"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉटर फिल्टर चं झाकणसुद्धा उचलून बघितलं येड्याने. जरा डोकं चालवून दाखवा की सीन. >> पण तरी रागीणीने लपवलेले व दोराने बाहेर गॅलरी लटकवलेल्या पैशाच्या कारणाचा आता अंदाज आला. दिग्दर्शकाने केव्हढी पुढचा विचार केलाय ये यावरुन दिसते. कमाल आहे. _/\_

केपी, तेच तर म्हणतेय की इतक्या फुटकळ ठिकाणी शोधाशोध करताना दाखवलाय तो आणि जिन्याखालचं कपाट दिसू नये?? बरं त्याला हॅन्डल वगैरेही दाखवलंय व्यवस्थित म्हणजे कपाट आहे हेही कळतंय. लाईटही लावला होता किचनमधला.

भयाण होता भाग कालचा. अर्थात एकदा शोध सुरू केल्यावर मागे फिरता येत नाही ना. आणि त्या माणसाला नको तेवढी माहिती मिळाली होती. संपवायला तर हवाच होता.

ते घर तसंच सोडून गेली असती तर ? पैसे आणि सामान जुन्या घरी न्यायचं. तसही watchman नाही, शेजारी पाजारी ओळखत नाहीत.

पण एक आहे, डावाच्या माणसाला तिचं घर नाही पण बिल्डिंग तर माहीत होतीच ना, तिथेच तळ ठोकला असता तर ती मिळालीच असती की कधी न कधी.

ते घर तसंच सोडून गेली असती तर ? पैसे आणि सामान जुन्या घरी न्यायचं. तसही watchman नाही, शेजारी पाजारी ओळखत नाहीत.>>> इस्टेट एजंटने पाहिलेलं असतं ना तिला.

रागीणीला दुसरा इलाज नव्हता हे करण्याशिवाय . दुसरे म्हणजे कि प्रेक्षकांच्या मनाची आता तयारी केली आहे कि रागीणी "तयार " झाली आहे. किक चा शेवट काय असेल ?

आडो संदिप पाठक किंवा डावा हे प्रो लोकं असते तर गोष्ट वेगळी पण ही अशी टुकार हाताखालची माणसे अशाच चुका करतात त्यामुळे फार काही चुकिचे नाही. तो मधेच आणलेला भाडोत्री मारेकरी कसला टुकार होता. बाहेर एकाला गाडी उभी करुन रागीणीला उडवायला निघालेला. त्यापेक्षा संदिप पाठक चंदुकाका डावा यांची पध्दत एकदम प्रो आहे.

काय माहिती ? कि असच काही तरी भयानक लपवलेलं वगैरे. तो ओनर कोण आहे ते पण दाखवलं नाहीये . तो नाहीतर किकच निघायचा >> असू शकतो. ब्रोकर तिला म्हणतो ना ओनर दुबईला असतो. आणि किक एका भागात रा ला सांगतो ना त्याची हॉटेल्स आहेत दुबई मध्ये.

कालचा भाग सॉलीड अंगावर आला. रा ह्या क्रिमीनल्स बरोबर डील करुन करुन त्यांच्यासाठी त्यांच्याचसारखा विचार करायला लागली तर!

डावाच्या माणसाच्या खूनाचा आळ डावावरच घालण्याची आयडीया जामच भारी आहे आणि अनप्रेडिक्टेबल पण!!

तसंच आधीच्या भागाचा शेवट राच्या व्हिडीओनी होईल हे सुद्धा अनप्रेडिक्टेबलच होतं माझ्यासाठी!

व्हेरी गुड गोईंग....

जे दाखवलं ते प्रतिकात्मकच तर होतं..
माखिजा वाला एपिसोड.. एवढंच कश्याला? ती अमिता खोपकर तिच्या एंट्रीच्या एपिसोडला नुसत्या डायलॉग्ज मध्ये कोंबड्या कापायच्या फॅक्टरीचं वर्णन करते ते याहून कैक पटीने किळसवाण होतं.--- अगदी खरं.. कालचा भाग त्यामानाने खूपच सटल होता...
कोणालाही मारताना तिला आता फरक पडणार नाही असं दिसतंय, कारण नवऱ्याचे खुनी शोधून शिक्षा करणं हे एकच ध्येय आहे तिचं आता, त्यामध्ये स्वतःचं काय होईल याची काही पर्वा नाही तिला.
मला असा वाटतं की तिचा पण शेवट काही चांगला नसेल , कदाचित अंजाम मधल्या माधुरी प्रमाणे, शेवटी ही एक सूडकथाच तर आहे.

हो हो, शेवटी तिलाही मारलेलं दाखवतील कदाचित Sad Sad

कायम लक्षात राहणार आपल्या ही मालिका आणि मु ब.

ती मरणार किंवा मारेकर्याला शिक्षा करुन स्वतःलाच मारुन घेणार. तिच्या मागे रडणार ही कुणी नाही व ती ईतकी अडकलीे ह्या मधे की मागे फिरायची दारं हि बंद झालीयेत.

