दशहरा काही दंतकथा

Submitted by अविनाश जोशी on 7 October, 2017 - 04:05

दशहरा काही दंतकथा

माझ्या एका लेखात दसऱ्याला दशहरा हा शब्द वापरला आहे. शब्द वापरताना मला विशेष काही वाटले नाही पण काहींना तो शब्द खटकला. दशहरा हा शब्द संस्कृत असून व्युत्पत्ती शास्त्राप्रमाणे त्याचे दोन अर्थ होतात.

दश (दहावा)+ अहर (पाय मोडता अ आहे) अर्थ दिवस = दहावा दिवस
दुश (अपभ्रश) दुष्ट, पापी, पाप + हर (नष्ट करणे, निर्मूलन करणे) = वाईट गोष्टींचा नाश

त्यामुळे दशहरा शब्दाला अजून काही किनार नसावी
दसऱ्याच्या दंतकथांबद्दल काहींनी विचारले आहे. मला माहिती असलेल्या पाच खालील प्रमाणे ..
१. महिषसुराचा वध
ही कथा बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. बंदासुर दैत्य आणि त्याचे दोन सरदार चंडा आणि मुंडा हे अतिशय त्रासदायक ठरल्यावर दुर्गेने कालीचे रूप घेतले. बंडासुर हा महिष (रेडा) स्वरूपात वावरत असल्याने त्याला महिषसूर म्हणत. आणि याच नावावरून त्याच्या गावाला म्हैसूर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. नऊ दिवस आणि नऊ रात्रीच्या घनघोर युद्धानंतर कालीने राक्षसांचा एका टेकडीवर वध केला. ज्या टेकडीवर वध केला त्या टेकडीला चामुंडा हिल्स आणि देवीला चामुंडेश्वरी नाव पडले. आणि हा दिवस विजयादशमी किंवा दशहरा म्हणून प्रसिद्ध झाला. वाडियार कुटूंबाची (म्हैसूरचे राजघराणे ) चामुंडेश्वरी कुलदैवत झाली . आणि या कारणामुळेच म्हैसूरचा दशहरा अत्यंत उत्साहात साजरा होतो.
२. राम रावण युद्ध
रामाने नऊ दिवस देवीची आराधना केली आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
३. पांडवांचा अज्ञातवास
जुगारात हरल्यामुळे पांडवांना बारा वर्ष वनवासानंतर एक वर्ष अज्ञातवासात जायचे होते. विराट नगरीत अज्ञातवास करताना पांडवांनी शस्त्रे वन्नी (शमी) च्या झाडावर लपून ठेवली होती. अज्ञातवास सपंतांना विराट राजाचे गोधन कौरव पळवून नेत होते. पांडवांनी वन्नीच्या झाडाची पूजा करून शस्त्रे काढली आणि विराट राजाला गोधन परत मिळवून दिले. तो दिवस म्हणजे दसरा.
म्हैसूरचे वडियार राजघराणे स्वतःला पांडवांचे/यादवांचे वंशज समजतात आणि त्यामुळे बहुतेक समारंभात शमीच्या झाडाची पूजा होते.
इथे एक वडियार कुटुंबाची चमत्कारिक हकीकत आठवली म्हणून सांगतो . वडियार राजाने तिरुमला राजाला मारून त्याचे राज्य घेतले. त्याच्या बायकोला अलमेलम्मा दागिने काढायला भाग पाडले तिने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आणि मरताना शाप दिला की म्हैसूरच्या राजघराण्याला मुलं होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चारशे वर्षात बहुतेक वेळेला दत्तक पुत्र घेऊनच म्हैसूरचे राजघराणे चालू आहे. .
