आनंद निकेतन शाळा : प्रथम सत्र अहवाल २०१७

Submitted by नानाकळा on 23 December, 2017 - 05:14

नमस्कार माबोकर मित्रमैत्रिणींनो,

मराठी माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य शाळांमध्ये नाशिकच्या आनंद निकेतन ह्या प्रयोगशील शाळेचे नाव आवर्जून घेतले जाते. 'चांगलं काम करतात, उत्तम नाव आहे' वगैरे अशा त्रोटक आणि मोघम वाक्यांतूनच आपल्याला अशा शाळांची ओळख असते. पण त्या छोट्या वाक्यांमागे असलेले खरे काम प्रचंड असते. या शाळा नक्की काय करतात हे सविस्तर समजले तर खर्‍या अर्थाने अशा दिपगृह मानल्या जाणार्‍या शाळांकडे बघण्याचा आपला दॄष्टिकोन बदलेल व त्यांच्या कार्याला मनापासून समजून उमजून दाद देता येईल ह्या भावनेतून हा आनंद निकेतन शाळेचा २०१७ च्या प्रथम सत्राचा अहवाल सादर करत आहोत.

(लेखात काही टंकनचुका दिसत आहेत त्या कॉपी-पेस्टमध्ये आलेल्या तांत्रिक समस्येमुळे झालेल्या आहेत, लवकर दुरुस्त करण्यात येतील)

अहवाल (प्रथम सत्र)

बालवाडी विभाग

१२ जून शाळेचा पहिला दिवस, खेळवाडीतील मुलांची शाळेची सुरूवात. ताई उत्सुकतेने मुलांची वाट पहात होत्या. खेळवाडीचा वर्ग छान सजवण्यात आला होता. काही मुले आईचे बोट घट्ट पकडून रडवेल्या चेहर्यातने तर काही मुले चेहर्यागवर उत्सुकता घेऊन वर्गात प्रवेश करत होती. बालवाडीच्या छोट्या गटातील मुले खेळवाडीच्या रडणार्याक मुलांचे ताई दादा बनून त्यांच्यासोबत खेळत होती. वयोगट तोच असला तरी दरवर्षी येणारे अनुभव मात्र वेगळे असतात. बालवाडी लहान व मोठ्या गटाची मुले मात्र आनंदात होती. नवनवीन खेळणी बघून आनंदली होती. काही मुले खूप दिवसांनी ताई भेटल्या म्हणून ताईंना मिठी मारत होती. सुट्टीमध्ये काय काय धमाल केली ते ताईंना सांगत होती. खेळवाडीतील मुलांच्या शाळेची सुरूवात रडत-रडत झाली. पण लवकरच मुलं रमली. आई बाबांना टाटा करून वर्गात बसू लागली. पहिला आठवडा खेळणे, रडणे, गप्पा मारणे यातच संपला.

प्रथम सत्रात बालवाडीत झालेल्या कार्यक्रम – उपक्रमांचा अहवाल पुढीलप्रमाणे :-
• प्रयोग :- दरवर्षी ताई मुलांना पाण्याचे प्रयोग दाखवून निरीक्षण करायला सांग़तात.
१) तरंगणे – बुडणे – प्रथम या संकल्पना मुलानां समजावून सांगितल्या. वर्गातील छोट्या छोट्या वस्तू गोळा केल्या. ( कापूस, कापड, दगड, रबर ) त्या तरंगतात की बुडतात हे मुलांनी स्वतः वस्तू पाण्यात टाकून अनुभवले. घरी पण तुम्ही हे प्रयोग करून बघा, असे ताईंनी मुलांना सांगितले.
२) विरघळणे - न विरघळणे – पाण्यात मीठ, साखर, लिंबू, गहू, तांदूळ टाकले. त्यातील कोणते पदार्थ पाण्यात विरघळले त्यांची यादी केली.
३) गढूळ पाणी स्वच्छ करणे – मुलांना तुरटी दाखवली. काही मुलांना तो बर्फ वाटला तर काहींना खडीसाखर! खेळवाडीच्या मुलांना तर या बर्फाचे आता काय करणार हा प्रश्न पडला होता. सारांशने तुरटी बरोबर ओळखली. एका बरणीत गढूळ पाणी भरले, त्यात तुरटी फिरवून बरणी कपाटावर ठेवली. थोड्या वेळाने गढूळ पाणी स्वच्छ झालेले बघून मुलांना आश्चर्य वाटले. मुले सारखी बरणीतील स्वच्छ पाणी ताईंना दाखवत होती.
४) पाण्याचा रंग बदलणे – वेगवेगळे रंग पाण्यात टाकून मुलांनी त्याचे निरीक्षण केले. पाण्यात रंग मिसळल्यावर पाणी तो रंग धारण करते हे लक्षात आले.
५) ‘हुशार कावळा’ या गोष्टीतील कावळ्याप्रमाणे मुलांनी बरणीत दगड टाकून पाण्याच्या वाढणार्या पातळीचे निरीक्षण केले.
• मूल्यमापन पत्रिका तयार करणे – सर्व मुलांनी सुचिताताई व आदितीताईंच्या मदतीने वेगवेगळे रंग वापरून दोर्याच्या सहाय्याने व ब्रश वापरून मूल्यमापन पत्रिकेवर छान डिझाइन्स तयार केल्या.
• परिसर भेट - मुलांचे छोटे छोटे गट करून शाळेच्या परिसरात फिरायला नेले. वेगवेगळी झाडे, पानांचे वेगवेगळे आकार, फुले, बांधकाम, पक्षी, घरटी यांचे निरीक्षण केले.
• वॉटर लिलीचे निरीक्षण – स्नेहलताईंच्या बागेतील वॉटर लिलीच्या फुलांचे मुलांनी निरीक्षण केले. फुलांचा रंग, आकार व वास याची माहिती ताईंनी मुलांना सांगितली. चैतन्यने हे जांभळं फूल आहे असं सांगितलं – शाळेतील कदंबाच्या झाडाला पण खूप फुले आली होती. त्याचे पण मुलांनी निरीक्षण केले. कदंबाच्या फुलाला काटे आहेत का, असे ईशानने विचारले.

