नवरात्र इतिहास आणी शास्त्र

Submitted by अविनाश जोशी on 3 October, 2017 - 12:32

आपण दशहरा ते दिवाळी अंतर का मोजायचे ??
नाही !!!
दोघान्चा कालखंड महत्व वेगळे आहे. मी यथायोग्य मांडण्याचा प्रयत्न करतो
टिळकांच्या लेखनानुसार आणि उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असे म्हणतात. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावे. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो.
आपले सर्व सण ऍस्ट्रॉनॉमि वर अवलंबुन असतातं आत नवरात्रीबद्दल बघू..
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य,संयम ,उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.उमा, गौरी,पार्वती,जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी , चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत
चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात. सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते.
१. शारदीय नवरात्र
शरद ऋतूत येते म्हणून शारदीय नवरात्र. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे हि शारदीय equinox च्या जवळ म्हणजे सप्टें ऑक्ट मध्ये येते. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे.
दुर्गापूजा : बंगाल आणि त्याच्या आसपासच्या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता पंचमीच्या दुसर्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
बिहारमध्ये सप्तमीपासून नवरात्र सुरू होते.
रामाने दुर्गेची आराधना ९ दिवस केली आणि रावणावर विजय मिळवला
२. वासंतिक नवरात्र
वसंत ऋतूत येणारे नवरात्र . चैत्र शु १ ते शु ९ पर्यंत येते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे हे वासंतिक equinox च्या जवळ म्हणजे मार्च एप्रिल मध्ये यते.
सुदर्शन राजाने हे नवरात्रीचे व्रत केले आणि देवीने त्याला कौशल राज्य दिले . ह्याच्याच वंशात रामाचा जन्म झाला.
सुदर्शन
अग्निवर्ण
शीघ्रग
मरू
प्रशुश्रुवा
अंबरीश
नहुष
ययाती
नाभाग
अजा
दशरथ
राम
अशी वनशावळ आहे. त्यावरून वासंतिक नवरात्रीचे पौराणिकत्व कळेल. नवमीला रामजन्म झाला.
३. शाकंभरीचे नवरात्र
हे माघ शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. जाने फेब्रु मध्ये येते. तांत्रिक लोकांमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी हे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे. सीकेपी व गोव्यात ह्या नवरात्रीत भाज्यांची रेलचेल असते. शाकंभरी देवी बरोबर सरस्वती पूजन तर काही प्रदेशात कामदेवाचे पूजन होते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे मकर संक्रांती नंतर येणारे नवरात्र उत्तरायणाचा सुरुवात शिशिर ऋतूत. प्रजोयपादनास योग्य काळ.
४ गुप्त नवरात्र अथवा वराही नवरात्र
आषाढ शु १ ते शु ९ पर्यंत . जून जुलै मध्ये येते. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे कर्क संक्रांती च्या जवळ येणारे नवरात्र . दक्षिणायनाची सुरवात. याला विठोबाचे नवरात्र हि म्हणले जाते,गुप्त नवरात्र कारण तंत्र ,जादूटोणा अशा विद्येचे अध्ययन व पुरश्चरण केले जाते. वाराही देवतेचे पूजन होते. सप्त मातृकांत या देवीची गणना होते. शुंभ निशुंभ वध केल्यावर सप्त मातृका त्यांचे रक्त पिऊन बेभानपणे नाचत होत्या अशी आख्यायिका आहे. सप्त मातृका बद्दल अनेक कथा अय्यर भारतात आहेत पण त्याबद्दल नंतर कधीतरी

इतर नवरात्रे

५ चंपाषष्ठीचे नवरात्र :
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
६. नरसिंहाचे नवरात्र :
नृसिंहाच्या सन्मानार्थ मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते.
सण व त्याचे महत्व या साठी प्रपंच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामाने दुर्गेची आराधना ९ दिवस केली आणि रावणावर विजय मिळवला >>
याबद्दल माहीत नव्हतं. रामाने रावणाला मारणे आणि दुर्गा पूजा योगायोगाने एकाच दिवशी आले असं मला वाटत होतं. राम देवीभक्त होता हे ही माहित नव्हतं. मला वाटलं होतं रामाने शिवराधाना केली.
चांगली माहिती!

>>> शुंभ निशुंभ वाढ केल्यावर सप्त मातृका त्यांचे रक्त पिऊन
वाढ? 'वध' का?
या लेखासाठी कोणते संदर्भ वापरले त्यांची यादी/माहिती देऊ शकाल का?

उत्तर ध्रुव प्रदेशात 'ऑक्टोबरमध्ये' सहा महिन्यांची रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होतो म्हणून दीप पूजन करुन दिवाळी साजरी करतात ही पण नविन माहिती आहे. ह्याची दखल घ्यायची राहिली सोनू तुमची.
बाकी नवरात्रात देवीला माळा (माळ चं अनेकवचन) इत्यादी (जरी कर्मकांड असली तरी) बघायला छान वाटतं, नॉस्टॅल्जिकही वाटतं. ह्या मागून लावलेल्या छद्म शास्त्रीय शेपटाची गरज नाही. रादर हे असं सगळ्यात कसं विज्ञान दडलेलं आहे! वाचलं की वाईट वाटतं. कारण ते अनेकदा नसतंच आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याचा आज काहीच रिलेव्हन्स नसतो.

