दशहरा काही दंतकथा

Submitted by अविनाश जोशी on 7 October, 2017 - 04:05

दशहरा काही दंतकथा

माझ्या एका लेखात दसऱ्याला दशहरा हा शब्द वापरला आहे. शब्द वापरताना मला विशेष काही वाटले नाही पण काहींना तो शब्द खटकला. दशहरा हा शब्द संस्कृत असून व्युत्पत्ती शास्त्राप्रमाणे त्याचे दोन अर्थ होतात.

दश (दहावा)+ अहर (पाय मोडता अ आहे) अर्थ दिवस = दहावा दिवस
दुश (अपभ्रश) दुष्ट, पापी, पाप + हर (नष्ट करणे, निर्मूलन करणे) = वाईट गोष्टींचा नाश

त्यामुळे दशहरा शब्दाला अजून काही किनार नसावी
दसऱ्याच्या दंतकथांबद्दल काहींनी विचारले आहे. मला माहिती असलेल्या पाच खालील प्रमाणे ..
१. महिषसुराचा वध
ही कथा बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. बंदासुर दैत्य आणि त्याचे दोन सरदार चंडा आणि मुंडा हे अतिशय त्रासदायक ठरल्यावर दुर्गेने कालीचे रूप घेतले. बंडासुर हा महिष (रेडा) स्वरूपात वावरत असल्याने त्याला महिषसूर म्हणत. आणि याच नावावरून त्याच्या गावाला म्हैसूर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. नऊ दिवस आणि नऊ रात्रीच्या घनघोर युद्धानंतर कालीने राक्षसांचा एका टेकडीवर वध केला. ज्या टेकडीवर वध केला त्या टेकडीला चामुंडा हिल्स आणि देवीला चामुंडेश्वरी नाव पडले. आणि हा दिवस विजयादशमी किंवा दशहरा म्हणून प्रसिद्ध झाला. वाडियार कुटूंबाची (म्हैसूरचे राजघराणे ) चामुंडेश्वरी कुलदैवत झाली . आणि या कारणामुळेच म्हैसूरचा दशहरा अत्यंत उत्साहात साजरा होतो.
२. राम रावण युद्ध
रामाने नऊ दिवस देवीची आराधना केली आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
३. पांडवांचा अज्ञातवास
जुगारात हरल्यामुळे पांडवांना बारा वर्ष वनवासानंतर एक वर्ष अज्ञातवासात जायचे होते. विराट नगरीत अज्ञातवास करताना पांडवांनी शस्त्रे वन्नी (शमी) च्या झाडावर लपून ठेवली होती. अज्ञातवास सपंतांना विराट राजाचे गोधन कौरव पळवून नेत होते. पांडवांनी वन्नीच्या झाडाची पूजा करून शस्त्रे काढली आणि विराट राजाला गोधन परत मिळवून दिले. तो दिवस म्हणजे दसरा.
म्हैसूरचे वडियार राजघराणे स्वतःला पांडवांचे/यादवांचे वंशज समजतात आणि त्यामुळे बहुतेक समारंभात शमीच्या झाडाची पूजा होते.
इथे एक वडियार कुटुंबाची चमत्कारिक हकीकत आठवली म्हणून सांगतो . वडियार राजाने तिरुमला राजाला मारून त्याचे राज्य घेतले. त्याच्या बायकोला अलमेलम्मा दागिने काढायला भाग पाडले तिने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आणि मरताना शाप दिला की म्हैसूरच्या राजघराण्याला मुलं होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चारशे वर्षात बहुतेक वेळेला दत्तक पुत्र घेऊनच म्हैसूरचे राजघराणे चालू आहे. .
४. कौत्साची गुरुदक्षिणा
कौत्स नावाचा देवदत्त ब्राम्हणांचा मुलगा होता. तो वरतंतू नावाच्या गुरुकडे पैठणला शिक्षण घेत होता. चौदा वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने गुरुदक्षिणा द्यायची इच्छा व्यक्त केली. वरतंतूने पहिल्यांदा नकार दिला पण नंतर कौत्साची परीक्षा घेण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली. प्रत्येक वर्षाच्या शिक्षण पोटी एक कोटी सुवर्ण मोहरा अशा चौदा कोटी सुवर्ण मुद्रा त्याने मागितल्या. कौत्स रघुराजाकडे गेला. रघु राजा हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कौत्साने त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
रघुराजाने नुकताच विश्वजीत यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान केले होते. त्याने कौत्साकडे तीन दिवसाचा वेळ मागितला आणि इंद्रावर स्वारी करून सुवर्ण मुद्रा मिळवायचे ठरवले. इंद्राला हे समजताच त्याने कुबेराला शमी आणि आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितलं. त्या संपूर्ण सुवर्ण मुद्रा घेऊन कौत्स वरतंतू कडे गेला. पण त्याने चौदा कोटीं चं सुवर्णमुद्रा ठेऊन घेतल्या कौत्साने उरलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबांना वाटल्या. तेव्हा पासून आपट्याची पानं सोने म्हणून देण्याची प्रथा आहे.
५. गायत्री देवीची बारा वर्षे तपस्या केल्यानंतर ही ती प्रसन्न न झाल्यामुळे शंकराचार्यांनी तपस्या सोडायचे ठरवले. ते उठणार तोपर्यंत त्यांना गायत्री देवीची मागून हाक ऐकू आली. शंकराचार्य तिला म्हणाले इतका वेळ तू आली नाहीस आता येऊन काय उपयोग? गायत्री देवी म्हणाली मागे वळून पहा त्यांनी मागे वळून पहिले तर जंगले आणि डोंगरांनी प्रदेश व्याप्त होता. गायत्री त्यांना म्हणाली तुझी पहिली हाक एकल्यावरच मी निघाले होते पण तुझ्या गत जन्माची पापे ओलांडेपर्यंत माझा एवढा वेळ गेला. त्यानंतर शंकराचार्यांनी गरजू लोकांकरिता सुवर्णवर्षाव करायला सांगितला. दंत कथेनुसार हा वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला त्यामुळे आपट्याला सोने म्हणायची पद्धत झाली. (शन्कराचार्याच्या ऐवजी दुसरे नाव असण्याची शक्यता आहे.) उप दंत कथेत सुवर्णवर्षाव आवळ्याच्या स्वरूपात झाला .
लेखन सीमा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेही लग्न करूनच वंश वाढतो असे काही नाही
>> करुनही वाढेलच असेही नाही. महाभारत आणि रामायण दोन्ही महाकाव्यातले सगळे मेन कॅरेक्टर्स कसे जन्मले , त्या प्रत्येकाची स्टोरी हटकेच आहे.

