ज्यात ते लोक नुसते पठाणी वेषात होते. चक्क आपल्या सैनिकांनी त्यांना मानवतेच्या दृष्टीने कपडे आणी बुट तसेच काही खाद्य पदार्थ देऊ केले होते. आता आपले आर्मी वाले काही टिनपाट राजकारणी नाहीत जे मतांकरता लोकांमध्ये कपडे, वस्तु वाटत फिरतील. पण ही बातमी पत्रकारांनी ( त्या मासिकाच्या ) छापली तेव्हा त्यांचा पण विश्वास बसत नव्हता. पण भारतीय लष्कर हे पाकड्यांसारखे कट्टर आणी माथेफिरु नाही हे जगाला माहीत आहे.

पण पाकडे हे सापासारखे आहेत. कितीही दूध पाजा, उलटणारच. जाधव आणी बाकी लोक पाकड्यांच्या कैदेतुन लवकर सुटोत ही देवाचरणी ( ५६ इंच नव्हे ) प्रार्थना.

नानाकळा तुम्ही स्वतः मोदींविषयी असे लिहीत आहात आणी सायो ह्यांना उपदेश करत आहात, हे खूपच विनोदी आहे. तुमच्या सारख्या अभ्यासु आणी सामाजीक जाणिव असणार्‍या माणसाकडुन ही अपेक्षा नव्हती.

कुंकु लावणारी बाई काय कपाळावर टिकलीच्या आकाराचा बाँब लावणार होती का? मंगळसुत्रात काय फटाक्याची लड असणार होती का? उलट बुरख्या मध्ये काहीही लपवु शकता. पण बुरखा असो वा कुंकु-मंगळसुत्र, यात वागवणे काय गैर आहे? पोलीसां मध्ये स्त्रीया असतात की. त्या चेक करु शकल्या असत्या की कुंकु आणी मंगळसुत्र कितपत धोकादायक आहे ते. आता काय तर म्हणे बुटांमध्ये जाधव सासु सुना काहीतरी लपवत होत्या. <<
>> आत्ताची एक बातमी आहे..
मानवतेचा आव आणणाऱ्या पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद वागणूक तर दिलीच, पण पाकिस्तानी मीडियानेही आपल्या रानटीपणाचं दर्शन घडवलं आहे. जाधव यांना भेटून बाहेर पडल्यानंतर पाक मीडियाने जाधव यांच्या आई आणि पत्नीला गराडा घातला आणि त्यांच्यावर अचानक प्रश्नांचा भडिमार सुरू केला. 'खुनी मुलाला भेटून तुम्ही खूश आहात का?', असा उर्मट सवाल पाकिस्तानी मीडियाने त्यांना केला.

पाकड्यांसारखे कट्टर आणी माथेफिरु नाही हे जगाला माहीत आहे<<
>>भारतीय लष्कर आणि एकंदर भारतीय मानसिकता माथेफेरू नाही याच उदाहरण म्हणजे भारतीय नागरिकांना सरेआम कत्तल करताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतरही कसाबला आपल्या देशाने बिर्याणी खाऊ घालण्याची परवानगी दिली.. त्याला पूर्ण न्यायिक हक्क प्रदान केले.. ज्या देशाचा तो होता त्याने तर ओळखही दाखविली नाही.. भारताने त्याला बाजू मांडण्याची संधी दिली... याला मानवता म्हणतात..
आज पाकिस्तानजवळ कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात किती पुरावे आहेत हा संशोधनाचा प्रश्न आहे.. पाककडून सादर झालेले जवळपास सर्व पुरावे आंतरराष्ट्रीय न्यायालयात आले आहेत.. त्याचे वाभाडेही निघाले आहेत.. म्हणून तर कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती. पण तरीही काहींना कुलभूषण जाधव या भारतीय अधिकाऱ्याची तुलना विकृत आतंकवादी कसाब याच्याशी करायची आहे..

<कसाबला आपल्या देशाने बिर्याणी खाऊ घालण्याची परवानगी दिली..>
अहो, त्या पद्मपुरस्कृत उज्जव निकम यांनी न्यायालयात खोटं सांगितलं की कसाब बिर्याणीसाठी हट्ट करतोय. का तर म्हणे प्रसारमाध्यमांत रंगवलं गेलेलं कसाबचं चित्र लोकांच्या मनांत त्याच्याबद्दल सहानुभूती उत्पन्न करतंय.
(न्यायालयाचा निर्णय लोकभावनेवर ठरणार होता का? खटला आरोपीच्या गुन्ह्यांबद्दल होता की लोकभावनांना आंदोलनावण्यासाठी?
तुम्ही बिर्याणी खाण्याची परवानगीही देउन टाकलीत.

