Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45
पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू 
रुद्रम भाग -१ इथे बघा 
https://www.maayboli.com/node/63408?page=63
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्या मिडबावकराचं काय झालं
त्या मिडबावकराचं काय झालं नाही ना दाखवलं अजून? कि क ला मारून त्याच्या धंद्याची जरी वाट लावली तरी त्याच्याकडे बर्याच गुन्हेगारांचा पैसा आहे. त्याचा शेवट असा वार्यावर नाही सोडला म्हणजे मिळवलं.
सगळं गुंडाळणार की काय. पाठक
सगळं गुंडाळणार की काय. पाठक चा रोल फक्त शोभा पत्ता सांगण्यापुरता होता की काय अर्थात डावा च्या माणसाला मारून त्याने रागिणीला वाचवलं म्हणा.
फार फास्ट फास्ट करतायेत सर्वच
फार फास्ट फास्ट करतायेत सर्वच. कि क ला कशी मारते ते बघणं महत्वाचं असेल.
मखिजासारख्या माणसाने रागिणीला
मखिजासारख्या माणसाने रागिणीला असं मोकळं सोडून कसं दिलं?
नंतर मारेकरी पाठवून काय उपयोग?
पण आजचा किरण करमरकरचा ( तो खरंच सनकी वाटतो) आणि मारेकरी घरात पाहिल्यावर मुक्ताचा अभिनय अप्रतिम होता!
मुक्ताने मुलींच्या हातात
मुक्ताने मुलींच्या हातात शोभाला सोपवून बसून बघण्याचा अभिनय पण सॉलिड केला, डोळ्यातून पाणी आलं.
कि क ने टोटल सायकीक मस्त केला, भीती वाटली त्याच्या डोळ्यातल्या झलकेची.
थोड दमाने घेतल असत तर अजुन २
थोड दमाने घेतल असत तर अजुन २ आठवडे नक्किच चालली असति पण त्या वेगाने जो थरार निर्माण होतो तो अशा कथानकाला आवश्यक ! आजचा सगळ्यान्चाच अभिनय सॉल्लिड! कसला थरारक एपिसोड होता.
संदीप पाठक च्या कॅरेक्टरच नाव
संदीप पाठक च्या कॅरेक्टरच नाव कळलंच नाही शेवट पर्यंत. त्याच्या सारखा शार्प शूटर अशा गप्पा मारत नाही बसणार, त्याने ज्या वेगात डावाच्या माणसाला मारलं त्याच वेगात रागिणी ला पण मारलं असतं, पण कथेची गरज म्हणून सोडून देऊ. तेच आज मखिजा च्या बाबतीत ,त्याने तिला असंच सोडून दिल सकाळी आणि मारेकरी पार रात्री पोचला हे माहित असून कि ती किती danger आहे त्यांच्या साठी.
एकदम खटा खट दोन हातातून
एकदम खटा खट दोन हातातून दोंघांवर गोळ्या . मस्त होता भाग . मुक्ता त्या पाठक ला कशी म्हणते मार मार माझ्या कपाळात मार . आता त्या पार्सल मध्ये काय असेल ? आला का डोक्याला खुराक . किक चा अभिनय जब्राट. किक ला डायलॉग जब्राट
मला वाटले सर्वांना आजच मारून
मला वाटले सर्वांना आजच मारून मालिका आजच संपवतात की काय?