खाऊ - पॉपकार्न - आधी मुलांना पॉपकार्न तयार करण्यासाठी लागणारे साहित्य दाखवले. मग मुलांसमोर पॉपकार्न बनवले. तडतड आवाज करत फुलणारे पॉपकार्न बघायला मुलांना खूप मज्जा आली. गरम गरम पॉपकार्न मुलांनी आवडीने खाल्ले.
• बटाटे उकडून बालवाडी मोठागटाच्या मुलांना सोलण्यास दिले व ते कापून खेळवाडीच्या मुलांना खाण्यास दिले.
• साबुदाणा खिचडी – खिचडी करण्यासाठी साबुदाणा पाण्यात भिजवून ठेवावा लागतो हे दाखवून मग खिचडी करण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले. सर्व मुलांना खिचडी खूप आवडली.
• साहित्य प्रदर्शन व पालकसभा – 8 जुलै रोजी साहित्य प्रदर्शन व पालकसभा एकत्र घेतली. सुरवातीला पालकांना बालवाडी अभ्यासक्रमासाठी लागणार्याक साहित्य दाखवून त्याचा कसा उपयोग होतो ते सांगितले. नंतर पालकसभेत अभ्यासक्रम, शाळेत शिकवण्याची पद्धत याबद्दल चर्चा झाली.
सण –
• रक्षाबंधनानिमित्त ताईंनी मुलांकडून राख्या बनवून घेतल्या. वेगवेगळ्या रंगाचे मणी व लोकर यांचा वापर करून राख्या बनवल्या व ताईंनी मुलांना राख्या बांधल्या.
• नागपंचमी निमित्त मुलांच्या हातावर मेंदी काढली. मुलांना कार्टून, ढग, फुलपाखरू छोटा भीम, गाडी, साप, यासारखी आपापल्या आवडीची चित्रे हातावर काढून दिली.
• यावर्षी शाळेतील गच्चीवर दहीहंडी बांधली. मुलांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. नंतर मुलांना गोपाळकाला दिला. तो त्यांनी आवडीने खाल्ला. दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असताना पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला. दहीहंडीसोबत मुलांनी पावसात भिजण्याचाही आनंद लुटला.

फळांची ओळख - अननस, टरबूज, पपई, पेरू, चिकू, केळी, मोसंबी, संत्री, डाळींब, सफरचंद ही सर्व फळे आणली. ती मुलांना दाखवून फळांचे आकार, रंग, वास, फळातील बिया (बी नसलेली फळे, बी असलेली फळे), सालीसहित खायची व साल काढून खायची फळे यावर ताईंनी चर्चा केली. हे सर्व चालू असताना फळं कधी खायला मिळतील याची मुलं वाट बघत होती. शेवटी फळे खाऊन मुलांनी चवीचा आस्वाद घेतला.

फळभाज्याची ओळख – वेगवेगळ्या फळभाज्या ताईंनी मुलांना दाखवल्या. त्यांची माहिती, रंग, चव याबद्दल मुलांना सांगितले. त्यापासून काय काय बनवतात यावर चर्चा केली. काकडी, दोडके, गिलके, कारले, डांगर, दुधीभोपळा, बटाटा, गाजर, फ्लॉवर, सिमला मिरची, तोंडली या भाज्या दाखवल्या. ‘भाजी घ्या भाजी’, हे गाणे म्हटले. स्वरा ताईंना म्हणाली, “तुम्ही आज भाजी विकायला आलात का?”

गणपती उत्सव - शाळेतील मोठ्या ताई-दादांनी बनवलेल्या शाडुमातीच्या गणपतीची बालवाडीच्या मुलांनी स्थापना केली. गणपतीसमोर मुलांनी गाणी गोष्टी व नाच सादर केले. पिनाकने शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कशी कापली याची गोष्ट सांगितली.

• फुले ओवणे - विप्लवने चांदणीची भरपूर फुले आणली होती. मुलांनी ती फुले ओवून छान माळा तयार केल्या.
• सुगरण पक्ष्याच्या घरट्याचे निरीक्षण – उर्वीने तिच्या बागेतील सुगरण पक्ष्याचे घरटे मुलांना दाखवण्यासाठी आणले होते. ताईंनी मुलांना घरट्याची माहिती सांगितली. पिल्ले आत कशी जातात व राहतात अशा प्रश्न मुलांना पडला होता. मुलांना घरट्याचे निरीक्षण करायला खूप आवडले.
• लव्हबर्डस् चे निरीक्षण – स्नेहलताईंनी मुलांना दाखवण्यासाठी लव्हबर्डस आणले होते. ते बघायला, त्यांचा आवाज ऐकायला मुलांना मजा वाटली. त्यांची चोच, पंख, रंग याचे निरीक्षण केले. दोन पक्ष्यांमधील एक मुलगा व एक मुलगी आहे असे उज्ज्वलाताईंनी मुलांना सांगितले, यावर पिनाकने ते नवरा बायको आहेत, नर व मादी आहेत असे सांगितले.
• हवेचे प्रयोग - रूमाल ओला करून हवेत वाळवणे. हवेमुळे ओला रूमाल कसा वाळतो हे मुलांना दाखवले, पंपाद्वारे सायकलमध्ये हवा भरणे, फुगे फुगवून हवेत उडवणे, झाडांची, पांनाची हालचाल हवेमुळे होते हे मुलांनी अनुभवले.

पहिली ते दहावी
• २०१७-१८ च्याे शैक्षणिक अहवालाची सुरुवात एप्रिल २०१७ पासूनच करायला हवी. २४ ते २८ एप्रिल या काळात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या आय.पी.एच. या संस्थेतर्फे ‘वयम’ मासिकाद्वारे आयोजित बहूरंगी बहर स्पर्धेतील विजेत्यांसाठी एका आगळ्यावेग़ळ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात भावनिक बुद्धिमत्ता, स्व-क्षमता ओळखणे, विविध करिअर पर्याय निवडताना कोणता विचार करावा यावर तज्ज्ञ व्यक्तिंची कृतिसत्रे, काही शैक्षणिक भेटी, काही मुलाखती अशा अनेक सत्रांचा समावेश होता. आपल्याय शाळेतील विजेते संस्कृाती, आयरा (इयत्ताे सातवी), ईशिता, ज्ञानदा, असीम (इयत्ता आठवी) व अर्पिता (इयत्तार नववी) अशा सहाजणांनी या शिबिराचा अनुभव घेतला. असीम, संस्कृती व ज्ञानदाच्या प्रतिक्रिया वयम मासिकात छापूनही आल्या.
• सातवीच्या मुलांना, सुट्टीत त्यां्नी एखाद्या दुकानात आठवडाभर कामाचा अनुभव घ्या वा असा प्रकल्प- दरवर्षी देण्यातत येतो. मुलांनी मेडिकल, किराणा दुकान, सेंद्रीय भाजीबाजार अशा विविध ठिकाणी कामे करुन विक्री, हिशोब, ग्राहक संवाद अशा गोष्टींचा प्रत्यञक्ष अनुभव घेतला.
• मे महिन्यातच काही मुलांनी शाळेची दर्शनी भिंत अतिशय कलात्मक पद्धतीने रंगविली. मोठया अवकाशात मोठ्या ब्रशने मुक्तपणे केलेली ही अभिव्यक्ती शाळेला अधिकच रूपवान करते. बंगलोर येथील ऋषीव्हॅली शाळेतील कलाशिक्षिका जाई पुणतांबेकर यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला.
• मे महिन्यात ATF (Active teacher Forum) च्याय मुक्त विद्यापिठात झालेल्या शिक्षक संमेलनात विनोदिनीताईंनी उपक्रमशील गणित अध्यापन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले.
• गेल्या शैक्षणिक वर्षात दीपस्तंभ, धुळे या संस्थेद्वारे आयोजित पुस्तकवाचनावरील राज्यस्तरीय स्पर्धेत दहावीतील अर्पिताने दुसर्या फेरीत (मुलाखत) प्रवेश केला होता. त्यात यशस्वी झाल्याने तिची चार दिवसीय शिबिरासाठी निवड झाली. जुलैमध्ये झालेल्या या शिबिरात शिबिरार्थिंनी आयुका, कात्रज प्राणीसंग्रहालय, पिंपरी-चिंचवड मनपा अशा ठिकाणी भेटी दिल्या.
शाळाभेटी – या सत्रात या मान्यवरांनी शाळेला भेट दिली.
२८ जून पुणे विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले
१७ जुलै आय.पी.एच.ठाणे या संस्थेचे डॉ. अरूण नाईक
२९ सप्टेंबर विख्यात कवी अरूण म्हात्रे
प्रशिक्षणे – २ व ३ जून असे दोन दिवस शाळेत सर्व ताईंसाठी जिओजिब्राचे प्रशिक्षण घेण्यात आले. गणितातील अनेक संकल्पना या सॉफ्ट्वेअरचा वापर करून संगणकाच्या आधारे मुलाना शिकविता येतात. या विषयाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक श्री. शमसुद्दीन अत्तार (सिंधुदुर्ग) यांनी हे प्रशिक्षण दिले.

• दरवर्षीप्रमाणे ताईंचे निवासी शिबीर ५, ६, ७ जूनला लेस्ली सॉनी सेंटर, देवळाली येथे घेण्याीत आले. शिबिरात पुण्यातील धृव ट्रस्टच्या अध्यक्ष माधवी पटवर्धन व मुंबईच्या डॉ. प्रज्ञा भोसेकर यांची सत्रे विशेष ठरली. माधवीताई गेली अनेक वर्षे पुण्यात विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समावेशी शिक्षणाचे मॉडेल यशस्वीरित्या राबवित आहेत. त्यांनी अभ्यासात मागे पडणार्या मुलांमधून विशेष गरजा असलेली मुले ओळखायची कशी, त्यांच्यासाठी अध्यापन, मूल्यमापन यात कोणते बदल करायचे याबद्दल चित्रफिती, केस स्टडी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. डॉ प्रज्ञा भोसेकर यांनी पुस्तक वाचनाचा उपचारात्मक उपयोग या विषयावर डॉक्टरेट मिळविली आहे. त्यांनी वाचन, त्याचा व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम व शाळेत वाचनाचा उपयोग कशा कशासाठी करता येईल यावर उदाहरणे व दृक श्राव्य सादरीकरण याच्या मदतीने प्रभावी मांडणी केली. शिबिरात सर्वांचाच उत्साईही सहभाग होता.

• CEQUE या संस्थेद्वारे दृकश्राव्य शैक्षणिक पाठांची निर्मिती केली जाते. आपल्या शाळेतील चार ताईंचे पाठ यापूर्वीच त्यांच्या वेबसाईटवर प्रसारित केले आहेत. याच मालिकेतील पुढील निवडक पाठांच्या चित्रिकरणासाठी त्यांनी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. यासाठी सुजाताताई व स्वातीताई यांची निवड झाली. ५ ते ११ जून या कालावधीत पुण्यात झालेल्या वर्गात त्या सहभागी झाल्या.

• INTACH आयोजित हेरिटेज वर्कशॉपमध्ये ज्योतीताई व नीलिमाताई सहभागी झाल्या.

दहावी निकाल – मार्च २०१६ च्यात दहावी परीक्षेचा निकाल जून रोजी जाहीर झाला. यात आपल्या शाळेतील एक विद्यार्थिनी अनुत्तीर्ण तर बाकी सर्व जण चांगल्या गुणांनी उत्तीूर्ण झाले. शानूल देशमुख, मृण्मयी साळगावकर यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले. शानूल ९३% गुण मिळवून प्रथम आला तर प्रेरणा कुंभारे, विराज थोरात, दर्शन काळे, गार्गी सोनावणे, अंजली व पूजा कनोजिया, गायत्री अहिरराव, धीरज थेटे यांना ८०% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले.