आता उगाच यातून मी पाक आणि कसाबबद्दल सहानुभूती व्यक्त केलीय असं म्हणत लाठ्या, सळ्या, तलवारी घेऊन येऊ नका. ते एकच खोटं पुन्हा पुन्हा फिरतंय त्याबद्दल आक्षेप.
कसाबवरचा खटला न्याय्यपद्धतीने चालवला गेलाच नाही, तर तसा तो दिसलाही, इतका की आपलेच लोक त्यावरून संतप्त होत होते. तर अगदी परदेशी दहशतवाद्यावरचाही खटला आपण न्याय्यपद्धतीने चालवतो, याचं महत्त्व जाधव आणि सरबजीत प्रकरणांवरून लोकांच्या लक्षात यावं.

बाकी जाधवप्रकरणी पाकिस्तानकडून वेगळी कोणती अपेक्षा असणार होती?

विकूंनी वर म्हटलं तसं अन्य देशांत असते तशी पकडल्या गेलेल्या हेरांच्या आदानप्रदानाची पद्धत भारत- पाकिस्तान
यांनीही स्वीकारायला हवी.

मला ह्या बाबतीत जास्त काही माहित नाही पण अजमल कसाब आणि कुलभूषण जाधव ह्यांच्यावर असलेल्या आरोपाच्या सिद्धतेची किंवा खरेपणाची पातळी सारखी कशी?
कसाब बाबतीत यत्किंचितही संदेह नव्हता किंवा नसेल कोणाच्याही मनात ( भारतीय नागरिक किंवा इतर कोणत्याही देशाच्या नागरिकाच्या मनात) की तो टेररिस्ट आहे की नाही कारण टेलिव्हिजन वर ते लाईव्ह दिसत होते, इतक्या लोकांनी त्याला समोरून गोळ्या झाडताना बघितले होते.त्याने त्याची आयडेंटिटी ही लपवली नव्हती.

कुंकु लावणारी बाई काय कपाळावर टिकलीच्या आकाराचा बाँब लावणार होती का?

तिने कुंकवात सायनाईड मिसळून ते हळूच त्याला दिले असते तर ? हे संतापजनक वाटेल पण पाकिस्तान कसा विचार करत असेल हेही पहाणे आवश्यक आहे. मुळात ही भेट घेऊ दिली, ही शेवटचीच भेट नाही असे सांगून अणखी भेटी देण्याची शक्यता जिवंत ठेवली, इतक्यात त्याला फाशी देणार नाही असे सांगून पाक दोन पावले मागे गेला आहे. अशा स्थितीत थोडी परिपक्वता दाखवून दगडाखालचा हात सोडवून घेणे महत्वाचे असतना भारतीय मिडिया कुंकु, मंगळसूत्र, अशा गैरलागू गोष्टीबद्दल का चर्चा करत आहे?

कुलभूषण आज पाकच्या ताब्यात आहे, त्याला अगदी आज फाशी देण्यापासून पाकला कुणीही रोखू शकत नाही, जिनेव्हा कन्वेन्शन इथे लागू होत नाही. आंतरराष्ट्रिय न्यायालयाचा निर्णय पाक वर बंधनकारक नाही. ज्या अधिकार्‍याने कुलभुषण ला अटक करण्यात भुमिका निभावली तो बहुदा भारताच्या ताब्यात आहे. वतावण निवळल्यावर कुलभुषण ची सुटका होईल अशी आशा आहे. असे असताना झोपलेल्या कुत्र्याला दगड का मारावा?

https://www.loksatta.com/manoranjan-news/madhur-bhandarkar-tweeted-film-...

चला एका तरी फिल्मवाल्याने या बाबत तोंड उघडले. नाहीतर पाकी कलाकारांना सामावुन घेण्यासाठी रोज मातम करणारे आणी हंबरडा फोडणारे बॉलीवुडचे तथाकथीत नेते महेश भट, सल्लुभाई वगैरे वगैरे लोक आता का गप्प आहेत हा प्रश्न कोणाच भारतीयाला पडला नसेल ना?

