दशहरा काही दंतकथा

Submitted by अविनाश जोशी on 7 October, 2017 - 04:05

दशहरा काही दंतकथा

माझ्या एका लेखात दसऱ्याला दशहरा हा शब्द वापरला आहे. शब्द वापरताना मला विशेष काही वाटले नाही पण काहींना तो शब्द खटकला. दशहरा हा शब्द संस्कृत असून व्युत्पत्ती शास्त्राप्रमाणे त्याचे दोन अर्थ होतात.

दश (दहावा)+ अहर (पाय मोडता अ आहे) अर्थ दिवस = दहावा दिवस
दुश (अपभ्रश) दुष्ट, पापी, पाप + हर (नष्ट करणे, निर्मूलन करणे) = वाईट गोष्टींचा नाश

त्यामुळे दशहरा शब्दाला अजून काही किनार नसावी
दसऱ्याच्या दंतकथांबद्दल काहींनी विचारले आहे. मला माहिती असलेल्या पाच खालील प्रमाणे ..
१. महिषसुराचा वध
ही कथा बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. बंदासुर दैत्य आणि त्याचे दोन सरदार चंडा आणि मुंडा हे अतिशय त्रासदायक ठरल्यावर दुर्गेने कालीचे रूप घेतले. बंडासुर हा महिष (रेडा) स्वरूपात वावरत असल्याने त्याला महिषसूर म्हणत. आणि याच नावावरून त्याच्या गावाला म्हैसूर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. नऊ दिवस आणि नऊ रात्रीच्या घनघोर युद्धानंतर कालीने राक्षसांचा एका टेकडीवर वध केला. ज्या टेकडीवर वध केला त्या टेकडीला चामुंडा हिल्स आणि देवीला चामुंडेश्वरी नाव पडले. आणि हा दिवस विजयादशमी किंवा दशहरा म्हणून प्रसिद्ध झाला. वाडियार कुटूंबाची (म्हैसूरचे राजघराणे ) चामुंडेश्वरी कुलदैवत झाली . आणि या कारणामुळेच म्हैसूरचा दशहरा अत्यंत उत्साहात साजरा होतो.
२. राम रावण युद्ध
रामाने नऊ दिवस देवीची आराधना केली आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
३. पांडवांचा अज्ञातवास
जुगारात हरल्यामुळे पांडवांना बारा वर्ष वनवासानंतर एक वर्ष अज्ञातवासात जायचे होते. विराट नगरीत अज्ञातवास करताना पांडवांनी शस्त्रे वन्नी (शमी) च्या झाडावर लपून ठेवली होती. अज्ञातवास सपंतांना विराट राजाचे गोधन कौरव पळवून नेत होते. पांडवांनी वन्नीच्या झाडाची पूजा करून शस्त्रे काढली आणि विराट राजाला गोधन परत मिळवून दिले. तो दिवस म्हणजे दसरा.
म्हैसूरचे वडियार राजघराणे स्वतःला पांडवांचे/यादवांचे वंशज समजतात आणि त्यामुळे बहुतेक समारंभात शमीच्या झाडाची पूजा होते.
इथे एक वडियार कुटुंबाची चमत्कारिक हकीकत आठवली म्हणून सांगतो . वडियार राजाने तिरुमला राजाला मारून त्याचे राज्य घेतले. त्याच्या बायकोला अलमेलम्मा दागिने काढायला भाग पाडले तिने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आणि मरताना शाप दिला की म्हैसूरच्या राजघराण्याला मुलं होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चारशे वर्षात बहुतेक वेळेला दत्तक पुत्र घेऊनच म्हैसूरचे राजघराणे चालू आहे. .
४. कौत्साची गुरुदक्षिणा
कौत्स नावाचा देवदत्त ब्राम्हणांचा मुलगा होता. तो वरतंतू नावाच्या गुरुकडे पैठणला शिक्षण घेत होता. चौदा वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने गुरुदक्षिणा द्यायची इच्छा व्यक्त केली. वरतंतूने पहिल्यांदा नकार दिला पण नंतर कौत्साची परीक्षा घेण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली. प्रत्येक वर्षाच्या शिक्षण पोटी एक कोटी सुवर्ण मोहरा अशा चौदा कोटी सुवर्ण मुद्रा त्याने मागितल्या. कौत्स रघुराजाकडे गेला. रघु राजा हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कौत्साने त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
रघुराजाने नुकताच विश्वजीत यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान केले होते. त्याने कौत्साकडे तीन दिवसाचा वेळ मागितला आणि इंद्रावर स्वारी करून सुवर्ण मुद्रा मिळवायचे ठरवले. इंद्राला हे समजताच त्याने कुबेराला शमी आणि आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितलं. त्या संपूर्ण सुवर्ण मुद्रा घेऊन कौत्स वरतंतू कडे गेला. पण त्याने चौदा कोटीं चं सुवर्णमुद्रा ठेऊन घेतल्या कौत्साने उरलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबांना वाटल्या. तेव्हा पासून आपट्याची पानं सोने म्हणून देण्याची प्रथा आहे.
५. गायत्री देवीची बारा वर्षे तपस्या केल्यानंतर ही ती प्रसन्न न झाल्यामुळे शंकराचार्यांनी तपस्या सोडायचे ठरवले. ते उठणार तोपर्यंत त्यांना गायत्री देवीची मागून हाक ऐकू आली. शंकराचार्य तिला म्हणाले इतका वेळ तू आली नाहीस आता येऊन काय उपयोग? गायत्री देवी म्हणाली मागे वळून पहा त्यांनी मागे वळून पहिले तर जंगले आणि डोंगरांनी प्रदेश व्याप्त होता. गायत्री त्यांना म्हणाली तुझी पहिली हाक एकल्यावरच मी निघाले होते पण तुझ्या गत जन्माची पापे ओलांडेपर्यंत माझा एवढा वेळ गेला. त्यानंतर शंकराचार्यांनी गरजू लोकांकरिता सुवर्णवर्षाव करायला सांगितला. दंत कथेनुसार हा वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला त्यामुळे आपट्याला सोने म्हणायची पद्धत झाली. (शन्कराचार्याच्या ऐवजी दुसरे नाव असण्याची शक्यता आहे.) उप दंत कथेत सुवर्णवर्षाव आवळ्याच्या स्वरूपात झाला .
लेखन सीमा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामाने त्या हरणाला तेव्हाच बाण मारला जेव्हा मारिच ने रामाच्या आवाजात लक्ष्मणाला हाक मारली