YLE परीक्षा निकाल
– ब्रिटीश कौन्सिलतर्फे झालेल्या YLE परीक्षेला २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात बारा विद्यार्थी बसले होते. यापैकी दहा जणांनी फ्लायर्स तर दोन जणांनी मुव्हर्सची परीक्षा दिली. यांच्यापैकी हर्षला मुव्हर्समध्ये तर संस्कृती, सुमतीला फ्लायर्समध्ये १५ पैकी १५ शिल्ड्स मिळाले.
बहुरंगी बहर स्पर्धा – मुलांसाठी चालवल्याज जाणा-या ‘वयम’ या मासिकातर्फे सातवी ते नववीच्याै विद्यार्थ्यां साठी ‘बहुरंगी बहर’ नावाची स्पचर्धा आयोजित केली होती. सु‍प्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याठ IPH या संस्थेुच्याा सहयोगाने मुलांच्याव बहुआयामी व्यक्तिमत्वा प चा वेध घेण्या च्या् उद्देशाने ही स्पार्धा झाली. पहिल्यास फेरीत साठ प्रश्नां ची लेखी चाचणी घेण्या त आली. मुलांचे छंद, आवडीनिवडी, विविध विषयांवर त्यां ची मते, प्रतिक्रिया, त्यां्चे आदर्श अशा अनेक मुद्यांवरचे लेखन या चाचणीत अपेक्षित होते. आपल्या शाळेतील 39 विद्यार्थ्यांतनी या प्रश्परश त्रिका सोडवून दिल्याख. ‘वयम’कडे या फेरीत 800 पेक्षा जास्त उत्तरपत्रिका महाराष्र्ांभरातून जमा झाल्यार. यापैकी 48 विद्यार्थी दुसर्याे म्ह्णजे गटचर्चा फेरीसाठी निवडले गेले. आपल्याक शाळेतील स्वानंद, श्रावणी (सातवी) अनुष्का व कणाद (आठवी) व शर्वरी (नववी) असे पाच जण या फेरीसाठी पात्र ठरले. २३ सप्टेंवबरला ठाणे येथे गटचर्चा फेरी झाली. यासाठी ‘फॅशनची पॅशन, निषेध! निषेध!, खाऊ आनंदे’ असे काही विषय गटचर्चेसाठी दिले होते. डॉ. आनंद नाडकर्णी, अभिनेत्री नीलकांती पाटेकर, सिनेदिग्दर्शिका व लेखिका समृद्धी पोरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत असे दिग्ग ज परीक्षक या फेरीसाठी होते. यातून निवडलेल्या! दहा जणांची मुलाखत फेरी २४ सप्टेंहबरला ठाण्यारच्याव गडकरी रंगायतनमध्येी पार पडली. यासाठी आठवीतील कणाद व नववीतील शर्वरीची निवड झाली होती. दोघांना उपविजेते घोषित करण्या‍त आले. बक्षीस समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाला. दुस-या फेरीसाठी पात्र ठरलेल्याा सर्व मुलांसाठी IPH येथे तीन वर्षे व्याक्तिमत्व्ाक विकास कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.

शाळाबाह्य उपक्रमातील सहभाग-

• सातवीतील निमिषची आंतर शालेय रोलर स्केटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
• मालेगाव येथे २०, २१ सप्टेंबरला झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

१) अमोघ साळगांवकर २०० मी धावणे (कांस्य), लांब उडी (कांस्य), रिले (सुवर्ण)
२) आभा गोकर्ण १०० मी धावणे (सुवर्ण), लांब उडी (कांस्य), २०० मी धावणे (रजत), रिले (सुवर्ण)
३) आरूष गोविंद ४०० मी.धावणे (कांस्य)

• कराटे क्लब अंतर्गत मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत सहावीतील गौरीला फाईटमध्ये सुवर्ण तर कातामध्ये कांस्यपदक मिळाले. याच स्पर्धेत पाचवीतील सुश्रुतला काता व फाईट दोन्हीमध्ये रजतपदक मिळाले.
• सिन्नर येथे झालेल्या मल्लखांब जिल्हास्तरीय निवड स्पर्धेत पाचवीच्या सई थत्तेची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
• सातवीतील राजदीप वेगवेगळ्या ठिकाणी होणार्यार राज्यस्तरीय बॅट्मिंटन स्पर्धेत सहभागी होऊन चांगली कामगिरी करत आहे.
• नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने कथा, कविता व निबंधस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धात स्वरचित काव्यलेखनात ओजस, यशस्विनी (इयत्ता पाचवी) यांनी उत्तेजनार्थ व ईरा (इयत्ता सहावी) हिने द्वितीय तर निबंध स्पर्धेत पाचवीतील मल्हारने द्वितीय अशी पारितोषिके मिळविली.

शैक्षणिक भेटी - पाठ्यपुस्तकातील व पाठ्यपुस्तकाबाहेरील काही विषयांची अनुभूती मुलांना मिळावी म्हणून आपण शैक्षणिक भेटींचे आयोजन करतो. या सत्रात पुढील भेटी झाल्या.
• दहावीच्या मुलांनी विद्युत विलेपन प्रक्रिया पहाण्यासाठी श्री. देवेश शेवडे यांच्या सरगम इंडस्ट्रीला भेट दिली.
• सातवी व आठवीच्या सर्व मुलांनी २ व ४ ऑगस्टला ट्रॅफिक पार्कला भेट दिली व वाहतुकीचे नियम समजावून घेतले.
• सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी २८ सप्टेंबरला विद्याप्रबोधिनी प्रशालेत भरविण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ या विषयावरील प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात गांधीजींच्या जीवनाचा चित्ररूप आढावा, कापूस ते वस्त्र या विषयावरील मांडणी याचा समावेश होता.

वर्षासहली -
पहिली व दुसरीची वर्षासहल गंमत-जंमतला गेली होती. तिथे मुले खेळण्यांवर मनसोक्त खेळली व पावसात भिजण्याचा आनंद लुटला. तिसरीची सहल दिंडोरी येथील आपले पालक श्री. मोरे यांच्या शेतात गेली होती. तेथे मुलांनी पॉलीहाऊस, शेततळे, गोठा, गोबरगॅस संयंत्र इ. गोष्टी पाहिल्या. चौथीची सहल श्री. पारेख यांच्या बेळगाव ढगा येथील फार्म हाऊसवर गेली होती. चौथीच्या मुलांनी बेळगाव ढग्याची ग्रामपंचायत पाहिली व तिचे कामकाज कसे चालते ते समजावून घेतले. पेरणीची कामे बघितली तसेच स्वत: टोमॅटो, वांग्याची रोपे लावली. पाण्यात भिजून, चिखलात खेळून मुलांनी वर्षासहलींचा आनंद लुटला.

पाचवीची वर्षासहल चांदवडला गेली होती. तेथे मुलांनी चंद्रेश्वर मंदिर, राहुडचे शनिमंदिर, गावातील अहिल्याबाई होळकरांचा वाडा, प्राचीन दोन मजली विहीर पाहिली. सहावीची मुले त्र्यंबक-घोटी रस्यािर वरील अमितदादांच्या शेतावर तर सातवीची मुले चामरलेण्या ला, आठवीची मुले रामशेज किल्ल्यावर व दहावीची मुले अंजनेरीला गेली होती. नववीच्या मुलांनी पाहिने फाट्या जवळील सोल्या डोंगरावर बायो वॉक अंतर्गत विविध वनस्पती व किटकांची माहिती घेतली. सर्व सहलींमध्ये मुलांनी पावसाबरोबरच शैक्षणिक अनुभवही घेतले.

