ईकेबाना(जापनीज पद्धतीने पुष्परचना) शिबीर, एक सुंदर अनुभव

Submitted by सायु on 17 March, 2016 - 08:51

पुष्परचना, एक अत्यंत आवडीचा विषय. रोज ,कधी घरी उमललेली, तर कधी लेकाला शाळेत सोडुन घरी येताना, आसपसच्या परिसरात उमलेली फुलं, पाने झालेच तर वाळलेल्या काड्या, दगड गोळा करुन आणायचे आणि घरातला एखादा कोपरा सुशोभीत करायचा.हा माझा रोजचा नेम. त्यामुळे घरात प्रसन्न वाटतं , सजिवत्व जाणवते, ताण हलका होतो असे माझे मत. असो..

फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान एक ईकेबानाचे शिबीर अटेंड करण्याचा योग आला. तर त्या शिबीराचा अनुभव ईथे सांगते आहे ....

ईकेबाना, ही एक कला आहे, जापनीज पद्धतीने पुष्परचना करण्याची. ईकेबाना, इज अबाऊट टु मीनिमायझेशन.. म्हणजे कमीत कमी फुलं , पानं / साहित्य वापरुन सुबक रचना कशी करायची..म्हणजे अगदी एकच फुल आणि एकच पान देखिल वापरुन सुद्धा तुम्ही एक्झोटीक रचना करु शकता..:)

तर सुनिता नेवाटीया, (मुंबई ) यांचे शिबीर होते. मी अर्धा दिवस ऑफीस करुन घरी जाऊन मुलांची दुपारची खाण्याची सोयकरुन साधारण ४ वाजता चिटणवीस सेंटर (नागपूर) च्या हॉल मधे पोचले, तेव्हा शिबीराला सुरवात झली होती. त्यामुळे दबकतच प्रवेश केला.. सुनिता नेवाटीया, साधारण ४० ते ४५ वर्षाच्या असाव्यात, गोर्‍यापान, उंच पुर्‍या, मृदु भाषीय आणि हसमुख व्यक्तीमत्व.. त्यांची देह भाषा, प्रेक्षकांशी संवाद आणि एकुणच मंत्रमुग्ध झालेले शिबीरर्थी असे सगळे बघता मला तिथे समरस व्हायला काही फार वेळ लागला नाही.

सुनिता जी इज द फर्स्ट मास्टर ऑफ ओहारा स्कुल. त्यांनी सांगीतले की मी.ओहारा, हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 'मोरीबाना' आर्ट आणले (म्हणजे एनी अरेंजमेन्ट डन इन प्लॉट कंटेनर, त्या विषयी पुढे सांगणारच आहे.)

ईकेबाना, हे तीन गोष्टींवर आधारित आहे, मास्क, स्कल आणि लाईन्स..
ईट फॉलोझ लाईन्स ऑन्ड कर्व्हझ.त्यातही एखादी फान्दी/पान कसे ट्विस्ट करायचे, कसे कापायचे, कसे बेन्ड करायचे आणि बरेच काही शिकायला मिळाले. त्यांनी मुंबई हुन खुप सुंदर वेस, कंटेनरर्स, एक्झोटीक फुले / पाने खास या शिबीरा साठी आणले होते. छोट्या तोंडाच्या कंटेनरर्स मधे पिन होल्डर्स जात नसेल तर
आधी वाळु भरायची मग पीन होल्डरर्स ठेवुन पुष्परचना करायची.. पसरट कंटेनरर्स मधे आधी पाणी आणि मग पीन होल्डरस ठेवुन रचना करायची असे सगळे नविन नविन शिकायला मिळाले.. रचना दिर्घ काळ टीकण्यासठी पाण्यात डीस्प्रीन टाकायची. तसेच वन थर्ड ऑफ ए हाफ इझ द बेस्ट प्रपोरशन अशा महत्वाच्या टीप्स पण मिळाल्यात. Happy

त्या दिवशी त्यांनी आम्हाला एकुण १२ रचना शिकवल्यात. त्यातल्या काही ईथे सांगते-

१.हेनामाय - ही रचना डान्सींग फ्लावर्स नी केली होती.. अतिशय मोहक रचना होती.

२. हेका - म्हणजे अशी रचना जी उंच कंटेनरर्स मधे करतात.

३.मोरीबाना - म्हणजे अशी रचना जी पसरट कंटेनरर्स मधे करतात.

४.ओहारा हेवनली स्टाईल - टॉल स्टाईल अरेन्जमेंट, गोईंग टुवर्डस हेवन, यात त्यांनी उंच उंच अम्रेला पाम चा
खुप छान उपयोग केला होता.

५, ल्यान्डस्केप - अंडाकृती/ गोल पसरट भांड्यात, बाम्बु आणि आयसच वापरुन खुप छान रचना केली होती.

