ईकेबाना(जापनीज पद्धतीने पुष्परचना) शिबीर, एक सुंदर अनुभव

Submitted by सायु on 17 March, 2016 - 08:51

पुष्परचना, एक अत्यंत आवडीचा विषय. रोज ,कधी घरी उमललेली, तर कधी लेकाला शाळेत सोडुन घरी येताना, आसपसच्या परिसरात उमलेली फुलं, पाने झालेच तर वाळलेल्या काड्या, दगड गोळा करुन आणायचे आणि घरातला एखादा कोपरा सुशोभीत करायचा.हा माझा रोजचा नेम. त्यामुळे घरात प्रसन्न वाटतं , सजिवत्व जाणवते, ताण हलका होतो असे माझे मत. असो..

फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान एक ईकेबानाचे शिबीर अटेंड करण्याचा योग आला. तर त्या शिबीराचा अनुभव ईथे सांगते आहे ....

ईकेबाना, ही एक कला आहे, जापनीज पद्धतीने पुष्परचना करण्याची. ईकेबाना, इज अबाऊट टु मीनिमायझेशन.. म्हणजे कमीत कमी फुलं , पानं / साहित्य वापरुन सुबक रचना कशी करायची..म्हणजे अगदी एकच फुल आणि एकच पान देखिल वापरुन सुद्धा तुम्ही एक्झोटीक रचना करु शकता..:)

तर सुनिता नेवाटीया, (मुंबई ) यांचे शिबीर होते. मी अर्धा दिवस ऑफीस करुन घरी जाऊन मुलांची दुपारची खाण्याची सोयकरुन साधारण ४ वाजता चिटणवीस सेंटर (नागपूर) च्या हॉल मधे पोचले, तेव्हा शिबीराला सुरवात झली होती. त्यामुळे दबकतच प्रवेश केला.. सुनिता नेवाटीया, साधारण ४० ते ४५ वर्षाच्या असाव्यात, गोर्‍यापान, उंच पुर्‍या, मृदु भाषीय आणि हसमुख व्यक्तीमत्व.. त्यांची देह भाषा, प्रेक्षकांशी संवाद आणि एकुणच मंत्रमुग्ध झालेले शिबीरर्थी असे सगळे बघता मला तिथे समरस व्हायला काही फार वेळ लागला नाही.

सुनिता जी इज द फर्स्ट मास्टर ऑफ ओहारा स्कुल. त्यांनी सांगीतले की मी.ओहारा, हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 'मोरीबाना' आर्ट आणले (म्हणजे एनी अरेंजमेन्ट डन इन प्लॉट कंटेनर, त्या विषयी पुढे सांगणारच आहे.)

ईकेबाना, हे तीन गोष्टींवर आधारित आहे, मास्क, स्कल आणि लाईन्स..
ईट फॉलोझ लाईन्स ऑन्ड कर्व्हझ.त्यातही एखादी फान्दी/पान कसे ट्विस्ट करायचे, कसे कापायचे, कसे बेन्ड करायचे आणि बरेच काही शिकायला मिळाले. त्यांनी मुंबई हुन खुप सुंदर वेस, कंटेनरर्स, एक्झोटीक फुले / पाने खास या शिबीरा साठी आणले होते. छोट्या तोंडाच्या कंटेनरर्स मधे पिन होल्डर्स जात नसेल तर
आधी वाळु भरायची मग पीन होल्डरर्स ठेवुन पुष्परचना करायची.. पसरट कंटेनरर्स मधे आधी पाणी आणि मग पीन होल्डरस ठेवुन रचना करायची असे सगळे नविन नविन शिकायला मिळाले.. रचना दिर्घ काळ टीकण्यासठी पाण्यात डीस्प्रीन टाकायची. तसेच वन थर्ड ऑफ ए हाफ इझ द बेस्ट प्रपोरशन अशा महत्वाच्या टीप्स पण मिळाल्यात. Happy

त्या दिवशी त्यांनी आम्हाला एकुण १२ रचना शिकवल्यात. त्यातल्या काही ईथे सांगते-

१.हेनामाय - ही रचना डान्सींग फ्लावर्स नी केली होती.. अतिशय मोहक रचना होती.

२. हेका - म्हणजे अशी रचना जी उंच कंटेनरर्स मधे करतात.

३.मोरीबाना - म्हणजे अशी रचना जी पसरट कंटेनरर्स मधे करतात.

४.ओहारा हेवनली स्टाईल - टॉल स्टाईल अरेन्जमेंट, गोईंग टुवर्डस हेवन, यात त्यांनी उंच उंच अम्रेला पाम चा
खुप छान उपयोग केला होता.

५, ल्यान्डस्केप - अंडाकृती/ गोल पसरट भांड्यात, बाम्बु आणि आयसच वापरुन खुप छान रचना केली होती.

६.ह्युज ल्यान्डस्केप - ही रचना त्यानी एका मोठ्या पितळीच्या परातीत केलेली.
जपान मधे रुतवर आधारित ल्यान्डस्केप बनवतात. जसे की विन्टर ल्यान्डस्केप, समर ल्यान्डस्केप, ऑटम ल्यान्डस्केप्स ईत्यादी. त्यातही खुप टेकनिक्स असतात, समर ल्यान्डस्केप मधे समोरच्या भागात जास्त डेकोरेशन करतात तर विंटर ल्यान्डस्केप मधे मागच्या भागाला जास्त डेकोरेशन करतात. अशा प्रकारच्या रचना जास्तकरुन डेमोंस्ट्रेशन साठी वापरल्या जातात.

त्या म्हणाल्यात ईकेबाना ही नुसतीच एक कला नसुन ते 'शिल्प' आहे -

त्यांचा शब्द न शब्द मनात कोरल्या जात होता. त्यानी एखादी साधी वाळलेली काडी जरी धरली तरी ती त्याक्षणापासुन सुंदर वाटु लागायची.. ते म्हणतात ना एखाद्याला तशी वेचक नजर लाभलेली असते के तो असे
सौन्दर्य पाहु शकतो जे आपण सर्व सामान्य लोक नाही.. गॉड गिफ्टच, नाही का!

शिबीराचा कालावधी दोन तासाचा होता, पण सगळ्यांचा उत्साह पाहुन दोन तासाचे शिबीर ३ १/२ तास चालले.
शिबीराच्या दरम्यानच माझ्या सकट प्रत्येकानी मनोमन आपआपला कोपरा सजवायला सुरवात केली होती.
सगळ्यांचे चेहरे फुलासारखे खुललेले , टवटवीत... बरच काही शिकल्याचे समाधान होते आनंद होता..एवढे सगळ असुनही पाय तीथुन निघवत नव्हता.. अजुन शिकण्याची लालसा होतीच.. पण वे़ळे अभावी शिबीर संपवावे लागले..

जपान मधे प्रत्येक घरी रोज एकतरी ईकेबाना करतात, तीथेले लोक त्याला पवित्र/ धार्मिक (स्पीरीचुअल ) समजतात. जसे आपल्या ईथे प्रत्येका कडे देवघर असते, तसे त्यांच्या कडे ईकेबाना साठी एक खास जागा असते, त्याला "टोकोनामा" म्हणतात. तीथेचे ईकेबाना ठेवले जाते.आपल्याकडे आपण मुलीला जसे भरतकाम , विणकाम शिकवतो तसे तिथे ईकेबाना शिकवले जाते..

जपान सारख्या आधुनिक तंत्रध्न्यानात प्रगत देशानी, निसर्गाचा देवा सारखा आदर करावा, प्रेम करावं, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. अनुकरणिय आहे.-

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages