स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली या वेब साइडवर माहिती प्रसारित करणाऱ्या सर्व बंधू व भगिनींना व सर्व सभासदांना माझा नमस्कार
नेट वर मराठी वाचायला खूप कमी प्रमाणात भेटते आपण मायबोलीच्या रूपाने सर्व मराठी जनतेसाठी महत्वाची माहिती प्रसारित केली आहे धन्यवाद

<<<या जपाचा टोन मला खुपच भावला... नेट वर खुप मिळाले.. पण तो टोन नाहिये... अनेक chanting machine हि पहिले.. पन त्यत हि त्या टोन मधिल जप नाहिये... <<<<
गोन्दवल्यात मिळेल. गोन्दवल्यात मन्दिराजवळच्या कुठल्याही दुकानात मन्त्राचे मशिन मिळेल ...त्यात हीच ट्युन आहे.

कोल्हापुरात राजलक्षमी पेढेवाल्यानक्डे काटवे काका म्हणुन आहेत. त्यान्च्याकडे मिळेल तश्या मन्त्राचे मशिन.

भवानीभुजङ्गम्

षडाधारपङ्केरुहान्तर्विराजत्
सुषुम्नान्तरालेऽतितेजोल्लसन्तीम् ।
सुधामण्डलं द्रावयन्तीं पिबन्तीं
सुधामूर्तिमीडे चिदानन्दरूपाम् ॥ १ ॥

ज्वलत्कोटिबालार्कभासारुणांगीं
सलावण्यशृंगारशोभाभिरामाम् ।
महापद्मकिञ्जल्कमध्येविराजत्
त्रिकोणे निषण्णां भजे श्री भवानीम् ॥ २ ॥

क्वणत्किङ्किणीनूपुरोद्भासिरत्न-
प्रभालीढलाक्षार्द्रपादाब्जयुग्मम् ।
अजेशाच्युताद्यैः सुरैः सेव्यमानं
महादेवि मन्मूर्ध्नि ते भावयामि ॥ ३ ॥

सुशोणाम्बराबद्धनीवीविराज-
न्महारत्नकाञ्चीकलापं नितम्बम् ।
स्फुरद्दक्षिणावर्तनाभिं च तिस्रो
वलीरम्ब ते रोमराजीं भजेऽहम् ॥ ४ ॥

लसद्वृत्तमुत्तुङ्गमाणिक्यकुंभो-
पमश्री स्तनद्वन्द्वमम्बाम्बुजाक्षि ।
भजे दुग्धपूर्णाभिरामं तवेदं
महाहारदीप्तं सदा प्रस्नुतास्यम् ॥ ५ ॥

शिरीषप्रसूनोल्लसद्बाहुदण्डै-
र्ज्वलद्बाणकोदण्डपाशाङ्कुशैश्च ।
चलत्कङ्कणोदारकेयूरभूषो-
ज्ज्वलद्भिर्लसन्तीं भजे श्री भवानीम् ॥ ६ ॥

शरत्पूर्णचन्द्रप्रभापूर्णबिम्बा-
धरस्मेरवक्त्रारविन्दां सुशान्ताम् ।
सुरत्नावलीहारताटङ्कशोभां
महासुप्रसन्नां भजे श्री भवानीम् ॥ ७ ॥

सुनासापुटं सुन्दरभ्रूललाटं
तवौष्ठश्रियं दानदक्षं कटाक्षम् ।
ललाटे लसद्गन्धकस्तूरिभूषं
स्फुरच्छ्रीमुखाम्भोजमीड्येऽहमम्ब ॥ ८ ॥

चलत्कुन्तलान्तर्भ्रमत्भृङ्गबृन्दं
घनस्निग्द्धधम्मिल्लभूषोज्ज्वलं ते ।
स्फुरन्मौलिमाणिक्यबद्धेन्दुरेखा-
विलासोल्लसद्दिव्यमूर्धानमीडे ॥ ९ ॥

इति श्रीभवानी स्वरूपं तवेदं
प्रपञ्चात्परं चातिसूक्ष्मं प्रसन्नम् ।
स्फुरत्वम्ब डिंभस्य मे हृत्सरोजे
सदा वाङ्मयं सर्वतेजोमयं च ॥ १० ॥

गणेशाभिमुख्याखिलैः शक्तिबृन्दैर्-
वृतां वै स्फुरच्चक्रराजोल्लसन्तीम् ।
परां राजराजेश्वरि त्रैपुरि त्वां
शिवाङ्कोपरिस्थां शिवां भावयामि ॥ ११ ॥

त्वमर्कस्त्वमिन्दुस्त्वमग्निस्त्वमाप-
स्त्वमाकाशभूवायवस्त्वं महत्त्वम् ।
त्वदन्यो न कश्चित्प्रपञ्चोऽस्ति सर्वं
त्वामानन्दसंवित्स्वरूपां भजेऽहम् ॥ १२ ॥

श्रुतीनामगम्ये सुवेदागमज्ञा
महिम्नो न जानन्ति पारं तवाम्ब ।
स्तुतिं कर्तुमिच्छामि ते त्वं भवानि
क्षमस्वेदमत्र प्रमुग्द्धः किलाहम् ॥ १३ ॥

गुरुस्त्वं शिवस्त्वं च शक्तिस्त्वमेव
त्वमेवासिमाता पिता च त्वमेव ।
त्वमेवासि विद्या त्वमेवासि बन्धुर्-
गतिर्मे मतिर्देवि सर्वं त्वमेव ॥ १४ ॥

इतीमां महच्छ्रीभवानीभुजंगं
स्तुतिं यः पठेद्भक्तियुक्तश्च तस्मै ।
स्वकीयं पदं शाश्वतं वेदसारं
श्रियं चाष्टसिद्धिं भवानी ददाति ॥ १५ ॥

भवानी भवानी भवानी त्रिवार-
मुदारं मुदा सर्वदा ये जपन्ति ।
न शोकं न मोहं न पापं न भीतिः
कदाचित् कथंचित् कुतश्चिज्जनानाम् ॥ १६ ॥

भवानीभुजङ्गम्

षडाधारपङ्केरुहान्तर्विराजत्
सुषुम्नान्तरालेऽतितेजोल्लसन्तीम् ।
सुधामण्डलं द्रावयन्तीं पिबन्तीं
सुधामूर्तिमीडे चिदानन्दरूपाम् ॥ १ ॥

ज्वलत्कोटिबालार्कभासारुणांगीं
सलावण्यशृंगारशोभाभिरामाम् ।
महापद्मकिञ्जल्कमध्येविराजत्
त्रिकोणे निषण्णां भजे श्री भवानीम् ॥ २ ॥

क्वणत्किङ्किणीनूपुरोद्भासिरत्न-
प्रभालीढलाक्षार्द्रपादाब्जयुग्मम् ।
अजेशाच्युताद्यैः सुरैः सेव्यमानं
महादेवि मन्मूर्ध्नि ते भावयामि ॥ ३ ॥

सुशोणाम्बराबद्धनीवीविराज-
न्महारत्नकाञ्चीकलापं नितम्बम् ।
स्फुरद्दक्षिणावर्तनाभिं च तिस्रो
वलीरम्ब ते रोमराजीं भजेऽहम् ॥ ४ ॥

लसद्वृत्तमुत्तुङ्गमाणिक्यकुंभो-
पमश्री स्तनद्वन्द्वमम्बाम्बुजाक्षि ।
भजे दुग्धपूर्णाभिरामं तवेदं
महाहारदीप्तं सदा प्रस्नुतास्यम् ॥ ५ ॥

शिरीषप्रसूनोल्लसद्बाहुदण्डै-
र्ज्वलद्बाणकोदण्डपाशाङ्कुशैश्च ।
चलत्कङ्कणोदारकेयूरभूषो-
ज्ज्वलद्भिर्लसन्तीं भजे श्री भवानीम् ॥ ६ ॥

शरत्पूर्णचन्द्रप्रभापूर्णबिम्बा-
धरस्मेरवक्त्रारविन्दां सुशान्ताम् ।
सुरत्नावलीहारताटङ्कशोभां
महासुप्रसन्नां भजे श्री भवानीम् ॥ ७ ॥

सुनासापुटं सुन्दरभ्रूललाटं
तवौष्ठश्रियं दानदक्षं कटाक्षम् ।
ललाटे लसद्गन्धकस्तूरिभूषं
स्फुरच्छ्रीमुखाम्भोजमीड्येऽहमम्ब ॥ ८ ॥

चलत्कुन्तलान्तर्भ्रमत्भृङ्गबृन्दं
घनस्निग्द्धधम्मिल्लभूषोज्ज्वलं ते ।
स्फुरन्मौलिमाणिक्यबद्धेन्दुरेखा-
विलासोल्लसद्दिव्यमूर्धानमीडे ॥ ९ ॥

इति श्रीभवानी स्वरूपं तवेदं
प्रपञ्चात्परं चातिसूक्ष्मं प्रसन्नम् ।
स्फुरत्वम्ब डिंभस्य मे हृत्सरोजे
सदा वाङ्मयं सर्वतेजोमयं च ॥ १० ॥

गणेशाभिमुख्याखिलैः शक्तिबृन्दैर्-
वृतां वै स्फुरच्चक्रराजोल्लसन्तीम् ।
परां राजराजेश्वरि त्रैपुरि त्वां
शिवाङ्कोपरिस्थां शिवां भावयामि ॥ ११ ॥

त्वमर्कस्त्वमिन्दुस्त्वमग्निस्त्वमाप-
स्त्वमाकाशभूवायवस्त्वं महत्त्वम् ।
त्वदन्यो न कश्चित्प्रपञ्चोऽस्ति सर्वं
त्वामानन्दसंवित्स्वरूपां भजेऽहम् ॥ १२ ॥

श्रुतीनामगम्ये सुवेदागमज्ञा
महिम्नो न जानन्ति पारं तवाम्ब ।
स्तुतिं कर्तुमिच्छामि ते त्वं भवानि
क्षमस्वेदमत्र प्रमुग्द्धः किलाहम् ॥ १३ ॥

गुरुस्त्वं शिवस्त्वं च शक्तिस्त्वमेव
त्वमेवासिमाता पिता च त्वमेव ।
त्वमेवासि विद्या त्वमेवासि बन्धुर्-
गतिर्मे मतिर्देवि सर्वं त्वमेव ॥ १४ ॥

इतीमां महच्छ्रीभवानीभुजंगं
स्तुतिं यः पठेद्भक्तियुक्तश्च तस्मै ।
स्वकीयं पदं शाश्वतं वेदसारं
श्रियं चाष्टसिद्धिं भवानी ददाति ॥ १५ ॥

भवानी भवानी भवानी त्रिवार-
मुदारं मुदा सर्वदा ये जपन्ति ।
न शोकं न मोहं न पापं न भीतिः
कदाचित् कथंचित् कुतश्चिज्जनानाम् ॥ १६ ॥

चाल लिहिण्यासाठी दोन पद्धती आहेत.

१. जुन्या नाट्यगीतांसाठी ही पद्धत वापरत असत. पदाचे शीर्षक लिहून पुढे छंद्/वृत्ताचे नाव आणि कंसात जुन्या माहीत असलेल्या त्याच छंदातील गीताचे शीर्षक. उदा. संदीप खरेची कविता - प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी, वृत्त - भुजंगप्रयात (चाल - गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा)

२. चक्क चालीचे नोटेशन लिहिणे. इथे नोटेशन डिकोड करण्या इतपत ज्ञान वाचकाला असणे अपेक्षित आहे.

दीक्षितजी आपले बरोबर आहे असे वाटते. स्तुतीमंडल या साईटवर म्हटले आहे की भवानीभुजंग स्तोत्र हे आदि शंकराचार्यांचे आहे.

देवी खड्गमाला स्तोत्रम्

ह्रींकाराननगर्भितानलशिखां सौः क्लींकलाम् बिभ्रतीं
सौवर्णाम्बरधारिणीं वरसुधाधौतां त्रिनेत्रोज्ज्वलां ।
वन्दे पुस्तकपाशमङ्कुशधरां स्रग्भूषितामुज्ज्वलां
त्वां गौरीं त्रिपुरां परात्परकलां श्रीचक्रसञ्चारिणीम् ॥

अस्य श्री शुद्धशक्तिमालामहामन्त्रस्य, उपस्थेन्द्रियाधिष्ठायी
वरुणादित्य ऋषयः देवी गायत्री छन्दः सात्विक
ककारभट्टारकपीठस्थित कामेश्वराङ्कनिलया महाकामेश्वरी श्री
ललिता भट्टारिका देवता, ऐं बीजं क्लीं शक्तिः, सौः कीलकं मम
खड्गसिद्ध्यर्थे सर्वाभीष्टसिद्ध्यर्थे जपे विनियोगः, मूलमन्त्रेण
षडङ्गन्यासं कुर्यात् ।

ध्यानम्
तादृशं खड्गमाप्नोति येव हस्तस्थितेनवै
अष्टादशमहाद्वीपसम्राड्भोक्ताभविष्यति

आरक्ताभांत्रिणेत्रामरुणिमवसनाम् रत्नताटङ्करम्याम्
हस्ताम्भोजैस्सपाशाम्कुशमदनधनुस्सायकैर्विस्फुरन्तीम्
आपीनोत्तुङ्गु वक्षोरुहकलशलुठत्तारहारोज्ज्वलाङ्गीं
ध्यायेदम्भोरुहस्थामरुणिमवसनामीश्वरीमीश्वराणाम् ।

लमित्यादिपञ्च पूजाम् कुर्यात्, यथाशक्ति मूलमन्त्रम् जपेत् ।

ॐ ऐं ह्रीं श्रीं ऐं क्लीं सौः ॐ नमस्त्रिपुरसुन्दरी,
हृदयदेवी, शिरोदेवी, शिखादेवी, कवचदेवी, नेत्रदेवी,
अस्त्रदेवी, कामेश्वरी, भगमालिनी, नित्यक्लिन्ने, भेरुण्डे,
वह्निवासिनी, महावज्रेश्वरी, शिवदूती, त्वरिते, कुलसुन्दरी,
नित्ये, नीलपताके, विजये, सर्वमङ्गले, ज्वालामालिनी, चित्रे,
महानित्ये, परमेश्वरपरमेश्वरी, मित्रेशमयी, उड्डीशमयी,
चर्यानाथमयी, लोपामुद्रमयी, अगस्त्यमयी, कालतापशमयी,
धर्माचार्यमयी, मुक्तकेशीश्वरमयी, दीपकलानाथमयी,
विष्णुदेवमयी, प्रभाकरदेवमयी, तेजोदेवमयी, मनोजदेवमयि,
कल्याणदेवमयी, वासुदेवमयी, रत्नदेवमयी, श्रीरामानन्दमयी,
अणिमासिद्धे, लघिमासिद्धे, गरिमासिद्धे, महिमासिद्धे,
ईशित्वसिद्धे, वशित्वसिद्धे, प्राकाम्यसिद्धे, भुक्तिसिद्धे,
इच्छासिद्धे, प्राप्तिसिद्धे, सर्वकामसिद्धे, ब्राह्मी,
माहेश्वरी, कौमारि, वैष्णवी, वाराही, माहेन्द्री, चामुण्डे,
महालक्ष्मी, सर्वसङ्क्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वाकर्षिणी,
सर्ववशङ्करी, सर्वोन्मादिनी, सर्वमहाङ्कुशे, सर्वखेचरी,
सर्वबीजे, सर्वयोने, सर्वत्रिखण्डे, त्रैलोक्यमोहन चक्रस्वामिनी,
प्रकटयोगिनी, कामाकर्षिणी, बुद्ध्याकर्षिणी, अहंकाराकर्षिणी,
शब्दाकर्षिणी, स्पर्शाकर्षिणी, रूपाकर्षिणी, रसाकर्षिणी,
गन्धाकर्षिणी, चित्ताकर्षिणी, धैर्याकर्षिणी, स्मृत्याकर्षिणी,
नामाकर्षिणी, बीजाकर्षिणी, आत्माकर्षिणी, अमृताकर्षिणी,
शरीराकर्षिणी, सर्वाशापरिपूरक चक्रस्वामिनी, गुप्तयोगिनी,
अनङ्ग कुसुमे, अनङ्गमेखले, अनङ्गमदने, अनङ्गमदनातुरे,
अनङ्गरेखे, अनङ्गवेगिनी, अनङ्गाङ्कुशे, अनङ्गमालिनी,
सर्वसङ्क्षोभणचक्रस्वामिनी, गुप्ततरयोगिनी, सर्वसङ्क्षोभिणी,
सर्वविद्राविनी, सर्वाकर्षिणी, सर्वह्लादिनी, सर्वसम्मोहिनी,
सर्वस्तम्भिनी, सर्वजृम्भिणी, सर्ववशङ्करी, सर्वरञ्जनी,
सर्वोन्मादिनी, सर्वार्थसाधिके, सर्वसम्पत्तिपूरिणी, सर्वमन्त्रमयी,
सर्वद्वन्द्वक्षयङ्करी, सर्वसौभाग्यदायक चक्रस्वामिनी, सम्प्रदाय
योगिनी, सर्वसिद्धिप्रदे, सर्वसम्पत्प्रदे, सर्वप्रियङ्करी,
सर्वमङ्गलकारिणी, सर्वकामप्रदे, सर्वदुःखविमोचनी,
सर्वमृत्युप्रशमनि, सर्वविघ्ननिवारिणी, सर्वाङ्गसुन्दरी,
सर्वसौभाग्यदायिनी, सर्वार्थसाधक चक्रस्वामिनी, कुलोत्तीर्णयोगिनी,
सर्वज्ञे, सर्वशक्ते, सर्वैश्वर्यप्रदायिनी, सर्वज्ङानमयी,
सर्वव्याधिविनाशिनी, सर्वाधार स्वरूपे, सर्वपापहरे,
सर्वरक्षास्वरूपिणी, सर्वेप्सितफलप्रदे, सर्वरक्षाकर चक्रस्वामिनी,
निगर्भयोगिनी, वशिनी, कामेश्वरी, मोदिनी, विमले, अरुणे,
जयिनी, सर्वेश्वरी, कौलिनिवशिनी, सर्वरोगहरचक्रस्वामिनी,
रहस्ययोगिनी, बाणिनी, चापिनी, पाशिनी, अङ्कुशिनी, महाकामेश्वरी,
महावज्रेश्वरी, महाभगमालिनी, सर्वसिद्धिप्रदचक्रस्वामिनी,
अतिरहस्ययोगिनी, श्री श्री महाभट्टारिके, सर्वानन्दमय
चक्रस्वामिनी, परापरातिरहस्ययोगिनी, त्रिपुरे, त्रिपुरेशी,
त्रिपुरसुन्दरी, त्रिपुरवासिनी, त्रिपुराश्रीः, त्रिपुरमालिनी,
त्रिपुरसिद्धे, त्रिपुराम्बा, महात्रिपुरसुन्दरी, महामहेश्वरी,
महामहाराज्ञी, महामहाशक्ते, महामहागुप्ते, महामहाज्ञप्ते,
महामहानन्दे, महामहास्कन्धे, महामहाशये, महामहा
श्रीचक्रनगरसाम्राज्ञी, नमस्ते नमस्ते नमस्ते नमः ।

एषा विद्या महासिद्धिदायिनी स्मृतिमात्रतः
अग्निवातमहाक्षोभे राजाराष्ट्रस्यविप्लवे ।
लुण्ठने तस्करभये सङ्ग्रामे सलिलप्लवे,
समुद्रयानविक्षोभे भूतप्रेतादिके भये
अपस्मारज्वरव्याधिमृत्युक्षामादिजेभये,
शाकिनी पूतनायक्षरक्षःकूष्माण्डजे भये,
मित्रभेदे ग्रहभये व्यसनेष्वाभिचारिके,
अन्येष्वपि च दोषेषु मालामन्त्रं स्मरेन्नरः
सर्वोपद्रवनिर्मुक्तस्साक्षाच्छिवमयोभवेत्,
आपत्कालेनित्यपूजाम् विस्तारात्कर्तुमारभेत्,
एकवारं जपध्यानम् सर्वपूजाफलं लभेत्,
नवावर्णदेवीनां, ललिताया महौजनः
एकत्रगणनारूपोवेदवेदाङ्गगोचरः,
सर्वागमरहस्यार्थः स्मरणात्पापनाशिनी ।
ललितायामहेशान्या माला विद्यामहीयसी,
नरवश्यं नरेन्द्राणां वश्यं नारीवशङ्करम् ।
अणिमादिगुणैश्वर्यं रञ्जनं पापभञ्जनम् ।
तत्तदावरणस्थायि देवताबृन्दमन्त्रकम् ।
मालामन्त्रं परम् गुह्यां परं धामप्रकीर्तितम् ।
शक्तिमालापञ्चधास्याच्छिवमालाचतादृशी,
तस्माद्गोप्यतराद्गोप्यं रहस्यं भुक्तिमुक्तिदम् ।

इति श्री वामकेश्वरतन्त्रे उमामहेश्वरसंवादे
देवीखड्गमालास्तोत्ररत्नं समाप्तम् ।

मी (किंवा इतर) आधी इथे हे लिहिलंय का नाही ते माहीत नाही. हा बीबी वर दिसला म्हणून लिहावंसं वाटलं म्हणून, इथे असेल तर सांगा मी काढून टाकीन.
हे गौरी शंकर अर्धांगिनी
यथा त्वम शंकर प्रिया
तथा माम् कुरुकल्याणी
कांतकांता सुदुर्लभाम
देहि सौख्यमं मा देहि
देहि देवी परमसुखम्
रूपं देहि, जयं देहि, यशो देहि दशोदिशा

नामःस्मरण (कोणतेही) रोज एकाच जागी, एकाच वेळी आणि एकाच संख्येत केले तर जास्त फलदायी होते. नामःस्मरण सुरु करायच्या आधी नीट विचार करुन रोज कुठे, किती वाजता आणि किती वेळा करणे सहज शक्य आहे तो विचार करूनच विशिष्ट कार्यसिद्धी साठी सुरुवात करावी.