भारतातला प्रिझन कोड माध्यमांनी वाचलेला दिसत नाही.

http://bprd.nic.in/WriteReadData/userfiles/file/5230647148-Model%20Priso...

इथेही कैद्याच्या कुटुंबियांना काचेआडून फोनवरच बोलावं लागतं.

काही वर्षापूर्वी दिल्लीतील प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या पिंजर्‍यात एक वेडसर माणूस उतरला. वाघ त्या माणसाच्या अगदी समोर उभा राहिला होता. वाघ कुतुहलाने पहात होता. फार अ‍ॅग्रेसिव्ह वाटत नव्हता. लोकांनी पिन ड्रॉप शांतता राखली असती तर वाघ कदाचित परत फिरला असता. पण लोकांचे ओरडणे, किंचाळणे, रडारड, दगड मारणे वगैरेमुळे तो बिथरला व त्यने माणसाला ठार केले.

बेबी चित्रपतात एक प्रसंग आहे. मंत्री आणि डॅनी च्रचा करीत असताना. अक्षय कुमारला ' परदेशात घुसवण्यासाठी. तेव्हा त्याच्या राजनैतिक परिणामामुळे मंत्री सहज तयार होत नाही. तेव्हा डॅनी आश्वासन देतो की अक्षय पकडला गेला तर त्याला ' डिसओन' करू. हा आमचा माणूस नाही अशी भुमिका घेऊ. चित्रपट असला तरी सगलेच काल्पनिक नसते. त्यतल्या त्यात नीरज पांडेच्या. कसाब च्या बाबतीत पाक ची भूमिका अशीच होती की हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम नाही. तो खाजगी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून आला असेल तर त्याला शासन जबाबदार नाही. म्हणजे उदा. एखादा देशभक्त शिवसैनिक , केवळ सामन्यातून डरकाळ्या फोडण्यास कंटालून , जीवावर उदार होऊन सेनेतर्फे पाकमध्ये ' गर्वसे कहो .. असे ओरडत दहशतवादी कृत्ये करताना पकडला गेला तर त्याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम कसे म्हणता येईल? (कल्पनाही करवत नाही ना? ). किंवा नि:शस्त्र म्हातार्‍यावर गोळ्या झाडन्या ऐवजी एखादा अर्धचड्डिकानन्द , खरोखरीच जीवावर उदार होउन , ' संघ' टनेच्या पैशाने खर्च करून इस्लामाबादच्या संसदेवर बॉम्ब टाकता झाला (कसचं कसचं !) तर त्याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिसम कसे म्हणता येईल? आणि सरकार त्यांच्या कृट्याला देश म्हणून कसे जबाबदार असेल.? खरेच हिंदुत्ववाद्यानी पाकिस्तान नष्ट करायला अशा जिहादी सेना /संघ उभारायला काय हरकत आहे. नुसतेच चीर देंगे , खीर देंगे म्हणण्यात काय हशील आहे.

पाकिस्तान आपल्या दृष्टीने जितका वाईट, भयंकर वगैरे आहे तितकाच भारत पाकिस्तानच्या मते! आपण पाकिस्तानचे चित्र आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अतिरेक्यांना पोसणारा देश म्हणून रंगवतो. पाकिस्तानच्या मते भारत नेमके तेच करतो. हा झाला मुद्दा क्रमांक एक, जो विजय कुलकर्णींच्या मुद्यासारखा (थोडा तरी) आहे. तेव्हा कुलभूषण जाधवला दिली जाणारी वागणूक जगातील कोणताही देश त्या देशाविरुद्ध कारवाया करणार्‍याला देईल अशी किंवा त्यापेक्षा थोडी बरी आहे. (कुलभूषण मध्यमवयीन असूनही साठीचा का दिसत होता ह्यावर एक लहानशी चर्चा टीव्हीवर झाली. हे क्रौर्य पाकिस्तानकडे नक्कीच आहे व पूर्वी चार भारतीय जवानांचे त्यांनी कसे हाल केलेले होते हे सर्वांना माहीत आहे. ते हाल त्या सरकारने मात्र केले नव्हते, तेथील लष्करी अधिकार्‍यांनी केले होते.)

