नवरात्र इतिहास आणी शास्त्र

Submitted by अविनाश जोशी on 3 October, 2017 - 12:32

आपण दशहरा ते दिवाळी अंतर का मोजायचे ??
नाही !!!
दोघान्चा कालखंड महत्व वेगळे आहे. मी यथायोग्य मांडण्याचा प्रयत्न करतो
टिळकांच्या लेखनानुसार आणि उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असे म्हणतात. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावे. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो.
आपले सर्व सण ऍस्ट्रॉनॉमि वर अवलंबुन असतातं आत नवरात्रीबद्दल बघू..
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य,संयम ,उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.उमा, गौरी,पार्वती,जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी , चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत
चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात. सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते.
१. शारदीय नवरात्र
शरद ऋतूत येते म्हणून शारदीय नवरात्र. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे हि शारदीय equinox च्या जवळ म्हणजे सप्टें ऑक्ट मध्ये येते. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे.
दुर्गापूजा : बंगाल आणि त्याच्या आसपासच्या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता पंचमीच्या दुसर्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
बिहारमध्ये सप्तमीपासून नवरात्र सुरू होते.
रामाने दुर्गेची आराधना ९ दिवस केली आणि रावणावर विजय मिळवला
२. वासंतिक नवरात्र
वसंत ऋतूत येणारे नवरात्र . चैत्र शु १ ते शु ९ पर्यंत येते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे हे वासंतिक equinox च्या जवळ म्हणजे मार्च एप्रिल मध्ये यते.
सुदर्शन राजाने हे नवरात्रीचे व्रत केले आणि देवीने त्याला कौशल राज्य दिले . ह्याच्याच वंशात रामाचा जन्म झाला.
सुदर्शन
अग्निवर्ण
शीघ्रग
मरू
प्रशुश्रुवा
अंबरीश
नहुष
ययाती
नाभाग
अजा
दशरथ
राम
अशी वनशावळ आहे. त्यावरून वासंतिक नवरात्रीचे पौराणिकत्व कळेल. नवमीला रामजन्म झाला.
३. शाकंभरीचे नवरात्र
हे माघ शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. जाने फेब्रु मध्ये येते. तांत्रिक लोकांमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी हे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे. सीकेपी व गोव्यात ह्या नवरात्रीत भाज्यांची रेलचेल असते. शाकंभरी देवी बरोबर सरस्वती पूजन तर काही प्रदेशात कामदेवाचे पूजन होते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे मकर संक्रांती नंतर येणारे नवरात्र उत्तरायणाचा सुरुवात शिशिर ऋतूत. प्रजोयपादनास योग्य काळ.
४ गुप्त नवरात्र अथवा वराही नवरात्र
आषाढ शु १ ते शु ९ पर्यंत . जून जुलै मध्ये येते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे कर्क संक्रांती च्या जवळ येणारे नवरात्र . दक्षिणायनाची सुरवात. याला विठोबाचे नवरात्र हि म्हणले जाते,गुप्त नवरात्र कारण तंत्र ,जादूटोणा अशा विद्येचे अध्ययन व पुरश्चरण केले जाते. वाराही देवतेचे पूजन होते. सप्त मातृकांत या देवीची गणना होते. शुंभ निशुंभ वध केल्यावर सप्त मातृका त्यांचे रक्त पिऊन बेभानपणे नाचत होत्या अशी आख्यायिका आहे. सप्त मातृका बद्दल अनेक कथा अय्यर भारतात आहेत पण त्याबद्दल नंतर कधीतरी

इतर नवरात्रे

५ चंपाषष्ठीचे नवरात्र :
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
६. नरसिंहाचे नवरात्र :
नृसिंहाच्या सन्मानार्थ मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते.
सण व त्याचे महत्व या साठी प्रपंच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहिती जमते आहे इथे.
मलाही वराही देवी ही वराह अवताराचे स्त्रीरूपच वातले होते.
शिवाजींची भवानीभक्ती तर सर्वांनाच माहीत आहे. भवानीमातेच्या आशिर्वादानंतरच राजे सर्व महत्वाची कामे करत असत. आता दसर्याचा कार्यक्रम पाहिला कोल्हापूरचा. खूप मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. २ वर्षांपूर्वी म्हैसुर पॅलेसला दसर्याच्या आसपास जाणे झाले. तिथे तर खूपच मोठा कार्यक्रम असतो.
राम-रावण युद्ध, देवीचे युद्ध या सर्वांबरोबरच अर्जुनाने आपली शस्त्रे आपट्याच्या झाडावरून काढली तो ही हाच दिवस असतो अशी काही गोष्ट आहे ना? कोणी महाभारतातील नवरात्री व दसरा याबद्दल लिहाल का?

खुप संशोधनानंतर मला असं कळलंय की माल चढ उतार करण्याची ठिकाणी 'वाराई' घेतात. याच वाराईच फारसी रूप वराही. (ईलाही, हिलाही, तिलाही, मलाही वगैरे वगैरे)

खुप संशोधनानंतर मला असं कळलंय की माल चढ उतार करण्याची ठिकाणी 'वाराई' घेतात. याच वाराईच फारसी रूप वराही.>>>> Lol खुप संशोधनानंतर म्हणे... Rofl सॉरी राहवल नाहीये.

