मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरारा, जाऊ द्या. तुमका दृष्टीकोन मला तरी चुकीचा वाटलेला नाही. पण तुम्ही पोस्ट संपादित केल्याने माझ्या पोस्टलाही अर्थ नव्हता. Happy म्हणून मीही पोस्ट संपादित केली.

मेधा, ओके. आता मिळाले की एक तरी खाऊन टेस्ट बघेन. नि झेपतंय का ते पण बघेन. Happy

मागच्या पानावर सर्‍या माकुल म्हणून जो फोटो आहे तो ऑक्टोपस आहे . त्याच्या टेंटकल्स वर छोटे छोटे सक्शन कप्स आहेत.

स्क्विड आणि कटलफिश हे दोन्ही दिसायला बर्‍यापैकी सिमिलर असतात. पण कटलफिश मधे मोठे , जाड आणि porous हाड टाइप असते. स्क्विडमधे हे पातळ , कार्टिलेजिनस असते. कटल फिश, स्क्विड आणि ओ़क्टोपस तिन्ही मधे इंक सॅक असते आणि त्यात बनणार्‍या इंक चा उपयोग स्व संरक्षणार्थ होतो. कटलफिश मधली इंक ब्राउनिश रंगाचि असते. जुन्या फोटोग्राफ मधे सेपिया रंगाचं नाव या कटलफिश इंक वरुन आलंय .

जागू आणि इतर मुंबैकर - मुंबैत मासे मार्केटात स्क्विड आणि कटलफिश दोन्ही मिळतात का ? मला तरी कधी कटलफिश बाजारात पाह्यलाचं आठवत नाही.

सगळ्यांचे फॅन क्लब मध्ये स्वागत.

मी इंग्लिश नावांच्या फंदात कधी पडले नाही त्यामुळे मलाही माहीत नाही. गुगलवर मिळतील.

कालवे कच्ची खातात. माझा कालवांवर लेख आहे माहेर अन्नपूर्णा अंकात. काही महिन्यांनी इथे प्रकाशीत करेन.

वर्‍याच ठिकाणी कालवे कच्ची खातात. म्हणजे शिंपल्यातून डायरेक्ट पोटात. अलिबागला तर कालवांचे दगडच घेऊन बसलेल्या असतात काही बायका कालव विकायला.

निधी वागळीचा फोटो टाकशील का?

मेधा कटलफिश च्या डिझाइनवाला मासा काहीतरी पाहील्यासारख वाटत आहे मला बाजारात. पण नेहमी नसतात. नाहीतर मी आणला असता नविन म्हणून. कदाचीत तशाच डिझाईनचा मासाही असू शकेल.

निधी मी गुगलवर सर्च केला फोटो. वागळीला आम्ही पाकट म्हणतो. इतर माशांसारखाच तोही करतात. पण मी एकदा आणून पूर्ण रेसिपी करून इथे देईन.

वागळीला काही ठिकाणी वाघूळ किंवा पाकट/पाकटीसुध्दा म्हणतात. बाजारात असतात पण कधी खाल्लेली नाही.

खडकाला लागलेली कालवे

हे असे कालवांचे शिंपले घेउन बसतात बायका.

ही काढलेली कालवे

अशी मोठी कालवेही असतात. ती कापून करावी लागतात.

ओहो.. मी डोळे मोठ्ठे मोठ्ठे करुन पाहत बसली पहिल्या फोटोत काय दिसतय का ते Lol Proud
दुसर्‍या फोटोत ते बघीतल्यावर कळल कि बापजन्मात कधी पहिल्या फोटोत कालवे आहे हे ओळखता आले नसते.. हाहाहा

हो हो पाकट, हे नाव माबोवरच वाचलं होतं पण काही केल्या आठवेना मला.

इतर माशांसारखाच तोही करतात. पण मी एकदा आणून पूर्ण रेसिपी करून इथे देईन.>> चालेल जागू.
मी (म्हणजे इथे सर्वजणच) मटणासारखं करतो. सुक खोबरं, कांदा भाजून त्याचं वाटणं लावतो. जास्तवेळ शिजवलं की रस्सा असला भारी लागतो. त्याचे काटे जरा मऊ असतात त्यामुळे चाऊन खायला मज्जा येते. Happy

आमच्याकडे वरचेवर असतात कालवं. आता कधी मिळतायत नि कच्चीच खातेय असं झालंय. Proud
ते कालवांचे दगड भाजून त्यातली खरपूस झालेली कालवं खायला पण भारीच टेस्टी लागतात. Happy

वॉव निधी कालवे भाजून पण खातात. पहिल्यांदाच ऐकल. मस्त.