>>> म्हणजे हरणाची हत्या करणे हे रामाचे प्रथम उद्दिष्ट नव्हते..... राम त्या हरणाची हत्या न करता सीतेला हवे असलेलं चामडं कसं काढणार होता ते नाही कळले.

तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान् वराहमृष्यं पृषतं महारुरुम्
आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ वासाय काले ययतुर्वनस्पतिम् | -रामायण (अयोध्याकांड)

जोशी याचा अर्थ सांगा पाहू

राम लक्ष्मण आणि सीता वनवासात काय खात होते भाऊ?
कंदमुळे खाऊन राह्यला ते काय ऋषीमुनी होते का? का देवाला काहीही चालत होता. >>
____________
रामाने गृहत्याग करताना राम आणि कौसल्या यांचा एक संवाद आहे. जेव्हा कौसल्या रामाला पंचपक्वानाने भरलेले ताट देते. तेव्हा राम म्हणतो 'मला आता वनवासात जावे लागणार आहे. ऋषिमुनींसारखे कंदमुळे फळ खाऊन जिवन व्यतीत करावे लागणार आहे. त्यामुळे हे पंचपक्वान मला नको.
म्हणजे हरणाची हत्या करणे हे रामाचे प्रथम उद्दिष्ट नव्हते..... राम त्या हरणाची हत्या न करता सीतेला हवे असलेलं चामडं कसं काढणार होता ते नाही कळले. >>> जे झालच नाही त्याबद्दल तुम्ही किंवा मी काहीही तर्क करु शकतो पण ते उपयोगाचे नसतात. मी बुद्धीजीवी आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो तो. त्यामुळे सॉरी .

ओ बंधो....
कुणी लढवत असलेल्या तर्काचा काहीच प्रश्न नाहीये इथे. पण श्लोक देऊन आता तुम्हीच अडकलात त्यामुळे विषय बदलू नका.

१. मुदलात राम त्या मृगाच्या मागे का गेला?
२.सीतेला त्या मृगाचे चामडे हवे होते हे वाल्मिकीकृत रामायणात लिहिलंय ना? म्हणूनच तीने हट्ट केला ना? (तीला ते खाण्यासाठी नको होते असे तूर्तास समजुया)

आता बोला? श्लोक टाकलाय ना?

राम हा कोदण्डधारी क्षत्रिय होता ना? दस्यु आणि अन्य राक्षसी लोकांना मारत होता ना? वनवासात असताना कंदमुळेच खायची होती तर मग धनुष्य बाण कोणाला दाखवायला घेऊन गेले होते?

अरण्यात शिकारीला जायची हिंदुराजांची हजारो वर्ष जुनी परंपरा (तीला मृगया असा मस्त शब्दही आहे) असतांना आजचे तथाकथित शाकाहारी हिंदुत्ववादी खर्‍या इतिहासाला डावलून आपल्याच मनाप्रमाणे संस्कृतीची रचना करु पाहतात तेव्हा जामच मनोरंजन होतं.

