दशहरा काही दंतकथा

Submitted by अविनाश जोशी on 7 October, 2017 - 04:05

दशहरा काही दंतकथा

माझ्या एका लेखात दसऱ्याला दशहरा हा शब्द वापरला आहे. शब्द वापरताना मला विशेष काही वाटले नाही पण काहींना तो शब्द खटकला. दशहरा हा शब्द संस्कृत असून व्युत्पत्ती शास्त्राप्रमाणे त्याचे दोन अर्थ होतात.

दश (दहावा)+ अहर (पाय मोडता अ आहे) अर्थ दिवस = दहावा दिवस
दुश (अपभ्रश) दुष्ट, पापी, पाप + हर (नष्ट करणे, निर्मूलन करणे) = वाईट गोष्टींचा नाश

त्यामुळे दशहरा शब्दाला अजून काही किनार नसावी
दसऱ्याच्या दंतकथांबद्दल काहींनी विचारले आहे. मला माहिती असलेल्या पाच खालील प्रमाणे ..
१. महिषसुराचा वध
ही कथा बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. बंदासुर दैत्य आणि त्याचे दोन सरदार चंडा आणि मुंडा हे अतिशय त्रासदायक ठरल्यावर दुर्गेने कालीचे रूप घेतले. बंडासुर हा महिष (रेडा) स्वरूपात वावरत असल्याने त्याला महिषसूर म्हणत. आणि याच नावावरून त्याच्या गावाला म्हैसूर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. नऊ दिवस आणि नऊ रात्रीच्या घनघोर युद्धानंतर कालीने राक्षसांचा एका टेकडीवर वध केला. ज्या टेकडीवर वध केला त्या टेकडीला चामुंडा हिल्स आणि देवीला चामुंडेश्वरी नाव पडले. आणि हा दिवस विजयादशमी किंवा दशहरा म्हणून प्रसिद्ध झाला. वाडियार कुटूंबाची (म्हैसूरचे राजघराणे ) चामुंडेश्वरी कुलदैवत झाली . आणि या कारणामुळेच म्हैसूरचा दशहरा अत्यंत उत्साहात साजरा होतो.
२. राम रावण युद्ध
रामाने नऊ दिवस देवीची आराधना केली आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
३. पांडवांचा अज्ञातवास
जुगारात हरल्यामुळे पांडवांना बारा वर्ष वनवासानंतर एक वर्ष अज्ञातवासात जायचे होते. विराट नगरीत अज्ञातवास करताना पांडवांनी शस्त्रे वन्नी (शमी) च्या झाडावर लपून ठेवली होती. अज्ञातवास सपंतांना विराट राजाचे गोधन कौरव पळवून नेत होते. पांडवांनी वन्नीच्या झाडाची पूजा करून शस्त्रे काढली आणि विराट राजाला गोधन परत मिळवून दिले. तो दिवस म्हणजे दसरा.
म्हैसूरचे वडियार राजघराणे स्वतःला पांडवांचे/यादवांचे वंशज समजतात आणि त्यामुळे बहुतेक समारंभात शमीच्या झाडाची पूजा होते.
इथे एक वडियार कुटुंबाची चमत्कारिक हकीकत आठवली म्हणून सांगतो . वडियार राजाने तिरुमला राजाला मारून त्याचे राज्य घेतले. त्याच्या बायकोला अलमेलम्मा दागिने काढायला भाग पाडले तिने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आणि मरताना शाप दिला की म्हैसूरच्या राजघराण्याला मुलं होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चारशे वर्षात बहुतेक वेळेला दत्तक पुत्र घेऊनच म्हैसूरचे राजघराणे चालू आहे. .
४. कौत्साची गुरुदक्षिणा
कौत्स नावाचा देवदत्त ब्राम्हणांचा मुलगा होता. तो वरतंतू नावाच्या गुरुकडे पैठणला शिक्षण घेत होता. चौदा वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने गुरुदक्षिणा द्यायची इच्छा व्यक्त केली. वरतंतूने पहिल्यांदा नकार दिला पण नंतर कौत्साची परीक्षा घेण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली. प्रत्येक वर्षाच्या शिक्षण पोटी एक कोटी सुवर्ण मोहरा अशा चौदा कोटी सुवर्ण मुद्रा त्याने मागितल्या. कौत्स रघुराजाकडे गेला. रघु राजा हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कौत्साने त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
रघुराजाने नुकताच विश्वजीत यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान केले होते. त्याने कौत्साकडे तीन दिवसाचा वेळ मागितला आणि इंद्रावर स्वारी करून सुवर्ण मुद्रा मिळवायचे ठरवले. इंद्राला हे समजताच त्याने कुबेराला शमी आणि आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितलं. त्या संपूर्ण सुवर्ण मुद्रा घेऊन कौत्स वरतंतू कडे गेला. पण त्याने चौदा कोटीं चं सुवर्णमुद्रा ठेऊन घेतल्या कौत्साने उरलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबांना वाटल्या. तेव्हा पासून आपट्याची पानं सोने म्हणून देण्याची प्रथा आहे.
५. गायत्री देवीची बारा वर्षे तपस्या केल्यानंतर ही ती प्रसन्न न झाल्यामुळे शंकराचार्यांनी तपस्या सोडायचे ठरवले. ते उठणार तोपर्यंत त्यांना गायत्री देवीची मागून हाक ऐकू आली. शंकराचार्य तिला म्हणाले इतका वेळ तू आली नाहीस आता येऊन काय उपयोग? गायत्री देवी म्हणाली मागे वळून पहा त्यांनी मागे वळून पहिले तर जंगले आणि डोंगरांनी प्रदेश व्याप्त होता. गायत्री त्यांना म्हणाली तुझी पहिली हाक एकल्यावरच मी निघाले होते पण तुझ्या गत जन्माची पापे ओलांडेपर्यंत माझा एवढा वेळ गेला. त्यानंतर शंकराचार्यांनी गरजू लोकांकरिता सुवर्णवर्षाव करायला सांगितला. दंत कथेनुसार हा वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला त्यामुळे आपट्याला सोने म्हणायची पद्धत झाली. (शन्कराचार्याच्या ऐवजी दुसरे नाव असण्याची शक्यता आहे.) उप दंत कथेत सुवर्णवर्षाव आवळ्याच्या स्वरूपात झाला .
लेखन सीमा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावण खिडकीतून पडूच शकत नाही. १० तोंडांमुळे अडकून बसेल. फारतर खिडकीच्या समोर नसलेली तोंड भिंतीवर आपटतील.

