फुलांनी बहरलेली बुचार्ट गार्डन : फोटोफीचर

Submitted by rar on 2 November, 2017 - 13:12

कॅनडातली बुचार्ट गार्डन ही जागा. वेगवेगळ्या ऋतूत वेगळा अनुभव देणारी. मागच्या वर्षी बुचार्ट गार्डन ला भेट दिली त्या दिवशी भरपूर पाऊस होता. त्यामुळे बागेचे, फुलांचे फोटो काढण्यापेक्षाही मला माणसं आणि त्यांच्या हातातल्या छत्र्या ही स्टोरी कॅपचर करावीशी वाटली होती. ते फोटोज मी शेयर देखील केले होते.
यावर्षी परत एकदा बुचार्ट गार्डनला जायचा योग आला. यावेळी मस्त सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात आपले रंग मुक्तपणे उधळणारी फुलं यांनी माझं लक्ष वेधून घेतलं.
या वेळी फोटोज काढताना मला जाणवलं की लहानपणापासून मला फुलं ही कायम फक्त झाडावरच, त्यांच्या नॅचरल वातावरणातच आवडत आली आहेत. मोगर्‍याचे गजरे, गुलाबाचं फूल, झेंडुच्या माळा किंवा ट्युलिप्सचे पुष्पगुच्छ ह्या सगळ्या गोष्टींना असलेले रोमँटीक, धार्मिक, किंवा इकॉनॉमिक असे विविध संदर्भ लक्षात घेऊन सुद्धा मला केवळ 'झाडावरची फुलंच' पहायला आवडतात. तिथे का कोण जाणे ती फार कमफर्टेबल असतात असं मला वाटतं. त्यामुळे फोटो काढताना देखील मी फुलांचे विविध आकार, रंग, त्यातली लय, पानांशी, फांद्यांशी आजूबाजुच्या इतर झाडांशी मिळून निर्माण झालेली स्पेस थोडक्यात फुलांचं ते नैसर्गिक विश्व, नॅचरल सेटींग फार एंजॉय केलं.
त्यात अजून एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे यावेळी मी स्वतःला कोणत्याही अपेक्षांच्या परीक्षेला न बसवता, फोटो मधे कोणतेही परफेक्शन येण्याचा अट्टाहास न करता पूर्णतः मोकळ्या मनाने, फ्री स्पीरीट मधे लाईट आणि अँगल्सशी खेळायचं ठरवलं. मायक्रो फोटोग्राफी लेन्स बरोबर नव्हती. पण त्याचीही काही खंत वाटून घेतली नाही.
२०१७ सालच्या बुचार्ट गार्डनमधले फोटोग्राफीचे हे पूर्ण मॅन्यूअल सेटींग्सवर मुक्तपणे केलेले काही प्रयोग...

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

9.

10.

11.

12.

13.

14.

15.

16.

17.

18.

19.

20.

21.

22.

23.

24.

25.

26.

27.

28.

29.

30.

31.

32.

33.

34.

35.

36.

37.

38.

39.

40.

41.

42.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख आरती.

तुमच्या गावातली गुलाबाची बाग पण सुंदर असते की!

सुरेख!!
छान लय पकडली आहे. काही फोटोत तर फूलं नाच करतायत असं वाटतंय उदा. 31, 33, 37.....

मायक्रो फोटोग्राफी लेन्स बरोबर नव्हती >> तिच्यामुळे काही फरक पडला असता का रिझल्ट्स मध्ये...

जबरी आलेत सगळेच फोटो..

मस्तच.

मायक्रो फोटोग्राफी लेन्स बरोबर नव्हती >> तिच्यामुळे काही फरक पडला असता का रिझल्ट्स मध्ये... >> अर्थातच खूप फरक पडतो.

खुप मस्त फोटो आलेत रार..
रच्याकने मी तुला संपर्कातून मेल पाठवला होता.. विपूपन केली होती शायद.. बघ ना एकदा..

फोटो आवडल्याचं सांगीतल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद Happy

टण्या, गावातल्या गुलाबाच्या बागेत अजून निवांत जाणं झालं नाहीये. आता नेक्स्ट सिझनला नक्की.
पण गावातल्याच जॅपनीज आणि चायनीज गार्डनची फोटोग्राफी केलीये. लवकरच ते फोटोही मायबोलीवर पोस्ट करायचा विचार आहे.

हिम्या, कदाचित मायक्रो लेन्स असती तर वेगळ्या परस्पेक्टीव्हने फोटो काढले गेले असते. म्हणजे या फोटोत आहे त्यापेक्षा काही वेगळंच टिपलं असतं. पण ह्या आत्ताच्या फोटोत माझ्या नजरेनं फ्रेमिंग करताना, पाहताना मला जे वाटत होतं कॅपचर व्हावं, त्यात मला नाही वाटत फार फरक पडला असता.

टीना, सॉरी. माझ्याकडून विपु पाहिलीच गेली नाही, आणि मेल नोटोफिकेशन पण आलं नाही. तुला करते रीप्लाय ...खूप सॉरी.