Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45
पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू 
रुद्रम भाग -१ इथे बघा 
https://www.maayboli.com/node/63408?page=63
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
श्या रुद्रमची अजूनही खूप आठवण
श्या रुद्रमची अजूनही खूप आठवण येते, साडेनऊला.
किक मला पार्ल्यात दीनानाथ
किक मला पार्ल्यात दीनानाथ च्या शेजारचं जे हॉटेल आहे ( अगदी लागून ) तिथे नाटक संपल्यावर आम्ही खायला गेलो होतो तेव्हा आमच्या शेजारच्याच टेबल वर बसला होता तेव्हा दिसला नंतर नाही . त्याच्या बरोबर पल्लवी जोशी चा जीजू होता . त्यानंतर लगेचच तो बालाजीच्या मालिकेत झळकला आणि नशीबच बदलून गेलं .
आता रुद्रमच्याच दिग्दर्शकाची नवीन मालिका येतेय " बापमाणूस " गावातल्या कथानकावर आहे . ( क्रेडिट गोज टू तुझ्यात जीव रंगला ) फेसबुकवर जिकडे तिकडे सगळे कलाकार आपल्या आयुष्यातल्या बापमाणसाचा जिक्र करताहेत म्हणून समजलं
ते विनोद लव्हेकर म्हणाले ना
ते विनोद लव्हेकर म्हणाले ना त्यादिवशी की आम्ही एक मराठवाडी बोलीतील मालिका घेऊन येतोय, तीच असेल कदाचित ही.
त्यानंतर लगेचच तो बालाजीच्या मालिकेत झळकला आणि नशीबच बदलून गेलं .>>> तो म्हणाला त्या दिवशी मुलाखतीत की मी हिंदी सिरीयलमध्येच बिझी झालो तिथे आणि पैसा पण उत्तम मिळतो, प्रसिद्धी भारतभर मिळते पण नाटक मात्र मला आता मराठीत करायचं आहे, माझ्या मराठी fans साठी. रुद्रम मध्ये अतिशय छान रोल मिळाला म्हणून त्याने केला. बाकी मराठी पिक्चर वगैरे करत होता एकीकडे पण सिरियल्स मात्र हिंदीच करत होता.
त्या दिवशी मेकींग मधे
त्या दिवशी मेकींग मधे ऐकल्यासारखं वाटलं की मराठवाडी (म्हणजे कुठला प्रांत नेमका) ठेचा गोड करुन घेऊन येतोय
मराठवाड्यामध्ये बोलली जाणारी
मराठवाड्यामध्ये बोलली जाणारी भाषा असेल असं मला वाटतं. त्या भाषेवर उर्दू भाषेचा प्रभाव असेल का, निजामशाही होती ना. तिथल्या बोलीबद्दल फार नाही माहीती.
ठेचा गोड करुन घेऊन येतोय >>> अरेरे
, गोड ठेचा कसा चालेल.
ते मात्र आहे हिंदीत काहींच्या
ते मात्र आहे हिंदीत काहींच्या काही पैसा मिळतो . त्या झी च्या उत्सव नात्यांचा अंकात ती पल्लवी जोशी पण म्हणालेय आपले मराठी लोक्स हिंदी मालिकेत का जात नाहीत त्यांनी तिकडे प्रयत्न करायला पाहिजेत . तिथे मराठीच्या तिप्पट पैसे मिळतो . त्यातून आपले मराठी कलाकार नाटकातून आल्याने त्यांना डायलॉगची ईतकी कसून प्रॅक्टिस करायची सवय असते कि त्यांचे रिटेक्स पण कमी होतात . असं काही तरी लिहिलंय
पल्लवी आठल्ये म्हणजे ऐश्वर्या
पल्लवी आठल्ये म्हणजे ऐश्वर्या नारकरने एकदा सांगितलं मुलाखतीत की मराठीत काम केल्याचं समाधान मिळते आणि हिंदीत चौपट पैसा त्यामुळे मी दोन्ही करते पण हिंदीत मिळालेला जास्तीचा पैसा मी मराठी फिल्म काढण्यासाठी वापरला आणि यापुढेही मराठी निर्मितीसाठीच वापरेन.
मराठवाडा म्हणजे औरंगाबाद
मराठवाडा म्हणजे औरंगाबाद वगैरे. कट्टी बट्टी म्हणालेे होते ते नवीन मालिकेचं नाव. ऐश्वर्या नारकरने कुठला मराठी चित्रपट काढला आहे. काही मराठी कलाकारांचे जुन्या दिवाळी अंकातले लेख किंवा मुलाखती फार साधे आणि सच्चे आहेत, त्यातलीच एक रेणुका शहाणे. तिचा वजनाबद्दलचा लेखही छान जेव्हा ती झलक दिखलाजा मध्येे सहभागी झाली होती आणि तिचं वजन खूप वाढलं होतं.
ऐषवर्या ने चॅम्पियन पिक्चर
ऐषवर्या ने चॅम्पियन पिक्चर काढला होता.
तोच का ज्यात अनुराग वरळीकर
तोच का ज्यात अनुराग वरळीकर होता.
पल्लवी आठल्ये म्हणजे ऐश्वर्या
पल्लवी आठल्ये म्हणजे ऐश्वर्या नारकर???
तोच का ज्यात अनुराग वरळीकर
तोच का ज्यात अनुराग वरळीकर होता. >> नाही चॅम्पियन मध्ये अनुराग वरळीकर नाहीये . अनुराग वरळीकर प्राईम टाइम सिनेमात होता जी केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची निर्मिती होती . तो पोर बाजार सिनेमात पण होता
हो पण तो बालकलाकार म्हणून एका
हो पण तो बालकलाकार म्हणून एका चित्रपटात होता ज्यात सुभा आणि शर्वरी जमेनीस त्याचे आई वडिल होते. मला वाटलं तोच चॅम्पियन.