१५ ऑगस्ट – भारताचा एकाहत्तरावा स्वाणतंत्र्यदिन दरवर्षीप्रमाणेच उत्सातहात पार पडला. मुख्याध्यापिका निवेदिताताईंच्याट हस्तेभ ध्वाजारोहण झाले. अश्विनीताईंनी बसवलेले संपूर्ण जन-गण-मन, वंद्य वंदे मातरम व इसलिये राह संघर्षकी हम चले......ही समूहगीते, विशेषतः पंजाबी भाषेतील समूहगीत, आजी माजी विद्यार्थ्यानी केलेली वाद्यवृंदाची साथ ही १५ ऑगस्टचची ठळक वैशिष्ट्येा ठरली. याच कार्यक्रमात शालांत परीक्षेत उत्तआम यश मिळविल्यााबद्दल दहावीच्या् मुलांचा सत्काठर करण्याशत आला.

सांस्कृतिक कार्यक्रम –
• २७ जुलैला नागपंचमीनिमित्त पहिली ते चौथीच्या मुलांच्या हातांवर मेंदी काढण्या्त आली.
• रक्षाबंधन - शाळेतील रक्षाबंधन बुधवार दि. ४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. पहिली ते पाचवीच्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवल्या होत्या. त्या एकमेकांना बांधून हा सण साजरा केला.
• रमझान ईद निमित्त २७ जूनला आठवी ते दहावीसाठी आठवीच्या मुलांनी शाळेत शिरकुर्मा बनवला. तर सर्व ताईंनी आणलेला शिरकुर्मा पहिली ते सातवीच्या मुलांना देण्यात आला.
• गोपाळकाला व दहीहंडी – कृष्णाष्ट्मीनिमित्त दरवर्षी पहिली ते चौथीच्या मुलांची वेशभूषा स्पर्धा घेतली जाते. यावर्षी ही स्पर्धा १६ व १७ ऑगस्टला घेण्यात आली. पालकांनी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून मशरूम, ढग, भिंगरी, नारदमुनी, आईस्क्रीम, अॅलम्ब्युलन्स, बुजगावणे, शाश्वत ऊर्जा, जपानी बाहुली अशा खूपच कल्पक व वैविध्यपूर्ण वेशभूषा केल्या होत्या
• शनिवार दि. १४ ऑगस्टुला गोपाळकाल्याचा खाऊ देण्यात आला. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी ताईंनी वर्गावर्गात लाह्या व पोह्यांचा गोपाळकाला बनविला. पाचवी व आठवीने पोहे, सहावी व नववीने कोशिंबीर तर सातवी व दहावीने उसळ आणली होती. प्रत्येक वर्गातील मुलांनी आणलेला खाऊ त्या त्या वर्गात एकत्रित करून वाटण्यात आला. गोपाळकाल्यातील एकत्वाची भावना मुलांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दरवर्षी याच प्रकारे गोपाळकाला साजरा होतो. १४ ऑगस्टला सातवी ते दहावीच्या मुलांनी मनोरे रचून दहीहंडी फोडली.

महिनाअखेरचे कार्यक्रम-
काही वेगळ्या कलांचा परिचय मुलांना करून देणे या हेतूने महिनाअखेर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जून महिनाअखेरी रत्नाताई भार्गवे यांनी पहिली ते चौथीच्या मुलांना सोप्या पद्धतीने चित्रे कशी काढायची ते शिकवले. A,B,C,D,…या अक्षरांपासून तसेच ० ते ९ या अंकांपासून चित्रे कशी बनतात हे पहायला मुलांना खूपच मजा आली. ताईंनी त्या चित्रातून गोष्टही तयार करून सांगितली.

ऑगस्ट महिनाअखेर आपल्या शाळेची माजी विद्यार्थीनी पल्लवी आणि तिची मैत्रीण संपदा या कॉलेजकन्यांनी पहिली ते चौथीच्या मुलांसमोर तबलावादन व गायनाचा कार्यक्रम केला. पल्लवीने तबल्याच्या चार परीक्षा दिलेल्या असून तिच्या महाविद्यालयातील कार्यक्रमांमधूनही ती तबलावादनाचे कार्यक्रम करत असते. शाळेच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमातही तिने तबल्याची साथ केली होती. आपलीच माजी विद्यार्थीनी महिनाअखेरला पाहुणी म्हणून आली हा शाळेसाठी खूप अभिमानाचा क्षण होता. महिनाअखेरच्या कार्यक्रमांचा हेतू सफल होत आहे हेच यातून दिसून येते.

खाऊ – पहिलीपासूनच मुलांना स्वैपाकाच्या सर्व कामांचा अनुभव दिला जातो. यात मुलांनी पुढील खाऊ बनविण्याचा अनुभव व आनंद घेतला.
पाचवी – कडधान्य व भाज्या यांची मिश्र कोशिंबीर
सहावी - कटलेट
आठवी – शीरकुर्मा
स्पर्धा – तिसरी व चौथीच्याच मुलांसाठी प्राणी व पक्षी या विषयांवर कविता पाठांतर स्पर्धा घेण्या–त आली.
गणपती कार्यशाळा – चौथीच्या सर्व मुलांनी शाळेत कार्यानुभवच्या तासाला शाडुचे गणपती बनवले व रंगवले.

१३ ऑगस्ट रोजी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यां साठी गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्या त आली.

वर्ग प्रदर्शने - वर्गावर्गात मुलांनी पुढील वस्तू जमा करून त्याचे प्रदर्शन मांडले व माहिती सांगितली.
पहिली - भातुकलीतील खेळणी, भाज्या दुसरी - वजनकाट्यांचे प्रकार
तिसरी - कडधान्य, तृणधान्य
चौथी - वेगवेगळ्या पोताचा अनुभव देण्यासाठी कापडाचे नमुने.
विज्ञानातील हवा या घटकांतर्गत वाद्यांच्या प्रतिकृती मुलांनी बनवल्या. गिटार, तबला, पियानो,
जलतरंग, एकतारी, खुळखुळा, ढोल, ताशा, बासरी.
विविध देशांतील जुन्या, नव्या नोटा व नाणी

सृजनोत्सव -
दरवर्षीप्रमाणे गणपतीच्या दिवसात दि. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंाबर या कालावधीत सृजनोत्सव संपन्न झाला. सुरुवात पर्यावरणस्नेचही मखर स्प.र्धेने झाली. सातवी-आठवीच्या‍ आठ गटांनी कागद, कापड, झाडाच्यास फांद्या, काथ्या , ज्यूवट इ. पर्यावरण-स्नेपही वस्तूं चा वापर करून मखरे बनवली. सातवीच्याा विद्यार्थ्यां नी बनविलेल्याज मखरांमध्येद खूपच विविधता व कल्पटकता दिसून आली.