४. कौत्साची गुरुदक्षिणा
कौत्स नावाचा देवदत्त ब्राम्हणांचा मुलगा होता. तो वरतंतू नावाच्या गुरुकडे पैठणला शिक्षण घेत होता. चौदा वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने गुरुदक्षिणा द्यायची इच्छा व्यक्त केली. वरतंतूने पहिल्यांदा नकार दिला पण नंतर कौत्साची परीक्षा घेण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली. प्रत्येक वर्षाच्या शिक्षण पोटी एक कोटी सुवर्ण मोहरा अशा चौदा कोटी सुवर्ण मुद्रा त्याने मागितल्या. कौत्स रघुराजाकडे गेला. रघु राजा हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कौत्साने त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
रघुराजाने नुकताच विश्वजीत यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान केले होते. त्याने कौत्साकडे तीन दिवसाचा वेळ मागितला आणि इंद्रावर स्वारी करून सुवर्ण मुद्रा मिळवायचे ठरवले. इंद्राला हे समजताच त्याने कुबेराला शमी आणि आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितलं. त्या संपूर्ण सुवर्ण मुद्रा घेऊन कौत्स वरतंतू कडे गेला. पण त्याने चौदा कोटीं चं सुवर्णमुद्रा ठेऊन घेतल्या कौत्साने उरलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबांना वाटल्या. तेव्हा पासून आपट्याची पानं सोने म्हणून देण्याची प्रथा आहे.
५. गायत्री देवीची बारा वर्षे तपस्या केल्यानंतर ही ती प्रसन्न न झाल्यामुळे शंकराचार्यांनी तपस्या सोडायचे ठरवले. ते उठणार तोपर्यंत त्यांना गायत्री देवीची मागून हाक ऐकू आली. शंकराचार्य तिला म्हणाले इतका वेळ तू आली नाहीस आता येऊन काय उपयोग? गायत्री देवी म्हणाली मागे वळून पहा त्यांनी मागे वळून पहिले तर जंगले आणि डोंगरांनी प्रदेश व्याप्त होता. गायत्री त्यांना म्हणाली तुझी पहिली हाक एकल्यावरच मी निघाले होते पण तुझ्या गत जन्माची पापे ओलांडेपर्यंत माझा एवढा वेळ गेला. त्यानंतर शंकराचार्यांनी गरजू लोकांकरिता सुवर्णवर्षाव करायला सांगितला. दंत कथेनुसार हा वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला त्यामुळे आपट्याला सोने म्हणायची पद्धत झाली. (शन्कराचार्याच्या ऐवजी दुसरे नाव असण्याची शक्यता आहे.) उप दंत कथेत सुवर्णवर्षाव आवळ्याच्या स्वरूपात झाला .
लेखन सीमा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाय मोडता अ आहे >>
हे भारी आहे. असे अक्षर पण माहीत नव्हते. तुमच्या प्रत्येक लेखात काही न काही नवीन मिळतच असते.