मी यु ट्यूब वर त्याचा तो
मी यु ट्यूब वर त्याचा तो बालकलाकार असताना पिक्चर बघितला त्यात शिल्पा तुळसकर त्याची खरी आई होती आणि अलका कुबल चा मुलगा ऍक्सीडेन्ट मध्ये जातो . ( दरीत पडून ) आणि मग हि धाकटी जाऊ शिल्पा तुळसकर आपला मुलगा तिला दत्तक देते कि नुसताच वाढवायला देते अशा स्टोरीचा काही तरी सिनेमा होता . सिनेमाचं नाव आठवत नाही
सुजा तो देवकी पिक्चर.
सुजा तो देवकी पिक्चर. चॅम्पियन बद्दल फार काही आठवत नाहीये. माधवी पण होती आमची त्यात, असं ती म्हणाली. मी काही बघितला नाहीये.
सस्मित ऐश्वर्या नारकर आमच्या एरियातली आमच्या शाळेतली, बहिणीची batchmate, लहानपणापासून बघितलं आहे तिला म्हणून माहेरचं नाव जास्त ओळखीचं.
Still missing Rudram
Still missing Rudram
एका मैत्रीण्नी बरोबर सतत मी
एका मैत्रीण्नी बरोबर सतत मी चर्चा केली की इतकी मस्त होती ही सिरियल तर तिला आता बघायचीय.
मी तिला वरची लिंक दिलेली(http://expertblogz.com) पण ती म्हणतेय की, नेमके सगळे भाग गायब आहेत सपटेंबर ५ पासून.
अमेरीकेत आहे ती. कोणाला लिंक माहिती आहे का अमेरीकेतील लोकांसाठी जी ओपन होतेय.
>>अमेरीकेत आहे ती. कोणाला
>>अमेरीकेत आहे ती. कोणाला लिंक माहिती आहे का अमेरीकेतील लोकांसाठी जी ओपन होतेय.<<
यु ट्युब वर आहेत सगळे ७४ भाग. पहिले काहि भाग बघितल्यानंतर माझा धीर झाला नाहि पुढचे भाग बघण्याचा. बायकोने नेटाने पाहिले सगळे भाग, बिंज वॉच करुन...
रुद्रमला मानान्कने आहेत
रुद्रमला मानान्कने आहेत ह्यावेळच्या म.टा. सन्मान मध्ये.
यु ट्युब वर आहेत सगळे ७४ भाग
यु ट्युब वर आहेत सगळे ७४ भाग >
सापडत नाहीये. लिंक देणार का?
रुद्रमला मिळायला हवीत सर्वच
रुद्रमला मिळायला हवीत सर्वच अवॉर्डस.
कि क आणि आनंद अलकुंटेचं पण हवं होतं नाव मानांकनात. मुक्ता, संदीप, मुडे यांना मिळायलाच हवंय मटा सन्मान.
ओझी (आता झी५) वर पहा. एक सलग
ओझी (आता झी५) वर पहा. एक सलग एक पहायला मिळतील.
६० भागापर्यंत आहे झी ५ च्या अ
६० भागापर्यंत आहे झी ५ च्या अॅप वर..
पुढ्चे भाग कुठे बघायचे?
Worst ऍक्टरेस चा अवॉर्ड द्या
Worst ऍक्टरेस चा अवॉर्ड द्या मुक्ताला... एक नंबर फालतू अकटिंग करते
मुक्ता, मुडे यांना मिळाला मटा
मुक्ता, मुडे यांना मिळाला मटा सन्मान. बेस्ट सिरीयलचं पण रुद्रमला मिळालं. संदीप पाठकला पण मिळायला हवं होतं. दुसऱ्या sp ला मिळालं. सचित पाटीलला राधा प्रेम रंगी रंगली साठी. चांगलं काम करतोय पण पाठक बेस्टम बेस्ट होता त्याच्यासमोर सचितला का दिलं काही कळले नाही, पटलं नाही.
कलर्सच्या बहुतेक सगळ्या
कलर्सच्या बहुतेक सगळ्या मालिकांना मानांकन आहे. पण रूद्रम झीवर लागायची. मानांकन आणि नामांकन यात काय फरक आहे. मटाची बक्षिसं म्हणून मानांकन पण खरंच असा शब्द आहे की त्यांनी सोयीसाठी तसा बनवलाय. कलर्सच्या मालिका रद्दड आहेत सगळ्या, काही लागेबांधे असतील कलर्सचे.
कलर्स मिडिया पार्टनर आहे
कलर्स मिडिया पार्टनर आहे बहुतेक म्हणून असेल.
नामांकन म्हणजे Nomination..
नामांकन म्हणजे Nomination..
जे प्रत्येक कॅटेगरीसाठी ३/४/५ जणांचे करतात..
मानांकन म्हणजे जो त्या त्या कॅटेगरीत अंतिम विजेता म्हणून निवडला जातो तो... Selected as Winner..
नाही नीरु. अंतिम यादी आहे
नाही नीरु. अंतिम यादी आहे त्यात nominations असणाऱ्यांना मटातर्फे नेहेमी मानांकन असं म्हणतात, पहिल्यापासून. नामांकनलाच मानांकन म्हणतात तिथे.
बाय द वे आपल्या मायबोलीच्या
बाय द वे आपल्या मायबोलीच्या 'कासव' चित्रपटाला पण सहा मटा सन्मान मिळाले. मस्त वाटलं वाचून, अभिनंदन कासवच्या पूर्ण टीमचं.
Pages