स्वर्णाकर्शण भैरव
गायत्री मंत्र

स्वर्ण भैरवाय विद्महे
स्वर्ण हस्ताय धिमही
तन्नो भैरव प्रचोदयात !!

स्वर्णाकर्शण भैरव
मुल मंत्र १

ओम श्रीं ह्रीं क्लीं
स्वर्णाकर्शणाय भैरवाय
हुं फट स्वाहा !

स्वर्णाकर्शण भैरव
मुल मंत्र २

ओम नमो भगवते
स्वर्णाकर्शण भैरव
धन धान्य वृद्धीकराय
शीघ्रम स्वर्णं देही देही
वस्यम कुरु कुरु स्वाहा !!

श्रीरामाविजय ग्रंथातील - हनुमंतजन्मकथन

इकडे नवमास भरता अंजनी| प्रसूत झाली तेधवां||
ऋषिपत्न्या पाहती ते वेळा|बळिया तो बाळ जन्मला|कि वासरमणी प्रकटला|वानरवेशे दैदिप्य||
विद्युतप्राय कुंडले झळकती| गंडस्थळी पडली दीप्ती| दृढ कौपिन निश्चिती| कटिप्रदेशी मौजी झळके||
तळपतसे यज्ञोपवीत|ऐसे वानररूप अद्भुत|मुखी पुच्छाग्री आरक्त|वर्ण दिसतसे प्रवाळासम||
परम क्षुधाक्रान्त बाळ|चहूकडे पाहे चंचळ|तो अंजनी उतावेळ|फळे गेली आणावया||
रुदन करी क्षुधित बाळ|तो आरक्त दिसे सूर्यमंडळ|म्हणे हे दिसे उत्तम फळ|उडे चपळ मारुती||
पिंजारल्या रोमावळी|सिंहनादें गर्जे निराळी (=आकाशात)|दिग्गजांची बैसली टाळी|आंदोळली वसुंधरा||
स्फुरण दाटले थोर|गाजवी पुच्छाचा फडत्कार|मागे अंगवाटे तरुवर| उन्मळोनि जात आकाशी||
चपळ पदद्वय तैसेचि हस्त|प्रतापे झेपावे गगनात|उड्डाणांवर उड्डाण घेत|जात आदित्ये लक्षोनिया||
कि उर्वी(=पृथ्वी) वरोनी सुपर्ण (= गरुड)|जाय वैकुंठपीठ लक्षून|तैसाचि अंजनीहृदयरत्न|भानुमंडळा आटोपी||
मनोवेगासी मागे टाकोनी |हनुमंत वेगे जात गगनी|तो लोकप्राणेश (=वायू) धावोनि| म्हणे धरीन स्वपुत्रा||
परम तीव्र सूर्यमंडळ|तेजे आहाळेल (= पोळेल) माझे बाळ| म्हणोनि धरू पाहे अनिल| परी तो चपळ नाटोपे||
मग हिमाचलाचे शीतालांबूकण| मागुनी शिंपी प्रभंजन|हनुमंत मुख पसरोन|सूर्याजवळी पातला||
तो ते दिवशी सूर्यग्रहण|राहू आला मुख पसरोन|मारुतीस क्रोध आला दारुण|सिंहिकासुता देखता||
म्हणे मी अत्यंत क्षुधित| फळ भक्षावया आलो येथ| हा आला कोण अकस्मात| ग्रासाआड माझिया||
सबळ पुच्छधायेकरून| फोडिले राहूचे वदन| भिरकावला पायी धरून| मूर्च्छा येऊनि पडला तो||
जैसा शुंडादंडेकरून देख| महागज विदारी बिडालक (=सिंह)| कि भुजंगाचे कवेत मूषक|अकस्मात सापडला||
राहूचे कैवारी केत (=केतू)| कपीवर धावला उन्मत्त| जैसा केसरीपुढे जंबुक (=कोल्हा) येत| आपले मरण विसरुनिया||
केतू देखतांचि हनुमंते| तेथेचि मर्दिला मुष्टिघाते|आंग चुकवोनि वेगे बहुते| पाळता जाहला केतू पै||
राहू आणि केत| इंद्रापाशी आले धावत| अशुद्धी (=रक्ते) नहाले जैसे पर्वत| सिंदुरेकरून माखले||
आक्रोशें बोलती दोघेजण| तू सुरेश सहस्रनयन|आम्हावरी कोप धरून| हे का विघ्न धाडिले||
नवा पुच्छराहू करून| आम्हावरी दिधला पाठवून|आश्चर्य करी शचीरमण (= इंद्र)| म्हणे हे कर्तृत्व कोणाचे||
कोणी केली विपरीत करणी| त्यांसी संहारावया वज्रपाणि| त्रिदशसमुदाय घेऊनि|वायुवेगे धाविन्नला||
राहू पुढे पुढे धावत| मागे देवांसहित अमरनाथ| तो इकडे अंजनीसूत| सूर्यग्रासु धावतसे||
चळाचळा कापे मित्र (= सूर्य)| म्हणे हा कैचा आला अमित्र(=शत्रू)| दिनमान सांडोनि दिनकर|पळो न लाहे सर्वथा||
प्रतापरुद्र मारुती| सूर्यमंडळ धरिले हाती| हे फळ नव्हे निश्चिती| म्हणोनि पुढती टाकिले||
जैसा केवळ वडवानल| तैसेचि दैदिप्यमान सूर्यमंडळ| फळ नव्हे म्हणोनि अंजनीबाळ| टाकिता झाला पुढता पै||
माघारा पाहे परतोन| तो राहू आला शक्रास (= इंद्र) घेऊन|पुढती क्रोध आला दारुण| म्हणे आता न सोडी यासी||
साह्य करून अमरपती| मजवरी आला पुढती| जैसे शलभ मिळून येति| कल्पान्तविजु (= प्रळयकाळाची वीज) धरावया||
ऐसे बोलत वायुनंदन| राहूवर लोटला येऊन| इंद्रादेखत ताडण| राहूसी केले बहुसाल||
जैसा पर्वत पडे अकस्मात| तैसा राहूसी दे मुष्टिघात| ग्रहपूजा यथासांग तेथ| वायुसुते मांडली||
राहू आक्रोशें फोडी हाका| म्हणे काय पाहसी अमरनायका (=इंद्र)| मग शक्रे ऐरावती देखा| अकस्मात प्रेरीला||
जिकडे धावे ऐरावत| तिकडे भारे उर्वी (=पृथ्वी) लवत| कि दुसरा मेरू मूर्तिमंत| शक्राचे वाहन जाहला||
तो सबळ लोटला ऐरावती| चपळ धावला वीर मारुती| जैसा वज्रघात पर्वती|तैसा कुंभस्थळी ताडीला||
धाके ऐरावत तो पळे|पाकशासन (=इंद्र) निजबळे|ऐरावत आकळिता नाकळे|राणा घेतले भयेंचि||
जैसी दुर्बळाची स्त्री नष्ट बहुत| ती न मानी त्याचा वचनार्थ| तैसा इंद्रासी ऐरावत| नाटोपेंची सर्वथा||
असो विवेक करुनि बहुत| कामक्रोध आवरती महंत|तैसा सहस्त्राक्षे ऐरावत|पुढती समोर आणिला||
मागुती धावे पवनसुत| धरी ऐरावताचे चारही दंत| उलथोनी खाली पाडीत| शंकरासहित तेधवां||
हस्तचपेटे हनुमंते ते वेळी| शंकराचा किरीट पाडिला भूतली| सकाळ देवसेना ते काळी| भयभीत जाहली||
इंद्राची झोटी (= शेंडी) मोकळी| मागुती ऐरावत आकळी| हनुमंतावरी बळेंची घाली| परी गज न टाकी पाऊल पुढे||
गज पळे रानोरान| परम घाबरला सहस्त्रनयन| तो यम हस्ती दंड घेऊन| हनुमंतावरी धाविन्नला||
याने दंड प्रेरावा जो ते वेळा| तो मारुती अंगावरी कोसळला| मुष्टिघात हृदयी दिधला| यम पडला धरणीवरी||
यमे धरिले मारुतीचे चरण| म्हणे मी तुजला अनन्यशरण| हस्त जोडोनिया वरुण| स्तुती करी मारुतीची||
कुबेर धावोन ते समयी| लागे हनुमंताचे पायी| तो ऐरावतारूढ लवलाही| शक्र वेगे पातला||
ऐसे देखोनि ते अवसरी| मारुती धावे शचीवरावरी| ऐरावतास पुच्छी धरी| पृथ्वीवरी आपटावया||
पुच्छ धरोनि भोवंडी गज| पृथ्वीसहित कापती दिग्गज| अवनीवर देवराज| वज्रासह पाडिला||
बळे गज आपटीला धरणी| देवांस मांडली महापळणी| कडेकपारी जावोनि| महायोद्धे दडिले||
म्हणती पृथ्वी गेली रसातला| एकाची हाहाकार जाहला| तो अमरेन्द्रे ते वेळा| आव (= हिंमत) धरिला पुढता पै||
वज्र बळे भोवंडीत| मुखावरी ताडला हनुमंत| तेणे मूर्च्छना दाटिली बहुत| पडे वायुसुत पृथ्वीवरी||
कनकाद्रीवरून कोसळला|पर्वतदरीमाजीं पडला| लोकप्राणेश (=वायू) धाविन्नला सूत धरिला पोटासी||
कासावीस वायुनंदन| विकल पडला अचेतन| वायू रडे स्फुंदस्फुंदोन| पुढे घेऊनि हनुमंता||
म्हणे दुर्जन हा अमरेंद्र| तान्ह्यावरी घातले वज्र| परम निर्दय पुरंदर (= इंद्र)| करिन संहार तयाचा||
माझिया तान्ह्याचा जाता प्राण| आटिन सकळ त्रिभुवन| जैसे प्रह्लादकारणे दैत्य संपूर्ण| श्रीनृसिंहे आटिलें||
वायुआधीन सकळांचे प्राण| आकर्षिले न लागता क्षण| श्वासोच्छवास कोंडून| केले त्रिभुवन कासावीस||
मग इंद्र विरिंची सकळ सुरावर| रमावर आणि उमावर| सकळ प्रजा ऋषीश्वर| शरण आले वायुते||
पोटाशी धरुनी हनुमंत| वायू दीर्घस्वरें रडत| तो ब्राह्मणादी देव समस्त| प्राणनाथे (= वायू) देखिले||
हनुमंत कडेवर घेऊनि| वायू उभा राहे ते क्षणी| तिन्ही देव देखोनि नयनी| नमस्कार करी तेधवां||
मग बोले कमलासन (= ब्रह्मदेव)|पुत्राचा कैवार घेऊन| अवघे जन निरदाळून| टाकीशी काय प्राणेशा||
येरु म्हणे न उठता माझा सुत| इंद्रासी आटिन देवांसहित| ऐकोनि हासे इंदिरानाथ (= विष्णू)| वर देतसे संतोषोनि||
पूर्ण पिंडाचा हनुमंत| यासी स्वप्नीही नाही मृत्यू| ब्रह्मकल्पापर्यंत चिरंजीवी पुत्र तुझा||
मग बोले कर्पूरगौर|माझिये तृतीय नेत्रिचा वैश्वानार|क्षणे जातील चराचर| परी यासी बाधे ना||
माझी त्रिशुळादि आयुधे तत्त्वता| ती न रुतती हनुमंता| मग विरिंची होय बोलता| निजावरदान ऐका ते||
माझे ब्रह्मास्त्र आणि पाश| कदा न बांधतील यास| म्या जी शास्त्रे निर्मिली बहुवस| तीही यास न बाधिती||
मग इंद्रही वदे सवेग वर| माझे यासी न बाधे वज्र| हा वज्रदेही साचार| अक्षय अभंग सर्वदा||
हनुवटीसी झगडले वज्र| यास हनुमंत नाम साचार| कुबेर म्हणे बहुत असुर| क्षय पावती हस्ते याच्या||
यम वदे वरदान| यास काळदंड न बाधी पूर्ण| याचे करिती जे नामस्मरण| त्यांसी बंधन न करी मी||
मग बोले रसाधिपती (= वरुण)| याची असो अभंग शक्ती| कधी श्रम न पावे मारुती| युद्ध करिता बहुसाल||
दिव्य कमळांची सुमनमाळ| न सुके लोटता बहुकाळ| ती विश्वकर्मे तत्काळ| गेला घातिली मारुतीच्या||
समष्टी देउनी वरदाना| गेले आपापले स्वस्थाना| वायूने हनुमंत ते क्षणा| अंजनीजवळ आणिला||
मारुतीस हृदयी धरोनि| स्फुंदस्फुंदोनि रडे जननी| मुखामाजी स्तन घालोनि| वदन कुरवाळली वेळोवेळा||
रामविजय ग्रंथ सुरस| त्यामाजी हनुमंत जन्म विशेष| श्रवण करिती जे सावकाश| ग्रहपीडा तयांसि न होय||
हनुमंतजन्मकथन| निजभावें करता श्रवण| दुष्टग्रहविघ्ने दारुण| न बाधती कदाही||

श्रीरामाविजय वाचताना कित्येक पौराणिक गोष्टी, दाखले, उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार ...अत्यंत रसाळ वर्णन आहे. यात रामायणात कोणत्या देवांनी कोणते रूप घेतले त्याचे वर्णनही आहे. ते पुढीलप्रमाणे.

पैलतीरी देवा सकाळी| उभे ठाकिले बद्धांजुळी| म्हणती पूर्णब्रह्म वनमाळी| भक्तपालका सर्वेशा||
जय जय अनंत ब्रह्माण्डानायका| वेदवंद्या वेदपालका| विश्वनभरा विश्वव्यापका| विश्वरक्षका जगदगुरो||
पुराणपुरुषा परात्परा| पंकजलोचना पयोब्धिविहारा| परमात्मया परम उदारा| भुवनसुंदरा भवहृदया||
कर्ममोचका करुणाकरा| कैवल्यदायका कमळावरा| कर्मतीता कैटभसंहारा| कनकवसना करुणाबधे||
जय जय सकळदेवपाळका | जय जय सकळचित्तचाळका | निर्वीकारा निरूपाधिका| निर्गुणा निश्चळा नि:संगा||
केशव हरी मुरमर्दना| रमावल्लभा मधुसूदना| सकळदुरितकाननदहना| तमनाशना प्रतापसूर्या||
प्रळयसमुद्री तू जनार्दना| विशाळ मीनरूप धरून| महादैत्य विदारून| वेदोद्धार तुवा केला||
परम विशाळ मंदाराचळ| भेदीत चालला पाताळ| तू कूर्मरूप धरुनी घननीळ| पृष्ठी खालती दिधली||
हिरण्याक्ष दैत्य सबळ| काखेसी घेऊ जाता भूमंडळ| वराहवेष तू तमाळनीळ| दानव सकळ मर्दिले||
दानवबालकप्रह्लादा| त्यास तुझा अखंड छंद| मग करुनि स्तंभभेद| प्रकटलासी नरहरी||
इंद्राचे कैवारे बळी| तो तुवा घातला पाताळी| त्याचे द्वारी तू वनमाळी| दवारपाळ अद्यापि|
नसता सेना रथ सेवक| फरशधर तू भृगुकुलतिलक| तीन सप्तके उर्वी(=पृथ्वी) नि: शंक| निक्षत्री केली हरी त्वां||
आता रावण कुंभकर्ण असुर| इही त्रिभुवन पिडीले समग्र| भक्तकैवारी तू सर्वेश्वर| रक्षी सत्वर दासांते||
तो क्षीरसागराहुनि अद्भुत| ध्वनी उठली अकस्मात| रविकुळी राजा दशरथ| अवतार तेथे घेतो मी||
शेष होईल लक्ष्मण| भरत होईल पांचजन्य (श्रीविष्णूच्या शंखाचे नाव)| सुदर्शन तोचि शत्रूghn|अवतार पूर्ण हे माझे||
जनकराजा मिथिलापुरी| कमळा जाईल त्याचे उदरी| तुम्ही देवा एकसरी| वानररूपी अवतरा||
शिव तो होईल हनुमंत| ब्रह्मा तो ऋक्ष जांबुवंत| धन्वंतरी तो सुषेण सत्य| अंगिरापती तो अंगद जाणिजे||
अदिती आणि कश्यप| तेचि कौसल्या आणि दशरथ भूप| तेथे अवतरेल चित्स्वरूप| आत्माराम रघुवीर||
सुग्रीव तो जाणिजे मित्र (= सूर्य)| नळ तो अनळ(= अग्नी) साचार| नीळ तो अनीळअवतार (=वायू)| यम तोचि ऋषभ पै|| ऐसी आज्ञा होता समस्त|देव जयजयकारे गर्जत| आनंद न माय अंबरात| गेले त्वरित स्वस्थाना||

हनुमन्त जन्मकथनात २ ठिकाणी शंकर शब्द चुकून पडला आहे. तो शक्र अर्थात इन्द्र असा वाचावा. संपादन करण्याची मुदत उलटुन गेल्याकारणाने करता येत नाही.

का विद्या कविता विना स्वर विना
दीपं विना मंदिरं
भार्या भक्ति वीना नदी जल विना
धेनुश्च दुग्धम विना
भ्राता स्नेह विना तरु फल विना
विद्या विना ब्राम्हणा
व्यर्थम जन्म निरर्थक किं जन्म कीर्ति विना

----हरवलेली वस्तू सापडण्यासाठी एक मंत्र आहे, त्याची माहिती मिळू शकते का?

नवीन Submitted by बागेश्री१५ on 25 April, 2018 - 15:32------

कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान|
तत स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते||

आमच्याकडे नरसिंहाचे नवरात्र असते. (सध्या सुरू आहे.) आम्ही प्रल्हाद आणि नरसिंहाची आरती म्हणतो. पण जर कोणाला अजून आरती, स्तोत्र माहीत असेल तर कृपया सांगावे.

खुप सुन्दर धागा आहे. खुप नविन नविन माहिती मिळत आहे.
"दोरे ओढिता ओढिता हरि दमला, धावत या हो कन्थ माझा दाटिला"
कुणाला हे भजन माहित असल्यास क्रुपया द्यावे.

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥ गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ॥ध्रु०॥ सांवळे सगुण सकळा जिवांचें जीवन । घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥ शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥

योगियां मुनिजना ध्यानीं
योगियां मुनिजना ध्यानीं । ते सुख आसनी शयनी ।।१।। हरी सुख फावले रे ।।धृ।। गोकुळींच्या गौळीया । गोपी गोधना सकळा ।।३।।बापखुमादेविवरू विठ्ठलें । तें सुख सवंगडीया दिधलें ।।४।।

तुजविण येकली रे कृष्णा
तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुंवा नवल केलें वेणू घेउनी हाती । आलीये तेचि सोय तुझी म्यां ओळखली गती ।।१।।नवल हे वालभ रे कैंसे जोडलें जीवा । दुसरें दुरी ठेलें प्रीती केला रिघावा ।।धृ।। पारू रे पारू कान्हा झणें करिसी अव्हेरू । तू तंव हृदयींचा होसी चैतन्य चोरू । बापखुमादेविवरू विठो करीं कां अंगिकारू ।।३।।

लक्ष लाऊनि अंतरी । कृष्णा
लक्ष लाऊनि अंतरी । कृष्णा पाहती नर नारी । लावण्यसागरू हरी । परमानंदु ।।१।। छंदे छंदे वेणू वाजे । त्रिभुवनी घनु गाजें । उतावेळ मन माझें । भेटावया ।।धृ।। ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोंवळा ।श्रुति नेणवे ते लीळा । वेदां सनकादिकां ।।३।। भूतग्रामींचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु । आड धरुनी गोपवेषु । वत्सें राखे ।।४।।रासक्रीडा वृंदावनी खेळे । इंदुवदन मेळे । उद्धरी यदुकुळें । कुळदीपकें ।।५।। निवृत्तीदासाचा दातारू । बापखुमादेविवरू । भक्ता देतो अभयकरू । क्षणांक्षणांमाजीं ।।

यातीकुळ माझें गेलें
यातीकुळ माझें गेलें हारपोनि । श्रीरंगावांचूनी अनु नेणें ।।१।। किती वो शिकवाल मज वेळोवेळा । मी तया गोवळा रातलीये ।।धृ।। अष्टभोग भोगणें मातें नाहीं चाड । भक्तिप्रेम गोड लेइलें गे माये ।।३।। बापरखुमादेविवरू जीवींचा जिव्हाळा । कांही केलिया वेगळा नव्हे गे माये ।।४।।

घनु वाजे घुणघुणा
घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रूणझुणा । भवतारकू हा कान्हा । वेगीं भेटावा कां ।।धृ।। चांद वो चांदणें । चापे वो चंदनु । देवकीनंदनेंवीण नावडे वो ।।२।। चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ।।३।। सुमनांची सेज । शितळ वो निकी ।पोळे आगीसारीखी । वेगीं विझवा कां ।।४।। तुम्ही गातसां सुस्वरें । ऐकों नेदावीं उत्तरें । कोकिळे वर्जावें । तुम्ही बाईयांनो ।।५।। दर्पणी पाहतां । रूप न दिसे आपुलें । बापखुमादेविवरू विठ्ठलें । मज ऐसें केलें ।।६।।

जयाचिये आवडी संसार त्याजिला
जयाचिये आवडी संसार त्याजिला । तेणें कां अबोला धरिला गे माये । पायां दिली मिठी घातली जीवें गांठी । साऊमा नये जगजेठी उभा ठेला गे माये ।।१।। भेटवा वो त्यासीं चरण झाडीन केशीं । सगुण रूपासी मी वो भाळलीये ।।धृ।। क्षेमालागीं जीव उतावेळ माझां । उचलोनि चारी भुजा देईन क्षेम । कोण्या गुंणें कां वो रुसला गोवळू । सुखाचा चावळू मजसी न करी गे माये ।।३।। ऐसें अवस्थेचें पिसें लावियेलें कैसें । चित्त नेलें आपणियां सरिसे गे माये । बापखुमादेविवरे लावियले पिसे । करूनि ठेविलें आपणिया ऐसें गे माये ।।४।।

