नवरात्र इतिहास आणी शास्त्र

Submitted by अविनाश जोशी on 3 October, 2017 - 12:32

आपण दशहरा ते दिवाळी अंतर का मोजायचे ??
नाही !!!
दोघान्चा कालखंड महत्व वेगळे आहे. मी यथायोग्य मांडण्याचा प्रयत्न करतो
टिळकांच्या लेखनानुसार आणि उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असे म्हणतात. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावे. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो.
आपले सर्व सण ऍस्ट्रॉनॉमि वर अवलंबुन असतातं आत नवरात्रीबद्दल बघू..
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य,संयम ,उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.उमा, गौरी,पार्वती,जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी , चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत
चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात. सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते.
१. शारदीय नवरात्र
शरद ऋतूत येते म्हणून शारदीय नवरात्र. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे हि शारदीय equinox च्या जवळ म्हणजे सप्टें ऑक्ट मध्ये येते. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे.
दुर्गापूजा : बंगाल आणि त्याच्या आसपासच्या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता पंचमीच्या दुसर्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
बिहारमध्ये सप्तमीपासून नवरात्र सुरू होते.
रामाने दुर्गेची आराधना ९ दिवस केली आणि रावणावर विजय मिळवला
२. वासंतिक नवरात्र
वसंत ऋतूत येणारे नवरात्र . चैत्र शु १ ते शु ९ पर्यंत येते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे हे वासंतिक equinox च्या जवळ म्हणजे मार्च एप्रिल मध्ये यते.
सुदर्शन राजाने हे नवरात्रीचे व्रत केले आणि देवीने त्याला कौशल राज्य दिले . ह्याच्याच वंशात रामाचा जन्म झाला.
सुदर्शन
अग्निवर्ण
शीघ्रग
मरू
प्रशुश्रुवा
अंबरीश
नहुष
ययाती
नाभाग
अजा
दशरथ
राम
अशी वनशावळ आहे. त्यावरून वासंतिक नवरात्रीचे पौराणिकत्व कळेल. नवमीला रामजन्म झाला.
३. शाकंभरीचे नवरात्र
हे माघ शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. जाने फेब्रु मध्ये येते. तांत्रिक लोकांमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी हे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे. सीकेपी व गोव्यात ह्या नवरात्रीत भाज्यांची रेलचेल असते. शाकंभरी देवी बरोबर सरस्वती पूजन तर काही प्रदेशात कामदेवाचे पूजन होते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे मकर संक्रांती नंतर येणारे नवरात्र उत्तरायणाचा सुरुवात शिशिर ऋतूत. प्रजोयपादनास योग्य काळ.
४ गुप्त नवरात्र अथवा वराही नवरात्र
आषाढ शु १ ते शु ९ पर्यंत . जून जुलै मध्ये येते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे कर्क संक्रांती च्या जवळ येणारे नवरात्र . दक्षिणायनाची सुरवात. याला विठोबाचे नवरात्र हि म्हणले जाते,गुप्त नवरात्र कारण तंत्र ,जादूटोणा अशा विद्येचे अध्ययन व पुरश्चरण केले जाते. वाराही देवतेचे पूजन होते. सप्त मातृकांत या देवीची गणना होते. शुंभ निशुंभ वध केल्यावर सप्त मातृका त्यांचे रक्त पिऊन बेभानपणे नाचत होत्या अशी आख्यायिका आहे. सप्त मातृका बद्दल अनेक कथा अय्यर भारतात आहेत पण त्याबद्दल नंतर कधीतरी