या महोत्स्वात कला-कार्यानुभव, सादरीकरण व सर्जनशील लेखन अशा तीन गटात विविध स्पीर्धा व उपक्रम घेण्याात आले. पाचवी, सहावी, सातवीचा एक गट आणि आठवी, नववी दहावीचा एक गट अशा दोन पातळ्यांवर हा स्पर्धा झाल्या. कला कार्यानुभव गटात वॉलपीस, पेपर ज्वेवलरी, सीडीवर क्विलिंग करून दिवे, 3D पेपर क्विलिंग, ओरीगामीची ग्रिटींग बनविणे अशा स्पयर्धा झाल्यास. चित्रकला स्पर्धेसाठी ‘वाद्य’, ‘शाळेच्या इमारतीचे पेन्सिल स्केच’ ‘all things bright and beautiful’ असे विषय होते. मोठ्या गटासाठी ‘निसर्गातील संगीत’, ‘माझी स्वर्गाची कल्पना’ व सुलेखन असे विषय देण्यात आले.

सर्जनशील लेखन गटात चित्रवर्णन स्पवर्धा, काव्यालेखन स्पीर्धा, निबंध स्पीर्धा, संवाद लेखन यांचा समावेश होता. मुलांनी पुढील विषयांवर काव्यालेखन केले. ‘अरे माझ्या मना’, ‘तर लोक काय म्हणतील’, ‘स्वाकतंत्र्य’ ‘नामंजूर’. लहान गटाच्यान निबंध स्परर्धेसाठी विषय होते, ‘मी .... होणार’, ‘नकोच ते वर्ग प्रतिनिधी होणे’ तर मोठ्या गटासाठी ‘ज्याचा त्याचा कल्पवृक्ष’, ‘हे जीवन सुंदर आहे’ व खुले पत्र असे विषय निबंधलेखनासाठी होते.

सादरीकरणात पाचवी ते सातवीसाठी काव्य‘वाचन/अभिवाचन, नाट्यछटा, वक्तृनत्त्व या स्पोर्धा घेण्याित आल्या् तर आठवी ते दहावीसाठी काव्यावाचन/अभिवाचन, वादविवाद स्पनर्धा घेण्यावत आल्या्. ‘गणित अरे वा!, माझा छंद, पुस्तकांचे जग’ हे विषय वक्तृभत्वभ स्पवर्धेसाठी देण्या्त आले होते, तर गटचर्चेचे विषय होते, ‘देव असतो की नाही’ ‘ट्युशन क्लासेसची खरोखर किती गरज आहे?’ ‘यशस्वी होण्यासाठी इंग्रजी शिकणे किती आवश्यक?’

आठवी ते दहावीच्यास गटासाठी काही वैशिष्ट्यचपूर्ण कृती व स्पयर्धा घेण्याकत आल्याो. गटांतर्गत वेशभूषा स्प्र्धा हे यातील प्रमुख आकर्षण ठरले. कथ्थकली नर्तक, समुद्री चाचा, विवेकानंद, नटसम्राट या काही उल्लेरखनीय वेशभूषा ठरल्याप. वर्तमानपत्राच्या पुंगळ्यांपासून वस्तूर बनविणे व गॅसशिवाय खाऊ बनवणे या कृती आठवी, नववीला गटात देण्यापत आल्या . सृजनोत्सवाचा बक्षीस समारंभ चित्रकार श्री. धनंजय गोवर्धने यांच्या हस्ते झाला.

शिक्षक-पालक संघ - पालक संघ या औपचारिक रचनेबरोबरच या वर्षी ‘वर्गपालक’ अशी नवीन संकल्पना पहिल्या पालकसभेत मांडण्यात आली. सहली, शैक्षणिक भेटी, खाऊ बनविणे व ताईंच्या रजाकाळात या वर्गपालकांची मदत घेता येईल अशी कल्पना यामागे आहे. पालकांनीही ही कल्पना उचलून धरली. यासाठी वेळ देऊ शकतील अशा पालकांची वर्गवार यादी तयार झाली असून ते वेळोवेळी शाळेच्या कामकाजात आपले योगदान देत आहेत.

उल्लेखनीय -
पुण्यातील पालकनीती परिवारातर्फे गेली 25 वर्षे पालकत्वाला वाहिलेला पालकनीती हा अंक प्रकाशित केला जातो. यावर्षी या अंकाच्या संपादक मंडळाने प्रत्येक महिन्याचा अंक शैक्षणिक क्षेत्रात वैशिष्ठपूर्ण काम केलेल्या संस्थेचा विशेषांक करावा असे ठरवले.

ऑगस्ट महिन्याचा पालकनीतीचा संपूर्ण अंक आपल्या शाळेवर काढण्यात आला आहे. या अंकात आपल्या शाळेतील ताईंनी शाळेचे विविध उपक्रम, विविध विषयांच्या अध्यापनात वापरण्यात येणार्याण अध्यापन पद्धती, शालाबाह्य उपक्रम, शाळेचा इतिहास, विविध विषयांवरील शाळेची भूमिका यावर लेखन केले आहे. आपली शाळा समजून घेण्यासाठी हा अंक एक उत्तम साधन ठरावे. पालकांना आवाहन की आपण जरूर हा अंक खरेदी करावा. अंक शाळेत उपलब्ध आहे.