बरोबर पाकट मटणासारखच करतात मी विसरले होते कारण मी कधी केल नाही पण ऐकून आहे. शारमु/मुशी पण अशीच मटणासारखी करतात.

कालवं मी तरी कच्चीच खाल्लीत. आंजर्लेलेल्या नातेवाईकांकडे जायचो तेव्हा सकाळी सकाळी जायचि समुद्रावर हातात कोयती घेवून.
कालवं फोडून टाकायच्क तोंडात.

भरपूर झिंक असते , केस गळायचे थांबतात असे आमची काकू सांगायची जी डॉक्टर आहे.

झंपी मी अजून नाही कच्ची खाल्ली. त्रास होत नाही ना काही. कच्ची कालवे खाऊन केस गळायचे थांबतात की शिजवलेलीही चालतील?

कच्ची खायची? Uhoh
आम्ही माझ्या आतेच्या गावी गेलो होतो कोलमांडल्याला. रात्री जेवणात तिच्या सासुबाईंनी हिरव्या मसाल्यात कालवं केली होती.
आधी हिरवा मसाल्याची ग्रेवी बघुन माझ्या ताईने विचारलं की हे काय आहे आजी?
तर त्या म्हणाल्या अगं कालवं आहेत. तुम्हाला माहित नाहीत? ती समुद्रातल्या दगडांना चिकटलेली असतात. वै वै
आम्ही दोघी बहिणींनी ते खाल्लंच नाही मग. Happy
मी अजुन तिसर्‍या-शिवल्या पण केल्या नाहीयेत. करुन खायची खुप इच्छा आहे.

त्या मासेखाउ काकूनेच आम्हाला मासे खायला शिकवले नाहितर आम्ही घरी शाकाहारी आजी आणि तिच्या सोवळ्यामुळे.

जागू, काही त्रास होत नाही कच्ची खावून. तिथे अमेरीकेत सुद्धा अशी कच्चीच असतात थंड करून खायला. मी खायचे तिथे असताना सुद्धा. अलीकडेच बंद केलेय कच्चे खाणं.

छान ब्रशने धूवोइन घे आणि गरम पाण्यात घालून दोन मिनिटातच काढ. पाणी उकळावायचे नाही. आता ह्या वयात मला सुद्धा भितीच वाटते कच्चे खायची. म्हणून मी असेच पाणी उकळवून मग गॅस बंद करून साफ केलेली अक्ख्ही कवरासकट घालते मग फोडोन खायचे. खूप शिजले तर चिवट होतात. शिजवल्याने झिंक कमी होते.

मी तिसर्‍या सुद्धा असेच खाते.

शंख पण खातात का? शंखतले प्राणी कसे दिसतात, इथे कधी फोटो पाहिल्याचे आठवत नाही >>
काही प्रकारचे शंख आणि गोगलगायी खातात. फ्रेंच, इटालियन, ग्रीक , चिनी, मलेशियन रेस्टॉरंटमधे खाल्लेत .
बहामा बेटे तर कॉन्च करता फार प्रसिद्ध आहेत. आपल्या इथल्या मध्यम नारळाच्या आकराचे शंख असतात. त्याचं सूप, किंवा कॉर्न घालून केलेली भजी - कॉन्च फ्रिटर्स फार भारी लागतात .

शंखातील प्राणी खाल्यासारखे वाटत नाहीयेत. इंग्रजी नाव काय आहे?
गोगलगाय ही फ्रेंच डेलिकसी आहे. कधी खाल्ली नाही पण खाऊन पहाण्याची इच्छा आहे.

काय मस्त चर्चा चालू आहे! कालवं खाऊन युगं लोटली.कालवांचे दबदबीत मस्त लागते.कच्चे खाल्ले नाहीत.पण इथे कालवं फारशी मिळत नाहीत.

मी अजुन तिसर्‍या-शिवल्या पण केल्या नाहीयेत. करुन खायची खुप इच्छा आहे.>>>>>> अहाहा.तिसर्‍यांच्या आठवणीने डोळे पाणावले.नक्कीच करून खा.