इतर नवरात्रे

५ चंपाषष्ठीचे नवरात्र :
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
६. नरसिंहाचे नवरात्र :
नृसिंहाच्या सन्मानार्थ मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते.
सण व त्याचे महत्व या साठी प्रपंच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिषासुरमर्दिनी म्हणजे पार्वती होती ना? कि सर्व स्त्री देवींनी एकत्र येउन हा अवतार घेतला?>>>
कवी रामकृष्ण यांनी भगवतीपाद्यपुष्पांजली नावाने लिहिलेले हे स्तोत्र आज महिषासुरमर्दिनी स्तोत्र या नावाने प्रचलित आहे. स्तोत्राचे दुसरी सवाई हे वृत्तही नेहमी वापरल्या जाणार्‍या वृत्तांमधे सर्वात मोठे / दीर्घ वृत्त आहे. याच्या प्रत्येक ओळीत 23 अक्षरे येतात. स्तोत्रात असलेल्या यमक, अनुप्रास इत्यादि अलंकारांमुळे हे स्तोत्र अतीशय गेय झाले आहे.
आदिशक्तीची महालक्षमी , महासरस्वती , महाकाली अशी रूपे आहेत. सप्तशती किंवा
चंडी पाठामध्येही तिन्ही रूपे आहेत

Sara-La-Kali नावाची देवी (सेंट) फ्रांस मध्ये पुजली जाते.
एरवी मूर्ती पूजक नसलेल्या आणि गौर वर्णीय असणाऱ्या लोकात या एकाच सावळ्या मूर्ती ची पुन्हा केली जाते.
भारतात मूळ असणाऱ्या जिप्सी लोकांनी ही देवी तिकडे नेली असे म्हणतात,
सारा-ला-काली चे सरस्वती- लक्ष्मी- काली या त्रिकुटाशी असणारे नामसाधरम्य आश्चर्यकारक आहे,

उद्या कोणी माचुपिचूवर देवीची मुर्ती सापडली असे संगीतले तर आश्चर्य वाटणार नाही

images (1).jpg

24 25 मे ला हिची यात्रा असते,
24 ला रात्री यात्रेकरू जिप्सी नाच गाणे करून रात्र जागवतात (अगदी आपल्या गरब्या सारखी)
भाविक हिला स्कार्फ वाहतात, (अगदी आपल्या खणा च्या ओटी सारखा)
25मे ला हिची मूर्ती मिरवणूक काढून समुद्रकिनारी /जलाशया जवळ आणली जाते, आणि पाण्याला स्पर्श करवतात, तेव्हा भाविक फुलांचा वर्षाव करतात.(अगदी आपल्या विसर्जन सारखेच)

अरे वा. खूप छान माहिती सिम्बा. जसे उत्तर ध्रुवावरून आर्य आले तसेच दक्षीण भारतातून भारतीयही उत्तर दिशेला असलेल्या फ्रान्समधे गेले तर!
सारा-ला-काली चे सरस्वती- लक्ष्मी- काली या त्रिकुटाशी असणारे नामसाधरम्य >> हे तर खरच आश्चर्यकारक आहे. हा दोन दिवसांचा नवरात्र महोत्सव खरच रोचक आहे.

सोनू, मला जेवढ माहित आहे तेवढ लिहिते.

महिषासुरमर्दिनीचा सहावा अवतार श्रीरामवरदायिनी आहे. हनुमंत हे रामाचा दास तसेच तातही होते. जेव्हा सर्व सैन्याचा ध्वंस झाल्यावर रावण स्वतः युद्धासाठी उतरला तेव्हा हे युद्ध प्रलयाग्नीप्रमाणे वाटू लागले. तेव्हा हनुमंतांनी श्रीरामांना त्यांच्या मूळ स्वरुपाच्या (श्रीहरि) मातेची अर्थात आदिमातेची प्रार्थना करायला सांगितले. मग राम, लक्ष्मण, हनुमंत व बिभिषण यांनी स्तवन केल्यावर महिषासुरमर्दिनीचा सहावा अवतार अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मध्यरात्री राम-रावण युद्धाच्या रणांगणावर प्रकटला आणि विजयप्राप्तीचा आशीर्वाद दिला. ह्या वरामुळे बिभीषणाला शुक्राचार्यांनी जो रावणाच्या बलस्थानाच्या विस्मृतीचा शाप दिला होता त्याचा प्रभाव नाहिसा होवून बिभीषणास सर्व आठवू लागले.