<<मग राम, लक्ष्मण, हनुमंत व बिभिषण यांनी स्तवन केल्यावर महिषासुरमर्दिनीचा सहावा अवतार अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मध्यरात्री राम-रावण युद्धाच्या रणांगणावर प्रकटला आणि विजयप्राप्तीचा आशीर्वाद दिला. << छान माहिती अश्विनी!

<<हनुमंत हे रामाचा दास तसेच तातही होते. << याबद्दल अजुन काही सान्ग ना! Happy

अरे लगेच संपल्या माहितीपर पोस्टी.
खुपच मनोरण्जन म्हणजे ज्ञानवर्धन झाले.
माचुपिचुची आठवण आली खरंच.

माचु पिचु हा शब्द अश्लिल डिक्लेर करावा अशी मी या निमित्ताने माबो प्रशासनाकडे मागणी करतो.

अरेरे, आर्य हे भारतीयच हे सिद्ध करण्याचे इतके प्रयास करूनही असे लेख लिहिले जातात? उद्या आर्या स्टार्कचा रेफरन्स देऊन, आर्य वेस्टरोसी होते म्हणाल (विंटर इज कमिंग हेच खरे, कारण आर्यही विंटरफेल सारख्याच कुठल्यातरी थंड भागातून आले)

रामाने दुर्गेची आराधना ९ दिवस केली आणि रावणावर विजय मिळवला...

पण रामायण मनका/ रामचरितमानस तसेच रामविजयकथासार याबद्दल वेगळेच म्हनते......

"दुर्गापूजन रावण कीनो ।
नौ दिन तक आहार न लीनो ।।
आसन बैठ किया है ध्यान ।
पतितपावन सीताराम ।।88।।
रावण का व्रत खंडित कीना । )हे काम हनुमानाने केले यज्ञातुन अर्धा रथ वर आलेला होता तोवर तो यज्ञच हनुमंताने उधवस्त केला )
परम धाम पहुँचा ही दीना ।।
वानर बोले जय श्री राम ।
पतितपावन सीताराम ।।89।।"

अरेरे, आर्य हे भारतीयच हे सिद्ध करण्याचे इतके प्रयास करूनही असे लेख लिहिले जातात? )))

खरंय, खूप दुदैर्वी आहे हे.

Enough has been said to show how leaky is the Aryan theory expounded by western scholars and accepted by Brahmins. Yet, the theory has such a hold on the people that what has been said against it may mean no more than scotching it. Like the snake, it must be killed.”

The Vedas do not support the contention that the Aryans were different in colour from the Dasas and Dasyus…..If anthropometry is a science which can be depended upon to determine the race of a people….. (then its) measurements establish that the Brahmins and the Untouchables belong to the same race. From this it follows that if the Brahmins are Aryans the Untouchables are also Aryans. If the Brahmins are Dravidians, the Untouchables are also Dravidians

वरील दोन्ही quotes डॉ आंबेडकर यांच्या आहेत. त्यांनी या विषयावर विस्ताराने लिहिले आहे ते नेटवर शोधून जरूर वाचावे.

खरंय, खूप दुदैर्वी आहे हे.
<<
अगदी अगदी.
आर्य भारतीय आहेत हे सिद्ध करण्याचे प्रयत्न खरेच दुर्दैवी आहेत. :दु:ख:

besides trying to quote Ambedkar when convenient, is more unfortunate Wink

हे यज्ञ उध्दवस्त करणे प्रकार इंद्रजिता बरोबर झाला होता ना?

माझ्या माहिति प्रमाने तरि रावनाबरोबर झाला होता..

शिव! शिव! देवीच्या नवरात्राच्या धाग्यात काय एकेक लिहितात लोक.

शिव! शिव! देवीच्या नवरात्राच्या धाग्यात काय एकेक लिहितात लोक >> मग शिव शंकर तरी कशाला देवीच्या धाग्यावर? हे राम असे लिहिले असतेत तर दसर्याच्या रामलीलेला जोडता आले असते.

आशुभाऊ, आजाराला देवीचे नाव नाही हो,
तो आजार देवी कोपल्यामुळे होतो अशी समजूत होती.

तसेच गावांमधून मरीमाय हि देवी आजारपण दूर करणारी, किंवा आरोग्य सांभाळणारी म्हणून ओळखली जाते. साथीचे आजार, त्याने होणारे मृत्यू हे मरीआई चा कोप झाल्याने होतात अशी समजूत होती.

तुम्हाला आर्यन थिअरीवरचे आंबेडकरांचे विचार मान्य नाहीत का?
<<
तुम्हाला आंबेडकर सिलेक्टिवलीच का आठवतात, याचा प्रश्न पडलाय.

मरी आई = मदर मेरी.
हिंदू धर्मात सर्व देवतांना सामावून घेतात, ते असे. मरिआईलाही क्षूद्र देवता म्हणून सामावूण घेतले आहे.

अगदी अगदी आरारा,
आधी सारा ला काली, आता मारिअम, मरी आई,
किती ओव्हरलॅप आहे सगळीकडे

सारा ला काली ला 3 सेन्ट्स ची अटेंडेंट (एक अर्थाने नोकरच) मानतात,
आपण मरीआई ला क्षुद्र देवता मानतो,
फिट्टम फाट

Pages