६.ह्युज ल्यान्डस्केप - ही रचना त्यानी एका मोठ्या पितळीच्या परातीत केलेली.
जपान मधे रुतवर आधारित ल्यान्डस्केप बनवतात. जसे की विन्टर ल्यान्डस्केप, समर ल्यान्डस्केप, ऑटम ल्यान्डस्केप्स ईत्यादी. त्यातही खुप टेकनिक्स असतात, समर ल्यान्डस्केप मधे समोरच्या भागात जास्त डेकोरेशन करतात तर विंटर ल्यान्डस्केप मधे मागच्या भागाला जास्त डेकोरेशन करतात. अशा प्रकारच्या रचना जास्तकरुन डेमोंस्ट्रेशन साठी वापरल्या जातात.

त्या म्हणाल्यात ईकेबाना ही नुसतीच एक कला नसुन ते 'शिल्प' आहे -

त्यांचा शब्द न शब्द मनात कोरल्या जात होता. त्यानी एखादी साधी वाळलेली काडी जरी धरली तरी ती त्याक्षणापासुन सुंदर वाटु लागायची.. ते म्हणतात ना एखाद्याला तशी वेचक नजर लाभलेली असते के तो असे
सौन्दर्य पाहु शकतो जे आपण सर्व सामान्य लोक नाही.. गॉड गिफ्टच, नाही का!

शिबीराचा कालावधी दोन तासाचा होता, पण सगळ्यांचा उत्साह पाहुन दोन तासाचे शिबीर ३ १/२ तास चालले.
शिबीराच्या दरम्यानच माझ्या सकट प्रत्येकानी मनोमन आपआपला कोपरा सजवायला सुरवात केली होती.
सगळ्यांचे चेहरे फुलासारखे खुललेले , टवटवीत... बरच काही शिकल्याचे समाधान होते आनंद होता..एवढे सगळ असुनही पाय तीथुन निघवत नव्हता.. अजुन शिकण्याची लालसा होतीच.. पण वे़ळे अभावी शिबीर संपवावे लागले..

जपान मधे प्रत्येक घरी रोज एकतरी ईकेबाना करतात, तीथेले लोक त्याला पवित्र/ धार्मिक (स्पीरीचुअल ) समजतात. जसे आपल्या ईथे प्रत्येका कडे देवघर असते, तसे त्यांच्या कडे ईकेबाना साठी एक खास जागा असते, त्याला "टोकोनामा" म्हणतात. तीथेचे ईकेबाना ठेवले जाते.आपल्याकडे आपण मुलीला जसे भरतकाम , विणकाम शिकवतो तसे तिथे ईकेबाना शिकवले जाते..

जपान सारख्या आधुनिक तंत्रध्न्यानात प्रगत देशानी, निसर्गाचा देवा सारखा आदर करावा, प्रेम करावं, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. अनुकरणिय आहे.-

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली - रांगोळी काय, पाककृती काय, पुष्परचना काय - किती विविध गोष्टींमधे तुला रसही आहे आणि गतिही.. ग्रेट, केवळ ग्रेट..
अनेकानेक शुभेच्छा.. Happy

सायु, खुप छान माहिती .आणि फोटो सुद्धा तूझे अतीव निसर्गप्रेम नेहमीच तुझ्या कुठल्याही कलाकृतीत अगदी ठळकपणे उतरते .
मात्र काही रचनांमध्ये तोल साधला गेलेला नाहीये किंवा चुकीच्या कोनातून फोटो काढले असावेत. यापेक्षा निग धाग्यावरील तुमच्या स्वतःच्या उत्स्फुर्तपणे केलेल्या रचना सहज सुंदर आहेत …. असो हे माझे वै.म.
पण तुमची ही सदैव उत्साही ,आनंदित निसर्गामिभुख होत जगण्याची शैली खुप कौतुकास्पदच आहे.

लिंबुटिंबु, यो. शशांकजी, भुईकमळ सगळ्यांचे आभार...

सायली - रांगोळी काय, पाककृती काय, पुष्परचना काय - किती विविध गोष्टींमधे तुला रसही आहे आणि गतिही.. ग्रेट, केवळ ग्रेट..अनेकानेक शुभेच्छा.. स्मित+++++ शशांकजी माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना देखिल कीती दाद देता तुम्ही..
खरच खुप आनंद होतो तुमचा प्रतिसाद आला की...:)

भुईकमळ, तुमचे प्रतिसाद नेहमीच खास असतात माझ्यासाठी...:)

मात्र काही रचनांमध्ये तोल साधला गेलेला नाहीये किंवा चुकीच्या कोनातून फोटो काढले असावेत. ++++ शिबीरात काढलेले प्र.ची का? का मी केलेल्या रचनांन बद्द्ल बोलताय, कृपया स्पष्ट कराल का?