राम क्षत्रिय होता. वनात शिकार करायचा. स्वसंरक्षण करण्यासाठी धनुष्यबाण घेऊन नाही फिरायचा. लांबच्या प्राण्यांची शिकार करता यावी म्हणून वापरायचा. नाहीतर तलवार किंवा दंडुका घेऊन गेला असता.
दशरथाला शाप मिळालेला तो पण शिकारीमुळेच ना?

दशरथाची तर वेगळीच कथा... बरं का सोनुतै. म्हणे तो मृगया करायला नव्हे तर हिंसक झालेल्या, नरभक्षक झालेल्या कुणा वाघाला का सिंहाला मारायला गेला होता जंगलात. आता इतके मोठ्या राज्याच्या राजाला एक वाघ मारायला स्वतः जावं लागत असेल तर धन्यच आहे ते राज्य आणि राजा.

नाना झोपेच खोबर केलत माझ्या Happy

>> तुम्हाला प्रतिवाद करायला सॉलिड मुद्दा मिळालाय आता असं दिसतंय... म्हणून झोप बिप गुंडाळली असावी. Wink

Submitted by नानाकळा on 12 October, 2017 - 14:29 >>> बर बंधो तुम्ही म्हणताय म्हणुन मी काय झाले असते याचे उत्तर देतो. स्त्री हट्टापुढे राम त्या हरणाच्या मागे गेला असता. हरणाला मारले असते. त्याचे कातडे फाडुन काढले असते. मांस बिर्याणीत घालुन खाल्ले असते आणि मस्तपैकी ढेकर दिला असता.
हा तुम्हाला ह्ववा असलेला तर्क पण असेच झाले असते याबद्दल मी शाश्वती नाही देऊ शकत
आणि सत्य परिस्थिती तुम्हाला माहीतिच आहे.

तुम्हाला प्रतिवाद करायला सॉलिड मुद्दा मिळालाय आता असं दिसतंय... म्हणून झोप बिप गुंडाळली असावी. Wink >>> तुमच्याशी प्रतिवाद करणारे आम्ही कोण फक्त सितेने बिर्याणी साठी हरणाला मारले नव्हते इतकेच सांगायचे होते Happy

काय झाले असते याचे उत्तर देतो.

>>> काय झाले असते याचे उत्तर कुठे मागितलंय, कुणी मागितलंय? जरतर च्या गोष्टी करायच्या नसतात इथे. जे झालं ते स्पष्ट करा असे म्हणत आहे. वर दोन प्रश्न दिलेत. त्याची कारणमीमांसा करा.

काय झाले असते वगैरे कल्पनारंजन करण्याचे काम वाल्मिकमहोदयांनी विधिवत आधीच करुन ठेवले आहे.

राम हरणाजवळ जाऊन म्हणणार होता,
हे मृगराज, माझ्या पत्नीस आपल्या सुवर्णकांतीची भुरळ पडली आहे. तिच्या तेजस्वी तनूवर आच्छादली गेल्यास आपल्या कांतीचे सोने होईल (नुसती रंगाची सोनेरी राहणार नाही!). तर कृपया आपण आपल्या कांतीचा त्याग करावा. मग हरीण सापासारखी कात टाकून कृतकृत्य होऊन निघून गेले असते नी रामाने ती कात, सोनेरी कातडी सीतेला भेट दिली असती चोळीसारखी वापरायला.

- वनवासाला जाताना गंगा व यमुना या नद्या सीतेला ओलांडून जाव्या लागल्या. त्या वेळी सीतेने या नदीदेवतांची प्रार्थना करून त्यांना सांगितलं होतं की, 'चौदा वर्षांचा वनवास संपवून परत आल्यावर मी तुम्हाला सुरेचे सहस्र घट आणि मांसमिश्रित भात अर्पण करीन.
. सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता | - रामायण (अयोध्याकांड)

- रामाने सीतेला आपल्या हाताने मधु-मैरेय सुरा पाजली होती, असं रामायणात सांगितलं आहे
सीतामादाय हस्तेन मधुमैरेयकंशुचि | - रामायण (उत्तरकांड)

सोअर्स, - अन्नं वै प्राणा: (२) - चिनुक्स Wink

Submitted by सिम्बा on 12 October, 2017 - 15:44 >> हे मलाही माहितिये पण सीतेने हरिण बिर्याणीत घालण्यासाठी मागितले होते याबद्दल काही संदर्भ आहे का?? Happy

अस कुठे असत का राव मी तुम्हाला संदर्भासहीत स्पष्टीकरण द्यायच आणि तुम्ही मुळ ग्रंथात बदल करुन काहीही टाकणार हा त्या लेखकाचा किंवा पुस्तकाचा अपमान (अवहेलना ) नाही का?? Happy
आशुचैम्प सोनु सस्मित तुमच्याकडे आहे का संदर्भ???