महाभारत आणि रामायण दोन्ही महाकाव्यातले सगळे मेन कॅरेक्टर्स कसे जन्मले , त्या प्रत्येकाची स्टोरी हटकेच आहे.
>>
नाना, त्यावेळी ऍडॉप्शन, सरोगसी नी "इतर" गोष्टींना आजच्या इतके नियम नव्हते.

अस्सल कथा म्हणजे?????

मला आत्ता सुचलीये, अजून पण सुचतय काही काही पण बाकी प्रतिभाशाली लोकांचेही येऊ द्या.

अमितव- अरे होय की एसटीवाय होऊ शकतो भारी पैकी...

रावणाची दहा डोकी एकाच रांगेत असली पाहिजेत हे देखील दंतकथेचाच भाग झाला. अश्याने त्याला टीशर्ट सुद्धा पॅंट सारखे चढवावे लागत असेल, किंवा सदरा सुद्धा लुंगीसारखा गुंडाळावा लागला असता. बहुधा त्याची डोकी टोपात टोप असतात त्याप्रमाणे एकात एक असावीत. जेवढे मी पाहिलेले रामायण आठवतेय त्यानुसार रामाने एक बाण मारून त्याचे एक डोके उडवल्यावर ते जाऊन त्या जागी दुसरे प्रकट व्हायचे. दहाच्या दहा तो डिस्प्लेला लावायचा नाही.

रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हणून दशमुखी असेल.
>>>
हे रावण ब्राह्मण असायचा फंडा मला आजवर समजला नाही. म्हणजे जो राक्षस होता तो शाकाहारी ब्राह्मण होता. आणि जो देव होता तो हरीण मारणारा, आणि मांसाहार करणारा क्षत्रिय होता. पण आपण मात्र देवाचा वार पाळताना मात्र मांसाहाराला वर्ज्य समजतो आणि शाकाहाराला कवटाळतो. कसलं कन्फूजन आहे राव! मी रावण असतो तर माझ्या दहाही डोक्यांचा भुगा झाला असता विचार करून

विभिषणाला थेट पक्षात घेणे रामाला अडचणीचे असल्याने मंत्रीपद व मुलाला महामंडळ या बोलीवर विभिषणाने इवलासा पक्ष स्थापन करून रामाला बाहेरून पाठिंबा दिला.

लोकहो धागा राजकारणात हलवला जाईल ईतके वाहावत जाऊ नका...

फक्त एक शंका...
भारतातले राजकारण ग्रूपात जाईल की यात लंकाही सामील असल्याने भारताबाहेरील राजकारण ग्रूपात जाईल ?

मुंबई, ११ तारीख-
मायबोलीवरील चर्चा वाचून सलमान खानने पत्रकार परिषद घेतली आहे. काळवीट शिकारीच्या वेळी आपण सैफ, सोनाली बेंद्रे, नीलम बरोबर रामायणाचे शूटिंग करत होतो. काळवीट समोर आला तेव्हा हाच तो मृग आहे असे वाटून आपण शिकारीची फक्त action केली, यात आपली काहीच चूक नाही असा दावा सलमानने केला. त्यावेळी रामायण नव्हे तर हम साथ साथ है चे शूटिंग सुरु असल्याचे पत्रकारांनी सांगताच हम साथ साथ है म्हणजे रामायणच असून यात मोहनिश बहल राम तर आपण भरत असल्याचे सलमानने सांगितले. रामायणातील मृग सोनेरी असल्याचे सांगताच जुनं सोनं काळं पडतं म्हणून आपला गैरसमज झाल्याचे सलमानने प्रतिपादन केले.
दरम्यान मायबोलीवर खळबळ उडाली असून सलमान कोणत्या डुआयडि ने तिथे वावरतो हा तपास सुरू आहे. हम साथ साथ है मध्ये तो भरत असला तरी मायबोलीवरील भरत तो नाही यावर सर्वांचे (कधी नव्हे ते )एकमत झाले आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानने एक तक्रारवजा पत्र मायबोली प्रशासनास पाठवले होते- त्यात एक इसम आपला फ्यान असल्याचे भासवतो पण त्याच्यामुळे लोक उगाच आपलाच राग राग करतात व त्यामुळेच हल्ली आपले चित्रपट चालत नाहीत असा शाहरुखने दावा केला होता अशी अफवा आहे. त्यामुळे 'तो' तोतया फ्यान तर सलमान नाही ना व बादशाहला मात देण्यासाठी सुलतान तर असे करत नाही ना अशीही चर्चा आहे. पत्राच्या बातमीला मायबोली प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही.