ओ.नो. मग आता रिपीट कसा आणि कुठे बघता येईल? कारण आता तर ऑफिस मध्ये आहे..
आणि असं काय विशेष आहे की ऑन्लाईन येणार नाही..म्हण्जे काय कारण?

काही महिन्यांपूर्वी मुक्ता बर्वेचा एक व्हिडिओ फेसबूकवर आला होती - त्यात ती कुठेतरी बंदी बनवून ठेवली असावी अशी अंधार्‍या खोलीत बसलेली दाखवली होती आणि मला वाचवा असं काहीतरी आवाहन कॅमेरासमोर करत होती; जखमीही दाखवली होती बहुतेक...
तो व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त करणार्‍या पोस्टी वगैरे टाकल्या, मग कळलं की तो एक प्रमोशनल व्हिडिओ होता.
तो याच मालिकेचा असावा का?

(मी व्हिडिओ पाहिलेला नाही, हे सगळं पेपरमध्ये वाचलं होतं.)

तो व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त करणार्‍या पोस्टी वगैरे टाकल्या, मग कळलं की तो एक प्रमोशनल व्हिडिओ होता.
तो याच मालिकेचा असावा का?> >>>>>>>>>> हो.

प्रमोशनल व्हिडिओ होता.
तो याच मालिकेचा असावा का?>> हो. चॅनेलवर पण तो व्हिडीओ दाखवायचे ट्रेलर म्हणून..

बापरे ! बरंच काय काय झालेलं दिसतंय कालच्या भागात ..उत्कंठा खूपच वाढलीये .. पण काल एपी अपलोड च केलेला नाहीये कुठेच Sad
आणि आता म्हणताय कि होणारच नाहीये .. का म्हणे ?? रडवेली बाहुली

आजच्या भागासाठी (खरं तर पूर्ण मालिकेसाठीच; पण आजच्यासाठी खास) मुक्ताला दंडवत.. कमाल acting केलीय तिने.. >>>>>>>>>> अगदी तोंडाला स्कार्फ बांधलेला असतानाही हातात कटर घेतल्यानंतरचे ऑपरेट करतानाचे भाव जबरी होते.

मुक्ताच्या करियरमध्ये ही भूमिका माईलस्टोन ठरणार. खास तिच्यासाठीच लिहिली गेली असणार ही. ग्रेट. नि:शब्द.

अन्जली तुझ्यासाठी सांगते कालच्या भागात काय झाले ते..
डावा चा माणूस रागिणीच्या घरात घुसून सगळी उलथापालथ करतो पण त्याला पैसे सापड्त नाहीत. म्हणजे सापडतात पण ते अगदी वरखर्चाला ठेवल्यासारखे गादीखाली सापडतात तितकेच (२-५ लाख असतील) मग त्याला तिथे टेबलवर रागिणीची पर्स असते त्यात तिचा व्हिडिओ कॅमेरा मिळतो आणि तो तिचं रेकॉर्डीन्ग पाहतो ज्यात तिने पहिला व्हिडिओ अभय सातव ला संपवल्यावर बनवलेला असतो तिथपासून ते हा नविन फ्लॅट भाड्याने घेतलाय तिथवर सगळे पाहतो.
तोवर रागिणी घरात शिरते आणि तिला कळतं की घरात कुणीतरी एक तर घुसून गेलंय किंवा अजूनी आहे. तितक्यात डावा चा माणूस तिच्यावर हल्ला करून सुनवतो कि मला पैसे हवेत कारण मी तुला त्या गॅरेज मधून सोडवायला खूप काम केले आहे आणि तो डावा साठी काम करतो म्हणून. रागिणी प्रथम त्याला शह द्यायचा प्रयत्न करते पण त्याच्या हातात गन असते, तो तिला पैसे कुठे ठेवलेयस तिथे घेऊन चल आणि तुला दोन बॅग्ज भरून पैसे दिले होते त्यातली एक बॅग भरून पैसे मला हवेत. ति म्हणते हे इतकेच पैसे घरात आहेत.. आणि डावाकडून करून घेतलेल्या कामाचे पैसे मी त्यांना देऊ केलेत. पण तो माणूस म्हणतो मग तु डावाशी बोल आणि तो काही पैसे कमी करतो का बघ, आणि हे ही सांगतो की डावा बायकांच्या बाबतीत रसिक माणूस आहे, इतर काही दिल्यास कन्सेशन नक्की मिळेल, तोपर्यंत बाकिच्या पैशांपर्यन्त घेऊन चल म्हणून तो तिला बंदुकिच्या टोकावर ठेवून आधी गादीखाली सापडलेले पैसे आणि तो कॅमेरा एका बेडशीट मध्ये बांधायला लावतो, मग रागिणी त्याला बाकी पैसे देण्याच्या बहाण्याने जिन्यावरून बेडरूमकडून किचनकडे घेऊन येते आणि फ्रिजकडे जाते तोवर हा माणूस जिन्यावर च असतो, तो तिला म्हणतो ए तिकडे कुठे जातेयस? त्यावर ति म्हणते पाणी पिते तहान लागली आहे. (इथे मला वाटलं खरोखरी शेजारच्या खणातून पैशाचं पोतं काढून देते की काय? आणि आता हिचा खेळ संपला) पण शिताफिने ती फ्रिज च्या दुधाच्या ट्रे मधली सायलेन्सर लावलेली गन काढून त्या माणसाला २ गोळ्या तिथून मारते तो जिन्यावर कोसळतो. वर येऊन अजून २ गोळ्या मारते (बहुधा) तेव्हा मी हुश्श केले Proud
एव्हाना तिला सगळा उलगडा झालेला आहे की हा माणूस डावाचा आहे आणि हे त्यानेच घडवून आणले आहे. मग ती आपला दुसरा फोन काढून डावाला फोन करते आणि रडते की एक माणूस येऊन सगळे पैसे घेऊन गेला.. आणि मला स्वसंरक्षणासाठी गन द्या. तो म्हणतो उद्या येऊन घेऊन जा, पण फोन ठेवण्या आधी हे विचारायला विसरत नाही की तो माणूस काही बोलला का? की तो कुणासाठी काम करतो वगैरे,? रागिणी नाही म्हणते. त्यामुळे डावा निश्चिंत वाटला की हिला यातले काही माहित नाही. मग तो त्याच्या माणसाला (जो रागिणीकडे गेलाय त्याला फोन करतो पण फोन बंद असतो. म्हणून दुसर्‍या माणसाला त्याच्या मागावर पाठवतो, कारण त्याला संशय आलाय की परस्पर पैसे घेउन तो पसार झालाय आणि फोन ही बन्द करून ठेवलाय.
मग रागिणी एक मोठी बॅग, हार्डवेअर च्या दुकानातून मोठे ताडपत्रीसारखे शीट आणि इलेक्ट्रिक कटर आणते. मग तोंडाला रूमाल बांधून ते कटर चालवताना दाखवली आहे. मग बॅग ढकलत, आणि पाठिवर सॅक घेऊन गेट मधून बाहेर पडताना तिच्या डोळ्यावर कार चे लाईट्स पडतात, तिथे एपिसोड संपला..