अमित इथे भूगोलाचा नाही, इतिहासाचा विषय चाललाय. कृपया शीर्षक वाचा.

निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो. >> यात पण उत्तर ध्रुवावर पावसाळा कुठे आला विचाराल का? तीन हजार वर्षांपूर्वी भूगोल कसा होता हे तुम्हाला माहीत असेलच असे नाही ना!

असो, 4 नवरात्र याबद्दल माहित नव्हतं, दोनच माहिती होत्या.

प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असे म्हणतात. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे >>> इथे गफलत आहे की हो! यासाठी आर्य दक्षिण धृवावर असायला हवे होते मला वाटते ! Happy

>>सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस

हे म्हणजे सूर्याचं बटन बंद करून अचनक सहा महिन्यांची रात्र झाल्यासारखं वाटतंय. पुन्हा बटन दाबलं की सहा महिन्यांचा दिवस सुरू.

सहा दिवसांचे नवरात्र.... अरे हा तर मास्टर स्ट्रोक आहे.
हा सज्जड पुरावा आहे की आपल्या पूर्वजांना नेपच्युन फक्त माहितच न्हवता तर ते नेपच्युन वरुन आलेले आहेत. नासाच्या https://spaceplace.nasa.gov/days/en/ साईट नुसार नेपच्युन वर १६ तासचा दिवस असतो. म्हणजे नवरात्र १६ गुणिले ९ = १४४ तासाचं असेल.
आता १४४ तास म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे १४४ भागिले २४ = ६ दिवस.
सो सहा दिवसांचे नवरात्र हे कितीही अतार्किक वाटले तरी तो आपले पुर्वज स्पेस ट्रॅव्हल करत असत.... रादर ते नेपच्युन वरुन आलेले आहेत याचा सज्जड पुरावा आहेत.

आता नेपच्युनवर सोलॅस्टिस कधी होतो त्यावरील गणिते करुन झाली.. (म्हणजे अनुमान काढून तयार आहे, त्याला पुष्टी देणारे गूगल सर्च मिळाले) की पेपरच छापणारे. Proud

सहा दिवसांचे नवरात्न>>>
का म्हणतात माहित नाही हा प्रश्न मी अनेक जणांना विचारला पण प्रथा आहे या शिवाय उत्तर मिळाले नाही. मार्तंडने चंपा षष्टीला मणी मल्लाचा वध केला तर द भारतात आणि स्कन्द पुराणाप्रमाबे चंपा षष्टीला कार्तिकेयाचे पूजन होते.
आणि नेपच्युन वरील नवरात्र नेपच्युन वेळेप्रमाणे असेल. कारण त्यांना त्या वेळेला पृथ्वी माहीतच नसेल. Happy Happy
http://ioustotra.blogspot.in/2011/11/khandobache-navaratra.html
अमितजी धन्यवाद !! लॉजिक छान आहे

एक शंका. दिवाळी नेहमीच ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये येते. नॉर्थ पोलवर नोव्हेंबरमध्ये सूर्य उगवतच नाही. ६ महिन्यांची रात्र सुरु झालेली असते. काही गडबड आहे का ह्यात?

काही गडबड आहे का ह्यात?>>>
आर्य दक्षिण धृवावर असायला हवे होते मला वाटते ! >>>

नाही. मी नन्तर सविस्तर उत्तर देइन

हा धागा धार्मिक ग्रूपमधे हलवला आहे.
नवीन Submitted by webmaster on 4 October, 2017 - 04:42>>>>>>

Wema, हल्ली धाग्यांची हलवा हलवी जास्त फ्रिक्वेन्सी हे होते, तुम्ही सूचना टाकता, पण एकदा धागा हरवला तर त्याच धाग्यावर टाकलेला पत्ता लोकांना कसा दिसणार ब्बो?
हे म्हणजे किल्ली तिजोरीत ठेऊन तिजोरी लॉक करण्यासारखे झाले.

या साठी वेमांच्या सूचना किंवा तत्सम नावाचा वेगळा BB बनवून तो कायम पहिल्या क्रमांकावर राहील अशी व्यवस्था करावी, सगळे बदललेले पत्ते तिकडे नोंदवून ठेवा.

पुर्ण वाचले नाही अजुन. पण मराठी सण "दसरा" असतो ना?
की ते "उत्तर" ध्रुवावर राहतात म्हणुन दशहरा चालवुन घ्यायचे?

@सिम्बा
>हे म्हणजे किल्ली तिजोरीत ठेऊन तिजोरी लॉक करण्यासारखे झाले.
नाही. हा धागा सार्वजनिक होता आणि आताही आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणेच "मायबोलीवर नवीन" टॅब मधे दिसत राहील. तुम्ही ग्रूपचे सभासद असा वा नसा.
तुम्ही म्हणता ते खाजगी धाग्यांसाठी बरोबर आहे. पण त्यावर सोपा उपाय सापडला नाहीये.