एपि जबराच होता. तो पत्ते
एपि जबराच होता. तो पत्ते कुटायचा दोन दिवसाचा टीपी नसता केला आणि कि क बद्दल रागिणीला जरा वेगळ्या आणि थरारक पद्धतीने कळतं हे दाखवलं असतं तर मजा आली असती, कि क तिला एवढ्या सहज हिंट देतो :दु:खी: मला एक गोष्ट कळली नाही की वकिल बनून जायच्या आधी रा कपडे कुठे बदलते, डाॅचं क्लिनीक असतं ना ते, मग तिथे कशी कपडे बदलते आणि काम झाल्यावर काहीवेळ पेशंट्सच्या मध्ये बसते आणि मग अचानक ऊठून चालायला लागते, कुणी सांगेल का नक्की काय प्रकार होता. तसंच हेअरपिनने कसं काय दरवाजे उघडतात, आता किती वेगवेगळ्या प्रकारची लॅचेस आली आहेत. मुक्ताच्या घरात खाली फ्रिज, मग जीना, तो बंगला आहे की रो हाऊस की सोसायटी. कि क जे काही म्हणाला ते खरं असेल का, मोठं रॅकेट आणि सगळं काही हीच लोकं ठरवतात अगदी तूरडाळीचे भाव वगैरे. कि क एक नंबरचा घाबरट आहे
ती क्लिनिकच्या washroom का
ती क्लिनिकच्या washroom का toilet मध्ये कपडे बदलते. दारावर लिहिलेलं होतं, मी नीट वाचलं नाही. फोकस केला होता काही सेकंद त्यावर सिरीयलमध्ये. जगतापला भेटायला जाताना दाखवलं नाही पण आल्यावर कुठे कपडे बदलायला जाते ते दाखवलं.
कि क एक नंबरचा घाबरट आहे >>>
कि क एक नंबरचा घाबरट आहे >>> हो हे रूपपण दिसलं.
. दारावर लिहिलेलं होतं, >>
. दारावर लिहिलेलं होतं, >> हो परत येताना लिहीलेलं होतं दारावर.
अरे काय खटाखट उडवलं सगळ्यांना
अरे काय खटाखट उडवलं सगळ्यांना !
मला वाटत्लं संदीप पाठक मुक्ताला किरण करमरकरनी केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे पुरवणार , त्याच्या डयरेक्ट किरण करमरकरकडे काम करण्यामागे काहीतरी हेतु अस्स्णार वगैरे.. पण ठोकला त्यालाही.
अता मुक्ताच्या घरी २ डेड बॉडीज पडल्यायेत, त्याची विल्हेवाट म्हणजे पुन्हा फार कष्ट तिला, सगळी समग्री मांडावी लव्गणार.. करवत, ड्रिलिंग मशिन वगैरे पुन्हा बाहेर काढायची वेळ झाली.
बाकी तिनी रिजाइन केलय का न्युज चॅनल मधून ?
बातम्या देताना मंदारच दिसतो !
आपण खुनी असल्याची आणि माखीजाची शेवटची बातमी ऑडीयन्सला लाइव्ह पुरवून सिरियल संपेल असं वाटतय.
पण अता संपत आलीये सिरियल म्ह्स्णता म्हणता सुहास, त्याचे वडिल, हॉस्पिटलची नर्स , मिडबावकर, जगताप बरेच थ्रेड्स अपूर्ण राहिलेत !
मुक्ता मरण्या आधी वंदना गुप्तेची जवाबदारी कोणावर टाकते तेही बघायला हवं !
डिजेच्या पोस्टस शी सहमत !
डिजेच्या पोस्टस शी सहमत ! सावकाश निट उलगडायला वेळच नाही उरलाय अस दिसतय.
डिजेच्या पोस्टस शी सहमत !
डिजेच्या पोस्टस शी सहमत ! सावकाश निट उलगडायला वेळच नाही उरलाय अस दिसतय.
आपण खुनी असल्याची आणि
आपण खुनी असल्याची आणि माखीजाची शेवटची बातमी ऑडीयन्सला लाइव्ह पुरवून सिरियल संपेल असं वाटतय. >>> हा end जास्त शोभेल.
दोन एपिसोडमध्ये काय काय दाखवणार. सुहासलाच तिच्या आईची काळजी घेताना दाखवतील बहुतेक.
वं गु ची जबाबदारी अनुराधा
वं गु ची जबाबदारी अनुराधा सातव कडे. मुक्ता ह्यात मरणार नाही.
छान झाला आजचा भाग.
छान झाला आजचा भाग.