दुकान जत्रा – शाळेचा महत्त्वपूर्ण उपक्रम. पहिली ते दहावीच्या मुलांनी शाळेत शिकलेल्या हस्तकलेला प्रोत्साहन व बाजारपेठ मिळावी, मुलांना उद्योजकतेची ओळख व्हावी या हेतूने दरवर्षी दुकानजत्रा भरवली जाते. यावर्षीची दुकानजत्रा 13 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. उद्घाटनासाठी दीपाली शेटे व सोनाली जाधव या बहिणींना बोलावले होते. हार्डवेअर हा पुरूषी वर्चस्व असलेला व्यवसाय त्या गेली २० वर्षे समर्थपणे सांभाळत आहेत. यावर्षीच्या जत्रेत आकाशकंदील, खलबत्त्यात कुटलेल्या चटण्या, शटलकॉकच्या खोक्याचे फ्लॉवर पॉट्स, सी.डी.वर नक्षीकाम केलेले दिवे, पेपर क्विलींगच्या फ्रेम्स, कानातली अशा विविध वस्तुंबरोबरच पुस्तकांचा मोठा स्टॉल होता. आठवीच्या मुलांचे पापडी चाट आणि आलू टिक्कीचा स्टॉल होता. दुकान जत्रेला नेहमीप्रमाणेच पालकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

आत्मभान शिबिर – पौगंडावस्थेत शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे होणारा भावनिक गुंता व्यवस्थित समजून घेऊन त्याला नीटपणे सामोरे जाण्याची तयारी करण्यासाठी दरवर्षी आठवीच्या मुलांसाठी हे शिबीर शाळेत घेतले जाते. मात्र काही कारणाने यावर्षी दहावीला असणार्याद मुलांचे हे शिबीर राहिले होते. ते प्रथमसत्र संपताच 14 व 15 ऑक्टोबरला घेण्यात आले. यात आपले माजी पालक प्रशांत केळकर व शोभनाताईंनी मार्गदर्शन केले. मुलांना हे शिबीर फार उपयुक्त ठरले हे त्यांनी लिहिलेल्या अहवालातून लक्षात येते. (यापैकी अनुष्काचा अहवाल शाळेच्या फेसबुक पेजवर ठेवला आहे.)

• प्रथम सत्रातील देणगीदारांची यादी
सत्यपवती राऊळ (मुंबई) १,००,०००/-
डॉ. अनिल गोरे (पुणे) ४५,०००/-
श्री. विजय मधुकर लिमये (मुंबई)
श्री. श्रीकांत शालीग्राम (नाशिक) २५,०००/-
दिल दोस्ती दोबारा (नाशिक) १५,०००/-
श्री. संजय प्रभाकर कर्वे (नाशिक) ११,०००/-
श्री. संदीप देशमुख (नाशिक) ११,०००/-
श्रद्धा रंगनाथ मोरे (आसाम) १०,०००/-
वृषाली कुंटे (नाशिक) १०,०००/-
निशिकांत मनोहर बोबडे (नाशिक) १०,०००/-
ऋता पंडित (नाशिक) १०,०००/-
दीपाली कुलकर्णी (नाशिक) ८,०००/-
संदीप कुलकर्णी ( सृजनोत्सव ) (नाशिक) ५,२००/-
डॉ. यशवंत बर्वे (नाशिक) ५,०००/-
कौस्तुशभ खांडेकर ५,०००/-
आदित्यश वासुदेव बापट ५,०००/-
अरुण भामरे २,०००/-
प्रज्ञा टिल्लू - भोसेकर (मुंबई) १५००/-
मीनल सोबलकर (नाशिक) १००१/-

प्रथम सत्रातील फीसाठी देणगीदारांची यादी
MPTA Education Ltd (पुणे) २५,०००/-
मीनाक्षी वशिष्ठL, फरझीन (दुबई) २४,२५०/-
वंदना आपटे (पुणे) १८,५००/-
कामिनी महाजनी (अमेरीका) १८,०००/-
शुभांगी चपळगावकर (नाशिक) १२,०००/-
शर्मिला देशपांडे (सांगली) १०,०००/-
सुधा दास (सांगली) १०,०००/-
अभिषेक दिवेकर (नाशिक) ८,५००/-
दिनेश शेंडे (नाशिक) ८,५००/-
दीपक कशाळकर (नाशिक) ४२५०/-

वस्तूरुपात देणगी – आपले पालक हेमचंद्र मोरे यांनी शाळेला 25 खुर्च्या व संदीप डांगे यांनी कुकर, मॅट्स, सतरंज्या दिल्या.

विशेष सूचना - प्रत्येक अहवाल अचूक व परिपूर्ण असावा अशीच आमची इच्छा व प्रयत्न असतो. तरी यात काही त्रुटी राहिली किंवा कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला तर तो अनवधानाने आहे हे लक्षात घ्यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहवाल मस्त आहे. शाळा एकदम आवडली. मुलांचा हेवा वाटला, भारतात राहात असताना आमची शाळा अशी का न्हवती झालं.
इकडे मुलाच्या शाळेत बऱ्यापैकी याच धर्तीवर उपक्रम चालतात. पालकांचा सहभाग जास्त असलेल्या शाळा जास्त चांगल्या असतात असं मत झालंय. वर्गपालक सुरू करत आहेत ते चांगलं आहे.
काही शंका: शाळेत मेल शिक्षक नाहीयेत का?
वाचन/ग्रंथालय यावर काही आढळलं नाही ( वाचण्यात निसटल असेल तर दिलगीर आहे) नक्कीच यावर काम कार्य असतील अशी खात्री आहेच.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

मस्त ! यादी संपता संपत नव्हती...
अशी शाळा माझ्या मुलांच्या नशिबी नाहीच आली तरी घरच्या घरी देखील यातील काही उपक्रम राबवू शकतो. ईथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद

अवहाल मस्त आहे! हे सगळे करायला किती स्टाफ आहे? हौशी लोक दिसतात एकदम. मुलांना परफेक्ट वातावरण आहे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला.

आनंदनिकेतन शाळेत एका वर्गाच्या २ तुकड्या आणि एका तुकडीत १५ ते २० मुलं. म्हणजे एका वर्गात ३० ते ४० मुलं. खेळवाडी ते दहावी पर्यंत सर्व वर्ग मिळून ५०० मुलं आहेत.

इथे ३० ताई शिकवतात. इथे शिकवणार्‍या शिक्षिकांना ताई म्हणतात. पुरुष शिक्षक एक-दोन आहेत पण पूर्णवेळ नाहीत. इथल्या शिक्षिकांचे वैशिष्ट्य असे की कोणीही पगार घेत नाही.

मुलांमध्ये वाचनाची संस्कृती लहानपणापासून रुजवली जातेच, अवांतर वाचनावर भर आहे. रोजच्या शेड्युलमध्ये वाचनाचा खास एक तास असतो. शाळेतर्फे मुलांना वेगवेगळी पुस्तके पुरवली जातात, शाळेचे अधिकृत वाचनालय मागच्या महिन्यात सुरु झाले आहे.
-----------------------------
आनंदनिकेतन शाळेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास बुकगंगावरुन "सहजशिक्षणाची प्रयोगशाळा" हे पुस्तक मागवू शकता. यात शाळेच्या उभारणीपासूनची सगळी जडणघडण, वैचारिक बैठक, संबंधित घटना, शाळेतले उपक्रम याबद्दल वाचायला मिळेल.