जीवींचिया जीवा प्रेम भावाचियां भावा
जीवींचिया जीवा प्रेम भावाचियां भावा । तुजवांचुनी केशवा अनु नावडे ।।१।। जीवें अनुसरलीयें अझुनि कां न ये । वेगीं आणावा तो सये प्राणु माझा ।।धृ।। सौभाग्य सुंदरु लावण्यसागरू । बापखुमादेविवरू श्रीविठ्ठल ।।३।।

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईये वो ।।१।। वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी ।।धृ।। पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझें जिणें एका विठ्ठलेंविण ।।३।। बापखुमादेविवरू विठ्ठलची पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ।।४।।

परब्रम्ह निष्काम तो हा
परब्रम्ह निष्काम तो हा गौळीया घरीं । वाक्या वाळें अंदु कृष्ण नवनीत चोरी ।।१।।  म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ।।धृ।। लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी ।।३।। सांपडला देव्हारीं यासी बांधा दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ।।४।। बहुतां कष्टे बहुतां पुण्यें जोडिलें देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ।।५।। नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा । जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ।।६।।

मिळोनी गौळणी । देती यशोदे
मिळोनी गौळणी । देती यशोदे गाऱ्हाणी । खोडी करी चक्रपाणि । ऐक यशोदे साजणी ।।धृ।। परवां आला आमुचे घरा । दारीं निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा हो डेरा । फोडिला सैरा त्यावरी ।।२।।दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगतें तुझिया मुकुंदें । आमुचें घरा येऊनि गोविंदें । नवल केलें साजणी ।।३।। सून होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणि । कैसी जाहलीस हो गर्भिणी । तंव ती हसू लागली ।।४।। जवळ बैसला जाऊनी । पोट पाहे चांचपुनी । न कळे ईश्वराची करणी । तंव ती झिडकावी ।।५।। ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनी सांगू सुंदरी । एका जनार्दनीं आवरीं । आपुलियां कृष्णातें ।।६।।

गौळणी सांगती गाऱ्हाणी ।
गौळणी सांगती गाऱ्हाणी । रात्रीं आला चक्रपाणि । खाऊनि दहीं दुध तूप लोणी । फोडिलीं अवघी विरजणी । हा गे बाई कोणासी आवरेना ।।१।। यशोदे बाळ तुझा कान्हा । कोठवर सोसूं धिंगाणा ।।धृ।। दुसरी आली धांवत । यानें बाई काय केली मात । मुखासी मुखचुंबन देत । गळ्यामधीं हात घालीत । धरु जातां सांपडेना ।।३।। तिसरी आली धांवूनि । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढी माझी वेणी । दोहोंसी गांठ देऊनि । गांठ बाई कोणा सुटेना ।।४।। मिळोनी अवघ्या गौळणी । येतीं नंदाच्या अंगणीं । जातों आम्ही गोकूळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हें बाई आम्हासी पहावेना ।।५।। ऐसी ऐकतां गाऱ्हाणी । यशोदे नयनीं आलें पाणी । कृष्णा खोडी दे टाकुनी । एका जनार्दनीं चरणी । प्रेम तया आवरेना ।।६।।

यशोदे घराकडे चाल
यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ।।धृ।। साध्या गव्हाची पोळी लाटी । मला पुरणपोळी करून दे मोठी । नाहीं अडवित गुळासाठी । मला जेवूं घाल ।।२।। तूप लावून भाकर करी । वांगे भाजून भरीत करी ।वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवूं घाल ।।३।। आई गे खडीसाखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवूं घाल ।।४।। आई लहानचं घे गे उंडा । लवकर भाजून दे मांडा । लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवूं घाल ।।५।। आई मी खाईन शिळा घाटा । दह्याचा करून दे मठ्ठा । नाहीं माझ्या अंगीं ताठा । मला जेवूं घाल ।।६।। भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हरपली । यशोदेने कृपा केली । मला जेवूं घाल ।।७।। आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितो नऊ लाख । गाई राखुनी झिजली नखं । मला जेवूं घाल ।।८।।नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी । जाऊन सांगा यशोदेसी । मला जेवूं घाल ।।९।।

बाळ सगुण गुणांचें तान्हें
बाळ सगुण गुणांचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गाऱ्हाणे गे । गोकुळींच्या नारी ।।१।। श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडा गे । तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळींच्या नारी ।।धृ।। पांच वर्षाचें माझें बाळ गे । अंगणी माझ्या खेळे गे । कां लटिकाची घेतां आळ गे । गोकुळींच्या नारी ।।३।। सांवळा गे चिमणा माझा । गवळणीत खेळे राजा । तुम्ही मोठ्या ढालगजा गे ।  कुळींच्या नारी ।।४।। तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे । आळ घेतां या गोपाळा गे । तुम्ही ठाईच्या वोढाळा गे । गोकुळींच्या नारी ।।५।। तुम्ही लपवूनी याची गोटी गे । लागतां गे याचे पाठीं गे । ही एवढीच रीत खोटी गे । गोकुळींच्या नारी ।।६।। तुम्ही लपवूनी याचा भोवरा गे । आळ घेतां शारंगधरा गे । तुम्ही बारा घरच्या बारा गे । गोकुळींच्या नारी ।।७।।हा ब्रम्हविधीचा जनिता गे । तुम्ही याला धरुं पाहतां गे । हा कैसा येईल हातां गे । गोकुळींच्या नारी ।।८।। नामा म्हणे यशोदेशी गे । हा तुझा हृषीकेशी गे । किती छळीतो आम्हांसी गे । गोकुळींच्या नारी ।।९।।

राधा आणि तो मुरारी
राधा आणि तो मुरारी । क्रीडा कुंजवनी करी ।।१।। कृष्ण डुल्लत डुल्लत । आले निजभूवनांत ।।धृ।। सुमनाचे शेजेवरी । राधा आणि तो मुरारी ।।३।। आवडीनें विडे देत । दासी जनी उभी तेथ ।।४।।

 आवरीं आवरीं आपुला हरी
आवरीं आवरीं आपुला हरी । दुबळ्याची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णे ठेविली नाही ।।१।। गौळण उतावेळी । आली यशोदेजवळी । आवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ।।धृ।। कवाड भ्रांतीचे उघडिले ।  कुलूप मायेचे मोडिले । शिंके अविद्येचें तोडिलें । बाई तुझियां कृष्णें ।।३।। होती क्रोधाची अर्गळा । हळूची काढिलीसे बळा । होती अज्ञानाची खिळा । तीही निर्मूळ केली ।।४।। डेरा फोडिला दंभाचा । त्रिगुण तिवईस ठाव कैंचा । प्रपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ।।५।। अहंकार होता ठोंबा । उपडिला घुसळखांबा । तोही टाकीला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णें ।।६।। संचित हे शिळे लोणी । याची केली धूळधाणी । संकल्प विकल्प दुधाणी । तींही फोडीयेली कृष्णें ।।७।। प्रारब्ध हें शिळे दहीं । माझें खादलें गे बाई । क्रियमाण दुध साई । तीही मुखीं ओतली ।।८।। द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होतें कामाचें तें पाळे । तेंही फोडिले कृष्णें ।।९।। सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या होत्या घरीं । त्याही टाकिल्या बाहेरी । बाई तुझिया कृष्णें ।।१०।। कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफोडी । होती आयुष्याची दुरडी । तेही मोडिली कृष्णें ।।११।। पोरें रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाहीं ।।१२।। ऐसी वार्ता श्रवणी पडे । मग मी धांवोनी आलें पुढें । होतें द्वैताचे लुगडे । तेंही फिटोनी गेलें ।।१३।। आपआपणा विसरले । कृष्णस्वरूपी मिळालें । एका जनार्दनीं केलें । बाई नवल चोज ।।१४।।

चला बाई वृंदावनीं रासक्रीडा
चला बाई वृंदावनीं रासक्रीडा पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥ कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥ सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायीं हरिरुप होसी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥

गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे
गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळा । का रथ शृंगारीला ।सांगे वो मजला । अक्रूर उभा असे बाई गे साजणी ।।१।। या नंदाच्या अंगणी । मिळाल्या गौळणी ।।धृ।। बोले नंदाची पट्टराणी । सद्गदित होऊनी । मथुरेसी चक्रपाणि । जातो गे साजणी । विव्हळ झालें मन वचन ऐकुनी ।।३।। अक्रुरा चांडाळा । तुज कोणी धाडीला । कां घात करुं आलासी । वधीशी सकळां । अक्रुरा तुझें नाम तैशीच करणी ।।४।। रथीं चढले वनमाळी । आकांत गोकुळी । भूमि पडल्या व्रजबाळी । कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकानें भिजली धरणी ।।५।। देव बोले अक्रूरासी । वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी । न पहावें मजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनि ।।६।।  गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी

गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी
गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी गवळणी येउनी सांगती गार्‍हाणीं ।
येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥ आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा । याचें लाघव न कळे चतुरानना । यासी पाहतां मन नुरे मीपणा वो ॥२॥ एके दिवशीं मी आपुलें मंदिरीं । मंथन करितां देखिला पुतनारी । जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितोम तु राहें क्षणभरी वो ॥३॥ परवां आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा । नाचले ऐकत धरें पाहें अचला । धरूं जातां तो पळोनियां गेला वो ॥४॥ ऐसें बहु लाघव केलें येणें । किती सांगावें तुज गार्‍हाणें । एका जनार्दनीं परब्रह्मा तान्हें । यासी ध्याता खुंटलें येणे जाणे वो ॥५॥

गौळणी गार्‍हाणे सांगतो यशोदेसी
गौळणी गार्‍हाणे सांगतो यशोदेसी । दहीं दुध खाऊनियां पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगु महीपत्र सिंधु आटे ॥२॥ मेळवानि गोपाळ घरामध्यें शिरे कान्हा । धरुं जातां पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥ ऐसें मज याने पिंसे लावियसे सांगु काई । एका जनार्दनी कायावचामनें पायी ॥४॥

मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं
मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥ परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥  दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदें । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केलें साजणी ॥३॥ सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥ जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥  ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनीं आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६||

माझा कृष्ण देखिला काय
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥ हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥ माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥ संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजंयती ॥३॥ एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा गे ॥४॥

नानापरी समजवितें न परी राहे श्रीहरी ।
नानापरी समजवितें न परी राहे श्रीहरी । दहींभात कालवोनि दिला वेगीं झडकरीं । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ।१॥
राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ॥धृ॥ क्षणभरी घरीं असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरीं जातां आळ घेती गौळणी । थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥ राधा घेउनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकीं पहुडाविला श्रीहरीं । एका जनार्दनीं हरीला भोगी राधा सुंदरीं ॥३॥

आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी
आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥ पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत । एका चिती मात । मंथन करीत होती दारीत । धरुन कृष्णांचा हात । ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥ दुसरी गौळण भाळीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी । पिवळा पितांबर नेसुन आली । अंगीं बुट्टे दार चोळी । एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी । ऐशा आल्या पांच गौलणी ॥२॥ तिसरी गौळण रंग काळा । नेसुन चंद्रकाळा । काळे काजल लेऊन डोळां । रंग तिचासांवळा । काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा । ऐशा आल्या पांच गौळनी ॥३॥
चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल । कपाळी कुंकुम चिरी लाल । भांगी भरुन गुलाल । मुखी विडा रंग लाल । जैसे डांळिबीचे फुल । ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥ पांचवीं गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । हिरव्या कांकणांचा पहा रंग । जसें आरशींत जडलें भिंग । फुगडी खेळतां कृष्णसंग । एकनाथ अभंग । ऐशा आला पांच गौळणी ॥५॥

कसा मला टाकुनी गेला राम
कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥ रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥ रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥ एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥

नंदनवन मुरलीवाला
नंदनवन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥ पती सुताचा विसर पडिला । याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥ स्थावर जंगम विसरुनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥ समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐक्तां मना विश्रांती ॥५॥ एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सदगद ॥६॥

मुरली मनोरह रे माधव
मुरली मनोरह रे माधव ॥धृ॥ श्रीवत्सलांछन हृदयीं विलासन । दीन दयाघन रे ॥१॥ सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२॥
एका जनार्दनीं त्रिभुवनमोहन । राखी गोधन रे ॥३॥

झ्या मुरलीचा ध्वनी
झ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥  मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥ तुझ्या मुरलीचा सुर तान । मी विसरले देहभान । घर सोडोनि धरिलें रान । मी वृंदावना गेले ॥३॥ एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंद । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥

तुझें श्रीमुख सुंदर
तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥ मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ ॥ सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा नाहीं सांसारासी थारा । भेदाभ्रम गेला । कमलनयना ॥२॥ ध्वनि मंजुळ ऐकिली कानीं । सर्व सुखां जाली धनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । एकपणा जगजीवना ॥३॥

तुझी संगती नाहीं कामाची
तुझी संगती नाहीं कामाची । मी सुदंरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥ कसें वेड लाविलें कान्हों गोवळियां ॥धु॥ माझा वंश आहे मोठ्याचा तुं तंव यातीहीन गौळ्याचा । ऐक्य जालीया नांवरुअ पाचा । ठावाचि पुसलिया ॥२॥
तुझ्या अंगेची घ्रट घाणी । तनु काय दिसती वोगळवाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥ तुझ्या ठिकाणी अवगुणा मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा । व्रजनारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥ सर्व सुकहची कृष्णासंगती । वेणुनादें गाई गोप वेधती । एका जनार्दनी हरिरुपी रमतीं । त्या व्रज सुंदरीया ॥५॥

खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी
खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥ एका एक गौळनी एकएक गोपाळा । हातीं धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥ एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्मा कोंदलें ॥४॥

कृष्णाला भुलविलें गोपीने
कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥ यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥ नंदजी तुमचा कृष्ण लाडका हाका मरितो मोठ्यानें ॥२॥ वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवानें ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । नाहीं ऐकिलें मातेनें ॥४॥

कान्ह्या रे जगजेठी
कान्ह्या रे जगजेठी । देई भेटी एकवेळा ।1। काय मोकलिले वनी । सावजानि वेढियेले ।2।  येथ वरी होता संग । अंगे अंग लपविले ।3।

तुका म्हणे पाहिले मागे । ऐवढ्या वेगे अंतरला ।4।

आंत हरि बाहेर हरि
आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥1॥ हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥ हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥2॥ तुका ह्मणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥3॥

हरि तुझी कांती रे सांवळी
हरि तुझी कांती रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ।।१।। उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगो रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ।।धृ।।  तुझिये अंगी घुरट घाणी । बहू खासी दूध तूप लोणी । घरिचे बाहेरिल आणोनि । मी रे चांदणी सुकुमार ।।३।। मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन ।अंगीचे तुझे देखोनि लक्षण । मग विटंबना होईल रे ।।४।। तुज तंव लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणिक मात बोलु काही । कसी भीड नाही तुज माझी ।।५।। वचन मोडी नेदि हात । कळले न साहेचि मात ।तुकयास्वामी गोपिनाथ । जीवन्मुक्त करुनि भोगी ।।६।।

देहुडा चरणीं वाजवितो वेणू
देहुडा चरणीं वाजवितो वेणू । गोपिकारमणु स्वामी माझा ।।१।। खिला गे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या ।।धृ।। गुंजावर्ण डोळे शिरी बाबर झोटी । मयूर पुच्छ वेष्ठी शोभतसे ।।३।। सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशवराज ।।४।।

यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल
यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ।।धृ।। साध्या गव्हाची पोळी लाटी । मला पुरणपोळी करून दे मोठी । नाहीं अडवित गुळासाठी । मला जेवूं घाल ।।२।। तूप लावून भाकर करी । वांगे भाजून भरीत करी । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवूं घाल ।।३।। आई गे खडीसाखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवूं घाल ।।४।। आई लहानचं घे गे उंडा । लवकर भाजून दे मांडा । लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवूं घाल ।।५।। आई मी खाईन शिळा घाटा । दह्याचा करून दे मठ्ठा । नाहीं माझ्या अंगीं ताठा । मला जेवूं घाल ।।६।। भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हरपली । यशोदेने कृपा केली । मला जेवूं घाल ।।७।।

आई मी तुझा एकुलता एक
आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितो नऊ लाख । गाई राखुनी झिजली नखं । मला जेवूं घाल ।।८।। नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी । जाऊन सांगा यशोदेसी । मला जेवूं घाल ।।९।।

बाळ सगुण गुणांचें तान्हें गे
बाळ सगुण गुणांचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गाऱ्हाणे गे । गोकुळींच्या नारी ।।१।। श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडा गे । तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळींच्या नारी ।।धृ।। पांच वर्षाचें माझें बाळ गे । अंगणी माझ्या खेळे गे ।कां लटिकाची घेतां आळ गे । गोकुळींच्या नारी ।।३।। सांवळा गे चिमणा माझा । गवळणीत खेळे राजा । तुम्ही मोठ्या ढालगजा गे । गोकुळींच्या नारी ।।४।। तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे । आळ घेतां या गोपाळा गे । तुम्ही ठाईच्या वोढाळा गे । गोकुळींच्या नारी ।।५।।तुम्ही लपवूनी याची गोटी गे । लागतां गे याचे पाठीं गे । ही एवढीच रीत खोटी गे । गोकुळींच्या नारी ।।६।। तुम्ही लपवूनी याचा भोवरा गे । आळ घेतां शारंगधरा गे । तुम्ही बारा घरच्या बारा गे । गोकुळींच्या नारी ।।७।। हा ब्रम्हविधीचा जनिता गे । तुम्ही याला धरुं पाहतां गे ।हा कैसा येईल हातां गे । गोकुळींच्या नारी ।।८।। नामा म्हणे यशोदेशी गे । हा तुझा हृषीकेशी गे । किती छळीतो आम्हांसी गे । गोकुळींच्या नारी ।।९।।

हातीं घेऊनियां काठी
हातीं घेऊनियां काठी । शिकविते श्रीपती । यमुनेची माती । खासी कां कां कां कां ।।१।। हरिं तू खोडी नको करुं । माझ्या बा बा बा बा ।।धृ।।धांऊनिया धरिला करीं । बैसविला मांडीवरी । मुख पसरोनी करी । आ आ आ आ ।।३।। विष्णुदास नामा म्हणे । मरोनियां जन्मा येणें ।कृष्ण सनातन पाहू । या या या या ।।४।।

तळवे तळहात टेंकित
तळवे तळहात टेंकित । डाव्या गुडघ्यानें रांगत । रंगणी रंगनाथ । तो म्या देखिला सये ।।१।। गवळण जसवंती पैं सांगे । आलें या कृष्णाचेनि मागे । येणें येणें वो श्रीरंगें । नवनीत माझें भक्षिलें ।।धृ।। एक्याहातीं लोण्याचा कवळू । मुख माखिलें आळूमाळू । चुंबन घेता येतो परिमळू । नवनीताचा गे सये ।।३।। येणें माझें कवाड उघडिलें । येणें शिंकें हो तोडिलें । दह्यादुधातें भक्षिलें । उलंडिलें ताकातें ।।४।। ऐसें जरी मी जाणतें । यमुना पाणिया नच जातें । धरुनी खांबासी बांधितें । शिक्षा लावितें गोविंदा ।।५।। ऐसा पुराणप्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार । पंढरपुरी उभा विटेवर । भक्त पुंडलिकासाठी ।।६।।

दु:खाची निवृत्ती सुखाचें तें सुख
दु:खाची निवृत्ती सुखाचें तें सुख । पाहतां श्रीमुख गोविंदाचें ।।१।|रंगणी रांगत गुलगुला बोलत । असुर रुळत चरणांतळी ।।धृ।।नामा म्हणे हातीं लोणियाचा उंडा । गौळणी त्या तोंडा भुललिया ।।३।।

परब्रम्ह निष्काम तो हा
परब्रम्ह निष्काम तो हा गौळीया घरीं । वाक्या वाळें अंदु कृष्ण नवनीत चोरी ।।१।।  म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ।।धृ।। लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी ।।३।। सांपडला देव्हारीं यासी बांधा दाव्यांनी । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ।।४।। बहुतां कष्टे बहुतां पुण्यें जोडिलें देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ।।५।। नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा । जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ।।६।।

असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायानें लंगडा ।।धृ।।गौळ्याघरी  जातो दहीं दुध खातो । करी दह्यादुधाचा रबडा ।।२।।वाळवंटी जातो कीर्तन करितो । करी साधूसंतांसी झगडा ।।३।।एका जनार्दनीं भिक्षा वाढा माई । देव एकनाथाचा बछडा ।।४।।

सांवळा देखिला नंदाचा
सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पूर आला ।।धृ।।काळी घोंगडी हातामध्ये काठी । चारितो यमुनातटी गोधनें तो ।।२।।एका जनार्दनीं सांवळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहतां होती ।।३।।

दुडीवरी दुडी गौळणी सातें
दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळण गोरस म्हणों विसरली ।।१।। गोविंदु घ्या कोणी दामोदरू घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ।।धृ।। दुडिया माझारीं कान्होबा झाला भारी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ।।३।। एका जनार्दनीं सबलस गौळणी । ब्रम्हानंदु न समाये मनीं ।।४।।

गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेसी
गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेसी । दहीं दुध खाऊनियां पळूनी जातो हृषीकेशी ।।१।। लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगू महिपत्र सिंधू आटे ।।धृ।। मेळवोनी गोपाळ घरामध्ये मेळवोनी गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा । धरुं जातां पळूनी जातो यादवांचा राणा ।।३।। ऐसें मज यानें पिसें लावियलें सांगू काई । एका जनार्दनीं कायावाचामनें पायीं ।।४।।

अधरीं धरुनी वेणू
अधरीं धरुनी वेणू । वाजविला कुणी नेणुं ।।धृ।। प्रात:काळी तो वनमाळी । घेऊनि जातो धेनू ।।२।। उभी मी राहें वाट मी पाहें । केव्हां भेटेल मम कान्हु ।।३।। एका जनार्दनीं वाजविला वेणू । ऐकतां मन झालें तल्लीनु ।।४।।