असे जर एखादा शब्द संस्कृत भाषेत बरोबर आहे म्हणून मराठी शब्द न वापरता तो तसा संस्कृतातलाच वापरायचा असेल, तर मग मुळात मराठी भाषातरी कशाला वापरायची?
संस्कृतच वापरु ना?

ज्या टेकडीवर वध केला त्या टेकडीला चामुंडा हिल्स
>>
हे आजच्या मिश्र भाषेत झाले. जेव्हा हे सगळे झाले तेव्हा हिल्स वगैरे नव्हते हो. त्याचा संस्कॄत शब्द असेल ना? किंवा ते गावकरी किंवा काली माता जी कोणती भाषा बोलत असेल ती असेल ना? दशहराचे स्पष्टीकरणदेण्यासाठी खास नवा धागा काढला आणि त्यात हिल्स?

<<<<संस्कृतच वापरु ना?>>>>
<<<<हे आजच्या मिश्र भाषेत झाले. जेव्हा हे सगळे झाले तेव्हा हिल्स वगैरे नव्हते हो. त्याचा संस्कॄत शब्द असेल ना? किंवा ते गावकरी किंवा काली माता जी कोणती भाषा बोलत असेल ती असेल ना? दशहराचे स्पष्टीकरणदेण्यासाठी खास नवा धागा काढला आणि त्यात हिल्स>>>

लेख आजकालच्या काळात लिहीला आहे ना, म्हणून आ़जकालची भाषा - त्याला मिश्र भाषा म्हंटले तरी ती मराठीच आहे.
मराठीत तर आ़जकाल जुने संस्कृतमय शब्द वापरण्या ऐवजी इंग्रजी, उर्दू कुठल्याहि भाषेतले शब्द जसेच्या तसे चपखलपणे वापरतात. त्याला मराठी प्रतिशब्द असले तरी ते वापरण्यात लोकांना कमीपणा वाटतो. आजकालचे मराठी बोलणार्‍या पुष्कळ लोकांना ते माहितच नसतात किंवा त्या आधी इतर भाषेतील शब्दच पटकन तोंडत येतात.
आता हिल्सला एखादे संस्कृत भाषेतले नाव असले तरी ते वापरले तर मराठी बोलणारे पुष्कळ लोक म्हणणार - म्हणजे काय? नि अर्थ सांगितला तर म्हणतील - शी:, मग हिल्सच म्हणा ना!

बरं, संस्कृत तर संस्कृत. संस्कृत मधे स्वरांचे पाय मोडता येतात हे माहीत नव्हतं. अशी आणखी काही उदाहरणे द्याल का संस्कृत वा मराठीत?

हल्ली असल्या फालतू कंमेंट्स खूप असतात, मराठीच लिहा , दुसरी लँग्वेज नको.. काय फरक पडतो जर भावना पोचत असतील तर?

आपट्याची पाने वाटायची प्रथा मग महाराष्ट्रातच का?
जरी कोत्स पैठण ला असला तरी रघु राजा तर उत्तरेचा असेल ना?
शंकराचार्य कथेत तेच?

शिवाजी महाराजांनी आपट्याची पाने लुटल्याचे उल्लेख आहेत का? जसे शिलांगण चे आहेत.

{पाय मोडता अ आह} - इथवर वाचून मी सरळ प्रतिसादांकडे वळलो.

सोनू+१.

आपट्याची पाने वाटायची प्रथा >>>
आपट्याच्या पानाची प्रथा फक्त महाराष्ट्रात सापडते. शिवाजी महाराजांनी ह्या प्रथेचा वापर केल्याची काही माहिती उपलब्ध नाही(कदाचित ते खरं सोन लुटत असावेत Happy ) महाराष्ट्रात आपट्याची पाने दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आणि इतर दिवशी तेंदू पानासारखी बिडीला वापरतात.
उत्तर रामचंद्रांच्या विजयाने भरलेला असतो. रामलीला रावण दहन असे कार्यक्रम जास्त असतात. पूर्व आणि उत्तर पूर्व भाग दुर्गा पूजेत मग्न असतो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे वीर वृत्तीचे प्रदर्शन करतात. आपल्याकडे सुद्धा जेजुरीचा खंडा (४२ किलोची तलवार) दशमीला उचलण्याची प्रथा आहे. महानवमीला शस्त्र पूजनही होते.
हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद

शिवाजी महाराज माहित नाही,
पण पेशवे काळात दसर्याला गावाच्या सीमे बाहेर जाऊन शमी ची पूजा करून (पांडवांच्या संदर्भात) ती पाने पागोत्यात खोचाल्याचे वाचले आहे.

दुसरा मुद्दा विजया दशमी, दिवाळी आणि गुढी पाडवा.
विजयादशमी ला रावण मारला
२० दिवसात दिवाळी ला रामाचा राज्याभिषेक झाला असे मानतात
राम आयोध्येत आला म्हणून लोकांनी गुढया उभारल्या असे म्हणतात ते ९० दिवसा नंतर.
मला हे गणित कधी कळले नाही,
(नॉट that त्याने काही फरक पडनार आहे आयुष्यात पण , आता विषय निघालाच आहे म्हणून विचारतो)

महाराष्ट्रात आपट्याची पाने दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आणि इतर दिवशी तेंदू पानासारखी बिडीला वापरतात.>>>>>