दुसरा मुद्दा: इतक्या वरच्या पातळीवर गेलेल्या प्रकरणात जनमत कसेकसे होईल, कसे व्हावे वगैरे सर्व विचार करून अशी धोरणे राबवली जातात (जात असावीत) जी इथल्या मुख्यमंत्र्यांनाही कळणार नाहीत. आपण तर काय, फुकटच्या जागेवर निषेध नोंदवता नोंदवता उपहासात्मक व राजकीय वगैरे स्वरुपाचे अभिप्राय देणारे सामान्यजन! भेटला तो कुलभूषणच होता का इथपासून प्रश्न असू शकतात. तसेच, तो तोच होता की नव्हता हे आपल्याकडील काही चंद लोकांना माहीतही असू शकते. मीडियावरील बातम्या, नाट्यमय एपिसोड्स आणि चर्चासत्रे मात्र जनमत तयार करत राहतात. काल एक मुल्ला टीव्हीवर म्हणाले की 'तीन तलाकला विरोध करणार्‍या मुस्लिम कट्टरांनाही शिक्षा व्हायला हवी'हे विधान बुरखा घालून करणारी महिला प्रत्यक्षात संघाची प्रतिनिधी आहे आणि तिला ते पर्सनली ओळखतात. तिला मुद्दाम मीडियाने बुरखा घालून हे वाक्य उच्चारायला लावले आहे असेही ते म्हणाले.

तिसरी गोष्ट म्हणजे भेट घेण्याआधी 'लॉ ऑफ लँड' किंवा तत्सम काहीतरी पाळायला सांगितले जाणे ह्यात सहसा काही गैर मानले जाऊ नये. ते नरेश अगरवाल की कोण ते समाजवादी नेते म्हणाले त्यात तथ्य आहे की पाकिस्तानसाठी कुलभूषण अतिरेकी आहे (किंवा त्याला पाकिस्तान मुद्दाम तसे दाखवत आहे). भारत काही मोठा संत देश असेल असेही काही नाही. जनतेपर्यंत सहसा ते पोचते जे पोचवायचे असते.

कुलभूषण आणि कसाब ही तुलना अयोग्य वाटते.

कुलभूषन हे बलुचिस्तानातून उचलण्यात आले म्हनतात. चित्र असे आहे की निवृत्त झालेत आणि आणि व्यवसाय करतात. आता त्यांचा आर्मीचा संबंध नाही. वगैरे. भारताच्या बलुचिस्तानाच्या धोरणात झालेला बदल की जो मोदींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणातून बोलून दाखवला. की आम्ही बलुचिना मदत करू असे काहीसे. त्यात कुलभूषणना बलुचिस्तानातून (की इराण मधून?) उचलण्यात आलेले आहे. तेव्हा कुलभूषण बलुचिस्तानात काही ' काम ' करत नसतीलच असे नाही. अर्थात जीव धोक्यात घालून ते करणे हे प्रचंड देशसेवा आहेच. त्यांच्या ' कामाची' घरच्याना कल्पना असनार आहे. त्यामुळे तेही तितकेच खंबीर झालेलेच असणार. आता यात काही निगोश्येशन्स होतील . कदाचित चन्दू चव्हाण सारखे सोडतीलही. हीच शक्यता जास्त आहे. पण बदल्यात काही खूंखार लोकाना सोडावे लागणार. ते कोण कंदाहारला अतिरेक्याना सोडल्याच्या गोष्टी सांगत असतात ना. तर तो अशा स्ट्रॅटेजीचा भाग असतोच. इन्केडिबल स्पाय ह्या चित्रपटातली इस्त्रायली हेराने तर सिरियाच्या लषक्रातच उच्च पदावर नोकरी मिळवली होती आणि माहिती पाठवत होता. ही सत्यकथा मी लहानपणी एका दिवाळी अंकात वाचली त्यावेळी थक्क झालो होतो. कोणत्याही क्षणी आपण शत्रू हाती स्स्पडून मरणार हे माहीत असूनही हे वाण घेणार्‍याना खरेच सलाम....