सावळे परब्रह्म आवडे ये
सावळे परब्रह्म आवडे ये जीवा । मनें मन राणिवा घर केलें ।।१।।काय करुं सये सांवळे गोवित । आपें आप लपत मन तेथें ।।धृ।।बापखुमादेविवरू सांवळी प्रतिमा । मनें मनीं क्षमा एक झालें ।।३।।

कृष्णे वेधिली विरहिणी
कृष्णे वेधिली विरहिणी बोले । चंद्रमा करितो उबारा गे माय ।न लावा चंदनु अंगीं न घाला विंजणवारा । हरिविणे शून्य शेजारु गे माये ।।१।। माझे जीवीचें तुम्ही कां वो नेणां । माझा बळिया तो पंढरीराणा वो माय ।।धृ।। नंदनंदनु घडी घडी आणा । तयावीण न वांचती प्राणा वो माये । बापखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु ।अमृतपान गे माये ।।३।।

पंढरपुरीचा निळा लावण्याचा
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईये वो ।।१।। वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी ।।धृ।। पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझें जिणें एका विठ्ठलेंविण ।।३।। बापखुमादेविवरू विठ्ठलची पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ।।४।।

काय सांगुं तूतें बाई
काय सांगुं तूतें बाई । काय सांगुं तूतें ।।धृ।। जात होतें यमुने वातत भेतला सावला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ।।२।। तेणे माझी केली तवाली मग मी तेथून पलाली । पलता पलता घसलुन पलली दोईची घागल फुतली ।।३।। माझे गुलगे फुतले मग मी ललत बथले । तिकून आले शालंगपाणी मला पोताशी धलिले ।।४।।मला पोताशी धलिले माझे समाधान केलें । निवृत्तीचे कृपे सुख हें ज्ञानदेवा लाधलें ।।५।।

ऐक एक सखये बाई
ऐक एक सखये बाई । नवल मी सांगू काई । त्रेलोक्‍याचा धनी तो हा । यशोदेसी म्‍हणतो आई ॥१॥ देवकीने वाहीला । यशोदेनें पाळिला ।पांडवांचा बंदीजन । होऊनियां राफिला ॥२॥ ब्रह्मांडाची साठवण । योगियाचें निजधन । चोरी केली म्‍हणऊनी उखळासी बंधन ॥३॥सकळ तीर्थे जया चरणी । सुलभ हा शूळपाणी । राधिकेसी म्‍हणे तुझी । करीन मी वेणीफणी ॥४॥ शरण एका जनार्दनी । कैवल्‍याचा मोक्षदानीं ।गाई गोप गोपाबाळां । मेळविले आपुलेपणीं ॥५॥

भूल‍वलें वेणुनादे
भूल‍वलें वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥ पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्‍चळ ॥२॥ तुणचरें लुब्‍ध जालीं । पुच्‍छ वाहुनियां ठेलीं ॥३॥ नाद न समायें त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥

गोधनें चाराया जातो
गोधनें चाराया जातो शारंगपाणि । मार्गी भेटली राधिका गौळणी ।
कृष्‍ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी हो ॥१॥ यशोदा म्‍हणे नाटका ऋषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।येऊ रुदत सांगतो मातेपासी । माझा चेडु लपि‍वला निरीपाशीं हो ॥२॥राधीका म्‍हणे यशोदे परियेसी । चेंडू नाही नाही वो मजपाशीं । परि हा लटिका लबाड ऋषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी हो ॥४॥ यशोदा म्‍हणे चाळका तुम्‍हीं नारी । मार्गी बैसता क्षण एक मुरारी । एका जनार्दनीं विनवी श्रीहरी । नाम घेतां पातकें जाती दूरी हो ॥५॥

तुझ्या मुरलीचा ध्‍वनी
तुझ्या मुरलीचा ध्‍वनी । अकल्पित पडली कानीं । विव्‍हळ झालें अंत:करणीं । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहा रे सावळीया कैसी वाजविली मुरली ॥धृ॥ मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरिला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येऊनि ह्र्दयीं संचरली ॥३॥ तुझ्या मुरलीचा सूरतान । मी विसरलें देहभान । घर सोडोनि धरिले रान । मी वृंदावनी गेलें ॥४॥ एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंदा । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥५॥

धिंग्याचे धिंगुले खांद्यावर कांबुळे
धिंग्याचे धिंगुले खांद्यावर कांबुळे ।। नाचत तान्हुले येश्वदेचा ।। ग बाई येश्वदेचा ।।१।। येती गवळणी करती बुझावणी ।। लागती चरणीं गोविंदाच्या ।। ग बाई गोविंदाच्या ।।२।। गोविंद बाळिया वाजविती टाळिया ।। आमुचा  कान्हा देवराव ।। ग बाई देवराव ।।३।। कटी दोरा बिंदली वाघनखे साजिरीं । नाचतो श्रीहरी येश्वदेचा ।। ग बाई येश्वदेचा ।।४।। पायीं घागरिया वांकी साजरिया ।। कानींच्या बाळिया ढाल देती ।। ग बाई ढाळ देती ।।५।। एका जनार्दनी एकत्व शरण ।। जीवें लिंबलोण उतरिती । ग बाई उतरिती ।।६।।

कैसी जाऊं मी वृंदावना
कैसी जाऊं मी वृंदावना ।। मुरली वाजवितो कान्हा ।। धृ॰ ।। पैल तिरीं हरी वाजवी मुरली । नदी भरली जमुना ।।१।। कांसे पितांबर केशरी टिळक ।। कुंडल शोभे काना ।।२।। काय करूं बाई कोणाला सांगू ।। नामाची सांगड आणा ।।३।। नंदाच्या हरीनें कौतुक केलें ।। जाणे अंतरींच्या खुणा ।।४।। एका जनार्दनी म्हणा ।। देवमहात्म्य कळेना कोणा ।।५।।

कोणी एक भुलली नारी
कोणी एक भुलली नारी ।। विकितां गोरस घ्या म्हणे हरी ।।१।। देखिला डोळां बैसलां मनीं ।। तोचि वदनीं उच्चारी ।।२।। आपुलियाचा विसर भोळा ।। गोविंद कळा कौतुकें ।।३।। तुका म्हणे हांसे जन ।। नाहीं कान ते ठाई ।।४।।

माझें अचडें छकुडें ग राधे रुपडें
माझें अचडें छकुडें ग राधे रुपडें ।। पांघरू घालितें कुंचडें ।। धृ॰ ।। हरि माझा गे सांवला ।। पायीं पैंजण बाजती खुळखुळा । यानें भुलविल्या गोपी बाळा ।। माझे॰ ।।१।। हरि माझा गे नेणता ।। करि त्रिभुवनाचा घोंगता ।। जो काआ नांदे त्रिभुवनी ।। मा॰ ।।२।। ऐसे देवाजीचे गडी ।। पेंद्या सुदामाची जोडी ।। बळीभद्र त्याचा गडी ।। मा॰ ।।३।। जनी म्हणी तूं चक्रपाणी ।। खेळ खेळ खेळतो वृंदावनीं ।। लुब्ध झाल्या त्या गौळणी ।। माझे॰ ।।४।।

वृंदावनीं वेणू कोणाचा बाईं
वृंदावनीं वेणू कोणाचा बाईं वाजे ।। वेणू नादें गोवर्धन गाजे ।। पुच्छ पसरुनी मयूर विराजे ।। मजा पाहतां भासती यादव राजे ।।१।। तृण चारा चरुं विसरलीं ।। गाई व्याघ्र एके ठायीं झालीं ।। पक्षींकुळें निबांत राहिलीं ।। वैरभाव समूळ विसरलीं ।।२।। तेथें यमुनाजळ स्थिर स्थिर वाहे ।। रविमंडळ चालतां स्तब्ध होय ।। मत्स्य कूर्म वराह स्तंभित राहे ।। बाळा स्तनपान देऊं विसरली माय ।।३।। वांक्या रुणझुण रुणझुण वाजती ।। ध्वनी मुंजळ मुंजळ उमटती ।। देव विमानीं बैसूनि स्तुति गाती ।। भानुदासी लाधली प्रेमभक्ती ।।४।।

भक्ताकारणें येणें घेतलीसे आळी
भक्ताकारणें येणें घेतलीसे आळी ।। दहा गर्भवास सोशी वनमाळी ।।१ ।। माझ्या कान्ह्याचें नांव तुम्ही बरें घ्या गे ।। हृदयी धरुनि यासी खेळावया न्या गे ।।२।। कल्पने विरहित भलतिया मागें ।। अभिमान सांडूनि दीनापाठी लागे ।।३।। शोषियेली पुतना मोडियेले तरू ।। आलिंगन दे सवे बापरखुमादेवीवरु ।।४।।

कृष्ण माझा कणकण करितो
कृष्ण माझा कणकण करितो , दृष्ट झाली कीं काय गे ।। कृष्ण॰ ।। धृ॰ ।। रामरक्षा असे मिळोनी , कुणी तरी करा उपाय गे ।। मीठ मोहऱ्या मिरच्या उतरून देईन ब्राम्हणा गाय गे ।। कृष्ण॰ ।।१।। लावा अंगारा मार्ग मलिन मी पूजिन सटली माय गे ।। मेंढा कोंबडा बळी म्यां देतें कृपा करिल मनुराजे गे ।। कृष्ण॰ ।।२।। आली राधिका दृष्ट उतरली उठुनी उभा राही गे ।। हांसत चालिला राधिके संगें वंदूं यदुपतिपाय गे ।। कृष्ण॰ ।।३।।

गाई गोपाळ यमुनेच्या तटी
गाई गोपाळ यमुनेच्या तटी ।। येती पाणिया मिळून जगजेठी ।। चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी ।। चला म्हणती पाहूं दृष्टीं ।।१।। ऐशा गोपिका त्या कामातुर नारी ।। धृ॰ ।। चित्ता विव्हळ त्या देखाव्या हरी ।। मीस पाणियाचें करिताती घरीं ।। बारा सोळा मिळूनी परस्परीं ।।२।। चीरें चोळीया त्या धुतां विसरती ।। ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्ण मूर्तिं ।। कोणा न ठावें कोण कुल जाती ।। झाल्या तटस्थ सकळ नेत्रपातीं ।।३।। दंत धुवण्याचा मुखामाजी हात ।।  वाद्यें वाजती न ऐकती जन्मांत ।। करी श्रवण कृष्ण वेणू गीत ।। स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ ।। ऐशा॰ ।।४।।

गोधनें चारावया जातो सारंगपाणी
गोधनें चारावया जातो सारंगपाणी ।। मार्गी भेटली राधिका गौळणी ।। कृष्ण दान मागे निरी आसडूनी ।। तंव देखिली येश्वदा जननी हो ।।१।। येश्वदा म्हणे नाटकी हुशिकेशी परनारीसी कैसा धुंडीसी ।। येरुं रुदोनी सांगतो मातेसी ।। माझा चेंडू लपवी निरीपाशीं हो ।।२।। राधिका म्हणे येश्वदे परियेसी ।। परि हा लटिका लबाड हृषीकेशी ।। चेंडू नहीं नहीं हो मजपाशीं ।। निरी आसडीतां चेंडूं पडे धरणीसी ।।३।। येश्वदा म्हणे चेटकी तुम्ही नारी ।। मार्गी क्षणेक येतां मुरारी ।। एका जनार्दनी विनवी हरी ।। नाम घेता पातकें पळती दुरी ।।४ ।।

गौळणी म्हणती गौळणीला यशोदेशी
गौळणी म्हणती गौळणीला ।। यशोदेशी पुत्र झाला ।।१।। एक धांवती एकीपुढे ।। एक वांटीती सुंडवडे ।।२।। वाणें घेऊनिया ताटी ।। नंदाघरी झाली दाटी ।।३।। ऐसी गलबला झाली ।। दासी जनी हेल घाली ।।४।।

जात होतें पानियां तेथें भेतला सांवला
जात होतें पानियां तेथें भेतला सांवला ।। दोयवळ तोपी म्युल पिच्छाची ।। खांद्यावली कांबला ।। काय थांगुं तूंतें बाई ।। काय थांगू तूतें बाई ।। धृ॰ ।।१।। घुलगे फुतले ।। मग मी ललत बसलें ।। कुनिकून आला सालंगपानी ।। मला पोतासी धलिलें काय थांगू तूतें ।।२।। मला पोतासी धलिलें ।। मोते सुख बातलें ।। निवलुती कुलपें कलुनी ज्ञानदेवा लाधले । काय थांगू तूतें बाई ।।३।

तळवे तळहात टेंकितों
तळवे तळहात टेंकितों ।। डाव्या गुड्घ्यानें रंगतो ।। रंगनीं रंगनाथ आज म्यां देखियेले सये ।।१।। यानें माझें कवाड उघडिलें ।। यानें माझें शिंकें गे तोडिलें दह्या दुधातें भक्षिलें।। उलंडीलें ताकातें ।।२।। एका हातीं लोण्याचा कवळ ।। मुखें माखिला अलुमाल ।। चुंबन देतां येतो परिमळ ।। नवनीताचाग सये ।।३।। गवळण यशवंती पैं सांगे ।। आलिया कृष्णाच्यानी मागें ।। येथेंयेणें हो श्रीरंगें ।। नवनीत भक्षिलें सये ।।४।। ऐसें कांहीं मी जाणतें ।। यमुनापाण्या जंव जातें ।। धरून खांबासी बांधितें शिक्षा लावितें गोविंदा ।।५।। तो हा पुराणप्रसिद्ध चोर ।। केशव नाम्याचा दातार ।। पंढरपुरी धरिला अवतार ।। भक्त पुंडलिका साठीं ।।६।।

दुडीवर दुडी गौळणी साते जे निघाल्या
दुडीवर दुडी गौळणी साते जे निघाल्या ।। गौळणी गौरस म्हणों विसरल्या ।। गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे ।। तंव हांसती नारी मथुरेच्यागे ।।१।। दुडिया माझारीं कान्होबा झाला भारी ।। उचंबळे गौरस सांडे बाहेरी ।। गो॰ ।।२।। एका जनार्दनी सबरस गौळणी ।। ब्रम्हानंद न समाये मनीं ।। गो॰ ।।३।।

नको बाजवूं कान्होबा मुरली
नको बाजवूं कान्होबा मुरली ।। नको॰ ।। धृ॰ ।। तुझ्या मुरलीनें सुद बुद हरली ।। हरली हरली ।। नको॰ ।।१।। घरीं कंरीत होतें काम धंदा ।। तेथेंच मी गडबडले ।। नको॰ ।।२।। घागर घेउनि पाणियाशी जातां ।। डोईवर घागर पाझरली ।। नको॰ ।।३।। एका जनार्दनी पूर्ण कृपेनें ।। राधा गौळण घाबरली ।। नको॰ ।।४।।

भूलविलें वेणुनादें
भुलविलें वेणुनादें ।। वेणू वाजविला गोविंदें ।।१।। पांगुळले यमुनाजल ।। पक्षी राहिलें निश्चळ ।।२।। तृणचारा विसरलीं ।। पुच्छें वाहोनियां ठेलीं ।।३।। आनंद न समाये त्रिभुवनी ।। एक भुलला जनार्दनी ।।४।।

रडत माझें बाळ तान्हें
रडत माझें बाळ तान्हें ।। समजाविते राहिना ।। धृ॰ ।। नानापरी समजाविते ।। मागेल तें खाया देतें ।। थोपटुनी निजवितें ।। परी हा उगा राहिना ।।१ ।। नानापरी करितो छंद ।। रडतो हा स्फुंद स्फुंद ।। नेत्रांतुनी वाहे बिंद ।। परी डोळा लागेना ।।२।। पोटीं धरूनियां दम ।। सर्वांगी सुटला घाम ।। एकाजनार्दनी प्रेम ।। यशोदेशीं माईना ।।३।।

राधे तुझा रंग पाहून कृष्ण दंग झाला
राधे तुझा रंग पाहून कृष्ण दंग झाला ।। राधे हरि दंग झाला ।। धृ॰ ।। वेणी फणी करूनि चांग ।। काजळ कुंकूं ल्याली भांग ।। अंगामध्यें चोळी तंग ।। दावि गोरा रंग हरिला ।। राधे॰ ।।१।। राधे तुझा रंग झोक ।। कृष्ण पाहून लावी नोक ।। जरी पातळाचा झोंक ।। पदर सांवरिला ।। राधे॰ ।।२।। मथुरेची गौळण थाट ।। शिरीं गोरसाचा माठ ।। चढून यमुनेचा घांट ।। पालवी हरीला ।। राधे तुझ्या॰ ।।३ ।। मथुरेची गौळण वेडी ।। चालतांना ।। डोळे मोडी ।। गोपळनाथ भक्त गडी ।। चरणीं ठाव दिला ।। राधे॰ ।।४।।

राधे तुला पुसतो घोंगडीवाला
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ।। घोंगडीवाला कांबळीवाला ।। राधे॰ ।। धृ॰ ।। जमवुनि पोरें गेला यमुनेच्या तिरीं ।। वांटितो गोपाळकाला ।। राधे॰ ।।१।। रात्री माझ्या मंदिरीं आला ।। निरोप सांगुनि गेला ।। राधे॰ ।।२।। गळां वैजयंती माळा हाति घेऊनियां वेणू ।। नेसुनि पितांबर पिंवळा ।। राधे॰ ।।३।। जनी म्हणे विठू हा धाला ।। गळां वैजयंती माळा ।। राधे ।।४।।

वारियानें कुंडल हाले
वारियानें कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।।धृ॰।। राधेलापाहुनी भुलले हरि । बैल दोहितो आपुले घरीं ।।१।।  फणस गंभीर कर्दळी दाट ।। हातीं घेऊन सारंगीपाट ।।२।। हरिला पाहुनी भुलली चित्ता । मंदिरीं घुसळी डेरा रिता ।।३।। मन मिळालेंसे मना । एका भुलले जनार्दना ।।४।। वारियानें॰ ।।

1 बाळछंदो प्रेमडोहीं मन ७२६
बाळछंदो प्रेमडोहीं मन । जालें मनाचें उन्मन । उपरती धरिलें ध्यान । झालें ज्ञानपरब्रह्मीं ॥१॥ निमिषा निमिष छंद माझा । बाळछंदो हा तुझा । वेगि येई गरुडध्वजा । पसरुनीया भूजा देई क्षेम ॥२॥ तुटली आशेची सांगडी । ध्यानें नेली पैल तडी । सुटली संसाराची बेडी । क्षणु घडी रिती नाहीं ॥३॥ नाठवें द्वैताची भावना । अद्वैती न बैसें ध्याना । दिननिशींची रचना । काळगणना छंदे गिळीं ॥४॥ जप तप वृत्ति सहित । निवृत्ति होईन निश्चिति । समाधी बैसेन एकतत्त्व । मुखीं मात नामाची ॥५॥ ज्ञानदेवीं छंद ऐसा । बाळछंद झाला पिसा । दान मागतसे महेशा । दिशादिशा न घली मन ॥६॥

2 अलक्षलक्षीं मी लक्षीं ७२७
अलक्षलक्षीं मी लक्षीं । तेथें दिसती दोहीं पक्षी । वेदां शास्त्रां हे़ची साक्षी । चंद्रसूर्या सहित । मागेन स्वानुभवअंगुले । पांचा तत्त्वांचे सानुलें । व्यर्थ इंद्रिये भोगीलें । नाहीं रंगले संताचरणीं ॥१॥ बाळछंदो बाबा बाळ छंदो । रामकृष्ण नित्य उदो । ह्रदयकळिके भावभेदो । वृत्तिसहित शरीर निंदो । नित्य उदो तुझाची ॥२॥ क्षीरसिंधुही दुहिला ।चतुर्दशरत्नीं भरला । नेघे तेथील साउला । मज अबोला प्रपंचेंसी । दानदेगा उदारश्रेष्ठा । परब्रह्म तूं वैकुंठा । मुक्ति मार्गीचा चोहटा ।फुकटा नेघे तया ॥३॥ पृथ्वीतळ राज्यमद । मी नेघे नेणें हेंही पद ।रामकृष्ण वाचे गोविंद । हाची छंद तुझ्या पंथे । मंत्र तीर्थयज्ञयाग । या न करि भागा भाग । तूंचि होऊनि सर्वांग । सर्वासंग मज देई ॥४॥वृत्ति सहित मज लपवी । माझें मन चरणीं ठेवी । निवृत्ति पदोंपदीं गोवीं तुं गोसावी दीनोध्दारण ॥ सात पांच तीन मेळा । या नेघे तत्त्वांचा सोहळा । रज तमाचा कंटाळा । ह्रदयीं जिव्हाळा हरि वसो ॥५ श्वेत पीत नेघे वस्त्र । ज्ञानविज्ञान नेघे शास्त्र । स्वर्ग मृत्यु पाताळपात्र । नित्य वस्त्र हरी देई । चंद्रसूर्य महेन्द्र पदें । ध्रुवादिकांची आनंदें । तें मी नेघे गा आल्हादें । तुझ्या ब्रिदें करीन घोष ॥६॥ करचरणेंसे इंद्रियवृत्ति । तुझ्या ठायीं तूंचि होती । मी माझी उरो नेदी कीर्ति । हें दान श्रीपति मज द्यावें । शांती दया क्षमा ऋध्दी । हेहि पाहातां मज उपाधी । तुझी या नामांची समाधी  कृपानिधी मज द्यावी ॥७॥ बापरखुमादेविवरु तुष्टला । दान घे घे म्हणोनि वोळला । अजानवृक्ष पाल्हाईला । मग बोलिला विठ्ठल हरी । पुंडलिके केलेरे कोडें । तें तुवां मागीतलेरे निवाडें । मीं तुज ह्रदयीं सांपडे । हे त्त्वां केलें ज्ञानदेवा ॥८॥ बाळछंद समाप्त