म्हणूनच पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत असे म्हणतात का

राम आयोध्येत आला म्हणून लोकांनी गुढया उभारल्या>>>
हो पण तो गुढीपाडवा नव्हता.
कुठल्याही गोष्टीचे स्वागत करणे म्हणजे गुढी उभारणे. पूर्वी एखादा राजा लढाई जिंकून आला किंवा राजाचे लग्न समारंभात पण गुढ्या उभारल्या जायच्या.
गुढीपाडवा शब्दात पाडवा शब्द महत्वाचा. पाडवा म्हणजे प्रतिपदा. नवीन वर्षाचे आगमन . दक्षिणेकडे या दिवसाला उगादी म्हणतात. शालिवाहन राजाने पहिल्या शतकात याच दिवशी हुन लोकांचा पराभव केला. त्या निमित्ताने शालिवाहन शक सुरु झाला

राम आयोध्येत आला म्हणून लोकांनी गुढया उभारल्या असे म्हणतात ते ९० दिवसा नंतर.
मला हे गणित कधी कळले नाही,
>>
गुढ्या फक्त महाराष्ट्रातच उभारतात. उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे कुठेही ही पद्धत दिसत नाही.

राम श्रीलंकेहुन अयोध्येला पुष्पक विमानाने, अधेमधे हॉल्ट घेत २० दिवसांनी अयोध्येत पोहचला म्हणून तिथे दिवाळी साजरी केली.
राम अयोध्येत पोहचला आहे, तेव्हा विजयोत्सव साजरा करा असे सांगणारा दूत्/बातमीदार महाराष्ट्रात पोहचायला ९० दिवस लागले असावे. हा दूत पायी आणि हॉल्ट घेत घेत आला असावा. महाराष्ट्रात ही बातमी गुढीपाडव्याला आली म्हणून पाड्व्याला गुढ्या उभारतात.
हे असे काही लॉजिक असावे का? Wink

पण त्या काळी महाराष्ट्र होताच कुठे. दंडकारण्य आणि त्यात राहणारे काही भिल्ल अदिवासी. त्यांना सांगायला अयोध्येवरून माणूस पाठवावा इतके महत्व का असावे त्यांना.

आणि मग येता येता उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशवरूनही आला असेल. तिथे नाही सांगितले गुढ्या उभारायला, फक्त महाराष्ट्रात. खालीही गेला नाही दक्षिणेत कुठे.

असे का म्हणे

येता उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशवरूनही>>>
काही दिया परदेस नंतर हल्ली उत्तर प्रदेशात गुढ्या उभारणे (आणि वडापाव खाणे) सुरू झाले म्हणतात

आशु, प्रतिसाद एडिट करुन स्मायली टाकली आहे. त्यावरुन असे लॉजिक लावण्या मागचे लॉजिक काय आहे हे ओळखावे. Happy
बाकी सोन्याचा धूर तर मस्तच!

सोन्याचा धूर ची वेगळी थिअरी मे ऐकली होती,
खूप खूप पूर्वी सोनोपंत आपटे म्हणून एक गृहस्थ स्मोक साईन्स देण्यात कुशल होते, पुष्पक विमान उतरवण्यासाठी उडपट्टी कुठे आहे हे सांगण्यासाठी याच साईन्स वापरायचे.
त्यांचे परिचित त्यांना "सोन्या" म्हणत
त्यावरून सोन्याचा धूर ही संकल्पना आली,

साक्षात रामराण्याला टेक ऑफ ला मदत केल्याने त्याची आठवण जिवंत राहावी म्हणून सोने आणि आपट्याची पाने यांचे असोसिएशन केले गेले.

आणि सोनोपंत लोकल इंटिटी असल्याने ही प्रथा फक्त महाराष्ट्रात राहिली.

खूपच रोचक कथा सिम्बा.
आणि सोनोपंत लोकल इंटिटी असल्याने ही प्रथा फक्त महाराष्ट्रात राहिली. >> हे बरेचदा पाहिलेय. लोक राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होण्याऐवजी लोकल स्तरावर होतात. राम पुष्पक विमान घेऊन दंडकारण्यात / महाराष्ट्रात आला नसावा कारण वनवासानंतर श्रीलंका नी नंतर थेट अयोध्या. पण तरीही दंडकारण्यात / महाराष्ट्रात लोक आठवण अशी साजरी करतात.

