रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

आपण काय काय तर्क लावलो होते, माखिजाच्या वर कोण असेल ते, वं.गु काय, मो.आ काय..>>> हो ना.. आगाशेंचा रोल असेल असं वाटलं होतं. सुहासच्या बाबांचा ट्रॅक पण उगाच होता.
असो.
रुद्रम आपल्या सगळ्यांच्या लिस्ट मध्ये नेहमीच टॉपवर राहिल.
कमाल acting, कमाल दिग्दर्शन, पटकथा-संवाद अफलातून..
Happy

आपण काय काय तर्क लावलो होते, माखिजाच्या वर कोण असेल ते, वं.गु काय, मो.आ काय..>> आता सेवटीं शेवटी माखिजा हाच सूत्रधार आहे हे नक्की झालं होत . वं.गु ची तिने कायमची सोय केली आहे हे मी माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत म्हटलं आहेच . त्याच प्रतिक्रियेत मोहन आगाशे रेकॉर्डिंग वर एक पुस्तक लिहिलं असं मुदामून खोडसाळपणे मीच लिहिलं होत पण ते शक्य नाही हे माहित होत. बाकी सगळ्या सपोर्टींग कॅरेक्टरना शिक्षा मिळेलच ते आपण समजून जायचं . इतकं डिटेल मध्ये ते दाखवणार नाहीत आणि तशी अपेक्षा पण नाही .:)

जबरदस्त. गाडी उडवणार हे आधीच लक्षात आलं पण तिथपर्यंत पोचण्याचा प्रवास, ग्रेट.>>> माखिजाला ऐकवलं शेवटी ते पण ग्रेट!

आजचा एपिसोड जबरी ... त्याची सिस्टिम लॉक करणे, गाडित बॉम्ब वैगरे उच्चच , त्याच्याशी बोलणे पण भारी.. माखिजाची तडफड बघताना बर वाटत होत.
फॅन पेजची लिन्क द्या प्लिज!

अरे वा ! भारिच की !
फॅन पेजच एवढ कव्तिक केलय , द्या कि लिन्क

भीमराव मुडे, अरे वा excellent.

आपण सर्व बघितलेलं असलं तरी उद्याचा भाग मुक्ता मीडिया समोर जगाला सांगतेय सर्व हा हवा होता, असं मात्र मला राहून राहून वाटतंय. उद्या कलाकार अनुभव सांगायला येणार आहेत.

दक्षे नक्की बघ उद्या, धुरत असणार आहे.

वाह , लाजवाब !
काही थ्रेड्स अपूर्ण रहातात असं जवळपास गृहित धरून पहायला घेतला आणि आवडूनच गेला शेवट, मुक्ताचं आईशी शेवटचं बोलणं... goosebumps आलेच.. , नर्स चं एकच वाक्यं, अगदी पटेल आसा शेवट !
फॅन पेज मीही फार उशीरा पाहिलं, धम्माअल आहे !
आधी मुक्ताची मॅनेजर जॉइन झाली मग मुक्ता स्वतः Happy
अत्ताच किरण करमरकर झालाय जॉइन Happy

कालचा एपिसोड खूपच फास्ट होता, तेवढा वेळच नव्हता त्यामुळे एवढे हॅकिंग करायचे प्लॅन व नंतरचा 4 ओळीचा कोड लिहायला सुहासला किती वेळ लागला, स्फोटाकासकट गाडी ठरवायला रागिणीला किती वेळ लागला वगैरे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. शेवटी रिझल्ट काउन्टस!!

मखिजाला इतका सहज मृत्यू का दिला असे आधी वाटले. पण त्याला हाल करून मारणे शक्य नव्हते. त्याचे स्वतःचे पॉवरफुल नेटवर्क होते ज्याच्याशी भिडून त्यांना हरवणे एकट्या माणसाला शक्य नव्हते.

आणि वाटेतली माणसे मारणे हा मखिजाचा धंद्याचा भाग होता. रावचे तसे नव्हते. आशीष व त्याची फॅमिली रावच्या रोजच्या ओळखीतला होती, त्याची खबर दिल्यास त्याचे काय परिणाम होतील हे पुरेपूर माहीत असूनही राव त्याची खबर किरणला देतो. त्यासाठी त्याला जबरी शिक्षा देणे रागिणीच्या नजरेत योग्य ठरते व ती तसे करते. जो मृत्यू रागिणीची माणसे अनुभवतात तोच मृत्यू ती रावला देते.

काय बोलली रागिणी माखिजाला! वा! सरळ एकेरीवरच. एकही शिवी न देता , आवाज न तापवता तिरस्कार पोचवला तिने. टाळ्या...
शेवटी रागिणीचे तिच्या आईशी बोलणे.. गलबलून टाकले. नर्सचे ते एकच वाक्य काय परिणामकारक!
खुप वाईट वाटले मालिका संपल्याने.
मुडेसाहेब फारच लहान आहेत की. सलाम त्यांना. त्यांनी या आधी काय काम केले आहे ते शोधावे लागेल, कारण इतकी महत्वाची मालिका त्यांना उगाच नाहीत देणार.