सीतेने हरिण बिर्याणीत घालण्यासाठी मागितले होते याबद्दल काही संदर्भ आहे का?
>>> अवो म्हाराज, मंग कशापायी मागितलं व्हतं ते तुमीच सांगा की संदर्बासहित का काय ते!

आहो पण मागितलेले कोणी ससंदर्भ स्पष्टीकरण?
इकडे टोटल मजे मजेत चाललेलं असताना तुम्हाला उगाच पुरावे आणि सत्यशोधन करायची हुक्की आली.

सीतेने बिर्याणीत घालायला हरीण मागवले की चोळी शिवायला हरीण हवं म्हणून हट्ट धरला याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार होत्या का? की इतिहासाचे( पुरणाचे) विद्रुपीकरण होणार होते?

राहिली गोष्ट पुस्तकाचा अपमान वगैरे, ते उत्तर रामायण प्रक्षिप्त आहे असे ऑफिशिअली डिकलेर करायला लावा शंकराचार्यांना, ते जास्त अपमान करतय मूळ पुस्तकाचा.

उगाच काहीतरी लोड घेऊ नका.

Submitted by नानाकळा on 12 October, 2017 - 16:06 >>> आपले म्हणणे सिद्ध करायला जेव्हा आपल्याकडे सबळ पुरावा नसतो. त्यावेळी अशी फिलॉसॉफी वापरतात. हे एकप्रकारे हतबलता दर्शवते. देव तुमच भल करो.
जय श्रीराम Happy

सीतेने हरिण बिर्याणीत घालण्यासाठी मागितले होते याबद्दल काही संदर्भ आहे का?>>>> नाही.
पण सीतेला हरीणमांस घालुन केलेली बिर्याणी प्रिय होती असं वाचलंय. त्यामुळे ते हरीण दिसल्यावर तिला बिर्याणी खायची इच्छा झाली असावी आणि मग पुढची स्टोरी.
पण आपल्या लोकांनी त्याचं सीतेला हरणाच्या सोनेरी कातडीची चोळी करुन हवी होती वैगेरे बदल केले असावेत.
(बिर्याणी बिर्याणी वाचुन लिहुन मलाही बिर्याणी खायची इच्छा झालीय.)

आपले म्हणणे सिद्ध करायला जेव्हा आपल्याकडे सबळ पुरावा नसतो. त्यावेळी अशी फिलॉसॉफी वापरतात. हे एकप्रकारे हतबलता दर्शवते. देव तुमच भल करो.
जय श्रीराम Happy

>>> तुमचे अगदी तेच होतंय हो. तुम्हाला 'नक्की काय झाले' ह्या प्रश्नाचे उत्तर काही देता येत नाहीये. काहीतरी मोदींनी केले तसे शरसंधान करण्याचा प्रयत्न चाललाय तुमचा. धनुष्य मोडलंय तर बाण फेकून मारताय..... जा झोपा. गुडनाइट.

----------------------------------------

भारतीय ग्रामीण जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मांस खाणारे हजारो वर्षांपासून आहेत. त्यात रामाला शाकाहारी आणी अहिंसक ठरवण्याची काय बुद्धी सुचायली काय म्हाईत लोकांना. आपल्याला हवा तसा राम पाहिजे ना? मग घ्या आणि व्हा बाजूला... बाकीच्यांना कशाला विचारता तुमचा राम असा-कसा..?

जाकी रही भावना जैसी प्रभुमूरत देखी तीन तैसी.... विषय संपला.

सोनूचा प्रतिसाद वाचून राम त्या हरणाला संधी विग्रह करून संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगतोय असं समोर आलं. Lol

अजून काही वर्षांनी तसे रामायण वाचायची वेळ येऊ शकेल,

गोळाबेरीज मध्ये पुलंचा एक लेख आहे,

मारीच लंकेहून कापड विकायला आला, राम बाहेर येई पर्यंत तो बराच पुढे निघून गेला, मग रामाने बाणा वर आपला पत्ता लिहून तो बाण मारीच गेल्या दिशेला सोडला, तो चुकून मारीचाला लागला,
इकडे रावण सीतेला लंकेत खूप दुकाने आहेत सांगून लंकेत घेऊन आला,

शेवटी राम बाणाने नारळ पाडत असताना चुकून बाण खिडकीत उभ्या रावणाला लागला, आणि तो दचकून खाली पडला, म्हणून उत्तरीय तपासणीत" गवक्षातून पडून "असा शेर मिळून फाईल बंद झाली.

सरते शेवटी सीता भु-दान चळवळीत सामील झाली

Pages