काही चुका होत असतील तर नि:संकोच सांगा, मी नक्कीच सुधरवण्याचा प्रयत्न करिल..
पुन्हा एकदा, आभार.

सायु, मला त्या शिबीरातल्या रचनां बददल म्हणायचे होते . आपण रांगोळी काढताना जसे समअंगी किंवा विषम अंगी मुक्तहस्त चित्रण करतो त्यात जसा रचनेचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतो तेच इथे फक्त त्रिमितीय रचनेचा बॅलंन्स साधत करायचेय . डोळयांपुढे लांब रिबीन फडकवत लयबद्ध जिमनॅस्टिक क रणारया मुलीची आकृती आणून पहा तसच हे काहीसं छोटस पण नजर बांधून ठेवणार थ्रीडी वर्क .
तसेच वरून काढण्यापेक्षा फोटो समोरून काढले असते तर आणखीन सुंदर आले असते.
नव्या पुष्परचनेचा फोटोतील पानाफुलांचा रंग आकारातील विरोधाभास छान वाटतोय .

अशोका ची फुले/मोहर आणि जट्रोफा चे एक पान सुद्धा तुमच्या घरातला एक कोपरा सजवु शकतो...:)

भुईकमळ अगदी अचुक निरिक्षण... शिबीरातले फोटो खास नाही आलेत, मो. ची बॉटरी खुपच लो होती, त्यामुळे पटा पट जसे जमतील तसे काढले आणि म्हणुनच ते फोटो या धाग्यावर द्यावे का नाही याचा खुप विचार पण केला.. पण मग वाटले की फोटो शिवाय रचना कळणार नाही... Happy

वरील रचना पार गंडलेली आहे. हिरवी मॅट टीवीवरची. त्यावर ते पात्र मातीच्या पिशवी सारखे. ती काटकी व मोहोर मरगळलेला आहे आणि मोठया हिरव्या पानावर डाग आहेत. हे इकेबाना तर नाहीच वाट्त आहे. पात्र भरून टाकेल इतका फुलोरा पानोरा पाहिजे नाहीतर पात्र वेगळे छोटे पाहिजे
बसकट किंवा मग लांबुळके निरुंद तोंडाचे. एकदा री अ‍ॅरेंज करून बघा.

अमा, ते जे मातीची पिशवी सारखी वाटते आहे ना, ती मुळात एक चीनी मातीची बास्केट आहे, आणि एकेबाना मधे वाळलेल्या काड्या, ड्राय लीफ्ज, झाडाचे छोटे ओंडके, ईतकच काय तर दगड ही वापरतात..
तरी सुद्धा, मी दुसर्‍या कंटेनर मधे रीअरेंज करुन नक्कीच बघिन.. Happy

सायु मस्त लेख. तुझ्या रचना ही खूप आवडल्या. रांगोळ्या आधीपासूनच आवडतात. Happy
नोकरी, घर सांभाळून एवढे सगळे करतेस, स्वतःचे छंद जोपासतेस याचे खूप कौतूक वाटते.

छान माहिती.
पण कांदेपोहे ला अनुमोदन. इकेबाना मधे प्रत्येक छोट्या गोष्टीला , नीटनेटकेपणाला खुप महत्व आहे.
वरच्यात कल्पना चांगली आहे, कदाचित ठेवण्याची जागा , अँगल बदलुन फोटो काढुन पहा. आणि मोहोराच्या वर काडीचे तुटलेले टोक काढुन टाकता आले असते.

पात्र भरून टाकेल इतका फुलोरा पानोरा पाहिजे >> हे मात्र इकेबाना मधे नाही. ते प्रत्येक रचनेवर व पात्राच्या आकारावर अवलंबुन आहे. सहसा आणली आहेत ती सगळी पानं फुलं असलेल्या वाझमधे खुपसायची आपली सवय असते. पण इकेबानामधे मोकळ्या जागेला , स्पेसला खुप महत्व आहे. ही स्पेस इतर ऑब्जेक्टचे महत्व अधोरेखीत करते.

माझे हे इकेबाना

नविन वर्षाची स्वागतरचना

टी रोझेज
08028.jpg

रोझेस इन लॅबोरेटरी

08028.jpg

सावली, कदाचित ठेवण्याची जागा , अँगल बदलुन फोटो काढुन पहा. आणि मोहोराच्या वर काडीचे तुटलेले टोक काढुन टाकता आले असते. +१११

तुमच्या रचना क्लास आहेत... शेवटची जास्त्च छान आहे..
आजुन ही पाहायला आवडेल..:)

Saavali, khup ch sundar rachana ahet. perfect balance! Mala romatun baher kadhle tyanni Happy

बट-शेवंती आणि फर्न...

Pages