तसेच अश्विन शुद्ध पंचमीच्या रात्री रावणाच्या मातामह दुर्गम दैत्याकडून राम लक्ष्मणास दगा फटका करण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी तो त्याच्या आसुरी मायेने हनुमंताना निद्रिस्त करणार होता. पण त्या आधीच हनुमंतांनी आदिमातेचे स्तवन सुरु केले होते. तिचा वर अर्थात रावणाचा वध... ह्याच्या आड येवू पाहणार्‍या दुर्गम दैत्याचा वध करण्यासाठी ती प्रकटली व तिने परशुने कावळ्याचे रुप घेतलेल्या दुर्गमाचा वध केला. आदिमातेच्या ह्या लीलेचे वृत्त श्रीरामांना कळवण्यासाठी व राम रावणाच्या युद्धाचे वृत्त जानकीस कळवण्यासाठी आदिमातेने आल्हादिनीस (सीता, पार्वती, रुक्मिणी, लक्ष्मी, सरस्वतीचे मूळ रुप) 'लीलाग्राही' म्हणजेच 'ललिता' रुपाने बोलावून घेतले व तिचे कार्य सुरु होताच स्वतः अंतर्धान पावली. ह्या श्रीरामवरदायिनीच्या अवतारकार्यामुळे व युद्धानंतर नवमीला श्रीराम, सीता व,लक्ष्मणाने केलेल्या आदिमातेच्या वज्रमंडलपीठपूजनामुळे अश्विनातले नवरात्र सुरु झाले.

श्रीरामवरदायिनीच्या अवतारकार्यामुळे व युद्धानंतर नवमीला श्रीराम, सीता व,लक्ष्मणाने केलेल्या आदिमातेच्या वज्रमंडलपीठपूजनामुळे अश्विनातले नवरात्र सुरु झाले.
>> हे नव्हते माहीत मला. धन्यवाद केश्विनी. मला हे एकाच काळात येणारे दोन वेगवेगळे उत्सव वाटत होते.

माझ्यामाहिती प्रमाणे वराही देवता अमेरिकेतच आली ती इंग्लंड मधून. पाश्चात्य देशात ती स्त्री आणि पुरुष दोन्ही अवतारात पुजली जाते. अपभ्रंश होत होत स्त्री अवतारात ती 'पेपा' होते तर पुरुषी नाव 'जॉर्ज' असं पडलं आहे. आपल्या कडे जशा देवाच्या प्रतिमा असलेल्या अंगठ्या गंडे लाकेट असं असतं तसं अमेरिकेत पेपा अगदी लहान मुलांमध्ये ही प्रसिद्ध असल्याने त्यांच्या खेळण्याच्या आयल मध्ये पेपा जॉर्ज आणि इतर सुझी एमिली अशा देवता असतात. मुलाला वराह अवताराची गोष्ट आज सांगतो.

मुलाला वराह अवताराची गोष्ट आज सांगतो. >>
नक्की सांगा अमित. लहान मुलांना अशा देवांच्या सुरस कथा फार आवडतात. भारतातही छोटा भीम, बाल गणेश वगैरे कथा लहान मुले आवडीने पाहतात, नव्हे पारायणे करतात. शिंचान वगैरे हट्ट करणाऱ्या मुलांच्या कथा दाखवण्यापेक्षा अशा देवांच्या कथा दाखवून मुलांना स्फूर्ती देणे कधीही श्रेयस्कर.

मी ते हेडिंग नवरा, इतिहास आणि शास्त्र असंच वाचलं २/३ दा Uhoh
म्हटलं काय तरी बादरायण संबंधावर इनोदी लेख असेल Biggrin
असो...

अहो..
सारा ला काली टाईमपास म्हणून नाही लिहिले हो,
ते सगळे खरे आहे , गूगल करा

>भारतात मूळ असणाऱ्या जिप्सी लोकांनी ही देवी तिकडे नेली असे म्हणतात,
सारा-ला-काली चा भारताशी "थेट" संबंध आहे ही माहिती थोडी बरोबर, थोडी चूक वाटते.
बरोबर अशासाठी, काही हजार वर्षांपूर्वी जिप्सी लोकांना भारतासकट वेगवेगळ्या देशातून हाकलण्यात आले. त्यांच्यावर झालेला अन्याय हा वेगळा विषय आहे पण त्यांचा भारताच्या काही भागाशी संबंध होता. त्यामुळे भारतीय संस्कृती चा काही भाग तिकडे जाणे शक्य आहे.
चूक अशासाठी ती कृष्णवर्णीय आहे कारण ती ईजीप्त मधून आली आहे, भारतातून नाही. ईजीप्त मधली संस्कृती ही भारतासारखीच Polytheist होती. त्यामुळे त्यांचे रीवाज भारतातूनच आले असे ठाम संशोधन सिद्ध झाले नाही. किंवा उद्या भारतीय संस्कृतीतला काही भाग ईजिप्तमधून आला असे म्हटले तर तेही शक्य असू शकेल. ती ही संस्कृती आपल्यासारखीच पुरातन आहे.