बहुतेक सगळे गुन्हेगार स्वतःचे असेच समर्थन करताना दिसतात. दुसरे वाईट आहेत हे स्वतः वाईट असण्याचे समर्थन होऊ शकत नाही. गुन्हेगारांनाही आपला वाईटपणा कधीतरी, एखाद्या गाफील क्षणी टोचत असणार, ज्याचे समर्थन करण्यासाठी हा सारा खटाटोप करून तो आतला आवाज हे लोक कायमचा बंद करून टाकतात.
त्याच्या सारखा शार्प शूटर अशा
त्याच्या सारखा शार्प शूटर अशा गप्पा मारत नाही बसणार, त्याने ज्या वेगात डावाच्या माणसाला मारलं त्याच वेगात रागिणी ला पण मारलं असतं, पण कथेची गरज म्हणून सोडून देऊ. >>>>>
बरोबर. जखमी असल्याने व बरेच रक्त वाहून गेल्यामुळे त्याचे रिफ्लेक्सएस मंदावले असावेत.
दिवसभर रागिणी कुठे जाऊन विचार करते? ती ब्रेकफास्टच्या वेळेत माखिजाकडून निघते तेव्हा खूप डिस्टरब दाखवलीय. पण हे दोघे घरात घुसतात तेव्हा बाहेर काळोख होता. मखिजाचा निर्णय तर ती निघाल्यावर लगेच झालेला.
फेसबुकवर वाचलं कि १६ लाच
फेसबुकवर वाचलं कि १६ लाच संपतेय सिरियल !
सगळी सीरीयल अक्षरशः माझ्या
सगळी सीरीयल अक्षरशः माझ्या आजुबाजुच्या भागात शुट होते आहे. मी ठाण्याला लुइस वाडी मधेच रहाते. अगदी सगळे शॉट्स ह्या आमच्याच एरीयातले आहेत. आर्थात झी च्या बहुतेक सीरीयल ह्याच भागात शुट होतात. आम्हाला सवय झाली आहे.
मागे तो भाग होता ना की जगताप आणि धुरत भेटतात व धुरत झेरॉक्स काढत असतो. तेंव्हा मी मागुन डुलत डुलत जात होते, त्याचं चित्रिकरण आलं आहे. ( म्हणजे मी पण ह्या सिरीयल मधे काम केलं सांगायला मी मोकळी)
सध्याच तिचं घर म्हणजे आमच्या घरा जवळ्चा ड्युप्लेक्स बंगला. किन्वा तिचं आधीचं घर म्हणजे कचराळी जवळ्च्या "सरोवर दर्शन" मधला ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. परवा ती कपडे बदलताना दाखव्लय ते ठाण्याच प्रसिध्द "गोडबोले हॉस्पिटल". त्या हॉस्पिटल ला दोन दरवाजे आहेत. त्याचा सुरेख उपयोग केला आहे. ती गाडी लावुन आत जाते. टॉयलेट मधे कपडे बदलते. आणि त्यांच्या कँटीन मधुन बाहेर पडते. परत येताना कँटिन मधे आत शिरुन कोणाला संशय येवु नये म्हणुन थोडी बाकड्यावर टेकुन मग टॉयलेट मधे जाताना दाखवली आहे. बाकी बहुतेक जागा ह्या आजुबाजुच्याच आहेत. किरण करमरकर चं घर म्हणजे कदाचित ओवळ्या मधले बंगले असावेत. तिकडे खुप आलीशान बंगले आहेत. ती त्या मुर्ती ला शोधायला जाते तो भाग पण ओवळ्याचाच आहे.
मला वाटते की ठाणा बजेट आणि इतर सोयी ह्या मुळे चित्रीकरणाला सोयीचं पडत असावं. अनेक कलाकार ही ठाण्याला रहातात. हे ही असेल. किरण पण ठाण्याचाच आहे. त्याचं घर आहे नौपाड्यात. आर्थात आता गोरेगाव ला रहातो. तो माझ्या कॉलेज ला होता, तेंव्हा चांगली ओळख होती. तेंव्हाही चांगलच काम करायचा.