कुलभूषण आणि कसाब ही तुलना अयोग्य वाटते.>>> +1

Submitted by बेफ़िकीर on 28 December, 2017 - 20:40>>> कसाबला पाकिस्तान देशाने धाडले नसले तरी पाकिस्तान आपल्या होम ग्राउंड वर टेररिस्ट लोकांना थारा देतो हे नाकारता येईल का? किंवा तिथे गव्हरमेन्ट पेक्षा आर्मी चे जास्त चालते.ट्रम्प आधी ओबामांकडूनही पाकिस्तानला अनेकदा सांगितल्या गेले आहे तिथल्या टेररिस्ट च्या विरोधात कडक कारवाई करा.
बाकी पाकिस्तान भारतात बॉर्डर पाशी जे उद्योग करते आणि आमचा त्याच्याशी काही संबंध नाही किंवा आमच्या हे कंट्रोल बाहेर आहे असं म्हणते ह्यात कितपत तथ्य आहे असे तुम्हाला वाटते?
भारत ही कमी नाही आणि बलुचिस्तान मध्ये किडे करतो हे ठाऊक आहे.

आपण पाकिस्तानचे चित्र आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अतिरेक्यांना पोसणारा देश म्हणून रंगवतो. पाकिस्तानच्या मते भारत नेमके तेच करतो. हा झाला मुद्दा क्रमांक एक, >>>
भारत कुठल्या अतिरेक्यांना थारा देतो?त्यांची नावे कोणती?
बाकी पाकिस्तान अतिरेक्यांना थारा देतो हे फक्त भारत म्हणत नाहीये.खालील आर्टिकल हे देर्शवितो.
http://www.nybooks.com/daily/2017/12/12/militants-and-military-pakistans...

त्यातील हा खालचा पॅरा हेच देर्शवतो की पाकिस्तान आपल्या होम ग्राउंड वर टेर्ररीस्टला थारा देतो.आपण असल्या कुठल्या टेर्ररिस्ट ला थारा दिला आहे?

At the same time, the military is helping resurrect extremist groups that were used by General Zia ul-Haq back in the 1980s, or by General Pervez Musharraf after 2001. Hafiz Saeed, the leader of the extremist anti-India group Lashkar-e-Taiba (LT), was freed from house arrest in Lahore in late November after terrorism charges against him could not be proven. LT carried out the deadly 2008 Mumbai attack that left 166 people dead, including many foreigners, as well as attacks on Indian outposts in Kashmir. The US government imposed a $10 million bounty on Saeed and LT was declared a terrorist group by the United Nations, yet the Lahore court saw fit to release him. In the interim, the group had turned itself into a charitable organization and got permission to form a new political party, the Milli Muslim League, which will take part in elections next year under Saeed’s leadership. Indian officials are apoplectic about this legitimization of Saeed—the White House called the release of Hafiz Saeed a step that “belies Pakistani claims that it will not provide sanctuary for terrorists on its soil.” 

भारत कुठल्या अतिरेक्यांना थारा देतो?त्यांची नावे कोणती?<<<<

पाकिस्तानच्या मते कुलभूषण जाधव पाकिस्तानविरोधी कारवाया करत असे.

कुलभूषण बद्दल नाही पण आणखीन काही गोष्टी तुम्ही लिहिल्या आहेत त्या बद्दल बोलते आहे मी.

कुलभूषण सोडून हाफिज सईद किंवा दाऊद ह्यांच्या लेवलचा कुठला अतिरेकी किंवा terrorist भारताच्या होम ग्राउंड वर आहे आणि भारत त्या विरोधात ऍक्शन घेत नाही?

पाकिस्तानच्या मते कुलभूषण जाधव पाकिस्तानविरोधी कारवाया करत असे.}}}}

चूक ... पाकिस्तान त्याला हेर म्हणत आहे आणि तो बलुचिस्तान मध्ये भारत सरकार तर्फे काम करतोय.. कारवाई ऑपरेशन करताना पकडला नाही.. संशयावरून पकडला नंतसर चौकशी केली असे म्हणणे आहे
कुलभूषण यांना अतिरेकी वगैरे म्हणाले नाही ती हिम्मत पाकिस्तान करणार नाही.
आपण कसाबला अतिरेकी म्हणतो करण तो कारवाई करताना पकडला गेला त्यामुळे दोघांची तुलना चुकीची आहे. आणि ती होऊच शकत नाही

भारताने जसे पाकिस्तानाला अतिरेकी पाठवतो हे जगात सिध्द केले आहे तसे पाकिस्तान आपल्याला ठरवू शकत नाही. कारण असे लोक भारत पाठवत नाही.
त्यामुळे शहास प्रतिशह म्हणून भारत सरकार आमच्या देशात 'हेर' पाठवत आहे (अतिरेकी नाही) हे सिध्द करायचा प्रयत्न पाकिस्तान कुलभूषण आणि सबरजित यांना वापरून करत आहे. चंदू चव्हाण हे आर्मीत होते आणि चुकून लाईन क्रॉस केली होती. भारत सरकार ने तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केले होते त्यामुळे चंदू यांच्या विरुद्ध कोणताही कट पाक ला रचता आला नाही.