>सारा-ला-काली चे सरस्वती- लक्ष्मी- काली या त्रिकुटाशी असणारे नामसाधरम्य आश्चर्यकारक आहे.

हे तितकेच. त्यापुढे जाऊ नका.
सारा : Sarah
ला : La (French मधे the )
काली : Kali ( Black)

मुळात ही कल्पना अश्वीन संघी या लेखकाने "The Rozabal Line" या काल्पनिक कादंबरीत मांडली आहे. (शोध निबंधात नाही) येशू क्रिस्त मेला नाही पण नंतर तो भारतात आला या कल्पनेवर आधारीत ही कादंबरी आहे. जिप्सी लोकांचा भारताशी संबंध होता यावर काहीतरी संशोधन उपलब्ध आहे. पण हे सरस्वती- लक्ष्मी- काली नामसाधर्म्य, कल्पना असून त्या पलीकडे काही सिद्ध झालेले नाही.

@वेबमास्टर @सिम्बा
ग्रुप बदलताना वेबमास्टर ने ऑडियन्स ग्रुप डिफॉल्ट च्या ऐवजी साईट यूजर केला तर बरेच प्रश्न कमी होतील असे मला वाटते.

हे म्हणजे सूर्याचं बटन बंद करून अचनक सहा महिन्यांची रात्र झाल्यासारखं वाटतंय. पुन्हा बटन दाबलं की सहा महिन्यांचा दिवस सुरू.>>>>>>>>>>>>>
बऱ्याच लोकांना ध्रुवीय दिवस आणि रात्र यांच्या बद्दल संभ्रम आहे. त्यांच्या करिता एक नवीन धागा लिहला आहे तो खालील प्रमाणे
https://www.maayboli.com/node/64116

वाराही देवी आणि लक्ष्मी देवी यांच्यात काही तरी संबंध असावा. याच्या समर्थनासाठी काही मुद्दे खालीलप्रमाणे:
१) लक्ष्मी ही धनाची देवी आहे. लहान मुले पैसे पिगी बँकेत म्हणजे वराहाच्या आकाराच्या डब्यात साठवतात.
२) लक्ष्मी ही कमाळात बसलेली असते. कमळ चिखलात उगवते. वराहाला देखील चिखल प्रिय असतो. त्याचा वास चिखलातच असतो.

१) लक्ष्मी ही धनाची देवी आहे. लहान मुले पैसे पिगी बँकेत म्हणजे वराहाच्या आकाराच्या डब्यात साठवतात.
>> हे काही पटले नाही. माझ्यामते पाश्चात्त्य देशांत डुक्कर पाळणे हे आपल्याकडचे बकरी पाळण्यासारखे आहे. बकरी ही सेविंग समजली जाते, तिला गरिबाचे एटीएम म्हणतात. तसेच डुक्कर हे देखील तिकडे समजले जात असावेत. अडीनडीला एखादे डुक्कर विकून लगेच पैसे उपलब्ध होतात म्हणून पैसे साठवण्याच्या डब्याला पिग्गिबॅन्क म्हणत असावेत. हे माझे तोडलेले तारे, खरे खोटे महित नाही.

२) लक्ष्मी ही कमाळात बसलेली असते. कमळ चिखलात उगवते. वराहाला देखील चिखल प्रिय असतो. त्याचा वास चिखलातच असतो.
>> असं काही नसावे. बादरायण संबंध आहे. कमळाच्या चिखलाचा आणि डुकराच्या चिखलाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दोन्ही चिखल व स्थाने वेगवेगळी आहेत. लक्ष्मी कमळात बसणे हे वेगळे, वराही लक्ष्मी ही वेगळी.