Light 1

सनव Lol

संत सलमान यावरचे दंत गॉसिप Wink

सीतेकडे नाशकात रावण भिक्षां देही करत आला. तिने नाशिकची देवांग कुल्फी आणि कोंडाजी यांचा उत्त्त्तम (एक त जास्तच झाला बहुतेक. म्हणजे भारीतला उत्तम असणार) चिवडा सर्व केला. आपल्या लक्ष्मणाला वीडीची सवय. राम नशा करु किंवा चढू द्यायचा नाही (फक्त पतंग से लडगई चालायचं) म्हणून लक्षाने यावेळी चिवड्यात अSइ नि़ळ्या स्फटिकांच्या माळेत गुंडाळून वीड टाकालेली (निळ्या स्फटिकांचा संदर्भ महत्त्वाचा आहे, त्याला इंग्रजीत ब्लू क्रिस्टल म्हणतात. नोट करुन ठेवा. नोटेचे आणखी उपयोगही आहेत... अरे किती वाहावतोय मी). त्या चिवड्याला डोंगळे लागू नये म्हणून लक्ष्मणरेषा ही ओढुन ठेवायचा म्हणे तो. सीतेला इतकं बजावलं असुन सुद्धा तिने ती रेषा ओलांडली आणि दिला तो चिवडा रावणाला. तो चिवडा रावणाने खाल्ला आणि मग काय... उडालं त्याचं विमान. त्यातच बसून मग सीता आणि रावण वैकुंठास रवाना झाले .. आयला विमान म्हटलं की वैकुंठास रवाना झाले हेच आठवतं.. तर लंकेसी जाउन प्रयाण केले.

लंकेत त्याकाळी फक्त सिंह होते ते बोलत त्या लॅग्वेजला सिंहली म्हणतात. (एका वाक्यात उत्तरे द्या) रावण 'शिव' भक्त. त्यामुळे त्याच्या गळ्यात कायम रुद्राक्षांची माळ. काही शिवभक्त चावट लोक हल्ली लंकेकडे खांद्या पासून १५ अंशात हाताची तर्जनी वर करुन बोलतात म्हणे. त्यास रु-द्राक्षां बरोबर विदाउट रु आपली साधी हिरवी आणि काळी द्राक्षे आणि द्राक्षासवही आवडत असे (मानसोल्लास पृ. १७६०). त्या सिंहांशी 'सामना' करता करता रावण वाघा सारखा लढला. रादर म्हणूनच नंतर तामिळी लोक लंकेत गेले की त्यांना वाघ म्हणतात. (शास्त्रीय कारणे द्या). ते कोणाशी लढतात ते मरु दे.
तर लंकेत गेल्यावर 'सीतेस कुठे ठेवायचे' यावर विचार विनिमय चालू झाला. सीता पुर्वी मुंबईत रहात होती. तिच्या बेडरुमातून समोरच्या अशोकच्या घरचा संडास त्याच्या बाजुला वाढलेले पिंपळाचे झाड, सदानकदा घुटर-घु करणारे जटायू नावाचे कबुतर आणि त्याच्या शेजारी सरळ सोट वाढणारे एक किडमिडीत झाड दिसत असे. तिला लंकेत इतकी सारी झाडे बघुन अशोकच्या घरच्या बाजुच्या झाडाची आठवण झाली. तिने अ काढायची खोटी... रावणाने `टू` सेकंदात अशोक नावाचे 'वन' उभारले. मग वन टू का फोर गाणं म्हटलं का याचा पुराणात उल्लेख नाही. त्यामुळे रायटर्स लिबर्टी (आता सोनू मेट्रोचा जोक करयच्या आधी मराठी मातीला जागून मी भारतमाता, हिंदमाता आणि प्लाझाचा जोक करणारे.. इथे मांजरेकरांच्या मुव्ही मधली पीपी पी पी असा तुतारी चा पीस घालायला विसरु नका... मराठी माणसा जागा हो!) घेउन (विसरलात ना!... रायटर्स लिबर्टी वाक्य पुढे चालू) त्यांनी ते गाणे म्हटले समजून भंसाळी रावण, बिभिषण, कुंभकर्ण आणि इंद्रजित असा फोर मेल आणि एक फीमेल लीड डान्स बसवायला घेतोय म्हणे.
तर ते ही असो.
आता सीता अशोक वनात झूर झूर झुरत होती. आणि रावण सीतेच्या तोंडून करवून घ्यायच्या भाषणाची तयारी करत होता. त्याचा स्पीच रायटर वाल्मिकी लाँग वीकेंडला 'पापाचे धनि' ह्या नाटकाच्या दौर्‍यावर गेलेला.

