मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे गेले २२ प्रतिसाद वाचून सर्व सो कॉल्ड शाकाहारी लोक्स बेशुद्ध पडणार हे नक्की Lol>>> Lol खरंच. मी मांसाहारी आहे तरी, मटण, चिकन, अंडी आणि माशांचे चार-पाच प्रकारच माहित होते. हे शंख, शिंपले खातात इथेच माहित झालं. माखुल पहिल्यांदा बघितलं, माझ्याने खाल्लं जाणं अशक्य. Lol

लहान असताना नदीत एक बंद शिंपलं मिळालं होतं, मोती मिळेल म्हणून उघडून बघितलं कसलं काय नदीतलं कावलं असेल ते बहुतेक . Lol तेव्हापासून शिंपल्या हातातही घेत नाही.

काय मस्त गप्पा चालल्या आहेत. तुम्हा सगळ्यांना जे लहानपणी वाटायच तेच मलाही वाटायच.

मोरपंखीस तुझ्या काट्यांबद्दलच्या प्रश्नाला मी सोयरे बोंबीलवर उत्तर दिले आहे.

आता मला पण कालव भाजून खायची इच्छा झाली आहे.

Mr बिन इन हॉलिडे मध्ये त्या येड्या बिनला कच्चे म्युसेल्स खाताना बघितलेले तेव्हा थोडे युक्क झालेले. माय फॅमिली... मध्येही ताजी कोळंबी पकडून लगेच तोंडात टाकल्याचे वाचलेले. पु ल नि जपानी हवाई सुंदरीने कच्चा मासा समोर आणून ठेवल्यावर 'देशपांडे कुळात कच्चा मासा खाणारा अजून जन्मला नाही' असे उद्गार काढलेले.

पण जागु म्हणतेय तर कच्ची कालवे खायला उरण गाठायला हवेच.

. पु ल नि जपानी हवाई सुंदरीने कच्चा मासा समोर आणून ठेवल्यावर 'देशपांडे कुळात कच्चा मासा खाणारा अजून जन्मला नाही' असे उद्गार काढलेले. >>>> जपानमध्ये सुशीवर कच्चा मासाच असतो. तसेच साशिमी नावाच्या डीशमध्ये पण मासे कच्चेच असतात. माझ्यामते कच्चे मासे खायला acquired taste लागते.

पेरूमध्ये माशाला लिंबाचा रस आणि मीठ लावून ठेवतात आणि थोड्या वेळाने (की दिवसानी?) तो मासा शिजल्यासारखा दिसायला लागतो अर्थात शिजल्याचा effect येत नाही. म्हणजे bacteria वगैरे मरत नाहीत. ह्या पदार्थाला सेव्हिशे (ceviche) म्हणतात. सुरुवातीला ते आंबट मासे खायला मज्जा येते. नंतर मात्र बोअर होतं.

साधना, सुमुक्ता छान माहिती.

पूर्वी शेतात पाणी साठल की गोगलगायी यायच्या. आदिवासी लोक पोत घेउन यायचे आणि त्या गोळा करून न्यायच्या. ते लोक खायचे.

मी फक्त कच्च अंड खाल्ल आहे लहानपणी औषध म्हणून.

ह्या धाग्यातल्या सगळा मजकूर आहे रेसिपीज वॉट्सअ‍ॅपवर कोणीतरी शेयर करून त्या सगळीकडे फिरत आहेत.

या धाग्यातल्या सगळा मजकूर आहे रेसिपीज वॉट्सअ‍ॅपवर कोणीतरी शेयर करून त्या सगळीकडे फिरत आहेत. ........जागू,तुझे नाव दिले आहे का? नसेल तर हद्द आहे ढापण्यार्‍याची!

लिंक दिल्या आहेत त्यामुळे लिंक मध्ये माझे नावच आहे.>>>> गूड. मला वाटलं की नावाशिवाय / किंवा स्वतःच्या नावाने शेअर करतंय कुणीतरी.

जागू ताई, मी पण कुणाला तर रेसिपी देणार होते तुमची अर्थात तुमची परवानगी घेऊनच. Happy मला मात्र भाषांतर करयला लागेल. Lol

जागू
आताच अमेरिकेतील kazin ने हया dhaagyaachaa मेसेज पाठवला,हया धाज्ञात तुझे नाव नाही,मात्र लिंक दिल्या आहेत.tithe तुze naav a aahe.

पेरूमध्ये माशाला लिंबाचा रस आणि मीठ लावून ठेवतात आणि थोड्या वेळाने (की दिवसानी?) तो मासा शिजल्यासारखा दिसायला लागतो.
Submitted by सुमुक्ता >>>>

अरे हे माहीत नव्हत... कच्चे पेरु चालतील कि पीकलेले पण ठिक आहेत..
पेरु, लिंबू आणी मीठ यांच मिश्रण म्हणजे मस्तच आणि वेगळ पण वाटतय.. करायला हव एकदा...!!

मोरपंखी, Rofl एकदम जोक ऑफ द डे आहे तुमची वरची पोस्ट म्हणजे. एकदम आईने अकबरीचं भावंडं.
पेरु म्हणजे पेरु ह्या देशात.

@ सायो..... Lol

अरेच्च्या ते पेरु देश आहे तर... तरीच म्हटल लिंबू आणी मीठ मध्ये पेरु घालायचा म्हणजे थोड वेगळ वाटतय.
आता अम्हाला त्या माशां मधल एवढ नाही माहीत.. मला पापलेट आणि शार्क हे दोनच मासे माहीत..
बर झाल तुम्ही सांगितल नाहितर सौ म्हणाली असती " काय रे.. ते कुठून अशा रेसीपी वाचुन येतोस "..
( तसे हल्ली कच्चे पेरु स्वस्तच आहेत, म्हटल एवढ सांगतायत तर करुन टाकु लिंबू, मीठ आणी पेरु रेसिपी.. ).

Lol मी वेळेवर येऊन क्लिअर केलं हे बरं झालं नाहीतर कच्चे, पिकलेले पेरु घेऊन गेला असतात मासे करायला आणि बायकोने ठोकलं असतं.

Lol

मलाही ते पेरूमध्ये म्हणजे फळातच वाटले होते हो.. म्हटलं असेल बॉ काय रेसिपी ती... आदिवासी लोक पेरुंच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतांना बघितले आहे. त्यामुळे.....

पर जल्ला सगला कामेडी झाला .....

Pages