१ सुंदर माझे जाते गे फिरतेके बहुतेके
सुंदर माझे जाते गे फिरतेके बहुतेके । ओव्या गाऊ कवतिके  तू ये रे बाळ विठ्ठला ।।१।। जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेट गे । लाउनी पांची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला ।।२।। सासू आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बाळ विठ्ठला ।।३।। प्रपंच दळण  दळीले पीठ ते भरिले । सासू पुढे ठेविले तू ये रे बाळ विठ्ठला ।।४।।सत्वाचे आंदण ठेविले पुण्य ते वैरीले । पाप ते उतू गेले ये रे बाळ विठ्ठला ।।५।। जनी जाते गाईल कीर्ती राहील । थोडासा लाभ होईल तू ये रे बाळ विठ्ठला ।।६।।

१ येई हो कान्हाई मी दळीन एकली
येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळितां शिणले हात लावी वहिली ॥धृ॥ वैराग्य जातें मांडुनि विवेक खुंटा थापटोनी । अनुहत दळण मांडुनी त्रिगुण वैरणी घातलें ॥१॥ स्थूळ सूक्ष्म दळियेलें देहकारणासहित । महाकारण दळियेलें औट मात्रेसहित ॥२॥ दशा दोन्ही दळिल्या व्दैत अव्दैतासहित । दाही व्यापक दळियेलें अहंसोहंसहित ॥३॥ एकवीस स्वर्ग दळियेले चवदा भुवनांसहित ।सप्त पाताळें दळियेलीं सत्प सागरांसहित ॥४॥ बारा सोळा दळियेल्या सत्रवीसहित । चंद्र सूर्य दळियेले तारांगणांसहित ॥५॥ नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहासहित । तेहतीस कोटी देव दळियेले ब्रम्हाविष्णुसहित ॥६॥ ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानासहित । मीतूंपण दळियेलें जन्ममरणासहित ॥७॥ ऎसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित ।एका जनार्दनी कांहीं नाहीं उरलें व्दैत ॥८॥

जोहार मायबाप जोहार । मी सकळ संतांचा
जोहार मायबाप जोहार । मी सकळ सन्ताचा महार । सांगतों दृढ विचार । तो ऎका की जी मायबाप ॥१॥ माझा विचार नारदें ऎकिला । तो पुन:रुपा नाहीं आला । भीष्म ध्रुव प्रल्हाद आगळा । या विचारें बोधिलें की जी मायबाप ॥२॥ उपमन्यु बिभीषण । सर्वांमाजीं अर्जुन । आणिकही ऋषी सांगेन । सावध ऎका की जी मायबाप ॥३॥ पराशर विश्‍वामित्रादि जाण । या विचारें पावलें समाधान । हरिश्र्चंद्र शिबी सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥४॥ ऎशा विचारें चालले । ते पुनरपि नाहीं आलें । एका जनार्दनीं भले ।ऎक्यपण कीं जी मायबाप ॥५॥

मुका झालो वाचा गेली ।।धृपद।।
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ।।१।। जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्न । निंदिले उपान्ना । तेणे पातालो मुख बंधना ।।२।। साधुसंताची निंदा केली । हरी भक्ताची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगु झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ।।३।।

बहिरा अभंग
बहिरा झालो या या जगी ॥धृ॥ नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा
उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा । आलासी कवण्या वाटां मातेचियां गर्भवासा । जो पंथ वोखटा रे पचलासी कर्मकोठा । अविचार बुद्धि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥ पयें दे मदालसा सोहं जो जो रे बाळा । निजध्यानीं निज पा रे लक्ष लागो दे डोळा । निज तें तूं विसरलासी होसी वरपडा काळा ॥२॥ नवमास कष्टलासी दहाव्यानें प्रसुत झाली । येतांचि कर्मजाड तुझीमान अडकली । आकांतु ते जननीये दु:ख धाय मोकली । स्मरे त्या हरिहरा ध्यायीं कृष्णमाउली ॥३॥ उपजोनि दुर्लभु रे मायबापा झालासी । वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी । माझें  माझें म्हणोनिया झणी वायां भुललासी । होणार जाणार रे जाण नको गुंफो भवपाशीं ॥४॥ हा देहो नाशिवंत मळमुत्राचा बांधा । वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा । रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई ऎसा ॥५॥  या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऎसा । माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा । बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा ते सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥ या पोटाकारणें रे काय न करिजे एक । या लागीं सोय धरी रे तिहीं भुलविले लोक । ठायींचे नेमियेलें त्याचें आयुष्य भविष्य । लल्लाटीं ब्रम्हारेखा नेणती तें ब्रम्हादिक ॥७॥ जळींचीं जळचरें रे जळीचिया रमती । भुललीं तीं बापुडीं रे ते कांहीं नेणती । जंव नाहीं पुरली रे त्यांची आयुष्यप्राप्ती । वरि घालुनि भोंवरा जाळ बापा तयातें गिवसिती ॥८॥ पक्षिणी पक्षिया रे निरंजनीं ये वनीं । पिलिया कारणें रे गेली चराया दोन्ही । अवचिती सांपडली रे पारधिया लागुनी । गुंतुनियां मोहोपाशीं प्राण त्याजिती दोन्ही ॥९॥ मृग हा चारिया रे अतिमानें सोकला । अविचार बुद्धि त्याची परतोनि मागुता आला । तंव त्या पारधियानें गुणीं बाणु लाविला । आशा रे त्यजुनियां थिता प्राणा मुकला ॥१०॥ अठराभार वनस्पती फुली फळी वोळती । बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती । ज्या घरीं कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती । हें सुख सांडुनियां कासया योग सेविती ॥११॥हे सुख सांडूनियां कोण फळ तयासी । कपाट लंघुनियां योगी ध्याती कवणासी । योग तो सांग मज कवण ध्यान मानसी । सर्वत्र गोविंदु रे ह्र्दयी ध्यायीं ह्र्षीकेशी ॥१२॥ इतुकिया उपरी रे पुत्रा घेई उपदेशु । नको भुलो येणें भ्रमें जिवित्वाचा होईल नाशु । क्षीरा नीरा पारखी रे परमात्मा राजहंसु । निर्गूण निर्विकार पुत्रा सेवी ब्रम्हरसु ॥१३॥इतुकिया उपरी रे पुत्र मातें विनविता झाला । संसार सोहळा थोर कष्टी जोडला । पंचभुतें निवती येथे म्हणोनि विश्रामु केला । वोखटा गर्भवासु कणवा कार्या रचिला ॥१४॥ गर्भीची यातना रे पुत्रा ऎके आपुल्या कानीं । येतों जातां येणें पंथें सांगाती नाहीं रे कोणीं । अहंभावो प्रपंचु पुत्रा सांडी रे दोन्ही । चौर्‍यांशी जीवयोनी प्रवर्तले मुनिजन तत्क्षणीं ॥१५॥ वाहातां महापुरीं रे पुत्रा काढिले तुज । राक्षिलासी प्रसिद्ध सापडलें ब्रम्हबीज । मग तुज ओळखी नाहीं कां रे नेणसी निज । आपेंआप सदगुरु कृपा करील सहज ॥१६॥ उपजत रंगणा रे पुत्रा तुवां जावें वना । बैसोनि आसनीं रे पाहे निर्वाणीच्या खुणा । प्राणासी भय नाहीं तापत्रयाचाराणा । मग तुज सौरसु पाहा रे परब्रम्हिच्या खुणा ॥१७॥ बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनीं । चेतवी तुं आपणापें चेतविते कुंडलिनी । चालतां पश्र्चिम पंथें जाई चक्र भेदुनी । सतरावी जीवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥ मग तूं देखसी त्रिभुवन स्वर्ग मृत्यु पाताळ । नको भुलों येंणें भ्रमें सांडीं विषय पाल्हाळ । आपणापें देखपा रे स्वरुप नाहीं वेगळें । परमात्मा व्यापकु रे पाहा परब्रम्हा सांवळें ॥१९॥ इतुकिया उपरी रे पुत्रा ते विनवी जननी । परियेसी माउलिये सन्तोषलों तत्क्षणीं । इंद्रायणी महातटीं विलासलों श्रीगुरुचरणीं । बोलियेले ज्ञानदेवो सन्तोषलों वो मनीं ॥२०॥

श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा ।
श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा । अनादि मूळ तूंचि विश्वव्यापक बीजा । समाधि घेई पुत्रा स्वानंदाचिया भोजा । पालखी पहुडलिया नाशिंवत रे माया ॥१॥ जाग रे पुत्रराय जाई श्रीगुरुशरण । देह तूं व्यापिलासी चुकवी जन्ममरण । गर्भवासु वोखटा रे तेथें दु:ख दारुण । सावध होई कां रे गुरुपुत्र तूं सुजाण ॥२॥ मदालसा म्हणे पुत्रा ऎक बोलणें माझे । चौर्‍यांशी घरामाजी मन व्यामुळ तुझें । बहुत सिणतोसि पाहतां विषयासीं वांझे । जाण हें स्वप्नरुप येथें नाहीं बा दुजें ॥३॥सांडी रे सांडी बाळा सांडी संसारछदु । माशिया मोहळ रे रचियेला रे कंदु । झाडुनि आणिखी नेला तया फुकटचि वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशें आनंदु ॥४॥ सत्व हे रज तम तुज लाविती चाळा । काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा । यासवें झणें जासी सुकुमारा रे बाळा ।अपभ्रंशी घालतील मुकशील सर्वस्वाला ॥५॥ कोसलियानें घर सुदृढ पैं केलें । निर्गमु न विचारिता तेणें सुख मानियेलें । झालें रे तुज तैसें यातायाती भोगविलें । मोक्षव्दार चुकलासी दृढकर्म जोडलें ॥६॥ सर्पे पै दर्दुर धरियेला रे मुखीं । तेणेंहि रे माशी धरियेली पक्षी ।तैसा नव्हे ज्ञानयोगु आपाअपणातें भक्षी । इंद्रियां घाली पाणी संसारी होई रे सुखी ॥७॥ पक्षिया पक्षिणी रे निरंजनीं ये वनीं । पिलिया कारणें रे गेली चराया दोन्ही । मोहोजाळें गुतली रे प्राण दिधले टाकुनी ।संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥८॥ जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला । तैसा नव्हे ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला । अनुभवी गुरुपुत्रा तोचि स्वयें बुझाला । ऎक त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला ॥९॥

पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी बाप ना माये ॥१॥ दाते हो दान करा जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥ हिंडतां गव्हानें गा शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी जन्म दुःखातें वारी । कीतिऩ हे संतां मुखीं तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो नांदे पंढरपुरीं ॥२॥ या पोटाकारणें गा जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय भीक नाहीं खंडणा । पुढारा ह्मणती एक तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं आशा बहु दारुणा ॥३॥ काय मी चुकलों गा मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य तेथें आठव नाहीं । मी माजी भुललों गा दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान संत महानुभाव कांहीं ॥४॥ दुरोनि आलों मी गा दुःख जालें दारुण । यावया येथवरीहोतें हें चि कारण । दुर्लभ भेटी तुह्मां पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां दोन्ही कर जोडून ॥५॥

देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलों
देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी कोठें स्थिर राहीलो । पाय डोळे ह्मणतां माझे तींहीं कैसा मोकलिलों ।परदेशीं नाहीं कोणी अंध पांगुळ जालों ॥१॥ आतां माझी करीं चिंता  दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥चालतां वाट पुढें  भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं तुज धरूनि चित्तीं ॥२॥ भाकितों करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा लक्ष चौ-यांसी गांव । धरूनि राहिलों गा हा चि वसता ठाव ॥३॥ भरवसा काय आतां कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीतिऩ तया मज बहुतां । म्हणऊनि मारीं हाका सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी तूंचि कृपाळू दाता ॥४॥ संचित सांडवलें कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा। होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां माझा सर्वस्वें बळी ॥५॥

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ
देखत होतों आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय जियाल्याचें फळ ॥१॥ आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी। करीं मारग सोपा । जाईन सिद्धपंथें । अवघ्या चुकतील खेपा ॥ध्रु.॥ होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना मागें ।तोही सांडिला आधार । हा ना तो ठाव झाला । अवघा पडिला अंधार ।फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥ जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा ।इंद्रिये मावळलीं । आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला। तो चि देह नव्हे दुजा ॥३॥ गुंतलों या संसारें। कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी ।मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसे चि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥ लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा ।पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा। पंढरीच्या निवासा ॥५॥

सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें । मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥ सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें ।त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा । न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥ ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद ।अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतkव निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । ह्मणोनि चालविला मागें येतील त्यांसीं । मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥ वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव । ह्मणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥५॥

आंधळ्या पांगळ्या चा एक विठोबा
आंधळ्या पांगळ्या चा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥ धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु॥ घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं । न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥ बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा । मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना । आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥

भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीतिऩ हे वाखाणिली थोर वाढली सीमा॥ध्रु॥ भुक्ती मुक्ती तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । ह्मणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥ संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंद्रिये वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका । जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥ नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥

भगवंता तुजकारणें मेलो
भगवंता तुजकारणें मेलो जिताची कैसी । निष्‍काम बुध्दि ठेली चरण नाहीं तयेसी । न चलती हात पाय दृष्‍टी फिरली कैसी । जाणतां न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२॥ भुक्ति मुक्ति तूंचि एक होसी सिध्‍दीचा दाता । म्‍हणोनि सांडवली शोक भय लज्‍जा चिंता । सर्वस्‍वें त्‍याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येऊनि सामोरा आतां ॥३॥ संसार सागरु गा भवदु:खाचें मूळ । जनवाद अंथरुण माजीं केले इंगळ । इंद्रियें वज्रघातें तपे उष्‍ण वरी ज्‍वाळ । सोसिलें का करुं दुर्भर रे चांडाळ ॥४॥ तिही लोकीं तुझें नाम वृक्ष पल्‍लव शाखा । वेंधलो वरि खोडा भाव धरुनी टेंका । जाणवी नरनारी जागो धर्म हा लोकां । पावती पुण्‍यवंत सोई आमुचिये हाका ॥५॥ नाठवे आपपर आतां काय बां करुं । सारिखा दोहीसवा हारपला विचारु । घातला योगक्षेम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देई अभयकरु ॥६॥

पंढरपुर पाटणी गा महाराज
पंढरपुर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचेंतें नाम ॥१॥ आंधळ्या जीवींचे तो गा जाणतो धर्म । म्‍हणोनि आलों गा देई माझें मज वर्म ॥२॥ असोनि हात पाय डोळा जाहालों मी आंधळा । मुखी नाम तुझें लागला वाचेसी चाळा ॥३॥ देऊनि दान मातें नाम सांगे ये काळीं । विठोबाचें दान आलें ऐसी देईन आरोळी ॥४॥ दान पावलें संतसंगे भक्‍तीचें । एका जनार्दनीं अखंड नाम वाचे ॥५॥

दाते बहुतअसती परि न देती साचार
दाते बहुतअसती परि न देती साचार । मागत्‍याची आशा बहु तेणें न घडे विचार । सम देणें सम घेणें या नाही प्रकार । लाजिरवाणें  जिणें दोघांचें धर्म अवघा असार ॥१॥ तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार । तुष्‍टला माझया देहीं दिधलें अक्षय अपार । न सरेचि कल्‍पांतीं माप लागलें निर्धार । मागतेंपण हारपलें दैन्‍य गेलें साचार ॥२॥ देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ । मायामोह तृष्‍णा हाचि चुकविला कोल्‍हाळ । एका जनार्दनी एकपणें निर्मळ । शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥

मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे
मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे पांगुळ । चालतां न चलवेंचि कोठें नमिळे स्‍थळ । हिंडतो दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही भ्रांती वारी कैं भेटेल गुरुदयाळ ॥१॥ धर्म जागो गुरु महिमा देही दाविला  देव । निवारुनी भवर जाळें अवघा निरसला भेव ॥२॥ कर्म त्‍या अकर्माच्‍या लागती वाटें ठेंसा । संपत्‍ती विपत्‍तीचा मानिला भरवसा । कन्‍या पुत्र आप्‍त जन हा तों सहज वोळसा । या भ्रम डोहीं बुडालों धांवे गुरुराया  सर्वशा ॥३॥ येऊनि गरुनाथें माथां ठेविला करु । अज्ञान तिमिर गेलें शुध्‍द मार्ग साचारु । गर्जत चालियेलों फिटला अज्ञान अंधारु । एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारु ॥४॥

सहजपुर पाटणी गा एक जनार्दन
सहजपुर पाटणी गा एक जनार्दन दाता । पांगुळा पाय देतो विश्रांति समस्‍तां ॥१॥ यालागीं नाम त्‍यांचे दु:ख निरसी मनाचे । पांगुळा जीवींचे तोचि चालवी साचें ॥२॥ जीवें जिता मी पांगुळ दिधला निजबोध ढवळा । त्‍यावरि बैसोनि क्रीडे सर्वश्र स्‍वलीला ॥३॥एकाएकु परम दीन अंध पंगु अज्ञान । जनार्दनें कृपा करुन करवी निजसत्‍ता चलन ॥४॥

असोनियां दृष्‍टी जाहलों मी
असोनियां दृष्‍टी जाहलों मी आंधळा । आपंगिलें जिही जाहलों त्‍या वेगळा । मायबाप माझे म्‍हणती मज माझ्या बाळा । शेवटी मोकलिती देती हातीं काळा ॥१॥ संत तुम्‍ही मायबाप माझी राखा कांही दया । लागतों मी वारंवार तुमचीया पायां ॥२॥ इंद्रियें माझी न चलता क्षणभरी । गुंतलों मायामाहें या संसाराचे फेरी । अंथरुण घातलें इंगळाचे शेजेवरी । कैसी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥३॥माय बाप तुम्‍ही संत उपकार करा । जगीं तो नांदतो जनीं एवढा जनार्दन तो खरा । तयाचिया चरणावरी मस्‍तक निर्धारा । एका जनार्दनी करी विनंति अवधारा ॥४॥

मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें
मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर । पुंडलिक भक्‍तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत  जिवा वाटे हुरहूर ॥१॥ तुम्‍ही संत मायबाप ऐवढा उपकार करा । न्‍या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥२॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड । कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड । नाक मुख गळूं लागले लाळ आणि शेंबूड । श्‍वानापरी गती झाली अवघे करिती हाड हाड ॥३॥ साधुसंत मायबाप जे कां दयेचे सागर । भावाचे मुख्‍य स्‍थान भक्‍तीचें तें माहेर । तिहीं केले कृपादान मस्‍तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुध्‍द झालें कलेंवर ॥४॥ भाव दिला मज सांगातें मार्ग दाविला निट । भ्रांति हे समूळ गेली दिसूं लागली वाट । नाचता प्रेमछंदे चालूं लागलों सपाट । एकाजनार्दनी पावलों पंढरी पेंठ ॥५॥

मार्ग बहु असती परि तयांची
मार्ग बहु असती परि तयांची न कळे गती । म्‍हणोनि पडियलो माया मोहभ्रांती । तेणे मी जाहालों अंध कोण धरिल चित्‍ती । मारितों हांका मोठ्यानें अहो उदार श्रीगुरुमुर्ति ॥१॥ धांव धांव श्रीगुरुराया काढीं देऊनि हात । बुडतसे भवनदीमाजीं न कळे अंत । शिण बहु मज जाहला श्रमलों पाहत पाहत । यांतुनी सोडी वेगी तुम्‍हां श्रीगुरुसमर्थ ॥२॥ वाटे आडवाट दरी दरकुटे यांमाजीं गुंतले । कन्‍या पुत्र स्‍त्रीधन हें वर पाडिले जाळें । कवण उगवील कवणा शरण जाऊं तें न कळे । करितों चिंता ह्र्दयीं तंव श्रींगुरु प्रसन्‍न जाहले निवारली अवघी भ्रांती ॥३॥ एका शरण जनार्दनी जाहली संतोषवृत्‍ती । अंधपण फिटलें निवारली पुनरावृत्‍ती ॥४॥

अंध पंगू दृढ जाहलों बांधलों
अंध पंगू दृढ जाहलों बांधलों संसारी । मायामोह भरली नदीमाजीं दुसतर मगरी । यातून कोण सोडवील नाना परिचे दु:ख भारी । दैवयोगें भेटला तो जनार्दन गुरुसत्‍वरीं ॥१॥ धर्म जागो जनार्दनाचा तेणें निवारिला फेरा । चुकविल्‍या चौ-यांशीच्‍या तयानें वेरझारा । मोक्ष प्राप्‍ती वाट जाहली दाविला सोयरा । जन्‍म मरण दु:ख गेलें जाहालों सैराट मोकळा ॥२॥ घातिलें अंजन डोळां दिसों लागली वाट । मोकळा मार्ग जाहला चालिलों सैराट । श्रीगुरुजनार्दन मुखीं नामाचा । बौभाट । एका जनार्दनी पावलों मूळची पेठ ॥ ३॥

ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों
ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों प्रत्‍यक्ष । दान मागो रामकृष्‍ण जनार्दनां प्रत्‍यक्ष ॥१॥ झालों मी अंध पंगु । माझा कोणी न धरिती संगु ॥२ ॥ चालतां वाट मार्गी मज कांही दिसेना । उच्‍चारिती नाम संतमार्गे चालिलों जाणा ॥३॥ पाहुनी पंढरीं पेठ अंधपणा फिटलों । एका जनार्दनी संतपायी लीन झालों ॥४॥

जंबु या द्वीपामाजीं एक
जंबु या द्वीपामाजीं एक पंढरपूर गांव । धर्माचे नगर देखा विठो पाटील त्‍याचें नांव । चला जाऊं तयां ठाया । कांही भोजन मागाया ॥१॥विठोबाचा धर्म जागो । त्‍याची चरणी लक्ष लागो ॥२॥ ज्‍यासी नाही पंख पाय तेणे करावें ते काय । शुध्‍द भाव धरोनियां पंढरपुरासी जावे ।इि‍च्‍छलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥४ ॥ भक्ति आणि भावार्थाचा तेणे गुंफियेला शेला । विठोबा दाताराच्‍या घरा उचित नेला । उशिर न लागतां जनमा वेगळा केला ॥५॥ सुदामा ब्राम्‍हण दु:खे दारिद्रे पिडीला । मुष्‍टी पोहे घेऊनि त्‍याचे भेटिलागी गेला ।शुध्‍द भाव देखोनियां नांव सोनियाचा दिला ॥६॥ गण आणि गोत्रज सर्व हांसताती मज । गेलें याचे मनुष्‍यपण येणें सांडियेली लाज ।
विनवितों शिंपी नामा संत चरणींचा रज ॥५॥