हा ईनोदी बीबी दिसतोय. Wink
>>राम लक्ष्मण आणि सीता वनवासात काय खात होते भाऊ?>> अहो चँप, वरण भात, मटकीची उसळ? Wink

रावण खिडकीतून पडूच शकत नाही. १० तोंडांमुळे अडकून बसेल. फारतर खिडकीच्या समोर नसलेली तोंड भिंतीवर आपटतील.
>> गॅलरीत असेल. चांगली ऐसपैस गॅलरी.

सिम्बा,
अहो हिंदमाता,क्रॉफर्ड मार्केट म्हणजे मुंबई मधले आम्ही. गवाक्ष बिवाक्ष नाय कळणार. इटूकल्या पिटुकल्या खिडक्या नी 2 माणसांना जेमतेम पुरेल इतक्या गॅलरी माहितेत.

सिंबा, राहू दे! त्याला गच्चीत उभा करूया म्हणजे काही प्रॉब्लेम नाही दचकून पडायला. आणि नारळाचं झाड गच्चीपर्यंत येतंच.

अमित, Proud

100

तरी जरा दूर पडायला हवं. नाहीतर १० तोंडं झावळ्यांमध्ये अडकून हा आपला वरच्यावर कटलेल्या पतंगासारखा.... बस म्हणावं बोंबलत Biggrin

श्या! कल्पनाशक्तीचा बहर बास झाला Lol

आशुचॅंप, सिम्बाने story लिहिलीय. त्याला विचार आणि संदर्भही त्याच्याकडेच माग... नविन रामायण आहे ते. त्यात रावण वरून दचकून पडून मरतो.

बास झाली त्याची पाडापाडी नी अडका अडकी. इतक्या सुंदर माहितीपर धाग्याचा विनोद करून ठेवलाय! काही दन्तकथा असतील तर त्या लिहा.

श्रीलंकेत नारळाची झाडे भरपूर. किनार्‍यावरच्या खूप सारे नारळ असलेल्या एखाद्या झाडाला तर दहा डोकी असलेला रावण नाही ना समजलेत रामप्रभू....?

अहो 'आमचे येथे मागणी प्रमाणे दंतकथा तयार करुन मिळतील' असा बोर्ड लावायचं सोडून छडी कसली हातात घेताय सोनू!

नारळाचे घड असतात, एका रेषेत ठेवल्यासारखे नसतात, त्यामुळे तुमची दन्तकथा बाद. सिम्बा, पुलं सारखी ढासू काहीतरी आणा.

हे बघा सोनू, चित्रकार कसेही घड आय मीन डोकी काढू शकतो. जुन्या काळातली चित्रं बघितली नाही का? साईडअ‍ॅन्गल असला तरी दोन्ही डोळे दाखवतात, तेव्हा विचारता क तुम्ही...आं आं आं?