>>>>चूक ... पाकिस्तान त्याला हेर म्हणत आहे <<<<

>>>>कुलभूषण यांना अतिरेकी वगैरे म्हणाले नाही<<<<

कुलभूषण अतिरेकी आहे हे मीही म्हणालेलो नाही. तो पाकिस्तान विरोधी कारवाया करत आहे असे पाकिस्तानचे म्हणणे आहे असे म्हणालो आहे. आणि एका राष्ट्राचा हेर जो असतो तो दुसर्‍या राष्ट्रात जाऊन हेरगिरी करतो ती त्या दुसर्‍या राष्ट्राच्या विरुद्धच करत असतो. अन्यथा तो त्या दुसर्‍याच राष्ट्राचा हेर ठरेल. तुमच्या असंख्य अवतारांनंतर आज तुमच्याशी (नीट) बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आभार!

माझे प्रतिसाद समोरच्या प्रतिसादावर अवलंबून असतात.
तो वाकडा की मी तिकडा पण काही काही तुमच्या अवतारांना सरळ योग्य उत्तर दिले तरी ते वाकड्यात शिरले होते.
पुढच्या वेळेस घ्या काळजी Happy

यावरून शोलेचा एक संवाद आठवला.. " जब तक तेरे पैर चलेंगे तब तक इसकी सांसे चलेगी.."

बेफिकीर,
कुलभूषण जाधव हेर आहेत असे तुम्ही म्हणत असाल तर ठीक. मान्य.

बेफिकीर,
पाकिस्तान जाधवला हेर समजते आहे आणिक तो आहे/नाही इतपत मान्य आहे.

तुमच्या काही पोस्टनी तुम्ही त्यांना हाफिज सईद, दाऊद सारख्या टेररीस्ट किंवा अतिरेक्यांच्या रांगेत बसवत आहात किंवा पाकिस्तान बसवते आहे आणि ते तुम्हाला पटतंय अशी समजूत झाली.
पण आ.रा.रा आणि नंतरच्या तुमच्या प्रतिसादा नंतर कळाले की तुम्हाला काय म्हणायचे आहे.

>>>>पण आ.रा.रा आणि नंतरच्या तुमच्या प्रतिसादा नंतर कळाले की तुम्हाला काय म्हणायचे आहे.<<<<

अच्छा, त्यांनी पण प्रतिसाद दिला आहे का? ओके. काय म्हणतात ते?

भारत ही कमी नाही आणि बलुचिस्तान मध्ये किडे करतो हे ठाऊक आहे.>>>>>>> बलुचिस्तानच काय अख्ख्या पाकीस्तानात भारताने किडे मकोडे करावेत या मताची मी आहे. पख्तुनिस्तान ला पण पाठिंबा द्यावा. एका धडाक्यात सिंध पण वेगळे झाले तर? काय आहे काट्यानेच काटा काढावा. हे नापाकी डायरेक्ट युद्ध करता येत नाही म्हणून अश्या छुप्या लढाया लढतायत ना? मग आपण ही तेच करावे. अगदी अफगणिस्तान पासुन सगळीकडे धुमाकुळ घालावा. तसेही पिचपिचे चीनी आणी पाकीस्तानी हेच एकमेकांचे मित्र आहेत. बाकी जग यांचे विरोधी.

अगदी अफगणिस्तान पासुन सगळीकडे धुमाकुळ घालावा. तसेही पिचपिचे चीनी आणी पाकीस्तानी हेच एकमेकांचे मित्र आहेत. बाकी जग यांचे विरोधी.<<
>>सहमत, "धटासी असावे धट,उध्दटासी उद्धट..

मला न सुटलेले कोडे. १३० कोटीच्या विशाल भारत देशात पाकचे ३-५ हेर सरकारला सापडत नाही? अजुनही सापडलेले नाही ? तुरुन्गातही कुणीच नाही ? ज्यान्च्याबदल्यात देवाण घेवाण करुन आपल्या माणसाला परत आणायचे.