मृत्‍युलाका माझारी गा एक
मृत्‍युलाका माझारी गा एक सद्गुरु साचारु । त्‍याचेनि गा दर्शनें तुटला हा संसारु । पांगुळा हस्‍तपाद देतो कृपाळ उदारु । यालागीं नांव त्‍याचें वेदा न कळे पारु ॥१॥ धर्माचें वस्तिघर ठाकियलें बा आम्‍ही । दान मागों ब्रह्म साचें नेघों द्वैत या उर्मी ॥२॥ विश्रांति विजन आम्‍हां एक सद्गुरु दाता । सेवितां चरण त्‍याचे फिटली इंद्रियांची व्यथा । निमाली कल्‍पना आशा इळा परिसी झगटतां । कैवल्‍य देह झालें उपरती देह अवस्‍थां ॥३॥ मन हे निमग्‍ल झालें चरणस्‍पर्श तत्‍वतां । ब्रह्महंस्‍फूर्ति आधीं भावो उमटला उलथा । पांगुळलें गुह्यज्ञान ब्रह्मरुपें तेथें कथा । अधं मग दृढ झालो निमाल्‍या विषयाच्‍या वार्ता ॥४॥ ऋध्दि सिध्दि दास्‍य सख्‍य आपेआप वोळलीं । दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपें लीन झालीं । वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगुळा जीवनमार्गु सतरावी हे वोळली ॥५॥ पांगुळं मी कल्‍पनेचा पंगु झालों पैं मने । वृत्ति हे हरपली एका सद्गुरुरुप ध्‍यानें । निवृत्‍तीसी कृपा आली शरण गेलों ध्‍येयध्‍यानें ॥६॥

पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु
पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु विस्‍तारिलें । विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदले । चौ-यांशी लक्ष योनि फिरतां दु:ख भोगिलें । ज्ञानदृष्‍टी हारपली दोन्‍ही नेत्र आंधळे ॥१॥ धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दृष्‍टी देतो त्‍याचें नाम मी उच्‍चारी ॥२॥
संसार दु:खमुळ चहूंकडे इंगळ । विश्रांती नाही कोठें रात्रं दिवस तळमळ । कामक्रोध लोभशुनीं पाठीं लागली ओढाळ । कवण मी शरण जाऊं आतां दृष्‍टी देईल निर्मळ ॥३॥ मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणी । इष्‍ट मित्र-स्‍वजनसखे हे तों सुखाची मांडणी । एकला मी दु:ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथें कोणी सोडविना एका सद्गुरुवांचुनि ॥४। ।साधुसंत मायबाप तिहीं केलें कृपादान । पंढरिये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्‍नान । पुंडलिके वैद्यराजें पूर्वी सधिलें साधन । वैकुंठीचें मूळमीठ डोळां घातलें तें अंजन ॥५॥ कृष्णांजन एकवेळा डोळां घालितां अढळ । तिमिर दु:ख गेलें फिटलें भ्रांतीपडळ । श्रीगुरुनिवृत्तिरायें मार्ग दाविला सोज्‍वळ । बापरखुमादेवीवरु विठ्ठल दीनाचा दयाळ ॥६॥

धर्म अर्थ काम मोक्ष दान
धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरु ।हस्‍त पाद शरीर व्‍यथा पंगु झालों मी पुढारु । तिमिर आलें पुंढे मायामोहो उदारु । तेणें मी जात होतों मग सहज भेटला सद्गुरु ॥१॥ धर्म जागो सद्गुरु महिमा जेंणे तुटे भवव्‍यथा । हाचि धर्म अर्ध काम येर तें मी नेघें वृथा ॥२॥ एक नाम कृष्‍ण याचें दान देई सद्गुरु । वेदशास्‍त्र मथन केलें परि नव्‍हेंचि पुढारु ।
शरण आलें निवृत्‍तीराया तोडीं संसारु । पाहातां इये भुवनी तुजविण नाहीं उदारु ॥३॥ ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी माझे पांगुळ । वृत्ति हे माझे ठायीं ह्र्दयीं बुझें गोपाळ । शंख चक्र पद्म गदा तुष्‍टे ऐसा तूं दयाळ । बापरखुमादेवीवरें  दान देऊनि केलें अढळ ॥४॥

शंख चक्र देवा तुज चुकलों
शंख चक्र देवा तुज चुकलों गा तेणें दृष्‍टी आलें पडळ । विषयग्रंथी गुंतलोंसे तेणें होतसें विव्‍हळ । अंध मंद दृष्‍टी झाली । गिळूं पाहे हा काळ । अवचित दैवयोगें निवृत्‍ती भेटला कृपाळ ॥१॥ धर्म जागो निवृत्‍तीचा तेणें फेडिलें पडळ । ज्ञानाचा निजबोधु विज्ञानरुप सकळ ॥२॥ तिहि लोकीं विश्‍वरुप दिव्‍य दृष्‍टी धिधली । द्वेत हें हरपलें अद्वेतपणें माऊली । उपदेश निजब्रह्म ज्ञानांजन साऊली । चिद्रुप दीप पाहे तेथें तनुमनु निवाली ॥३॥ दान हेंचि आम्‍हां गोड देहीं दृष्टी मुराली । देह हें हरपले विदेहवृत्ति स्‍फुरली । विज्ञान हें प्रगटलें ज्ञेय ज्ञाता निमाली । दृष्‍य तें तदाकार ममता तेथें बुडाली ॥४॥ प्रपंचु हा नाहीं जाणा एकाकार वृत्ति झाली । मी माझे हरपलें विषयांध या बोली । उपरती सद्गुरु बोधु तेथें प्रकृत्ति संचली । शुध्‍द धर्ममार्गे पंथ हातीं काठी दिधली ॥५॥ वेदमार्गे मुनी गेले त्‍याचि मार्गे चालिलों । न कळेचि विषयअंधा  म्‍हणोनि उघड बोलिलों । चालतां धनुर्धरा तरंगाकारी हरपलों । ज्ञानदेव निवृत्‍तीचा द्वेत सर्व निरसलों ॥६॥

पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु
पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु झालों मी अज्ञान । विषय बुंथी घेऊनियां त्‍याचें केले पोषण । चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान । अवचटें गुरुमार्गे प्रगट बह्माज्ञान ॥१॥ दाते हो वेग करा कृपाळु बा श्रीहरि । समता सर्व भावीं शांती क्षमा निर्धारीं । सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥ शरण रिघें सद्गुरु पायां पांग फिटेल पांचाचा । पांगुळलें आपेआप हा निर्धारु पै साचा । मनामाजीं रुप घालीं मी माजीं तेथे कैचा ।
हरपली देह बुध्दि एकाकार शिवाचा ॥३॥ निजबोधें धवळा शुध्‍द यावरी आरुढ पैं गा । क्षीराब्‍धी बोध वाहे तेथें जाय पां वेगा । वासना माझी ऐसी करीं परिपूर्ण गंगा । नित्‍य हें ज्ञान घेई अद्वैत रुप लिंगा ॥४॥ पावन होशी आधीं पांग फिटले जन्‍माचा । अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा । पांडूरंग होसी आधीं फळ पीक जन्‍माचा । दृष्‍टी बुध्‍दीटाकीं वेगीं टाहो करीं नामाचा ॥५॥ ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना । मुरालें ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना । दृश्‍य हें लोपलें बापा परती नारायणा । निवृत्‍ती गुरु माझा लागों त्‍याच्‍या चरणा ॥६॥

देवा तुज चुकलो गा तेणे
देवा तुज चुकलो गा तेणे दृष्टी आले पडळ । विषय ग्रंथी गुंतलोसे तेणे होत असे विव्हळ । अंधमंद दृष्टी झालि गिळु पाहे हा काळ । अवचित दैवयोगे निवृत्ती भेटला कृपाळ ।1। धर्म जागो निवृत्तीचा तेणे फेडिले पडळ । ज्ञानाचा निजबोध विज्ञानरुप सकळ ।2। तिन्ही लोकी विश्वरुप दिव्य दृष्टी दिधली । द्वैत हे हरपले अद्वैतपणे माऊली । उपदेश निज ब्रह्म ज्ञानांजन साऊलि । चिदरुप दीप पाहे तेथे तनुमनु निवाली ।3। दान हेचि आम्हा गोद देहि दृष्टी मुराली । देह हे हरपले विदेह वृत्ती स्फुरली । विज्ञान हे प्रगटले ज्ञेयज्ञाता निमाली । दृश्य ते तदाकार ममता तेथे बुडाली ।4। प्रपंचु हा नाहि जाणा एकाकार वूत्ति झाली । मी माझे हरपले विषयांध या बोली । उपरती सद्गुरु बोधु तेथे प्रकृति संचली । धर्ममार्गे शुद्ध पंथ हाती काठि दिधली ।5। वेदमार्गे मुनि गेले त्याची मार्गे चालिलो । न कळेचि विषय अंध म्हणोनि उघड बोलिलो । चालिलो धनुर्धरा तरंगाकारी हारपलो । ज्ञानदेवो निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो ।6।

जग जोगी जग जोगी
जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥ जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥ पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥ नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥५॥ तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥६॥ ॥

पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी बाप ना माये ॥१॥ दाते हो दान करा जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥ हिंडतां गव्हानें गा शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी जन्म दुःखातें वारी । कीतिऩ हे संतां मुखीं तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो नांदे पंढरपुरीं ॥२॥ या पोटाकारणें गा जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय भीक नाहीं खंडणा । पुढारा ह्मणती एक तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं आशा बहु दारुणा ॥३॥ काय मी चुकलों गा मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य तेथें आठव नाहीं । मी माजी भुललों गा दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान संत महानुभाव कांहीं ॥४॥ दुरोनि आलों मी गा दुःख जालें दारुण । यावया येथवरीहोतें हें चि कारण । दुर्लभ भेटी तुह्मां पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां दोन्ही कर जोडून ॥५॥

देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलों
देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी कोठें स्थिर राहीलो । पाय डोळे ह्मणतां माझे तींहीं कैसा मोकलिलों ।परदेशीं नाहीं कोणी अंध पांगुळ जालों ॥१॥ आतां माझी करीं चिंता  दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥चालतां वाट पुढें  भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं तुज धरूनि चित्तीं ॥२॥ भाकितों करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा लक्ष चौ-यांसी गांव । धरूनि राहिलों गा हा चि वसता ठाव ॥३॥ भरवसा काय आतां कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीतिऩ तया मज बहुतां । म्हणऊनि मारीं हाका सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी तूंचि कृपाळू दाता ॥४॥ संचित सांडवलें कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा। होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां माझा सर्वस्वें बळी ॥५॥

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ
देखत होतों आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय जियाल्याचें फळ ॥१॥ आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी। करीं मारग सोपा । जाईन सिद्धपंथें । अवघ्या चुकतील खेपा ॥ध्रु.॥ होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना मागें ।तोही सांडिला आधार । हा ना तो ठाव झाला । अवघा पडिला अंधार ।फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥ जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा ।इंद्रिये मावळलीं । आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला। तो चि देह नव्हे दुजा ॥३॥ गुंतलों या संसारें। कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी ।मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसे चि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥ लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा ।पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा। पंढरीच्या निवासा ॥५॥

सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें । मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥ सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें ।त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा । न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥ ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद ।अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतkव निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । ह्मणोनि चालविला मागें येतील त्यांसीं । मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥ वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव । ह्मणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥५॥

आंधळ्या पांगळ्या चा एक विठोबा
आंधळ्या पांगळ्या चा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥ धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु॥ घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं । न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥ बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा । मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना । आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥

भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीतिऩ हे वाखाणिली थोर वाढली सीमा॥ध्रु॥ भुक्ती मुक्ती तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । ह्मणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥ संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंद्रिये वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका । जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥ नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥

भगवंता तुजकारणें मेलो
भगवंता तुजकारणें मेलो जिताची कैसी । निष्‍काम बुध्दि ठेली चरण नाहीं तयेसी । न चलती हात पाय दृष्‍टी फिरली कैसी । जाणतां न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२॥ भुक्ति मुक्ति तूंचि एक होसी सिध्‍दीचा दाता । म्‍हणोनि सांडवली शोक भय लज्‍जा चिंता । सर्वस्‍वें त्‍याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येऊनि सामोरा आतां ॥३॥ संसार सागरु गा भवदु:खाचें मूळ । जनवाद अंथरुण माजीं केले इंगळ । इंद्रियें वज्रघातें तपे उष्‍ण वरी ज्‍वाळ । सोसिलें का करुं दुर्भर रे चांडाळ ॥४॥ तिही लोकीं तुझें नाम वृक्ष पल्‍लव शाखा । वेंधलो वरि खोडा भाव धरुनी टेंका । जाणवी नरनारी जागो धर्म हा लोकां । पावती पुण्‍यवंत सोई आमुचिये हाका ॥५॥ नाठवे आपपर आतां काय बां करुं । सारिखा दोहीसवा हारपला विचारु । घातला योगक्षेम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देई अभयकरु ॥६॥

पंढरपुर पाटणी गा महाराज
पंढरपुर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचेंतें नाम ॥१॥ आंधळ्या जीवींचे तो गा जाणतो धर्म । म्‍हणोनि आलों गा देई माझें मज वर्म ॥२॥ असोनि हात पाय डोळा जाहालों मी आंधळा । मुखी नाम तुझें लागला वाचेसी चाळा ॥३॥ देऊनि दान मातें नाम सांगे ये काळीं । विठोबाचें दान आलें ऐसी देईन आरोळी ॥४॥ दान पावलें संतसंगे भक्‍तीचें । एका जनार्दनीं अखंड नाम वाचे ॥५॥

दाते बहुतअसती परि न देती साचार
दाते बहुतअसती परि न देती साचार । मागत्‍याची आशा बहु तेणें न घडे विचार । सम देणें सम घेणें या नाही प्रकार । लाजिरवाणें  जिणें दोघांचें धर्म अवघा असार ॥१॥ तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार । तुष्‍टला माझया देहीं दिधलें अक्षय अपार । न सरेचि कल्‍पांतीं माप लागलें निर्धार । मागतेंपण हारपलें दैन्‍य गेलें साचार ॥२॥ देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ । मायामोह तृष्‍णा हाचि चुकविला कोल्‍हाळ । एका जनार्दनी एकपणें निर्मळ । शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥

मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे
मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे पांगुळ । चालतां न चलवेंचि कोठें नमिळे स्‍थळ । हिंडतो दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही भ्रांती वारी कैं भेटेल गुरुदयाळ ॥१॥ धर्म जागो गुरु महिमा देही दाविला  देव । निवारुनी भवर जाळें अवघा निरसला भेव ॥२॥ कर्म त्‍या अकर्माच्‍या लागती वाटें ठेंसा । संपत्‍ती विपत्‍तीचा मानिला भरवसा । कन्‍या पुत्र आप्‍त जन हा तों सहज वोळसा । या भ्रम डोहीं बुडालों धांवे गुरुराया  सर्वशा ॥३॥ येऊनि गरुनाथें माथां ठेविला करु । अज्ञान तिमिर गेलें शुध्‍द मार्ग साचारु । गर्जत चालियेलों फिटला अज्ञान अंधारु । एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारु ॥४॥

असोनियां दृष्‍टी जाहलों मी
असोनियां दृष्‍टी जाहलों मी आंधळा । आपंगिलें जिही जाहलों त्‍या वेगळा । मायबाप माझे म्‍हणती मज माझ्या बाळा । शेवटी मोकलिती देती हातीं काळा ॥१॥ संत तुम्‍ही मायबाप माझी राखा कांही दया । लागतों मी वारंवार तुमचीया पायां ॥२॥ इंद्रियें माझी न चलता क्षणभरी । गुंतलों मायामाहें या संसाराचे फेरी । अंथरुण घातलें इंगळाचे शेजेवरी । कैसी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥३॥
माय बाप तुम्‍ही संत उपकार करा । जगीं तो नांदतो जनीं एवढा जनार्दन तो खरा । तयाचिया चरणावरी मस्‍तक निर्धारा । एका जनार्दनी करी विनंति अवधारा ॥४॥

मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें
मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर । पुंडलिक भक्‍तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत  जिवा वाटे हुरहूर ॥१॥ तुम्‍ही संत मायबाप ऐवढा उपकार करा । न्‍या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥२॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड । कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड । नाक मुख गळूं लागले लाळ आणि शेंबूड । श्‍वानापरी गती झाली अवघे करिती हाड हाड ॥३॥ साधुसंत मायबाप जे कां दयेचे सागर । भावाचे मुख्‍य स्‍थान भक्‍तीचें तें माहेर । तिहीं केले कृपादान मस्‍तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुध्‍द झालें कलेंवर ॥४॥ भाव दिला मज सांगातें मार्ग दाविला निट । भ्रांति हे समूळ गेली दिसूं लागली वाट । नाचता प्रेमछंदे चालूं लागलों सपाट । एकाजनार्दनी पावलों पंढरी पेंठ ॥५॥

मार्ग बहु असती परि तयांची
मार्ग बहु असती परि तयांची न कळे गती । म्‍हणोनि पडियलो माया मोहभ्रांती । तेणे मी जाहालों अंध कोण धरिल चित्‍ती । मारितों हांका मोठ्यानें अहो उदार श्रीगुरुमुर्ति ॥१॥ धांव धांव श्रीगुरुराया काढीं देऊनि हात । बुडतसे भवनदीमाजीं न कळे अंत । शिण बहु मज जाहला श्रमलों पाहत पाहत । यांतुनी सोडी वेगी तुम्‍हां श्रीगुरुसमर्थ ॥२॥ वाटे आडवाट दरी दरकुटे यांमाजीं गुंतले । कन्‍या पुत्र स्‍त्रीधन हें वर पाडिले जाळें । कवण उगवील कवणा शरण जाऊं तें न कळे । करितों चिंता ह्र्दयीं तंव श्रींगुरु प्रसन्‍न जाहले निवारली अवघी भ्रांती ॥३॥ एका शरण जनार्दनी जाहली संतोषवृत्‍ती । अंधपण फिटलें निवारली पुनरावृत्‍ती ॥४॥

अंध पंगू दृढ जाहलों बांधलों
अंध पंगू दृढ जाहलों बांधलों संसारी । मायामोह भरली नदीमाजीं दुसतर मगरी । यातून कोण सोडवील नाना परिचे दु:ख भारी । दैवयोगें भेटला तो जनार्दन गुरुसत्‍वरीं ॥१॥ धर्म जागो जनार्दनाचा तेणें निवारिला फेरा । चुकविल्‍या चौ-यांशीच्‍या तयानें वेरझारा । मोक्ष प्राप्‍ती वाट जाहली दाविला सोयरा । जन्‍म मरण दु:ख गेलें जाहालों सैराट मोकळा ॥२॥ घातिलें अंजन डोळां दिसों लागली वाट । मोकळा मार्ग जाहला चालिलों सैराट । श्रीगुरुजनार्दन मुखीं नामाचा । बौभाट । एका जनार्दनी पावलों मूळची पेठ ॥ ३॥

ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों
ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों प्रत्‍यक्ष । दान मागो रामकृष्‍ण जनार्दनां प्रत्‍यक्ष ॥१॥ झालों मी अंध पंगु । माझा कोणी न धरिती संगु ॥२ ॥ चालतां वाट मार्गी मज कांही दिसेना । उच्‍चारिती नाम संतमार्गे चालिलों जाणा ॥३॥ पाहुनी पंढरीं पेठ अंधपणा फिटलों । एका जनार्दनी संतपायी लीन झालों ॥४॥

जंबु या द्वीपामाजीं एक
जंबु या द्वीपामाजीं एक पंढरपूर गांव । धर्माचे नगर देखा विठो पाटील त्‍याचें नांव । चला जाऊं तयां ठाया । कांही भोजन मागाया ॥१||विठोबाचा धर्म जागो । त्‍याची चरणी लक्ष लागो ॥२॥ ज्‍यासी नाही पंख पाय तेणे करावें ते काय । शुध्‍द भाव धरोनियां पंढरपुरासी जावे ।इि‍च्‍छलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥४ ॥ भक्ति आणि भावार्थाचा तेणे गुंफियेला शेला । विठोबा दाताराच्‍या घरा उचित नेला । उशिर न लागतां जनमा वेगळा केला ॥५॥ सुदामा ब्राम्‍हण दु:खे दारिद्रे पिडीला । मुष्‍टी पोहे घेऊनि त्‍याचे भेटिलागी गेला ।शुध्‍द भाव देखोनियां नांव सोनियाचा दिला ॥६॥ गण आणि गोत्रज सर्व हांसताती मज । गेलें याचे मनुष्‍यपण येणें सांडियेली लाज ।विनवितों शिंपी नामा संत चरणींचा रज ॥५॥