धन्यवाद अजय,
>>>>>
भारतीय संस्कृतीतला काही भाग ईजिप्तमधून आला असे म्हटले तर तेही शक्य असू शकेल. ती ही संस्कृती आपल्यासारखीच पुरातन आहे.>>>>
इजिप्तशीअन संस्कृती आणि भारतीय संस्कृती यात खूप साम्यस्थळे आढळतील,
बलराम जेंव्हा यात्रेला गेला होता तेव्हा तो इजिप्त मध्ये गेला होता असे म्हणतात,
आणि या संबंधाचे ठळक उदाहरण म्हणजे इजिप्त च्या राजांची राम शब्द असलेली नावे.
तसेच ते आपल्या शिरोभूषणात नागाचे मोटिफ वापरतात, बलरामास आपण शेषनागाचा अवतार मानतो. __/\__
हिंदुसंस्कृती कुठे कुठे पसरली होती हे पाहून चकित व्हायला होते.
या अशाच देवाणघेवाणीत वराहिनी सुद्धा इजिप्त ला पोचली असावी.

वराही ही महाविष्णूच्या वराह अवताराची कार्यशक्ती असावी. म्हणून ती लक्ष्मी असावी. उदा. नरसिंह अवताराची कार्यशक्ती नारसिंही, इंद्राची ऐन्द्री, सूर्याची उषा/पद्मावती, कुबेराची कुबेरी, अग्निची ज्वालादेवी, वरुणाची वरुणानी, वायुची जीवनदायिनी. शिवपुत्र कार्तिकेयाची कार्यशक्ती कौमारी, जी मोरावर बसून हातात कार्तिकेयाची दिव्य शक्ती 'देवसेना' घेवून शुंभ-निशुंभाच्या विरोधातल्या युद्धात सामिल झाली होती. महिषासुरमर्दिनीच्या तिसर्‍या अवताराच्या म्हणजे महासरस्वतीच्या ह्या सैन्याची सेनापती आल्हादिनी 'काली' स्वरुपात होती. बाकी सगळ्या निसर्गशक्ती व परमात्म्याच्या/देवगणांच्या कार्यशक्ती सैन्यात होत्या. ह्या सगळ्या मातृका.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते>>>
देवीने केवळ रामालाच वर दिला असे नाही,
तर तिने शिवाजी महाराजांना सुद्धा वर दिला होता.
महाराजांनी अफजलखानाची भेट मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ला प्रतापगडाच्या पायथ्याशी घेतली, जाण्या अगोदर त्यांनीं भवानी मातेचे दर्शन घेतले, तिने आशीर्वाद स्वरूप त्यांच्या तलावरीत प्रवेश केला, मग एक्दम त्यांना चिलखत घालण्याची आठवण झाली.
विजयादशमी ला जसे देवी रामराण्यास प्रसन्न झाली, तशीच चंपाषष्ठी ला देवी शिवाजीराजांना पावली.

मला चैत्र नवरात्र व अश्विन नवरात्राशिवाय कुठलंही नवरात्र माहित नाही. खंडोबाचं आणि शाकंभरीचं नवरात्र फक्त ऐकलं आहे. परंतु,

<<<गुप्त नवरात्र कारण तंत्र ,जादूटोणा अशा विद्येचे अध्ययन व पुरश्चरण केले जाते.>>> हे जर सप्तमातृकांमधल्या वराहीचं असेल तर वराहीच्या कार्याच्या विरोधात ह्या विद्यांचं कार्य नाही का? सप्तमातृका तर अघोरी विद्यांच्या शत्रू मानल्या जातात ना? नवजात बाळाची पाचवी/षष्ठी पूजण्यामागे त्या सप्तमातृकांचे पूजन करून बाळाचं अशुभ विद्यांपासून संरक्षण करणे हे कारण असते ना?

मल्ल्या नवरात्र आषाढ अमावास्येला म्हणजेच गटारी अमावास्येला उठते. काही लोक या दिवशी बसतात. Wink
अनेक लोक ३१ डिसेंबरला पण साजरे करतात. सोबत जागरण आणि नृत्य करतात. Happy

Pages