सॉरी, जरा अवांतर झालं का?
बाकी सध्या हीच सीरीयल बघण्या लायक आहे. त्याची पट्कथा आणि वेग अप्रतिम आहे. आर्थात मुक्ता बर्वे आणि लेखक गीरीश जोशी हे काँबीनेशन हीट आहेच नाहीतरी. कालचा भाग एकदम मस्त...
बाकी तुमचं चालु द्या.... छान चर्चा.
संदिप पाठक फिजमधील बंदुकीतील
संदिप पाठक फिजमधील बंदुकीतील गोळ्या काढुन ठेवतो. रागीणी सर्वांना मारुन शेवटी स्वतःला मारुन घेत असणार फ्रिज मधील पिस्तुल काढुन पण मरणार नाहि.
बहुतेक सगळे गुन्हेगार स्वतःचे
बहुतेक सगळे गुन्हेगार स्वतःचे असेच समर्थन करताना दिसतात. दुसरे वाईट आहेत हे स्वतः वाईट असण्याचे समर्थन होऊ शकत नाही >> किकला चांगले संवाद दिले होते. मला तर वाटायला लागले कि हा अजुन थोडा वेळ बोलत राहिला तर रा त्याला सामील झाल्याचे दाखवुन टाकतील.
मला तर वाटायला लागले कि हा
मला तर वाटायला लागले कि हा अजुन थोडा वेळ बोलत राहिला तर रा त्याला सामील झाल्याचे दाखवुन टाकतील.>>>>
माखिजालाही तेच वाटायला लागले म्हणून तर त्याने पाठकला विचारले
पाठकच्या डोळ्यांवर माखिजासारखा रागिणीप्रेमाचा पडदा असता तर तोही होत हो मिळवून राहिला असता पण तसे नसल्याने त्याने मखिजच्या डोळ्यांवरचा पडदा खेचला. रच्याकने, रागिणी आल्यावर त्याने पाठकला बाहेर जायला सांगितले नाही याचे आश्चर्य वाटले.
त्याला अंदाज घ्यायचा असणार
त्याला अंदाज घ्यायचा असणार म्हणून त्याने सं पा ला थांबू दिलं.
त्या पार्सल मध्ये रा ने केलेलं रेकॉर्डिंग असेल का ? अर्थात तिने कॉपी बनवली असणार.
की क चा माणूस जर रा च्या मागे सतत आहे तर रा घरात नाहीये हे सं पा ला कोणी सांगत नाही का ? का तो तिची वाट बघत बसणार असतो ? डावाचा एक माणूस गेला पण अजुन एक आहे ज्याला पत्ता माहित्ये.
कोणतं farmhouse तीन मजली असतं
कोणतं farmhouse तीन मजली असतं? Senior Police Officer एकटाच असणं शक्यच नाही. रा चा फोन आल्याबरोबर तो दहा मिनिटात civil कपड्यात तिला भेटायला येतो. फोनवर बोलताना त्याने uniform घातलेला असतो... असो!>>>
ते फार्महाऊस अजिबात नव्हतं. त्यांना कदाचित पेंटहाऊस म्हणायचे असेल. पडताना बऱ्याच उंचीवरून पडताना दाखवलाय.
फोनवर जरी युनिफॉर्म असला तरी भेटायचे कारण व्यक्तिगत असल्याने कोणाला कळू नये म्हणून तो शर्ट बदलून आला असेल. पोलीसी कपड्यातील कोणी दिसला की लोकांचे लक्ष वेधले जातेच.
घरात एकमेकांना मारलेल्या अवस्थेत तिचे दोन दुश्मन पाहून जे कटू हसते त्यामुळे पाठक विचलित होतो. त्याला नशेत हसणाऱ्या मुली आठवतात.
दोन एपिसोडमध्ये काय काय
दोन एपिसोडमध्ये काय काय दाखवणार. >>> हो ना . किती फटाफट आटपायला लागेल सगळं .