Rofl

ईतक्या सगळ्या पोस्ट बघुन डायरेक्ट प्रतीसाद वाचायला घेतले,
मस्तेय, सगळ्या एका पेक्ष एक भारी.

आता हा धागा विनोदी लेखनात हलवा

शिव शिव शिव!!

मी सीतेला बिर्याणी आवडत होती हे सत्यकथन काय केले, तर आपले ते हे येउन नर्तन करून गेले.

आता तर अमितव चक्क लक्ष्मणरावांना >.आपल्या लक्ष्मणाला वीडीची सवय < असं म्हणून त्या विडीत वीड भरून सीता अन रावण दोघांना विमानात बसवते झालेत!

आता काय खरं नाय. डायरेट धार्मिक भावना दुखावणार.

आपले ते हे येउन नर्तन करून गेले.

>> उत्तर नव्हते त्यांच्याकडे त्यामुळे विधिवत धर्मांधी कढ, शिव्या वगैरे देऊन पळते झाले.

त्या ह्यांच्या fb पेजवर लौकरच हा धागा शेअर केला जाईल विशेष टिप्पणी सह,
मायबोलीवरची धुणी fb/ट्विटर वर धुवायची सवय त्यांना "भूषणा"वह वाटली तरी तशी नाही

एक बाकी बरयं हिंदुंच्या देवतांचे कितीही फाजील, पाचकळ, फालतु मजाक केले तरी कोणी वस्सकन अंगावर येत नाही.
कदाचित याचमुळे कोणीही सोम्यागोम्या उठुन असा पांचटपणा करत असतो.

कृपया कोणीही स्वतःवर ओढुन घेवु नये. घेतल्यास.................. काही फरक पडत नाही.

एक बाकी बरयं हिंदुंच्या देवतांचे कितीही फाजील, पाचकळ, फालतु मजाक केले तरी कोणी वस्सकन अंगावर येत नाही.
कदाचित याचमुळे कोणीही सोम्यागोम्या उठुन असा पांचटपणा करत असतो
>> हाच तर खरा हिंदू धर्म आहे. ज्यांना समजत नाही ते हिंदूच नव्हेत.

दसरा इतका लोकप्रिय आणि मजेदार असेल अशी कल्पनाच नव्हती
<<
बर्‍याच मजेदार गोष्टींपासून वंचित आहात असे दिसते Lol

**
एक बाकी बरयं हिंदुंच्या देवतांचे कितीही फाजील, पाचकळ, फालतु मजाक केले तरी कोणी वस्सकन अंगावर येत नाही.
कदाचित याचमुळे कोणीही सोम्यागोम्या उठुन असा पांचटपणा करत असतो.
कृपया कोणीही स्वतःवर ओढुन घेवु नये. घेतल्यास.................. काही फरक पडत नाही.
<<

बाँड् भौ,

आंगवर उनं तर शिंगवर लेवानी आदत शे आम्हले.

धर्म ना नाववर वस्कन आंगवर येतस, त्या बठ्ठा लोके तालीबानी र्‍हातंस. तो तुम्हना आदर्श शे का? का तुम्हले बी तालीबान स्टाईलमा हिंदू धर्म आन हिंदूस्थान बी चालाडाना शे?

मद्रसेत देतात तस्सेच धर्मशिक्षण भारतात द्यावे. पाकिस्तानात जसा १९४७ पूर्वीचा इतिहास गायब करून, मुसलमानांचाच बहुतांशी फॅब्रिकेटेड शिकवतात, तसा आपणही मोगलांचा गायब करून फक्त हिंदूंचा शिकवावा. अगदी राणी पद्मावतीची कविता इतिहास म्हणून खपवावी, असल्या कन्सेप्ट्स तुम्हास विकल्या गेल्या आहेत काय? Are you sold on them?

शिरपूरना शेत ना तुम्ही? अजून बी अमरिशभाईच शेतस तठे. जाईसन त्याहिस्नं विकास माडेल दखि यात येक डाव.

Pages