Escargot - गोगल गाय - अर्थात सर्व प्रकारच्या खात नाहीत. काही मोजक्याच स्पीशीज खाण्याजोग्या आहेत .
conch - कॅरिबियन समुद्रातले शंख . ते लोक उच्चा काँक असा करतात. आम्ही झूलॉजी मधे कॉंच असे शिकलो होतो म्हणून मी तसाच उच्चार करते आणि चिल्लर पार्टी माझी टिंगल करतात.

आम्ही पण कालवं भाजून खातो. खाडीत ओहोटीच्या वेळी जाऊन कालवी आणायची. पातेरा (पालापाचोळा) घालून भाजायची. साकटा नी विळा किंवा हातोडी घेऊन बसायचं. बाजूला चपाती. तास-दोन तास ठोकठोक करत मनसोक्त कालवी चपाती खाऊन मगच उठायचं.

पावसाळ्यात गोड्या पाण्याच्या बाजूला खडकात खुबे ( गोगलगायीचा एक प्रकार) मिळतात ते ही कालवी सारखेच खातात.

मी अलिकडेच मासे खायला लगलोय...
एकदा काही मोठे पापलेट आणले व तुनळी वर काही व्हीडिओ पाहुन बनवला आणि खाल्ले..
मग एकदा इलसा मासा आणला (एक मासा २००० ला पडला १ किलो) मित्र म्हणे खुप चवीष्ट आहे.. होता तसा..
पण मला एक विचारायचा आहे.. काट्या बाबतीत..
१. मासे खाताना त्या मध्ये असंख्या हाडे वा काटे ( माझी सौ काटे म्हणते ) ते सगळे काडुन वेगळे करुन मग मासा खायचे का?
२. मला मासे खुप आवडतात पण त्या मधे लहान हाडे वा काटे त्याच काय करायच (कालवण वा आमटी केल्यास)
ते सगळे एक एक काढत बसायच कि खायच ?

तोंडात जाताना जिवंत असले तरी बहुतेक अन्ननलिकेतून खाली जाताना ते पाचक रसात विरघळत असावीत. अवांतर, मला लहानपणी कोणतंही बी - इंस्पेसिअल्ली कलिंगडाचे - पोटात जाऊन पोटात झाडं आलं तर अशी सॉलिड भीती वाटायची Happy ग्रेज anatomy मध्ये क्रिस्टिना नी हृदयात आलेल्या झाडाचं ऑपरेशन केले होते Happy

मासे खाताना त्या मध्ये असंख्या हाडे वा काटे ( माझी सौ काटे म्हणते ) ते सगळे काडुन वेगळे करुन मग मासा खायचे का?
२. मला मासे खुप आवडतात पण त्या मधे लहान हाडे वा काटे त्याच काय करायच (कालवण वा आमटी केल्यास)
ते सगळे एक एक काढत बसायच कि खायच ?

तार्ले , मांदेळी. अशा छोट्या माशांमधे बारीक बारीक काटे असतात . असे मासे काट्यासकट खाता येतात. कधी कधी तार्ल्यांमधला व्हर्टिब्रल कॉलम काढून बाकी तसेच खाता येतात . अ‍ॅंचोव्हीज् , बोकरोनेस असे मेडिटरेनियन मासे सुद्धा काट्यासकट खाता येतात .

तोंडात जाताना जिवंत असले तरी बहुतेक अन्ननलिकेतून खाली जाताना ते पाचक रसात विरघळत असावीत >> मनुष्य प्राणी सोडल्यास इतर कुठलेही लिव्हिंग बीइंग शिजवलेले अन्न खात नाहीत. हमखास आग पेटवणे आणि त्यावर अन्न शिजवणे ही उत्क्रांतीमधली बरीच अलिकडची स्टेप आहे.

"मनुष्य प्राणी सोडल्यास इतर कुठलेही लिव्हिंग बीइंग शिजवलेले अन्न खात नाहीत. " - पण त्यांना कच्चं अन्न खाऊन किंवा हाडं खाऊन काय त्रास होतो, ते पण कुठे लिहीत नाहीत. Happy Happy - जोक्स अपार्ट. मुद्दा बरोबर आहे तुमचा.

Pages