हरि अनंत हरि कथा अनंता। कहहिं सुनहिं बहुबिधि सब संता॥
रामचंद्र के चरित सुहाए। कलप कोटि लगि जाहिं न गाए॥

राम सिया राम सिया राम जय जय राम.....

नाही नाही,
रामाने लंकेतुन महाराष्ट्रात एक स्टॉप घेतला,
इकडे फक्त जंगल असल्याने विमान उतरवायची जागा शोधणे खूप कठीण होते,
तेंव्हाच सोनोपंतांनी धूर काढून मदत केली, म्हणून त्यांचे नाव उभ्या महाराष्ट्राला ठाऊक झाले.

दश (दहावा)+ अहर (पाय मोडता अ आहे) अर्थ दिवस = दहावा दिवस

>>> हे वाचलेच नव्हते. लै जबरी आहे. हे सर्व शिकवणारा संस्कृतचा क्लास कोठे असतो. मला फारा दिवसांची इच्छा आहे संस्कृत शिकायची.

राम पुष्पक विमान घेऊन दंडकारण्यात / महाराष्ट्रात आला नसावा कारण वनवासानंतर श्रीलंका नी नंतर थेट अयोध्या.
>>
रामाला विमानाने श्रीलंकेतून अयोध्येला यायला २१ दिवस का लागले? फार फार तर २-३ तास लागले असावेत. त्रेतायुगातले विमान समजुन आपण १ दिवस धरु.
मग बाकीचे २० दिवस राम कुठे होता?

राम नक्कीच विमानातून भारतभ्रमण करत होता. त्याला माहिती होते की एकदा अयोध्येत गेलो की राज्यकारभाराच्या गुंत्यातुन वेळ मिळणार नाही तेव्हा त्या आधीच देश फिरुन येऊ.

किंवा असेपण असावे की अयोध्येत लँडिंग करायला विमानतळच नसल्याने २० दिवस विमान हवेतच अयोध्येवर घिरट्या घालत राहिले. तो पर्यंत भरताने २० दिवसात विमानतळ बांधुन घेतले असावे.

राम कर्तव्यदक्ष राजा असल्याने तो इथेतिथे फिरण्यात वेळ वाया घालवनार नाही, म्हनून मला दुसरे कारणच जास्त पटतेय. Happy

म्हणजे विमानाचा शोध भारतात नाही, तर लंकेत लागला असं म्हणायचंय ना राहुल१२३ तुम्हांला?
बिभीषणाने विमानासोबत टेक्नॉलॉजीही ट्रान्सफर केली की नाही?

माझा तिसरा तर्क. रामाला १४ वर्षांचा वनवास होता. ती १४ वर्षं संपल्यावरच तो अयोध्येला परतला. मध्ये लंकेत गेल्याने वनवास ब्रेक झाला होता, तेव्हा आणखी कोणत्या तरी वनात त्याने कॉम्पेन्सेट केलं.

नाही हो,
दशमीला रावण मारला,
मग सीताशुद्धी, मग बिभीषणाला सुतक होते 13 दिवस, त्यानंतर त्याचा राज्याभिषेक,
14 दिवस यातच गेले बघा,

मग pure नॉस्टॅल्जिआ म्हणून दंडकारण्यात एखाद्या ठिकाणी भेट,
निअरेस्ट एअरपोर्ट पासुन अयोध्येत प्रवास यात पुढचे 6 दिवस गेले.

टेकनोलॉजि ट्रान्सफर करायला बिभीषणाकडे तरी कुठे होती?
मुळात कुबेराचे विमान रावणाने रेडी to फ्लाय अवस्थेत लंकेला नेले राफेल सारखे,
पुढे कुबेर पण पळून गेला त्यामुळे टेकनोलॉजि चे काय झाले ते कळले नाही

Pages