--------------------------
(वेमांच्या सल्ल्यानुसार संपादन करत आहे) शाळेशी चर्चा करुन पुढची माहिती लिहिन.

नानाकळा , उपक्रम स्तुत्य आहे. या लेखात तुम्ही शाळेला देणगी देण्याबद्दल आवाहन केले आहे. मायबोलीच्या धोरणानुसार, नोंदणीकृत सेवाभावी संस्थानाच असे आवाहन मायबोलीवर करता येते. पण शाळेच्या वेबसाईटवर कुठेच असा सेवाभावी संस्था असल्याचा उल्लेख नाही.
ही जर फॉर प्रॉफीट शाळा असेल तर असे जाहिरातवजा लेख अप्रकाशित केले जातात.
योग्य गोष्ट म्हणजे रितसर मायबोलीकडे जाहिरातीचे पैसे भरून आपण त्यांना जास्त प्रसिद्धी देऊ शकतो. म्हणजे संस्थेलाही फायदा आणि मायबोलीलाही. पण फॉर प्रॉफीट संस्थेची जाहिरात मायबोलीने फुकट करावी हे काही पटत नाही कारण ज्या इतर संस्था रितसर पैसे देऊन जाहिरात करतात आणि ज्या मुळे मायबोली चालू राहते त्यांच्यावर अन्याय होतो. (आणि म्हणून धोरणात बसत नाही.)

वेमा,
ही शाळा 'फॉर प्रॉफिट' नाहीये हे इथे शिकणार्‍या दोन मुलांचा पालक म्हणुन मला माहिती आहे. तरी आपल्या सूचनेनुसार अधिकृत माहिती घेऊन आपणांस कळवतो.

तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. शाळा सेवाभावी म्हणून रितसर नोंदणीकृत असेल तर मायबोलीच्या या सुविधेचाही त्यांना विनामूल्य फायदा घेता येईल.

सेवाभावी संस्थांसाठी मायबोलीची नवीन सुविधा

पण तसे नसेल तर हा लेख अप्रकाशित करावा लागेल (किंवा मायबोलीला योग्य जाहिरातमूल्य द्यावे लागेल )

avishkar-shikshan-sanstha.doc (109.5 KB)

आनंद निकेतन शाळा ही आविष्कार शिक्षण संस्था ह्या नोंदणीकृत ट्र्स्टतर्फे चालवली जाते. संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टींमध्ये श्री अनिल अवचटसुद्धा आहेत. शाळेबद्दल व संस्थेबद्दल सविस्तर माहिती वरच्या डॉकमध्ये मिळेल. सदर शाळा कोणताही नफा कमवण्यासाठी चालवली जात नाहीये. तसेच शाळेला मिळणारी देणगी ८०जी च्या अंतर्गत सवलतप्राप्त आहे.

आविष्कार संस्थेचा नोंदणी क्रमांकः
AVISHKAR SHIKSHAN SANSTHA
Reg.No. MH/5676/98/Nashik & F-5403
Sushila Krishna, P & T Colony, Sharanpur Road, Nashik – 422 005.
Tel. (0253) 2312640 / 2574944

The school is functioning for last 8 years without institutional funds and government aid, through funds collected from school fees, individual donations in cash and kind and voluntary services offered by teachers, parents and resource persons.

We are being constantly guided, inspired and encouraged by Smt. Leelatai Patil, founder of Srujan Anand Vidyalaya, Kolhapur, Smt. Vidya Patwardhan, founder of Akshar Nandan, Pune , Dr. Anil Awchat, noted social worker and writer and many other persons in education and social field.

Donations are exempted from income- tax under provisions of 80G.
For details, please contact us at 9421507782/9421507564

---------------

वेमा,
वरिल माहिती आपल्या धोरणाशी सुसंगत वाटत नसेल तर कळवा. माझा उद्देश फक्त शाळा व तिथल्या उपक्रमांची माहिती देणे हा होता, देणगीच्या आवाहनाचा भाग संपादित केलाच आहे. सदर लेखात माबोधोरणानुसार आणखी काही संपादन करायचे असल्यास कळवा.
धन्यवाद!

छान लेख व माहिती.
शाळेतील शिक्षिकांबद्दल आदर वाटला. आणि पोरांचा हेवा!

मस्त वाटले वाचून. शाळेची वेबसाइट पण पाहिली. खूप छान इनिशिएटिव आहे. एक कुतुहल - या शाळेत प्रवेश मिळणे किती सोपे किंवा कितपत अवघड असते?

धन्यवाद मै.

शाळेत साधारण चार वर्षे आधीपर्यंत प्रवेश मिळणे सोपे होते. मराठी माध्यम असल्याने एवढी मागणी नव्हती. पण आता शाळेतल्या मुलांची प्रगती बघून मागणी वाढत आहे. या वर्षी पहिल्यांदाच खेळवाडीच्या प्रवेशासाठी (प्लेस्कुल) सकाळी चार वाजतापासून पालकांनी रांग लावली होती. आमच्या मुलाच्या वेळेस अशी रांग वगैरे काही नव्हती हे आमचे नशिबच. फर्स्ट कम फर्स्ट बेसिस वर प्रवेश दिला जातो. कोणत्याही प्रकारे मुलाखती घेतल्या जात नाहीत.

प्रत्येक इयत्तेत ३० मुले घेत असल्याने प्रवेश मर्यादित आहेत. तसेच त्या मुलांना प्राधान्य दिले जाते ज्यांची मोठी भावंडे आधीच शाळेचे विद्यार्थी आहेत. शाळेची फी सुद्धा कमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षाची फी ८५०० ते ९५०० आहे. यात दुसरे कोणतीही अतिरिक्त शुल्क जोडले जात नाही. तसेच प्रोजेक्ट फी, गणवेष फी, पुस्तके वगैरे याबद्दल वेगळे शुल्क नसते.

फारच छान वाटले वाचून! ऋन्मेषने लिहिलंय त्याप्रमाणे घरी यातले जे उपक्रम जमतील ते नक्की करू.

मी या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. आपल्याच शाळेबद्दल वाचताना खूप छान वाटलं. परत शाळेत गेल्यासारखं..!!