मृत्‍युलाका माझारी गा एक
मृत्‍युलाका माझारी गा एक सद्गुरु साचारु । त्‍याचेनि गा दर्शनें तुटला हा संसारु । पांगुळा हस्‍तपाद देतो कृपाळ उदारु । यालागीं नांव त्‍याचें वेदा न कळे पारु ॥१॥ धर्माचें वस्तिघर ठाकियलें बा आम्‍ही । दान मागों ब्रह्म साचें नेघों द्वैत या उर्मी ॥२॥ विश्रांति विजन आम्‍हां एक सद्गुरु दाता । सेवितां चरण त्‍याचे फिटली इंद्रियांची व्यथा । निमाली कल्‍पना आशा इळा परिसी झगटतां । कैवल्‍य देह झालें उपरती देह अवस्‍थां ॥३॥ मन हे निमग्‍ल झालें चरणस्‍पर्श तत्‍वतां । ब्रह्महंस्‍फूर्ति आधीं भावो उमटला उलथा । पांगुळलें गुह्यज्ञान ब्रह्मरुपें तेथें कथा । अधं मग दृढ झालो निमाल्‍या विषयाच्‍या वार्ता ॥४॥ ऋध्दि सिध्दि दास्‍य सख्‍य आपेआप वोळलीं । दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपें लीन झालीं । वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगुळा जीवनमार्गु सतरावी हे वोळली ॥५॥ पांगुळं मी कल्‍पनेचा पंगु झालों पैं मने । वृत्ति हे हरपली एका सद्गुरुरुप ध्‍यानें । निवृत्‍तीसी कृपा आली शरण गेलों ध्‍येयध्‍यानें ॥६॥

पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु
पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु विस्‍तारिलें । विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदले । चौ-यांशी लक्ष योनि फिरतां दु:ख भोगिलें । ज्ञानदृष्‍टी हारपली दोन्‍ही नेत्र आंधळे ॥१॥ धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दृष्‍टी देतो त्‍याचें नाम मी उच्‍चारी ॥२॥संसार दु:खमुळ चहूंकडे इंगळ । विश्रांती नाही कोठें रात्रं दिवस तळमळ । कामक्रोध लोभशुनीं पाठीं लागली ओढाळ । कवण मी शरण जाऊं आतां दृष्‍टी देईल निर्मळ ॥३॥ मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणी । इष्‍ट मित्र-स्‍वजनसखे हे तों सुखाची मांडणी । एकला मी दु:ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथें कोणी सोडविना एका सद्गुरुवांचुनि ॥४। ।साधुसंत मायबाप तिहीं केलें कृपादान । पंढरिये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्‍नान । पुंडलिके वैद्यराजें पूर्वी सधिलें साधन । वैकुंठीचें मूळमीठ डोळां घातलें तें अंजन ॥५॥ कृष्णांजन एकवेळा डोळां घालितां अढळ । तिमिर दु:ख गेलें फिटलें भ्रांतीपडळ । श्रीगुरुनिवृत्तिरायें मार्ग दाविला सोज्‍वळ । बापरखुमादेवीवरु विठ्ठल दीनाचा दयाळ ॥६॥

धर्म अर्थ काम मोक्ष दान
धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरु ।हस्‍त पाद शरीर व्‍यथा पंगु झालों मी पुढारु । तिमिर आलें पुंढे मायामोहो उदारु । तेणें मी जात होतों मग सहज भेटला सद्गुरु ॥१॥ धर्म जागो सद्गुरु महिमा जेंणे तुटे भवव्‍यथा । हाचि धर्म अर्ध काम येर तें मी नेघें वृथा ॥२॥ एक नाम कृष्‍ण याचें दान देई सद्गुरु । वेदशास्‍त्र मथन केलें परि नव्‍हेंचि पुढारु ।
शरण आलें निवृत्‍तीराया तोडीं संसारु । पाहातां इये भुवनी तुजविण नाहीं उदारु ॥३॥ ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी माझे पांगुळ । वृत्ति हे माझे ठायीं ह्र्दयीं बुझें गोपाळ । शंख चक्र पद्म गदा तुष्‍टे ऐसा तूं दयाळ । बापरखुमादेवीवरें  दान देऊनि केलें अढळ ॥४॥

शंख चक्र देवा तुज चुकलों
शंख चक्र देवा तुज चुकलों गा तेणें दृष्‍टी आलें पडळ । विषयग्रंथी गुंतलोंसे तेणें होतसें विव्‍हळ । अंध मंद दृष्‍टी झाली । गिळूं पाहे हा काळ । अवचित दैवयोगें निवृत्‍ती भेटला कृपाळ ॥१॥ धर्म जागो निवृत्‍तीचा तेणें फेडिलें पडळ । ज्ञानाचा निजबोधु विज्ञानरुप सकळ ॥२॥ तिहि लोकीं विश्‍वरुप दिव्‍य दृष्‍टी धिधली । द्वेत हें हरपलें अद्वेतपणें माऊली । उपदेश निजब्रह्म ज्ञानांजन साऊली । चिद्रुप दीप पाहे तेथें तनुमनु निवाली ॥३॥ दान हेंचि आम्‍हां गोड देहीं दृष्टी मुराली । देह हें हरपले विदेहवृत्ति स्‍फुरली । विज्ञान हें प्रगटलें ज्ञेय ज्ञाता निमाली । दृष्‍य तें तदाकार ममता तेथें बुडाली ॥४॥ प्रपंचु हा नाहीं जाणा एकाकार वृत्ति झाली । मी माझे हरपलें विषयांध या बोली । उपरती सद्गुरु बोधु तेथें प्रकृत्ति संचली । शुध्‍द धर्ममार्गे पंथ हातीं काठी दिधली ॥५॥ वेदमार्गे मुनी गेले त्‍याचि मार्गे चालिलों । न कळेचि विषयअंधा  म्‍हणोनि उघड बोलिलों । चालतां धनुर्धरा तरंगाकारी हरपलों । ज्ञानदेव निवृत्‍तीचा द्वेत सर्व निरसलों ॥६॥

पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु
पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु झालों मी अज्ञान । विषय बुंथी घेऊनियां त्‍याचें केले पोषण । चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान । अवचटें गुरुमार्गे प्रगट बह्माज्ञान ॥१॥ दाते हो वेग करा कृपाळु बा श्रीहरि । समता सर्व भावीं शांती क्षमा निर्धारीं । सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥ शरण रिघें सद्गुरु पायां पांग फिटेल पांचाचा । पांगुळलें आपेआप हा निर्धारु पै साचा । मनामाजीं रुप घालीं मी माजीं तेथे कैचा ।हरपली देह बुध्दि एकाकार शिवाचा ॥३॥ निजबोधें धवळा शुध्‍द यावरी आरुढ पैं गा । क्षीराब्‍धी बोध वाहे तेथें जाय पां वेगा । वासना माझी ऐसी करीं परिपूर्ण गंगा । नित्‍य हें ज्ञान घेई अद्वैत रुप लिंगा ॥४॥ पावन होशी आधीं पांग फिटले जन्‍माचा । अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा । पांडूरंग होसी आधीं फळ पीक जन्‍माचा । दृष्‍टी बुध्‍दीटाकीं वेगीं टाहो करीं नामाचा ॥५॥ ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना । मुरालें ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना । दृश्‍य हें लोपलें बापा परती नारायणा । निवृत्‍ती गुरु माझा लागों त्‍याच्‍या चरणा ॥६॥

देवा तुज चुकलो गा तेणे
देवा तुज चुकलो गा तेणे दृष्टी आले पडळ । विषय ग्रंथी गुंतलोसे तेणे होत असे विव्हळ । अंधमंद दृष्टी झालि गिळु पाहे हा काळ । अवचित दैवयोगे निवृत्ती भेटला कृपाळ ।1। धर्म जागो निवृत्तीचा तेणे फेडिले पडळ । ज्ञानाचा निजबोध विज्ञानरुप सकळ ।2। तिन्ही लोकी विश्वरुप दिव्य दृष्टी दिधली । द्वैत हे हरपले अद्वैतपणे माऊली । उपदेश निज ब्रह्म ज्ञानांजन साऊलि । चिदरुप दीप पाहे तेथे तनुमनु निवाली ।3। दान हेचि आम्हा गोद देहि दृष्टी मुराली । देह हे हरपले विदेह वृत्ती स्फुरली । विज्ञान हे प्रगटले ज्ञेयज्ञाता निमाली । दृश्य ते तदाकार ममता तेथे बुडाली ।4। प्रपंचु हा नाहि जाणा एकाकार वूत्ति झाली । मी माझे हरपले विषयांध या बोली । उपरती सद्गुरु बोधु तेथे प्रकृति संचली । धर्ममार्गे शुद्ध पंथ हाती काठि दिधली ।5। वेदमार्गे मुनि गेले त्याची मार्गे चालिलो । न कळेचि विषय अंध म्हणोनि उघड बोलिलो । चालिलो धनुर्धरा तरंगाकारी हारपलो । ज्ञानदेवो निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो ।6।

मनु राजा एक देहपुरी
मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी । पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आह्मांवरी गा ॥१॥ ह्मणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥ सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण । कडे चुकवुनि कांटवण। ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥ पुढें भक्तीनें धरिलें हातीं। मागें ज्ञान वैराग्य धर्म येती । स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥ होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव । तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥

गातों वासुदेव मीं ऐका
गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥ ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय । पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥ क्षणभंगुर नाहीं भरवसा। व्हा रे सावध सोडा माया आशा । न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भिH भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥ विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां ।दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम ह्मणा गा ॥५॥

गेले टळले पाहार तीन
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥१॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना । चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥२॥ देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त । जालें एक चित्त तरी बहुत । तेवढएासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥ आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास । नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥ आतां मागुता येईल फेरा । हें तों घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥

राम राम दोनी अक्षरें
राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपिळया । टाळ घाग†याघोषें गा ॥ध्रु.॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥ एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं। नीज घेउनि फिरती गा ॥३॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीतिऩ वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥

घुळघुळा वाजती टाळ
घुळघुळा वाजती टाळ । झाणाझाणा नाद रसाळ । उदो झाला पाहली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ ।।१।। कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळा पोटी माय रिघेल। मेले माणूस जीत उठवील। वेळ काळाते ग्रासील ।।२।। आता ऐसेची अवघे जन । होते जाते तयापासून । जगी जग झाले जनार्दन । उदो प्रगटला बिंबले भान ।।३।। टाळाटाळी लोपला नाद । अंगोअंगी मुराला छंद । भोग भोगीतांची  आटला भेद । ज्ञान गिळूनी गांवा गोविंद ।।४।। गांवा आत बाहेर हिंडे आळी । देवो देवीची केली चिपुळी । चरण नसता वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांती सावळी ।।५।।

सुख दु:ख समान सकळ जीवांचा
सुख दु:ख समान सकळ जीवांचा कृपाळा । ज्ञानाचा उद्बोध भक्ति प्रेमाचा कल्लोळ ।।१।। धन्य जगी तोचि एक हरि रंगी नाचे । रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचें ।।२।। विषयीं विरक्त जया नाहीं आपपर । सर्वदा संतुष्ट स्वयें व्यापक निर्धार ।।३।। जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी । आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ।।४।। एका जनार्दनी नित्य हरिचें कीर्तन । आसनी शयनीं सदा हरीचें चिंतन ।।५।।

बोल बोले अबोलणे
बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥ वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥ध्रु.॥ हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें। गजर होतो बहु मोटएानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥ मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥ काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥ ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥

रामकृष्ण गीती गात
रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळएा वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥ जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥ निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥२॥ अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला ।जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवालागा ॥३॥ तुका म्हणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥४॥ ।6॥

धन्‍य जगी तोचि एक हरिरंगी नाचे
धन्‍य जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्‍ण वासुदेव सदा स्‍मरे वाचें ॥१॥ सुखद:ख समान सकळ जीवांचा कृपाळा । ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्‍लोळ ॥२॥ विषयीं विरक्‍त जया नाहीं आपपर । सर्वदा संतुष्‍ट स्‍वयें व्‍यापक निर्धार ॥३॥ जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी । आपण वस्‍तीकर वर्ततसे संसारी ॥४॥ एका जनार्दनी नित्‍य हरिचें कीर्तन । आसनी शयनीं सदा हरीचें चिंतन ॥५॥

कर जोडोनि  विनवितों तुम्‍हा
कर जोडोनि  विनवितों तुम्‍हा । नका गुंतूं संसार श्रमा । नका गुंतूं विषय कामा । तुम्‍ही आठवा मधुसूदना ॥१॥ तुम्‍हीं वासुदेव वासुदेव म्‍हण । तुम्‍हीं वासुदेव वासुदेव म्‍हण ॥धृ॥ नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना । त्‍यामध्‍ये दु:ख यातना । तुम्‍ही आठवा मधुसुदना ॥३॥ नलगे तीर्थाचें प्रभण । नलगे दंडण मुंडण । नलगे पंचाग्‍नी साधन । तुम्‍ही आठवा मधुसूदन ॥४॥ हेचि माझी विनवणी । जोडितों कर दोन्‍ही । शरण एका जनार्दनी । तुम्‍ही वासदेव म्‍हणा अनुदिनीं ॥५॥

वासुदेव स्‍मरण पापहरणाचें मूळ
वासुदेव स्‍मरण पापहरणाचें मूळ । तीर्थाचें माहेर ब्रम्‍ह व्‍यापक निश्‍चळ । त्रिविधताप शोषुनी रुपीं स्‍वरुपीं सुमंगळ ॥१॥ ओंम नमो भगवते राम कृष्‍ण वासुदेव ॥ धृ ॥ जपतप अनुष्‍ठान व्‍यर्थ कासया करणें । तीर्थ ब्रत यम नेम नलगे दैवता धरणें । केशव माधव अच्युत वदतां होय पातक हरणें ॥२॥ शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग । गुदपीडन कुंडलिनी कलीमल दलभंग । उर्ध्‍व वायुचा स्‍वेतु तोडोनि करीं वो वनभंग ।ब्रम्‍हरंध्री मिसळे परि मुमुक्ष दंग ॥३॥मनोजय वासना तोडोनि केली बीमोडी । मनपुर नगरी पाहतां दुर्गति मोडी । काम क्रोध मद मत्‍सर दंभ अहंकार झोडी । अखंड परमानंद सेऊनि उभवी गुढी ॥४॥ भेदभाव तोडोनियां घेतला प्रेमाचा गरळा । शुध्‍दनाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा । हरिस्‍मरणाचेनी बळें अंकित केलें कलिकाळा । एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ॥५॥

विषय सेवितां गा जन्‍ममरणाचा
विषय सेवितां गा जन्‍ममरणाचा बाधु । विवेक गुरुवाक्‍य छेदी भवबंधु ॥१॥ रामकृष्‍ण वासुदेव हरि ब्रम्‍हानंदे गळती गां । राम कृष्‍ण वासुदेव हरि देही विदेही झाला गा ॥२॥ गुरुवाक्‍य भावबळें निजबोधें पैं बुध्दि । तेणें बोधें पाहातां गा अखंड ते समाधी ॥३॥ जनीं वनीं निरंजनी वासुदेव समान । एका जनार्दनी चित्‍त चैतन्‍यघन ॥४॥

वासुदेव स्‍मरणें तुटती जन्‍ममरणव्‍याधी
वासुदेव स्‍मरणें तुटती जन्‍ममरणव्‍याधी । अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडीं उपाधी ॥१॥  रामकृष्‍ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा । जन्‍मजरा तुटे वाचे आठवित सांठवा ॥२॥ चिपळ्या टाळ घुळघुळा शब्‍द नादें । तेणें ब्रम्‍हानंद ह्रदयीं आठवण नांदे ॥३॥ एका जनार्दनी वासुदेव चिंतीतां । यम काळदूत पळती नाम ऐंकतां ॥४॥

मी वासुदेव नामें फोडितों
मी वासुदेव नामें फोडितों नित्‍य टाहों । देखिले पाय आतां मागतों दान द्या हों । सांवळे रुप माझया मानसी नित्‍य राहों । पावन संतवृदें सादरें दृष्टि पहा हों ॥१॥ राम कृष्‍ण वासुदेवा । हरि राम कृष्‍ण वसुदेवा ॥२॥ सांडोनि सर्व चिंता संतपदीं लक्ष लागों । मुक्‍त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागों । भाविक प्रेमळांच्‍या संगतीं चित्‍त लागों ॥३॥ अद्वैतेंचि चालों अक्षयी भक्‍तीयोग ।स्‍वप्‍नींही मानसातें नातळों द्वेतसंग । अद्वयानंदवेधें नावडों अन्‍यभोग ।अक्रियत्‍व चि वाहों सत्क्रियारुप बोध ॥४॥ पातां विश्‍व मातें निजरुप दाखवी । सत्‍काथा श्रवण कर्णी पीयूष चाखवी । रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्‍हणे बा रे घेई ॥५॥ हें दान पावलें सद्गुरु शांतिलिंगा । हें दान पावलें आत्‍मया पांडरुगा । हे दान पावलें व्‍यापका अंतरंगा । हें दान पावलें एका जनार्दनी दोष जाती भंगा ॥६॥

जया परमार्थी चाड
जया परमार्थी चाड । तेणें सांडावें लिगाड । धरुनी भजनाची चाड । नित्‍य नेम आदरें ॥१॥ सांडी मांडी परती टाकीं । वासुदेव नाम घोकी । मोक्ष येईन सुखी । नाम स्‍मरतां आदरें ॥२॥ रामकृष्‍ण वासुदेव । धरीं हाचि दृढ भाव । आणिकाचा हेवा । दुरी करीं आदरे ॥३॥
घाली संतासी आसनें । पूजा करी कायावाचा मने । एका जनार्दनी जाणे । इच्छिले तें पुरवी ॥४॥

सुखे सेऊं ब्रम्‍हानंदा
सुखे सेऊं ब्रम्‍हानंदा । गाऊं रामनाम सदा । नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥ करुं वासुदेव स्‍मरण । तेणे तुटेरे बंधन । खंडेल कर्माचे विंदान । वासुदेव जपतांचि ॥२॥ तीर्थयात्रें सुखें जाऊ । वाचे विठ्ठल नाम घेऊं । संतासंगे सेऊं । वासुदेव धणीवरी ॥३॥ लोभ ममता दवडूं आशा ।उदर व्‍यथेचा वोळसा ।न करुं आणिक सायासा । वासुदेवा वांचूनी ॥ ४॥ मुख्‍य वर्माचे हें वर्म । येणे साधे सकळ धर्म । एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥

ओले मृतिकेचें मंदिर
ओले मृतिकेचें मंदिर । आंत सहा जण उंदिर ।गुंफा करिताती पोखर । याचा नका करुं अंगिकार गा ॥१॥ वासदेव करितो फेरा । तूं अद्यापि कां निदसुरा ।सावध होई रे गव्‍हारा । भज भज तूं शारंगधरा गा ॥२॥बा तुझे तूं सोयरें । तुचि वडील बा धारे ।तूं तुझेनि आधारें । वरकड मिळाले ते अवघे चोर गा ॥३॥ वासुदेव फोडितो टाहो । उठी उठी लवलाहो ।हा दुर्लभ नवदेहो । म्‍हणे तुकयाबंधु स्‍वहित लवलाहो गा ॥४॥

उठ बा जागा होय पाहे
उठ बा जागा होय पाहे वासुदेवाला । सुदिन उगवला दान आपुले घाला ॥१॥ आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्‍य करा ॥२॥ ठेविल्‍या स्थिर नोहे घर सुकृते भर । भक्‍तासी भय नाहीं संत संगती धर ॥३॥ संसार सार नोहे माया मृगजळ भासत । क्षणांत भ्रांती यांचा काय विश्‍वास ॥४॥ घे करी टाळ  दिंडी हो या विठ्ठलाचा दास । सावधान नरहरी मालो चरणी निज ध्‍यास ॥५॥

बाबा अहंकार निशी घनदाट
बाबा अहंकार निशी घनदाट । गुरुवचनीं फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट ॥१॥ तिने मार्ग दाविला चोखट गा । नरहरी रामा गोविंदा वासुदेवा ॥२॥ एक बोल सुस्‍पष्‍ट बोलावा । वाचे हरि हरि म्‍हणावा । संत समागमु धरावा । तेणें ब्रम्‍हानंद होय आघवा गो ॥३॥आला शीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झालें या शरीरा । फिटला पातकांचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा ॥४॥ अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभवें तन्‍मय सकळ । नामा म्‍हणे केशव कृपाळु गा ॥५॥

घुळघुळा वाजती टाळ
घुळघुळा वाजती टाळ । झणझणा नाद रसाळ । उदो जाहाला पाहाली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ गा ॥१॥ कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळापोटी मायरिघेल । मेलें माणूस जीत उठविल । वेळ काळाते ग्रासील गा ॥२॥ आतां ऐसेचि अवघे जन येतें जाते तयापासून । जगी जग झाले जनार्दन । उदो प्रगटले बिंबलें भान गा ॥३॥ टाळा टाळी लोपला नाद । अंगोअंगी मुरला छंद । भोग भोगितांचि आटला भेद । ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा ॥४॥ गांवा आंत बाहेर हिंडे आळी । देवदेवीची केली चिपळी । चरण नसतां वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांती सांवळी गा ॥५॥

बाबा ममतानिशी अहंकार दाट
बाबा ममतानिशी अहंकार दाट । रामनामें वासुदेवी वाट । गुरुकृपें वोळलें वैकुंठ । तेणें वासुदेवो दिसे प्रगट गा ॥१॥ वासुदेव हरि वासुदेव हरि । राम कृष्‍ण हरि वासुदेवा ॥धृ॥ आला पुंडलिक भक्‍तराज । तेणें केशव वोळला सहज । दिधला विठ्ठल मंत्र बीज । तेणें झालें सर्व काज गा ॥३॥ राम कृष्‍ण वासुदेवं । वैष्‍णव गाताती आघवे । दिंडी टाळ प्रेम भावें । वासदेवी मन सामावें गा ॥४॥शांती क्षमा दया पुरीं । वासुदेव घरोघरी । आनंद वोसंडले अंबरी । प्रेमें डुले त्रिपुरारी गा ॥५॥ वासुदेवीं ज्ञेय ज्ञान । ध्‍यानीं मनी नारायण । वासदेवो परिपूर्ण । कैसे खरलेंसे चैतन्‍य गा ॥६॥ वासुदेव वाहुनि टाळी । पातकं गेली अंतराळी । वासुदेवो वनमाळी । कीर्तन करुं ब्रह्ममेळी गा ॥७॥ ज्ञानदेवा वासुदेवी । प्रीतिपान्‍हा उजळी दिवी । टाळ चिपळी धरुनि जीवीं । ध्‍यान मुद्रा महादेवीं गा ॥८॥