कदाचीत काही गोष्टी कदाचित विचारात किन्वा आठवणीत दाखवतील .
म्हणजे जर समजा मुक्ता तुरुन्गात दाखवली शेवटी तर तिला आठवेल की तिने अनुराधा किन्वा सुहासला सांगितल की आईची काळजी घे आणि ते तिला आश्वासन देतात.
कि क ने टोटल सायकीक मस्त केला, भीती वाटली त्याच्या डोळ्यातल्या झलकेची. >> रागिणी त्याला म्हणते " ...माझ्यावर प्रेम आहे असं दाखवायच " कसा पटकन उठून येतो आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसतो " नाही नाही , हे खोटं नाहिये" .
आता त्या पार्सल मध्ये काय असेल ? आला का डोक्याला खुराक >> कुठलं पार्सल ?
रागिणी आता शेवटी काहीच उद्दिष्ट न राहिल्यामुळे परत डिप्रेशन मध्ये जाईल का?
मागे तो भाग होता ना की जगताप आणि धुरत भेटतात व धुरत झेरॉक्स काढत असतो. तेंव्हा मी मागुन डुलत डुलत जात होते, त्याचं चित्रिकरण आलं आहे.>> मीराताई , म्हणजे आता मागचे भाग बघणे आलं
किकला चांगले संवाद दिले होते. मला तर वाटायला लागले कि हा अजुन थोडा वेळ बोलत राहिला तर रा त्याला सामील झाल्याचे दाखवुन टाकतील. >>>> अगदी अगदी . किती सहज बोलत होता तो आणि अथॉरिटीने .
प्रा-शि, ओझीवर आता पुढील
प्रा-शि, ओझीवर आता पुढील भागाची झलक दाखवत नाहीत, त्यामुळे कुठले पार्सल कोणाला मिळाले माहीत नाही. कोणाला दाखवलंय मिळाल्याचे?
काल रुद्रम्चे मिसलेले 3 भाग
काल रुद्रम्चे मिसलेले 3 भाग पाहिले..तो चंदूदादाचा खून वाला,रागिनीची कबुली,आणि फ्लॅश ड्राईव्ह वाला...की क कसला आहे यार...बास..काय हसतो तो..आणि रागिणीने डावा ला एकटीने उडवला म्हणल्यावर त्याला आश्चर्य आणि अभिमान त्याने काय कमालीचा दाखवलाय...फोन आल्यावर पण अगदी टीन एज सारखं वागतो..आणि रागिणी समोर जेव्हा ती म्हणते की मला अंदाज आलाय तुम्हाला काय सांगायचंय आणि नंतर का नाही ते सगळं समजावते तेव्हाचे एक्स्प्रेशन काय इनोसंट होते..आ हा हा..आणि ती नंतर गेल्यावर पण त्या माणसाला म्हणतो ते ही लाजवाब..
..चंदूदादा झालेला नट आधी डोक्यात जायचा पण आता त्याबद्दल आदर वाटतोय.. संदीप पाठक चा अभिनय पण आवडायला लागलाय ..याउलट राजवाडे आधी आवडायचा पण यात नाही आवडला..मुक्ताने जे केलं ते त्याला सुचलं पण नाही????..असो..वंदना गुप्ते आणि डॉक्टर आगाशे ऑल टाइम फेव्हरेट.. आणि धुरत पण लाजवाब.. मिताली जगताप ओके ओके..सरपोतदार नाही आवडला त्यापेक्षा मोरे पण चांगला..
मी चक्क प्रेमात पडलीये की क च्या.. कुणीतरी वर म्हणल्याप्रमाणे रुद्रम् नंतर जे कलाकार आधी आवडत नाही ते आवडायला लागलेत.. मला मुक्ता कधीच आवडली न्हवती(मु.ब फॅन क्लब ची माफी)..आता बरीच आवडते..की क कधी सिरियसली घेतला न्हवता आणि आता तर
ता क -आजचा भाग फास्टम फास्ट वाटला.. संदीप पाठक पण गेला..
Pages