व्वा.. मस्त.. जबरदस्त केला शेवट.. जरी शेवट माहीत होता तरी परिणाम कारक वाटला... मला आवडला शेवटचा भाग.. आवश्यक तेवढेच डिटेल्स.! आणि ती स्वतः हून सरेंडर करणार ते पण मस्तच.. टिपीकल स्टोरी सारखं सुहास तिच्या प्रेमात पडतो हे नाही दाखवलं.. गुड..!
रागिणी चे शेवटचे डायलॉग भारी!
Will miss rudram.. For Ever...!

मुडेसाहेब फारच लहान आहेत की. सलाम त्यांना. त्यांनी या आधी काय काम केले आहे ते शोधावे लागेल,>>> त्यांचं फेसबुक प्रोफाइल पाहिलं, 'लक्ष्य' नावाच्या कुठल्याशा मालिकेशी संबंधित होते ते

सॉरी रुद्रम फॅन्स, पण मखीजा बोलण्यात अडकतो इथपासून ते शेवटापर्यंत सिरियल अगदी सोप्पी आणि convenient करून टाकली असं वाटलं. खूपच घाई झाली सगळ्यालाच. ते 'आबा हस्तगत करणे' प्रकरण इतकं ताणलं नसतं तर शेवट आणखी नीट दाखवता आला असता. अनेक बाबतीत सिरियल मस्त होती, याद वादच नाही. पण शेवट गुंडाळला.

शेवट घाईघाईतच झाला . रा ने माखिजाला गोळ्या घालून नाही मारलं , ते आवडलं.
सुहास बहुतेक रात्रभर काम करत असावा .

माखिजा आणि रा चे डावपेच रंगवता आले असते तर मजा आली असती .
नाहीतरी तो तिच्या प्रेमात होताच , तिला लगेच मारले नसते .
पण सरपोददार सोडले तर बाकीची सारी माणसे अगोदरच मेलेली होती. डावपेच खेळायला काहीच शिल्लक नव्हतं .
आणि रा धोकादायक आहे हे माखिजाला कळलं होतचं.

सॉरी रुद्रम फॅन्स, पण मखीजा बोलण्यात अडकतो इथपासून ते शेवटापर्यंत सिरियल अगदी सोप्पी आणि convenient करून टाकली असं वाटलं. खूपच घाई झाली सगळ्यालाच. ते 'आबा हस्तगत करणे' प्रकरण इतकं ताणलं नसतं तर शेवट आणखी नीट दाखवता आला असता. अनेक बाबतीत सिरियल मस्त होती, याद वादच नाही. पण शेवट गुंडाळला>>>>>>>

100 टक्के सहमत. शोभा माकन प्रकरण 2दा उल्लेखुनही रागिणीला समजत नाही. पण नुसते जाळून मारल्याचा उल्लेख, तेही बातमी आदल्या रात्रीच टीव्हीवर आल्यावर, माखिजाची माणसे पाठलागावर आहेत हे माहीत असूनही संशय येणे जुळवून आणल्यासारखे वाटले.

कालचा रुद्रम चा शेवटचा एपिसोड मुक्ता , निर्माते संदेश कुलकर्णी ( सहा निर्मात्यांपैकी एक ) , पटकथा लेखक आणि संवाद लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी एकत्र पहिला . त्याचा फोटो Happy

23658417_1552871378154009_1006671096526061830_n_2.jpg

सॉरी रुद्रम फॅन्स, पण मखीजा बोलण्यात अडकतो इथपासून ते शेवटापर्यंत सिरियल अगदी सोप्पी आणि convenient करून टाकली असं वाटलं. खूपच घाई झाली सगळ्यालाच. ते 'आबा हस्तगत करणे' प्रकरण इतकं ताणलं नसतं तर शेवट आणखी नीट दाखवता आला असता. अनेक बाबतीत सिरियल मस्त होती, याद वादच नाही. पण शेवट गुंडाळला>>>>>>>

100 टक्के सहमत. शोभा माकन प्रकरण 2दा उल्लेखुनही रागिणीला समजत नाही. पण नुसते जाळून मारल्याचा उल्लेख, तेही बातमी आदल्या रात्रीच टीव्हीवर आल्यावर, माखिजाची माणसे पाठलागावर आहेत हे माहीत असूनही संशय येणे जुळवून आणल्यासारखे वाटले.

पुनमशी सहमत! पेनड्राइव्ह मिळवण्यात फार एपिसोड खर्ची पडले त्यामुळे शेवट घाइघाइत झाला .

मला न्युज चॅनल एडिटर आणि मंदारची रिर्‍क्शन पहायला आवडली असती मुक्ताच्या कन्फेशन वर , शोभच्या तावडीतल्या मुलींना तिनी कुठे सोडलं दाखवायला हवं होतं असं वाटलं !

Pages