ओंम नमो भगवते वासुदेवाय
ओंम नमो भगवते वासुदेवाय । द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काह्या ॥धृ॥वोडियाणा बंदु घालुनि देहुडा लागसील पावा । ओतप्रोत सांडुनी मना धरिसी अहंभावो । ओंकार बिंदुचा तूं न पावसी ठावो । बोळगे वोळगे कृष्‍ण द्वारावतीये रावो ॥१॥ नागिणी उत्‍साहें नवहि द्वारे निरोधून । नाडिन्‍नयामाजी सुषुम्‍नासंचरण । न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन । नरहरि चिंतने अहर्निशीं मुक्तिस्‍थान ॥२॥ मोडीसी करचरण तेणे पावसी अंत समो । मोहो तृष्‍णा न तुटे ब्रम्‍ह विद्या केवी गमो ।मोठा हा अन्‍यावो जें हरिचरणी नाहीं नमो । मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो ॥३॥ भांबावसी झणे हें शरीर कर्दळीस्‍तंभ । भस्‍म कृमिविष्‍ठा उभें आहे तों सुशोभ । भावितां कीटकी झाली भृंगीतिया क्रमिले नभ । भावें भक्‍ती सुलभ वोळगा वोळगा पद्मनाभ ॥४॥ गति मति इंद्रियें जंव आहेती समयोग । गणितां आयुष्‍य न पुरे जंव हें न वचें भंग ।गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग । गरुडध्‍वज प्रसादें निस्‍तारिजे भवतरंग ॥५॥ वनींसिंह वसतां गजीं मदु केवीं धरावा । वन्हि दग्‍धबीज त्‍यासी अंकुर केवीं फुटावा । वज्रपाणि कोपलियां गिरी उदधि केवीं लंघावा । वदनीं हरि उच्‍चारी तेणे संसार केवीं भुंजावा ॥६॥तेज नयनीचा भानु जेणें तेजें मीनलें ते । त्‍याचे मानसींचा चंद्रमा तो सिंपीतो अमृतें । त्‍याचें नाभीकमळीं ब्रम्‍हा तेणे सृजिलीं सकळही भूतें । तें विराट स्‍वरुप ओळखावे विष्‍णुभक्‍ते ॥७॥ वाताघातें फुटे गगनी मेघांचा मेळावा । वारि बिंदु पदमणीपत्रीं केवी हो ठेवावा ।वानराच्‍या हातीं चिंतामणी केवी हो द्यावा । वासुदेव चिंतनें तोचि कल्‍मषा उठावा ॥८॥ सूक्ष्‍म स्‍थूळ भूतें चाळीतां हे परमहंसु । शूळपाणि देवोवेवी जयाचा रे अंशु । शुभाशुभी कर्मी न करी नामाचा आळसु । सुखे निरंतरी ध्‍याई ध्‍याई ह्रुषिकेशु ॥९॥ देव देउनी उदार भक्ता देतो अमरपदें । देता न म्‍हणे सानाथोर वैरियासी तेंचि दे ।देहे सार्थक अंतीं वासुदेव आद्य छंदे । देखा अजामेळ उध्‍दारलो नामें येणें मुकुंदे ॥१०॥ वाडा सायासी मनुष्‍य जन्‍म पावावा । वियाला पुरुषार्थ तो कां वायां दवडावा । काया वाचा मनें करुनी मुरारी ओळगावा । व्रतें एकादशी करुनी परलोक ठाकावा ॥११॥या धनाचा न धरीं विश्‍वास जैसी तरुवर छाया । यातायाती न चुके तरी हे भोगिसील काहृयां । या हरिभजनेविण तुझा जन्म जातो वायां । यालागी वैकुंठनाथाच्‍या तूं चिंतीं पां रे पायां ॥१२॥ इहींच द्वाद्वशाक्षरीं ध्रुव अढळपद पावला । प्रल्‍हाद रक्षिला अग्निषस्‍त्रापासूनीजळा ।
बापरखुमादेवीवरु विठ्ठलु तुम्‍ही ध्‍यारे वेळोवेळां । तो  कळिकाळ पासूनी सोडवील अवलीळा ॥१३॥

योगिया दुर्लभ तो म्यां
योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहता पाहता मना न पुरेचि धणी ।।१।। देखिला देखीला माय देवाचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण ।।२।। अनंत रूपे देखिले म्या त्यासी । बापरखुमादेवीवरू खुण बाणली कैसी ।।३।।

अवताराच्या राशी तो हा
शंख चक्रगदापदमसहित करी ।।१।। देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे माये ।।२।। सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदी चरणरज नामा विनवी पुढती गे माय ।।३।।

करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा
करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥ असो नमो भाव आलों तुझिया ठाया।
पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥२॥ तुका म्हणे आह्मीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥

माझे चित्त तुझे पायी
माझे चित्त तुझे पायी । राहे ऐसे करी काही । धरोनिया बाही । भव हा तारी दातारा ।।१।। तु चतुरा तु शिरोमणी । गुणलावण्याची खाणी । मुकुट सकाळा मनी । धान्य तूंची विठोबा ।।२।। करी या तिमिराचा नाश । उदय होऊनी प्रकाश । तोडी आशा पाश । करी वास हदयी ।।3।। पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा । पायी आंता राखावे ।।४।।

ऐसी वाट पाहे कांहीं निरोप
ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । काहो कळवळ तुम्हा उमटे चि ना ॥१॥ अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आस चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥ काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी । ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥२॥ तुका म्हणे खरा न पवे चि विभाग । धिकारितें जग हें चि लाहों हिशोबें ॥३॥

बोलोनि दाऊं कां तुह्मी
बोलोनि दाऊं कां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । ह्मणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु॥ त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥

तुका म्हणे माते बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥

कां गा किविलवाणा केलों
कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन दशा जालीसी दिसे ॥१॥ लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली या सारिखी ॥ध्रु.॥ लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥२॥ तुका म्हणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादा वांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥

जळो माझें कर्म वायां
जळो माझें कर्म वायां केली कटकट । जालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥ आता पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥ गुणवंत केलों दोष जाणायासाठीं। माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥२॥ तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥३॥

जळोत तीं येथें उपजविती
जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥ आतां मज साहे येथें करावें देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥ भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनि ॥२॥ तुका म्हणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तनें ॥३॥

न संगतां तुम्हा कळों
न संगतां तुम्हा कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥ परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥ध्रु.॥ काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तई पासूनिया समर्थ ॥२॥ तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥३॥

तुजसवें आम्ही अनुसरलों
तुजसवें आम्ही अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥ सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहिवीशीं लज्जा राखें आमुची ॥ध्रु.॥ न कळतां संग जाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥२॥ तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें । वचन या भावें वेचुनियां विनटलों ।3॥ ॥८॥

कामें नेलें चित्त नेदी
कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥ कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु॥ प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥ येथें अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे जाल्या वेचाचा ॥३॥

तुझें दास्य करूं आणिका
तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥ काय गा विठोबा तुज आता म्हणावे ।शुभाशुभ गोड तुंम्हा थोरांचे नावे ॥ध्रु.॥ संसाराचा धाक निरंतर आम्हासी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥ तुझा शरणागत शरण जाऊ आणिकासी ।तुका म्हणे लाज कवणा हे का नेणसी ।।3।।

चित्ती तुझे पाय डोळा
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ।।१।।हेचि एक तुम्हा मागतो मी दातारा । उचित ते करा भाव जाणोनी खरा ।।२।। खुंटली जाणीव काही बोलणेची आता ।कळो येईल तैसी करा बाळाची चिंता ।।३।।तुका म्हणे आता नका देऊ अंतर । न कळे पुढे काय कैसा होईल विचार ।।४।।

कनकाच्या परियेळीं उजळूनि
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥ओंवाळूं गे माये सबाहए साजिरा |राहिरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥२॥ वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥३॥ सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥ओंवाळीता मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टी समान तुकया लागली पायीं ॥५॥

वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात ।
वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥ कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु॥ डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविळ भाव सांडुनियां देहे ॥२॥ सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥ तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥

देखिले तुमचे चरण निवांत
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन । कासया त्याजन प्राण आपुला गे माये ॥१॥ असेन धणीवरी आपलें माहेरी । मग तो श्रीहरी गीती गाईन गे माये ॥२॥ सकळही गोत माझे पंढरीस जाण । बापरखुमादेवीवरा  श्री विठ्ठलाची आण ॥३॥

पडिले दूरदेशी मज आठवे
पडिले दूरदेशी मज आठवे मानसी ।नको नको हा वियोग कष्ठ हिताती जिवासी ॥१॥ दिन तैसीं रजनी झाली वो माये अवस्था लाउनी गेला अझुनी का नये ॥२॥ गरुडावाहना गंभीरा येई गा दातारा बापरखुमादेवीवरा  श्री विठ्ठला ॥३॥

पैल विलाचीये विळ अंगणी
पैल विलाचीये विळ अंगणी उभी ठेलीये ।येतीया जातीय पुसे विठ्ठल केउता गे माये ।।१।।पायरऊ झाला संचारू नवल।वेधें विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल।।२।।नेणे तहान भूक नाही लाज अभिमान।वेधिलें जनार्दनी देवकीनंदनुगे माये।।३।।बापरखुमादेवीवरू जीवांचा जीवनु । माझे मनीचे मनोरथ पुरवी कमलनयनु ।।४।।

येतीया पुसें जातिया
येतीया पुसें जातिया धाडी निरोप । पंढरपूरी आहे माझा मायबाप ।।१।|येई वो येई वो विठाबाई माउलीये । निढळावरी कर ठेउनी वाट पाहे ।।२।। पिंताबर शेला कैसा गगनी झळकला । गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला ।।३।। विठोबाचे राज्य आम्हां दिवाळी । विष्णुदास नामा जीवें भावे ओवाळी ।।४।।

येई वो येई वो येई
येई वो येई वो येई धायोनिया । विंलब कां वाया लाविलया कृपाळे ।।१।। विठाबाई विश्वबंर भवच्छेदके । कोठें गुंतलीस माये विश्वव्यापके ।।२।। न करी  न करी आता आळस अव्हेरू । व्हावया प्रकट कैचे दुरी अंतरु ।।३।। नेघे नेघे नेघे माझी वाचा विसावा । तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ।।४।।

आता कोठें धावे मन । तुमचे चरण
आता कोठें धावे मन । तुमचे चरण देखलिया ।।१।। भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंद ।।२।। प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ।।३।। तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ।।४।।

उठा उठा हो साधुसंत
उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥१॥ उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया॥२॥ उठोनियां पहाटे । विठ्‌ठल पाहा उभा विटे । चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका॥३॥ जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा । वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥४॥ पुढें वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती । होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥५॥ सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं । केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥६॥

उठा जागे व्हा रे आतां
उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरीनाथा । भावें चरणीं ठेवा माथां । चुकवीं व्यथा जन्माच्या ॥१॥ धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून । सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥ माया विघ्नें भ्रमला खरें । म्हणता मी माझेनि घरे । हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥३॥ आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा ।स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं राहा श्रीहरीच्या ॥४॥ संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामा स्मरा । मुक्ति सायुज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥५॥ विष्णुदास विनवी नामा । भुलूं नका भव कामा |धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥

उठा पांडुरंगा आतां  दर्शन
उठा पांडुरंगा आतां  दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां ॥१॥ संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा । सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा ॥२॥ रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी । मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥ राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया । सेजें हालउनि जागे करा देवराया ॥४॥ गरुड हनुमंत पुढे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥ झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥

उठा अरुणोदय प्रकाश झाला
उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला । हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥१॥ महाद्वारीं वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन । आले द्दावे तयांसी दर्शन । बंदिजन गर्जती ॥२||सभामंडपी कीर्तन घोष ।मृदंग टाळ विणे सुरस । आनंदे गाती हरिंचे दास ।परम उल्हास करूनियां ॥३॥ चंद्रभागे वाळ्वंटी । प्रातःस्नानाची जनदाटी । आतां येतील आपुले भेटी ।उठीं उठीं गोविंदा ॥४॥ ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत झाले चक्रपाणी । नामा बद्धांजुळी जोडुनि ।चरणीं माथा ठेवितसे ॥५॥

उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥१॥ वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥२॥ शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥३॥ सुरवरांची विमाने गगनीं दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥४॥ रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात । त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥५॥ पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती । भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती॥६॥ अनंत अवतार घेसी भक्तांकारणें । कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें ॥७॥ चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं । पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥८॥

सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा
सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥ काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया ।चराचर मोहरलें तुझी मूर्ति पाहाया ॥२॥ कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख ॥३॥ आरती करितां तेज प्रकाशले नयनीं । तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं ॥४॥

कां हो तुम्ही निश्र्चितीनें
कां हो तुम्ही निश्र्चितीनें निजलाती हरी । मानिलें हें सुख आम्ही वाचुं कैशापरी ॥१॥ उठा सावध व्हावे क्षेम सकळां द्यावें । जया जी वासना तयां तैसे पुरवावें ॥२॥ जन्मोजन्मीं सांभाळिलें क्षमा करा अन्याय ।कृपा करी देवा आम्हां तूंचि बापमाय॥३॥ तुका म्हणे करा वडीलपणा दानासी । जेणें सुख होय सकळ हे जनासी ॥४॥

अवघे हरिजन मिळोनि आले राउळा
अवघे हरिजन मिळोनि आले राउळा । दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥१॥ उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी । पाहुं द्दा वदन वंदूं पायांची धूळी ॥२॥ उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा ।कोठवरी निद्रा आतां उठा परेशा ॥३॥ तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी । दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥४॥

तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे
तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे । कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥हाल कां रे कृष्णा डोल कां रे  । घडिये घडिये घडिये गुज बोल कां रे ॥२॥ उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरू विठ्‌ठलु नाहो  ॥३॥

भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥१॥ ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥२॥ काय महिमा वर्णू आतां सांगणे किती ।कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥३॥ राही रखुमाई दोही दो बाहीं ।मयूर पिच्छ चामरें ढाळिती ठायीं ठायीं ॥४॥ तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा । विटेवरी उभा लावण्यगाभा ॥५॥

उठा सकळ जन उठिले नारायण
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥२||तुका म्हणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥

उंच नीच काही नेणे भगवंत
उंच नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनिया ।।१।।दासी-पुत्र कण्या विदुराच्या भक्षी ।दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ।।२।।चर्म रंगू लागे रोहिदासा संगे । कबीराचे मागे शेले विणी ।।3।।सजन कसाया विकू लागे मांस । माळ्या सावत्यास खुरपू लागे ।।४।।नरहरी सोनारा घडू फुंकू लागे । चोख्यामेळ्या संगे ढोरे ओढी ।।५।।नामयाची जनी सवे वेचे शेणी । धर्मा घरी पाणी वाहे झाडी ।।६।।नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियांची भिंत अंगे ओढी ।।७।।अर्जुनाचे रथी होय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ।।८।।गौळीयांचे घरी अंगे गायी वळी । व्दारापाळ बळी व्दारी जाला ।।९।।येंकोबाचे ऋण फेडी ऋषीकेशी । आंबऋषीचे सोशी गर्भवास ।।१०।।मीराबाई साठी घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पाडेवार ।।११।घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी।।१२।।पुंडलिका साठी अझुनी तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ।।१३।।

श्रवणे कीर्तने झाले ते पावन ।
श्रवणे कीर्तने झाले ते पावन । सनकादिक जाण परम भक्त ।।१।।जाली ते विश्रांती याचका सकळा । जीवी जीवनकळा श्रीमूर्तीरया ।।२।।पादसेवने अक्रूर जाला ब्रम्हरूप । प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ।।3।|सख्यपणे अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दन एकरूप ।।४।।दास्यत्व निकट हनुमंते पै केले । म्हणुनी देखिले रामचरण ।।५।।बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषणावरद चंद्रार्क ।।६।।व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकादिक । आणि पुंडलिक शिरोमणी ।।७।।शुकादिक योगी रंगीले श्रीरंगी । परिक्षितीच्या अंगी ठसावले ।।८।।उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचा मेळ ब्रम्हरूप ।।९।।अनंत भक्त राशी तरले वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ।।१०।।

पवित्र तें कुळ पावन तो देश
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास जन्म घेती ॥१॥कर्म धर्म त्यांचे झाला नारायण । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥२॥वर्ण अभिमानें कोण झाले पावन । ऎसें द्या सांगुन मजपाशी ॥३॥अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनें । तयाची पुराणे भाट झालीं ॥४॥वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धार हा चांभार रोहिदास ॥५॥कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥६॥कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदु हरीचे पायीं ॥७॥चोखामेळा वंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऎक्य करी ॥८॥नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तिये सवें ॥९॥मैराळ जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचें काय सांगों ॥१०॥यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऎसा वेदशास्त्रीं ॥११॥तुका म्हणे तुम्ही विचारावें ग्रंथ । तारिलें पतित नेणो किती ॥१२॥

बहु उतावीळ भक्ताचिया काजा
बहु उतावीळ भक्ताचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ।।१।।तुझ्यापायी मज झालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ।।२।।ऋषी मुनी सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ।।3।।नाही नाश ते सुख तयास । जाले जे उदास सर्वभावे ।।४।।तुका म्हणे सुख न माये मानसी । धरिले जीवेशी पाय तुझे ।।५।।

पुण्यवंत व्हावे । घेता
पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनाचे नावे ।।१।। नेघे माझी वाचा तुटी । महा लाभ फुका साठी ।।२।। विश्रांतीचा ठाव । पायी संतांचिया भाव ।।३।। तुका म्हणे पापे । जाती संतांचिया जपे ।।४।।

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥ध्रु.॥ मकर कुंडलें तळपती श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रूळे माळ कंठी वैजयंती ॥ध्रु.॥मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥३॥सकळ तुम्ही व्हागे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं ह्र्दयामाजी ॥२॥तुका म्हणे कांही न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे॥३॥

आवडे हें रूप गोजिरें सगुण
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥ आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा/वेळोवेळा ॥ध्रु.२॥लांचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥३॥तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापा॥४॥

झणी दृष्टी लागो सगुणपणा
झणी दृष्टी लागो सगुणपणा । तेणे माझ्या मना बोध केला ।।१।।अनंत जन्माचे विसरलो दु:ख । पाहता तुझे मुख पांडुरंगा ।।२।।योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी । तो तू आम्हापाशी मागे पुढे ।।३।|नामा म्हणे जिवे करिन निंबलोण । विटेसहित चरण ओवाळीन ।।४।।

पाहातां श्रीमुख सुखावलें सुख
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळीयांची भूक न वजे माझ्या ॥१॥जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनि ॥२॥महामळें/महाबळे मन होतें जें गादलें । शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें ॥३॥तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥

येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम
येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम । तेंचि मज प्रेम देई देवा ॥१॥ डोळे भरूनियां पाहीन तुझें मुख । तेंचि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥ कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥ वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देई हातांस पायां सुख/बळ॥३॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥

नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव । मी भक्त तू देव ऐसे करी।।१।।दावी रूप मज गोपिका रमणा । ठेऊ दे चरणा वारी माथा ।।२।। पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ।।३।। पुसता सांगेन हित गुज मत । बैसोनी एकांत सुख गोष्टी ।।४।। तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ।।५।।

रुप पाहतां लोचनीं
रुप पाहतां लोचनीं । सुख झालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥

वचन ऎका कमळापती
ऐके/वचन ऎका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥ कर जोडितों कथेकाळीं । आपण असावें जवळीं ॥२॥ घ्यावी घ्यावी माझी भाक । जरीं कां मागेन आणिक ॥३॥ तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥

राहो आतां हेंचि ध्यान
राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपट ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२॥ होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३॥ तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडो द्दा ॥४॥

तुज पाहतां सामोरी
तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीराया ॥२॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥४॥

तुम्ही सनकादिक संत
तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥ माझी भाकावी करुणा । विनवा पंढरीचा राणा ॥३॥ तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥

आतां तुम्ही कृपावंत
आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥ गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥२॥ वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥३॥ तुका म्हणे सोडिल्या गांठी। दिली मिठी पायांसी ॥४॥

लेकुराचें हित । जाणे/वाहे माउलीचें
लेकुराचें हित । जाणे/वाहे माउलीचें चित्त ॥१॥ ऎसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥ तुका म्हणे माझें । तुम्हां संतांवरी ओझे ॥४॥

करुनि उचित । प्रेम घाली
करुनि उचित । प्रेम घाली हृदयांत ॥१॥ आलों दान मागायास । थोर करुनियां आस ॥२॥ चिंतन समयीं । सेवा आपुलीच घेई ॥३॥ तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥

न धरी उदास । माझी
न धरी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥ ऎका ऎका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥ मायबाप बंधुजन । तुंचि सोयरा सज्जन ॥३॥
तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझें हित ॥४॥

गरुडाचे पायीं । ठेवी
गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥ वेगीं आणावा तो हरी । मज दीनातें उद्धरी ॥२॥ पाय लक्ष्मीच्या हातीं । तिसीं यावे काकुळती ॥३॥तुका म्हणे शेषा । जागे करा ह्रषीकेशा ॥४॥

येग येग विठाबाई । माझे
येग येग विठाबाई । माझे पंढरींचे आई ॥१॥ भिमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणींची गंगा ॥२॥ इतुक्यासहित त्वां बा यावें । माझें रंगणीं नाचावें॥३॥ माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

Khupach Sunder dhaga ahe. Chan mahiti milali.
Kanakdhara stotra baddal konala Kahi mahiti asalyas pl sanga.

गोपाल सहस्रनामा सोबत महादेवाचा एक स्तोत्र वाचायचा असतो कुणाला माहित असल्यास सांगावे.

Mala dattachi ani navnath maharaj Che bhajan ani strotra have ahet please koni link dya

Pages