हे प्रकरण ICJ मधे भारताने नेले, तिथे पुरावे समोर आल्यावर जो निकाल मिळाला त्याने आपण पाकची कशी जिरवली म्हणुन दिवाळी साजरी केली. अरे अजुन जाधव पाकच्या ताब्यात आहेत, त्यान्ना आधी भारतात सुखरुप परतू द्या मग करा साजरी दिवाळी.

भारतातल्या पाक राजदुताला याबद्दल दोषी ठरवुन आपण चपला/ जोडे पाठवुन काय उपयोग? देशाचा राजदुत हा सन्वाद साधण्याचा महत्वाचा दुवा आहे, त्याला दुखावुन आपण कोणाचेच हित साधत नाही.

हे प्रकरण ICJ मधे भारताने नेले, तिथे पुरावे समोर आल्यावर जो निकाल मिळाला त्याने आपण पाकची कशी जिरवली म्हणुन दिवाळी साजरी केली. अरे अजुन जाधव पाकच्या ताब्यात आहेत, त्यान्ना आधी भारतात सुखरुप परतू द्या मग करा साजरी दिवाळी.>>
ICJ मध्ये नेले कारण साधी भेटण्याची परवानगीही दिली जात नव्हती.ती आता दिल्या गेली, पाक प्रेशर खाली आल्यामुळे. शिवाय पाकचा खोटारडेपणा बाहेर आला.हे गरजेचे होते कारण एरवी असे बरेच लोक आहेत ज्यांनी पाकच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता पण हे सर्व सगळ्यांच्या समोर ICJ त झाल्याने तसे आता होणार नाही.

बाकी दिवाळी मनवली वगैरे>>>...आपल्याकडे एरवीही छोटा आनंदही इतका मोठ्या प्रकारे मनवल्या जातो की नॉर्मल माणसाला हे झेपणे अवघड. आणि त्यात हे पाकिस्तान मग तर विचारायलाच नको.पाकिस्तान बरोबरची क्रिकेटची tournament किंवा मॅच जिंकलो तरीही युद्ध जिंकल्या प्रमाणे मनवल्या जाते.
ह्या गवर्मेंटला मुळात एक्सचेंज करायला एकही हेर मिळत नाही का?त्यांना खरच हे diplomaticaly सोडवायचे आहे का ?असे प्रश्ण काही जणांच्या मनात डोकावतात. हे म्हणजे ह्या सवाला सारखे झाले- खरंच कोणत्याही गव्हरमेन्टला कश्मीर प्रश्ण सोडवायचा आहे की हा गुंता असाच ठेऊन त्या मागचे पोलिटिकल मायलेज फक्त घ्यायचे आहे.अर्थात कश्मीर प्रश्ण सोडवणं अवघड आहे आणि हे त्या मानाने सोपे तरीही आपण का सोडवू शकत नाही म्हणून असे प्रश्ण उद्भवतात.ह्यात तीन शक्यता आहेत की :-
1) पहिली शक्यता ही की खरच प्रयत्न चालू आहेत आणि दिसते तितके हे सोपे नाही.
2) दुसरी शक्यता ही की प्रश्ण सोडवण्याकडे कल नसून त्या मागचा फायदा उचलण्याकडे कल आहे.
३) तिसरी ही की जितका सोडवता येईल तितका सोडवण्याकडेही कल आहे आणि हे करतांना सोबत भारता च्या आत मायलेज घेणे, इंटरनॅशनल पातळीवर विकटीम कार्ड प्ले करून (जे गरजेचे ही आहे.) भारतासाठी सहानुभूती मिळवणे हे ही आहे.
ह्यात नंबर 3 ची शक्यता जास्त वाटते.

बाकी,
हेर सापडला तरीही पाक exchange offer स्वीकारेल का?पहिले तर अश्या agent कडे secrets असतील तर ते त्याच्या कडून काढल्या शिवाय भारत त्याला सोडणार नाही आणि exchange करायला बघणार नाही. आणि तसे नसेल तर त्यांनी exchange ऑफर दिली तरी पाक ती स्वीकारेल का आणि त्या बदल्यात जाधव ह्यांना सोडेल का?हे ही आहेच.पण निदान तसा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Pages