छडी कसली हातात घेताय सोनू!
>>
आशुचँप ना दया आली त्याची बिचाऱ्याची म्हणून! बिचारा, खाया पिया कुछ नही, गिलास भी हनुमान ने तोड दिया नी परत वरून तुम्ही त्याला पाडत बसलाय.

साईडअ‍ॅन्गल असला तरी दोन्ही डोळे दाखवतात, तेव्हा विचारता क तुम्ही...आं आं आं?
>>
बिंदू है. ती कसलीशी लिबर्टी की मेट्रो म्हणून सोडून दिले होते तसे इथे पण सोडू शकते.
बरं तर मग माडाचे पुढे कसे काय??

अहो हिंदमाता,क्रॉफर्ड मार्केट म्हणजे मुंबई मधले आम्ही. गवाक्ष बिवाक्ष नाय कळणार. इटूकल्या पिटुकल्या खिडक्या नी 2 माणसांना जेमतेम पुरेल इतक्या गॅलरी माहितेत.
>>>>>>>>
मुंबईत ईटुकली पिटुकली घरेच असतात ही सुद्धा एक दंत कथा आहे. रामायणात काय घुसडायचे ते घुसडा राव पण असे मुंबईला बदनाम करू नका. मुंबईतही मोठी घरे असतात. आणि हो, हरीण मारणार्‍या जमातीचे वंशज सध्या आमच्या मुंबईतच राहतात हे विसरू नका Happy

बिचारा राम, रावण अन् धागाकर्ता! Sad
धाग्यावर मरीआईचा कोप झालेला का??
काही पुजाअर्चा आहेत का?..धागा सुरळीत होण्यासाठी... Lol

हरीण मारणार्‍या जमातीचे वंशज सध्या आमच्या मुंबईतच राहतात हे विसरू नका
>>
वंशज कसे काय? वंशवृद्धी साठी लग्न कुठे केलेय.
तसेही लग्न करूनच वंश वाढतो असे काही नाही. Wink

उत्तर प्रदेश मधून आलेल्या रामाला महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतदार संघ तयार करायचा होता. यासाठी त्याने वैभवशाली राहणी सोडली आणि शबरी नामक आदिवासी महिलेच्या घरी जेवण केले. तसेच वानर समाजाची मते मिळवायला त्यांच्याशी युती केली.
रामाची वाढती लोकप्रियता पाहून रावणाची झोप उडाली. त्याने बेहन शूर्पणखा ला पाठवले पण ही मुसद्देगिरी असफल ठरली. लक्ष्मणाने ट्विट आणि फेसबुकच्या माध्यमाने तिची व्यंगचित्रे पसरवली.
यामुळे चिडलेल्या रावणाने मामा (काका नव्हे) मारीचच्या मदतीने सोन्याची खुर्ची बनवली आणि महाराष्ट्रात धाडली.
राज्यांपेक्षा केंद्रात जास्त महत्व आहे हे माहिती असल्याने रामाने कानाडोळा केला मात्र स्त्रीहट्ट पुरवण्यासाठी त्याने प्रसारमाध्यमे हाताशी धरून आपल्याला खुर्चीचा मोह नसल्याचे सांगायला सुरुवात केली आणि नागपुरास रवाना झाला.
जाताना त्याने लक्ष्मणास बारामतीकडे लक्ष देण्यास बजावले. भावाची आज्ञा पालन करणाऱ्या लक्ष्मणाला चकवण्यासाठी रावणाने नाशिकला मारीच विमानतळ, पाटबंधारे, नदी जोड अशा मोठ्या योजना जाहीर केल्या.
यामुळे धास्तवलेल्या लक्ष्मणाला नागपूर गाठून भावाला सगळी हकीकत सांगावी लागली.
त्याच्या गैरहजेरीत रावणाने सीतेची भेट घेऊन तिला लंकेत राखीव मतदारसंघात जागा देण्याचे कबूल केले आणि प्रचारासाठी तिला सोबत घेऊन गेला.
आता पुढे काय होणार? रावणाचा कुटील डाव यशस्वी होणार का? पती आणि दीर यांच्या मदतीविना सीता लंकन नागरिकांचे मन जिंकणार का? का तिचे डिपॉझिट जप्त होणार?

जाणून घेण्यासाठी वाचत रहा

वंशज कसे काय? वंशवृद्धी साठी लग्न कुठे केलेय.
>>>>>>>

तो स्वतः वंशज आहे.
त्याचे वंशज आता कदाचित येणार नाहीत, बहुधा रामाने मारलेल्या हरणाने शाप दिला असावा पुन्हा असे झाल्यास तुमचा वंश थांबलाच म्हणून समजा

ऋ, तुमचा घरावाला धागा आठवला....
>>>>
हो, ते मी आमच्याच घराच्या अनुषंगाने लिहिले होते. उगाच याच्या त्याच्या घरात डोकावायची मला सवय नाही Happy

Pages