पुढच्या भागात मध्ये दाखवले की रागिणी खेडवळ बाईच्या वेषात डावा समोर बसली आहे, आणि तिच्या हातात बहुधा त्यानेच तिला स्वसंरक्षणार्थ दिलेली बंदुक आहे, कशी चालते बघु तरी म्हणत ती डावाला टेबलवरचा मध्येच असलेला ग्लास निव्वळ आवाज होइल म्हणून बाजूला ठेवायला सांगते आणि तीच गन त्याच्यावर रोखते...
झालं आता आज काय घडतं ते पहायचं.. Happy

हायला दक्षिणा धन्यवाद गो पोरी !!भारीच झालाय म्हणायचा कालचा एपी .. तुज्या वर्णनावरून आता नाही बघायला मिळालातरी चालेल Happy
फक्त एक spoiler alert कि काय म्हणतात तो टाक नाहीतर ज्यांना बघायचा आहे त्यांना गोष्ट फोडली असे वाटायचे !!
thanks again ! अंगठा वर उचलून दाखवणारी बाहुली

स्पॉयलर अ‍ॅलर्ट असं लिहिलं तरीही रूद्रम प्रेमी ही पोस्ट वाचणारचेत अंजली Proud
आजचा भाग टिव्हीवर पाहिलास तर कालच्या भागात काय घडले याचा सारांश तुला पाहता येइल.

काल मला रागिणी खरोखरी एकटी पडलेय याची जाणिव झाली (धुरत मिस यू :()

थँक्यू दक्षिणाताई. Happy
अगदी सगळंच लिहिलंयस. आता मी हुश्श करते, हा भाग नाही बघायला मिळाला तरी काही बिघडणार नाही.

नशिबाने मी कालचा भाग पाहिला न विसरता, फाफे बघून आलो होतो आणि रुद्रम (चक्क) विसरायला झालं होतं. अर्थात १-२ प्रसांगांना मी मान फिरवली होती.

खरचं रा अगदी एकटी पडली आहे. डावाचा पत्ता आज कट होणार का बघायचं.

डावा चा आज पत्ता कट व्हायलाच हवा. पण कुणाला कळणार नाही अशा पद्धतीने व्हायला हवा फक्त.
कारण रागिणी डायरेक्ट त्याच्या दुकानात जाऊन भिडणार आहे त्याला.
पण तिची अवस्था "मेलेलं कोंबडं आगीला भित नै" अशातली असल्याने तिचे काही सांगता येत नाही, ति सर्वांसमक्ष पण मारेल त्याला आणि सहि सलामत पळून जाईल आणि वेष बदलला की कुणाला ओळखू पण येणार नाही Happy

Pages