अशी वनशावळ आहे. त्यावरून वासंतिक नवरात्रीचे पौराणिकत्व कळेल. नवमीला रामजन्म झाला.
<<
" पौराणिकत्व" म्हणजे काय?
गोष्टीत सांगितलेल्या "वनशावळ" वरून पौराणिकत्व कसे कळते?

>>>>नाही. हा धागा सार्वजनिक होता आणि आताही आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणेच "मायबोलीवर नवीन" टॅब मधे दिसत राहील. तुम्ही ग्रूपचे सभासद असा वा नसा.>>>

तुम्ही म्हणताय ते या धाग्या बद्दल बरोबर आहे,

काही दिवसांपूर्वी धागाकर्तीलाच धागा दिसेनासा झाला होता,

सभासद नसलेल्या गृप मध्ये धागा असेल तर "तुम्हाला परवानगी नाही" असा मेसेज येतो, तो मेसेज कोणत्या गृप चे सभासदत्व घ्या हे सांगत नाही.(atleast 7 8 दिवसांपूर्वी हे स्टेट्स होते, मधल्या काळात काही बदल केले असल्यास कल्पना नाही)
सोपा , कायमस्वरूपी उपाय सापडेल तेव्हा सापडो पण तो पर्यंत अंतरिम उपाय म्हणून अशा ग्रुपबदलाची नोंद एका धाग्यावर करावी असे वाटते.

सुदर्शन राजाने हे नवरात्रीचे व्रत केले आणि देवीने त्याला कौशल राज्य दिले . ह्याच्याच वंशात रामाचा जन्म झाला.>>
सुदर्शनच्या वनशावळीत राम आहे नी तेव्हापासून नवरात्र व दुर्गा पूजा होते असे म्हणायचे असावे त्यांना. ते पुराणकाळात असावे.
धृव कोणता ही गफलत नसावी. आर्य उत्तर ध्रुवावरूनच आले असावेत. तिथे ऑक्टोबर मधे रात्र सुरू होते की दिवस यात गफलत होण्याची शक्यता वाटतेय. एवढ्या मोठ्या अंधाऱ्या रात्रीनन्तर सूर्य उगवला तर लोक दिवे मालवतील. इथे दिवे लावून साजरे करत आहेत सण लगेच दिवाळीत तर मला वाटतं रात्र सुरू होत असावी ऑक्टोबर मधे. 6 महिने सूर्य तळपत राहणार असेल तर सगळे दिवे घासून पुसून कपाटात ठेवले जातील. पण तसेही तीस हजार वर्षांपूर्वी लोक काय करायचे त्याला आपण हल्लीच्या काळाची फुटपट्टी नाही लावू शकत. दिवे ठेवण्यापूर्वी शेवटचे लावून उत्सव साजरे करत असू शकतातच.

बरेच लोकं नवरात्र म्हणजे 9 रात्री असाच विचार करतात. नव म्हणजे नवीन या दृष्टीकोनातूनही विचार करायला हवा. जसे दिवाळीची पहिली आंघोळ असते तश्या या नवीन रात्री घटस्थापनेपासून सुरू होतात.

एक जरा अवांतर आहे पण शंका इथे विचारते. नवरात्रीत आरतीच्या वेळी `महिषासुरमर्दिनी' स्तोत्र ऐकलं. (फार सुरेख वाटत ऐकायला. बहुधा शंकराचार्यांच आहे) . त्यात देवीचे वर्णन कधी पार्वती तर कधी लक्ष्मी असे केले आहे. (http://shivu360.blogspot.in/2010/01/mahishasura-mardini-stotram.html) . पण महिषासुरमर्दिनी म्हणजे पार्वती होती ना? कि सर्व स्त्री देवींनी एकत्र येउन हा अवतार घेतला?

मग 'दशहरा' साजरा करायला परत उत्तर ध्रुवावर जायचे कि हे देशातच साजरा करून देशद्रोही म्हणवून घ्यायचे.

6 महिने सूर्य तळपत राहणार असेल तर सगळे दिवे घासून पुसून कपाटात ठेवले जातील.
>>
दिव्यांच्या अमावास्येला (म्हणजे गटारी अमावास्येला) कपाटातून दिवे काढून घासून पुसून स्वच्छ करतात आणि मग त्यांची पूजा करतात.
याचा देखील उत्तर ध्रुवावर रात्र किंवा दिवस किंवा साफसफाई करायचा दिवस (सुट्टी असल्याने) यापैकी कशाशी तरी संबंध असायला हवा.

ती अमावस्येची रात्र असेल तर रात्र आहे म्हणून सूर्य नाही नी अमावस्या असल्याने चंद्र नाही. अशावेळी दिव्यांची गरज पडू शकेल. पण ध्रुवीय प्रदेशात 6 महिने रात्र असेल तर अमावस्येची कोणती हे सांगणे कठीण आहे. तिथे गटारे असतील का हे ही शोधावे लागेल. सिंधू संस्कृतीमधे गटारे मिळाल्याचे आढळले होते बहुतेक. उत्तर ध्रुवाचे माहित नाही.

Pages